Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 12, 2007

Hitguj » Views and Comments » General » Cricket » Archive through June 12, 2007 « Previous Next »

Farend
Thursday, May 10, 2007 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारत १९८३ साली वर्ल्ड कप जिंकला त्यानंतर जेव्हा वेस्ट इंडीज टीम भारताच्या दौर्‍यावर आली तेव्हा भारतात जिंकणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने मोठी कर्तबगारी नव्हती, कारण भारत त्यांच्या पुढे जवळ जवळ आत्ताच्या बांग्लादेश सारखाच होता. पण ते ज्या खुन्नस ने खेळले आणि भारताला कसोटीमधे ३-० आणि वन डे मधे ५-० हरवले होते त्यावरून ते त्या पराभवाचा बदला घेण्यास उत्सूक होते हे उघड झाले. गावस्कर खेळला नसता तर उरलेल्या तीन कसोटीतही आपण हरलो असतो.

हे सर्व आत्ता का आठवले, तर कालच्या सामन्यांत भारतचे गलथान क्षेत्ररक्षण वगैरे ऐकून. फलंदाजी आणि गोलंदाजी सुद्धा 'बदले की आग' वाल्यांची वाटत नव्हती. हे आपले काय आहे कळत नाही, रवी शास्त्री म्हंटला होता " They will want to prove a point ", पण त्यानंतर द्रवीड ची मुलाखत " Revenge is not on our mind ", आणि जणू त्याचाच परिणाम त्यांच्या खेळावर झाल्यासारखे वाटत होते. एखादा मोठा सामना हरल्यावर 'चिडलेला' संघ जसा खेळतो तसे काल दिसले नाही.

एकूणच सहकार्‍यांना 'पेटवण्याचे' कौशल्य द्रवीड कडे दिसत नाही, किंवा आज काल हे लोक पेटतच नाहीत. मला वाटते गांगुली पहिली २-३ वर्षे काहीतरी दुसर्‍या संघा विरुद्ध बोलायचा किंवा करायचा त्याने इतर खेळाडू आपला खेळ उंचावयाचे. फलंदाजीत एखादी चूक तुमचा डाव संपवू शकते, पण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात "फायर" दिसून येते आणि मॅच चे रिपोर्ट्स पाहता काल दिसली नाही.

अर्थात रखडत का होइना पण मॅच आपण जिंकली आहे बांग्लदेश ची टीमही तितकीच ढिसाळ आहे, आणि एखाद्या सामन्यांत खूप चांगले खेळल्यावर पुढे ते ढेपाळतात, त्यामुळे भारताला त्याचा फायदा मिळेल.


Satishmadhekar
Friday, May 11, 2007 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सचिन आणि गांगुली नसतानासुद्धा आपण बलाढ्य बांगलादेशाला हरवलं. भारतीय संघ फिनिक्स पक्षासारखा राखेतून बाहेर आलेला दिसतोय. खरच ग्रेट परफॉर्मन्स! कालचा सामना बघितल्यावर पॉंटिंगला धडकी भरलेली असणार! :-)

Mandard
Wednesday, May 16, 2007 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारताने एवढा मोठा विजय मिळवला बांगलादेशाविरुद्ध तरी पण कुणाला त्याचे कौतुक नाही. ह्यामुळेच आगामी भारत पाक मालिकेला कोणी प्रायोजक मिळत नाहीत. पवारसाहेब चिंतेत असतील. बी सी सी आय चे दुकान बंद झाले तर. कपिल, मोरे झी च्या दुकानात घुसले पण. तेंडुलकर, गावस्कर मंडळींनी टक्स मधे घोटाळा केला. जाहिरातीचे उत्पन्न खेळापासुन मिळाले असे दाखवुन कर चुकवला. भिकारडी मनोव्रुत्ती. त्यापेक्षा सर्वसामान्य बरे.इमाने इतबारे कर भरतात.

Uday123
Thursday, May 17, 2007 - 6:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(कोट्याधीश) भिकारडी मनोवृत्ती किंवा दिवसाढ्वळ्या चोरी म्हणा हवतर. फ़ेरारी च्या वेळेला पण ( duty माफ़ करण्यासाठी) अर्ज खरडला होता. कोटींचा कर चुकवयचा, आणी लाखांचे दान करतो म्हणुन डांगोरा पिटायचा. संपुर्ण लक्ष खेळावर केंद्रित केल्यामुळे, अनावधानाने झाले असावे, ही शक्यता पण तशी कमीच आहे.

जे लोक इमाने-इतबारे कर भरतात, तो कष्टाचा पैसा पण कुठे जातो? बराचसा भाग हा सरकारातीलच लोकांच्या खिषात रहतो. भारतीयांचे दुर्दैव.
विषयांतराबद्दल क्षमस्व


Mukund
Tuesday, May 22, 2007 - 10:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमोल... तुझ्या विनंतीला मान देउन परत आज क्रिकेटकडे वळलो आहे...:-)

यंदाच्या क्रिकेट विश्वकरंडकातील भारतीय संघाच्या दारुण कामगीरीनंतर क्रिकेटबद्दल उत्साह वाटणे हे कुठल्याही भारतीय क्रिकेटप्रेमीसाठी कठीण गोष्ट आहे. तरी पण मी विचार करत होतो की हा माझ्यासारख्या अनेक क्रिकेटप्रेमींना क्रिकेटबद्दलचा आलेला निरुत्साह हा भारताच्या पराभवामुळे आला आहे की गेली कित्येक वर्षे या खेळाचे होत असलेल्या संगणीककरणामुळे व यामुळे खेळात आलेल्या यांत्रीकीमुळे........ का क्रिकेट अती झाल्यामुळे आला आहे?

हा विचार करत असताना माझे मन मला माझ्या क्रिकेटच्या पहिल्या आठवणींच्या भुतकाळात घेउन गेले...

१९७५-७६ चा वेस्ट इंडीज दौरा व त्या दौर्‍यात चौथ्या डावात ४०० च्या वर धावांचे लक्ष्य गाठुन भारताने मिळवलेला पराक्रमी विजय आठवला... त्याच वर्षी ओव्हलवरती गावस्करच्या द्विशतकाने हातातोंडाशी आलेला(पण न मिळालेला:-()इंग्लंडबरोबरचा सामना आठवला,१९७८-७९ मधला भारताचा पाकीस्तान दौरा आठवला ज्यात कपिलने पदार्पण केले व ज्यात पाकीस्तानच्या झहीर अब्बासने डोक्याला पट्टी बांधुन(जी त्याने डोळ्याला बांधली असती तरी चालण्यासारखी होती इतका तो सहज व अप्रतिम खेळत होता त्या सीरीजमधे!) भारताच्या चंद्रा,बेदी व वेंकट या महान फिरकी गोलांदाजांआ अक्षरश्: झोडुन काढले व त्यांची कारकिर्द्र केविलवाण्या रितीने संपुष्टात आणली.....१९७९ मधला विश्वकरंडक आठवला ज्यात विव्ह रिचर्ड्स ने शेवटच्या चेंडुवर हेंड्रीकला ऑफ़ स्टंप च्या बाहेर जात स्क्वेअरलेगच्या बाहेर चेंडुला भिरकावुन मारलेला उत्तुंग षटकार व ती त्याची बेदरकार व्रुत्ती आठवली..... भारताचा १९८३ विश्वकरंडकामधला हायली इंप्रॉबेबल विजय आठवला व त्या वर्ल्ड कप मधला रॉजर बिन्नी, मदनलाल,मोहींदर अमरनाथ,संदीप पाटील,श्रिकांत यांचा उत्स्फुर्त झेळ व न भुतो न भवीष्यती अशी कपिलची झिंबाब्वे बरोबरची १७५ धावांची अविस्मरणीय खेळी आठवली........ १९८५ मधे रवी शास्त्रीने मिळवलेला चॅंपिअन ऑफ़ चॅंपिअन्स हा किताब व त्याकरता त्याला मिळालेली ऑडी गाडी व भारताने जिंकलेला बेन्सन ऍंड हेजेस कप आठवला...आणि झालच तर तेंडुलकरची पहीली १० वर्षे आठवली ज्याचा कळस शारजाह मधे त्याच्या ऑस्ट्रेलिया बरोबरच्या १९९८ च्या अविस्मरणीय खेळींमधे आपल्या सगळ्यांना दिसुन आला. त्याची ती शारजाह मधली ओस्ट्रेलियाविरुद्ध ठोकलेली(हो ठोकलेलीच....:-)) दोन शतके व ती ठोकताना वॉर्न,मुडी व कॅस्परवीच ला पुढे येउन ठोकलेले सणसणीत षटकार कोण विसरेल?

मग मी विचार केला की या सगळ्या आठवणींमधे एक कॉमन सुत्र काय आहे? तर मला असे उत्तर सापडले की या सगळ्या आठवणींच्या मागे खेळाडुंचा उत्स्फुर्त पणा, ओरीजीनॅलीटी व खेळाबद्दलचे अनब्रायडल एंथुझियाझम होते. पण आज ते जगातल्या कुठल्याच खेळाडुंमधे दिसुन येत नाही. एक यांत्रीकीकरण सगळ्यांच्या खेळात आलेले दिसुन येते. विनींग ऍट एनी कॉस्ट! हाच मंत्र सगळीकडे दिसुन येतो. मग त्याकरता खेळाडूंनी त्यांचा नैसर्गीक खेळ व देणगी विसरुन ठरावीकच शॉट खेळुन पर्सेंटेज क्रिकेट खेळायचे असाच सगळ्यांचा कल दिसुन येतो.त्यामुळे झाले काय की असे मोजुन मापुन खेळल्यामुळे खेळातला उत्स्फुर्तपणा निघुन गेला व ओरीजीनॅलीटी र्‍हास पावली. खेळ कंटाळवाणा वाटू लागला.

या सगळ्याचे कारण म्हणज़े आज काल सगळे संघ संगणकाची मदत घेउन कोण कुठल्या शॉटला किती वेळा आउट होतो.....स्लिप व गलीच्या दरम्यान ३ क्षेत्ररक्षक लावले तर सेहवाग ८५ टक्के वेळा कसा आउट होतो, तेंडुलकर स्क़्वेअर कट मारताना ६० टक्के वेळा आउट होतो म्हणुन त्याने तो शॉटच खेळायचा नाही... तीच गत गोलंदाजांची... यष्टीपासुन १० ते १५ फुटापर्‍यंतच व ऑफ़ स्टंपच्या बाहेर फक्त २ फुट असेच टप्पे टाकुन गोलंदाजी केली तर षटकामागे तीनच धावा प्रतिस्पर्धी संघ काढू शकतो वगैरे वगैरे...

हे असे पर्सेंटेज विचारात घेउन खेळ खेळत असल्यामुळे आपल्याला १९९८ चा शारजाहतला तेंडुलकर मुकावा लागला आहे... बेदरकारपणे शेवटच्या चेंडुवर षटकार मारणारा विव्ह रिचर्ड्स सारखा खेळाडू आपल्याला परत बघायला मिळेल की नाही ही शंकाच आहे... झालच तर गावस्करसारखे फिरकीला पुढे जाउन चोप देणारे खेळाडू बघायला मिळतील की नाही हेही कठीणच वाटते व विश्वनाथसारखे.. मी स्लिपमधे झेलबाद होईन हा विचार न करता.. स्क़्वेअर कट मारणारे नैसर्गीक फलंदाज होतीलच की नाही हेही सांगता येत नाही.

आज क्रिकेटमधे १९८९ मधल्या तेंडुलकरची, १९९१ मधल्या लारासारख्याची व विव्ह रिचर्ड्सच्या १९७९ च्या बेदरकारी व्रुत्ती असणार्‍या क्रिकेटपटूंची गरज आहे की जे क्रिकेट हा खेळ म्हणुन खेळतील..मैदानावर... कोचच्या संगणकावर नाही... तरच आजच्या क्रिकेट मधे आलेली मरगळ दुर होउ शकेल असे मला वाटते...

आणी हो... ऑस्ट्रेलियाने कधी कधी वर्ल्ड कपमधे व इतर वेळीही हरुन दुसर्‍या देशांनाही विजयाची गोडी चाखायची संधी दिली तरी चालण्यासारखे आहे..:-)



Kedarjoshi
Wednesday, May 23, 2007 - 12:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोल मुकुंद.
अरे पण ऑस्ट्रेलिया हा देश क्रिकेट हा खेळ मैदाना शिवाय आणखी दोन ठिकानी खेळते. त्यांचा मनात व मिडीयात. वर अमोल ने जे राहुल द्रवीड चे उदाहरण दिले ते आपल्या टिम ला लागु पडते. "आम्ही खेळ म्हणुन खेळतो व रिव्हेन्ज घेत नाही". हारन्याच्या मनोवृती मुळे ते किलींग इन्स्टींक्ट ने खेळतच नाहीत. उलट मिडीयात त्याने जर बाग्लांदेशाचे खच्चीकरन केले असते तर ते विजय आण्खी सुखकर झाले असते. पहिल्या वन्डेत तर हारू की काय असे वाटत होत. आपल्या लोकांनी क्रिकेट हे तिन्ही ठिकानी खेळायला शिकायला पाहीजे.

मागच्या आठवड्या आफ्रीदीने परत श्रिलंकेला धुतले. तु म्हणतोस तशी बेदरकारी वृत्ती आपल्या खेळाडुंमध्ये दिसतच नाही सध्या अपवाद फक्त धोनी. मग आपण ऑस्ट्रेलियाला कसे हारवनार?


Farend
Wednesday, May 23, 2007 - 12:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे आभार मुकुंद. बरोबर आहे, विशेषत: भारतीय उपखंडातील खेळाडू आणि विंडीज मधीलही यांनी मिळवलेले बरेच विजय हे त्यांच्या त्या दिवशी उफाळून आलेल्या प्रतिभेमुळे मिळाले, process, systems, planning वगैरे मुळे नाही. सद्ध्या ते टॅलेंट कोठेच दिसत नाही. २००१ मधला मुंबई करोटीत सचिन सोडून इतरांचा खेळ दयनीय झाल्याने जी टीका झाली होती बहुधा त्याने पेटलेला लक्ष्मण, ५व्या क्रमांकावर पाठवल्यामुळे काहीतरी करून दाखवायच्या जिद्दीने आलेला द्रविड हे फार प्लॅनिंग करून असे खेळले असते असे वाटत नाही.

रिचर्ड्स असे काहीतरी म्हणाला होता की (विशेषत: इंग्लंड विरुद्ध) " I wanted to assert a black man's dominance so whenever I walked in to play I went like I owned the park ". मला असे वाटते की असे काहीतरी पेटविणारे विचार डोक्यात आणून किंवा कप्तानने बोलल्यावर बर्‍याच खेळाडूंचा खेळ उंचावतो. त्यामुळेच diplomatic बोलणार्‍या द्रविड पेक्षा गांगुली मला कप्तान म्हणून आवडतो. त्यापूर्वी जन्मात कधी कोणत्याही भारतीय संघाने पाकिस्तानात काही जिंकलेले नसताना २००४ च्या दौर्‍या आधी " If we play at 60% of our potential we will win against them " किंवा वाजपेयींनी "दिल जीतो" वगैरे पाजलेले असताना " Never mind the friendship, we are here to win " म्हणून त्याने Test and ODI series पहिल्यांदा जिंकून दाखविली (यात द्रविड चा मुख्य हातभार होता हे मान्य करूनही) हे विशेष. कप्ताना ची body language निदान मुख्य प्रतिस्पर्ध्याशी खेळताना कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे गांगुलीचा २००४ मधील कराची मधला डाव. मात्र २००४ च्या त्या सिरीज नंतर पुढे त्याला आणि एकूणच संघाला काय झाले ते एक न सुटलेले कोडे आहे.


Mukund
Wednesday, May 23, 2007 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमोल तु तुझ्या मे १० च्या पोस्टींग मधे व वरील पोस्टींगमधे द्रवीड व गांगुली बद्दल बरोबर लिहीले आहेस. मलाही गांगुली कर्णधार म्हणुन आवडायचा.

२००४ नंतर काय झाले? उत्तर साधे आहे.. ग्रेग चॅपेल व त्याने द्रवीडच्या डोक्यात शिरवलेले प्रॉसेस, सिस्टीम व (अती!)प्लानींग चे भुत!

मला तर असे वाटते की आपले बोर्डचे पदाधीकारी जेवढा वेळ कोच शोधण्यात घालवत आहेत तेवढा वेळ त्यांनी जर टॅलंटेड खेळाडु शोधण्यात घालवले तर भारतीय संघाला त्याचा अधिक फायदा होईल. कोच हे प्रकरण फारच ओव्हर रेटेड वाटते मला... भारतीय संघात स्थान मिळण्याची मजल तुमची असेल तर त्या पातळीवरच्या खेळाडुला कोच लागत नाही.. कोच केव्हा लागतो? जेव्हा तुम्ही खेळाचे बाळकडु घेत असता तेव्हा... शिवाजी पार्कवर... वानखेडेवर ऑस्ट्रेलियाशी खेळताना जर तुम्हाला कोच ची आवश्यकता भासत असेल तर तुम्ही परत शिवाजी पार्कवर जाउन खेळावे.. भारतिय संघात तुमचे स्थान डिझर्व्हींग नाही असे मला वाटते...


गावस्कर,रिचर्ड्स,लारा,तेंडुलकर असे जीनीअस कोच असल्यामुळे तयार होत नाहीत... ते जन्मावे लागतात व तसे हिरे ओळखुन काढणारे जवाहीरे लागतात. सध्याच्या आपल्या बोर्ड पदाधिकार्‍यांकडे बघुन त्यातला एक तरी जवाहीरा असेल की नाही याची शंकाच येते..


Mandard
Monday, May 28, 2007 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सचिनला झाले तरी काय. २२६ चेंडुत १२२ धावा. धोनी आल्यावर मॅच मधे जान आली.तेंडुलकरला बहुधा स्वताची विकेट वाचवुन सरासरी वाढवायची होती बहुधा. असो आपण सामना जिंकला व जफ़र जहिर चांगले खेळले. विश्वचषकाची मरगळ झटकली गेली.

Satishmadhekar
Monday, May 28, 2007 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> सचिनला झाले तरी काय. २२६ चेंडुत १२२ धावा. धोनी आल्यावर मॅच मधे जान आली.तेंडुलकरला बहुधा स्वताची विकेट वाचवुन सरासरी वाढवायची होती बहुधा.

२२६ चेंडूत १२२ धावा ही गती नक्कीच कसोटी सामन्यात कमी मानता येणार नाही. सचिनने काहीही केलं तरी त्याला शिव्याच मिळतात. पहिल्या कसोटीत लिंबूटिंबू बांगलादेशविरुद्ध दोन्ही डावात भोपळा मिळालेल्या जाफरचा तर कुणी उल्लेखही करत नाहिये. गांगुलीनेसुद्धा जेमेतेम १५ धावा केल्या. पण टीका मात्र फक्त सचिनवरच.

ज्याची सरासरी आधीच ५५ च्या पुढे आहे, तो त्याच्यात अजून काय वाढ करणार आणि वाढवून त्याला मिळणार तरी काय? सचिन वेगात खेळला तरी त्याच्यावर टीका होते. आता तो निवृत्त व्हावा म्हणून काही लोकांनी देव पाण्यात घातलेत. उद्या तो जर खरोखरच निवृत्त झाला तर हेच लोक तो घाबरून घरी बसला असं बोलायला सुरवात करतील.

सचिनने आता ८४ चेंडूत ८४ षटकार मारून नाबाद पंचशतक काढावे आणि नंतर दोन्ही डावात प्रतिपक्षाचे २० गडी बाद करून भारताला सामना एका दिवसातच जिंकून द्यावा. म्हणजे कदाचित त्या सामन्यापुरते त्याच्या टीकाकारांचे तोंड बंद होईल.


Mandard
Monday, May 28, 2007 - 7:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिश आपण मॅच पाहिली का? सचिनला स्लो खेळायचे काहीही कारण नव्हते. ते पण बांगलादेशाविरुद्ध. तो जास्तच जपुन (विकेट वाचवुन) खेळत होता. तसेच त्याची आणि जाफ़रची तुलना कशाला करता. करायची असेल तर रीकी पोटिंगशी करा. उगिच तडक भडक लिहले म्हणजे मुद्दा प्रुव्ह होतो असे नाही.

Satishmadhekar
Monday, May 28, 2007 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> सतिश आपण मॅच पाहिली का? सचिनला स्लो खेळायचे काहीही कारण नव्हते. ते पण बांगलादेशाविरुद्ध. तो जास्तच जपुन (विकेट वाचवुन) खेळत होता.

त्याला फास्ट खेळायचे सुद्धा काहीही कारण नव्हते. स्लो किंवा फास्ट चे काही मोजमाप आहे का? त्याने किती मिनिटात किंवा किती चेंडूत किती धावा कराव्यात, म्हणजे तो स्लो खेळला किंवा फास्ट खेळला हे ठरवता येईल? आणि तो कशा तर्‍हेने खेळला म्हणजे आपल्याला ठरवता येईल की तो विकेट वाचवून खेळत होता किंवा जास्तच जपून खेळत होता किंवा एकदम बेधडक खेळत होता? जरा खुलासा केला तर बरं होईल.

दुसरं म्हणजे आपल्याला सचिन स्लो खेळला हे दिसलं, पण गांगुली ३ पैकी २ डावात फेल गेला, जाफर पहिल्या कसोटीत दोन्ही दावात शून्यावर गेला, द्रविडने पहिल्या कसोटीत पहिला डाव घोषित करायला उगाचच उशीर लावला, द्रविडची कर्णधारकी खूपच बचावात्मक आहे इ. गोष्टी खुपल्या की नाही? की फक्त सचिनच संथ (!) खेळणं तेवढं दिसलं?


Mandard
Monday, May 28, 2007 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

So you want to apply same scale to Jafar,Ganguli, Dravid and Sachin. I don't except anything great from these people. So you want to say I should not except the same from Sachin also. But it is pain to see Sachin struggling for runs against Bangladeshi bowlers. Anyway I don't want to say anything more on this.

Gobu
Monday, May 28, 2007 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सचिन खुप स्लो खेळला
विशेषत्: भारताची धावसन्ख्या चान्गली असताना व तेही बान्गलादेशासारख्या टीम विरुद्ध खेळताना जरा फ़ास्ट खेळायला हवे होते


Satishmadhekar
Monday, May 28, 2007 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> सचिन खुप स्लो खेळला
विशेषत्: भारताची धावसन्ख्या चान्गली असताना व तेही बान्गलादेशासारख्या टीम विरुद्ध खेळताना जरा फ़ास्ट खेळायला हवे होते

काय फरक पडला असता अजून वेगात खेळून? सचिन एवढा संथ (!) खेळून सुद्धा बांगलादेश हरलाच ना ३ दिवसात. खरं तर ५०० झाल्यावरच भारताने डाव घोषित करायला पाहिजे होता. द्रविडने उगाचच डाव लांबवला. पहिल्या कसोटीत सुद्धा पावसाने बराच वेळ वाया गेला होता. तिसर्‍या दिवस-अखेर भारत ६ बाद ३८४ होता. तिथेच घोषित करण्याऐवजी द्रविडने चौथ्या दिवशी परत डाव पुढे सुरू केला. शेवटी थोड्या वेळाने ८ बाद ३८७ करून डाव घोषित केला. काय गरज होती ३ धावांसाठी पुढे खेळण्याची. त्यामुळे जी काही २५-३० मिनिटं वाया गेली ती जर गोलंदाजांना मिळाली असती तर बांगलादेशाला अजून लवकर बाद करता आलं असतं.



Hishubsa05
Saturday, June 02, 2007 - 1:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hiiii me abhimanyu...
mala madad pahije..kawshayak aahe.onhi mala sangtya ki mmarathit kasa lhiwaycha???i mean hw do i write in devnagri??mala kavita pan lhiwaycha aahe....tumhi yechyawar kasa lhiwlya sarve jana marathit???

Satishmadhekar
Tuesday, June 12, 2007 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बीसीसीआयवर सर्व पुढारी भरलेले आहेत. त्या कमिटीवर एकही क्रिकेट खेळलेला खेळाडू नाही. बीसीसीआय वर असलेल्या काही पुढार्‍यांचा पुर्वोतिहास बघितल्यावर मला असे वाटते की, ग्रॅहम फोर्डकडून कोच म्हणून नेमणूक करण्याकरता या पुढार्‍यांनी त्याच्या मानधनातून आपला कट मागितला असेल आणि त्याने ह्यांना पैसे चारण्याऐवजी प्रशिक्षक व्हायला नकार दिला असेल.

Farend
Tuesday, June 12, 2007 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता कोण होणार प्रश्नच आहे. की पुन्हा एक हंगामी क्रिकेट मॅनेजर आयर्लंड आणि इंग्लंड दौर्‍यावर जाणार? बहुधा, खेळणार्‍यांना पुढे पाठवून 'तोवर थोड्या वनडे खेळून घ्या, कोच मागाहून पाठवतो' सांगून हाकलणार बहुतेक :-)

Satishmadhekar
Tuesday, June 12, 2007 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> आता कोण होणार प्रश्नच आहे.

जो कोणी बीसीसीआयवरच्यांना योग्य तो कट देईल तो कोच होणार. तुम्ही देणार असाल तर तुम्ही सुद्धा होऊ शकता.

Lukkhi
Tuesday, June 12, 2007 - 11:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतीश, आज घरी फार बोलणी पडलीत त्याचं frustration इथे काढताय का?

दिवे घ्या :-)


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators