|
आजच बातमी वाचली की मांतग, चर्मकार ई. समाजाचा लोकांनी बोध्द धर्मात प्रवेश घेतला. त्यांचे धर्मातंर हे मुंबै च्या रेसकोर्स वर झाले. त्यात खासदार लक्ष्मण माने म्हणाले की आता हिंदु धर्माच्या वस्त्राची राख करुन ती आम्ही हिंदुत्ववाद्यांकडे पाठवनार आहोत. मला खालील प्रक्ष्न पडले आहेत. (प्रामानीक). १. अशी राख करता येते का? २ कोण आहेत हे हिंदुत्ववादी, त्यांचा कडे जाउन सांगीतले म्हणजे आख्या हिंदु धर्माला सांगीतले जाते का? ३. धर्मातंर केल्याने प्रश्न सुटतो का? असा सुटत असेल तर मग जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लाखोना दिक्षा दिली होती त्यांची आजची समाजातली जागा काय? ते हिंदु वा मुस्लीम वा ईतर धर्म ह्यांचापेक्षा फार पुढे (अध्यात्मीक वा भोतीक) गेले आहेत का? खरच गेले असतील तर मग त्यांचाच साठी ५० वर्षानंतर पण आरक्षन का ठेवाव लागते. ४. दरवर्षी जी बोध्दधर्मांतर होतात त्या व्यक्तीची आजची सामाजीक स्तिथी बदलली आहे का? वा बदलेल का? कधी? (१०० वर्शाने हे ऊत्तर होऊ शकत नाही कारण तेवढ्या काळात भारतच बदलेल). ५. बोध्द धर्माचे सुगीचे दिवस का पालटले हे त्यांना माहीती आहे का? त्याच समारंभात आपले मुख्यमंत्री म्हणतात ह्या ऐतीहासीक सोहळ्यात उपस्तिथे राहाने मी माझे भाग्य समजतो. ( हे स्वत अजुनही हिंदु आहेत मग लक्ष्मन मानेनी त्यांच्या कडे राख पाठवावी का?). आपल्याच धर्मातील लोक धर्मातंअर करताना हे माझे भाग्य आहे असे म्हणतात? तर गोळाबेरीज भारतात बोध्द धर्मात प्रवेश केल्याने सर प्रश्न चुटकी सारखे सुटतात का? की नंतर की त्याच अडचनी येतात. की हा सर्व परत एकदा मतांचा खेळ आहे. ता.क. मला खरच हे प्रश्न प्रामानिकपणे पडले आहेत. कुठल्याही धर्माअविषी मला आकस नाही. पण नेहमी हे धर्मांतर पाहुन जे प्रश्न पडतात त्याच उत्तर काही सापडत नाही त्यामुळे तुमच्यासमोर मांडले. मॉड योग्य त्या सदरात या बीबीची पाठवनी कराल का?
|
खरच गेले असतील तर मग त्यांचाच साठी ५० वर्षानंतर पण आरक्षन का ठेवाव लागते. असे आरक्शण हिन्दु धर्मामधील मागासलेल्या जातीन्साठी पण आहे. तात्पर्य: धर्मन्तर केल्यने प्रश्न सुटत्तेल असे नाही पण ते न केल्याने ही फारसा फरक पडत नाही.
|
>>> त्याच समारंभात आपले मुख्यमंत्री म्हणतात ह्या ऐतीहासीक सोहळ्यात उपस्तिथे राहाने मी माझे भाग्य समजतो. उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील तर म्हणाले की जगासमोर 'बुद्धाचा किंवा युद्धाचा' असे दोनच मार्ग आहेत. गंमत म्हणजे ते किंवा त्यांचा पक्ष यापैकी एकही मार्ग स्वीकारत नाही. या धर्मांतराचा मुख्य उद्देश त्यांच्या पुढार्यांची राजकीय महत्वाकांक्षा आहे. या लोकांच्या सध्याच्या अवस्थेला हिंदू धर्म अजिबात जवाबदार नाही. भरपूर मुलांना जन्म देणे, दारूसारखी व्यसने करणे, जातपंचायतीच्या जोखडात चिकटून राहणे, शिक्षणाकडे दुर्लक्ष करणे इ. अनेक कारणे यांच्या दुरावस्थेमागे आहेत. यापैकी कोणत्याही कारणाला हिंदू धर्म जवाबदार नाही. ५० वर्षांपूर्वी आंबेडकरांच्या बरोबरीने धर्म बदलून सुद्धा यांच्यापैकी बहुतेकांची परिस्थिती फारशी बदलली नाही. यामागे ते स्वत: आणि त्यांना फसविणारे आठवले, गवई यांच्यासारखे यांचे पुढारी कारणीभूत आहेत. हिंदू धर्म नाही.
|
बौध्द धर्मांतरण हा काही महत्वाचा मुद्दा नाही. आजकाल काहिही हिंदु असले की त्याला विरोध केला जातो. आणि काहिही चुकिचे होत असेल तर त्याला हिंदु संस्क्रुतीच जबाबदार अस मानल जात. धर्म बदलल्यानी जर लोकांच्या मानसिकतेत काही फ़रक पडत नसेल तर काय उपयोग???आपल्याकडे आंबेडकरवादी किती बुध्द खर्या बुध्द धर्माचे पालन करतात???बहुतेक लोकांना बौध्द धर्माची basic माहिती पण नसते. मागच्याच महिन्यात पुण्यात बौध्द सम्मेलन झाले ज्याला तिबेटवरून बौध्द धर्मगुरु (त्यांना काय म्हणतात माहिती नाही) आले होते त्यांनी रामदास आठवलेंसमोर म्हटले की नुसता धर्म बदलून काहिच उपयोग नाही.सर्व धर्मातुन चांगल्या गोष्टी घ्या.
|
Lukkhi
| |
| Tuesday, May 29, 2007 - 11:43 pm: |
| 
|
लामांचा बौद्ध धर्म आणि आठवल्यान्चा बौद्ध धर्म यात फार फरक आहे. आठवल्यांसारखे नवबौद्ध हे हिंदू धर्मातील उच्च वर्णीयांकडून नाडल्या गेलेल्या दलितांनी हिंदू धर्मापसून दूर जाऊन स्वत:ची एक ओळख बनविण्याचा प्रयत्न होता. धर्म बदलून त्यांना काहिही मिळाले नसले तरी शतकानुशतके हिंदू धर्मात खितपत पडलेल्या लोकांना एक त्यांची स्वत:ची ओळख मिळाली (हेही नसे थोडके)
|
लोकसत्तेमधे आलेल्या बातमीनुसार धर्मांतर करणार्या लोकांनी आपापल्या पारंपारिक वस्त्रांची जाळून राख केली आणि ती हिंदुत्ववाद्यांकडे पाठवून दिली असे लक्ष्मण माने म्हणाले. अशी कल्पना करा की पन्नास एक मुस्लिम स्त्रिया त्यांच्या धर्माच्या जाचाला कंटाळून दुसर्या धर्माचा स्वीकार करत्या झाल्या. सोयीकरता त्या ख्रिस्ती वा बुद्ध झाल्यात असे मानू. जर त्यांनी आपल्या बुरख्याची जाळून राख करुन ती इमामाला पाठवली तर कुणी मंत्री अशा समारंभाला यायचे धाडस करेल का? त्या स्त्रियांवर स्तुतीसुमने उधळेल का? असे घडले तर मुस्लिम लोक जाळपोळ, दंगली, फतवे असे कार्यक्रम केल्याशिवाय राहतील का? मात्र हिंदू लोक अशा प्रकाराविरुद्ध चकार शब्द काढत नाही. जाळपोळ दंगली तर दूरच. हे प्रगल्भतेचे लक्षण आहे का हा षंढपणा आहे?
|
Mahaguru
| |
| Wednesday, May 30, 2007 - 2:49 pm: |
| 
|
ह्या विषयावर म.टा. मधे आलेला अग्रलेख जरुर वाचा.
|
Slarti
| |
| Wednesday, May 30, 2007 - 4:13 pm: |
| 
|
महागुरू, धन्यवाद. संपादकीय छान आहे. आत्मसन्मानाशिवाय त्यांना आणखी काय मिळाले ही चिंतनीय बाब आहे हे खरेच. शिवाय नवबौद्ध म्हटल्यावर 'हे मूळचे खालच्या जातीजमातीचे ! ' हा विचार बर्याच हिंदूंच्या डोक्यात येतो हे एक कटू सत्य आहे. हे कदाचित केवल दलित चळवळीचेच नव्हे तर एकंदरीत समाजाचेच अपयश मानावे लागेल. (म.टा. चे सद्य संपादक कोण आहेत ? )
|
हा प्रगल्भपणाच म्हणावा लागेल. आणी कुणी स्वखुशीने हिन्दु धर्म सोडून जात असेल तर त्याना मारून मुटकून धर्मात ठेवण्यात काय अर्थ आहे? काही वर्शान्पुर्वी जळगाव मध्ये मुस्लीम धर्म गुरुनी फतवा काढून मुस्लीम महिलाना सिनेमा पहायला बन्दी केलि होती. काही मुस्लीम स्त्रियानी त्याला निर्धाराने विरोध केला होता.
|
हा प्रगल्भपणाच म्हणावा लागेल.>> कोणता? मारुन मुटकुन हिंदु धर्मात त्यांना आपण " ठेवले " न्हवते कुलकर्णी. आपल्या आडनावाचे एक अ. रा. कुलकर्णी नावाचे इतिहासकार आहेत आपण जरा त्यांचे प्रकाशित खंड वाचावेत त्यात महार, मांग, चांभार, सोनार वैगरे जांतीचे काय म्हत्व होते व ते गावपंचायतीत कसे महत्वाचे होते, त्यांचे अधिकार काय?, ते कोणला जबाबदार याची सर्व जंत्रीच होती. खेड्याचे स्वंयपुर्णपन त्यांचा शिवाय न्हवते. तर मला तरी त्या सर्व जनतेची धर्मांतर करुन केलेली फसवनुकच दिसत आहे. रोज खायला काही मिळत नाही तर आम्ही ते देऊ तु धर्मांतर कर असे फालतु आश्वासन दिसते. मी वर एक प्रश्न विचारला की ५० वर्षापुर्वी जे धर्मांतरीत झाले त्यांची आजची आर्थीक, सामाजीक परिसिथी जैसे थे आहे. ( फक्त रासु गवई, आव्हाड, प्रकाश आबेंडकर, आठवल सोडुन) मग फार्स का? की स्वतच्या उत्कर्षा साठी ह्या जनतेचा बळी. ( मग सो कॉल्ड हिंदु अत्याचारात व ह्यात काही फरक आहे का?)
|
Gobu
| |
| Wednesday, May 30, 2007 - 6:38 pm: |
| 
|
१. "धर्म" म्हणजे एक विचारसारणी असते, जीवन मार्गदर्शक तत्वे असतात २. जे लोक बुध्द धर्माच्या विचारसारणीला मानतात, त्या धर्माच्या प्रार्थनेत त्याना मानसिक शान्ती मिळते (किन्वा मिळेल अशी ते आशा करतात), ते लोक धर्मान्तर करतात (हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे) (इथे आपले सर्व भाऊबन्द, नातेवाईक, मित्र धर्मान्तर करतात म्हणुन आपणही करु, असे करणारे ही काहीजण असावेत!) ३. धर्म आणि आर्थीक सामाजिक प्रगतीचा काही सम्बन्ध नाही, ही प्रगती वैयक्तीक मेहनत, महत्वकान्क्षा ईत्यादीवर अवलम्बुन असते धर्मन्तर केल्यने प्रश्न सुटत्तेल असे नाही पण ते न केल्याने ही फारसा फरक पडत नाही. हे मत पटते मला या धर्मांतराचा मुख्य उद्देश त्यांच्या पुढार्यांची राजकीय महत्वाकांक्षा आहे. हे ही पटते त्याच समारंभात आपले मुख्यमंत्री म्हणतात ह्या ऐतीहासीक सोहळ्यात उपस्तिथे राहाने मी माझे भाग्य समजतो. ही मात्र फार शरमेची गोष्ट आहे!
|
धर्म आणि आर्थीक सामाजिक प्रगतीचा काही सम्बन्ध नाही, ही प्रगती वैयक्तीक मेहनत, महत्वकान्क्षा ईत्यादीवर अवलम्बुन असते >>>. कस बोललास गोबू. एकदम बरोबर. हे मात्र उठ सुट हिंदु धर्मीयाना शिव्या देनार्यांना कळले पाहीजे. तसे कळत नाही वा कळले तरी वळत नाही.
|
Lukkhi
| |
| Thursday, May 31, 2007 - 12:24 am: |
| 
|
आपल्या आडनावाचे एक अ. रा. कुलकर्णी नावाचे इतिहासकार आहेत आपण जरा त्यांचे प्रकाशित खंड वाचावेत त्यात महार, मांग, चांभार, सोनार वैगरे जांतीचे काय म्हत्व होते व ते गावपंचायतीत कसे महत्वाचे होते, त्यांचे अधिकार काय?, ते कोणला जबाबदार याची सर्व जंत्रीच होती. खेड्याचे स्वंयपुर्णपन त्यांचा शिवाय न्हवते. >> जोशी, एकतर तुम्ही खेड्यात (किंवा कुठेही) होणारी दलितांची कुचंबणा अथवा हेटाळणी पाहिलेली नाही, किंवा पाहून दुर्लक्ष केले. जातीच्या उतरंडीमध्ये खाली असलेल्या घटकांची गावांच्या अर्थव्यवस्थेला गरज होती हे खरे आहे, पण त्यांना समाजात मान होता असे मानणे म्हणजे फारच होते. आता कुलकर्ण्यांचे (अ. रा.) जर असे म्हणणे असेल की खालच्या जातीच्या लोकांना उच्चवर्णीयांनी बरोबरीने वागवले, तर त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि ज्ञानाची कीव करावी लागेल. अर्थात त्यांचे आडनाव पाहता शेंबडं पोरही सांगू शकेल की ते या निष्कर्षापर्यंत (ओढून ताणून का होईना) का पोहचू इच्छित आहेत. मारुन मुटकुन हिंदु धर्मात त्यांना आपण " ठेवले " न्हवते कुलकर्णी. >> मग ते चालले तर त्याचा एव्हढा गहजब का? त्यांनी हजारो वर्षे अपमान सहन करत हिंदू धर्मात रहायचे की स्वत:ची वेगळी वाट शोधायची हे त्यांचे त्यांना पाहू द्या की...
|
Lukkhi
| |
| Thursday, May 31, 2007 - 12:34 am: |
| 
|
मी वर एक प्रश्न विचारला की ५० वर्षापुर्वी जे धर्मांतरीत झाले त्यांची आजची आर्थीक, सामाजीक परिसिथी जैसे थे आहे. >>हे तुम्हाला कुणी सांगितले? आता त्या सस्माजातील मुले शिकतात, शाळा कॉलेजात (व्यवस्थित) शिकवतात, इतर नोकर्या, उद्योगधंदे करतात, समाजकार्यात भाग घेतात. मान्य की त्या समाजात अजून सुधारणेची गरज आहे, पण गेल्या ५०० वर्षात फ़रक पडला नसेल एव्हढा गेल्या ३० - ४० वर्षात पडलाय. सामाजिक दरी आता बरीच कमी झालेली आहे. आंबेडकर आणि गवई सोडा, आपल्या आजूबाजूला बघितले तर सामाजिक आणि आर्थिक उद्धार झालेली अनेक उदाहरणे आपल्याल्या आपल्याच कार्यालयांमध्ये बघायला मिळतील
|
लुक्खी, तुम्ही आडनावावर जाऊ नका. (माझ्या व अ. रां च्या) मी वर प्रामानिक असे खरोखर प्रामानीकपणे लिहीले आहे. निदान त्या अ रा सारख्या माणसावर शंका घेऊ नका त्यांनी काय लिहीले ते वाचा, तुम्ही भारतात असाल तर ते मराठ्यांचा ईतीहास खंड १ ते ३ म्हणुन आहेत, अमेरिकेत असाल तर पत्ता द्या पाठवुन देतो. नेहमी प्रमाने लोक आडनावावर का जातात हे कळत नाही. आणि मी गहजब पण करत नाही तर खरच विचारतोय की हे जे धर्मांतर चालु आहे ते फक्त शो बिझनेस म्हणुन की त्याने प्रगती होनार म्हणुन. मागच्या धर्मांतरात ती दिसली नाही हे सत्य आहे. त्यांनत अनेक धर्मांतरे नागपुर ला झाली. प्रश्न विचार्न्याचा हेतु त्या लोकांची हेटाळनी करने नाही तर त्यांना जे सांगीतले जाते ते होते का? त्याची आकडेवारी उपलब्ध असेल तर तुम्हीच द्या. परत एकदा सांगतो हे प्रश्न प्रामानीक आहेत, माहीती गोळा करन्यासाठी, फालतु वादासाठी नाही.
|
Yogy
| |
| Thursday, May 31, 2007 - 8:13 am: |
| 
|
अयोध्येत राम मंदिर बांधल्याने जसा समस्त हिंदू धर्मीयांचा विकास होणार होता. तसाच या नुकत्याच झालेल्या धर्मांतराने समस्त धर्मांतरितांचा विकास होईल असे प्रामाणिकपणे वाटते.
|
Santu
| |
| Thursday, May 31, 2007 - 8:20 am: |
| 
|
केदार अरे हा लक्षमण माने म्हनजे धंदेवाइक राजकारनि आहे. यासगळ्याचा वापर करुन त्याने बरिच जमिन सातारा येथे लाटलि आहे याची बरिच बोंम्ब मागे झालि होति. या महाराष्ट्रात्ल्या दलित पुढार्यानी मायावती पासुन काहि धडा घेतला पाहिजे. उठ्सुट हिन्दु धर्मा वर हल्ला करुन काय होणार
|
Gobu
| |
| Thursday, May 31, 2007 - 12:14 pm: |
| 
|
लुक्खि, आता त्या सस्माजातील मुले शिकतात, शाळा कॉलेजात (व्यवस्थित) शिकवतात, इतर नोकर्या, उद्योगधंदे करतात,.. हे अगदी खर आहे, निर्विवाद! या समाजाची गेल्या काही वर्षात खुप आर्थिक सामाजिक प्रगती झाली हे सत्य आहे पण हा बदल धर्मान्तरामुळे झाला नाही तर शिक्षणाची आस, मेहनत, ईत्यादीमुळे झाला (रिजर्वेशनमुळे फायदा झालाच) मित्रहो, आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी म्हणुन त्यानी ५० वर्षापुर्वी धर्मान्तर केले नव्हते, त्याची कारणे वेगळी होती यावेळेसही ते काय कारण नाही मग काय?....मानसिक शान्ती, बुद्धतत्वाचा स्वीकार, की आणखी काही...???
|
सान्गली सातारा भागात राहाताना काही बौद्ध विवाहाला उपस्थीत रहाण्याचा योग आला. कन्यादाना सारख्या कालबाह्य गोष्टी नसलेले ते साधे सोपे विवाह आवडून गेले.
|
Chyayla
| |
| Friday, June 01, 2007 - 12:23 am: |
| 
|
धर्मान्तराचे सन्दर्भ बाबासाहेबान्च्या वेळेस दुसरे होते आज त्याचे सन्दर्भ पार बदलली आहेत. धर्मान्तरामुळे एक ओळख निर्माण होते अस वाटत होते पण त्याचाही पुरता भ्रमनिरास झालेला आहे. एवढच काय मुस्लिमानमधेही जे जबरदस्तीने धर्मान्तरीत झाले तरी त्याना पुर्वीच्याच जातीनी ओळखल्या जाते त्यान्च्यातही चक्क चमार, लोहार अशा जातीन्ची ओळख आजही कायम आहे. आज जी काही सामाजिक व आर्थिक परिस्थिती बदलली आहे ती हिन्दु सन्स्कृतीच्या लवचिकतेमुळे व काळानुसार बदलली आहे. हे ईतर धर्मात किती कठीण आहे ते पहातच आहोत. त्यामुळे धर्मान्तराने परिस्थिती बदलली नाही हे आपसुकच सिद्ध झाले. जातीनिहाय अन्याय दुर व्हावा यासाठी कित्येक ब्राह्मण, समाजसेवक, उच्चवर्णिय जसे सावरकर, हेडगेवार, प.पु. गुरुजी, गान्धी तसेच आता आता शन्कराचार्यानी ही योगदान दीलेले आपण पाहिलेच आहे. आज धर्मान्तर केवळ एक राजकिय हत्यार म्हणुन उपयोग केल्या जातो. तर दुसरीकडे सगळ्यात महत्वाचे जिहादी, मिशनरी यान्च्या षडयन्त्राचे बळी. कारण त्याना एक पुरत माहित आहे की एकदा हिन्दु मधुन बाहेर पडला की त्याची नाळ ईथल्या मातीशी, पुर्वजान्शी, सन्स्कृतीशी तोडणे सोपे जाते. आजच्या दलीत चळवळीचे सगळ्यात मोठे अपयश म्हणजे बाबासाहेबानी ज्या धर्मान्पासुन जसे ख्रिश्चन, मुस्लिम यान्पासुन जाणीवपुर्वक दलीत समाजाला दुर ठेवले होते आज तेच नव्बौध धर्मान्तरीताचे किती सहजपणे मिशनरी, चर्चेस धर्मान्तर करीत आहेत ही खरी चिन्तेची बाब आहे. मागे एक मुद्दा मान्डला होता की एकदा धर्मान्तरीत झालेली व्यक्ती स्वता:चे नाव, धर्म, ओळखच बदलवत नाही तर त्याची निष्ठा ही चक्क देशाबाहेर जोडल्या जाउन मग त्यापायी नकळत देशद्रोह करायलाही मागे पुढे पहात नाही. आज काश्मिर, तसेच ईशान्येकडील धर्मान्तरीत झाल्या ख्रिश्चनान्च्या बोडोल्यान्ड व अलगाववादी आन्दोलने पहाता याची खात्रीच पटते. त्याना देशापासुन वेगळे का व्हायचे तर ते हिन्दु नाहीत म्हणुन. हिन्दु मधुन धर्मान्तरीत होउन गेल्यानी केवळ एक हिन्दु कमी होतो असे नाही तर देशाचा एक शत्रूही वाढतो ही खरी चिन्ता.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|