|
Vidyaraj
| |
| Friday, April 06, 2007 - 9:29 am: |
| 
|
Smoking is one of the worst things kids or adults can do to their bodies. Yet every single day nearly 4,400 kids between the ages 12 and 17 start smoking. Why? There's more than just one simple answer. Some kids may start smoking just because they're curious. Others may like the idea of doing something dangerous - something grown-ups don't want them to do. Still others might have grown up around lots of people who smoke and they might think it's the way to act like an adult. From:- www.kidshealth.org
|
माझा असा अंदाज आहे की धूम्रपानाचा आनंद घेणार्या बहुतेक मुली या बाहेरगावच्या किंवा महाराष्ट्राबाहेरच्या असाव्यात. पुण्यात आयटी आणि बीपीओ मध्ये स्थानिक कर्मचारी फक्त ३०-४० टक्केच आहेत. उरलेले परराज्यातून आलेले आहेत. एकतर घरापासून एवढ्या लांब एकटं रहायचं; त्यामुळे आई-वडील, भाऊ-बहीण, जवळचे नातेवाईक इ. लोकांचे नियंत्रण नाही; हातात बर्यापैकी पैसे खेळतात; दिवस-रात्रीच्या शिफ्ट; अनिर्बंध स्वातंत्र्य आणि आजूबाजूची संगत यांमुळे बहुदा काही मुलींना धूम्रपानाची सवय लागत असावी.
|
सतीशजी, हा तुमचा आडाखा बराचसा बरोबर आहे.. आणि हे सगळेजण त्याच्या व्यसनाला stress चे कारण देतात. जणू आम्ही कधी tension मधे काम करतच नाही.
|
Disha013
| |
| Friday, April 06, 2007 - 4:11 pm: |
| 
|
correct point ! लहान वयात हातात खेळणारा पैसा आणि तो मनासारखा खर्च करण्याची मुभा, मग वाईट गोष्टींकडेच आकर्षित व्ह्यायला कितिसा तो वेळ लागणार?
|
Storvi
| |
| Friday, April 06, 2007 - 8:38 pm: |
| 
|
>>ह्या मुद्द्यात तथ्य आहे पण थोडेसेच. मुळात एकच गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे व्यसन पुरवणारे आहेत, तोवर व्यसन करणारे असणारच, त्याचा पैश्याशी संबन्ध आसता तर व्यसने फ़क्त रईसांच्यात दिसली असती. पण आमच्याकडे येणारी कामवाली बाई मिस्रीतंबाखु चे तोबरे भरत असे, आणि गवंडी वगैरे मंडाळी बीडी ओढताना दिसतात.. ते आपल्याला का बरं खटकत नाही? >>माझ्यामते मुली तल्लख बुध्दीच्या असतात.>>अर्च हे काय पटलं न्हाय बा... हा chuavunism चा दुसरा angle वाटतो मला तरी
|
Madhura
| |
| Friday, April 06, 2007 - 9:05 pm: |
| 
|
storvi , अगदी बरोबर मुद्दा. मुळात पुर्वीपासूनच अतिश्रिमंत आणि अतिगरीब वर्गात स्त्रियांमधे देखील व्यसने चालतात. पण ते एक प्रकारे ग्रुहीत धरले जाते. आता फरक इतकाच आहे की ते लोण मध्यम आणि उच्च मध्यम वर्गात दिसू लागले आहे आणि ते खटकू लागले आहे कारण त्याची सवय नाहि. प्रथम बायकान्नी केस कापायला किंवा पंजाबी dress वापरायला सुरुवात केली तेव्हाही ते असेच खटकले असणार. बर्याच जणंना धुम्रपानापेक्शा मुली ते करतात हे फ़ार खटकलेले दिसते. पण , या BB चा विशय अहे smoking तर त्यावर मत मांडताना त्यात gender bias नसावा असे माझे मत. इथे मला व्यसनाचे कुठलेहि समर्थन करायचे नाही. smoking वाईटच , मग ते कुणीही केले तरी....
|
Mrinmayee
| |
| Saturday, April 07, 2007 - 2:51 pm: |
| 
|
स्मोकिंगचा विषय म्हणून काही दिवसांपूर्वी घडलेला प्रसंग सांगावासा वाटतो. माझ्या मुलाच्या शाळेची शैक्षणिक सहल ओरलँडो सायन्स सेंटरला गेली होती. सध्या तिथे Human bodies नावाचं exibit ठेवलंय. त्यात माणसाच्या सांगाड्यापासून प्रत्येक system दाखवणारे देह ठेवलेत उघडे करून. (हे सगळे खर्याखुर्या माणसांचे देह! ज्यांनी स्वखुशीने मरणोत्तर देहदान केलंय!) बघता बघता आम्ही एका सेक्शन ला आलो. तिथे व्यसनाधीन लोकांचे मेंदु, lungs वगैरे ठेवण्यात आले होते. त्याच्याच बाजुला हेल्दी व्यक्तीचे तसेच अवयव ठेवले होते. दिसणारा फरक खरंच भयानक होता. माझ्या ग्रुपमधली एक मुलगी रडायला लागली. तिला भिती वाटत होती, तिचे smoking करणारे आई-वडील 'आतून' असेच दिसत असणार या विचाराने. वर म्हणाली, "आता त्यांना smoke करु देणार नाही कधीच!!" एका मुलानी आपल्या वडलांना बोलवून आणलं. त्यांना तेच exibit दाखवून 'आजपासून तुम्ही सिगरेट हातात घेणार नाही असं प्रॉमिस करा' हे सांगीतलं! या मुलाच्या वडलांना मी ओळखते. काही दिवसांनी हे गृहस्थ भेटले असता आमचं या विषयावर बोलणं झालं. त्यावेळी ते स्मोकिंग सोडता यावं म्हणून मिळणारा पॅच लावून फिरत होते. http://www.osc.org/specialevent/ourbody.htm ही लिंक बघु शकता.
|
१-२ महिन्यांपूर्वी आउटलूकचा स्मोकिंग विशेषांक आला होता. India's new outlaws असेच सर्वांचे स्मोकर्स बद्दल मत होते. शेवटी पिणे हे वाइटच. मीपण सोडायचा प्रयत्न करतो आहेच
|
मला कायम हा प्रश्ण पडतो की smokers can really quit smoking forever before it really hits them? I mean they discover health issues or wife tells them or something happens due to smoking or because of old age? My question is can young person who has been smoking whether chain smoker or 2-3 per day smoker quit compltely smoking if he decides in young age having smokers friends around? I have seen most of my friends doing so for year and then switching back till one of the above scenario hits them in some ways. इथे कोणी smoker आहेत ज्यांनी successfully सोडली आहे आता करु शकईल क हा Exp share ?
|
Hello Manuswini हो smokers पुर्णपणे smoking सोडु शकतात. माझा नवरा खुप जास्त स्मोकिन्ग करायचा. दिवसातुन ४-५ सिगरेट्स आरामात घ्यायचा. हे सगळं त्यानेच मला सान्गितलं. तेन्व्हा आम्हि भेटलो सुद्धा नव्हतो. पण एक दिवस त्याच्या स्वत: च्या च लक्शात आलं कि आपण आता आहारि जातो आहे सिगरेट च्या म्हणुन. त्या दिवसा पासुन त्याने smoking पुर्णपणे सोडलं. त्याचे सगळे मित्र अजुनहि smoke करतात. पण हा स्पष्ट नाहि म्हणुन सान्गतो. आता सगळ्यांना माहिति आहे त्यामुळे कुणि force पण करत नाहि. त्याला स्मोकिन्ग सोडुन आता ७ वर्ष झालि. smoking सोडन्या करता त्या व्यक्तिचि स्वत: चि इछा शक्ति खुप महत्वाचि असते.
|
>>>>> इथे कोणी smoker आहेत ज्यांनी successfully सोडली आहे आता करु शकईल क हा Exp share ? मनुस्विनी, होय, एकेकाळी मी चेन स्मोकर होतो! दिवसाला २४ च एक पाकीट सम्पवुन वर तीन चार व्हायच्या! नन्तर माझी मलाच घृणा वाटू लागली की इतके कसे आपण आहारी गेलोत! छातीच खोकड होत आलेल तशात त्यावेळेस १० वर्ष जुना दमा औषधाशिवाय अन्गावर काढलेला! एकन्दर परिस्थिती भयानक हे हे तर कळतच होते, पण स्मोकिन्ग शिवाय रहावयाचे नाही शेवटी एक दिवस निश्चय केला की हे थाम्बवायचे! पण कसे???? एक चाळा, एक सवय सोडायची तर दुसरी लावुन घ्यायला लागते, त्यातच आमच सामान्यपण सामावलेल असत! दुसरी लावलेली सवय चान्गली असेल तर ठीकच! माझ्यापुरते तसे घडणार नवते! स्मोकिन्ग सोडायला त्याच्या तुलनेत स्वस्त आणि कमि धोकेदायक असा तमाखुचा पर्याय मी निवडला! ते मात्र आजतागायच हे! तमाखु सोडायला बडिशेप लवन्ग वेलची वगैरे चघळुन पाहिले पण तल्लफ ती तल्लफच, आणि त्यावर मात करण्यास आवश्यक तो मनोनिग्रह माझेकडे नाही! एनिवे, सिगारेटच व्यसन सुटु शकत! वरील घटना इसवीसन १९८३ मधिल हेत! 
|
Arch
| |
| Tuesday, June 05, 2007 - 12:28 pm: |
| 
|
हे कोणाला अस उद्देशून नाही. पण जे लोक smoking करतात किंवा पान तंबाखूच ज्यांना व्यसन असत त्यांना अस लक्षात येत नाही का की आपल्या बायकोला किंवा मुलांना त्यांची किती घृणा येत असेल? ते काळे ओठ, ते पिवळे, लाल, काळे झालेले दात. माणसाला, त्याच्या कपड्यांना येणारा वास, त्यामुळे घरात भरलेला तो गलिच्छ्पणा. स्वतःहून स्वतःच्या आरोग्याची पर्वातर नाहीच पण आपल्यामुळे सगळ्यांना त्रास होत असेल ह्याचीही जाणीव नाही. मुलांना जन्म दिला तर त्यांच्या आरोग्याची जबाबदारी स्वतःच नाकारायची? मुलांपुढे तरी काय उदाहरण राहिल? मुलं मोठी झाल्यावर म्हणणार नाहीत का " तुम्ही काय आम्हाला व्यसनाबद्दल सांगणार? infact तुम्हीच आम्हाला त्याला expose केलत. "
|
Zakki
| |
| Tuesday, June 05, 2007 - 2:12 pm: |
| 
|
बरेच लोक आपण किती ग्रेट हे लोकांना पटवून देण्यासाठी सांगतात, की मी ना, एकदा ठरवले सिगरेट बंद की लग्गेच कायमची बंद केली. असतील कदाचित् तसे महात्मे. पण म्हणून बाकीच्यांना सिगरेट सोडताच येणार नाही असे नाही. स्वानुभव. १९६४ ते १९७३ भरपूर सिगरेटी ओढत होतो. मग घरात ओढणे बंद केले, सुट्टीच्या दिवशी ओढणे बंद केले. नि मग एकदा चार दिवसाचा वीकेंड व नंतर चार दिवस घसा दुखत असल्याने नि नंतर दोन दिवस माझा ब्रॅंड ऑफिसच्या मशीनमधे न मिळाल्याने अनेक दिवस बिना सिगारेटचा राहिलो. नि मग सुटली की राव! मग आत्तापर्यंत एकदा सुद्धा प्यायलो नाही. स्वप्नात सिगारेट पितो आहे असे दिसल्यावर खडबडून जागा झालो, नि मग परत तसे स्वप्न पण पडत नाही. वजन एकदम दहा किलोने वाढले पण मग हळू हळू जऽरा कमी पण झाले. आता दारू तशी सुटेल का? गेल्या पाच वर्षात आठवड्यातून तीनदा पासून महिन्यात तीनदा पर्यंत आलो आहे. प्रयत्न चालू आहेत.
|
Slarti
| |
| Tuesday, June 05, 2007 - 3:55 pm: |
| 
|
लिंबू, सिगारेटपेक्षा तंबाखू बरी (कमी धोकादायक) हे खरे नाही वाटत. म्हणजे त्यात सिगारेटसारखी additives नसतील, पण आता तुम्ही ती धुराच्या रूपात घेण्याऐवजी direct खात आहात. मला असेही सांगण्यात आले की तंबाखूने जास्त किक बसते. आता खरे खोटे तुम्हीच सांगा. मला तंबाखूचा अनुभव नाही. माझ्या माहितीतल्या एकदोघांनी सिगारेट सोडण्याच्या प्रयत्नात तोंडाला 'पर्यायी चाळा' म्हणून शेंगदाणे, मनुका - बेदाणे खाणे सुरु केले होते त्याची आठवण झाली. ते कितपत उपयोगी झाले याची कल्पना नाही. तंबाखूवरून म्हणे माणसांचे चार प्रकार आढळतात - १. जे तंबाखू विडीसिगरेटच्या रूपात घेतात ते फुंक्ये, २. जे तंबाखू तशीच खातात ते थुंक्ये, ३. जे तंबाखू तपकीरीच्या रुपात घेतात ते शिंक्ये आणि ४. यातील काहीच न करता 'तंबाखू आरोग्याला वाईट' असा आरडाओरडा करतात ते भुंक्ये.
|
मी बारा वर्षे सिगारेट ओढून सोडली त्याला आता बावीस तेवीस वर्षे झाली. आता मला सिगरेट ओढणाराचा राग तर येतोच पण खरेही वाटत नाही की मी सिगरेट ओढत होतो. त्याकाळी मी बॅन्केत नोकरी करीत होतो बौद्धिक काम असल्याने बॅन्क स्टाफमध्ये सिगरेटचे व्यसन लोकप्रिय असे. अगदी काऊन्टरवरही आम्ही सिगरेट ओढत असू. बर्याचदा शेअरही करीत असू... सिगरेटचा वास ओढणार्याना फार आवडतो. जसे मसाल्याच्या वासाने खाणर्याच्या चित्तवृत्ती चळतात. तसे सिगरेटचा वास आला की ओढणारा मोहून अस्वस्थ होतो व त्याला ओढल्याशिवाय चैन पडत नाही. तेव्हा मी एकटाही रहात होतो. त्यामुळे वाच्ताना गाणी ऐकताना चालूच असे. कलीगपैकी कोणी पेटवली की नाक वळवळू लागे... त्यावेळीही वाटायचे जरा जास्तीच होतेय सोडली पाहिजे. पण सुटेना तसतसे confidence loose होऊ लागला. आपले काही खरे नाही. वगैरे बर्याचदा सोडून पाहिली. दिवस मोजून स्वत्:चे रेकॉर्ड रचू लागलो. मागचे रेकॉर्ड मोड्ण्याचे टार्गेट स्वताला देऊ लागलो. पण कधीतरी शेण खायची लहर यायचीच. एकदा बहिणीच्या कानाखाली गाठ आली. आमच्या गावाकडे त्याला गळचुट्या म्हणतात. मेडिकलमध्ये ट्युबरक्युलॉसिस. precaution म्हणून doctorane biopsy साठी गाठीचा सॅम्पल घेऊन मुम्बईच्या लॅबमध्ये पाठविला. त्याचा रिपोर्ट येईपर्यन्त आम्ही हैराण कारण एक शक्यता कॅन्सरची असते. त्यात त्या वर्षी मुम्बईत अतोनात पाऊस होऊन मुम्बईला गेलेली माणसे आठ दहा दिवस मुम्बईतच अडकली होई मुम्बईचा सर्व कारभार बन्द आमचा रीपोर्टही रखडला. दर्म्यान आम्ही कॅन्सरचे literature खूप वाचले त्यात धूम्रपान आणी तम्बाखू खाऊन कॅन्सर झालेल्ल्या अवयवांचे रंगीत फोटो पाहून एकदम मानसिक धक्काच बसला (trauma) रात्रंदिवस ती चित्रे डोळ्यासमोर उभी रहात. त्या धक्क्याने सिगरेट सुटली बरेच दिवस झाल्या वर त्या गॅपचा फायदा घेऊन ठरवले आता परत त्या वाटेने जायचेच नाही. त्याला आता २३ वर्षे झाली...(बहिणीची तीगाठ नॉर्मल गलगन्डच निघाले ) मी नेहमी दारुड्यांच्या संगतीतच अस्तो. पण आपला मनावर ताबा रहात नाही हा दुर्गुण हेरल्यावर या वाटेला जायचेच नाही असे ठरवले होते. त्यात एका दारुड्या मित्राने विचारले की तुम्ही पिता का? म्हटले नाही. तो म्हणाला पीत नसाल तर सुरू करू नका... ही गोष्ट तुम्ही कमी करू शकता फार तर पण पूर्ण सोडू शकत नाही. आपल्या मनोरचनेमुळे आपण कमी सुद्धा करू शकणार नाही हे सिगरेटच्या अनुभवाने कळले च होते त्यामुळे एकच प्याल्यात म्हटल्या प्रमाणे दारू सोडण्याची आदर्श वेळ म्हनजे पहिला एकच प्याला घेण्यापूर्वीचीच या उक्ती प्रमाणे तो पहिला प्याला आयुष्यात आलाच नाही त्यामुळे मी माझ्या मुलाला नैतिकतेने व अधिकारवाणीने उपदेश करू शकतो.... माझे अनेक मित्र दारूच्या व्यसनाने मातीमोल झाल्याचे मी रोजच पहातो... तेही उच्चपदस्थ..... तेव्हा वाटते आपण पुष्कळ मिळवलेय आयुष्यात.... मात्र मी दारुड्यांची कम्पनी मी कधीच टाळीत नाही.. गुन्त्यात गुन्तूनि पाय माझा मोकळा असे सुरेश भटानी म्हटलेच आहे ना.... मुळात ज्याला सिगरेट सोडायचीय त्याला त्याबद्दल स्वत्:ला गिल्टी वाटत राहिले पाहिजे. ही पहिली पायरी निर्माण झाली पाहिजे तरच सुटण्याचे चान्सेस असतात. नाहीतर तो फुंक्या त्याचे समर्थन करीत असेपर्यन्त ही शक्यता नाही. मग दुसर्याना नावे ठेवणे वगैरे हाय कम्बख्त तूने पीही नही.म्हणणे वगैरे... रजनीशानी व्यसनाची केलेली व्याख्या मला फार आवडते' व्यसन म्हणजे ज्याच्यावाचून माणसाचे चालू शकते पण चालत नाही ते!!'
|
बरीच उपयुक्त माहीती from horses mouth . thanks to all खरे तर तो वास इतका घाणेरडा असतो नी पोटात मळमळुन येते जेव्हा ओढुन कोणी बाजुला बसते तेव्हा. माझ्या ऑफ़ीसमध्ये एक chain smoker होता त्याच्या तोंडाला घाण वास यायचा. एक दिवस त्याच्या bday party ला गेलो त्याच्या घरी, केक कापल्यावर त्याचा उष्टा केक त्याने त्याच्या ३ वर्षाच्या मुलिला भरवला, इतकी घाण वाटली ते पाहुन दोन मिनीटापुर्वी बाहेरुन फुकुन आला होता. हा जेव्हा मिटींग मध्ये तोंड उघडायचा तेव्हा त्याच्याकडे बघायला घाण वाटायची कारण ह्यांची जीभ,दात,तोंड खुप घाण दिसते. वास तर येतोच. हे कोणाला उद्देशुन नाही पण ह्याची बायको कशी सहन करते हा विचार यायचा. माझ्या एका मित्राला lunchtime मध्ये मध्येच घुसुन चमचा घालुन घालुन खायची सवय होती. मुळात कोणाचेच उष्ट आवडत नाही खायला त्यात ह्याने चमचा उष्टा घातला माझ्या डब्यात की सांगायचे तु खावुन टाक उरलेले,मला भूक नाही म्हणुन. पिवळट दात,जाड जीभ, वास मारतोय गल्लीछ वाटायचे मला.
|
Disha013
| |
| Tuesday, June 05, 2007 - 8:57 pm: |
| 
|
भटकलेल्या मर्गावरुन परत आलेल्यांनो, सगळ्यात चांगला निर्णय असणार तुमचा तो. खरच oral cancer चे फ़ोटो सतत दाखवायला हवेत या चेन smokers ना. माझ्या एका मैत्रीणीचा नवरा चेन स्मोकर आहे. बिचारी खुप चांगली आहे. पण घरी गेले की घर अगदी उदास,खिन्न धुरकट असते. अचानक गेलो तर बरेचदा सिगारेटची थोटके दिसतात. मग ती उदबत्ती लावुन ठेवते. बिच्चारी. अगदी दया येते तिची. तिच्या नवर्याला समजावण्याचा काहिही फ़रक नाही. त्याला जेव्हा बुद्धी होईल तेव्हाच तो बदलणार. आता तर ती ४ महिन्यांची प्रेग्नंट आहे. सतत चिंतेत असते ती. तिला सांगितले, तु माहेरी जावुन रहा सरळ डिलिव्हरी होईतो, कमीत कमी मुल तरी त्या धोकादायक धुरापासुन दुर राहील.
|
Bee
| |
| Wednesday, June 06, 2007 - 3:48 am: |
| 
|
माझ्यामते व्यसन सोडणे हे सुसंस्कृत व्यक्तीलाच शक्य असणारी गोष्ट आहे. कित्येक सुशिक्षित पण सुसंस्कृत नसणारी माणसे व्यसन लावून घेतात पण त्यांना त्याबद्दल काहीच वाटत नाही.
|
Yog
| |
| Wednesday, June 06, 2007 - 5:08 am: |
| 
|
>>बौद्धिक काम असल्याने बॅन्क स्टाफमध्ये सिगरेटचे व्यसन लोकप्रिय असे. अरे हूडा ही कुठली philosophy आहे..? smoking is dangerous to health ही warning वाचूनही smoke करणारे बुध्दीवादी कसे?. असो. भारी अनुभव आहेत एकेकाचे.
|
Dhumketu
| |
| Wednesday, June 06, 2007 - 6:39 am: |
| 
|
मी कानपूर ला कॉलेजात असताना मला सिगारेट पिणार्या मित्रांचा हेवा वाटायचा. त्यांची मैत्री लवकर होते असे वाटायचे (अजूनही तसेच वाटते... खेड्यातही तंबाखूचा बार भरणार्यांची गट्टी लवकर जमते.) म्हणून मी मित्राकडे सिगारेट मागायचो.. कारण पुर्ण ओढता येत नसे. तो म्हणायचा मुळीच देणार नाही. नंतर जन्मभर मला शिव्या घालशील की पहीली सिगारेट मी दिली म्हणून.. त्याचे म्हणणे असे की सिगारेट पिणारा नेहमी पहीला झुरका का घेतला म्हणून हळहळतो.. त्याने जर मला त्यावेळी सिगारेट दिली असती तर मलाही सवय लागली असती..
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|