|
Rajankul
| |
| Monday, March 19, 2007 - 2:35 pm: |
| 
|
अगदी खरे आहे. लालभाईंची अभ्यासू वृत्ती, आणी प्रचंड विरोध होत असुनही आपली मते परखडपणे मांडण्याची निर्भिड वृत्ती कौतुकास्पद आहे>>.. लालभाइ तुमचे अभिनन्दन! या सगळ्या कोल्हेकुई मध्ये तुम्ही छान कार्य करत आहात. तुमचे लेखन अप्रतीम आहे. आणि शैली सुध्दा व्यवस्थीत आहे. आपला मुद्दा तुम्ही "चांगल्या"भाषेत माडता. नाहितर इथे येउन माझी भाषा बिघडली होती हो (या रिकाम्या लोकंना अम्रुत पाजुन उपयोग नाही हे पण जाता जाता सांगतो. ) लिहित रहा.
|
विषयाला धरुन लिहीता आले तरच लिहा. वैयक्तिक हल्ले नकोत.
|
Zakki
| |
| Monday, March 19, 2007 - 10:41 pm: |
| 
|
लालभाईंच्या अभ्यासू वृत्तिचे, स्वतंत्र मते मांडण्याचे, नि ते सुद्धा वैयक्तिक टीका न करता, शैलीदारपणे लिहायचे, हे वाचून मी पण प्रभावित झालो. माझी मते मी आता संपूर्णपणे बदलली, नव्हे, लालभाईंच्या लिखाणापुढे मला तार्किक पर्यायच राहिला नाही. मलाहि वाटू लागले आहे की संघामुळेच भारताची आजच्या सारखी परिस्थिती झाली. कॉंग्रेस, कम्युनिस्ट इ. पक्षांचा नाईलाजच झाला. जेंव्हा बहुसंख्य लोक कम्युनिस्टांना मत देत नाहीत, तर त्यांनी काय करावे? या बाबतीत लोकांनी रशिया किंवा चीनचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे होते. आपल्या धर्माचा अभिमान धरणे या सारखे संकुचित्, देशविघातक दुसरे काही नाही. त्याचप्रमाणे आरक्षण. केवळ शिकलेले आहेत म्हणून नोकर्या देणे हे योग्य नाही. त्या ऐवजी न शिकलेल्यांना ताबडतोब सर्वत्र नोकर्या द्याव्यात. आता त्यांना IT मधले काही येत नाही, हा काय त्यांचा दोष? तो संघाचा दोष. खरे तर त्यांना अणुशक्ति उत्पादक केंद्रांमधे प्रमुख अभियंत्याची नोकरी दिली तर भारताचेच काय, पाकीस्तान, बांगलादेश, श्रीलंका, भूतान, नेपाळ, नि कदाचित् मायनामारचे सगळे प्रश्न चुटकीसरशे सुटतील. शिवाय जगातील लोकसंख्येचा प्रश्नहि सुटेल!
|
Mahesh
| |
| Tuesday, March 20, 2007 - 3:14 am: |
| 
|
झक्की आणी नेमस्तक, माफ करा, पण मी आधी केलेल्या कौतुकाचे स्पष्टीकरण करणे आवश्यक वाटले म्हणून लिहित आहे. कौतुक लालभाई या व्यक्तीचे केले आहे, त्यांच्या विचारांचे नाही. मी असे कधीच म्हणले नाही की त्यांचे विचार चांगले आहेत की वाईट, योग्य आहेत की अयोग्य. पण सर्वांच्या विरोधाला सतत टिकून राहून लिहिणे हे सोपे नाही. एक उदाहरण म्हणजे अनिरुद्ध बापू या विषयावरील बोर्डाचे. अचानक झालेल्या विरोधी विचारांच्या हल्ल्याने त्यांनी लिहिणेच बंद केले. काही अपवाद सोडले तर लालभाईंचे लिखाण हे अभ्यासू भाषेतच आहे. कृपया विचार आणी खंबीर वृत्ती यामधे गल्लत होऊ देऊ नका. असो, माझे म्हणणे पटत नसेल, तर सोडून द्या...
|
Peshawa
| |
| Tuesday, March 20, 2007 - 4:42 am: |
| 
|
लालभाइ नंदिग्रम मधे गेले वाटते. गुजराथच्या दंग्यात सरकार सहभागि होते असे ऐकले पन कम्युनिस्टांची महत ऊपयोगी "संघ" टना असलेल्या राज्यात शेतकर्यांच्या जिवावर अनिर्बंध सत्ता भोगणारे सरकारचे हे चावायचे दात दिसल्यावर तोंड लपवलील दिसते लालम्हराजांनी. एक साध निशेधाचा post नाही? तर्कशुद्ध my foot असेल असेल. लाल "संघ"टना लोकांचे बळि घेतायत तुम्ही खाकि "संघा" वर लोकसता हे आद्य पुस्तक सम्जुन लिहा! बहुतेक ह्यालाच अभ्यासु व्रुत्ती म्हणतात!
|
Mahesh
| |
| Tuesday, March 20, 2007 - 4:54 am: |
| 
|
लालभाईंचे लिखाण सद्ध्या बंद आहे खरे. 
|
Aaspaas
| |
| Thursday, March 22, 2007 - 6:36 pm: |
| 
|
महेश मी ही तुझ्या मताला सहमत आहे. संघ किंवा कम्युनिस्ट यांच्यामुळे वाईट झाले किंवा चांगले झाले असे म्हणायला अभ्यास व कालावधीची गरज आहे. तसेच हा [दोन्ही] विचार पूर्णतः वाईत असेही म्हणता येणार नाही आणि म्हणू ही नये यौलट त्या विचाराचा अभ्यास व्हावा. खरेच लालभाई नंदीग्राम ला गेले असल्यास त्यांचायाकडून चांगले काम घडो
|
Aaspaas
| |
| Thursday, March 22, 2007 - 6:39 pm: |
| 
|
झक्की शेवटचा परिच्छेद उपरोधात्मक लिहिला आहेस काय?
|
Saavat
| |
| Friday, March 23, 2007 - 12:28 pm: |
| 
|
तो कायम 'उप-रोध-आत्मक' च लिहितो.. शेवटी 'हूड' म्हणतो तेच खरे... नेती-नेती.
|
Zakki
| |
| Friday, March 23, 2007 - 1:14 pm: |
| 
|
उपरोध, cynical , पाचकळ विनोद, obnoxious , facetious , एव्हढेच डोक्यात येते भारताचे राजकारण म्हंटले की. बाकी काही लायकीचे वाटत नाही ते. थोड्याफार प्रमाणात सगळ्याच राजकारणासंबंधी. पण कुठे जरा कमी, कुठे जास्त. इथे तरी काय, gay , गर्भपात, Stem cell research , उत्क्रांतिवाद वि. बायबल, नि सध्याची justice dept. ची चौकशी. सगळेच नुसते स्वार्थ, नि सत्ता यासाठी. बाकी काही अर्थ नाही. शेतकरी, डॉक्टर, अगदी वकील सुद्धा (कधी कधी) लोकोपयोगी कार्ये करतात. राजकारणी मात्र .... कितपत उपयोगी आहेत याबद्दल शंकाच आहे!
|
खाली दिलेला लेख वाचा. थोडा वेगळ्या विषयावरचा लेख आहे. पण मुख्य विषयाचा संघाशी बादरायण संबंध जोडून उगाचच संघाची निंदा केली आहे. http://www.loksatta.com/daily/20061029/lr04.htm
|
Zakki
| |
| Tuesday, March 27, 2007 - 10:41 am: |
| 
|
वास्तविक ब्राम्हणांनी द्रव्यसंचय करायचा नसतो. शिकणे, शिकवणे नि ज्ञानोपासना करणे ही त्यांची कामे. पूर्वी समाज त्यांचे पालनपोषण करीत असे. पण ज्ञान म्हणजे फक्त वेदाचे ज्ञान, अध्यात्माचे ज्ञान हा समजहि अनेक शतके होता. अर्थात् या अत्यंत पुरातन काळातील गोष्टी झाल्या. त्या पोषणाचे शोषण होऊ लागले. स्वत: ब्राम्हणांनी ज्ञानोपासनेकडे कमी नि अर्थसंचयाकडे जास्त लक्ष दिले. आजकालच्या जगात अर्थसंचयाला जास्त महत्व आले आहे. CEO होणे, बक्कळ पैसा कमावणे हेच यशाचे मोजमाप झाले आहे. (अमेरिकेचा प्रभाव). त्याचा संघाशी काय संबंध आहे ते मला माहित नाही, पण त्याच मोजमापाने बघायचे तर कदाचित् या लेखात म्हंटलेले बरोबर असावे. पण यात ब्राम्हणांवर नि संघावर टीका करण्याचा हेतू जास्त दिसून येतो. ब्राम्हणांत धडाडी नाही म्हणणार्या या माणसाची तरी, असले काही, मुसलमान समाजातल्या दहशतवादाला प्रोत्साहन देणार्या मुल्ला मौलवींविरुद्ध लिहिण्याची या लेखकाची हिंमत आहे का? अर्थातच नाही, ती ताकद भारतात कुणालाच नाही. जगात सुद्धा फार थोड्यांना!
|
वास्तविक पाहता या लेखातील मुद्दे सर्व मराठी माणसांना लागू आहेत. पण झोडपले आहे फक्त ब्राह्मणांना. ब्राह्मणांवरील टीकेप्रमाणेच संघावर टीका करायला, हिंदूंवर टीका करायला आणि थुंकायला भारतात कुणाची परवानगी लागते? अशी टीका करणार्यांनाच बुद्धिवादी, विचारवंत, पुरोगामि इ. समजले जाते. आपले पुरोगामित्व Renew करायला हे तथाकथित "पुरोगामि" विशारवंत अधूनमधून अशी टीका करत असतात. हा BB सुरू करण्यामध्ये बहुदा तोच पवित्र हेतू असावा.
|
Chyayla
| |
| Tuesday, March 27, 2007 - 11:56 pm: |
| 
|
हा विषय पहिले वैयक्तिक वादावर सरकला त्याला कारणही तसेच होते मुळ हेतु सन्घाची बदनामी करायचा प्रयत्न, मग त्यासाठी मुद्यान्ची ओढुन ताणुन केलेली शोधाशोध ही बाब काही केल्या लपवता आली नाही. उदा.: पण ह्यांचे गुण विधायक देशकार्यासाठी वापरले गेले असते, तर देशाचा फार मोठा फायदा झाला असता उपदेशाबद्दल धन्यवाद... त्यातल्या त्यात डॉ होमी भाभा यान्चे उदाहरण म्हणजे चान्गली कोटी होती वडाची साल वान्ग्याला लावायचा प्रकार सन्दर्भात न बसणारे... आणी त्याच अणु सन्शोधनाचा उपयोग करुन देशाच्या दुरगामी आत्मनिर्भरता, सरन्क्षणासाठी अणुस्फ़ोट केल्यावर काय पण गहजब केला होता याच लोकान्नी... आता झक मारुन अणुस्फ़ोट हे पण विधायक कार्य मान्य म्हणावे लागेल.(झाली ना पन्चाईत ) नशीब नाहीतर यान्नी तेन्व्हाच डॉ होमी भाभाना सन्घवादी म्हणुन गौरव केला असता. तरी जरा योग्य उदाहरणाची.. सामाजिक, राजकिय सन्दर्भात... निदान एक तरी... अपेक्षा करतो... संघाच्या जन्मापासून त्याची राजकिय महत्वाकांक्शा हा काही गुप्ततेचा विषय नव्हता राजकारण तर देशाकार्यातला केवळ एक महत्वाचा भाग आहे त्याशिवाय सतिश इनामदारान्नी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दीली त्याबद्दल केवळ या सन्स्था स्वता:चेच कौतुक करतात... एवढी कोरडी, अर्थशुन्य टीका (टीका नव्हे उद्वेग) म्हणजे स्वताच्या कार्याचा अभिमान ठेवु नये की काय? आम्हाला राग येतो बुवा. तरी सन्घाचे निश्चित ध्येय "परमवैभवम नेतु मे स्वराष्ट्रम" याबद्दल लालभाईन्ना काही किन्तु नसावा असे एकन्दरीत दीसते... ही एक समाधानाची गोष्ट. मार्ग चुकुही शकतो त्यात अडचणी येतातच पण मला वाटत ईथे स्पष्ट उद्देश, ध्येय असणे महत्वाचे ईछा तिथे मार्ग त्याप्रमाणे आलेले तथाकथित दुर्गुण (तुम्ही सान्गितल्याबद्दल आभार ) यावरही मात करुन पुढे जाता येते, एवढ्या अडचणी व प्रखर विरोध असुनही सन्घ पुढेच जातोय याचा अर्थ वाटचाल योग्य होत आहे हे मान्य करावे लागेल. जर ताकद केवळ राजकिय बलाबलावरुन ठरवायची तर ईथेही तुम्हाला निराश व्हावे लागेल नुकत्याच झालेल्या निवडणुकात झालेल्या विजयामुळे दीनेश म्हणतात त्याप्रमाणे तुमचे अन्दाज (आता किती राज्यात भाजपाचे राज्य येते ते पाहु...) साफ़ चुकले, मला तुमच्या बद्दल सहानुभुती. पण अशीच आकलनक्षमता ठेवुन तुम्ही जे सन्घाचे आकलन करण्याचा प्रयत्न केला तो कौतुकास्पद आहे. अर्थात, संघाचा जो काही पाठीराखा आहे, तो मुख्यतः पांढरपेशा मध्यमवर्ग आहे. ह्या वर्गाला स्वतःचे आयुष्य अधिकाधिक समृद्ध करून घेण्याची इतकी घाई झालेली आहे, की थोडाफार tax भरावा लागला तरी "हाय मै लुट गयी" अशी आरोळी हा वर्ग ठोकत असतो. तेंव्हा अशा ह्या वर्गाकडून, आपला राजकिय अजेंडा पूर्ण होण्यासाठी किती अपेक्षा ठेवायची, हे समजण्याइतपत बुद्धीमत्ता सरसंघचालकांकडे असावी, अशी अपेक्षा. (वास्तव तसे वाटत नाही.) दुसरा धनिकांचा वर्ग. ह्या वर्गाला जो पक्ष अधिकाधिक आर्थिक स्वातंत्र्य देईल त्याकडे हे धनिक वळणार. ह्यात नवल ते काय? उरला कष्टकर्यांचा वर्ग. ह्या वर्गाचा कितपत पाठिंबा संघाला आहे, हे संघानेच ठवायचे आहे. म्हणजे गोळाबेरिज कम्युनिस्म, वर्गसन्घर्श वैगेरे... कुणी तरी लाल चष्म्याबद्दल लिहिलेच आहे. तुम्ही त्यान्चे म्हणणे अक्षरशा: खरे ठरवले... ईतक्या सन्कुचित द्रुष्टीने विचार करणार्याला प्रत्यक्ष स्ट्यालीन जरी आला तरी समजावु शकणार नाही. तरी भाजपाची राज्ये वाढलीत त्यामुळे आता मात्र सगळेच वर्ग पाठिम्बा देत आहेत की काय? म्हणजे तुमचा हा पण अन्दाज चुकला म्हणायचा... माझी परत सहानुभुती आहे तुमच्यासोबत. अहन्कारी, दाम्भिक, आत्मस्तुति... ईथल्या सन्घिष्टान्च्या लिखाणावरुन... वैगेरे.. तात्पर्य सन्घावर होणार्या निष्कारण टीकेला चोख प्रत्युत्तर देउ नये.. सन्घाने काही विरोधकाना सडेतोड प्रत्त्युत्तर देउ नये असला पुळचटपणा शिकवला नाही वाटत.. फ़ारच रोकठोक व जशास तसे उत्तर द्यायला शिकवले वाटते... (हे अजुन एक दुख्: ) विरोधकाना प्रतुत्तर द्यायचा ठेका फ़क्त कम्युनिस्टान्ना असतो हे माहित नव्हते. झक्की तुमचे निन्दकाचे घर असावे शेजारी मान्य.. पण ईथे केवळ द्वेष बुद्धितुन आन्धळी टीका आणी विधायक टीका यात गफ़लत झालेली दीसते. पण तरीही जी काही टीका केली त्याबद्दल मी लालभाईन्चे मनापासुन आभार मानतो. कारण मला आता पर्यन्त सन्घाच्या कार्याबदाल श्रद्धा होती पण यान्ची टीका पाहुन उलट विरोधकान्चा फ़ोलपणाच लक्षात यायला लागला व श्रद्धे सोबत आता सन्घकार्याचा आदरही वाटु लागला याबद्दल मी मनापासुन लालभाईन्चा वैयक्तिक आभारी आहे माझ्या लिखाणाचे श्रेयही मी त्यानाच देतो, केवळ त्यान्च्याचमुळे मायबोलीवर लिहायला शिकलो ज्यान्नी माझे सुरुवाती पासुनचे पोस्ट पाहिले असतील त्याना लक्षात येइल. कारण या टीकेमुळेच मी सन्घाचा, हिन्दुत्वाचा, कम्युनिस्मचा, सेक्युलरवाद, जिहाद यान्चा अधिक बारकाईने अभ्यास व वाचन केले व आगीतुन सोने तापुन अधीकच तेजस्वी व्हावे अगदी त्याचप्रमाणे माझे सन्घाबद्दलचे मत अधिकच दृढ झाले. मला तरी स्वता:ला सच्चा हिन्दुस्थानी सर्वसमावेषक हिन्दुत्ववादी (याना फ़क्त सन्कुचितच माहिती आहे), सन्घिष्ट म्हणवुन घ्यायला अभिमान वाटतो (आयला परत आत्मस्तुती ) पण मी जेन्व्हा त्याना विचारले तेन्व्हा ते काही तरी सामाजिक कम्युनिस्ट आहेत जे मला समजणार नाही असे म्हणाले होते, म्हणजे ईथे त्याना स्वता:ची व्यवस्थित ओळख द्यायलाही लाज वाटते की काय? माझा प्रश्न प्रामाणिक होता हो. एका ठिकाणी त्यान्नी मुन्गुस व एका अविचारी स्त्री चे उदाहरण दीले.. मला वाटत याला कारणीभुत त्यानी पाळुन ठेवलेले पुर्वग्रहदुशीत विचार, व ठरावीक पोथिनिस्ट विचारातुन बाहेर न पडता आल्यामुळे आलेला मोकळेपणाचा अभाव... यापेक्षा मला ईथे लान्डगा आला रे आला असे म्हणणार्या गुराख्याच्या गोष्टीची आठवण येते. अशा व्यक्तिनी एखाद्या वेळेस प्रामाणिकपणे खरे जरी सान्गितले तरी तोपर्यन्त विश्वास गमावल्यामुळे अशा प्रकारे पश्चाताप करायची पाळी येते... तात्पर्य ईथे जी सुरुवातीला टीका झाली त्याला जबाबदार लालभाईच. बाकीच्या मुद्यान्चा समाचार देशी, सतीश, लिम्बुटीम्बु यान्नी घेतलाच आहे.. सध्या माझ्याकडुन एका दमात एवढेच. लालभाईन्ना राग आल्यास क्षमस्व... थोडीसी गान्धीगीरी भी हो ज्जाये
|
Chyayla
| |
| Wednesday, March 28, 2007 - 5:16 pm: |
| 
|
बरोबर आहे, म्हणूनच कायम "मुसलमान शत्रु" "हिंदूंनी चार पोरे जन्माला घालावीत" असल्या सवंग घोषणा क्या बात है... काहो कुणी वाचले आहे का की याच प्रवृत्तीन्नी कधी तरी "हम ५ हमारे २५" व ईतर अनेक सेक्युलर फ़तवे काढणार्यान विरुद्ध एक तरी शब्द बोलायची हिम्मत दाखवली आहे का? कुटुम्ब नियोजनाचे डोज एकाच समाजाला का?... गवत खाउन जगु पण आमची सन्ख्या वाढवु व जिहाद करु या बद्दल काय म्हणणार? शेवटी घोषणा व फ़तवा यात काही फ़रक आहे की नाही. ईथे जिहादी हे देशाचे शत्रुच हे वास्तविक जगातले सत्य सान्गण्याची हिम्मत कोणी तरी दाखवली आहे का? तीथे का बोबडी वळते. शत्रुला शत्रुच म्हणुन ओळखा त्याला उगीच शत्रु शत्रु म्हणुन डोक्यावर घेउन नाचायची गरज नाही. नाहीतर पृथ्वीराज चव्हाण बनायला काही वेळ लगत नाही. असला दुट्टप्पिपणा व अन्याय सामान्य जनतेला ही कळु लागला तुम्ही त्याना अशाप्रकारे जास्त दीवस मुर्ख बनवुन ठेवु शकत नाही. हा सेक्युलरिस्म चा रोगच ईतका भयन्कर आहे की त्यावर कधी कधी असले ईलाज करण्याशिवाय पर्याय उरलेला नसतो. सावरकर, गुरुजी यान्चाबद्दल तुम्ही न बोललेलेच बरे लिम्बुटिम्बुन्नी त्यावर अतिशय सुन्दर, अभ्यास करुन उत्तम विचार मान्डलेत... अभिनन्दन... दुसरीकडे एक प्रकारे यान्ना मा. गुरुजीन्चे विचार जास्तच समजलेले दीसतात. मतलबापुरता स्वताच सोयिस्कर अर्थ कसा काढावा व लगेच मतलब सम्पला की शिव्या देणे... मस्त जमतय... प्रापन्चिक गोष्टीन्चा त्याग करुन सर्वस्वी जीवनाचा होम करुन "राष्ट्राय स्वाहा: ईदम न मम" व अखन्ड जीवन सन्घकार्य राष्ट्रकार्यासाठी वेचणारे गुरुजी आणी त्यान्च्याच सन्घाला उगीचच शिव्या घालणारे तुम्ही, त्यान्चे ईतरही सगळे विचार मान्य असते तर जातीभेद, ईतर भेद सोडुन विधायक राष्ट्रकार्यात तुमचीही भर पडली असती, किन्वा निदान शिव्या तरी नसत्या घातल्या. ईथे त्यान्च्या सन्घाला विरोध करणारे तुम्हीच त्यामुळे त्यान्च नाव न घेता बोललात तर तुमचीच फ़जिती होणार नाही. काही म्हणा अशा व्यक्ति मात्र स्वतालाच "उन्टावरचा शहाणा" म्हणुन दाखवुन देतात. आपल्याला काय फ़ालतु आणी अयोग्य ठिकाणी गान्धीगीरी जमत नाय.
|
मुळात "सोनियासत्ता"सारख्या कट्टर संघद्वेषी कॉंग्रेसी मुखपत्रात छापून आलेले लेख लोकांनी वाचावे आणि त्यावर गांभीर्यपूर्वक चर्चा करावी हा आग्रह धरणे हीच मोठी चूक होती. एखाद्या नि:पक्षपाती वृत्तपत्राने जर हे लेख छापले असते तर गोष्ट वेगळी होती. उद्या एखाद्या पाजीस्तानी वृत्तपत्रात भारताची निंदा करणारा लेख छापून आला तर तो लेख गांभीर्याने घ्यायच्या लायकीचा असेल का? या संघावरच्या लेखांचीही दुर्लक्ष करण्याचीच लायकी आहे कारण ते "सोनियासत्ता"त प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष करणेच योग्य.
|
Saavat
| |
| Thursday, March 29, 2007 - 2:11 pm: |
| 
|
संघ! दक्ष!! || मातृभूमी प्रार्थना || नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् । महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते || १ || प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता इमे सादरं त्वां नमामो वयम् त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं शुभामाशिषं देहि तत्पूर्तये । अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं सुशीलं जगद्येन नम्रं भवेत् श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् || २ || समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रं परं साधनं नाम वीरव्रतम् तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् । विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर् विधायास्य धर्मस्य संरक्षणम् । परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं समर्था भवत्वाशिषा ते भृशम् || ३ || ॥ भारत माता की जय ॥
|
Deshi
| |
| Thursday, March 29, 2007 - 2:44 pm: |
| 
|
आ S S रम .. .. ..
|
नाही..ंआही.. आधी.. विश्रभ.......... आरमचा सम्बध नाही.
|
प्रार्थना संपल्यावर सर्वात पहिल्यांदा ध्वजप्रणाम (१, २, ३). नंतर ध्वज उतरवून गुंडाळून ठेवणे. सर्वात शेवटी दक्षिणेकडे वळून अजून एक ध्वजप्रणाम (संघऽऽऽऽ वीकिर) आणि नंतर "स्वस्थ". असा ठरलेला क्रम आहे.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|