Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 12, 2007

Hitguj » Views and Comments » General » Cricket » Archive through April 12, 2007 « Previous Next »

Farend
Tuesday, April 10, 2007 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि थोडे त्याच्या खेळाबद्दल ही...

हे जरा जास्त वाटेल, पण मला वाटते खेळाडू म्हणून सर्वोच्च वैयक्तिक पारितोषिक भारतातर्फे रवी शास्त्रीने मिळविले आहे... WSC '85 मधे Man of the series . वरती सतिश ने म्हंटलेले खरे आहे, तो काही फार वेगवान खेळला नाही एकाही सामन्यांत, पण ज्या स्पर्धेमधे त्यावेळचे सर्व संघ जवळजवळ पूर्ण ताकदीने उतरले होते त्या स्पर्धेत त्याने ते मिळवले होते आणि त्याला महत्त्व आहे. त्याला वेगवान खेळाची गरजच पडली नाही, त्याचा 'रोल' तो नव्हता. एकतर भारताला फार जास्त धावा कधी कराव्या लागल्या नाहीत आणि काही सामन्यांमधे श्रीकांत ने ते काम केलेच. पुन्हा जेथे 'आपले' गोलंदाज इतरांना साधारण २०० मधे गुंडाळत होते तेथे फलंदाजी जरा अवघड असणारच. (मी दूरदर्शन वर दाखविलेले त्यातील सर्व सामने बघितले आहेत पण तेव्हा एव्हढे कळत नव्हते, पण स्विंग खूप चांगला होता बहुतेक). एरव्ही गोलंदाजांना मदत करणार्‍या खेळपट्ट्यांवर आपल्या लोकांनी लहान स्कोर चेस करत असताना सुद्धा अचाट दिवे लावलेले आहेत. यात हे मान्य की न्यू झीलंड च्या मॅच मधे शास्त्री पेक्षा कपील जास्त लायक होता Man of the match ला. पण तेव्हा बर्‍याच मॅच मधे जास्त धावा करणार्‍यांना ते मिळत (जसे World Cup '83 च्या सेमी फायनल ला संदीप पाटील ला न देता मोहिंदर अमरनाथ ला दिला होता).

एकूण मला वाटते तो सलामीला खूप स्लो खेळायचा, पण ६ किंवा ७ क्रमांकावर (बहुतेक वेळा कपील नंतर) आला की खूप चांगला खेळायचा). इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज मधील कसोटी शतके, आणि एकदा पाकिस्तानात (फॉलो ऑन नंतर) अम्पायर खोटे LBW देतील म्हणून दिवसभर मोहिंदर बरोबर चेंडू पायावर न घेता खेळून
वाचवलेला सामना (ऐकलेली हकीकत अशी आहे की असिफ़ इक़्बाल ने त्यांना टीप दिली होती) या जमेच्या बाजू होत्या.

मोहिंदर चे '८३ मधले सेमी आणि फायनल चे मॅन ऑफ द मॅच (जरी फक्त फायनलचाच 'खरा' होता), शास्त्री चे '८५ मधले मॅन ऑफ द सिरीज आणि सचिन चे '०३ मधले मॅन ऑफ द सिरीज हे मला वाटते आपल्या खेळाडूंनी परदेशात मिळवलेले (वन डे मधे) सर्वात मोठे सन्मान आहेत (वैयक्तिक). यात माझ्या मते शास्त्रीचे काकणभर सरसच असेल.

Nanya
Tuesday, April 10, 2007 - 9:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>मोहिंदर चे '८३ मधले सेमी आणि फायनल चे मॅन ऑफ द मॅच (जरी फक्त फायनलचाच 'खरा' होता), शास्त्री चे '८५ मधले मॅन ऑफ द सिरीज आणि सचिन चे '०३ मधले मॅन ऑफ द सिरीज हे मला वाटते आपल्या खेळाडूंनी परदेशात मिळवलेले (वन डे मधे) सर्वात मोठे सन्मान आहेत (वैयक्तिक). यात माझ्या मते शास्त्रीचे काकणभर सरसच असेल.

शास्त्रीचे का सरस असेल ते नाही कळाले.. माझ्यामते सचीनचे WC 2003 मधले award हे त्याच्या consistency साठी जास्त महत्वाचे आहेत. ( batting track असले तरी.)
पण माझ्यामते शास्त्रीला manager cum coach केले ही इतकी चर्चा करण्यासारखी news नव्हती. पुन्हा एकदा media ने त्यांचा डाव खेळला. आता जर indian team बांगलादेशमध्ये अयशस्वी झाली, तर पुन्हा media दंगा करायला तयार. आणि यशस्वी झाली तरी लगेच "रवी शास्त्री ने दिखाया कमाल" वगैरे news येइल. माझ्यामते जोपर्यंत domestic cricket ची level उंचावत नाही, तोपर्यंत शास्त्री असुदे अथवा chappel, results असेच vary होत राहणार. आपले winning percentage ५०% च्या आसपास च राहणार. कदाचीत खाली देखिल येइल जर आपण foregin contries मध्ये जास्त matches खेळलो.


Asami
Tuesday, April 10, 2007 - 9:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु म्हणतोयस तसा शास्त्री ग्रेट असेलही. (निदान Stat तरी तसे सिद्ध करत नाही. he was a avg. player )
>>नाही रे केदार I never claimed this. He has certain characteristics which I think are very interesting and would benefit to any player. You are dismissing his utility value based upon purely his stats and I found it quite incorrect. ह्या angle मधे माझे post परत बघ.

As far as stats goes, I do not think one can read too much into it beyond certain point. You can find tons of articles on cricinfo about sachin 's so called failures in crucial matches . Albait, by yardstick of stats, Shastri is quite right demanding Sachin should step down in that case. Won't you agree ? :-)

BTW, can you please provide link for Shastri's comment ? I seemed to have missed it

Check out this
link which illustrates why I call him street smart.


Kedarjoshi
Tuesday, April 10, 2007 - 9:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे नाही. मला फक्त त्याने सचिन जावा असे म्हण्ल्या मुळे राग आला. बाकी काही नाही.

I am not dismissing his utility value based upon purely his stats. Off course TEAM India will be winning all matches against B'desh and we will forget all these things once again. And Shastri or for that matter anybody, will be again our Guruji.

Asami
Tuesday, April 10, 2007 - 9:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

what is quite amazing in all hoopala, why is no one has questioned Ganguly's performance ? People seem to be obsessed with Sachin's failures. In all fairness he did not occupied crease for a long. :-)

Why Yuvraj? when Dravid was responsible for his run out against SL .



Kedarjoshi
Tuesday, April 10, 2007 - 9:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.cricketworldcuplatest.com/news/ravi-shastri-tells-sachin-tendulkar-to-enjoy-crick-111061.html

This One and I could not find the original which I read with title saying Sachin should step down.

Kedarjoshi
Tuesday, April 10, 2007 - 9:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

what is quite amazing in all hoopala, is no one has questioned Ganguly's performance >

Yes nobody seems talking about him
बाग्ला सोबत खेळताना त्याने जोशात येऊन विकेट फेकली n that was turning point त्याचा स्ट्राईक रेट सगळ्या matches मध्ये कमी होता.

शनिवार ची RSA vs B'desh पाहीली का? same tactics of slow bollowing आपल्या बॉलर्स ला पिच कळले नाहीत वा ते adaptive राहीले नाहीत.


Farend
Wednesday, April 11, 2007 - 12:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला शास्त्रीचे सरस वाटते कारण तो फायनल ला आणि त्यातही चेस करत असताना चांगला खेळला.

मी असे आधी वाचले होते की भारतात वर्ल्ड कप च्या आधी ज्या वन डे झाल्या त्या आधी वेस्ट इंडीज मधे व्हाव्यात अशी त्यांच्या बोर्डाची विनंती होती, पण मग BCCI ला काहीच मिळाले नसते त्यातून, म्हणून ते भारतात घेतले. आणि स्लो पिचेस वर विंडीज आणि लंकेविरुद्ध सराव करण्याचा चान्स घालवला. दुसरे असे की बर्‍याच लोकांना (खेळाडूंना सुद्धा) असे वाटत होते की वर्ल्ड कप ला भरपूर धावांचे सामने होण्यासाठी भारतातल्या सारख्या विकेट्स बनवतील. तसे झाले नाही. अर्थात भारत लंकेकडून हरला ते पिच काही स्लो वगैरे नव्हते.


Ram3
Wednesday, April 11, 2007 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सुध्हा सचिन तेन्दुलकरचा चाहता आहे. पन मला वाटते त्याला तसेच गान्गुलीलापन वगळावे.

Satishmadhekar
Wednesday, April 11, 2007 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२००७ चा विश्वचषक हा आतापर्यंतचा सर्वात कंटाळवाणा म्हणून ओळखला जाईल. आतापर्यंत झालेल्या ४० सामन्यांपैकी श्रीलंका-दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका-इंग्लंड हे २ सामने वगळता उरलेले ३८ सामने अतिशय एकतर्फी आणि कंटाळवाणे झाले. श्रीलंका-दक्षिण आफ्रिकाचा सामना सुद्धा मलिंगाने लागोपाठ ४ बळी घेतल्यावर शेवटच्या ३-४ षटकामध्ये रंगतदार झाला.

कालच्या सामन्यात लाराचे बहुतेक डोकं फिरलं असावं. पहिली फलंदाजी करून ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेने अनुक्रमे ३२२ आणि ३०३ धावा केल्या होता आणि वेस्ट इंडिजला ती धावसंख्या यशस्वीपणे पार करता आली नव्हती. हा इतिहास असून सुद्धा त्याने काल नाणेफेक जिंकून आफ्रिकेला फलंदाजी दिली आणि ३५६ धावांचे आव्हान अंगावर घेतले. ४५ व्या षटकात शेवटचा पॉवर प्ले घेण्याचा निर्णय अतिशय मूर्खपणाचा होता. त्या ५ षटकात आफ्रिकेने ७७ धावा केल्या. एकंदरीत बहुतेक सामने खूपच एकतर्फी होत आहेत.


Gobu
Wednesday, April 11, 2007 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़रेन्द,
काय छान लिहीतोस रे!
सुन्दर!

एकदम मान्य!


Zakki
Wednesday, April 11, 2007 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

३७.२ षटकात बांगला देश सर्व बाद १४३. आणि इंग्लंड चार षटकात १ बाद ८! गोलंदाजांना भलतेच अनुकूल दिसते आहे हे मैदान! इंग्लंड हरणार की काय, पुन:?

Farend
Wednesday, April 11, 2007 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि विंडीज ला अजून
थोडा चान्स आहे ना? लारा आत्ताच निरवानिरवीची भाषा का करतोय कोणास ठाउक :-) त्यालाच भरवसा नाही बहुतेक बांगला आणि इंग्लंड विरुद्ध जिंकण्याचा.

Zakki
Wednesday, April 11, 2007 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या बांगलादेश च्या खेळाडूंनी काय खाल्ले, नि काय प्यायले आहेत? इंग्लंड ११६ सहा बाद! २९ पेक्षा जास्त धावा कुणिही करू शकले नाहीत!

Deepanjali
Wednesday, April 11, 2007 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या बांगलादेश च्या खेळाडूंनी काय खाल्ले, नि काय प्यायले आहेत? इंग्लंड ११६ सहा बाद! २९ पेक्षा जास्त धावा कुणिही करू शकले नाहीत!
<<<<जे ' थकेले ' भारतीय खेळाडू पीत नाहीत तेच !

Zakki
Wednesday, April 11, 2007 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जिंकले एकदाचे इंग्लंडवाले! हुश्श म्हणले असतील! शेवटपर्यंत बांगलादेश लढत होते. शेवटच्या दोन चौकारापैकी पहिला असा तसाच होता! तो निक्सन करायला गेला एक नि झाले भलतेच. पण चार धावा तर मिळाल्या! अखेरचा मात्र नीट मारला चौकार नि जिंकले एकदाचे.

आता कुणितरी जाणकारांनी लिहावे की कोणते देश जवळपास गळले नि कुठले उरले?


Satishmadhekar
Thursday, April 12, 2007 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऑस्ट्रेलियाचे एकूण ८ गुण असून त्यांचे अजून न्यूझीलंड, श्रीलंका आणि आयर्लंड विरूद्धचे सामने शिल्लक आहेत. ते बहुतेक उर्वरित सर्व सामने जिंकून १४ गुण मिळवतील आणि पहिल्या क्रमांकावर राहतील.

न्यूझीलंड चे एकूण ८ गुण असून त्यांचे अजून ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज विरूद्धचे सामने शिल्लक आहेत. ते २ सामने जिंकून १२ गुण मिळवतील आणि दुसर्‍या क्रमांकावर राहतील.

दक्षिण आफ्रिकेचे एकूण ६ गुण असून त्यांचे अजून न्यूझीलंड आणि इ.ग्लंड विरूद्धचे सामने शिल्लक आहेत. ते १ सामना जिंकून ८ गुण मिळवतील आणि तिसर्‍या क्रमांकावर राहतील.

श्रीलंकेचे एकूण ६ गुण असून त्यांचे अजून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आयर्लंड विरूद्धचे सामने शिल्लक आहेत. ते १ सामना जिंकून ८ गुण मिळवतील आणि चौथ्या क्रमांकावर राहतील.

इंग्लंड चे एकूण ४ गुण असून त्यांचे अजून दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरूद्धचे सामने शिल्लक आहेत. ते १ सामना जिंकून ६ गुण मिळवतील आणि बाहेर पडतील.

वेस्ट इंडिज जर त्यांचे उरलेले इंग्लंड आणि बांगलादेश विरूद्धचे सामने जिंकू शकला तर त्यांना अंधुकशी संधी आहे. त्याचप्रमाणे जर इंग्लंड उरलेले दोनही सामने जिंकू शकला तर त्यांना देखील संधी आहे.

यापैकी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया चा उपांत्य फेरीतला प्रवेश नक्की आहे. एकंदरीत सर्व शक्यता पाहता, बहुतेक दक्षिण आफ्रिका आणि श्रीलन्का हे अनुक्रमे ३रे आणि ४थे संघ असतील असे वाटते. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात बहुतेक अंतिम फेरीची लढत होईल.




Farend
Thursday, April 12, 2007 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे द आफ्रिका, लंका, विंडीज किंवा इंग्लंड यापैकी कोणीही दोन अजूनही येउ शकतात असे दिसते. पूर्वी असे दिसले होते की आधी खूप चांगले खेळलेले काही संघ कोठेतरी एकदम ढेपाळतात ( India and Pak in '87, NZ in '92, RSA in '99 etc ) आणि काही एकदम खेळ उंचावतात ( Aus most of the times, Pak in '92 and '99, India in '83 and '03 etc ). एकूण Super 8 च्या दृष्टीने 'चार ज़िंदगी और चार मौत बंद है, देखे किसे क्या मिलता है' :-)

Satishmadhekar
Thursday, April 12, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवि शास्त्रीची १९८५ बेन्सन ऍंड हेजेस चषकातल्या पाच सामन्यातली फलंदाजी
२(५ चेंडूत), १३(३८), ५१(९४), ५३(८४) आणि ६३(१४८)
एकूण १८२ धावा ३६७ चेंडूत (धावांचा वेग ४९.५९ प्रत्येक १०० चेंडूंमागे)

कारकीर्दितला एक दिवसीय सामन्यांतला धावांचा वेग: ६१.०७ धावा प्रत्येक १०० चेंडूंमागे

१९९२ च्या विश्वचषकामध्ये तो फक्त दोनच सामने खेळला: ५७(११२) आणि २५(६७)

अखेरच्या कसोटी मालिकेतली कामगिरी
१४(८१), ७(४८), २३(१३९), १०(७६), ५(६८)

अखेरच्या एक दिवसीय मालिकेतली कामगिरी
२७(१६), १७(३२), २१(१८), ५(६)






Zakki
Thursday, April 12, 2007 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिश नि फ़रेंद, धन्यवाद! आता काही दिवसांनी, म्हणजे २४ एप्रिल ला लागेलच सगळ्याचा निकाल, नाही का?

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators