Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 07, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » Sports » Archive through April 07, 2007 « Previous Next »

Mukund
Thursday, January 18, 2007 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्थात भारताला स्वार्थी तर स्वार्थी निदान खेळ तरी असे म्हणायची वेळ आलेली आहे फलंदाजांना

अमोल... :-)

बेव्हन हा ६ किंवा ७ नंबरवर खेळायला यायचा... स्वार्थी म्हणुन नाही तर त्याच्या फ़िटनेसच्या अभावी त्याला काढुन टाकले होते असे मला वाटते. त्याचे running between wicket अफ़लातुन होते...

अरे हो.. आणी काल मी लॅंगर बद्दल विसरुनच गेलो. पण मार्क टेलर, हेडन,स्लेटर आणी लॅंगर या आघाडीच्या खेळाडुंच्या चौकडीचा ऑस्ट्रेलियाच्या डायनेस्टीला आज इथपर्यंत आणण्यात वॉर्न, मेक्ग्राथ व पॉंटींग इतकाच सिंहाचा वाटा आहे हे निश्चितच!आणी गिलख्रिस्ट ला विसरुन कसे चालेल... त्याच्याबद्दल एक वेगळेच पोस्ट लिहायला लागेल....

आपल्या फलंदाजांमधे सध्या एक प्रकारची मरगळ आणी निरुत्साह दिसुन येत आहे. आणी त्यांची
body language ती सुद्धा एकदम आत्मविश्वास नसल्यासारखी वाटते आजकाल. जास्त क्रिकेट खेळल्यामुळे असे झाले की तेंडुलकरही आता ३४-३५ चा झाला म्हणुनही असेल. तुमचे माहीत नाही पण माझे लहानपण गावस्कर आणी रिचर्ड्स ला बघण्यात गेल. गावस्करची body language कधीच... अगदी शेवटची बेंगलोरची टेस्ट खेळेपर्‍यंत..आत्मविश्वास गमावलेली वाटली नाही. आणी रिचर्ड्स बद्दल तर काय सांगावे... ते त्याचे छाती पुढे करुन chewing gum खात खात क्रिज़ वर येताना पाहुनच बोलर्स बहुतेक लाइन आणी लेंग्थ विसरुन जात असावेत... :-)

तेच तेंडुलकरकडे आजकाल पाहिले तर नेहमी नखे खात बसलेला दिसतो. त्याचा १९९८ मधे शारजाह मधे ऑस्ट्रेलियाबरोबर जो अंदाज आणी body language होती ती आजकाल दिसुन येत नाही. अगदी गेल्या वर्ल्ड कप मधे सुद्धा तो आत्मविश्वासाने खेळत होता... पाकीस्तान बरोबर सेंचुरिअन ला केलेल्या ९८ रन्स आठ्वत असतीलच सगळ्यांना... तो तेंडुलकर आज कुठेतरी हरवलेला वाटतो.ती खेळी आणी साउथ आफ़्रीके बरोबरच्या तिसर्‍या टेस्ट मधल्या दुसर्‍या डावातला तेंडुलकर.....कोण म्हणेल की त्या खेळ्या खेळणारा एकच खेळाडु आहे... guy managed to loose the test match for India singlehandedly by virtue of his dreadful inning that afternoon... खर म्हणजे १९९२ ते १९९९ दरम्यानचा त्याचा दरारा त्याला तसाच कायम ठेवता आला असता तर किती बरे झाले असते....

आणी लक्ष्मण... त्याच्या नजाकतीबद्दल आणी शैलीबद्दल प्रश्नच नाही... पण एवढेही खरे की तो केव्हाही आउट होईल असेच वाटते...

सेहवाग आणी गांगुली हे दोनच काय ते आपल्या टिममधे
swagger असणारे खेळाडु होते... पण गेल्या १ वर्षात सेहवाग इतका अधोगतीला गेला की आज तो तोच सेहवाग आहे का अशी शंका येते.. आणी ग्रेग चॅपेल आणी गांगुलीच्या सागात.. गांगुलीही होत्याचा नव्हता झाला..

ही अशी सगळी परीस्थिती आहे आणी वर्ल्ड कप २ महिन्यावर येउन ठेपला आहे..

त्यातल्या त्यात एक आनंदाची गोष्ट म्हनजे श्रीसंथ.... त्यात मात्र जिद्द दिसुन येते...
I hope he can brush some of his swagger to others in the Indian team....

आणी हा उथाप्पा..... अजुन एक आपल्या बोळीत वाघ आणी बाहेर शेळी असाच निघाला नाही म्हणजे मिळवली...आणी हो..या गंभीरला किती संध्या देणार? the guy is a failure time and again....

पाहुयात काय होते ते २ महिन्यात...घोडा मैदान जवळच आहे...

महागुरु... तु काय सानिया फ़ायनल पर्यंत जाण्याची स्वप्न बघत होतास काय
:-)

By the way.... काल सॅंप्रासला हॉल ऑफ़ फ़ेम साठी निवडले. पण माझ्या मते फ़ेडररचा गेम हा सॅंप्रास पेक्षा सरस आणी संपुर्ण आहे. प्रत्येक शॉट ला तो नेहमी कोर्टवर नेमक्या ठिकाणी उभा असतो.टायगर वुड आणी रॉजर फ़ेडरर ह्या दोन अजरामर होणार असलेल्या खेळाडुंची कारकिर्द्र आपल्या डोळ्यासमोर उलगडतानाचे सौभाग्य आपल्याला लाभत आहे. आजपासुन ३०-४० वर्षांनी आपण सांगु शकु की आम्ही त्या दोघांना खेळताना पाहीले होते...(आणी ९० च्या दशकात geniusमायकेल जॉर्डन ला!) अशा २ न भुतो न भविष्यती खेळाडुंची कारकिर्द्र समांतर चालली असणे हे असे परत कधी पुढे होइल हे सांगता येणार नाही.... दोघांच्या कौशल्याबद्दल लिहिण्यासाठी शब्द सापडणे कठीण आहे... मी रॉड लेव्हर किंवा जॅक निकलसला पाहिले नाही but I think these 2 are the best ever... in their respective sports.....

Kedarjoshi
Monday, January 22, 2007 - 12:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल रात्री कोणी गांगुली, धोनी, द्रविड ची धुलाई बघीतली का?. शेवटी असे वाटत होते की फार फार तर २८० ते २८५ वर जातील पण मग धोनी ने फिरसे धो डाला.
त्याची खेळी (सिक्सेस) बघने म्हणजे केवळ आनंद, एक गेला की लगेच दुसरा. सोबत द्रविड पण काही कमी नाही. कदाचीत त्याची ही सर्वोतम ईनिंग आहे ही. (गांगुली, द्रवीड वल्डकप पार्टनरशिप नंतर).

एकढे करुन ही फक्त १४ रन चा डिफरंस. आगे क्या होगा?


Chyayla
Monday, January 22, 2007 - 1:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुन्द तुम्ही एखाद्या क्रिडा पत्रकार समिक्षक याच्या तोडीचे लिहिले आहेत. अभिनन्दन... वाचुन मजा आली.

कालची खेळी तर कुणाला पहाता आली नाही, प्रसारणाचे वान्धे होते सगळे. पण नागपुरच्या छोट्या मैदानावर नेहमीच धावान्चा डोन्गर तयार होतो.


Mandard
Monday, January 22, 2007 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I have CAS so I managed to watch yesterdays's match. If AUS/SA was there in place of WI surely we would have lost the match. Yes Kedar you are right 'Age kya hoga'. May be in 2011 world cup India may require to play qualifying rounds.

Vinaydesai
Monday, January 22, 2007 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'भला उसकी धुलाई मेरी धुलाईसे सफेद कैसे', दादा चंद्रपॉलला बघून म्हणाला असेल...

श्रीशान्तची शेवटची ओव्हर बघताना चंद्रपॉल नक्की वीस बावीस रन मारणार असंच वाटत राहिलं.. आगरकरने मागच्या मॅच मधून काही शिकला असावा त्याने काही Yorker टाकले, पण आता परत नवीन बॉलर शोधावा लागणार.. RP ला तर नक्कीच बदडतील...



Mandard
Wednesday, January 24, 2007 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारताची गाडी पुन्हा पुर्वपदावर २र्या वन डेत ५०-४. सौरभ,गम्भिर,सचिन(आपला) राहुल सगळे घरी. चापल खातोय थोबाडीत

Mukund
Tuesday, February 06, 2007 - 12:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://content-usa.cricinfo.com/columns/content/story/279028.html


सगळे मुद्दे पटले....

Jaymaharashtra
Monday, March 26, 2007 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या चिमण्यांनो परत फिरा.

भारत आणि पाकिस्तान. प्रत्यक्ष आणि क्रिकेटच्या मैदानावरही परस्परांचे कट्टर शत्रू. या दोन देशांच्या क्रिकेट मॅचेस लोक कोबड्यांच्या झुंजीगत बघतात. पाक खेळाडू भारताविरुद्धची मॅच जिहाद पुकारल्यासारखी खेळतात. भारतीय खेळाडूही जणू 'हर हर महादेव' म्हणत त्यांना भिडतात. असे हे परस्परांचे कट्टर शत्रू आज चक्क मित्र झालेत की राव! परवाच मला स्वप्न पडलं की, या दोन्ही देशांचे खेळाडू आपापसात भांडतायत, कशासाठी? तर विमानातल्या विंडो सीटसाठी आणि आपल्या पठ्ठ्यांनी ते स्वप्न प्रत्यक्षात आणलंदेखील. इनोदाचा भाग सोडा; पण आज आपल्या टीम इंडियातील खेळाडूंनी स्वत:च्या हातांनी स्वत:वर ही पाळी आणली आहे.

आपल्याकडे क्रिकेटवर लोक प्रचंड प्रेम करतात. अक्षरश: वेडे होतात. जेव्हा आपले पठ्ठे परदेशातून जिंकून येतात, तेव्हा त्यांच्यात आपले कुणी नातलग नसतानासुद्धा रात्र रात्र एअरपोर्टवर त्यांचं स्वागत करायला, पदरचे पैसे खर्च करून हारतुरे, पेढे आणतात, त्यांना डोक्यावर घेऊन नाचतात. आपला यांच्याशी कोणताही संबंध नसताना हे लोक आपल्यापायी का वेडे होतात? याचा कधी विचार केलाय का तुम्ही खेळाडूंनी? खेळात सपाटून हरल्यावर लोक यांच्या फोटोना चपलाने बडवतात, तेव्हा हे म्हणतात 'खेळ आहे, त्याला खेळाप्रमाणे घ्या', त्यात हार-जीत असतेच, मग ज्या वेळेस तुम्हाला लोक डोक्यावर घेतात, हार घालतात, त्या वेळेस का सांगत नाहीत की, बाबांनो आमची एवढी पूजा का करता, हा निव्वळ खेळ आहे! हातावर पोट असलेल्या हातगाडी ओढणाऱ्या श्रमजीवी माणसापासून मसिर्डिजमध्ये फिरणाऱ्या सायबापर्यंत सारेच आपला वेळ, पैसा तुमच्यावर खर्च करतात. (जाहिरातीतून मिळणारा पैसा लोकांचाच असतो). मग तुम्ही त्या करोडो लोकांच्या भावनांची कदर करायला नको? मी तर या क्रिकेटवेडापायी माझं बारावीचं वर्ष पणाला लावलं, अवघे आठ टक्के मार्क कमी पडल्यानं मी मेडिकलला जाऊ शकलो नाही, नायतर आज मी डॉ. मकरंद अनासपुरे म्हणून पेशंटना तपाशीत असतो.

आपल्याला जर क्रिकेटमध्ये खरेच कपिल देव असलेल्या वेळेसारखे बनायचेय, तर आधी या खेळाडूंना जेव्हा तुम्ही भारतीय टीममध्ये असाल तेव्हा जाहिरातींमध्ये खेळायचे नाही, असा कायदा करायला हवा. अहो एकेका दिवसासाठी पाच लाख रुपये जिंकलो किंवा हरलो तरीही? शिवाय अॅम्बी व्हॅलीसारख्या ठिकाणी घरं फुकट? एखादी मॅच गाजवल्यावर आपापल्या राज्यात मोठ्ठा भूखंड? हॉटेल, व्यवसाय, एवढं सारं मिळाल्यावर कशाला आठवण राहील त्या भुक्कड देशाभिमानाची? कालच्या श्रीलंकेविरुद्धच्या महत्त्वाच्या मॅचमध्ये आपला सुप्रसिद्ध अंगुठा लगानेवाला हिरो ढोणी पायावर बॉल आपटल्यावर चक्क तंबूच्या दिशेने चालायला लागला, भोपळासुद्धा फुटला नाही. कमीत कमी अंपायरच्या निर्णयाची तरी वाट पाहायची. तो जयसूर्या पाच पाच वेळा क्लीअर पायचीत होऊनदेखील अंपायरने आऊट दिला नाही. तुला एक तरी जीवदानाची संधी साधायला हवी होती. आता काय सारंच संपलय. आता र्बम्युडाच्या पुण्याईने किंवा बांगलादेशच्या दुदैर्वाने आपण 'सुपर एट'मध्ये पोहोचलो तरी माझं प्रामाणिक मत आहे की, बाबांनो झाला तेवढा तमाशा पुरे. तेव्हा वाघ बनून वेस्ट इंडीज काबीज करायला गेलेल्या माझ्या मित्रांनो परत फिरा... नाहीतरी आता तुमचे चेहरे चिमण्यांप्रमाणे दिसू लागलेत...''

- मकरंद अनासपुरे



Zakki
Monday, March 26, 2007 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नायतर आज मी डॉ. मकरंद अनासपुरे म्हणून पेशंटना तपाशीत असतो.

अहो जयमहाराष्ट्र, तुमच्या प्रोफाईलमधे एका बाईचे नाव लिहीले आहे, नि इथे म्हणता एका पुरुषाचे नाव घेऊन प्रॅक्टिस केली असती? काय भानगड आहे?

एरवी एकच माणूस दोन दोन ID घेऊन लिहितो, जसे ते लक्खू. नि इथे तुम्ही दोघेजण मिळून एकच ID ? ऐ. ते. न. च.


Svsameer
Monday, March 26, 2007 - 7:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कि
तो लेख महाराष्ट्र टाईम्स मध्ये मकरंद अनासपुरे या कलाकराने लिहिलेला आहे.

जय महाराष्ट्र ने तो तिकडुन इथे copy केला आहे.


Disha013
Monday, March 26, 2007 - 7:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



न्भ्द्शह्द्ज ह्ह्द्ग ह्झ्ग्द्ग्य्द ध्ग्द्ज


Jaymaharashtra
Monday, March 26, 2007 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कि काका
तुम्हाला साष्टांग दंडवत हवे तर लोटांगण घालते. पण अश्या कोट्या करु नका.
अहो मी घाई घाई मधे म टा चा reference देणे विसरुन गेले.
या पुढे जन्मात अशी चुक करणार नाहि. अगदि "कानाला खडा"
जय हिंद!
जय महाराष्ट्र!



Zakki
Tuesday, March 27, 2007 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उगी उगी जयमहाराष्ट्र. अहो, वृद्धपणी पटकन् लक्षात येत नाहीत काही गोष्टी म्हणून विचारले. तुम्ही आपले लिहीत रहा. svsameer आहेतच खुलासा करायला.

Jaymaharashtra
Thursday, March 29, 2007 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो झक्किकाका!
होतात अश्या बारीकसारीक चुका कळत नकळत.शेवटि माणुस आहे?चुक करणे हा स्थायिभाव आहे मनुष्यप्राण्याचा!
svsameer यांनी स्पष्टिकरण दिले कारण कदाचित श्री अनासपुरे यांचा महाराष्ट्र टाईम्स मधिल लेख त्यांच्या आधिच वाचनात आलेला असेल!!!!!! पण म्हणुन काय माझ्यावतीने स्पष्टिकरण देण्याचा मक्ता नाहि घेतलेला त्यांनी. त्यांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी तत्परतेने निदर्शनास आणुन दिले इतकेच. हा त्यांचा चांगुलपणा.
या पुढे काळजी घेईन पोस्ट करताना.
चु.भु.द्या.घ्या.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Gobu
Thursday, March 29, 2007 - 6:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयमहाराष्ट्र,
अरे तो मकरन्द अनासपुरे म्हणजे टिवीवरचा कलाकार नाही ना?
फ़ारच विनोदी आहे तो
नाटकात आणि मालीकातसुद्धा दिसतो
झक्की,
अहो इथे तरी लुक्खीला सोडा हो!!!


Jaymaharashtra
Thursday, March 29, 2007 - 10:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो रे गोबु तोच तो मकरंद अनासपुरे. etv marathi वरील टिकल ते political या मालिकेचे anchoring करायचा. चित्रपट कायद्याच बोला मधिल केशव
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Mukund
Tuesday, April 03, 2007 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://news.yahoo.com/s/afp/20070402/sp_afp/swimworldoly2008_070402161834;

हा मायकेल फेल्प्स बहुतेक मार्क स्पिट्ज़ चा १९७२ पासुनचा जुना रेकॉर्ड मोडणार बहुतेक पुढच्या वर्षी बैजींग ऑलींपीक ला...

मला १९७२ चे ऑलिंपीक आठवत नाही... पण १९७६ च्या मॉंट्रीयाल ऑलिंपीक पासुन मी स्विमींग बघत आहे... तेव्हापासुन जीम मॉंटगॉमेरी(पहिला स्विमर ज्याने ५० सेकद्स च्या आत १०० मीटर्स फ़्री स्टाइल शर्यत जिंकली मॉन्ट्रीयालला...),जॉन नेबर,जर्मनीचा मायकेल ग्रॉस(अल्बर्टॉस!)पासुन ते ऑस्ट्रेलियाचा इयान थॉर्प(टोर्पिडो!), मॅट बिऑंडी व गॅरी हॉल ज्युनीअर पर्यंत अनेक स्विमर्स पाहीलेत..पण हा फेल्प्स सगळ्यांपेक्षा ग्रेट वाटतो.. अथेन्स ला १७ वर्षाचा असताना त्याने झलक दाखवली होती..पण आता २१ व्या वर्षी तो त्याच्या प्राईम फ़ॉर्मधे आहे...
cant wait till Baijing Olympics!



Gobu
Wednesday, April 04, 2007 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुकुन्दा,
अरे दर ओलिम्पीक मध्ये नवीन स्टार जन्माला येतात
स्पिट्झ, बियोन्डी, थोर्प आणि फ़ेल्प्स!!!!
पुढच्या वेळी नवीन कोणी तरी असेल
टेक्णोलोजीने या खेळात प्रचन्ड बदल केला आहे, सराव ही बदललाय
आणि
शेरास सवाशेर असतोच
असो,
फ़ेल्प्स नक्कीच चान्गला आहे
तुझे मत खरे आहे!!!


Mukund
Thursday, April 05, 2007 - 1:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबु...

तुझेही म्हणणे खरे आहे.... पण इतके दिवस स्विमींग मधे सो कॉल्ड होली ग्रेल..म्हणजे मार्क स्पिट्झ चा ७ सुवर्णपदकांचा रेकॉर्ड! आणी तोही त्याने ७ वर्ल्ड रेकॉर्ड्स करुन जिंकलेला होता... आतापर्यंत सगळ्या ऑलींपिक्स मधे पुष्कळ जणांनी तो मोडायचा प्रयास केला...
Matt Biondi came close in Seoul...5 gold,1 silver and 1 bronz! पण गेल्या आठ्वड्यात वर्ल्ड चॅंपियनशीप मधे फेल्प्स ने जवळ जवळ तो मोडला होता... जर त्याच्या टिम मेट ने रिले मधे चुक नसती केली तर...आठ सुवर्णपदके आठ वर्ल्ड रेकॉर्ड करुन त्याने मिळवली असती... असो... पण त्याच्यासारखे स्विमर्स ओलींपिक्स मधे जिंकताना बघण्यास मजा येते... त्यांची जिंकण्याची जिद्द व त्याकरता केलेले कठोर परीश्रम यापासुन बरेच काही शिकण्यासारखे असते... माझ्या जॉब च्या संदर्भात मला कालोराडो स्प्रिंग मधे या स्विमर्स चे प्रशिक्षण केंद्र व मॅट बिऑंडीला जवळुन बघायला मिळाले होते.. तिथे ते प्रशिक्षक व स्विमर्स किती कष्ट घेतात ते मी स्वत्: डोळ्याने पाहीले आहे...

Mukund
Saturday, April 07, 2007 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://sports.yahoo.com/golf/pga/news?slug=dw-masters040607&prov=yhoo&type=lgns

एप्रिल उजाडला की ३ गोष्टींची आतुरतेने मी वाट बघत असतो.. एक म्हणजे स्प्रिंग सीझन ची पहीली चाहुल... बागेत फुलणारी टुलीप्स,डॅफ़ोडिल्स व अझेलिया ची फुले,झालच तर ब्रॅडफ़र्ड पेअर व क्रॅब ऍपल सारख्या झाडांवर फुलणारा पांढर्‍या व किरमीजी रंगाच्या फुलांचा बहर...दुसरी गोष्ट म्हणजे बेसबॉलचा नवीन सिझन सुरु व तिसरी गोष्ट म्हणजे गॉल्फ़ मधली सगळ्यात प्रेस्टीजीअस टुर्नामेंट.... मास्टर्स!

जवळ जवळ दहा वर्षापुर्वी पदार्पणातच ही स्पर्धा जिंकुन सगळ्या जगाला स्वत्:च्या झंझावाताची चाहुल टायगर वुडने इथेच दिली होती. त्यानंतर अजुन ३ वेळा त्याने मास्टर्स जिंकुन या स्पर्धेवर आपले वर्चस्व गाजवले आहे. तो इतक्या सहज रित्या ह्या गॉल्फ़ कोर्सवर जिंकत होता(तब्बल १८ स्ट्रोकने) म्हणुन ह्या कोर्सची लांबी सुद्धा वाढवली गेली. पण अजुनही त्याच्याचकडे दरवर्षी संभाव्य विजेता म्हणुन पाहीले जाते.

पण या वर्षी पहिल्या २ राउंड नंतर तो ५ स्ट्रोकने मागे आहे. पण अजुन कोणीही तो या वर्षी पण मास्टर्स जिंकणार नाही असे छातीठोकपणे म्हणु शकणार नाही....:-)

कोणी ऑगस्टा गॉल्फ़ कोर्सवरची अझेलियाची फुले बघत आहे का? टायगर जरी खेळत नसला किंवा गॉल्फ़ जरी आवडत नसले तरी ती अझेलिया- र्‍होडेडेंड्रोनची फुले बघायला तरी मास्टर्स टुर्नामेंट बघायलाच हवी..:-)



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators