|
GS1... अजून येऊ दे
|
Peshawa
| |
| Thursday, July 20, 2006 - 5:07 pm: |
| 
|
With due respect I think this BB should be closed ASAP... (I don’t agree with admin but none the less) And I do hope that a "policy decision" would be taken by admin about political V & C's soon. विशिष्ठ विषय needs more clarification and definition as well. If maayboli has a policy that BB’s that are inactive for more than x months will be deleted without warning Then people who were contributing to the BB intermittently have no options but to start the thread again! When they feel that they have something to contribute! And therefore a decision should be conveyed without ambiguity that certain topic is not acceptable according to the policy and therefore BB is deleted and new Bb for that topic would not be allowed! I also feel that there should be comprehensive policy about “hate content” or with an extreme liberal attitude there should be new topic on maayboli “Things I love to hate” were one is allowed to vent his hate/anger/frustration related to (other than an ID on maayboli of course ) his/her object of hate/anger/frustration.
|
मी ही वाचत आहे. एडमिन महोदय यात मी कुठेही समर्थन करत नाहीये
|
Dinesh77
| |
| Thursday, July 20, 2006 - 5:17 pm: |
| 
|
हा बी बी बंद करु नये. वाचकांना जर अभ्यासपूर्ण माहिती मिळत असेल तर काय प्राॅब्लेम आहे?
|
Yog
| |
| Thursday, July 20, 2006 - 6:03 pm: |
| 
|
इतकी अभ्यासपूर्ण माहिती देणारा हा bb कृपया बन्द करू नये. bb चे शीर्षक जरी आक्रमक अन एककल्ली असले तरी v&c सदरात असल्याने येथील माहितीवर चर्चा प्रतिवाद होणे गैर नाही पण तशी भूमिका मान्डताना सबळ माहिती, पुरावे वा आकडेवारी दिली जावी (जसे वर gs1 यानी दिली आहे) अन कुठल्याही व्यक्ती वा id विरुध्ध वैयक्तिक चिखलफ़ेक केली जावू नये तरच "मुळात" admin ने उपलब्ध करून दिलेली जागा अन सन्धीचा योग्य वापर होईल असे वाटते. GS1, तुम्ही असे एखादे "सन्कलित" स्वरुपाचे पुस्तक का नाही लिहीत, ज्यात जोडीला तुमची सद्द्य परिस्थितीच्या अनुशन्गानेही मते अन विचार असतील? त्यात माझी कसलिही मदत होत असेल तर जरूर कळवावे. बाकी इथे अजून लिहीत रहा..वाचायला आवडते अन मुख्ख्य अन सर्वात महत्वाचे म्हणजे ज्ञानात भर पडते. धन्यवाद!
|
Dineshvs
| |
| Friday, July 21, 2006 - 3:45 am: |
| 
|
GS1 मी वाचतोय, पण ईथे लेखनात सलगता नाही.ती असावी म्हणुन मी प्रतिक्रिया दिली नाही. त्यापेक्षा तो तुझ्या BB वर लिहि म्हणजे तुझे लेखन सलग वाचता येईल.
|
Moodi
| |
| Friday, July 21, 2006 - 8:06 am: |
| 
|
जी एस दिनेशना अनुमोदन. हे सर्व लिखाण तुम्ही मॉडरेटरना सांगुन तुमच्या बीबीवर हलवा. तिथे निदान कायम राहील.
|
कोणत्याही विशिष्ट (केवळ "दुसर्याच्या" अशा अर्थाने नव्हे) विचारसरणीची चिकित्सा आणि मोजमाप करण्याचे ठरविल्यास वरील प्रमाणेच पोस्ट्स येणार तर मला तरी त्यात काही वावगे वाटत नाही! जी एस यान्ना जे जाणवले, जे माहीत हे ते ते मान्डताहेत, याच्या विरुद्ध काही माहिती असल्यास त्यासाठी स्वतन्त्र बीबी उघडण्याची सोय आहेच की! असे तर नक्कीच नाही की मायबोलीवर गुलमोहर सारखे साहित्य शास्त्र कला आणि मनोरन्जन या व्यतिरिक्त राजकीय वगैरे विषय मान्डायचेच नाहीत! अन जर तसे असेल तर तो सान्स्कृतिक दहशतवाद किन्वा अस्पृश्यता ठरेल. जीएस च्या वरच्या पोस्ट मला (किन्वा कुणाला) पटल्या नाहीत तर त्याला तोडिस तोड प्रतिशब्दचित्र दाखले देवुन उभे करण्याला किमान मायबोलीवर तरी स्वातन्त्र्य आहे असे मला वाटते! आणि असे स्वातन्त्र्य असेल तर जीएस च्या या विषयावरील या बीबीवर आगपाखड करण्यात अर्थ नाही! 
|
Pooh
| |
| Friday, July 21, 2006 - 2:01 pm: |
| 
|
मला या आणि इतर BBs वर चालू असलेल्या वादविवादामधे पडायची इच्छा नाही आहे. कारण मला दोन्ही बाजूंचे विचार थोडेसे एकांगी वाटत आहेत. पण कोणाला जर neutral viewpoint ने communism म्हणजे काय आणि रशिया, चीन, क्यूबा, युगोस्लाविया या देशातला communism मूळ कार्ल मार्क्स च्या तत्वज्ञानापेक्षा कसा वेगळा आहे हे जाणून घ्यायचे असेल तर ही लिंक पहा. http://en.wikipedia.org/wiki/Communism
|
Aaftaab
| |
| Friday, August 04, 2006 - 8:05 am: |
| 
|
Very relevant to what GS1 had started - Read on - http://ia.rediff.com/news/2006/aug/03flip.htm?q=sp&file=.htm
|
Gs1
| |
| Monday, August 07, 2006 - 7:34 am: |
| 
|
very logical article. Aaftaab, Thanks for sharing it.
|
Samuvai
| |
| Wednesday, August 09, 2006 - 11:12 am: |
| 
|
काय शत्रुत्व आहे आपल राजकारणाशी? एका लोकशाही देशाचे जबाबदार नागरिक म्हणुन जर राजकिय विचरमंथन होत असेल तर त्यास प्रोत्साहन मिळावयास हवे. कम्युनिस्ट दडपशाहीच्या संदर्भात एक आठवल्: पुण्यातील एका मित्राला IIMC ला प्रवेश मिळाला होता. त्याला ६ महिन्यांनी सहज म्हणून विचारल शाखेत जातोस का रे तिकडे पण (हा पुण्यात शाखेत जायचा हे मला माहीत होते). त्याच उत्तर अस होत की कलकत्त्यात "संघ" शब्द जरी उच्चारलास तरी साम्यवादी गुंड झोडतील. केरळात २० वर्षांपूर्वी हीच स्थिती होती. संघ स्वयंसेवक जशास तसे वागल्याने शेवटी रक्तपात बंद झाला. वनवासी कल्याण आश्रमाच्या वाडा-मोखाडा भागातील आश्रमांवर अनेक कम्युनिस्ट हल्ले झालेले आहेत. नेपाळात साम्यवादी सरकार आल्याने भारताचा एक कट्टर शत्रू वाढला आहे हे निश्चित!
|
Zakki
| |
| Wednesday, August 09, 2006 - 12:03 pm: |
| 
|
मी आफताब यांनी दिलेला संदर्भ वाचला. पण अहो, त्यापेक्षा नटवरसिंह याला काँग्रेसमधून काढावे का अश्यासारख्या अत्यंत महत्वाच्या विषयासंबंधी लोकसभेत गाढवांसारखा गोंधळ घालणे महत्वाचे नाही का? मुंबईच्या स्फोटांचे काय घेऊन बसलात? असले छोटे छोटे प्रश्न सोडवायला का जनतेने लोकांना निवडून दिले आहे? शरद पवारांनी क्रिकेटच्या वर्ल्ड कप ची नि त्या क्रिकेट बोर्डातल्या राजकारणाची काळजी करायची का कृषीमंत्र्याचे काम करायचे? छे:, उगीचच लोक असले विषय काढतात शोधून! मग ते शिकलेले लोक फुकट काळजी करत बसतात! आश्याने आम्हाला जण्तेची शेवा कशी करता येईल? हटकेश्वर, हटकेश्वर!
|
Ludabuda
| |
| Wednesday, August 09, 2006 - 12:15 pm: |
| 
|
करणारे करतात तुम्ही कशाला भांडताय? तुम्हाला दुसरे उद्योग नाहीत काय? कामधाम बायका पोरे वगरे? चला पाहू आपापल्या घरी.
|
४० च्या दशकातील भारतीय कम्युनिस्टांच्या इतिहासाचे काही संदर्भ 'हरवलेले दिवस: एका माजी कम्युनिस्टाचे आत्मचरित्र' या पुस्तकात मिळतील. PC Joshi आणि BT Ranadive यांच्यातील संघर्ष, मुंबईमधे उठावाचा फसलेला प्रयत्न इ. महत्वाच्या घटनांचे लेखक प्रभाकर उर्ध्वरेषे हे साक्षीदार होते.
|
Gs1
| |
| Wednesday, September 20, 2006 - 1:51 pm: |
| 
|
चिंतोचिमाजी, मला नाही मिळू शकले हे पुस्तक. प्रकशक सांगू शकाल का ?
|
Chyayla
| |
| Monday, March 19, 2007 - 7:05 pm: |
| 
|
बन्गाल म्हणजे कम्युनिस्टान्चे नन्दनवन, सत्ता स्थिर झाल्यामुळे आता जरा मार्क्स व लेनिनच्या कम्युनिस्मचा भाग्-२ सुरु झालेला दिसतो. हे नन्दीग्राम व त्यापुर्वी सिन्गुर मधे ज्यान्च्या अज्ञानाचा फ़ायदा घेउन भाकरी, सम्पत्तीचे समान वाटप सारखे स्वप्ने दाखवुन ज्याच्याबळावर सत्ता मिळवली आता त्याच शेतकर्यान्वर निर्दयपणे गोळीबार केल्याने सिद्ध झाले आहे. त्यान्चा दोष काय तर त्यान्नी बन्गालच्या विकासासाठी, SEZ साठी जमिनी अधिग्रहीत करण्यासाठी विरोध केला. भाग्-१ मधे, कम्युनिस्मचे तत्वज्ञानाने फ़क्त भावनिक आवाहन करुन द्वेष निर्माण करुन सत्ता मिळवता येते पण जेन्व्हा त्याना आता द्यायची वेळ आली असते तेन्व्हा मात्र यान्च्याकडे योजना, उपाय काही नसत. कारण रोजगार, भाकरी देण्यासाठी उद्योग तर हवेत आणी नेमके त्यालाच विरोध करुन तर पुढे आले होते त्यामुळे गोन्धळ आणखीनच वाढला. आता काय विकास करायचा आहे मग तो कसा करावा हा प्रश्न... त्यासाठी क्रान्ती, व नाही झाला विकास आणी लोक बोम्बलले की प्रतिक्रान्ती करुन त्याच गरीब, मजुरान्ची कम्युनिस्ट विरोधी, भान्डवलदारान्चे हस्तक म्हणुन हत्या करुन त्याना यमसदनास धाडायचे... पहा बरे गरीब पण मेला आणी गरीबी पण... एवढा साधा उपाय कुणाला कसा सुचत नाही सगळे कम्युनिस्ट विरोधक बावळटच म्हणायचे ना आता पन्चाइत अशी झाली की बन्गालातच कम्युनिस्ट पण केन्द्रात भान्डवलदारान्चे हस्तक त्याला शत्रु शत्रु असे म्हणायाचे, सन्स्कृती राष्ट्र असे कोणी म्हणत असतील तर परम शत्रु ह, फ़क्त जिहादी तेवढे मित्र कारण बिचारे तेच देश, राष्ट्र या सन्कल्पनेला विरोध करतात कारण त्यान्चा पण नारा आहे "दुनियाके सारे मुस्लिम एक हो..." दोघानमधे हे अजुन एक साम्य. क्म्युनिस्टान्चा नारा माहिती आहेच "दुनियाके सारे मजदुर एक हो..." याची पुर्तता दहशतवादानेच करण्याचे दोघान्चेही तन्त्र जगजाहीर आहेच. मग आता क्रान्ती अन प्रतिक्रान्ती कशी बरे करणार एवढे वर्ष होउनही बन्गाल अन केरळच्या बाहेर पडता न आल्याने सय्यम सम्पला व पुतना मावशीच प्रेमही त्यामुळे आता कम्युनिस्ट दहशतवादाचा खरा चेहरा समोर आला. आम्हाला विकास करायचा पण तो असाच दहशतवादी मार्गाने गुमान जमिनी द्या नाही तर मरा... त्यातल्या त्यात बन्गालच्या शेतजमिनी ह्या सुजलाम, सुफ़लाम त्यामुळे वास्तविक पहाता भरपुर पिके काढता येतात त्यामुळे सहसा शेतकरी जमिनी द्यायला तयार होणे शक्यच नाही म्हणुनच शेवटी कम्युनिस्मला खरा चेहरा दाखवावा लागला. त्याउप्परही केन्द्राला समज की तुम्ही बन्गालात लुडबुड करु नका पण हे कुठवर चालणार ह्या हत्यान्मुळे केन्द्र सरकारला दखल घ्यावीच लागणार ते बिचारे यान्चेच कडबोळे घेउन बसलेले त्यामुळे ईथे दोघान्चीही फ़जिती झाली आहे शेवटी दुष्टाची सन्गत कसा घात करते त्याचा अनुभव यायला सुरुवात झालेली आहे. मला हे कळत नाही याना विकास कोणाचा करायचा आहे? सामान्य जनतेचा की उद्योजकान्चा, दगड, धोन्डे यान्चा? आणी तो ही असल्या दहशतवादी मार्गाने? तरी कम्युनिस्ट दहशतवाद या घटनान्नी परत एकदा जगजाहीर झाला आहे.
|
महाराष्ट्रटाइम्स मधिल हा लेख. ' नंदीग्राम'मधील गोळीबाराच्या घटनेमागील धक्कादायक तपशील सीबीआयच्या चौकशीत उघड होऊ लागल्यामुळे, पश्चिम बंगालमधील बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या सरकारचीच लाज गेलेली नाही, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचेच वस्त्रहरण झाले आहे. गोळीबारात १४ जणांचे बळी गेल्यानंतरही, हा गोळीबार अपरिहार्य होता, असाच मुख्यमंत्री भट्टाचार्य यांच्या प्रारंभीच्या प्रतिक्रियेचा आशय होता. तृणमूल काँग्रेस, नक्षलवादी आणि 'उजवे' पक्ष यांनी एकत्रितपणे केलेल्या कटाचा भाग म्हणून पोलिसांवर हल्ला करण्यात आला, असाही आरोप त्यांनी केला होता. सीबीआयच्या आजवरच्या चौकशीतून पुढे आलेल्या बाबी पाहता, गावकरी हेच व्यापक कटाचे बळी होते आणि या कटात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यर्कत्यांचा समावेश होता, असे म्हणता येते. विरोधकांच्या कटाचा कांगावा करताना, गोळीबाराची चौकशी सीबीआयसारख्या राज्य सरकारच्या अखत्यारीत नसलेल्या यंत्रणेकडून एवढ्या तातडीने सुरू होईल, याची कल्पना बुद्धदेवांना नसावी! परंतु कोलकाता हायकोर्टाने गोळीबाराच्या घटनेनंतर तात्काळ सीबीआय चौकशीचे आदेश दिले आणि सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे बंधन घातले. घटनेनंतर ३६ तासांत सीबीआयने गोळीबार झालेल्या परिसराची बारकाईने पाहणी केली. परिणामी मार्क्सवाद्यांच्या सरकारला आणि पोलिसांना पुरावे नष्ट करण्यास अवधी मिळाला नाही, त्यामुळेच नंदीग्राममधील हिंसाचारात सामील असलेल्या दहा जणांना शस्त्रांसह सीबीआय ताब्यात घेऊ शकली. या व्यक्ती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकतेर् असल्यामुळे, मार्क्सवाद्यांचे पितळ उघडे पडले आहे. गोळीबारात मृत्यू पावलेल्या काही मृतदेहांवर भोसकल्याच्या जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे हे केवळ पोलिसांच्या गोळीबाराचेच बळी नसावेत, तर पोलिसांचा वेश घेऊन मार्क्सवादी गुंडांच्या हल्ल्यातही काही जणांना प्राण गमावावे लागले असावेत, असे आता मानले जात आहे. इंडोनेशियातील सलीम उद्योगसमूहाला रासायनिक उद्योग स्थापन करण्यासाठी सरकारतफेर् सुरू झालेल्या जमीन संपादनाला या परिसरातील गावकऱ्यांचा विरोध आहे. या मतदारसंघातील आमदार कम्युनिस्ट पक्षाचा असून, त्याचा गावकऱ्यांना पाठिंबा आहे. शेजारच्या हल्दिया परिसरातील मार्क्सवादी खासदाराने सलीम उद्योगसमूहाच्या मार्गातले अडथळे दूर करण्याचे कंत्राट घेतले आहे! जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात हिंसाचार होऊन सहा जणांचे बळी गेल्यानंतर या परिसरातून पोलिसांना माघार घ्यावी लागली होती. त्यावेळी शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध जमीन संपादनाची कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. परंतु लोकांच्या विरोधापुढे नमते घेणे, हा मार्क्सवाद्यांना त्यांच्या संघटनात्मक ताकदीचा अपमान वाटला असावा! या परिसरात लोकांनी पोलिसांना आणि जमीन संपादन यंत्रणेला गावबंदी जारी केली होती. रस्ते खोदून अडथळे उभे केले होते. संपर्कयंत्रणा निकामी केली होती. या यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला, तर त्यात आक्षेपार्ह काही नाही. मात्र जमीन संपादनाचा उद्देश यामागे नव्हता असे सरकार सांगत असले, तरी लोकांपर्यंत एकतर ही बाब पोचवली गेली नाही किंवा लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही. प्रत्यक्षात या कारवाईत मार्क्सवादी कार्यर्कत्यांनी सहभागी होऊन, गावकऱ्यांचे बळी घेतल्यामुळे, लोकांनी सरकारवर दाखवलेला अविश्वास सार्थच म्हणायला हवा. मार्क्सवाद्यांनी बुद्धदेवांच्या सरकारचे समर्थन करीत निर्ढावलेपणाची प्रचीती दिली असली, तरी डाव्या आघाडीतील पक्षांनी माफीची मागणी करीत आणि अनेक डाव्या विचारवंतांनी पुरस्कार परत करून निषेध नोंदवीत, बुद्धदेवांना घरचा आहेर दिला आहे.
|
Gs1
| |
| Tuesday, March 20, 2007 - 12:30 pm: |
| 
|
चायला आणि जयमहाराष्ट्र, खरे आहे तुमचे म्हणणे. पण कम्युनिस्टांची ढोंगबाजी या निमित्ताने पुन्हा एकडा सगळ्या जागासमोर उघड झाली हेही नसे थोडके.
|
GS1 लिहित रहा. खूप अभ्यासपुर्ण लिहितोस.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|