|
Chyayla
| |
| Friday, April 13, 2007 - 3:41 pm: |
| 
|
पेशवा खरच जबरदस्त लिन्क आहेत.. हा जिहाद विरुद्धचा लढा अजुनही तसाच सुरु आहे फ़क्त युद्धपट आणी प्रकार बदलला. पण शत्रुही तोच व गद्दारही तसेच आहेत. ही खरच एक अभिमानाची गोष्ट आहे की सुमारे १००० वर्षे भारताविरुद्ध जिहाद करुनही त्याना ईतर देशानप्रमाणे अजुनही पुर्ण मुस्लिम बनवता आले नाही आणी दुसरीकडे तितकीच शरमेची गोष्ट आहे जे झाले ते आपल्यातील गद्दारान्मुळे शक्य झाले व एकवेळ अफ़गाणीस्तान पासुन ब्रह्मदेशपर्यन्त असलेला हिन्दुस्थान आज केवळ भारतापुरता मर्यादीत झाला आहे. शिवाय आता पाकिस्तान, बान्ग्लादेश, काश्मिर हे होत असलेले पराभवच म्हणावे लागेल. मन्दार तुमच्या चिन्तेशी सहमत मागे पोस्ट मधे याचबद्दल लिहिले होते की हिन्दु समाज किती तयार आहे परधर्मियाना आपल्यात येउ द्यायला. या बातमित बदनामी व्हावी या उद्देशाने फ़ॅशन म्हणुन बजरन्ग दलाचे नाव मुद्दाम घातले असे दीसते. माझा प्रत्यक्ष अनुभव विरुद्ध आहे. एका मुस्लिम मुलीने हिन्दु मुलाशी प्रेम्-विवाह केला त्या मुलीचे पालकत्व, कन्यादान माझ्या परीवाराने केले हे लग्न विहिप, व बजरन्ग दल यान्च्यामुळे शक्य झाले व आजही ते दाम्पत्य सुखी व सुरक्षीत आहे.
|
Mansmi18
| |
| Friday, April 13, 2007 - 6:48 pm: |
| 
|
मित्रहो, तुम्हि वाचले का? इन्फ़ोसिस्च्या नारायण मुर्थीना म्हणे परदेशी पाहुण्यन्समोर राश्ट्रगीत म्हणायला लागणे लाजिरवाणे वाटते. खरे आहे का हे?
|
Uday123
| |
| Friday, April 13, 2007 - 11:28 pm: |
| 
|
हे खरे नसावे. नारायण मुर्ती यांनी वाद्या वर राष्ट्रगीत वाजवले, त्यांनी राष्ट्राचा कुठलाही अपमान केलेला नाही. (शाळेत न जाणार्या) किती लोकांना संपुर्ण राष्ट्रगीत येते? गीत चुकीचे म्हणुन अपमान करण्यापेक्षा वाद्या वर वाजवणे का अपमान ठरावा? ध्वजाच्या समोर (एकनीष्टतेची) शपथ घेऊन राज्यकर्ते (दुर्दैवाने आता उच्चपदस्थ पोलिस देखिल) राजरोसपणे चोर्या करतात, आणी मला वाटते तेथील राजकारण्यांना मुर्तीं बद्दल आसुया आहे.
|
Farend
| |
| Saturday, April 14, 2007 - 5:22 am: |
| 
|
पण परदेशी लोकांनी फक्त स्तब्ध उभे राहून मान राखणं अपेक्षित असतं ना? म्हणायची गरज नसते ना? मग एव्हढा प्रश्न का पडला? ऑलिंपिक मधे नाही का एव्हढ्या देशांची राष्ट्रगीते लावत?
|
Mansmi18
| |
| Saturday, April 14, 2007 - 1:36 pm: |
| 
|
मलाही मुर्तीबद्दल आदर आहे. पण... जर अ देशाचे राष्ट्रगीत लावले आणि जर ते ब देशाच्या लोकाना येत नसेल तर त्यात लाजिरवाणे काय आहे? मुर्ती जरा अति कराय्ला गेले. इथे ४ जुलै ला इतर लोक अमेरिकेचे राष्ट्रगीत गात असतात आणि मला ते येत नाही पण मी त्याचा आदर राखतो. पण ते मला येत नसल्याची मला "लाज" वाटत नाही.मला वाटते अमेरिकन किन्वा इतर देशाच्या लोकाना भारताचे राष्ट्रगीत येत नसल्याची लाज वाटणार नाही. अर्थात, जे राजकारणी लोक या गोश्टीचे भान्डवल करतात त्याना राष्ट्रगीताचा खुप अभिमान आहे असे वाटण्याचे काही कारण नाही. पण काही झाले तरी मुर्तीसाहेब तुम्हारा चुक्याच.
|
नारायण मूर्तीनी असे म्हटले होते की आम्ही इथे राष्ट्रगीत गाणार होतो त्यामुळे येथील परदेशी पाहुण्यांची अडचण होईल म्हणून आम्ही ते वाद्यावर वाजविले आहे. त्यावर कर्नाटक विधानसभेत प्रश्न विचारण्यात आला. त्यात गृहमंत्र्यानी उत्तर देताना असे सांगितले की या गुन्ह्याबद्दल मूर्तिंविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यात मूर्तींचे चुकले की नाही ते ज्याने त्याने ठरवावे पण कर्नाटक सरकारच्या निर्णयाला आणखी एक बाजू आहे ती म्हणजे मूर्तीनी कर्नाटक सरकार इन्फ़ोसिसला मदत करीत नाही व बंगळुरुमध्ये पायाभूत सुविधा चांगल्या नाहीत अशी टीका केली होती त्यामुळे कानडी सरकारला तसा मूर्तींचा राग होताच. सचिन तेंडुलकरने तिरंग्याचे आयसिंग असलेला केक कापल्याने वादळ निर्माण झाले आहे. बहुधा कुणीतरी प्रसिद्धीसाठी कोर्टात जाऊन त्यात सचिन विरुद्धही केस दाखल होण्याची शक्यता आहे. आता हे अपमान आहेत की नाही हे ठरवताना तुम्ही सचिनचे अन मूर्तींचे फॅन आहात की नाहीत हा यात कळीचा मुद्दा आहे. यात एखादा मुसलमान असता तर वेगळ्या प्रतिक्रिया आल्या असत्या हे नक्की. तर काय घटना काय आहे यापेक्षा माणूस कोण आहे यावर आपले मत अवलम्बून आहे. टिपिकल भारतिय ढोंगीपणा यालाच म्हणतात!!
|
Zakki
| |
| Sunday, April 15, 2007 - 4:26 pm: |
| 
|
मला नाही वाटत यात टिपिकल भारतिय असे काही आहे. राजकारणीच नव्हे तर इतरहि लोक अख्ख्या जगात त्यांच्या स्वार्थासाठी असाच ढॉंगीपणा नेहेमीच करत असतात. अमेरिकेत, इंग्लंडमधे, इतर देशात, गोरे, काळे, पिवळे सगळ्याच लोकात जे जे स्वार्थी, राजकारणी लोक आहेत ते सग्गळे अस्सेच करतात. अगदी खाजगी उद्योगधंद्यात सुद्धा असे 'पॉलिटिक्स' करतात असा अनुभव आहे.
|
Lukkhi
| |
| Tuesday, April 17, 2007 - 10:44 am: |
| 
|
झक्की, काय झाले तुम्हाला? नशेत वगैरे नव्हतात ना हे लिहिताना? भारतावर (आणि भारतियांवर) टीका करण्याची नामी संधी सोडलीत?
|
Gobu
| |
| Wednesday, April 18, 2007 - 8:54 am: |
| 
|
लुक्खी,
  पुर्ण अनुमोदन बाकी आजकाल काही लोक थोडासा सारासार आणि परीपक्व विचार करुन लिहायला लागले आहेत चला सुरुवात तर झाली...
|
नुकत्याच झालेल्या अमेरिकन शूट आऊटचे प्रत्यक्ष वर्णन करणारा एक लेख आजच्या टाईम्स ऑफ़ इंडियामधे आला आहे. माझ्या बॉसच्या मुलाने लिहीला आहे. मला लिंक मिळत नाही आहे. म्हणून इथे टेक्स्ट टाकत आहे. ‘After tragedy, police were of no help’ Shock Followed Disbelief, Bloodbath Was Preceded By Bomb Hoaxes On Two Days One madman killed 22 (now 33, including the gunman) people in a matter of two hours and changed the face of this university town, Blacksburg. For me it was even more shocking because I can’t find Minal (Panchal), my friend with whom I was till Monday and had chatted. My friends and I looked for her but she wasn’t to be found. Police, who took over the campus immediately after they came to know of the incident, were of no help. Perhaps they had their own reasons. Maybe they wanted to prevent any sharp reactions. It all started in the morning when I was at my breakfast table having the routine food....I decided to check email before leaving my room. There was a message from the authorities that there was a shooting on the campus. It also asked everyone to report to the police if they noticed any suspicious person or incident. It did not shock me greatly because there had been a few rumours about bombs on the campus, especially the engineering faculty building, over the past two days. They turned out to be hoaxes. I thought this also may turn out to be a hoax. While waiting for the all-clear signal, I decided to complete my pending home work. A great shock awaited when I received a second message only few minutes later at 9.50 am. It said a gunman was on the loose on the campus and everyone must stay in their rooms and away from windows till further notice. It seemed serious. I contacted a few friends on the campus but none had a clue of what was happening... Everyone was tense but safe in his room. The only way one could get information was through the network. Two more messages landed shortly afterward saying there was a second shootout in Norris Hall—the main study centre. The message said multiple casualties reported. Not knowing was more killing. The only way to get some information was the news. So I hooked on to CNN news online and was shocked by what I read. The only thing left to be done was to call up friends because many of them had labs in the morning in Norris Hall, which was the hotbed of the shooting spree. The police had sealed all entrances and no one was allowed to leave the rooms. Even those stranded outside were escorted to ensure their safety. The transit— transport network and lifeline of the campus—was shut. Without this service, it was impossible to go anywhere in the 2,600-acre zone. Worst was that the mobile phone network was jammed. Probably the police did not want the spread of unauthorised information. There was every possibility of them becoming rumours, spread ing panic all over. The police and paramilitary appeared to be efficient but everyone was tightlipped. Only close relatives of those who were affected, dead or injured, got to know something It was only after a few hours when the situation appeared to be under control that the police allowed us to go to hospital to check whether any one of our friends was affected. I was worried because I could not locate Minal. In the evening, we gathered at the inn so that we could share information but everyone knew very little. We stayed till midnight, where I typed out this message. Even penning down these few words did not relieve us of pain and depression. There is also a fear of reprisal from local youth as the gunman was apparently of Asian origin. That explained why the authorities were not willing to share any information with us or anyone else. A first-person account of Sham Chaware, a student at Virginia Tech.
|
Anamikaa
| |
| Wednesday, April 18, 2007 - 9:56 am: |
| 
|
नंदिनी खरच! खुप भयानक घटना घडली आहे. lecture चालु असताना वर्गात जाऊन अंदाधुंद गोळीबार केलाय त्या south korean युवकाने. काय? परिस्थिति असेल वर्जिनिया विश्वविद्यालयातील याची कल्पना देखिल करवत नाही!त्या युवकाचे वय काय तर २३ वर्षे? आताच समजले की मुंबईची कु.मिनल पांचाळ ही architecture ची विद्यर्थिनि देखिल या गोळीबारात मृत्युमुखी पडली आहे. प्राध्यापक लोंगनाथन यांच्या बद्दल तर कालच समजले होते. खरच फ़ार भयंकर आहे हे सगळे! आपले आयुष्य खरच किती क्षणभंगुर आहे याची कल्पना आज मी करु शकले. खरच भितिने शहारा आला अंगावर! "अनामिका"
|
Anamikaa
| |
| Wednesday, April 18, 2007 - 9:59 am: |
| 
|
या हत्याकांडाबद्दलचि माहीती देणारी लिंक http://www.msnbc.msn.com/id/18138369/?GT1=9246 "अनामिका"
|
Ajjuka
| |
| Wednesday, April 18, 2007 - 1:11 pm: |
| 
|
हे भयंकर आहे. पण I hope की ह्याची प्रतिक्रिया म्हणून इतर Asian विद्यार्थ्यांना काही त्रास होऊ नये. जसं ९११ नंतर थोडं संशयाने बघितलं जातं होतं.
|
Ajjuka
| |
| Wednesday, April 18, 2007 - 1:17 pm: |
| 
|
मला आज ऑर्कुटवर मिनलची प्रोफाईल मिळाली. तिथे मी जाऊन आले. तिथे 'मी तुला ओळखत नाही मिनल पण इश्वर तुझ्या आत्म्यास शांती देवो' अश्या आशयाचे कैक स्क्रॅप्स आहेत. लिहिणार्यांची काही चूक नाही पण तरी एखाद्याला... तुझ्या आत्म्यास शांती देवो म्हणलं जाणं हे कसलं odd आहे. म्हणजे तसं बघता तिथे काही चूक नाही पण आपण गेलेल्या माणसाला असं थोडीच सांगू शकतो. आपण एखाद्याला स्क्रॅप टाकतो तो त्याने वाचावा म्हणून पण हे ती वाचू शकणार नाही हे माहीत असूनही कदचित प्रोफाइल रूपाने ती असेल, वाचेल म्हणून असं लिहायचं... काटा आला अंगावर माझ्या... माहीत नाही.. नीट सांगता येत नाहीये मला पण खूप विचित्र वाटलं मला.
|
ह्याची प्रतिक्रिया म्हणून इतर Asian विद्यार्थ्यांना काही त्रास होऊ नये>>>>> भारत जरी asia मध्ये येत असेल तरी जेव्हा अमेरिकन लोक वा मिडीया asian म्हणतात तेव्हा त्यात भारतीय उपखंडातील लोक (भारत, पाक, श्रिलंका व बांग्ला) लोक नसतात. फक्त मंगोल वंशाचा लोकांना (चिनी, कोरीयन, जापानी, ई) asian म्हणले जाते.
|
Mansmi18
| |
| Wednesday, April 18, 2007 - 4:01 pm: |
| 
|
गेल्या दोन दिवसामधे या हत्याकाण्डाबद्दल बरेच वाचायला बघायला मिळाले. ज्यान्चे प्रियजन यात मारले गेले त्यान्चे काय होत असेल त्याची कल्पनाही करता येणार नाही. जीवन किती क्षणभन्गूर असते हे पुस्तकी वाक्य या क्षणी त्याच्या जहालतेची जाणीव करुन देते. इश्वर म्रुतात्म्यास शान्ती देवो आणि त्यान्च्या प्रियजनाना हा आघात सहन करण्याची शक्ती देवो.
|
Disha013
| |
| Wednesday, April 18, 2007 - 4:28 pm: |
| 
|
घडले ते फ़ार वाईट आणि धक्कादायक होते. बातमी टीव्हीवर बघत असताना काटा आला अंगावर. इतक्या जणांचे प्राण घेवुन त्या मुलाला काय मिळाले असेल?त्याच्यामुळे कितीक जणांचे विश्वच उद्ध्वस्त झाले असेल.
|
मिनल मझ्या आत्ते भावाची जवळची मैत्रिण होती. तिची आई तिला आणि तिच्या NJ येथील बहिणीला भेटायला भारताहुन आली आहे. बिचार्या तिच्या आईवर ह्या माथेफ़िरु मुळे आज काय वेळ आली आहे...सगळेच फ़ार भयंकर आहे...
|
Ajjuka
| |
| Wednesday, April 18, 2007 - 5:18 pm: |
| 
|
केदार, अरे हो की पण. जसं त्यावेळेला मुस्लिम दिसू शकेल अश्या कुणाकडेही संशय जायचा तसं यावेळेला आशियाई असं होऊ नये. एवढच रे.
|
Sunidhee
| |
| Wednesday, April 18, 2007 - 6:26 pm: |
| 
|
भयानक... विचार पण करता येत नाही..
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|