Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 15, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » General » Archive through May 15, 2007 « Previous Next »

Kedarjoshi
Wednesday, April 18, 2007 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच जर सांगयचे झाले तर मला स्व्त ला या काहीही भयानक वाटत नाहीये ( कदाचीत रोजच १०० लोक मेल्याच्या बातम्या ऐकुन). आता तुम्ही म्हणाल की मला काय भावन नाहीत का? तर उत्तर हे फक्त अमेरिकेतच घडु शकत. ईतर देशात नाही (अजुन्तरी).

वैयक्तीक स्वातंत्र्याचा नावाखाली स्वैराचारी व्ह्यायच व नंतर असे काही झाले की म्हनु रुट कॉज करायला पाहीजे. अमेरिकेत प्रत्येक राज्यात तुम्ही बंदुक सहजगत्या विकत घेऊ शकता व वापरु शकता. बंदुक संघटना बंदुकीवर बंदी घालु देत नाहीत. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण २००३ मध्ये मी स्वत अमेरिकेत बंदुक चालवायच प्रशिक्षन घेतल आहे. (नेमबाजी). अगदी कोणीही ज्याचाकडे गाडी चालवायच लायसन्स आहे तो मस्त बंदुक विकत घेउ शकतो. (कुठल्याही देशाचा नागरीक असला तरी) व एकदा बंदुक आल्यावर रागात ती दुसर्यावर चालवु शकतो. अशा घटना ईथे रोज घडतात. (फक्त मरनारे १ वा २ असतात) रोजचा पेपर वाचला (येथील) तर महीन्यात कीती घटना घडतात याचा अंदाज येईल.

मग ईतक्या घ्टना घडल्यावर त्यावर रोक आणु नये का?
आता कसे बोललात.
तर अमेरिका की पैशासाठी आहे. सर्व काही पैशात तोलले जाते. जर बंदुका विकल्या नाहीत तर त्या तयार करनारे कारखाने कसे चालतील. अरे हो मग तेवढे जॉब कट नाहीका होनार, मग मी माझ्या शेतात एकटा कसा राहु?, मग मी शनीवारी शिकार करायला जाउ नको का? मी थोडी अनेकांना मारले? अरे हो ति घटना वाईट पण त्या पोरामुळे माझी बंदुक का काढुन घ्यावी?
तर असे मुलभुत स्वातंत्र्याचे प्रश्न निर्मान होतात व बंदुकाचा लॉबी अजुन फेमस होतात.

मग अशी मोठी घटना घडली की तेच प्रश्न परत येतात व लोक चर्चा करतत मी मात्र रुट कॉज लक्षात घेऊन गप्प बसतो कारण मेलेल्यांचे मला फार काही वाट नाही. कारण ते खरे बंदुका मिळन्यामुळे मेले आहेत. जर बंदुका मिळन्यावर रोक लावला तर अशा घटना ही कमी घडतील.


Mukund
Thursday, April 19, 2007 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार.. तुझे पोस्ट अमेरिकेबद्दल पुर्ण सत्य सांगत नाही.. बंदुका बनवणारे व विकणार्‍यांना पैसा मिळतो म्हणुन बंदुका विकतात हे बरोबर आहे पण मुळ कारण ते नाही.

जे झाले ते बरोबर नाही व अतिशय ट्रॅजीक आहे.

सर्वप्रथम वरकरणी असे वाटणे साहजीक आहे की ही गोष्ट बंदुका बाळगण्यासाठी अनिर्बंधता असण्यामुळेच झाली. पण तसे नसुन ही गोष्ट अशा माणसामुळे झाली की त्याचे मानसीक संतुलन कमालीचे बिघडले होते. त्याला विविध प्रकारच्या विक्रुतींनी पछाडले होते हे दिसुन येत आहे.
The guy was bizarre in his behavior and was mentally sick. Thats the reason we have 32 innocent people dead from that University...gun was just the means he used to carry out these murders.

आता गन कंट्रोल बद्दल म्हणशील तर तो विषय समजुन घ्यायला तुला अमेरिकेचा इतिहास समजवुन घ्यायला पाहीजे तरच तुला त्यामागचे कारण समजु शकेल.

१४९२ मधे कोलंबसने दक्षिण अमेरिकेचा शोध लावला व त्यानंतरच्या लोकांना अमेरिकेत यायचा मार्ग दाखवुन दिला. नंतर जिओव्हानी कबोटो वगैरे सारख्या लोकांनी उत्तर अमेरिकेचा शोध लावला. अशा एवढ्या मोठ्या खंडाचा शोध लागला आहे हे युरोपमधे सगळीकडे जाहीर झाले. सर्वप्रथम जे स्पॅनीश लोक आले ते फक्त दक्षीण अमेरिकेतले इंका व माया लोकांचे सोने व वैभव लुटण्यासाठीच आले.पण नंतरचा इतिहास रंजक आहे. त्या सुमारास म्हणजे १५०० ते १६७५ सालादरम्यान युरोपमधे दोन आघाड्यांवर क्रांती होत होती. गॅलेलीओ,कोपर्निकस,न्युटन,लिओनार्दो द व्हिंची,मायकेल ऍन्जेलो युरोपमधे रेनेसांसचे नवे युग निर्माण करत होते तर जर्मनीमधे मार्टीन ल्युथर पोपच्या स्तोमाला कंटाळुन कॅथलिकांपासुन वेगळे होउन प्रॉटेस्टंट धर्माचा पाया घालत होता. युरोप व इंग्लंडमधे बरीच लोक पोपच्या अनिर्बंधीत सत्तेला व कॅथलिक चर्च व ऍन्ग्लिकन चर्च जे त्यांच्या निजी जिवनात ढवळाढवळ करत होते त्या करत असलेल्या ढवळाढवळीला ती लोक कंटाळली होती. इंग्लंडमधे जरी लोकशाहीची सुरुवात होत होती तरी लोकांना या चर्चने चालवलेल्या अवडंबराचा वीट येत होता. तसे लोक मग या नवीन खंडाच्या कडे आशेने पाहु लागले. की तिथे जाउन आपण रिलिजीअस फ़्रीडम मिळवु व एक नवीन जिवन सुरु करु.

अशा हेतुने सुरुवातीचे इमिग्रंट अमेरीकेत आले. त्या सगळ्यांना लोकशाही तर हवी होती पण त्यातले सगळे दोष वगळुन. १७७६ च्या स्वातंत्र्य युद्धानंतर इथले जे अमेरिकेचे फ़ाउंडींग फ़ादर होते.... थॉमस जेफ़रसन, वॉशिंग्टन, बेंजामीन फ़्रॅंकलीन, जॉन अडॅम्स वगैरे त्यांनी मग अमेरिकेची संहीता लिहिली. थॉमस जेफ़रसन हा त्याचा प्रमुख शिल्पकार होता.(आंबेडकरांनी आपली घटना लिहिताना स्फुर्ती याच घटनेतुन घेतली होती). आता मुळातच ही युरोपमधुन आलेली माणसे.. तिथल्या सरकार व चर्च वर भरोसा नसल्यामुळे इथे आली होती. आता या नव्याने स्थापलेल्या देशात परत तसे सरकारचे व चर्चचे बंधन नागरीकांवर नको म्हणुन प्रथम त्यांनी ठरवले की चर्च आणी सरकार या दोन गोष्टी वेगळ्या असाव्यात व एकाने दुसर्‍यांच्या अधिकारात ढवळाढवळ करायची नाही.

ते ठरवल्यावर घटना कुठल्या तत्वांवर लिहायची या करता जेफ़रसनने जॉन लॉक ची ३ तत्वे जी त्या काळी इंग्लंड मधे पण खुप लोकप्रिय होती...
Life , Liberty and Persuit of happiness...त्या तत्वांचा आधार घेतला. आजही अमेरिकेत म्हणुन तुम्हाला दिसेल की ही ३ तत्वे लोकांना अगदी जवळची वाटतात व त्याप्रमाणे त्यांचा समाज काम करतो असे दिसुन येईल. आता लिबर्टी म्हटल्यावर त्याचा गैरफायदा घेणारी माणसे पण इथल्या समाजात कमी नाहीत पण मुळ तत्व खरच चांगले आहे.

आता घटनेची बेसिक संहिता तयार केल्यावर त्यात आजपर्यंत २७ अमेन्डमेंट्स केलेली आहेत त्याला पहिल्या दहाला बील ऑफ़ राइट्स असे म्हणतात.

त्यातले पहिले म्हणजे फ़्रिडम ऑफ़ स्पीच.. व दुसरे म्हणजे फ़्रिडम ऑर राइट टु बेअर आर्म्स!

आता काहींना वाटेल की हे कशाला अमेंडमेंट केले? तर त्याचा मुळ हेतु असा होता की आपण आज लोकशाही तर स्थापन करत आहोत पण याची काय हमी की जे लोक गव्हर्न करतील ते त्या सत्तेचा गैरफायदा घेणार नाहीत व लोकांवर जुलुमी कायदे न करुन व ज्यादती न करुन लोकशाही अमलात आणतील? तर त्यासाठी दुसरे अमेंडमेंट अमेरिकन लोकांना असा हक्क देते की तुम्ही स्वत्:च्या रक्षणाकरता आर्म्स बाळगु शकता व वेळ पडली तर त्याच आर्म्स चा उपयोग करुन करप्ट सरकार विरुद्ध मॅलीशिया ग्रुप्स स्थापन करता यावेत व जेणेकरुन अशा सरकारविरुद्ध बंड करुन उलथता यावे.

सरकारवरच्या अशा अविश्वासाचे बीज त्या लोकांनी युरोपमधे फ़्रेंच व ब्रिटीश लोकशाहींमधे जे अनुभवले होते त्या अनुभवांमधे दडले आहे.तशा गोष्टींची पुनराव्रुत्ती इथे परत या नवीन स्थापलेल्या देशात नको म्हणुन फ़्रिडम टु बेअर आर्म्स!

हे बील ऑफ़ राइट्स इथल्या लोकांना अतिशय प्राणप्रिय आहेत. त्यांची पायमल्ली हे लोक कधीच होउ देणार नाहीत. इथली विचारसरणी अशी आहे... आज तुम्ही त्या हक्कावर गदा आणलीत... उद्या फ़्रिडम ऑफ़ स्पिच वर आणाल...तिसर्‍या दिवशी अजुन कशावर व हळु हळु लोकशाही सरकार व हुकुमशाही यात फरकच राहाणार नाही. त्यामुळे घटनेतील व बील ऑफ़ राइट्स मधली प्रत्येक तत्वे तंतोतंत पाळायची असे इथल्या लोकांचे मत आहे.म्हणुन तुम्हाला अमेरीकेत गन कंट्रोल कधीच शक्य होणार नाही. नुसते हिटेड डिबेट्स होतील... मधुन मधुन.... पण गन कंट्रोल कधीच होणार नाही या देशात...

आणी समजा.... गन कंट्रोल जरी आणला... तरी या मुलासारखे माथेफिरु व इतर समाजकंटक व गुंड बेकायदेशीर पणे गन्स मिळवतीलच व अशी निर्घुण क्रुत्ये करत राहतीलच. ही क्रुत्ये मानसिक किडेतुन व विक्रुतीमुळे होतात..गन्स हे साधन आहे. या गोष्टी गन्समुळे झाल्या असे म्हणणे म्हणजे प्रत्येक भोसकुन झालेला खुन हा चाकुमुळे झाला असे म्हटल्यासारखे आहे.... शस्त्र खुन करत नाहीत... शस्त्र धरणारी व्यक्ती खुन करत असते...


Psg
Thursday, April 19, 2007 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद छान माहिती. गन्स बॅन करणं शक्य नसेल, कारण घटनेत दिलेले स्वातंत्र्य आणि केदार म्हणतो तसे पैसा हे ही कारण आहेच.
पण त्याचे हे असे दुष्परिणामही त्यांनाच भोगयला लागत आहेत ना? मेलेली लोक काही specific वंशाची नव्हती.. गोरेही मृत्युमुखी पडलेच..

यातून काहीतरी मार्ग काढायची वेळ आली आहे..


Sanghamitra
Thursday, April 19, 2007 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद सुरुवातीची वाक्ये वाचून (ते मूळ कारण नाही वगैरे) वाटले होते की पुढे लिहीलेले काही पटणार नाही पण खूपच छान माहिती दिलीत.
प्रत्येक सामाजिक बदल हा काहीतरी जुने वाईट टाकून काहीतरी नवीन चांगले घडावे यासाठीच होत असतो. पण माणसाची बुद्धी एका कायद्याला हजार पळवाटा शोधण्यात इतकी वेगात चालते की हे होतच रहाणार.
अमेरिकेच्या इतिहासावर एखादे चांगले पुस्तक सुचवाल का मराठी किंवा इंग्लिश?
पूनम काय करणार? सगळ्या समाजाचेच मानसिक संतुलन बिघडलेय. आणि त्याला संस्कार नावाची एकच ट्रीटमेंट लागू पडते. पण ती देणारे डॉक्टर्स हळूहळू कमी होतायत. :-)
हा स्वार्थीपणा असू शकेल पण खरंच हे 'तिकडे' असेच चालत राहिले की आपल्याकडेही तशी फ्याशन यायची याचीच मला जास्त भिती वाटते.


Bee
Thursday, April 19, 2007 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद, नेहमीप्रमाणे एक चांगले पोष्ट.

Asami
Thursday, April 19, 2007 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद thank you for smoking पाहिलात का ? :-)

Kedarjoshi
Thursday, April 19, 2007 - 2:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद हो अमेरिकेची घटना कशी निर्मान झाली हे मला माहीती आहे. वयक्तीक स्वातंत्र किती व कसे असावे ही मी मांडत होतो. कारण आता परत अमेंड्मेंट करायची वेळ आली आहे.

मुलासारखे माथेफिरु व इतर समाजकंटक व गुंड बेकायदेशीर पणे गन्स मिळवतीलच व अशी निर्घुण क्रुत्ये करत राहतीलच. ही क्रुत्ये मानसिक किडेतुन व विक्रुतीमुळे होतात>>>>

बरोबर पण जर गन्स वर कंट्रोल असेल तर थोडा रोक नाहीका लागनार? तो विकृत आहे हे मान्य. पण १० वर्षाचा मुलगा शाळेत बापाची गन घेऊन येतो व दुसर्या मुलांना मारतो या घटनांचे समर्थन तुम्ही करु शकाल का?

समाजकंटक हे विषेशन त्याच लोकांना दिले जाते जे समाज्विरोधी कारवाया करतात. त्यांना बंदुका कशा पैदा करायचा ते माहीती असतेच पण सामान्य मानसे त्या रुट वर जात नाहीत. मानसिक विकृती असनार्याना सहज गन्स मिळत असतील तर अशी कृत्ये जास्त नाही का होनार?


हा स्वार्थीपणा असू शकेल पण खरंच हे 'तिकडे' असेच चालत राहिले की आपल्याकडेही तशी फ्याशन यायची याचीच मला जास्त भिती वाटते>>>>>
मित्रा अग काय यायच राहील नाही. बहुतेक सगळच तर आलय. जर गन चे कायदे असे लुज केले तर गल्लीतल्या दादाचा पोरगा शाळेत येऊन दुसर्या एकद्द्या मुलाला कशावरुन मारनार नाही?






Zakki
Thursday, April 19, 2007 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बंदुका, पिस्तुले, गन्स (गण नव्हे) बंद करण्याचा कायदा येत नाही, कारण काही लोक असा मुद्दा मांडतात की जेव्हढे गुन्हे या गन्समुळे होतात, त्याच्या चौपट गुन्हे गन्स मुळेच थांबवल्या जातात. पण त्यात सनसनाटी नाही म्हणून प्रसिद्धी माध्यमे त्याला प्रसिद्धि देत नाहीत. पण ज्यांनी असे प्रत्यक्ष अनुभवले आहे ते पण जोरात आपला मुद्दा मांडतात, शिवाय पैसेहि भरपूर देतात निवडून आलेल्या लोकांना. त्याला आपल्याकडे लाच म्हणतात म्हणून ते आपण वाईट समजतो, पण इथे त्याला lobbying म्हणतात नि वर म्हणतात कॅपिटलिस्ट समाजात असेच चालणार, तुमच्याजवळ जास्त पैसे असतील तर तुम्ही जास्त पैसे द्या, नि थांबवा गन्स!

हळू हळू भारतहि कॅपिटलिस्ट होत आहे, म्हणूनच ना तो कोण नट आहे त्याने अवैध शिकार केली नि दुसर्‍यावर सध्या गन्स बद्दलच खटला चालू आहे, पण तो तुरुंगात जात नाही?

भारतात त्याला भ्रष्टाचार, लाचलुचपत म्हणायचे नि ते निंद्य मानायचे कारण भारतातले लोक इतर जगातल्या लोकांपेक्षा, जंगल सोडून, सभ्य व सुसंस्कृत झाले आहेत. म्हणून त्यांना ते निंद्य वाटते.

सगळे जग अजून जंगली मनोवृत्तिचे आहे. जास्तीत जास्त, हाताने न जेवता काट्या चमच्याने जेवायचे एव्हढीच त्यांची संस्कृति!
त्यांचा अजून जंगलाचा कायदा! जास्त ताकद (अणुशस्त्रे), जास्त पैसा ज्यांच्याजवळ आहे ते बरोबर, बाकीचे चूक.
हटकेश्वर, हटकेश्वर.


Disha013
Thursday, April 19, 2007 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं......मग या बिल ऑफ़ राईट्स आणणार्या किंवा lobbying करणा-यांच्या घरातील कोणी बळी गेला तरच आशेला जागा आहे म्हणायची...

Disha013
Saturday, April 21, 2007 - 2:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक वाचनिय लेख...न्न्ब भ्न्ज्न


http://www.deshonnati.com/21apr/mpra.htm

Mukund
Friday, April 27, 2007 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा तुला मेल करुन पुस्तके सांगीन.

असामी नाही रे पाहीला तो मुव्ही... पण स्मोकींग ची गोष्ट वेगळी आहे... त्यात झक्की म्हणतात त्याप्रमाणे लॉबी आहे.. फिलीप मॉरीस सारख्या जायंट कंपनीची व व्हर्जीनिया-नॉर्थ कॅरोलायनाच्या तंबाखु शेतकर्‍यांची.... अब्जावधी डॉलर्सचा प्रश्न आहे तो त्यांच्यासाठी! गन्स च्या बाबतीत एवढा पैसा त्या इंडस्ट्रीत नाही.

इथे अमेरिकेत सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश निवडताना ते घटनेचे स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन करणार की नाहीत या वरुनच इथल्या सरकारचे लेजीस्लेटिव्ह व एक्झ्युक्युटीव्ह खात्यातील लोक(म्हणजेच कॉंग्रेस व व्हाइट हाउस) त्यांची निवड करतात. म्हणुन सुप्रीम कोर्टामधले सगळे सरन्यायाधीश घटनेच्या बाहेर जाणारा निर्णय कधीच घेणार नाहीत....म्हणजेच.... गनवरती कंट्रोल कधीच आणु देणार नाहीत...! त्यामुळेही मी असे म्हटले की अमेरिकेत गन कंट्रोल कधीच होणार नाही. गन लॉबी आहे हे मान्य आहे पण मुख्य कारण घटनेचे तंतोतंत इंटरप्रिटेशन!

पुनम.... अशा स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशनमुळे इथे गन कंट्रोल शक्य नाही. या बाबतीत गोरा काळा अश्या वंशभेदाचा प्रश्नच उद्भवत नाही. हे(हत्याकांड) एका माथेफिरुचे काम आहे...

दिशा... अग ते अमेंडमेंट करणारे केव्हाच गेले.. या जगातुन.... १८२०-१८३० च्या सुमारास...:-) हं... आता लॉबीस्ट म्हणशील तर आहेत... पण इथे काही(खर म्हणजे बरीचशी!) लोक इतकी आडमुखी आहेत ना... की काहीही झाले तरी त्यांच्या विचारसरणीला चिकटुनच बसतील... प्रामुख्याने फ़ंडामेंटलीस्ट लोक... आता बुशचेच उदाहरण बघ ना... त्याची इराक पॉलीसी त्याला रोज तोंडघशी पाडत आहे... इराकची काय दशा करुन टाकली आहे बघ त्याने... स्वत्:चे देखील ४००० च्या वर सैनीक निष्कारण मेले आहेत... निरपराध इराकी किती मेले याची तर गणतीच नाही अमेरिकेने निर्माण केलेल्या सिव्हील वॉरमधे...सद्दामच्या हुकुमशाहीत सुद्धा एवढी माणसे मेली नसतील! पण तशा पॉलीसीला पण आंधळेपणाने पाठींबा देणारा मोठा वर्ग इथे अमेरिकेत आहेच... काय म्हणशील आता?:-)

केदार... मी कुठल्याच गन संहाराचे समर्थन करत नाही आहे. उलट मी सुद्धा गन कंट्रोलच्या बाजुनेच आहे... मी फक्त इथल्या इतिहासाच्या पार्श्वभुमीवर गन कंट्रोल का होउ शकणार नाही या देशात ते समजावयचा प्रयत्न करत होतो... एवढेच.... आणी तु म्हणतोस ते बरोबर आहे... परत अमेंडमेंट करायची वेळ आली आहे...



Gobu
Monday, April 30, 2007 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुन्दा,
छान लिहीलेस ह तु..
लिखाण अभ्यासपुर्व आहेच, शिवाय तटस्थ ही..
अभिनन्दन!


Zakki
Monday, April 30, 2007 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे तर, गन कंट्रोल च्या कायद्यात सध्या तरी, निदान काही राज्यांत बॅकग्राऊंड चेक नावाचा प्रकार आहे. पण त्यात mental illness बद्दल काहीच नाही. कारण जरी कुणाला मेंटल प्रॉब्लेम आहेत असे त्याच्या डॉक्टराला माहित असले तरी ती माहिति डॉक्टर पेशंट confidentiality या कायद्यान्वये प्रसिद्ध करता येत नाही. जर प्रसिद्ध केले तर त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते, म्हणून तर मुळातच हा डॉक्टर पेशंट confidentiality चा कायदा आहे. तर तो बदलणे म्हणजे वेगळाच प्रश्न होतो. कारण मग इतर रोगांबद्दल सुद्धा माहिती प्रसिद्ध का करू नये, असाहि प्रश्न येईल.

बुशने कायदा केला की, लोकांचे टेलेफोन कॉल मॉनिटर करायचे! तर तेहि खरे वैयक्तिक हक्कांची पायमल्लीच आहे. पण ते अतिरेक्यांविरुद्ध 'युद्ध' करण्यासाठी आहे.

तेंव्हा आणखीन किती आमची लाज उघड्यावर आणणार? असा प्रश्न उद्भवतोच!

एकूण, या देशातल्या घटनेला एक उत्कृष्ट घटाना म्हणतात, पण वैयक्तिक हक्क नि सार्वजनिक सुरक्षा यांचा मेळ काही बसत नाही.

शिवाय काही दूरदष्टिने निर्णय घेणे आता या जगात शक्यच नाही. जिथे तिथे राजकारण, नि पैसा हेच महत्वाचे झाले आहे!

लोक बिचारे, हळू हळू अधिकाधिक गैरसोयी सहन करून जगत रहातात. इथे हीहि एक गैरसोय! नाईलाज को क्या इलाज असे भगवंताने नि तुकारामाने म्हंटलेलेच आहे!


Mahaguru
Sunday, May 13, 2007 - 12:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऊसगावकर वाले साहेब लोक खरोखर घुटने आहेत.
http://www.loksatta.com/daily/20070513/mp04.htm

Zakki
Sunday, May 13, 2007 - 9:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यांनी मागेहि मोदी (भा. ज. प. चे एक नेते), तसेच एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ, जे पूर्वी अनेकदा अमेरिकेत येऊन गेले होते, त्यांना व्हिसा नाकारला होता. आता त्या आमट्यांचे कुणी जवळचे नातेवाइक इथे असतील नि त्यांनी sponsor केले तरी सर्व काम वेळच्या वेळी पूर्ण होईल की नाही याची शाश्वति नाही!

एकंदरीत अमेरिकेतले लोक जरा (जरा काय, बरेचसे) चक्रमच आहेत. अगदी लाखो लोक बेकायदेशीरपणे मेक्सिकोतून घुसतात, गुन्हे करतात, पण एक कायदेशीर रीत्या येऊ इच्छिणारा भारतीय मात्र कितीहि चांगला असला तरी त्याला अडचणि येतात!

म्हणून तर जगातल्या सर्व लोकांना इथे यायची इच्छा असते. कारण अमेरिकन स्वत: ९ ट्रिलियनचे कर्ज करतील पण पैसे खर्च करण्याचे थांबवणार नाहीत! अगदी तुम्ही नको म्हंटले तरी देतील.

मी तर म्हंटलेच. ब्रम्ह सत्यं, जगन्मिथ्या याचा प्रत्यय यायला या देशात मदत होते. सगळेच खोटे हो, पैसा खोटा, प्रेम खोटे, धर्म खोटा!


Santu
Monday, May 14, 2007 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा आहे
गंगु मेहतर १९५७ च्या लढ्यातिल
फ़ाशी गेलेला एक शहिद


Santu
Monday, May 14, 2007 - 10:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हि आहे लखनौ मधील १८५७ मधे नानासाहेबाने
उध्द्वस्त केलेलि engliish recidansy


Santu
Monday, May 14, 2007 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गन्गु मेहतर ची फ़ाशि १८५७ चे बन्ड

Chinya1985
Monday, May 14, 2007 - 10:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुंद तू लिहिलेल पुर्णसत्य नाही.गन्सचा कायदा करण्यामागे (अधिकार जनतेला देण्यामागे),सरकार उलथून पाडण हा महत्त्वाचा मुद्दा नव्हता तर अमेरिकेतिल तत्कालीन सामाजिक स्थिती हा महत्त्वाचा मुद्दा होता.त्या काळात गोरे आणि काळे यांच्यात युद्धे होत असत. आणि अमेरिकन गोर्यांनी गुलामगीरीसाठी काळ्यांवर अत्याचार केले होते आणि पैसा कमावण्यासठी काळ्यांकडून श्रम करवून घेतले जात आणि काहीच मोबदला दिला जात नसे. आणि हा फ़ायद्याचा धंदा इतका लोकप्रिय होता की आफ़्रीका आणि इतर देशांतून जहाजे भरभरुन काळे आणले गेले आणि गुलामगीरी वाढतच गेली आणि एक वेळ अशी आली की दक्शिण भागामधे बर्याच ठिकाणी काळे लोक गोर्यांपेक्शा जास्त झाले. आणि गोर्यांना त्याचे भय वाटू लागले.त्यामुळे काळ्यांपासुन सुरक्शा हा गन्स चा कायदा करण्यामागचा मुख्य उद्देश होता.मात्र काळ्यांची इतकी घेतलेली भिती ही निरर्थक होती कारण जेंव्हा कधी काळ्यांवर वेळ आली त्यांनी हिंसाचाराचा मार्ग मोठ्या प्रमाणात स्विकारला नाही काही काळ अमेरीकेमध्दे असाही कायदा होता की फ़क्त गोर्यांनाच गन्स बाळगायची परवानगी होती.
अमेरीकन माणसाला वाटणारी असुरक्शितता हा गन्स चा रुट कॉझ आहे.
आणि जर त्यांना सरकार उलथवायच असेल तर ते गांधींचा मार्गही अवलंबु शकतात.मागच्या शतकात कित्येक देशांना स्वातंत्र्य मिळाल.बहुतांश देशांनी अहिंसक मार्गानी ते मिळवल.येवढच काय अमेरिकेमधील काळ्यांनी सुध्दा समानतेसाठी गांधींचा मार्ग अवलंबला.मग आता त्या बिल ओफ़ राइट्सचा काय अर्थ आहे???
ही घटना अमेरिकेसाठी नवी नाही.काही वर्षांपुर्वी अशाच दोन घटना अमेरिकेत झाल्या होत्या ज्यात शाळांमधे गोळिबार झाला होता.मुलांची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने हे झाल हे पण चुकीच आहे.मानसिक संतुलन बिघडलेले जगात सगळीकडेच आहेत मग अमेरिकेतच अस का होत?महत्त्वाच कारण आहे गन्स जी अशा मानसीक स्थिती बिघडलेल्यांना सहज मिळतात!!!!


Limbutimbu
Tuesday, May 15, 2007 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्तू, तुला फोटु कुठुन मिळाले रे?
लिन्क असेल तर देवुन ठेव!
:-)

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators