|
मी अत्यन्त नास्तिक माणूस आहे. धर्माच्या दृष्टीने अत्यन्त पाखन्डी आहे. मी सर्वच धर्मांचा आत्यन्तिक राग करतो>> रॊबीन अहो हाही एक धर्मच आहे. उद्वव गितेत कृष्णाने हेच तर सांगीतले आहे जे योग्य आहे ते करने म्हणजेच धर्म. आता काही धर्मानां इतरांनां बाटविने हा धर्म वाटतो ते तो करत आहे तर बाकीच्यानां (जसे आम्ही) तो थांबविने हा धर्म वाटत आहे म्हणुन आम्ही तो करायचा प्रयत्न करत आहोत. माझ्या स्वतः च्या बाबतीत बोलायचे तर मी "फिल्ड" मधील कार्यकर्ता होतो त्यामुळे अनेक अनुभव लिहु शकतो. पण एक देतोच. वनवासी कल्यान आश्रम या सस्थें तर्फे नागालॅंड मध्ये दुर्गम भागात एक हॊस्पीटल चालविले जाते. तेथे नांदेड मधील एक डॊक्टर (पुर्णवेळ कार्यकर्ता) काम करायचा त्याला तेथील ख्रिश्नन क्म्युनिटी कडुन विरोध व्ह्यायला सुरु झाला तो इतका वाढला की त्याला बेदम मार बसला, हे ऐकुन आमच्या पैकी काही भारी कार्यकर्ते तिकडे रवाना झाले व हॊस्पीटल म्ध्ये गस्त घालु लागले व तुरळक मारामार्या झाल्या पण नंतर सर्व व्यवस्तिथ झाले. विरोध का तर त्यांचे देखील एक इस्पीत्ळ तेथे होते व ते मिशनरी हॊस्प्पेटल असल्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ येशु कडे चला असे साकडे घातले जात होते. तर अशा अनेक गोष्टी आहेत तो कार्यकर्ता आता ओरगांबाद च्या हेडगेवार रुग्नालयाचा अनेक प्रमुखांपैकी एक आहे. म्हणुन धर्माची चिड असली तरी आपण त्याचाच एक भाग असल्यामुळे पळुन जाउ शक्त नाही वा दुर्ल्श करु शकत नाहे असे वाटते. मागे लिहिल्याप्रमाने जर सर्व धर्म सारखे असतील तर धर्मांतर करा असे का सांगीतले जाते हा प्रश्न येतो. त्याचे उत्तर आपल्याकडे आहे काय? शिवाय आपली शिकवन ही शिवाजी महाराजां सारखी आहे स्वराज्या कामी येनार प्रत्येक जन म्हहत्वाचा मग मुसल्मान असो की ख्रिश्चन आपल्यासाठी महत्वाचेच. हिच खरी हिंदु धर्माची शिकवन आहे जी महाराजांनी अगिंकारली. आणि हाच हिंदु असन्याचा अभिमान मला आहे. जगा आणि जगु द्दया असे म्हणन्यात गैर काय आहे. निदान भारतात तरी बाकीच्या धर्माकडुन हिच अपे़शा आहे. पण नाही .... केरळ, पुर्वे कडील राज्ये हे आज ख्रिस्च्न होत आहेत. हिंदु मुस्लीम दंगली वेगळ्याच. या सर्वांचा आपल्या सारख्या सामान्य लोकांवर प्र्भाव पडनारच. यामंडळीना त्या इस्लामिक बीबी वर गेल्यावरच काय होते ते कळत नाही>>>> हुडराव अहो तुम्ही पण बघतच आहात की आजुबाजुला. त्याचाच परिनाम.
|
Chyayla
| |
| Saturday, April 07, 2007 - 2:36 am: |
| 
|
मी सर्वच धर्मांचा आत्यन्तिक राग करतो. .. यामंडळीना त्या इस्लामिक बीबी वर गेल्यावरच काय होते ते कळत नाही... रोबिनहुड तुम्ही खरच गम्भीर आहात या विधानावर? इस्लामिकच्या BB वरही त्यान्च्यातले चान्गले व वाईट दोन्ही बाबीन्ची प्रामाणिक पणे चर्चा झालेली आहे. तिकडचा विषयच इस्लामशी सम्बन्धीत होता तेन्व्हा त्यान्च्यातले दोश काढले तर इतके दुख्: का व्हावे? प्रान्जळपणे त्यातलेही मुद्दे मान्य करायचा मोकळेपणा दाखवावा ही अपेक्षा. तुमच्या धर्माचा रागातही आरक्षण आहे की काय... जसे मुस्लिम धर्माचा राग ५०% टक्केच करायचा वैगेरे तरी तुम्हीही स्वता:चे विचार व्यक्त केले त्याचा आनन्द आहे... दीवा घ्यायचा ह. सुनिधी खुपच छान शब्दात विचार मान्डलेस, तुझा मुद्दा खरच कळीचा महत्वाचा आहे... वनवासी कल्याण आश्रम, त्यान्च्या वनवासीन्साठी अनेक आश्रमशाळा, मुलान्चे वसतिग्रुह असे उपक्रम आहेत याशिवाय विहीपचे जे धर्मान्तरीत होउन गेलेत त्यान्चासाठी "घर वापसी" हे अभियान, शाळा व ईतर अनेक सामाजिक प्रकल्प केवळ वनवासी, मागास समाज बान्धवानसाठी आहेत. आज यान्च्या अविरत, व प्रसिद्धी परान्गमुख कार्यामुळे कित्येक लोक घरी परतत आहे व केवळ त्याचसाठी वर मी जे हिन्दुन्मधल्या त्रुटीबद्दल लिहिले त्यासाठी त्यान्चे हिन्दुनाच सहकार्याचे आवाहन आहे. याशिवाय अनेक सेवाभावी सन्स्था हेच कार्य करत आहेत पुढे त्याची माहिती देइल. मी जे विचार मान्डले ते सगळे सन्घ सन्स्कारातुनच आहेत (फ़क्त ईथे सरळ नाव घेतल तर काहीन्ना जळफ़ळाट होतो) त्याना ही लढाई अन्तर्गत व बाह्य दोन्ही आघाडीन्वर लढावी लागतेय. लोकान्ना फ़क्त बाह्य स्वरुप माहित आहे कारण अतिअसहिष्णु व कट्टरतेशी सामना करतना लेचीपेची भुमिका घेउन नाही चालत तिकडे पाहिजे ठकास ठक, व जशास तसे त्यामुळे ईतराना सन्घ म्हणजे काहे तरी भयन्कर अशी भलावण करुन देण्यात येते. वरती जे आत्मतत्व मान्डले त्यातुनच व्यक्ति, समाज, समष्टी, राष्ट्र, मानवता असा प्रवास आपसुकच होतो ही हिन्दुत्वाची मुळ अध्यात्मिक बैठक जी अस्सल स्वदेशी, याच सन्ताच्या भुमीतुन आलेली. व सनातन, वेदकाळान्पासुन चालत आलेला असा सान्स्कृतिक प्रवाह आहे. ह्या अध्यात्मिक बैठकीमुळेच कित्येक लोक सन्घाकडे आक्रुष्ट झालेत. प. पु. गोळवलकर गुरुजी तर पुर्ण अध्यात्मिक वृत्तीचेच, सन्यस्त होते, त्यानी केवळ याच अध्यात्मिक हिन्दुत्वामुळे राष्ट्रीय कार्यात सर्वस्व जीवनाचा होम केला, आज त्यान्चीही पुण्याई आहेच. आज सम्पुर्ण जग कायम युद्धे, आधुनिकतेनी विकृत झालेली जीवनशैली यामुळे अध्यात्माकडे पर्यायने हिन्दुत्वाकडे मोठ्या आशेनी पहात आहे.
|
Chyayla
| |
| Saturday, April 07, 2007 - 2:40 am: |
| 
|
शिवाय आपली शिकवन ही शिवाजी महाराजां सारखी आहे स्वराज्या कामी येनार प्रत्येक जन म्हहत्वाचा मग मुसल्मान असो की ख्रिश्चन आपल्यासाठी महत्वाचेच. हिच खरी हिंदु धर्माची शिकवन आहे जी महाराजांनी अगिंकारली. आणि हाच हिंदु असन्याचा अभिमान मला आहे. जगा आणि जगु द्दया असे म्हणन्यात गैर काय आहे. निदान भारतात तरी बाकीच्या धर्माकडुन हिच अपे़शा आहे. पण नाही .... केदार एकदम पटल बुवा, किती सोप्या शब्दात सान्गितलस... जर पुर्वग्रह काढुन टाकुन, प्रान्जळपणे या गोष्टीन्चा विचार केला तर कोणालाही पटेल.
|
Saavat
| |
| Saturday, April 07, 2007 - 7:42 am: |
| 
|
च्यायला,राॅबीनहूड,झक्की,सुनिधी धन्यवाद! केदार, तुमच्या वाचनातला अजून एकग्रंथ कळाला...उध्दवगीता!वाचून आनंद झाला. राॅबीनहूड, आपण दार्शनिकतत्वज्ञानाचे पुरस्कर्ते आहात काय? >>>धर्म ही संकल्पनाच संकुचित् आहे. झक्की, धर्म ही 'संकल्पना' नाही,तो एक 'प्रगल्भ-विचार' आहे.आणि ह्या 'विचारांना', कल्पनेचा बांध आपण घालतो,म्हणूनच 'धर्म', संकूचित भासायला लागतो.आपल्या कल्पनेच्या बाहेर बर्याच गोष्टी घडत असतात.
|
Gobu
| |
| Saturday, April 07, 2007 - 9:36 am: |
| 
|
आता मुसलमानांच्या मते काफिरांची हत्या करणे हा त्यांचा धर्म. मग त्यांना त्यांच्या धर्माने वागू दे! शेवटी मरते ते शरीर, त्याला पुनर्जन्म आहेच! ख्रिश्चनांच्या धर्मात फक्त ख्रिस्ती लोकांना ' सल्वतिओन ' मिळते, म्हणून उदार बुद्धीने ते इतरांना ख्रिश्चन बनवण्याचा उद्योग करतात. हा त्यांचा धर्मच. तेहि 'ब्रम्ह' च. ज्या धर्मात कट्टरपणा आहे, त्याचा विनाश अटळ आहे हिन्दु धर्मात काही दुर्गुण आहेतही (उदा. जातिभेद) पण याचे श्रेष्ठत्व वादातीत आहे जग म्हणते बुद्ध धर्म शान्तीचा सन्देश देतो, पण हे तत्वज्ञान आले कोठुन? अर्थातच हिन्दु धर्मातुन ना? आणि, एखादा मुर्खपणा करीत असेल तर आपण तो न करणे यालाच शहाणपण म्हणतात, यालाच सभ्यता म्हणतात
|
Mukund
| |
| Saturday, April 07, 2007 - 10:25 am: |
| 
|
सावट.... तुमचे कालचे सकाळचे ६ वाजताचे पोस्ट वाचुन इथे अभिप्राय द्यावासा वाटला.. बरेच वर्षांनी इतके मुद्देसुद व विषयाला अनुसरुन चपखल पोस्ट व्ही ऍंड सी वर वाचायला मिळाले. तुमच्या त्या पोस्टमधील सगळ्या मुद्यांना अनुमोदन.. मीही स्वामी विवेकानंदांच्या अद्वैत विचारसरणीचा साधक असल्यामुळे एवढेच सांगावेसे वाटते की अतिशय सुंदर शब्दात तुमचे विचार मांडले आहेत. Looking forward to read more of your posts... च्यायला.. तुमचे नाव कसेही असो(आय डी!)..पण तुमची सगळी पोस्ट विचारपुर्वक,सखोल,कळकळीची व अभ्यासु असतात. तुमच्या सारख्या माणसांमुळेच मायबोलिवर येणे हा एक चांगला अनुभव असतो... Always looking forward to read your postings too...
|
Zakki
| |
| Saturday, April 07, 2007 - 3:28 pm: |
| 
|
थोडे डोके शांत केल्यावर विचार झाला की जे काही चालले आहे ते सर्व बरोबर नि चांगले आहे. इतके कोटी हिंदू भारतात असताना काही थोड्या लोकांना ख्रिश्चन बनवले तर काय झाले? दंगली निरनिराळ्या कारणांनी होतच असतात. त्या सगळ्या काही मुस्लिम लोक धर्मासाठी करत नाहीत. हिंदू सुद्धा बर्याच खर्या खोट्या कारणांसाठी दंगली घडवून आणतच असतात. पण एकूणच हे प्रकार त्या मानाने कमीच. रोजचे आयुष्य तर सुरळित चालू आहे. जरा डोके शांत ठेवल्यावर कळते. तेंव्हा यापुढे माझ्यापुरते बोलायचे तर इथल्या कुठल्याच चर्चेत भाग घेण्यात अर्थ नाही. माझेपण इथे मस्त चालू आहे. करायच्या काय नसत्या उचापती. मला जे करायचे ते मी करतोच आहे. त्यात इथे येण्याला काही महत्व नाही. तर इथे फक्त इतर BB वर लोकांना भेटायला, कुठलीहि मते मांडायला नाही. चांगला आहे की नाही निर्णय?
|
Soha
| |
| Saturday, April 07, 2007 - 5:22 pm: |
| 
|
काही लोकांना तरी माझे या आधिचे पोस्ट पटले हे बघून माझा धीर थोडा वाढला आहे. खरंतर, जाती-धर्म इ. विषयाबद्दल काही लिहिण्याऐतक माझा अभ्यास नाही आणी त्यामुळे अधिकार नाही. पण इथे सक्तीच्या धर्मांतराबद्दल बरीच चर्चा वाचली. त्यामुळे एक प्रश्न पडला. दुसर्याला धाक दाखवून किंवा त्याच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन धर्मपरिवर्तन घडवून आणणे हे क्रिश्चन किंवा मुसलमान धर्मात अनेकदा घडते. बर्याचदा अनेक लोक केवळ आपली नड भागवण्यासठी ह्या धर्माचा स्वीकार करतात. पण असे धाकधपटशाने धर्म परिवर्तन कधी हिंदु धर्मात घडल्याचे माझ्या तरी ऐकण्यात किंवा पाहण्यात नाही. पण तरीही अनेक पाश्चिमात्य लोक आपल्या धर्माकडे आक्रुष्ट झालेले दिसतात. तेव्हा त्यांचे धर्मपरिवर्तन हे खरे धर्मपरिवर्तन मानले पाहिजे. माणसाचे लक्ष रोजच्या प्रापंचिक घडामोडीतून बाहेर पडून ईश्वराकडे लागावे हेच कोणत्याही धर्मांचे अंतिम उद्दिश्ट असेल तर केवळ गरज भागवण्यासाठी धर्मांतर करणारी लोकं ह्या उद्दीष्टाला कितपत न्याय देऊ शकणार?
|
सोहा ते लोक धर्म परिवर्तन करत नाहीत. अभ्यास करतात. त्यांचा मुळ धर्म हा तोच राहातो. हिंदु धर्मात परत घेन्याचे वा परत हिंदु धर्म स्विकारन्याचे काम पहीला विक्रम व त्याचा नातु शालिवाहन (दोघांचेही शक होते व आज आपण शालीवाहन संव्त्सर प्रमाने हिंदु दिनदर्शीका ठरवतो) यांचा काळात झाले. अनेक जैन व हिंदु राजे त्या आधीच्या काळात काळी बोध्द धर्मीय झाले होते. अशातच बोध्द धर्माचा प्रसार हा चिन व जपान कडे झाल्यामुळे तेथील लोक हे भारता कडे आकर्षीत झाले. त्यांनी भारतावर एक खुप मोठे आक्रमन केले जे शालीवाहनाने परतवुन लावले. (त्या आधी २०० वर्षे ही प्रकीर्या चालु होती) पण १० लाखाच्या चिनी सैन्याला शालीवाहनाच्या हिंदु सैन्याने हारविल्या मुळे व पर्त एकदा अनेक वर्षांनतर एक हिंदु सम्राट झाल्यामुळे अनेक जन ज्यांनी बोध्द धर्म स्विकारला होता ते परत हिंदु झाले वा तिबेट कडे पळुन गेले. राजाश्रय परत हिंदु धर्माला लाभला. त्यांनतर फक्त शिवाजी महाराजांनी नेताजीला परत हिंदु धर्मात घेतले. ( परत एकदा स्तिथी शालीवाहना सारखीच होती व त्यांनी ही आपली दिन दर्शीका स्थापन केली). ताक मी बोध्द धर्माविरुध्द लिहीत नाही तर फक्त सत्य परिस्थीत वर्णन करत आहे. बोध्द धर्माचा उदय व अस्त यावर अनेक पुस्तक उपलब्ध आहेत त्यातुन वरील माहीती मिळाली व ती सत्य आहे याची मी खात्री देतो नाहीतर उगीच परत बोध्द व हिंदु धुमाकुळ चालु व्हायचा. ही माहीती आपण हिंदु धर्म व धर्मांतर यावर चर्चा करत असल्यामुळे लिहावी वाटली. माणसाचे लक्ष रोजच्या प्रापंचिक घडामोडीतून बाहेर पडून ईश्वराकडे लागावे हेच कोणत्याही धर्मांचे अंतिम उद्दिश्ट असेल तर केवळ गरज भागवण्यासाठी धर्मांतर करणारी लोकं ह्या उद्दीष्टाला कितपत न्याय देऊ शकणार >>> अस म्हणतात की कन्वर्ट झालेला माणुस जास्त कडवट होतो. तेथेच त्यांचे उदीष्ट साध्य होते. प्रश्न राहीला ग्रेटर गुड चा. स्वतच्या (मोक्ष, असेल तर) व समाजाच्या (संस्कृती) . त्या कडे कोण लक्ष देतोय. आजचा गेम उरकला की झाले. हिंदु धर्मानेही तेच केले फरक हा होता की त्यांनी कोणावर आक्रमन करुन धर्म बदलायला सांगीतले नाही पण या जैन, बोध्द, नी परत हिंदु च्या जडनघडनीत जे लोक बोध्द्च राहीले त्यांची हिंदुनी उपेक्षा केली. ( कदाचीत आधीचा राग काढन्यासाठी, कारण बोध्द धर्मामध्ये पण सुरुवातीला बळजबरीने कन्वर्ट केले गेले). तर या होरपळीत आपण कर्मकांडाच्या जास्त मागे लागलो. कदाचीत कर्मकांड आपण पलायन साठी स्विकारला व तोच नंतर सुरु राहीले पण आजची कुंठा निर्मान झाली. पण या सर्व जडनघडनीत हिंदु धर्माने वा धर्मीयांनी कधीही हल्ला चढवुन ईतर धर्मीयांना हिंदु धर्मात धर्मातंरीत केले नाही. आणि म्हणुन कदाचीत आपण त्यांचापेक्षा या बाबतीत वेगळे असु.
|
Soha
| |
| Sunday, April 08, 2007 - 3:33 am: |
| 
|
पाश्चिमात्य लोकांचा मुळ धर्म तोच रहातो कारण हिन्दु धर्मात पर्धर्मीयांना सामावून घेण्याची पद्धत नीटशी विकसीत झालेली नाही असे मला वटते. हिंदु धर्माकडे आक्रुष्ट झालेले असे अनेक लोक हिंदु धर्मतत्वांनी भारावून जतात. आपल्या धर्मातील अनेक प्रथा परंपरांचे कसोशीने पालन करतात. ते फक्त formally धर्म परिवर्तन करत नाहीत.
|
Saavat
| |
| Sunday, April 08, 2007 - 9:15 am: |
| 
|
मुकुंद, धन्यवाद. धर्म आणि त्याच्या मागचे तत्त्वज्ञान अभ्यासताना, आपण एक गोष्ट कायम लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे ‘तत्त्वज्ञान’ हा एक ‘प्रगल्भ सुसंगत विचार’ असल्यामूळे , ‘विचार’ हा ‘विचारांने-अभ्यासाने-ध्यासाने-चिंतनाने-अनुभवाने-विवेकाने’ च जाणने शक्य आहे. हा मूळ ‘तत्त्वविचार’ जाणला, पण त्याचे जर आपल्या रोजच्या धकाधकीच्या जिवनात, अवलंब नाही केला गेला, तर Theory ही थिअरीच राहते. स्वत:च्या सर्वांगी उन्नती करता,पर्यायाने समाजाकरता, त्याचा Practical वापर करण-होण, हे सगळ्यात जरूरी असते. ‘माणूस’ जिवंत आहे, तर सगळ आहे, किंबहूना’मनुष्य’ हा central मानूनच, सगळ्या universe ची निर्मीती झाली, हे त्यातले ‘एकमेव सत्य’ आहे. वेगळ्या शब्दात सांगायचे तर, ‘देवाच देवपण’ जाणने हे ‘मनुष्य’ जन्मातच शक्य आहे. त्यामूळे मनुष्य जर नाही, तर देवही नाही(त्याची जरूरी नाही) किंवा देवाला,देव म्हणनार कोण? ह्या विचारा मागचा मूळ विचार कायम जागृत ठेवला पाहीजे. मागे ‘च्यायला’ यांनी सांगितल्याप्रमाणे, 'भुकेल्या माणसाची, भुक अगोदर पुर्ण होणे महत्त्वाचे’ कारण त्याशिवाय त्याच्या डोक्यात ‘तत्त्वविचार’ घुसने दुरापास्त असते, त्याचा रोजच्या जिवनात वापर ही महत्त्वाची गोष्ट फ़ारच दूर रहाते. आता ‘ही भुक’ फ़क्त अन्नाचीच असते असे अजिबात नाही, तर इतर अनेक गोष्टींची असते. फ़क्त हया इतर गोष्टिपण ‘तत्त्वज्ञानाच्या’ अनुषंगाने ‘भुक’ च आहेत, हे स्वत:लाच कळले पाहीजे. त्यात चूक-बरोबर, मीच शहाणा-तू मुर्ख, असा भाग अजिबात नसतो, पण ती ‘भुक’ शमल्याशिवाय, पुढची ‘महत्त्वाची भूक’ लागत नाही, हेही तेवढेच ‘सत्य’ आहे. उदाहरणच द्यायचे झालेतर, आपण आपल्या रोजच्या जिवनात पहातोच, कोणी राजकारणावर, कोणी समाजकारणावर,कोणी खाण्या-पिण्यावर, कोणी मनोरंजनावर, कोणी प्रवासावर, तर कोणी पुस्तकावर, कोणी स्वत:वर,तर कोणी इतर कशाकशावर तासनतास गप्पा मारत असतो. तरिही ही भुक चालूच असते हे विशेष आणि त्याला, ही पण ‘भुकच’ आहे या गोष्टीचा पत्ता पण नसतो. याच भुकेला , ‘तत्त्वज्ञानात’, ‘वासना’ असे म्हणतात. प्रत्येक ‘वासना’ ह्या चांगल्या,वाईट दोन्ही असू शकतात. त्यानुसार लौकिकदृष्टिने सज्जन-दुर्जन असे स्वतंत्र विभाग पडतात, त्याचबरोबर या वासनांची सरमिसळही असते. त्यानुसार परत लौकिकदृष्टिने सात्विक, राजस आणि तामस अशा त्रिगुणामध्ये ती व्यक्ती विभागली जाते. मग अशी ही व्यक्ती,आयुष्यभर आपल्या स्व:निर्मित-तत्वावर अहंभावाने चालते. अनुभवजन्य परिस्थितीनुसार, सुख-दु:खानुसार त्या व्यक्तीची ही स्व:निर्मिततत्त्वे ही बदलतात. ‘दुध पोळल्यावर, ताकपण फ़ुंकून पिल जात’ ह्या न्यायाने ती व्यक्ती स्व:तत्त्वाबाबत दुराग्रही असण्याचा संभवही असतो, त्याचबरोबर ‘विवेकाने-विचाराने’ जाऊन ‘अनुभवजन्यसत्य’ खुल्या मनाने माननाराही असतो. आता अशा ह्या ‘व्यक्तीरुपी’ प्रकृतीकडे हिंदूवैदिकधर्मतत्त्वज्ञानानुसार , अलौकिकदृष्टीने पाहीले असता, नाण्याची दुसरी बाजू दिसते. हे तत्त्वज्ञान व्यक्तिकडे ‘प्रकृतिच्या’ दृष्टीकोणातून पहाते. म्हणजेच ‘प्रकृतिरुपी’ व्यक्ती ही नाण्याची व्यक्त ‘अभिव्यक्ति’ असते, तर ‘निवृत्ती’ ही त्याच नाण्याची दुसरी अव्यक्तबाजू असते.वैदिकतत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहील तर, तर ‘व्यक्ति तितक्या प्रकृति’ हे सत्य असतच, परंतू ‘तिच विविध दिसणारी-भासणारी प्रकृती ही सारख्याच ‘पंचमहाभूतापासून’ बनलेली असते’ हेही तेवढेच ‘सत्य’ असते. फ़क्त मनुष्यप्राण्याकडेच, जर पहायच ठरविल तर, ‘मनुष्य’ हा पंच महाभूते,पंचज्ञानेंद्रिये,पंचकर्मेंद्रिये, ही साध्या डोळ्यांना दिसणारी आणि अकराव महत्त्वाच, साध्या डोळ्याला न दिसनार इंद्रिय म्हणजे ‘मन’, या सगळ्याच अजब मिश्रण असते. यातील मन हे साध्या डोळ्याना दिसत नाही,जाणता येत नाही, म्हणुनच हिंदूवैदिकतत्त्वज्ञानात या मनाला ‘अनन्यसाधारण’ महत्त्व दिले गेले आहे.
|
IPO मध्ये पैसा गोळा करता येतो म्हणुन मुंबै विद्यापिठाचे लिस्टींग? http://www.loksatta.com/daily/20070409/nav01.htm
|
Farend
| |
| Tuesday, April 10, 2007 - 6:41 pm: |
| 
|
A car that can earn a parking space in history along side Ford's model T. फोर्ब्स मधे टाटा मोटर्स च्या आगामी People's Car बद्दल
|
Peshawa
| |
| Wednesday, April 11, 2007 - 7:11 am: |
| 
|
the mughals! http://video.google.com/videoplay?docid=-1137088286491088052&q=india&hl=en enjoy
|
Peshawa
| |
| Wednesday, April 11, 2007 - 7:19 pm: |
| 
|
another one read on http://www.historyofjihad.org/india.html
|
It was the Marathas who presaged President Bush when he said “We will hunt down our enemies” The Marathas literally hunted down the Muslims. पेशवे. जबरदस्त लिंक दिली. धन्यवाद.
|
Mandarp
| |
| Friday, April 13, 2007 - 8:22 am: |
| 
|
पेशवा, २ ही लिन्क एकदम जबरदस्त. खूप ज्ञान मिळाले. धन्यवाद, मंदार
|
Mandard
| |
| Friday, April 13, 2007 - 8:41 am: |
| 
|
पेशवा लिंक चांगली आहे. पण त्यातील पानिपतचा संदर्भ चुकीचा वाटतो. पानिपत हा फ़क्त हिन्दु मुस्लिम संघर्ष नव्हता. मराठ्यांचा तोफ़खाना प्रमुख इब्राहिम खान गारदी होता. त्याने जवळजवळ जिंकत आणलेले युद्ध विंचुरकरांसारख्या सरदारांच्या मुर्खपणामुळे हारले. असो तसेच सुरजमल जाट पण स्वार्थी होता. त्याने पण मराठ्यांचा घात केला. उत्तरेतील एकाही हिंदु राजाने मराठ्यांची मदत केली नाही. उलट रजपुतांनी तर अब्दालीला निमंत्रण पाठवले होते मराठ्यांना हरवायला. असो उगीच विषयांतर झाले.
|
Mandard
| |
| Friday, April 13, 2007 - 8:49 am: |
| 
|
परवा भोपाळच्या एका मुलाने मुस्लिम धर्म सोडुन हिन्दु धर्म स्विकारला हिन्दु मुलीशी लग्न करण्यासाठी त्याला पन बजरन्गदलाचा विरोध आहे. खरेतर त्यांनी ह्याला पाठिंबा दिला पाहिजे. आणि वरुन तेथिल सिंधी समाज त्यांच्या मुलींवर निर्बन्ध घालणार आहे. (आजच्या सकाळमधील बातमी).
|
Giriraj
| |
| Friday, April 13, 2007 - 10:26 am: |
| 
|
त्या साईटवर जे आहे ते ख्रिश्चन धर्माच्या अनुशंगाने पाहिलेला इस्लाम आहे. बरेच संदर्भ तसेच आहेत. १८५७ बद्दलही तेच आहे आणि इंग्रजांनी भारतावर सत्ता करन्यालाही त्यांचा पाठींबा आहे.१८५७ ला धर्मयुद्धाचे स्वरुप नव्हतेच.तो इंग्रजांविरुद्धचा लढा होता हे ते मान्य करायला तयार नाहीत असे दिसले.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|