|  
Bee
 
 |  |  
 |  | Tuesday, February 27, 2007 - 7:49 am:    |  
 
 
 |   
  |   
 योग, सव्या इतकाच तुही बर्याच दिसांनी उगवलास.. आता लगेच मावळू नकोस   
 
  |  
Nilsat
 
 |  |  
 |  | Tuesday, February 27, 2007 - 2:02 pm:    |  
 
 
 |   
  |   
 खुप छान चर्चा सुरु आहे परंतु वाईट एका गोष्टीचे वाट्ते की सर्व जण नाण्याची एकच बाजू मांडत आहेत. तेव्हा नाण्याला दूसरी बाजूही असते हे पटवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न.   कदाचित काहीनां आठ्वत असेल की सहा वर्षापुर्वी तारा व प्रभात ही दोन मराठी चँन्ल्स सुरू झाली होती. त्यापैकी तारा चँनलनी हीत्यावर आधारीत मालिका दाखवल्या तसेच अनेक नविन दिग्दर्शक न निर्मात्यांना संधी दिली परतुं आज ते चँनल बंद झालेच पण त्या सर्व नविन निर्मात्यांना कर्जबाजारी करुन ठेवले. ही सर्व निर्मातीमंडळी ती होती की जी दूरदर्शन वा अल्फाझी मराठीवर संधी मिळत नाही असे आक्रोश करीत होती व ज्यांना काही वेगळे करुन दाखवायचे होते. आज जर त्यांना पुन्हा एक संधी दीली तर हीच क्रेईटिव्ह लोकं पुन्हा ती वेगळी वाट धरतील का?  आता प्रभात चँनल बद्दल सांगायचे तर ते चँनल पूर्णपणे मराठी नाटकांना वाहीलेले होते परन्तुं त्यांनाही आर्थिक गणित जमले नाही व काही काळाने ते चँनलसुद्धा बंद पडले.  हा सर्व अभ्यास करूनच झी मराठी व ई टीव्ही मराठी गेली आठ वर्षे समर्थपणे उभी आहेत. आपण कायम असा नाराजीचा सूर लावण्यापेक्षा हा विचार करा की एक चँनल म्हणुन त्यांनाही एकाच वेळी अनेक रसिंकांचा विचार करुन कार्यकम दाखवावा लागतो. हे विसरुन कसे चालेल की आभाळमाया, अवंतिका, श्रावणसरी, व्यक्ती आणि वल्ली, प्रपंचं, मानसी, श्रीयुत गंगाधर टीपरे, हसा चकटफू, मृण्मयी, ४०५ आनंदवन, नायक, दे धमाल, नक्षत्राचें देणे, वादळवाट, भटकंती, या सुखांनो या, होम मिनिस्टर व अशा ईतर अनेक मालिका सर्व रसिकांनी आवडीने पाहिल्यात.   आता मराठी सारेगमप विषयी ह्या कार्यक्रमात परीक्षक म्हणून आलेले पंडित हरीप्रसाद चौरसिया, हरीहरन, उषा मंगेशकर, अनुराधा पौडवाल, शौनक अभिषेकी ही संगीतातली जाणकार मंड्ळी ज्या कार्यक्रमाची स्तुती करताना थकत नाही तो कार्यक्रम जर कुणाला दर्जेदार वाटत नसेल तर मी वर उल्लेख केलेल्या कलाकारांना जाणकार म्हणणे चुकीचे ठरणार नाही का? सर्वात महत्वाचे म्हणजे जी मुलं मुलीं फक्त सहा महीन्यापूर्वी आपआपल्या शहरात होती ती आज ह्या कार्यक्रमामुळे जगात ओळखली जाऊ लागली आहेत.     
 
  |  
 योग, जर्सीमधे आहे रे. फ़ोनवर बोलू लवकरच.    पैसा टाकून स्तुती करायला बोलावले आहे, मग ते करणारच, हे भोळसटांना कळत नसेल कदाचित. सब गंदा है पर धंदा है ये  त्या पल्लवीची (किंवा दिग्दर्शकाने ठरवलेली)  मूर्ख बडबड, बेसूर गायन आणि त्याची प्रशंसा ह्यात काय दर्जेदार आहे कोण जाणे. 
 
  |  
Milindaa
 
 |  |  
 |  | Tuesday, February 27, 2007 - 3:52 pm:    |  
 
 
 |   
  |   
 एकदा काय झाले माझ्या शेजारच्या आजोबांना मी प्रभातफ़ेरीला बाहेर घेऊन गेलो तो ७ वाजता परत आलो. ते म्हणालेत आता माझ्या बातम्या हुकल्यात पण काही हरकत नाही अजून संकृत मधील बातम्या व्हायच्या आहेत. <<< संस्कृत मधल्या बातम्या ६.५५ ला असतात.. इयम् आकाशवाणी.. अजून लक्षात आहे   
 
  |  
Dinesh77
 
 |  |  
 |  | Tuesday, February 27, 2007 - 6:26 pm:    |  
 
 
 |   
  |   
 संप्रति वार्ता: श्रुयन्ताम्!  प्रवाचक: बलदेवानंद सागर:    खरच अजून आठवतात ते शब्द आणि सुर 
 
  |  
Mansmi18
 
 |  |  
 |  | Tuesday, February 27, 2007 - 7:01 pm:    |  
 
 
 |   
  |   
 मित्रहो,    मी मागील काही पोस्ट वाचली. त्यामधे दर्जेदार हा शब्द बर्यच वेळा वापरला गेला आहे. म्हणजे तुमच्या मते तुम्हि ज्या मलिकन्चा उल्लेख करता त्या दर्जेदार आणि ज्या मालिका लोकप्रिय आहेत पण ज्या तुमच्या लेखि दर्जेदार नाहीत त्या निर्माण करणारे आणि पहाणारे लोक दर्जाहीन आहेत असे तुम्हा "दर्जेदार" रसिकाना वाटते का?    ज्या महाराश्ट्रात "गीत रामायण" लोकप्रिय झाले तिथेच "नविन पोपट हा लागला विठु विठु बोलायला" हे गाणेहि लोकप्रिय झाले. दर्जा हि गोश्ट सापेक्ष आहे. तुम्हि ज्याला दर्जाहीन म्हणता ते काही लोकान्च्या मते दर्जेदार असु शकते. त्यामुळे जि चानेल्स असे कार्यक्रम प्रक्शेपित करतात त्यान्चि काहि चुक आहे असे मला वाटत नाही. आपल्याला असले कार्यक्रम सहन होत नसतील तर सरळ चानेल बदलणे किव्वा सरळ टीवी बन्द करणे हा सोपा उपाय आहे. ही चानेल्स पैसा कमवण्यासाठि सुरु आहेत त्यान्च्या कडुन प्रबोधन वगैरेचि मी कधिच अपेक्शा करत नाही.    चु भु द्या घ्या     आपला नम्र   
 
  |  
Chyayla
 
 |  |  
 |  | Tuesday, February 27, 2007 - 7:27 pm:    |  
 
 
 |   
  |   
 मनस्मी, बरोबर आहे तुझे म्हणणे ह्या वाहिन्या पैसा कमवायलाच बसल्या आहेत तर ते असले धन्दे करणारच शेवटी प्रेक्षकच राजा आहे जर त्यानी नाही पाहिले तर कोण विचारतय त्याना. बघणे न बघणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.    मी तरी हे असले कार्यक्रम नाही पहात निखळ मनोरन्जन म्हणुन गाणी ऐकणे व प्रोत्साहन म्हणुन कलाकारान्चे कौतुक इथपर्यन्त सगळ ठिक आहे पण त्यापुढचा प्रकार म्हणजे कलेचा बाजार वाटतो.    १) त्यान्चे टोमणे, भान्डणे, रडणे, हसणे सगळ कस कृत्रीम वाटत (तुम्ही ते  WWF  पाहिले का त्यासारख वाटत काही तरी) आणी त्या प्रत्येक बाबीला खुप प्रसिद्धी दिल्या जाते. आपणच मुर्ख ते पाहुन आपणही वहात जातो, आणी हेच तर हवे असते त्याना. भावनाना अश्याप्रकारे हात घातला तर प्रेक्षकही मिळतोच. एकप्रकारे त्या भावनान्चा असा बाजार होतोय असे वाटते.    २) एवढेच नव्हे तर अमुक कलाकार कसा दिसतो त्याचे नखरे, केशभुषा, कपडे, बोलणे, चालणे, लकबी या सगळ्यान्ची खमन्ग चर्चा, मला हे नाही कळत की कलेचा या गोष्टीन्शी काय सम्बन्ध.    ३) हे ही बरोबर परिक्षक कोणी मोठी व्यक्ती आहे म्हटल्या जाते आणी आपण त्याना पहिल्यान्दाच पहात असतो, का मोठी आहे तर त्याने एखादे रीमिक्स गायले असते ना म्हणुन.    ४)  SMS  हा त्यान्चा मुख्य आर्थिक स्त्रोत लाखो  SMS  आल्याने करोडो रुपयान्ची उलाढाल होते त्यातला काही भाग लाख रुपयाचे बक्षिस दिले की बाकिचा निव्वळ फ़ायदा. शिवया जाहिरातीनमधुन मिळकत होते तो भाग वेगळाच.   पण मला खर आश्चर्य वाटत ते पान्ढरपेशा जनतेच. जीथे लोकप्रतिनिधी निवडायला त्याना फ़ुकट असत शिवाय सरकारी सुट्टी सुद्धा दील्या जाते तिथे ते मतदान करायला जात नाहीत, आणी ईथे मात्र खर्च करुन  SMS  द्वारे मतदान करतात. आहे ना गम्मत?    ५) शिवाय यान्च्या निवड प्रक्रियेत कधीच पारदर्शकता दीसत नाही, कुठे तरी कुणाच चुकल्यासारख वाटतच.  जीथे राजकारण वाईट म्हणुन मतदान न करणारे मात्र ह्या गोन्धळात सामिल होउन वाद घालतील व मतदान जरुर करतील, हा विषय वेगळा आहे ईथे मी फ़क्त तुलना केली.    निळसट, तुमचे म्हणने मान्य की खरोखरच एखादा चान्गला कलाकार असेल तर त्याला फ़ायदा होउ शकतो व त्याची ओळख निर्माण व्हायला हे एक चान्गले माध्यम आहे, फ़क्त या वरच्या गोष्टी वगळल्या तर खरच या कार्यक्रमान्चा मुळ उद्देश यशस्वी होउ शकतो असे वाटते.      
 
  |  
Bee
 
 |  |  
 |  | Wednesday, February 28, 2007 - 2:23 am:    |  
 
 
 |   
  |   
 बघ मिलिंदा तुझ्यापेक्षा चाफ़्याला आणि दिनेश७७ ह्यांना पुढचेही वाक्य आठवतात      अनुभव ह्या हिंदी चित्रपटात सुरवातीलाच अगदी तो आकाशवाणीचा सुर आहे. मी जेंव्हा  CD  लावली तेंव्हा क्षणभर वाटले घरात रेडीओ सुरू झाला की काय.    नाण्याची दुसरी बाजू पटली.. पण मानवी स्वभाव असा आहे की तो निराशतेकडे अधिक झुकतो. त्यामुळे नाण्याची पहिली बाजू जास्त गंभीर वाटते. 
 
  |  
Mandard
 
 |  |  
 |  | Wednesday, February 28, 2007 - 11:00 am:    |  
 
 
 |   
  |   
 आत मुम्बई दिल्ली मधे कॅस लागु झाले आहे. तेव्हा आता आपल्याला हवी ती चॅनेल बघायची सोय आहे. जे चॅनेल आवडत नाही त्याचे पैसे भरु नका. चांगली सोय आहे. 
 
  |  
Swa_26
 
 |  |  
 |  | Wednesday, February 28, 2007 - 11:27 am:    |  
 
 
 |   
  |   
 मंदार,  cas  ची पद्धत चांगली आहेच, पण समस्या कोणतीही वाहीनी नसून त्यावरचे काही फालतु कार्यक्रम ही आहे.     जसे की, झी मराठी या वाहीनीवर जसे श्रीयुत गंगाधर टिपरे, नक्षत्रांचे देणे असे चांगले कार्यक्रम असतात तिथेच असंभव, अवंतिका सारखे कार्यक्रम असतात. त्यामुळे रिमोटवर  control  हाच उपाय आहे. 
 
  |  
Mansmi18
 
 |  |  
 |  | Wednesday, March 28, 2007 - 9:06 pm:    |  
 
 
 |   
  |   
 कुठली मालिका सम्पणार आहे?  
 
  |  
Bsk
 
 |  |  
 |  | Thursday, March 29, 2007 - 6:02 am:    |  
 
 
 |   
  |   
  कदाचीत या सुखांनो या.. 
 
  |  
 अधुरी कहाणीची लाम्बड सम्पतच नाही. ऊगीचच स्टाइल मारणार यश पटवर्धन नकोसा वाटतो. सध्या सगळ्या मालिका फ़ालतू आहेत. तरिसुद्धा कधीतरी बदल म्हणून हिन्दी, ईन्गलीश सोडून मराठी बघायला बरे वाटते. 
 
  |  
Sayuri
 
 |  |  
 |  | Tuesday, April 24, 2007 - 5:28 pm:    |  
 
 
 |   
  |   
 सारेगमप मध्ये जे आधीच प्रसिद्ध आहेत, त्यांना कशाला 'गाण्याची' (!) संधी दिलीय...सामान्य प्रजेतील उभरत्या कलाकारांना स्टेज मिळवून देण्याचा हेतू तूर्तास तरी गुंडाळून ठेवलाय वाटतं.
 
  |  
Mansmi18
 
 |  |  
 |  | Tuesday, April 24, 2007 - 6:01 pm:    |  
 
 
 |   
  |   
 मला वाटते कि हा दुसरा सारेगमप सुरु होण्याआधीचा टैम पास आहे.  कार्यक्रम बघायला तरी बरा वाटतो प्रिया बापट आणि सीम देश्मुख्मुळे    
 
  |  
Bsk
 
 |  |  
 |  | Wednesday, April 25, 2007 - 5:28 am:    |  
 
 
 |   
  |   
  प्रसाद ओक,पंकज विष्णु,सुनील बर्वे यांनी गाणी छान म्हटली..मुलींमधे, प्रिया बापट,सीमा देश्मुख ची गाणी चांगली झाली.. मधुराणी कदाचीत लवकर बाहेर जाईल..पण मजा येतीय पहायला.. 
 
  |  
Psg
 
 |  |  
 |  | Wednesday, April 25, 2007 - 11:24 am:    |  
 
 
 |   
  |   
 सायुरी, पटलं!    आम्हाला नाही आवडला कार्यक्रम हा. कोणालाच धड सुरात गाता येत नाहिये, कारण हे मुळात  singers  नव्हेतच,  actors  आहेत. त्यापेक्षा शिकणार्या/ शिकलेल्या मुलामुलींचाच ठेवायला हवा होता पुढचा सीझन. त्या संगीतकारांचे कौतुक वाटतं- सगळे इतके बेसूर असताना 'वा, मस्त' म्हणणं म्हणजे...       TRP  वाढवायचे प्रयत्न आहेत सगळे!  
 
  |  
Lukkhi
 
 |  |  
 |  | Wednesday, April 25, 2007 - 1:22 pm:    |  
 
 
 |   
  |   
 त्या संगीतकारांचे कौतुक वाटतं- सगळे इतके बेसूर असताना 'वा, मस्त' म्हणणं म्हणजे...   >>  म्हणजे कसं मायबोलीवरच्यासारखंच वाटतं ना? 
 
  |  
Itsme
 
 |  |  
 |  | Thursday, April 26, 2007 - 4:29 am:    |  
 
 
 |   
  |   
 मला पण नाही आवडला  ...  त्यांचे जास्त लक्ष चेहर्याच्या हावभावांवर होते, गाण्या पेक्षा. 
 
  |  
Deemdu
 
 |  |  
 |  | Thursday, April 26, 2007 - 6:56 am:    |  
 
 
 |   
  |   
 अरे काय आहे हे? कोणत्याही गोष्टीचा संबंध इथे मायबोलिशी जोडलाच पाहीजे का?    आणि लुक्खी हे तुमच्यासाठी,  ते जे सारेगमप वर बोलावतात ना ते पैसे घेउन आलेले असतात त्यामुळे त्यांनी वा छान म्हनाणच अपेक्षीत आहे, इथे मायबोलीवर तस नाहीये, हे लोक ज्याला जे वाटत त्या प्रतिक्रीया देतात. आता सगळ्यांनाच तुमच्यासारख थोडीच वाटणार आहे, की मी किती चांगली लेखिका आणि इतर म्हणजे कोण तुच्छ. आता मात्र माझं तुम्हाला  open challenge  आहे, घ्या एखादा विषय आणि लिहा एखादं ललीत किंवा कथा, मगच ठरेल तुमच्य प्रतिक्रीयांन किती मान द्यायचा ते.    आणि हो तुमच्या लुक्खी ह्याच  id  नी लिहा हो, नाही तर मग आम्हाला कळणार कस नक्की कोणी लिहीलाय ते     
 
  |  
 
 | 
| मायबोली | 
  |  
 
| चोखंदळ ग्राहक | 
  |  
 
| महाराष्ट्र धर्म वाढवावा | 
 |  
 
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत | 
 |  
 
|  पांढर्यावरचे काळे | 
 |  
 
|  गावातल्या गावात | 
 |  
 
|  तंत्रलेल्या मंत्रबनात | 
 |  
 
|  आरोह अवरोह | 
 | 
 
|  शुभंकरोती कल्याणम् | 
 |  
 
|  विखुरलेले मोती | 
 | 
 
 
  | 
 | 
 
 
 
 
 |