|
बस झाले! कृपया आता परस्परांवर आरोप प्रत्यारोप न करता विषयाप्रमाणे बोला
|
Moodi
| |
| Wednesday, May 17, 2006 - 4:02 pm: |
| 
|
पुरु आणखीन एक गोष्ट थोडी आड येतेय, की काही वेळेस मराठीचे व्याकरण जड पडते अन इंग्लिशचे सोपे वाटते. नॅशनल जीओग्राफी, animal planet सारखे चॅनेल्स सारखे नवीन नवीन माहिती देतात त्यावेळेस मुला मुलींना जर ते समजावुन सांगीतले तर लिहीणे सुद्धा जड जात नाही. हे असे उदाहरण माझ्यासमोर घडलेय म्हणुन सांगते की वाचनाबरोबर प्रात्यक्षीक पण बरे. आता पुण्यात दुकानांच्या पाट्या इंग्लिश अन हिंदीबरोबर मराठीतुन म्हणजे देवनागरीतुन लिहीणे बंधनकारक केलय, पण हे आधीच घडायला हवे होते. बाहेरच्या जगात इतरच भाषा लागतील हे मराठी माणुस जाणतोच, पण घरात तर आपण शिकवु शकतोच की. उलट लहान वयात मुले छान शिकतात. 
|
कृपया व्यक्तिगत चर्चा टाळा आणि विषयाला धरुन लिहा, अन्यथा हा BB बंद करण्यात येईल.
|
Zakki
| |
| Friday, April 20, 2007 - 1:16 pm: |
| 
|
मी आत्ताच असे वाचले की कर्नाटक मधे सगळ्यांना आता कन्नड शिकावे लागणार, कारण त्यांनी तेथे कन्नड हीच अधिकृत भाषा असे ठरवले. नि आता अगदी हॉटेलमधले मेनू पण फक्त कन्नड मधे! ख. खो. दे. जा. पण महाराष्ट्रात असे होऊ नये; नव्हे, होऊ शकणारच नाही. कारण आपण संकुचित् मनोवृत्तिचे नाही. आपण अखंड भारत मानतो, तेंव्हा फक्त मराठीच बोला असा आग्रह धरणे बरोबर नाही. अत्यंत महत्वाचे म्हणजे आपली गिर्हाईके, नि मालक, सगळे अमराठी!ते कशाला मराठी शिकणार आहेत? आपले धोबी, भाजिवाले दुकानदार सुद्धा हिंदी बोलतात! नि त्यामुळे आपणपण!
|
कालच बाळ ठाकर्यांची 'आजतक'वरील हिंदीतील मुलाखत पाहिली. त्यांना जर मराठीचा एवढ अभिमान आहे तर हिंदीत का मुलाखत देतात? फक्त मराठीतच का बोलत नाहीत? करूणानिधी वगैरे मंडळी कधी तामिळव्यतिरिक्त इतर भाषेत बोललेली पाहिली आहेत का? त्यांचे कधी अडले नाही. मग यांनाच हिंदीत मुलाखत देण्याची एवढी हौस का? एकीकडे मराठीवर अन्याय होतो म्हणून आरडाओरडा करायचा आणि दुसरीकडे सर्रास हिंदीत मुलाखती द्यायच्या? सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाळासाहेबांचे हिंदी किंव इंग्लिशवर फारसे प्रभुत्व नाही. या भाषेत बोलताना ते अगदीच मिळमिळीत उत्तरे देतात. कदाचित या दोन्ही भाषा त्यांना चांगल्या येत नसाव्यात. त्यापेक्षा मराठीत प्रभावी उत्तरे दिलेली चांगली.
|
सतिशजि मुद्दा एकदम मान्य!पण आजतक ला मराठीतुन मुलाख़त दिलेली चालणार नाही. बाळासाहेबांची मुलाखत हि फ़क्त मराठीतच प्रभावि ठरु शकते त्यांचे ईंग्रजीवर प्रभुत्व नक्किच आहे. पण तरीही मराठीचा बाज काही न्याराच असल्याकारणाने तसेच आपले मुद्दे आपल्या मायबोलीतुनच आपण काय किंवा बाळासाहेब काय समर्थपणे प्रकट करु शकतो. कालच्या मुलाखतित बाळासाहेबांना वयोमानानुसार ऐकु देखिल कमीच येत असावे हे मात्र प्रकर्षाने जाणवले. आजतक ला त्यांची मुलाखत घेण्याची इच्छा झाली पण अजुन आपल्या मराठी वाहिन्यांपैकी कुणालाही मुलाखत घेण्याची गरज भासली नाहि ही खेदाची बाब आहे. उद्या जर शरद पवारांना मुलाखतिसाठी आजतकने बोलावले तरी त्यांना देखिल हिंदीतुनच आपले विचार मांडावे लागतील चु भु. द्या. घ्या. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
बाळासाहेबांचे इन्ग्लिश चांगले आहे. पूर्वी मी त्यांची बी बी सी च्या एका बयेने घेतलेली इन्ग्लिश मुलाखत पाहिली आहे एका चॅनेलवर. छानच. बाळासाहेब पूर्वी इन्ग्लिश पेपरात कार्टूनिस्ट म्हणून काम करीत. आर के लक्शमन आणि ते शंकर्स वीकलीमध्ये बरोबरच काम करीत. तसे कार्टूनिस्ट म्हणून बाळासाहेब आर केनाही सिनियर आहेत. बाळासाहेब राजकारणात गेल्याने आपण एक आर के च्या तोडीचा व्यन्गचित्रकार गमावला आहे हे निश्चित... (राजकीय बाळासाहेबांचा मी अजिबात फॅन नाही..)
|
Zakki
| |
| Monday, April 23, 2007 - 3:52 pm: |
| 
|
करूणानिधी वगैरे मंडळी कधी तामिळव्यतिरिक्त इतर भाषेत बोललेली पाहिली आहेत का? त्यांचे कधी अडले नाही. मग यांनाच हिंदीत मुलाखत देण्याची एवढी हौस का? एकीकडे मराठीवर अन्याय होतो म्हणून आरडाओरडा करायचा आणि दुसरीकडे सर्रास हिंदीत मुलाखती द्यायच्या? अहो, पण मी वर स्पष्टपणे कारणे मांडली आहेत की आपल्याला हिंदी का बोलायला पाहिजे नि मराठीचा आग्रह का धरता कामा नये. मुख्य म्हणजे आपण 'संकुचित्' मनाचे नाही. भलेहि आपल्याला आपल्याच भाषेची लाज वाटते म्हणा. किंवा एकूणच मातृभाषेपेक्षा दुसर्या भाषेत बोलल्याने आपला उदारमतवादीपणा, आपले इतर भाषांवरील प्रभुत्व सिद्ध होते. स्वाभिमानापेक्षा ते जास्त महत्वाचे वाटते, आपल्यापैकी बर्याच जणांना. म्हणून तर मुद्दाम इथे मायबोली चालू केले. की इथेतरी सगळ्यांना आपल्या प्रिय मराठी भाषेत सुसंवाद साधता येईल. जरा अल्पसंतुष्ट असावे. मिळाले तेव्हढे पुरे म्हणून गप बसावे!

|
बोवाजी ही तुमची स्मायली बन्द करा पाहू. ती मला नेहमी एखाद्या उन्दराच्या चित्राप्रमाणे वाटते....
|
Zakki
| |
| Monday, April 23, 2007 - 7:47 pm: |
| 
|
मग उंदराला घाबरता की काय?
|
मी उन्दरालाच काय उन्दराच्या... .... ... .... मालकाला सुद्धा घाबरत नाय!!
|
Saavat
| |
| Wednesday, April 25, 2007 - 1:21 pm: |
| 
|
अहो हूड, तुमच रानमांजर कुठाय?
|
बिहारमधल्या एका न्यायालयाने राज ठाकरे मागच्या महिन्यात मुंबईत बिहारींच्याविरूद्ध बोलल्याबद्दल अटक वॉरंट काढलं आहे म्हणे. राज किंवा शिवसेनेने नुसती प्रक्षोभक विधानं करण्यापेक्षा किंवा रेल्वेची परिक्षा उधळून लावण्यापेक्षा दीर्घकालीन उपाय केले पाहिजेत. जर रेल्वेच्या परिक्षेची जाहिरात महाराष्ट्रात न देता इतर राज्यांमधे प्रदर्शित केली असेल, तर न्यायालयात जाऊन परिक्षा स्थगित करणे हे जास्त परिणामकारक होऊ शकते. त्याचप्रमाणे पुन्हा जर सत्तेवर आले तर, निदान राज्य सरकारी नोकर्यांमधे गाजावाजा न करता फक्त मराठी लोकांनाच घेणे, परप्रांतीयांना रेशन कार्ड न देणे, सर्व शाळांमधून मराठी विषय सक्तीचा करणे, अमराठी लोकांना निवडणुकीत तिकिटं न देणे, स्थानिक लोकांना नोकर्यांमध्ये किमान ८० टक्के प्रमाण ठेवण्यासाठी कायदा करणे, आयटी कंपन्यांना स्वस्तात जागा देताना बहुसंख्य मराठी लोकांना नोकर्या देण्याची अट घालणे असे अनेक कायदेशीर उपाय करता येतील. नुसत्या सवंग घोषणा किंवा कृत्यांनी काहिही होणार नाही. जे काय करायचं ते गुपचुप पण प्रभावीपणे करणे आवश्यक आहे.
|
Zakki
| |
| Wednesday, May 23, 2007 - 3:52 pm: |
| 
|
गाजावाजा न करता हे कठीण आहे. जागरुक पत्रकार (पैसे देऊन) हे गुपित फोडू शकतील. तेंव्हा जिथे कायद्याप्रमाणे आवश्यक आहे तिथे जाहीराती द्याव्या लागतील. बाकीच्या गोष्टी अगदी कायद्याच्या हद्दीपर्यंत नेऊन अंमलात आणाव्या लागतील. पण तेहि कठीणच. लोक ओरडतील, आम्ही १५ वर्षे इथे रहातो, आम्ही महाराष्ट्रियनच. आम्हाला मराठी येत नसले म्हणून काय झाले? मराठी लोकांना तरी कुठे मराठी येते आजकाल? काय उत्तर द्याल त्याला?
|
अमराठी लोकांना निवडणुकीत तिकिटं न देणे,>>>>> पुन्हा सत्तेत आले तर म्हणजे ? मनसे कधी सत्तेत होता? राजची विधाने मनसे म्हणून आहेत. अमराठी लोकाना तिकिटाचा आरोप तुम्ही शिवसेनेवर करा... त्यांचे राज्यसभेचे सीट अमराठी उद्योगपती अगर परप्रांतीय लोकांसाठी राखीव आहेत... असो . son of the soil theory ची अनेक वेळा चर्चा झालीय अन त्यातले वैयर्थ ही लक्षात आलेय त्यामुळे पुन्हा पुन्हा तो मुद्दा काढून उपयोग नाही... सेना भाजप युती सत्तेत आली तेव्हा त्यानी अशा स्वरूपाच्या कायद्याची चाचपणी करून पाहिली होती पण ते घटना बाह्य असल्याचे निदर्शनास आणले गेले. विधानसभेचे कायदे घतनेच्या मूळ गाभ्याशी सुसंगत नसतील (अल्ट्रा व्हायरस)तर रद्द करण्याचे अधिकार सुप्रीम कोर्टाला आहेत... सभागृहाला घटनेत बदल केल्याखेरीज घटनेच्या विसंगत वर्तन करता येत नाही. उमेदवारी अर्ज भरताना व सभागृहात प्रवेश करताना घटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी लागते.(मी अशी शपथ अनेकाना दिलीय आता घटना गेली उडत असे आपल्याला म्हणायचे असेल तर मला काहीच म्हणायचे नाही असे अनेक कायदेशीर उपाय करता येतील.>>>>> मुळात हे उपाय कायदेशीर नाहीत त्यामुळे ते करता येणार नाहीत त्यात एक व्यावहरिक बाब आहे मनसे अथवा सेना प्रादेशिक पक्ष असले तरी त्याना राष्ट्रीय पक्ष होण्याची महत्वाकांक्षा आहे. त्याना यू पी बिहारात जायचेय. केन्द्रिय मंत्रिमंडळात जायचेय.. अशा वेळी यू पी बिहारच्या प्रजेशी पर्यायाने लोकप्रतिनिधींशी पंगा घेणे शक्य नाही. ही गुरगुर सत्ता येईपर्यन्तच करायची असते. म्हणून तर बी जे पीनेही नन्तर ३७० कलमाबाबत, समान नागरी कायद्याबाबत बोटचेपी भूमिका घेतली.. सर्व संमतीनेच समान नागरी कायदा आनला जाईल हे वाजपेयींचे विधान सर्वात विनोदी विधान म्हणता येईल.. असे विनोद सर्व पक्षातील लोक करीत असतात.मनुवादी ब्राम्हण मायावतीच्या मंत्रीमण्ड्ळात ही कल्पना मागच्या वर्षी कोणी करू शकले असते काय? महाराष्ट्रात मराठे २२ टक्के आहेत. उरलेले ७८ टक्के लोक माया प्याटर्नमुळे एकत्र झाले तर काय या कल्पनेने मराठ्यांची धोतरे नक्कीच ढिली झालीत...त्यामुळे आता माहाराष्ट्रात अशी विनोदी विधाने नजीकच्या काळात फार येणार आहेत तेव्हा तयार रहा हसायला!!! त्यामुळे सतीशभाऊ राजभाऊंचे विधान फार गाम्भीर्याने घेऊ नका )
|
रॉबीनहुडनी लिहिलय की महाराष्ट्रात मराठे २२% आहेत ते सोडून राहिलेले एकत्र झाले तर काय होइल वगैरे. हे चुकीच आहे. माया ला मुख्यमंत्री बनवण्यात तेथील क्षत्रिय समाज पण होता हे विसरू नये.तेथे सर्वच समाजातील व्यक्तींनी तिला पाठिंबा दिला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बाळासाहेब हिंदीत का बोलतात मराठीतच बोलायला पाहिजे हेही चुकिच.जर आज तक हिंदी वाहिनी आहे तर मग तिच्याशी हिंदीत बोलण्यात काहीच हरकत नाही. हिंदुत्वासाठी बाळासाहेबांची गरज आहे.त्यांच्या हिंदुत्ववादी वक्तव्यांचे प्रतिसाद पाकिस्तानात पण उमटतात. आणि स्पष्ट भुमिका तेच घेतात.संघ तशा भुमिका घेतही नाही आणि त्यांना कोणी आजकाल फ़ारस महत्वही देत नाही. राममंदिरासाठी बलिदान करु वगैरे घोषणा देणारे केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता नसल्यावर कुठे गायब होतात समजत नाही.बाळासाहेबांच्या बोलण्याला महत्व आहे. त्यासाठी हिंदित बोलायला हरकत नाही. करुणानिधी राजकारण जर सर्व भारतात लागू झाल तर या देशाच्या फ़ाळण्या होतिल अशीही भिती आहे.मराठी माणसाने आधी आपल्या लोकांचे पाय ओढणे सोडले पाहिजे.दुसरी गोष्ट म्हणजे मुंब ईमधे अमराठी लोक खुपच आहेत.
|
बाळासाहेब देखील सत्ताप्राप्तीसाठी अथवा सत्ताप्राप्तीनन्तर भूमिका बदलतात वक्तव्ये बदलतात... बेळगावचा सीमाप्रश्न त्यानी सोडून दिलाय त्याचं स्पष्टीकरण त्यानी दिलय की सीमाप्रश्ना मुळे सत्ता मिळणार नाही त्यासाठी हिन्दुत्वाचा व्यापक बेस घेतला आहे. त्याना बिहार यूपीचे शिवसैनिक चालतात. तसेच युती सत्तेत आल्यावर समाजकल्याण खाते बन्द करून टाकीन असे म्हटले होते पण केले नाही...
|
Zakki
| |
| Wednesday, May 23, 2007 - 6:30 pm: |
| 
|
थोडक्यात्, महाराष्ट्रातल्या मराठी लोकांचे मरणसुद्धा त्यांच्या हातात नाही. ते देखील जेंव्हा अमराठी लोक ठरवतील तेंव्हा! मग प्रश्न असे की, हीच घटना इतर राज्यांना लागू असताना, ते कसे आपल्याच राज्यातील लोकांना नोकर्या देतात? आपल्या भाषेचा आग्रह धरतात? त्यांना अखिल भारतीय पक्ष बनण्याची महत्वाकांक्षा नाहीये का? त्यांना बिहारी,यू. पी. इथल्या लोकांचा त्रास होत नाही का? सर्वात पुढारलेले राज्य म्हणावे तर इतर राज्ये काय इतकी मागासलेली आहेत का? गुजरात, कर्नाटक? असे प्रश्न उद्भवतात!
|
दिल्लीतल्या जामा मशीदीच्या इमान बुखारीविरूद्ध अनेक वेळ कोर्टाने अटकेचे वॉरंट काढले होते. पण जेव्हा जेव्हा पोलिस त्याला पकडायला गेले तेव्हा तेव्हा त्याच्या समर्थक मुसलमानांनी जमाव करून पोलिसांना मशीदीच्या जवळपास सुद्धा येऊ दिले नाही. ३-४ वर्षांपूर्वी २००२ च्या मुंबई बॉंबस्फोटातला आरोपी, साकीब नाचनला, पकडायला मुंबईचे पोलिस मीरारोड-भाईंदरला गेले, तेव्हा तिथल्या मुस्लिमांनी जमाव करून दगडफेक करून पोलिसांना पळवून लावले होते. ७-८ वर्षांन्पूर्वी महाराष्ट्रातले काही पोलिस मुंबईतल्या काही बेकायदेशीर बांगलादेशींना पकदून त्यांना रेल्वेने बांगलादेशाच्या सीमेवर घेऊन चालले होते. त्यांची भारतातून हकालपट्टी करण्यासाठी त्यांना सीमेवरील सैनिकांच्या ताब्यात द्यायचे होते. रेल्वे बंगालमध्ये शिरल्यावर कम्युनिस्टांच्या दोन आमदारांनी आपले समर्थक घेऊन त्यांच्या डब्यावर हल्ला करून पोलिसांना मारहाण केली व त्या बांगलादेशीयांना मुक्त केले. राजला जेव्हा बिहारचे पोलिस अटक करायला येतील, तेव्हा राजच्या समर्थकांनी असाच गोंधळ करून त्यांना पळवून लावावे.
|
शिवसेना किंवा आता मनसे, हे केवळ स्टंटबाजी म्हणुन मराठीची तळी उचलुन धरत आहेत. शिवसेना ५ वर्षे सत्तेत होती तेव्हा मरातई गिरणि कामगारांसाठी काय केले?? आमच्या ईथे शाखेसमोर आणि आजुबाजुला दुकानांवर ईंग्रजी नामफलक आहेत, पण त्याक्डे लक्ष जात नाही. कदाचित शिवजयंतीला मिळणारी देणगी हा त्यामागिल भाग असावा. मुळात प्रादेशिक पक्ष राहुन सुद्धा बरेच काही मिळवता येते हे दक्षिणेकडील पक्षांनी दाखवुन दिले आहे. त्यामुळे शिवसेनेने देशपातळीवर जाण्यापेक्ष ईथेच राहुन काम केले आणि ते देखिल मराठी माणसांसाठी तर नक्कीच त्यांना फायदा होउ शकतो. वर हुडाने म्हटल्याप्रमाणे शिवसेनेने बर्याच प्रश्नांबाबत धरसोड भूमिका घेतली आहे. त्यांना खरच मराठी माणसा साठीचा पक्ष म्हणुन काम करायचे असेल तर आपली भूमिका बदलली पाहिजे!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|