|
Bee
| |
| Wednesday, June 06, 2007 - 7:08 am: |
| 
|
मी गेल्या महिन्यात फ़्रेच वाईन पिली. पण मी योगा करतो आणि मला वमन माहिती असल्यामुळे मी घरी येऊन १२ ग्लास पाणी पिले आणि सर्व फ़्रेच वाईन काढून टाकली पोटातली
|
Mandard
| |
| Wednesday, June 06, 2007 - 8:00 am: |
| 
|
मी गेल्या महिन्यात फ़्रेच वाईन पिली. पण मी योगा करतो आणि मला वमन माहिती असल्यामुळे मी घरी येऊन १२ ग्लास पाणी पिले आणि सर्व फ़्रेच वाईन काढून टाकली पोटातली ----------------- अहो मग कशाला प्यायची:-)
|
>>> मी गेल्या महिन्यात फ़्रेच वाईन पिली. पण मी योगा करतो आणि मला वमन माहिती असल्यामुळे मी घरी येऊन १२ ग्लास पाणी पिले आणि सर्व फ़्रेच वाईन काढून टाकली पोटातली फ्रेंच वाईन काढून टाकायला १२ ग्लास पाणी? आख्खी बाटली प्यालात तर बादलीभर पाणी प्यायला लागेल!
|
Bee
| |
| Wednesday, June 06, 2007 - 9:38 am: |
| 
|
नाही ती वेळच येणार नाही... कारण अर्धा ग्लास वाईन घेतली तर माझे डोके गरगर करायला लागते. एका बाटलीत दिवसभराची झोप लागेल. फ़्रेन्च वाईनचा तो पारदर्शक जांभळा रंग आणि वाळूच्या घड्याळासारखा आकार असलेला तो काचेचा प्याला खूप आवडला.. म्हणून मी चाखून बघितली.
|
मी वरती सगळ्याचे उदाहरण वाचले. मुळात सिगरेटचे व्यसन का लागते हा मला पडलेला प्रश्न आहे. ज्यावेळेला आमच्या ग्रूपमधे सर्व मुलीनी सिगरेट ओढली तेव्हा मीही ओढली. अर्ध्या जणी खोकत होत्या. मी मात्र सराईतपणे पहिला झुरका घेतला. अर्धी सिगरेट ओढली. सगळेजण माझ्याकडे बघत होते. बास्स,,, त्यानंतर कधीच ओढली नाही. मात्र गेल्या महिन्यात मी आमच्या जवळच्या बिल्डिंगमधल्या मुलाना दुपारी शाळा चुकवून सिगरेट ओढताना पाहिलं. माझ्या तळपायाची आग मस्ताकात गेली. बिघडाअयचं व्यसन लावून घायचं पण वय असतं. या सर्व मुलाना मी सिगरेटचे दुष्परिणाम वगैरे भानगडी सांगत बसले नाही. फ़क्त नेटवरती oral cancer वाल्या लोकाचे फोटो दाखवले. आता ओढा.... त्यातला एक शहाणा म्हणे.. "हे सगळं फ़ॉरेनमधे होतं. आपल्याकडे नाही.." खारघर अम्धे cancer hospital आहे हे तो विसरला. तिथले फोटो त्याला दाखवले, मग मात्र तो गडबडला. व्यसन लागण्या आधी त्याचे दुष्परिणाम समजले तर बरे होते. वरच्या सर्वाच्या उदाहरणावरून लक्षात येते की सिगरेट सोडणे अजिबात कठीण नाही.. पण त्याचबरोबर व्यसनी माणसाचा तिरस्कार, त्याना व्यसनाक्डे ढकल्ते. सिगरेटचे व्यसन त्यातल्या त्यात त्रासफ़्दायक नाही. पण दारू ड्रग्ज वाल्याना मात्र व्यसनातून सोडवताना खूप काळजी घ्यावी लागते. एकाच वेळेला शारिरिक आणि मानसिक स्तरावर झुंजवे लागते. त्याबाबतीत कुणाचे अनुभव असतील तर कृपया शेअर करा..
|
>>> ज्यावेळेला आमच्या ग्रूपमधे सर्व मुलीनी सिगरेट ओढली तेव्हा मीही ओढली. अर्ध्या जणी खोकत होत्या. मी मात्र सराईतपणे पहिला झुरका घेतला. अर्धी सिगरेट ओढली. सगळेजण माझ्याकडे बघत होते. बापरे. ऐकावे ते नवलच. हे पुण्यामुंबईत की दुसरीकडे. पुण्यामुंबईत मुलींनी धूम्रपानाचा आनंद घेणे हे काही फार नवीन नाही. पण इतर ठिकाणी पण हे लोण पोचलं म्हणायचं.
|
Zakasrao
| |
| Wednesday, June 06, 2007 - 11:26 am: |
| 
|
म्हणून मी चाखून बघितली.>>>> बी चाखुन बघण्यासाठी अख्खा ग्लास संपवण्याची गरज होती का? सतिश जे नन्दिनी ने संगितल ते कोणत्याही कॉलेज मधे हे होउ शकत. त्यासाठी पुणे किंवा मुंबई च असल पाहिजे अस काहि नाहि. वरती रॉबिन ने जे संगितलय ते आणि लिम्बु ने संगितलेल पटत. माझा एक दोस्त आहे एकदम जिगरी दोस्त. त्याला लहान वयात बर्याच सवयी लागल्या होत्या. तो पुर्ण आहारी जायचा आणि स्वत्:ला कन्ट्रोल नव्हता करु शकत तो. त्याचा अवतार मी एका पार्टीत पाहिला होता त्याला अक्षरक्ष: ३-४ जणानी उचलुन गाडीवर मधे बसवुन न्यावे लागले होते. नंतर त्याला आमच्या ग्रुप मधे सामिल करुन घेतले व बरेच समजावुन सांगितले. तो हळु हळु त्यातुन बाहेर पडत होता. लग्न ठरल्यावर पुर्ण बाहेर पडला. लग्नानंतर ६ महिने नो सिगारेट,नो दारु,नो तम्बाखु. आणि हे सर्व तो आम्हाला खुष होउन सांगत होता. त्यामुळे आम्ही खुष झालो होतो. पण नंतर हळुहळु कं. मधे बाकि लोक्स दिसायचे ना सिगारेट वाले,तंबाखु वाले हा त्यांच्यासोबत परत त्याच वाटेला जात होता. त्याला समजावुन सांगितले होते पण व्यर्थ. नंतर तर काय घरी देखिल पुडी ठेवु लागला. नंतर एका पार्टीत त्याने इतकी पिली होती कि परत धिंगाणा. त्यावेळी त्याला एक मुलगी झाली होती. त्यावेळी मात्र त्याची नायको वैतागली होती. त्याच्या दुसर्या दिवशी मात्र त्याने परत मुलीची शपथ घेवुन पिणार नाहि असे सांगितले. पण अजुन तंबाखु सुरु आहे. सिगारेट कोणी दिली तर नक्कि घेत असेल. आणि अधेमधे पार्टी झाली तरी ड्रिंक असतेच. त्याला शपथेची आठवण करुन दिली तर तो बोल्ला कि तु फ़क्त पुढे खड्डा आहे हे सांगायच काम कर पुढे जायच कि नाहि हे मला ठरवु दे. बास त्यावेळपासुन आपुन त्या विषयाव्र त्याच्याशी काहीच बोलत नाही. पण तो जर ६ महिने कंट्रोल करु शकत असेल तर पुर्ण आयुष्यभर करु शकतो अस मला वाटत.
|
Zakasrao
| |
| Wednesday, June 06, 2007 - 11:30 am: |
| 
|
नन्दिनी तु जो मुक्तांगण चा कोर्स करतेस त्याविषयी लिहि ना इथे.
|
>>>>>> त्याबाबतीत कुणाचे अनुभव असतील तर कृपया शेअर करा.. वविच्या बीबीवर म्हशीच्या पाठीवर बसण्यातल्या धोक्याच्या सुचना शेअर केल्यात! (कारण त्या शेअर करण्यात मला धोका नवता) आता या असल्या आधिच सुनिश्चितपणे "घृणास्पद अन तिरस्करणीय" विषयावर अनुभव कोण ग लिहिणार???????? पण कधी काळी जमलच तर अनुभुती अन निरीक्षणाद्वारे काही लिहीन जरुर, फक्त वेळ मिळायला हवा!
|
लिंबुजी, मला या विषयात इंटरेस्ट आहे म्हणून मी विचारत आहे. व्यसनामुळे उद्ध्वस्त झालेले संसार मी पाहिले आहेत. व्य्सनी माणसाची स्वत्:ची होणारी अवस्था मी पाहिली आहे. म्हणून मी विचारले आहे. झकास. अरे कोर्स तरी पूर्ण होऊ दे ना... पण व्यसनी माणसाला कसं ताळ्य्वार आणायचं याचा अनुभव मात्र आहे.. (सिगरेट किंवा दारुन नव्हे,,. I am talking about Cocaine and other substances ) त्याबद्दल मात्र नक्की लिहीन,
|
१-२ पाकिटावरून दिवसाच्या २-३ वर आलो आहे. ऑफिस मध्ये सगळे सिगारेट ओढायला निघाले कि मुद्दामहुन त्यांच्याबरोबर जातो आणि पीत नाही. त्यामुळे बराच आत्मविश्वास (आणि मन:स्ताप) वाढला आहे. लवकरच सोडेन असे वाटते (झक्की म्हणाले तसे काही लोक फट्याक करुन सोडतात.. माझ्या बाबांनीच १५ वर्षांपूर्वी अशीच एके दिवशी सोडली.. एकदम.. आता त्यांना त्यांचा मुलगा सिगरेट ओढतो ह्याचा सुद्धा तिरस्कार वाटतो ) बाकी सिगरेट का सुरु केली ह्यावर मी कायम विचार करत असतो. एकदा वेळ मिळाला की शांतपणे इथे मांडेन.
|
>>>> एकाच वेळेला शारिरिक आणि मानसिक स्तरावर झुंजवे लागते. व्यसनी व्यक्तीच्या जवळच्या लोकान्ना तर झुन्जावे लागतेच लागते पण स्वतः व्यसनी व्यक्तीची सत्सदविवेकबुद्धी शाबुत असेल तर प्रत्यक्ष व्यसनाच्या आहारी असताना देखिल शुद्धित असताना अशा व्यक्तीन्ना खुप त्रास होतो! दारुचा पहिला ग्लास रिचवल्यावर पुर्णपने दारुच्या आहारी जाण्यास किती काळ महिने वर्ष लागतील ते व्यक्ति आणि परिस्थिती सापेक्ष असते! कित्येकजण वर्ष सहा महिन्यात दारुच्या आहारी जातात तर कित्येकजण मोजुन मापुन दिवसाचा कोटा ठरवुन घेत घेत पाच दहा वर्षान्नी पुर्णपणे दारुच्या आहारी गेलेले आढळतात! यातल्या कुणाची दारु सोडणे सोपे की कठिण हे सान्गता यायचे नाही! दारु बाबत (त्यापासुन होणार्या आर्थिक आणि एकन्दरीतच कुटुम्बाच्या उद्ध्वस्ततेमुळे असेल) एखदा जरी अगदी नशेतही उत्कृष्ट प्रवचन झोडु शकत असेल, स्टेजवर काम करु शकत असेल, गायन वादन कलाप्रकार सादर करु शकत असेल, शिवाय घरातही सौम्यच रहात असेल तरी दारुडा तो दारुडाच, व त्याच्याकडे तिरस्करणिय नजरेनेच बघितले जाते, त्यास कोठुनही सहानुभुतीचा लवलेश मिळत नाही, व त्यामुळे त्याची एकटेपणाची भावना अधिकच बळावत जावुन तो अधिकाधिक नशेत रहाणे पसन्द करतो! मी येवढीच घेतली हे, यवढ्याश्याने काय होत? एखाद दोन पेगने काही होत नाही उलट तब्येतीला भुक लागल्याने चान्गले अस्ते असे म्हणणारे त्या येवढ्याश्या मापाला विसरुन बाटलीच्या बाटली रिचवायला केव्हा सुरुवात करतात ते त्यान्चे त्यान्ना समजत नस्ते असे नाही! पण कोणत्याही क्षेत्रात जाणुनबुजुन चूक करीत असलेला प्रत्येक माणुस ज्याप्रमाणे स्वतःच्या मनाला फसवत रहातो, नाना लन्गड्या सबबी सान्गत रहातो, अगदी तस्सेच दारुच्या आहारी गेलेले किन्वा जात चाललेले वागत असतात! या वेळेस त्यान्ना खरोख्खरच्या मानसिक, भावनिक तसेच काहिन्च्या बाबतीत बौद्धिक आधाराची, युक्तिवादाची गरज असते, व ते देखिल त्यान्चे मनास ठेच न पोहोचविता! पण जोवर मी म्हणतो ते आणि तेच खरे, अशा भ्रमात व्यक्ती असेल तर तिचा अहंकार हळुवार पद्धतीने पण निश्चितपणे ठेचुन काढावाच लागतो अन्यथा कोणत्याही उपदेश, आधाराचा तिच्यावर काडीमात्र परिणाम होत नाही! दुसर्या शब्दात सान्गायचे तर "त्या त्या व्यसनामुळे वा व्यसनातुन" त्यान्ची त्यान्नीच बनवलेली "स्व" विषयक प्रतिमा उद्ध्वस्त करावी लागते त्याशिवाय त्या "प्रतिमेच्या" आभासातुन वैचारिक दृष्ट्या ती व्यक्ती जोवर बाहेर येत नाही, तोवर व्यसन सोडण्यासम्बन्धीच्या कोणत्याही सुचनान्चे पालन तिच्या मेन्दु कडुन होवु शकत नाही! मला पुर्ण माहित नाही, पण एकिव माहितीनुसार, वर उल्लेख केलेल्या मुक्तान्गण सारख्या सन्स्थात, पडेल ती कामे करायला लावुन, मेन्दु कायम कशात तरी गुन्तवावयास लावुन व बाह्य जगातील "मी अमका" "मी तमका" अशा प्रतिमा मोडुन काढायचा प्रयत्न केला जातो! कोणतेही व्यसन वाईटच! पण दुर्दैवाने आमच्या शिक्षण पद्धतीत "ते केवळ वाईट आणि ते करणारा त्याहुनही वाईट" या पद्धतीनेच शिकवले जाते! त्यामुळे सामान्य जनात त्यातुनही व्यसनी व्यक्ती पान्ढरपेशी असेल तर होणारी छीथू भयानक असते! तशात, अशा व्यसनी व्यक्तीच्या नाते सम्बन्धात त्याच्या या अशा अडचणीच्या परिस्थितीचा फायदा घ्यायला कोण टपले असेल तर त्या व्यक्तिच्या नजिकच्या कुटुम्बियान्च्या दृष्टिने तो भयावह अनुभव असतो! शब्दश तोन्ड दाबून बुक्क्यान्चा मार सहन करावा लागतो! सुरवातीस व्यसन लागताना, ते व्यसन आपल्या काबुत हे असा समज व्यक्तीचा असतो! तसेच त्याचे वेळापत्रकही निश्चित असते! कालान्तराने, अरे थोडीशी अजुन घेतली तर काय होते? असे होवुन अधिक घेतली जावुन, मग त्यामुळे काहीच होत नाही असे भासल्याने अधिकाचे प्रमाण वाढतच रहाते व त्याचबरोबर दिवसाच्या चौविस तासान्चेही बन्धन उरत नाही! तरीही, काही "विशेष" अपवाद सोडले प्रत्येक व्यसनी व्यक्तीची व्यसनाच्या तलफेची वेळ ठरलेली असते जी नॉर्मली सन्ध्याकाळची असते! या तलफेचा कालावधी व्यक्तीनुसार आणि त्याच्या व्यसनातील क्वान्टिटी नुसार कमी अधिक असतो जसे की कुणाकरता ही तलफ एखाद दोन तासच टिकते, तर कोण कोण दिवसचे दिवस अस्वस्थ असु शकतात! दिवसचे दिवस दारु शिवाय अस्वस्थ रहाणारे हे शेवटच्या पातळीवर पोहोचलेत असे समजण्यास काहीच हरकत नसावी. तर वरील तलफेचा कालावधीत, जर त्या व्यक्तीचे मन सौम्यपणे वा जबरदस्तीने अन्य कशात वळवले तर तो दिवस टळतो आणि असे काही दिवस टळल्यावर, दारु न पिता, किन्वा न पिल्यामुळे जाणवणारा उत्साह व्यक्तिला कळू लागतो तेव्हा ती स्वतःच त्यापासुन दुर होते! कित्येकदा, डॉक्टरान्कडुन झोपेची गोळी किन्वा तत्सम उपाय करुन तलफेची वेळ टाळु पहाणारे महाभागही अस्तित्वात हेत, पण हा उपाय नव्हे! वरील मुक्तान्गण सारख्या सन्स्थेत, व्यसनी व्यक्तीची ही तलफेची वेळ अत्यन्त काळजीपुर्वक हाताळली जाते व ती वेळ टाळण्यास मदत केली जाते! त्यान्चे अन्य उपायही असणार, मला माहीत नाहीत! नन्दिनी, सद्ध्या येवढेच लिखाण पुरे, नन्तर बघु, लिहिन काहीतरी! 
|
Slarti
| |
| Wednesday, June 06, 2007 - 4:04 pm: |
| 
|
नंदिनी, तुझा उपाय खरोखर रामबाण आहे. शरीराची काय अवस्था होते हे बघितल्याशिवाय झटका बसणार नाही. माझ्या दोन मित्रांचे अनुभव सांगतो. दोघांचेही वडील या दोन व्यसनांच्या पूर्णपणे आहारी होते आणि त्यामुळेच त्या दोघांचे अकाली निधन झाले. सर्व काही कळत असूनसुद्धा, डॉक्टर सतत सांगत असूनसुद्धा या माणसांनी हे प्रकार चालूच ठेवले. व्यसनाधीन माणसाचे होणारे हाल त्या दोन्ही मित्रांनी प्रत्यक्ष अनुभवले. आता त्यांना या गोष्टींबद्दल आत्यंतिक तिडीक बसली आहे. दुर्दैवाने त्यांना त्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागली. एक किस्सा सांगावासा वाटतो. माझ्या वडिलांचे मित्र आहेत ए.के.टंडन म्हणून. संध्याकाळी घरी आले की रोज थोडे 'ग्रंथवाचन' करतात. तर एके दिवशी ते घरी नसताना फोन वाजला, त्यांच्या बायकोने उचलला. तिकडून आवाज आला," ये पी.के.टंडनसाब का घर है क्या ? " बायकोने सांगितले की नाही, इथे ए.के.टंडन राहतात. परत फोन वाजला, परत तेच झाले. जेव्हा तिसर्यांदा झाले तेव्हा मात्र वैतागून बायकोने सांगितले," जी ये तो वैसे ए.के.टंडनसाबका घर है, लेकिन सात बजे के बाद फोन किजीयेगा, पी.के.टंडनसाब मिल जायेंगे |"
|
Milindaa
| |
| Wednesday, June 06, 2007 - 4:25 pm: |
| 
|
कोणी मला सांगेल का की धुम्रपानावरुन (अ)पेयपानावर कशी आली चर्चा?
|
Slarti
| |
| Wednesday, June 06, 2007 - 4:59 pm: |
| 
|
मिलिंदा, point taken . (म्हणजे तुझा प्रश्न rhetotical आहे असे मी गृहीत धरतो. नसेल तर archive वाचले तर कळेलच.) चर्चा अपेयपानावरसुद्धा नसून आता ती व्यसने या विषयावर होत आहे. (त्यात मुख्यतः धूम्रपान व मद्यपान हे विषय येणे स्वाभाविक आहे, पण त्या अनुषंगाने पुढे गर्द वगैरे आणि एकंदरीतच व्यसनाधीनता आणि व्यसनमुक्ती यांवर चर्चा सुरू होण्याचे संकेत आहेत.) तेव्हा एकतर या BB चा मथळा बदलावा लागेल किंवा मथळ्याचे भान ठेऊन चर्चा करावी लागेल. नेमस्तकांकडून काही सुचना ?
|
Karadkar
| |
| Wednesday, June 06, 2007 - 5:05 pm: |
| 
|
मिलिन्दा तुझ्या प्रिय मित्राने चालु केले ते विचर त्यालाच.

|
Madya
| |
| Wednesday, June 06, 2007 - 5:07 pm: |
| 
|
4th std madhye asatana, gallimadhalya ekane cig odhali, mi tyachyabarobar hoto. public ne bomb maarali ki mi cig odhali mhanun, ghari aalyavar matoshrinni chapalane dhulayi keli, tyat mazya 2/3 kakani pan maar khallya. bharpur haan badiv zalyavar mala kalaale ki aapan na odhalelya cig baddal maar milaalaa aahe. aataparyant ekadahi cig cha zuraka suddha maaralela naahi, pan passive smoker aahe, baryach mitr/office madhalyanbarobar tyana company dyayala jato cig break madhye. college chya divasanmadhye mitrana khup samajavaayacho ki cig vagaire odhu naka, pan aata band kele aahe.
|
माणसे व्यसन का करतात? मोठा गूढ प्रश्न आहे अन कारणे अनेक आहे. मानसशास्त्रानुसार पौगंडावस्थेचे एक वैशिष्ट्य म्हणजे हीरो पूजा. हिरो म्हनजे सिनेमातलाच नव्हे एखादे शिक्षक, खेळाडू मोठा मित्र. adolescence म्हणतात या वयाला. period of storms and tremours म्हटलेय सायकॉलॉजीत त्याला. मोठे नातेवाईक जसे वडील, मोठा भाऊ कुणीही असू शकते. त्याचे अनुकरण करणे ही त्या वयात सहजप्रवृत्ती असते.आपणही तसेच करून पहावे असे वाटते. आता चित्रपटातील हीरोंच्या स्टाईल्सपण मारायच्या असतात. शिवाय एखादी वाईट गोष्ट एखाद्या opinion leader ने केली तर ती सुसह्य, acceptable वाटू लागते. त्यातून सिगरेट ओढून पाहण्याचा प्रयत्न केला जातो. शहरात ह्या गोष्टीना आवश्यक परकेपणा खाजगीपणा सहज असतो. खेड्यात तो कमी कारण गावातले सगळे जण मुलाना ओळखतात अन पोरानो काय करता रे इथे असे हटकतातही... मला पहिली सिगरेट चोरून ओढयला तीन चार तास आणि चार पाच किलोमीटर फिरावे लागले होते कारण सगळीकडे ओळखीची माणसे. अगदी म्हातार्याकोतार्याना देखील घाबरायचो आम्ही... तर ते असो.... नन्तर उपलब्ध पैसे, मानसिक स्थिती, समस्याना तोंड देण्याइतके मन खम्बीर नसणे अशा कारणामुळे व्यसन बळावू लागते. मानसिक ताणावर उपाय म्हणून गोड खाण्याचे व्यसन लागते हे पटते का तुम्हाला? त्याने ब्लड शुगर लेव्हल वाढून ज्वलनाने उर्जा निर्मिती होऊन बरे 'वाटते'. खरी गम्मत पुढे आहे.व्यसनाच्या पदार्थांची मानसिक गरज सम्पून शारिरिक गरज निर्माण होते अन खरा लोच्या सुरू होतो. कुठले तरी stimulant म्हणजे चहापासून तर दारू, ड्रग घेतल्या शिवाय उर्जा निर्मितीचा 'भास' निर्माण होत नाही. ही रासायनिक प्रक्रिया सुरू झाल्याशिवाय शरीर normal ला येत नाही.मुळात वयानुसार रिफ्लेक्सेस, स्नायुंची ताकद कमी होते.दहा वर्षा पूर्वीसारखा उत्साह शरीरात नसतो. अळसटल्या सारखे वाटते. मुळात शारिरिक हालचाली मन्द झाल्याने चलन्वलन कमी होऊन oxygen चा इनटेक कमी होतो. व पेशी आळसटतात.मग कृत्रिम उत्तेजनेसाठी शरीरात stimulant च्या मागणीच्या संवेदना सुरू होतात. जसे शरीरास पाणी कमी पडल्यास तहानेची संवेदना निर्माण करून पाणी शरीरात घेणाची व्यवस्था निसर्गाने केली आहे. ताणून ताणून लूज झालेल्या रबरी बेल्ट सारखी स्थिती होते. अशा संवेदनेनन्तर चहा प्यावासा वाटतो,सिगरेट ओढावीशी वाटते दारू प्यावीशी वाटते, ड्रगची नशा करावी वाटते अन ते तसे केल्यावर शरीर 'नॉर्मल'वर येते याला उपाय? मला वाटते शरीरात उत्साह निर्मान करणारा नैसर्गिक stimulanT घेणे. तो म्हनजे oxygen चा इनटेक वाढविणे. योगाभ्यासानुसार आपण आपल्या फुफ्फुसान्च्या कपॅसिटीच्या फक्त २० टक्के वापर करतो.म्हनजे आपण लंग्जने १००० मिलि ऑक्सिजन घेणे शक्य असताना २०० मिलिच घेतो.म्हणून प्राणायाम, पळन्याचे,जलद चालण्याचे व्यायाम यानी O2 intake वाढल्याने शरीर तरतरीत होते मग बाहेरील कृत्रिम स्टिम्युलन्टची गरज पडत नाही. अगदी चहाची देखील. व्यायामाने व्यसन सुटू शकते असे मला निश्चित वाटते. अर्थात हार्ड ड्रगच्या बाबतीत जरा वेगळी आणि एक्सपर्ट ट्रीटमेन्ट घेणे आवश्यक आहे. व्यसनात आणखी एक गोची असते ती म्हनजे withdrawl symptoms! म्हणजे असे की की तुम्ही व्यसन थाम्बवले(चहा ते कोकेन)की त्याचा तुम्हाला मानसिक,शारिरिक त्रास होतो. डोके दुखणे, चिड्चिड करणे,चक्कर येणे डोळ्यापुढे रंगीत वर्तुळे दिसणे,चक्कर येणे.सुन्न वाटणे.(याला टरकी येणे म्हणतात) मग चहा ते कोकेन घेतले की बरे वाटते.या अवस्थेला घाबरून मग आपले सुधारण्यापेक्षा व्यसनच बरे असे म्हणू लागतात. वर लिम्ब्याने म्हटल्याप्रमाणे व बरेच लोक करतात तसे म्हणजे एका व्यसनाकडून सौम्य 'भासणार्या' दुसर्या व्यसना कडे वळणे. म्हणजे सिगरेट सोडून तम्बाखूकडे वळणे. मी या प्रकाराला नेहमी 'शेण खायचे बन्द करून गोवर्या खायला सुरू करणे 'असे म्हणतो. मुळातच माणसास व्यायामाचा कंटाळा असल्यामुळे बहुतेकाना stimulus साठी काहीना काही व्यसन असतेच. माफ करा मी चहालाही व्यसन मानतो. बायकात व्यसने कमी असतात असा समज आहे. बायकाना एक जबर व्यसन असते ते म्हणजे खाण्याचे! हा विनोद नाही मानसिक अस्वश्थता घालविण्यासाठी अकारण खाल्ले जाते हे शास्त्रीय सत्य आहे... दुर्दैवाने बायकाना मानसिक तणाव, अस्वस्थता घालविण्यासाठी इतर व्यसनाचा उघड आधार घेता येत नाही. मग हा खात राहण्याचा मार्ग अभावितपणे अन व्यायाम न करण्याचा मार्ग जाणिवपूर्वक आचरला जातो.... व्यायाम करणार्यात व खेळाडूत तुलनेने व्यसने कमी असतात असे दिसून येईल. नायकांचे अनुकरण या पौगंडावस्थेतील मुलांच्या वैशिष्ट्यावरून मला आठवले पुलेला गोपीचन्द नावाच्या खेळाडूने मुलांवर परिणाम होऊ नये म्हणून शीतपेयांचीसुद्धा जाहिरात करायला नकार दिलेला आहे. आणी आठवा जहीर खान, हरभजनच्या मद्याच्या अन सिगरेटच्या जाहीराती. मला तर सचिन तेंडुलकरपेक्षा गोपीचंद मोठा'माणूस' वाटतो! कारण त्याच्याकडे ३०० कोटी रुपये नसूनही त्याने हे धैर्य दाखवले.. असो (मी एक विसरलो इथे शीतपेयाला व्यसन मानले जात नाही...)
|
सहज शोधले म्हणून सापडलेही..... इथे टिचकी मारा
|
Bee
| |
| Thursday, June 07, 2007 - 1:27 am: |
| 
|
स्लार्टीचे बरोबर आहे.. एकंदरीत पेय किंवा अपेय हा चर्चेचा विषय नसून कुठलेही व्यसन हा चर्चेचा विषय होत आहे.. ऐरवी कराडकर बोलत देखील नाही. फ़क्त टोमणे मारायला पहिला नंबर :-) दिवे हो ताई..
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|