Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 18, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Root Cause Analysis of Islamic Terrorism » Archive through March 18, 2007 « Previous Next »

Aaspaas
Wednesday, March 14, 2007 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या बी. बी. वरील चर्चा महत्वाची आहे आणि सगळ्यांच्या मतांतून बरेच मुद्दे येताहेत. पण याला फारच धार्मिक रंग येतो आहे. मुळातच बी.बी. च्या नावातच तसे असल्यामुळे साहजिक आहे. पण त्यामुळे दहशतवादाची मूळे शोधण्याची दिशा बदलत आहे असे वाटते.
दहशतवाद हा फक्त मुसलमानच करतात असे नाही. इतर ही करतातच की. दहशतवाद हा कोणत्याही जातीशी निगडित नाही, तर प्रवृत्तीशी आणि त्याच्या परिस्थितीशी निगडीत आहे. त्याची कारणे शोधायला हवीत. त्यामुळे हा दहशतवादाची मूळे असे नाव देऊन बी.बी. चालवल्यास वेगळे वळण मिळू शकेल यावर विचार व्हावा ही संबंधितांना विनंती.
याचबरोबर जात म्हणून मुसलमानांच्याभोवती हे का फिरते आहे हे वेगळे तपासायला हवे किंवा नेमेके कोण लोक याचे प्रामुख्याने शिकार होतायत (जातीनुसार नव्हे) हे ही पहायला हवे


Chyayla
Thursday, March 15, 2007 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आसपास तुम्ही नवीन दीसताहात असे तुमच्या पोस्ट वरुन वाटत. इस्लामी दहशतवादावर चर्चा करण्यापेक्षा केवळ द्वेशापायी आपल्याच बान्धवाना शिव्या घालण्यात काही अर्थ आहे का?, तरी ईथे प्रत्येक अगदी बीनबुडाच्या आरोपालाही सडेतोड व मुद्देसुद उत्तर देउन खोडण्यात आले आहे. वरच्याच काही पोस्ट वरुन लक्षात येइल.

प्रामाणिक पणे बघाल तर तुमच्या लक्षात येइलच की या मन्डळीन्चा टाहो फ़ोडुन हेच म्हणन आहे की इस्लामी दहशतवादाचे मुळ काय तर सहिष्णु हिन्दु... कोम्बड जरी झाकुन ठेवल तरी सत्याचा सुर्य उगवायचा थाम्बत नाही हे यान्ना कोण सान्गणार.

जिहाद, हा धार्मिक दहशतवाद आहे त्यामुळे त्यात धार्मिकता राहणारच. ईतरही दहशतवाद असतील पण धर्माच्या नावाने तलवारी व शस्त्राच्या बळावरच हा दहशतवाद चालतो व त्यावर सम्पुर्ण जगाकडुनही तशीच प्रतिक्रिया मिळाली तर याला जबाबदार तेच.

बरे सारे जगच या दहशतवादाने होरपळले आहे केवळ हिन्दुच याचे भोक्ते आहेत असे नाही, ज्याअर्थी ज्यु, बौध्ह, शिख, ख्रिश्चन, गैरईस्लामी या सगळ्यानाच त्याचा धोका व त्रास आहे, एवढच नव्हे तर त्यान्च्यावरही तो उलटलेला पहातोच आहे ना... त्यामुळे केवळ हिन्दुन्ना नुसते नावे ठेवण्यात काही तरी अर्थ आहे का?

तसा तो या BB चा विशय नाही हे तुम्हाला पटत काय? तुम्ही समजाउ शकलात तर बघा, माझ्या शुभेछा:. तुम्ही पण मुद्दे मान्डुन या "जिहादबद्दल" मत प्रदर्शन कराल तर स्वागतच आहे... तुमच्यासोबतही मनमोकळेपणे चर्चा करायला आवडेल.

एक मित्र च्यायला


Zakki
Thursday, March 15, 2007 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इस्लामी दहशतवादाबद्दल लिहायला बरेच काही आहे, कारण जगात सर्वत्र तो चालू आहे! सध्या बरीच राष्ट्रे त्यात सापडली आहेत, म्हणून प्रामुख्याने त्याची चर्चा. मूळात 'धर्मासाठी' करतो म्हणतात म्हणून त्यांच्या धर्माचा उल्लेख.

गरीबी, अन्याय या विरुद्धहि भारतात हिंसाचार चालूच आहे. नि त्यात हिंदूहि सामील आहेत, पण त्या हिंसेची कारणे वेगळी आहेत, धर्मासाठी कमी. त्यासाठी वेगळाच BB उघडावा लागेल.




Santu
Thursday, March 15, 2007 - 11:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धार्मिक दहशत्वाद फ़क्त मुसल्मान च करतात.

Zakki
Thursday, March 15, 2007 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धार्मिक दहशत्वाद फ़क्त मुसल्मान च करतात.
अधून मधून इतर धर्माचे लोकहि हिंसाचार करत असतात, जसे ज्यू नि ख्रिश्चन इराकमधे. पण त्यामागे 'धर्म' हे कारण ते तरी सांगत नाहीत. त्यामुळे त्या गोष्टींबद्दल बोलताना, धर्माचा प्रश्न निघत नाही. पण मुसलमान मात्र अगदी नेहेमीच सांगतात की आम्ही जिहाद करतो आहोत, आम्हाला मुस्लिम कायदे हवेत वगैरे. म्हणून त्यांच्या धर्माची चर्चा.

Aaspaas
Thursday, March 15, 2007 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, शेवटचा परिच्छेद जेवढा मनमोकळा लिहिलास तेवढा वरचा नाही लिहिलास.

मी नवीन मायबोलीला आहे विषयाला नाही.

द्वेशाचा संबंध येतोच कुठे? उगाचच?

मला वाटते प्रामाणिकपणा सगळ्यांच्याकडे असतो, कोणी इमान तर कोणी बेईमानी करण्यास वापरतात.

इथे प्रत्येक जण लिहिताना प्रामाणिकपणे लिहितो असे मी मानतो, लगेच अप्रामाणिकपणाकडे कुणाला ढकलायची गरज नाही. `नविन असताना'.

पुढच्या तुझ्या परिच्छेदाचा अर्थ तोच होतो की यामधे जातीकदे कोणी बघत नाही, याचा सगळ्यांनाच धोका आहे, हेच मला सांगायचे होते.

कोणालाच कोणी नावे ठेवत नाही, नावे ठेवली तर हा विषयच संपून जाईल, निर्णय झाला म्हणायचा.
तुला जसा हा विषय समजला आहे तसा हा बी.बी. नाही म्हणूनच हा बी. बी. रुपांतरीत करावा असे माझे म्हणणे आहे. मुळात जाती धर्माशी दहशतवाद निगडीत नाहीच, यावर या विषयातील तज्ञाला इथे असल्यास विचारु शकतो आपण.

घरात बायकांना, मुलांना धोपटतात हाही एक दहशतवादच आहे तोही जगभर चालू आहेच की.

धर्मासाठी करतो असे म्हणणारे कोण आहेत हे पहायला हवे, कारण कोणीही उठला आणि म्हणाला मी हिंदू धर्मासाठी करतो तर तुम्ही बरोबर म्हणाल काय?

अशाच बी. बी बद्द्ल मला म्हणायचे आहे, फक्त यात दुरुस्ती येवढीच की गरीबी, अन्यायात सगळेच सामिल आहेत. येथेच बरीच कारणे निगडीत आहेत. जसे माणसाचे आरोग्य त्याच्या पोटावर अवलंबून असते.


Chyayla
Thursday, March 15, 2007 - 10:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माफ़ करा पण तुमच्या पोस्ट मधुन काहीच स्पष्ट पणे कळत नाहीये... ईथे जिहाद मधे जातीन्चा काय सम्बन्ध कळेना मला तर ह्या BB विषय बरोबर वाटतोय आणी चर्चा ही तशीच सुरु आहे... विशय भरकटवल्या जातोय म्हणुन BB चे नाव बदलायचे तेही समजत नाहीये, तुम्ही जरा स्पष्ट कराल तर बरे होईल.

झक्कीन्च म्हणन बरोबर आहे धर्माच नाव घेउन जिहाद करणे हा धार्मिक दहशतवादच.


Santu
Friday, March 16, 2007 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बायकाना मुलान धोपटणे हा दह्शत वाद)))काहितरीच....
हे न
पटण्या सारखे आहे.


Santu
Friday, March 16, 2007 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

this is anatomy of islaam

Santu
Friday, March 16, 2007 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

this is anatomy of islaam हा आहे डनिअल पर्ल एक अमेरिकन पत्रकार
याचे डोके कापुन ठार मारण्यात आले. ही घटना घडली पाकिस्तानात.
त्याला मारण्याआधी काढलेले हे चित्र.
त्याला मारण्याचे कारण तो ज्यु होता म्हणुन.
www.exodus2006.com/fab/Dpearl.htm या वर हे
हे पाहय्ला मिळेल

याला धार्मीक दहशतवाद म्हणता
येईल.पण बायको ला मारणे म्हणजे दहशतवाद हे पटत नाही.

Mandard
Friday, March 16, 2007 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्यु लोकांनी देखिल पॅलीस्टीनी लोकांच्या जमीनी बळकावुन अमेरीकेच्या मदतीने धुमाकुळ घातलेला आहे. त्यांची एकमेकातील खुन्नस जबरदस्त आहे. अमेरीकेची मध्य पुर्व बाबतीतची धोरणे ही जागतिक इस्लामी दहशतवादाच्या मुळाशी आहेत. त्यावर चर्चा येथे घडत नाही. या द्रुष्टीने जाणकारांनी मते मांडावीत. नाण्याच्या दुसर्या बाजुचा पण विचार व्हावा.

Sunilt
Friday, March 16, 2007 - 2:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जगातील पहिला संघटीत दहशतवाद हा पॅलेस्टीनी लोकांनी ५० च्या दशकात सुरू केला. त्यामागची पार्श्वभूमी ही मूळच्या पॅलेस्टीनी लोकांना हुसकावून झालेली इस्रायलची अनैतीक स्थापना हीच होती.

कोणत्याही हिंसाचारचे कधीच समर्थन करता येत नाही. परंतु, मूळ कारणांचा शोध घेतला तर स्वतच्या समाजावर झालेले (खरे-खोटे) अन्याय आणि त्या अन्यायाचा सूड घेण्याची प्रव्रुत्ती हेच दहशतवादाचे मूळ कारण आहे असे दिसेल.


Zakki
Friday, March 16, 2007 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिका नि इंग्लंड या दोन्ही राष्ट्रांनी कुठे कुठे काय काय बळजबरी केली, की जी खुद्द त्यांच्या स्वत:च्या कायद्यात सुद्धा बसत नाही, त्याचे वर्णन मागे एकदा मी वाचले होते. इंग्लंडने हिंदी महासागरातील एका बेटावरील संपूर्ण लोकवस्ती हटवून ते बेट अमेरिकेला विकले. त्या लोकांचे पुढे काय झाले? ते कुठे गेले? त्यांना इंग्लंडमधे येण्यास फार त्रास झाला, असे ऐकले.

मुळात इस्राएल देशच जबरदस्तीने पॅलेस्टईन लोकांना हटवून निर्माण केला. कारण ज्यू लोकांना एक राष्ट्र पाहिजे म्हणून. आता ज्यू नि मुसलमान यांच्यात फरक हा, की अनेक शतके ज्यू लोकांवर अन्याय होत असूनहि, ज्यू लोकांनी प्रचंड प्रमाणात विद्या नि पैसा मिळवला. त्यामुळे अमेरिकन राजकारणात त्यांचा फाऽर फाऽर मोठ्ठा प्रभाव आहे. मुसलमानांनी मात्र तसे काही केले नाही. ते नुसतेच दंगे धोपे करतात, त्यामुळे सगळे त्यांच्या विरुद्ध. (फक्त भारतातले काही लोक सोडून). इस्राएल ला अमेरिकेचा पाठिंबा कारण जरा इस्राएल च्या विरुद्ध काही बोला, बोंबाबोंब होते (नि तरीहि जाळपोळ, दंगे होत नाहीत.) ज्यूंच्या हातात अनेक विद्यापीठे, नि बॅंका आहेत. हिंसा न करता ते आपलेच खरे करून घेतात. मुसलमानांना ते जमत नाही.

या बाबतीत भारतीयांची स्तुति करावी तेव्हढी थोडीच. इतकी वर्षे पारतंत्र्यात राहून, गरीब, अशिक्षित राहून सुद्धा त्यांनी जगात सध्या आपले स्थान फार उंचावर नेऊन ठेवले आहे. नि ते सुद्धा, कुठल्याहि भारतीयांनी कुठेहि हिंसा न करता!

मुसलमान तसे का करू शकत नाहीत? समजा भारतात त्यांच्यावर अन्याय होत असेल, मग इतर देशातल्या मुसलमानांनी तरी काय केले, की ज्यायोगे त्यांचा प्रभाव पडावा? काऽही नाही! फक्त हिंसा!


Dinesh77
Friday, March 16, 2007 - 3:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की काका,
१००० टक्के अनुमोदन.


Chyayla
Saturday, March 17, 2007 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन्दार नाण्याची दुसरी बाजु बघताना एकाच नाण्यावर येण्यासाठी दोन्ही मधे काही तरी समानता हवी असे नाही का वाटत? मुस्लिम ज्या प्रमाणे धर्माच्या नावाने हिन्साचार करतात तसे निदान अमेरिका तरी करत नाही.

या बाबतीत भारतीयांची स्तुति करावी तेव्हढी थोडीच. इतकी वर्षे पारतंत्र्यात राहून, गरीब, अशिक्षित राहून सुद्धा त्यांनी जगात सध्या आपले स्थान फार उंचावर नेऊन ठेवले आहे. नि ते सुद्धा, कुठल्याहि भारतीयांनी कुठेहि हिंसा न करता!

मुसलमान तसे का करू शकत नाहीत?

झक्की नी अतिशय उत्कृष्टपणे मुस्लिम आणी ईतरानमधला फ़रक दाखवला आहे, मुस्लिम समाजावर तथाकथित अन्याय झाला म्हणुन त्याच्या उत्तरादाखल सम्पुर्ण जगामधे दहशतवादी कार्यवाया ज्यामधे बॉम्बस्फ़ोट, व निरपराधान्च्या हत्या कुठवर समर्थनिय आहेत? माझे हे अजुन एक आवाहन आहे की झक्कीन्च्या वरच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा.

मला याच बाबीवर अजुन एक फ़रक दाखवायचा आहे.

सहनशक्तीचा अन्त झाल्यावरच ईतरही समाज प्रसन्गी हिन्सेने प्रत्युत्तर देतो पण ती प्रतिक्रिया तात्कालिक असते व झाले गेले विसरुन परत कामाला लागतो.
पण जिहाद मधे शत्रु असो वा नसो हिन्सा कायमच सुरु असते. तीच हिन्सा त्यान्च्यात इतकी भीनते की शान्तीत कसे जगावे ते कळत नाही त्यामुळे जेन्व्हा शत्रु (काफ़िर) उरत नसतो तेन्व्हाही त्यान्च्यात आपसातच चालते.
ह्याच कारणाने आज मुस्लिम, पाकिस्तान स्वता:च दहशतवादाचे फ़ळे चाखत आहेत मी आधीच म्हटले की दहशतवाद हे दुधारी शस्त्र आहे ते चालवणार्यावरच अशा प्रकारे उलटते. नाहीतर जे पुर्णता: मुस्लिम देश आहेत तिथे शान्ती नसण्याचे काय कारण असावे?

याउलट गुजरातमधे समाजाने हिन्सा करुनही तिथे आज शान्ती आहे एवढेच नव्हे तर दोन्ही समाजाचा अन्तर्भाव होउन ते राज्य उत्कृष्ट प्रगतीचा उच्चान्क गाठत आहे हे सगळा समाज एकत्र आल्याशिवाय शक्य नाही, नाहीतर तिथे आजही दन्गे झाले असते किन्वा काश्मिर मधे जसे पन्डिताना हाकलले तसे मुस्लिमाना हाकलले असते... तर दुसरीकडे सतत तथाकथित राष्ट्रवादी शक्तिन्ची भीती दाखवणार्या बन्गाल मधे काय सुरु आहे? यातच काय ते लक्षात येते.

थोडे विषयान्तर...

जिहाद आणी इस्लाम याला आम्ही काय ते स्वता: सुद्धा वेगळे करु शकत नाही, त्यामुळे निदान भारतापुरता तरी ईथले मुस्लिम आपलेच पुर्वज आहेत व त्यान्ची आपल्याला आजही गरज आहे व आपल्यात परत सामावुन घेणे आवश्यक आहे ही भावना प्रत्येक हिन्दुने निर्माण करण्याची गरज आहे त्यासाठी सरकार व वैयक्तिक पातळीवरही समाजाने प्रयत्न करणे आवश्यक आहे यासाठी आपण किती तयार आहोत? असा प्रश्न मला प्रत्येकाला विचारावासा वाटतो. हा प्रगल्भ विचार काही राष्ट्रवादी शक्ति वगळता कोणीच करताना दीसत नाही. उलट त्यान्च्याबद्दलच गैरसमज पसरवल्या जातात. खैर चान्गल्या गोष्टीन्ना विरोध होणे काही नवीन नाही.
दुसरी गोष्ट त्यान्नी आपल्यात परत का यावे? यासाठी परकिय, मिशनरी, कम्युनिस्ट तत्वान्नी जी वैश्विक कुटुम्बाची, परधर्म सहिष्णुता, जगा व जगु द्या यासारखी उच्च तत्वे बाळगणार्या समाजात जी ग्लानी निर्माण केली आहे ती फ़ेकुन देउन हा समाज सगळे दोष, भेद,जाती विरहीत एकसन्ध व समर्थ होणे आवश्यक आहे.

तर दुसरीकडे दुर्दैवाने व्होटब्यान्केच्या राजकारणापायी असमान वागणुक, कायदे, लान्गुलचालनाचे किळसवाणे प्रकार, धार्मिक आधारावर आरक्षण वैगेरे सारख्या क्लुप्त्यान्नी दोघानमधेही कटुता निर्माण करण्याचे उपद्व्याप पहाता चीड येणे सहाजिकच आहे.
निदान यासाठी तरी मी मुस्लिमाना पुर्ण दोष देण्यापेक्षा आपल्याच अराष्ट्रवादी विचारसरणीच्या लोकान्ना जबाबदार धरतो. या सगळ्यान्वर मात करण्यासाठी प्रत्येकामधे राष्ट्रिय विचार बळकट होणे आवश्यक आहे


Santu
Saturday, March 17, 2007 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वर्गात(जन्नत)की नरकात(जहन्नम)मधे सुध्दा आता जागा नाहि

Jaymaharashtra
Saturday, March 17, 2007 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्या,
तुमच्या पोस्ट्ला १००% अनुमोदन. असा उदारमतवादी दृष्टिकोण ठेवण्यावरच खरेतर भर दिला पाहिजे. भारतात निधर्मिवादाचे फ़ालतु गोडवे गाणार्‍या तथाकथित राष्ट्रवाद्यांना असे काहि सुचणे अशक्य आहे कारण मुळात इच्छाशक्तिचा आभाव आहे. या समाजाचे पुनरुत्थान करण्याचा प्रमाणिक प्रयत्न कॉन्ग्रेस आणि इतर निधर्मवादि पक्षांनि कधि केला नाहि उलट सत्तेसाठि यांच्या दाढ्या कुरवाळुन आणि फ़ाजिल लाड करुन आणि त्यांच्या वेगळेपणाची जाणिव वेळोवेळि करुन देवुन यांना कायम मुख्य प्रवाहापासुन दुरच ठेवले.
झक्कि काकांनी पुन्हा एकदा अतिशय समर्पक उदाहरणे देवुन आपले मुद्दे स्पष्ट केले.पण या वर चर्चा होणे संभव नाहि.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!



Zakki
Saturday, March 17, 2007 - 9:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुर्दैवाने व्होटब्यान्केच्या राजकारणापायी
ते जर सुधारले तर मुसलमानांचाच काय पण इतर सर्व प्रश्न लगेच सुटतील! नि भारत सर्व क्षेत्रात इतकी प्रगति करेल की अण्वस्त्रे असलेल्या अमेरिकेला सुद्धा काबूत ठेवू शकेल.

पण नुसतेच राजकारणी नाही तर सगळेच लोक केवळ पैशाच्या नि खोट्या मानापमानाच्या मागे लागले आहेत ना!

तेंव्हा माझ्या हयातीत तरी तो प्रश्न सुटणे शक्य नाही! मग मी आपले ब्रम्ह सत्यं जगन्मिथ्या म्हणून गप बसतो!


Aaspaas
Sunday, March 18, 2007 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे ही वाचा,
लोक्सत्ता, पुणे वृत्तांत, १५ मार्च, पान ३, उजवा कोपरा
सकाळ, १६ मार्च, अग्रलेख, प्रफ्फुल्ल बिडवई.

माओवादी आणि झारखंडमधील लक्षलवादाचे काय? यांचा कोणता जिहाद आहे?

बायकोला मारणे दहशतवाद नसेल तर मग काय आहे. पुरुष स्त्रिवर हक्क गाजवायचा प्र्यत्न करत असतो. शारिरीक ताकदीचा प्रयत्न का करावा लागतो आणि त्यामुळे काय होते याचा विचार करता येईल.


Santu
Sunday, March 18, 2007 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बायकोला मारणे हे दह्शतवाद नाहितर काय)))))अहो बायकोला मारणे किंवा बायकोने मारणे..... फ़ार तर
अन्याय या कॉटॉगरीत येईल पण याला दहशतवाद म्हणणे हे फ़ारच
अतीरंजीत होईल.

शारिरिक ताकतिचा प्रयत्न ))))मला वाटत हे सत्य युगात होत असेल
हल्लि कलियुगात उलटि परीस्थीती आहे.
झाडु, लाटणे, ई. स्त्रियाच्या ब्रह्मास्त्रा मुळे पुरुषांची च पळता भुई
थोडी झाली आहे.
तात्पर्य काय तर
-या अर्थाने स्त्रिया सुध्दा दहशत्वादी होतील.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators