|
Laalbhai
| |
| Thursday, January 18, 2007 - 12:02 pm: |
| 
|
बरे.. आता असे पहा की मी "चोर", माझ्यासारखे आणखीही काही "चोर" असतीलच. आता तुम्हीच विषय काढलात म्हणून उदाहरणादाखल तुम्हालाही आपण "चोर" म्हणू. (खरे नाही बरं का!) आणि आणखी १०० चोर मायबोलीवर आहेत, असे समजू. म्हणजे मायबोलीवर ५ टक्के "चोर" आहेत, जे आदरणीय झक्कीकाकांच्या म्हणण्यानुसार मायबोलीवरचे हलकेफुलके वातावरण उगाचच गंभिर करत असतात. मग मला असे सांगा, ह्या ५ टक्के मायबोलीकरांमुळे "अवघा मायबोली समाज" "चोर" ठरतो का? अवघी "मायबोली" नालायक ठरते का? तुमच्या logic प्रमाणे माझ्या ह्या प्रश्नाचे उत्तर "हो" असेच येते. म्हणजे, ही (चोर) माती मायबोलीच्या शुद्ध पाण्यात मिसळल्यामुळे मायबोली गढूळ झाली, अशी जरी संगती लावली, तरी "मायबोली" गढूळ आहे, असे तुम्ही म्हणाल का? माझ्या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर द्याल का? किमान मी तरी असे म्हणणार नाही. भारतीय समाजाविषयी मी जे म्हणतो, तेच मायबोलीविषयी म्हणेन. कोणतीही गोष्ट परिपूर्ण नसते, मायबोली अथवा भारतीय समाज त्याला अपवाद नाहीत. माझ्या प्रश्नाचे उत्तर द्याल का?
|
Zakki
| |
| Friday, January 19, 2007 - 12:42 am: |
| 
|
Attitude ने दोष दाखवत आहेत ते पटण्यासारखे नाही, अहो, नाही पटत तर सोडून द्या. मी काही माफी वगैरे मागत नाही! सगळ्यांना पटतील अशीच मते असण्याची सक्ति आहे का? मग मला असे सांगा, ह्या ५ टक्के मायबोलीकरांमुळे "अवघा मायबोली समाज" "चोर" ठरतो का? अवघी "मायबोली" नालायक ठरते का? तुमच्या logic प्रमाणे माझ्या ह्या प्रश्नाचे उत्तर "हो" असेच येते. म्हणजे, ही (चोर) माती मायबोलीच्या शुद्ध पाण्यात मिसळल्यामुळे मायबोली गढूळ झाली, अशी जरी संगती लावली, तरी "मायबोली" गढूळ आहे, असे तुम्ही म्हणाल का? समजा कुणि तुमच्या प्रश्नाला 'हो' असे उत्तर दिले तर तुम्ही, idealogical idiotism का काहीसेसे म्हणाल, मूर्ख म्हणाल, 'हलकट' म्हणाल. पुढे काय? काही नाही! कदाचित् वा वा लालभाई, तुसी ग्रेट हो! असे लोकांनी म्हणावे अशी तुमची अपेक्षा आहे का? अपेक्षा असेल, पण लोक जर तसे म्हणत नाहीयेत तर तुम्ही काय दुसरा उद्योग नसल्यासारखे तेच तेच लिहीत बसणार का? त्यापेक्षा जरा गुलमोहर, religion इ. BB वर जा. जरा चेन्ज होईल.
|
लालभाई..... ते चोर वगैरे शब्द वापरण्या ऐवजी "बुर्झ्वा" सारखे शब्द वापरले असते तर अधिक शोभुन दिसले असते नाही का?......! DDD पाणी सम्पुर्णच गढुळच होते......! समाज देखिल सम्पुर्ण ढवळुन निघतो.....! डिसेम्बर मधल्या (आर आर च्या मते नक्षलाईट्स्च्या सहाय्याने केलेल्या) दन्गलीन्मधे देखिल ते दिसले.....! पण तुम्ही म्हणता तसे मायबोलीचे तसे नाही..... मायबोलीवरचे तथाकथित उपद्रवी "चोऽऽर" शोधुन काढुन त्यान्चा बन्दोबस्त करण्याचे सामर्थ्य व अधिकार व इच्छा जोवर या साईटच्या मालका मधे आहे तोवर इथल्या सम्पुर्ण मायबोलिकराना "चोऽऽऽर" असे ठरविण्याच्या "भडकावू" "भावनिक" "आवाहनाचा" काहीही परीणाम एकाही सुज्ञ मायबोलिकरान्वर होणार नाही....! लालभाई, तुमची पोस्ट वाऽयाऽऽऽ गेलीऽऽहोऽऽऽ! DDD
|
Zakki
| |
| Friday, January 19, 2007 - 2:49 pm: |
| 
|
Admin feedback वरील भाग्या यांचे ऐकून मी या विषयावर काही लिहीत नाही.
|
Chyayla
| |
| Saturday, January 20, 2007 - 1:20 pm: |
| 
|
चला बरे झाले कुठे तरी हे भान्डण थाम्बले... पण आता परत तोच प्रश्न... Why we Indians are like this म्हणजे भान्डणारे म्हणायचे आहे मला. दीवा घेणे नाही तर परत सुरु व्हायच ... नारायण नारायण...
|
Laalbhai
| |
| Monday, January 22, 2007 - 10:17 am: |
| 
|
यांचे ऐकून मी या विषयावर काही लिहीत नाही. >> तुम्ही कुणाचे तरी ऐकता हे वाचून आनंद जाहला !! 
|
Laalbhai
| |
| Monday, January 22, 2007 - 10:19 am: |
| 
|
लालभाई, तुमची पोस्ट वाऽयाऽऽऽ गेलीऽऽहोऽऽऽ! >> म्हणजे काय? ती उडवली. का ते विचारण्याची सोय नाही. पण वाया गेली म्हणजे काय?
|
Chyayla
| |
| Monday, January 22, 2007 - 8:18 pm: |
| 
|
छ्या झालच शेवटी... गई भैस पानी मे.
|
Kashi
| |
| Friday, January 26, 2007 - 2:57 am: |
| 
|
सगळ्यांना प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
|
आयला हा bb अद्याप सुरुच? काहीच सार निघत नसताना, आणि वैयक्तिक शिव्याशाप देण्यात मश्गूल मन्डळींनी आता वेगळी वाट सुरु करावी. चू.भू.दे.घे.
|
Sashal
| |
| Friday, February 02, 2007 - 9:50 pm: |
| 
|
http://www.rediff.com/news/2006/dec/20george.htm Living abroad मधल्या passport for a new born मधल्या चर्चेत ह्या article चा उल्लेख आला .. मी ऐकून होते ह्या प्रकरणाबद्दल पण पुर्ण article आताच वाचलं म्हणून त्याबद्दल काहि .. ह्या पुर्ण प्रकारात जेव्हढी चूक त्या श्रीवर्धनकर नवरा - बायकोची आही तेव्हढी कोणचीच नाहि .. इथे रहात असलेल्या समस्त NRIs ना भारताची ट्रिप ही 'a trip home' वाटत असली तरी ते international travel आहे हे आधी लक्षात घ्यायला हवं .. दोन्ही मुलांचा visa/ PIO घरी विसरून जाणं ही माझ्या दृष्टीने अक्षम्य चूक आहे .. मला अजिबात हे म्हणायचं नाहि की त्या immigration अधिकार्यांची चूक नाहि .. त्या french मुलाला transit visa दिला आणि ह्यांच्या मुलांना दिला नाहि वर white skin ची सबब निर्लज्जपणे सांगितली, हे जर खरं असेल, तर त्या अधिकार्यांबद्दल काय बोलायचं .. पण नऊ वर्षं अमेरिकेत राहिलेल्या, 9/11 ह्याची देही ह्याचे डोळा बघितलेल्या, green card holder आइ - बाबांना आठवणीने पोरांचा visa घेऊन जाणं लक्षात रहायला नको? आणि मग मग खुशाल 'असे कसे आम्ही भारतीय' असं म्हणून ठणाणा करण्यात काय अर्थ आहे? माझ्या दृष्टीनी श्रीवर्धनकर आइ - बाबांचा हलगर्जीपणा दुर्लक्षीत करण्यासारखा अजिबात नाहि आणि त्यावरून समस्त भारतीयांना नावे ठेवण्याजोगा तर अजिबात नाहि ..
|
Farend
| |
| Friday, February 02, 2007 - 11:40 pm: |
| 
|
त्यांना Boston विमानतळावर निघतानाही काही विचारलेले दिसत नाही. आपल्याकडे SFO वर कायम I-94 नाहीतर ग्रीन कार्ड विचारतात तिकीट देताना, त्याने किमान आठवण झाली असती.
|
Zakki
| |
| Saturday, February 03, 2007 - 1:49 pm: |
| 
|
कदाचित् श्रींना वाटले असेल सौ. बघतेय्, सौ. ला वाटले श्री! काय आहे, आमच्या वेळी बायका स्वत:ची हुषारी लपवून ठेवत. त्यामुळे नवर्यालाच सगळे करावे लागे. मग एका हाती नीट होते सगळे. आता काय, समानता काय, नि स्त्रीमुक्ति काय, असल्या भानगडीच जास्त! मग नवर्यांची (आधीच कमी असलेली बुद्धि) आणखीनच काम करेनाशी होते. पण त्या दोघात project Manager तरी ठरवायला नको का? जसे आमच्याकडे सौ! सगळा कारभार बिनबोभाट नि वेळच्या वेळी!
aso,
|
Ram3
| |
| Monday, April 09, 2007 - 9:03 am: |
| 
|
भारत हा आपला देश आहे अनी आपन सर्वानी त्याला चान्गला बनवायचा आहे. पन त्याला वाइट म्ह्ननने म्न्नजे खाल्या मिठाला न जागने असे वाटते.
|
Peshawa
| |
| Friday, April 20, 2007 - 11:09 pm: |
| 
|
www.esakal.com/esakal/04212007/Muktapith31DD64F0FB.htm ह्याच देशाबद्दल बोलताय का तुम्ही राम? ह्याच समाजाबद्दल आदर दाखवायचा का? का? आणि ह्याच देशाच्या उज्जवल बविश्याबद्दल भुतकाळबद्दल तोंड फ़ाटेपर्यंत स्तुती करतायत का इथले लोक?
|
Rajankul
| |
| Saturday, April 21, 2007 - 5:35 am: |
| 
|
साला सगळा देश पेटवुन दिला पाहिजे. काही कामाचा नाही.
|
Mandard
| |
| Saturday, April 21, 2007 - 8:58 am: |
| 
|
तुमच्या घरापासुन सुरवात करु कसे ठिक आहे ना राजन.
|
Rajankul
| |
| Saturday, April 21, 2007 - 10:50 am: |
| 
|
profile मध्ये पत्ता लिहिलाय मी. भारत सुधरण्यापलिकडचा आहे. घरातुन बाहेर पड नुसती गर्दी गोंधळ घाण. प्रत्येकाला आप्ल्या मनाचे करायचे असते. कायदे, नियम सब कुछ बकवास च्यायला अशे अनुभव दिले या लोकांनी उगाच नाही इतका कडवट झालो.
|
Zakki
| |
| Saturday, April 21, 2007 - 1:05 pm: |
| 
|
लालभाई, लालभाई, किंवा (आजकाल जे नाव घेतले असेल ते घेऊन)लवकर या. हे बघा सगळे तुमचा वैयक्तिक अपमान करताहेत. त्यांना 'हलकट' म्हणायला या! शिवाय ते संघवाले असतील, किंवा संघाच्या प्रचारामुळे तसे करत असतील असे काहीतरी तर्कशुद्ध नि मुद्देसूद लिहा.
|
Supermom
| |
| Saturday, April 21, 2007 - 2:34 pm: |
| 
|
मंदार, रजनकुल कुठल्या मनस्थितीतून लिहिताहेत हे कळायला तुला सकाळची ती लिंक वाचावी लागेल रे. खरेच देश पेटवावा हे म्हणणे नसावे त्यांचे. भ्रष्ट व्यवस्था आणि मुर्दाड, बधीर समाजमन यावरचा उद्रेक फ़क्त निघाला बाहेर असे वाटतेय मला. i dont think he really means it. वरची लिन्क वाचून अंगावर शहारेच आले. 'अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस?' असं प्रकर्षानं वाटून गेलं. आठ वर्षांपूर्वी मी जेव्हा लग्न होऊन अमेरिकेत आले, तेव्हा एका भारतीय कुटुंबाने आम्हाला जेवायला बोलावले होते. गप्पा मारता मारता मला कळले की त्यांनी नुकतीच सिटिझनशिप घेतलेली आहे. 'हे फ़ार मोठं डिसिजन आहे असं नाही वाटत तुम्हाला?' मी प्रश्न केला. 'त्यात काय? there is no hope for India...' ते अगदी पटकन म्हणाले. मला अर्थातच खूप राग आला, वाईटही वाटले. पण या आठ वर्षात मला इथलेही काही अनुभव आलेत. त्यावरून हा मनाला कष्टदायी निर्णय लोक का घेतात याची थोडी कल्पना येऊ लागली आहे. मी आणि माझी मैत्रीण रस्त्याने जात असताना आम्हाला एक मोठा अपघात झालेला दिसला. एक मोठी व्हॅन उलटी होऊन पडलेली होती. दारे लॉक झाल्याने उघडत नसावी बहुतेक. पण रस्त्यावरचे लोक सगळे गाड्या बाजूला घेऊन खाली उतरून जमेल तसा मदतीचा प्रयत्न करीत होते. एका कॉलेजच्या मुलाने आपल्या गाडीतून एक लोखंडी सळाक काढली आणि तो दार उघडायचा प्रयत्न करू लागला. इतर लोक काचांवर थापा मारून 'घाबरू नका,पोलिस येताहेत. धीर धरा.' हे सांगत होते. हे सारे नाट्य अगदी रस्त्याच्या मधे, भर गर्दीच्या वेळी होऊनही कोणीही शिव्या, किंवा 'पब्लिकका टैम खोटी मत करो' वगैरे उद्गार काढत नव्हते. आता याला दुसरी बाजू हीपण आहे की आपल्याकडे पोलिस असे काही झाले की साक्षीदार किंवा मदत करणार्यालाच त्रास देतात हे मला अनेक लोकांनी सांगितले आहे. त्यामुळेच कोणीही मधे पडत नाही. फ़ार कशाला, मी जेव्हा भारतात नोकरी करत होते तेव्हा एकदा आमचे साहेब ऑफ़िसमधे बरेच उशिरा पोचले. काय झाले विचारल्यावर त्यांनी सांगितले की एका मुलीला रस्त्यावर अपघात झाला होता. तिला डॉक्टरकडे नेऊन, पोलिसमधे कळवून मग ते आलेत. यावर ऑफ़िसमधल्या बहुतेकांची प्रतिक्रिया हीच होती की 'झाले. आता तुम्हाला बघा पोलिस किती त्रास देतील." मला दुर्दैवाने गेल्या वर्षी तीन वेळा तब्येतीच्या कारणाने दवाखान्यात भरती व्हावे लागले. नवराही तेव्हा इथे नव्हता. पण दवाखान्यात पोचल्यावर नेहेमी हाच अनुभव आला की ' insurance वगैरे नंतर बघू. आधी उपचार सुरू करू या.' अगदी बाळंतपणाच्या वेळच्या complications मधे हाच अनुभव. अन दवाखान्यातले सारेच इतके गोड बोलतात की बस. अगदी असे धरून चालूया की ते खोटे गोड बोलणे असेल. पण आजारी माणसाला कुणी अंगावर खेकसण्यापेक्षा खोट्या का होईना गोड बोलण्याचीच फ़ार अपेक्षा असते. भारतात असताना माझ्या मुलीला एकदा खूप ताप आला होता. पण भर उन्हात, तान्ह्या बाळाला ताप आहे हे सांगूनही ऑटोवाल्याने 'जवळ आहे' म्हणून यायला नकार दिला. पण ही सारी वाईट उदाहरणे जशी आहेत ना, तशी चांगलीही आहेत. माझी बहीण सिरियस असताना तिला दवाखान्यात नेणार्या ऑटोवाल्याने पैसे घ्यायलाच नकार दिला होता.एकदा मी माझ्या दोन लहान मुलांबरोबर airport वर असताना, दोन मुले अन खूप लहान आहेत हे पाहून एका पोलिसाने मदत केली होती. मी इकडे असताना, माझ्या म्हातार्या आईबाबांची काळजी घेणारी, त्यांना कुठल्याही अपेक्षेशिवाय मदत करणारी ही देखील आपलीच माणसे आहेत. माणुसकी अजून पूर्ण मेलेली नाही. तिला गंज चढलाय थोडासा येवढेच. थोडक्यात काय तर रजनकुल, असे निराश होऊ नका. बाकी कोणी काहीही करो. आपल्या हातात तर गरजवंताला मदत करणे आहे ना. तेवढेच मनापासून केले की झाले. आपल्यापासून सुरुवात केली तरी पुष्कळ झाले म्हणेन मी.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|