|
Anamikaa
| |
| Thursday, April 05, 2007 - 5:34 pm: |
| 
|
अजुक्का! सल्ला मान्य!........ ईतक सहन केलय की आता मला याचा त्रासही होत नाही,मी खरच त्यासगळयाच्या पलिकडे गेलेय.सगळ्या संवेदना बधिर झाल्यात "तोंड दाबुन बुक्क्याचा मार सहन करायचा" अजुन काय?................... मी पण फ़ार विचारपुर्वक हा अनुभव कथन करायचा निर्णय घेतला."झाकलि मुठ सव्वालाखाचि "या उक्तीप्रमाणे मी इतर कुणाचा अनुभव म्हणुन देखिल लिहु शकले असते पण" कोंबड झाकल तरी उजाडायच रहात नाहि ". डोळ्यावर काळाचश्मा लावुन पुर्वग्रहदुषित लिख़ाण करणार्यांसाठी मी माझा अनुभव कथन केला. असे काही आपल्याबाबतितही घडु शकते असा सर्वसामन्य माणुस विचार देखिल करत नाहि आणि आसपास जेंव्हा अश्या घटना घडतात तेंव्हा त्याला लोकलज्जेस्तव वाचा देखिल फुटत नाहि. नुसते छापुन आलेले वाचुन स्वतःची मते तयार करणे सोपे असते ग! पण स्वतःवर बेतले कि कशी ससेहोलपट होते ते मी स्वतः अनुभवले आहे. आमच्या घराची विस्कटलेली घडी कधी सुरळित होईल कि नाही या बद्दल मी साशंक आहे.या पुढे हा विषय मी माझ्यापुरता बंद करतेय. अर्थात तु म्हणतेस त्या प्रमाणे "आपला हिंदू धर्म असल्या गोष्टींनी ढासळून पडण्याइतका तकलादू नक्किच नाही तसे नसते तर इतकी परकीय आक्रमणे होवुन सुद्धा तो तग धरुन उभा राहु शकलाच नसता" "अनामिका"
|
Chyayla
| |
| Thursday, April 05, 2007 - 7:16 pm: |
| 
|
सावट यान्च्या बाबतित गैरसमज उडाला होता वाटत. पण त्यान्च्या प्रश्न खरच विचार करण्यासारखा आहे.. मी तुम्हाला माझ्या अल्पमतीने उत्तर द्यायचा प्रयत्न करतो? स्वामी विवेकानन्द एक तरुण, प्रचन्ड जिज्ञासु आणी हुषार व्यक्तिमत्व.. स्वामी रामकृष्णान्ची भेट होण्यापुर्वी असेच विचारान्ची काहुर माजलेले हे देव, धर्म काय याबाबतित सम्भ्रमीत, ज्याना भेटायचे एकच प्रश्न "तुम्ही देवाला पाहिलय का?" फ़ालतु उत्तरे नकोत असेल तर हो म्हणा नाही तर जा उडत.. कित्येक ठिकाणी निराषा त्यामुळे नास्तिकता बळावली होती ह्या सगळ्या देव, धर्म, अध्यात्म या वरचा विश्वास पुर्णपणे उडालेला... एका आधुनिक, तरुणाच प्रतिनिधित्व हा नरेन्द्र करायचा, हाच प्रश्न कोणालाही पडावा.. पण जिज्ञासा पुरवायला शोध घ्यायचे प्रयत्न कोण करतो. फ़क्त एका व्यक्तिनी निसन्दिग्ध पणे सान्गितले "हो मी देवाला पाहिले, अगदी मी तुला जसा पहातोय ना तसाच" आणी तिथेच त्यान्चा शोध सम्पला. रामकृष्णान्च आचरण पहाल तर त्याला कोणी वेडाच म्हणाव पण त्याची मोहिनी नास्तिक झालेल्या नरेन्द्रावर पडावी आणी सर्वस्व सोडुन स्वामी विवेकानन्द व्हावे, केवढा चमत्कार. पण तुम्ही कुठेही ऐकले आहे की स्वामी विवेकानन्दानी स्वता: कधी म्हटले की "मी पण देव पाहिला आहे"? कुठेच नव्हे कारण देव हा काही आकाशात नसतो तो बघण्याचा विषयच नाही तो जाणण्याचा विषय आहे तो असतो तुमच्या आमच्या सारख्या हाडामासाच्या माणसानमधे, या चराचरामधे प्रत्येक जीवमात्रात.. अरे हे जे काही जगात दीसत आहे हे जग म्हणजे परमेश्वराची अभिव्यक्ती आहे. वेदान्तान्ची घोषणा हीच "अहम ब्रह्मास्मी" त्याला जाणणे म्हणजेच परमेश्वर प्राप्ती होय. या देशातील गरीब, अज्ञानी पिडलेली जनता त्यान्ची सेवा हाच माझा धर्म हीच तर माझी दैवते आहेत... "नर सेवा हीच नारायण सेवा" आणी हाच धर्म. चर्च मानवाला म्हणते "तुम्ही पापी" आहात, तुम्ही येशुला शरण जा तो तुम्हाला माफ़ करेल व मुक्ती देइल.. स्वामी विवेकानन्द म्हणतात अरे "तुम्ही ईश्वराचे पुत्र तुम्ही अमृताचे अधिकारीगण... हिन्दु तुम्हाला पापी म्हणण्याचे साफ़ नाकारतो, त्याला पापी म्हणणे हेच पाप.." समाजरिती, कर्मकान्ड आणी धर्म यात फ़रक आहे पण ह्या सामाजिक, धार्मिक कर्मकान्डाला ईन्ग्रजीमधे Religion शब्द आहे पण वेदाना अपेक्षीत असा धर्म याला कोणताच शब्द नाही त्यामुळे धर्म समजायला, पाश्चात्याना व ईतराना अडचनीचे जाते व गुन्तागुतीच वाटत. त्याएवजी त्याना म्हटल अरे प्रार्थना कर, क्रुसेड कर, कर्मकान्ड कर, बायबल, कुराण वाच ह्या भौतिक गोष्टी त्याना फ़ार सोप्या वाटतात, मग आपणच श्रेष्ठ आपला गॉड जास्त पॉवर्फ़ुल त्यान्चा गॉड दगडाचा वैगेरे असल्या समजुती. (आपण दगडाला देव मानत नाही तर दगडातही देव पहातो हे याना कोणी समजाव) आणी अशा धर्माचे चक्क Business Marketing प्रमाणे Sale केल्या जाते. जसे पेशवा नी Harvesting म्हतले तसे.. धर्म म्हणजे मुक्ति मिळवण्याचा धन्दा, मग त्याद्वारे राजकारण, सत्ताकारण, युद्धे हे सगळ आलच. स्वामी विवेकानन्द धर्म म्हणजे काय सोप्या शब्दात सान्गतात. "कर्म, उपासना, मन्:सयम वा ज्ञान यापैकी कोणत्याही एकाचा वा एकापेक्षा अधिकान्चा किन्वा सर्वच उपायान्चा अवलम्ब करुन ते उद्दीष्ट साधा आणी मुक्त व्हा. यातच सगळा धर्म आला, मते, वाद, क्रियाकान्ड, अनुष्ठाने, शास्त्रे, मन्दीरे वा ईतर बाह्य गोष्टी केवळ गौण तपशिलाच्या बाबी होत." आपल्याही सन्स्क्रुतीत कर्मकान्डाचे स्तोम माजले होते, समाजव्यवस्थेतील आलेल्या त्रुटीन्मुळे धर्माचा मुळ अर्थ झाकोळुन गेला होता, पण सत्याचा सुर्य ढगान्मुळे क्षणकाळ झाकल्या जातो पण त्याचे तेज कमी झालेले नसते व परत ते प्रगट होतेच. थोर, महात्मे, सन्त, मुनी, ऋशी यान्च्यामुळे आजही ते आजता गायत आपल्यापर्यन्त चालुन आले आहे.
|
Saurabh
| |
| Thursday, April 05, 2007 - 7:18 pm: |
| 
|
सावट नमस्कार! पोस्ट नीट वाचावी ही विनंती. 'परधर्मीय' हा शब्द तुमचा. माझे शब्द वर अहेतच. असे स्वतःचे शब्द दुसर्याच्या तोंडी कोंबण्यातून तुमची एकूण दिशा समजली. पुढे बोलण्यात अर्थ नाही.
|
च्या" नेहमीप्रमाणे अभ्यासपुर्ण लिखाण केले आहेस.तुझी पोस्ट उत्तमच आणि स्पष्टिकरण अगदी यथार्थ आहे. तुझे लिखाण वाचुन माझ्या ज्ञानात कायम भरच पडली आहे.धन्यवाद. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Chyayla
| |
| Thursday, April 05, 2007 - 8:07 pm: |
| 
|
सौरभ मला तरी सावट यान्चे पोस्ट वावगे वाटले नाही.. असो... स्वामी विवेकानन्द यान्चा काळ म्हणजे गुलामगिरीचा, आधी जिहादीन्चे, ईन्ग्रजान्चे राजकिय, तर चर्चचे परत सान्स्कृतिक आक्रमण यामुळे भारतिय जनमानसावर आलेली मरगळ व सोबत कर्मकान्डान्चे स्तोम यामुळे धर्माचा मुळ अर्थ लोप पावला होता अशा परिस्थितिचा फ़ायदा घेउन देशभर चर्च बान्धणे बघा तुमचा गॉड काही मदत करत नाही आमचा गॉडमुळे आम्ही आधुनिक, पुढारलेले व सभ्य आहोत आणी तुम्ही दरिद्री, गुलाम आहात याशिवाय सन्स्कृती, वेद, पुराण यान्ची निन्दा नालस्ती चालवली. नरेन्द्र सारखा तरुण भ्रमित नाही झाला तरच नवल, पण जेन्व्हा त्यानी वेदान्तान्चा अभ्यास केला व गुरुच्या आशिर्वादामुळे अध्यात्मिक सत्य त्यान्च्यात प्रगट झाले. तेन्व्हा हाच नरेन्द्र आता मिशनर्याना, पाश्चात्याना प्रत्युत्तर देतोय तुम्ही काय आमच्या धर्माची निन्दा नालस्ती करता, तुम्हालाच धर्म काय ते शिकायची गरज आहे. पुढे ते म्हणतात... "मूर्तिपुजकान्चा आत्मा वाचवण्यासाठी त्यान्च्या देशात धर्मप्रचारक पाठविण्याचा हव्यास बाळगाणारे तुम्ही, उपासमारीपासुन त्यान्चा जीव वाचविण्याचा का बरे थोडादेखील प्रयत्न करीत नाही? सार्या हिन्दुस्थानभर चर्च बान्धण्यात तुम्ही लोक गुन्तले असता, पण सपशेल विसरता की, भारतातील निकडीची गरज धर्म नव्हे, धर्म त्यान्च्यापाशी भरपुर आहे. अन्नासाठी ते आपल्यासमोर हात पसरित आहेत आणी आपण त्याना दगड देत आहोत. क्षुधार्त लोकान्ना धर्माच्या गोष्टी सान्गणे कीन्वा त्याना तत्वज्ञान समजावुन सान्गण्याचा प्रयत्न करणे म्हणजे विटम्बनाच करणे होय." आज आपण पहातो चर्च सेवेच्या नावावर, आमिश दाखवुन, पैशाच्या जोरावर मदत करतो असे दाखवतो पण आडुन कळपात ओढण्याचे पुतना मावशीचे प्रेम असते. ही घोर विटम्बनाच. मी सर्वस्वी चर्चला दोष देत नाही आपल्यातही काही कमी आहे, त्यामुळेच या गिधाडान्च फ़ावत.. समाजतला दुर्लक्षीत भाग ज्याने समाजासाठी तेवढेच महत्वपुर्ण योगदान केले आहे त्याना जवळ कोण करणार? डॉ हेडगेवारान्नी म्हटल्याप्रमाणे "हिन्दुत्वाचा खरा अर्थ म्हणजे नर सेवा हीच नारायण सेवा हा" जर प्रत्येकानी आपल्या परीने राबवला तरी कोणीही या राष्ट्राचे, वाकडे करु शकणार नाही. त्यासाठी आवश्यक आहे एकिकडे मरगळ झटकुन या धर्माच्या बाबतित दीशाभुल करणार्यान्चा (तो प्रयत्न ईथेही पहातोच आहे) प्रतिकार करण्याचा व अभिमानाने सर्व भेद दुर सारुन, स्वता:ची अध्यात्मिक उन्नती करत समाजकार्यात योगदान देण्याचा.
|
Karadkar
| |
| Thursday, April 05, 2007 - 8:10 pm: |
| 
|
सौरभ, गूगल ख़्रिस्तियनिटीच्या जहिरती देते कारण ख़्रिश्चन लोकानी त्या तशा येण्यासाठी गुगल ला पैसे दिलेत. तुम्ही पण काढा की एक AdWords account आणि द्या हिंदु धर्माची जाहिरात ती पण दाखवली जाईल.
|
Saurabh
| |
| Thursday, April 05, 2007 - 8:46 pm: |
| 
|
हो हो, मला महीत आहे गुगल वर जाहिराती कशा येतात ते
|
Mansmi18
| |
| Thursday, April 05, 2007 - 10:41 pm: |
| 
|
कुलकर्णी साहेब, पेढे काढा. एक आनन्दाचि बातमी तुमच्यासाठि. मित्रहो माफ़ करा थोडे विशयान्तर झाले पण कुलकर्णी काकाना हि महिती दिल्याशिवाय राहवत नाही. http://www.rediff.com/news/2007/apr/05quota.htm
|
हे सगळे मिळुन आपल्या देशाचे वाटोळे करणार आणि त्यानंतरच ह्या निधर्मिवाद्यांचा आत्मा शांत होणार बहुतेक!कुठे जावुन थांबणार हे सगळ आणि यातुन निष्पन्न काय होणार? जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Zakki
| |
| Thursday, April 05, 2007 - 11:02 pm: |
| 
|
च्यायला, तुम्ही छानच लिहीले आहे. उगीच इतर लोकांना दोष देण्याधी आपण हिंदू, इतर गरीब व अशिक्षित हिंदूंसाठी काय करतो हे पाहिले पाहिजे. ख्रिश्चनांना जे गरीब व दु:खी हिंदू सापडतात, तिथे त्यांच्या आधी हिंदूंनी जाऊन त्यांना मदत केली तर, काहीहि न बोलता, कुठलेहि भांडण न करता, इतर कुणालाहि दोष न देता आपण धर्मांतर थांबवू शकतो. आता मुसलमानांचे धंदे कसे थांबवायचे तो वेगळाच नि जास्त कठिण प्रश्न आहे. कारण मतांसाठी, secular पणाचा चुकीचा अर्थ घेऊन, भांडणारे हिंदूच जास्त आहेत. पुन: त्यांच्याशीच वाद घालून त्यांना पटवून द्यायला पाहिजे की जरा मुसलमान प्रेम कमी करा, ते डोक्यावर चढून बसण्या आधी.
|
Soha
| |
| Friday, April 06, 2007 - 6:59 am: |
| 
|
अनामिका यांच्या वैयक्तिक प्रश्ना वर मी बोलणे तितकेसे बरोबर नही. त्यांच्या घरात नक्कि काय समस्या आहे त्याची मला नीटशी कल्पना ही नाही. पण मला वाटते की त्यांच्या नंणदेला क्रिस्चन धर्म स्वीकारल्या नंतर सुद्धा नवीन घरत सत्यनारयणाची पुजा करावीशी वाटली हा खरेतर हिंदु धर्माचा विजय आहे. ह्याचा अर्थ त्यांनी जरी क्रिस्चन धर्म स्वीकारला असला तरी मनाने त्या अजून हिंदुच आहेत.
|
सोहा.. पण पुढच्या पिढीचे काय? हे लोक लहानपणापासूनच इतकं ब्रेन वॉशिंग करतात... की याना नंतर आपण आधी हिंदू होतो हे कबूल करायची लाज वाटते.
|
Saavat
| |
| Friday, April 06, 2007 - 10:26 am: |
| 
|
सौरभ, अनावधानाने, माझ्या पोष्टमधून तुमचा उपमर्द झाला असेल, तर कृपया मला क्षमा असावी. माझा असा उद्देश नक्कीच नव्हता,आणि नसेलही!आपली इतर मते ऐकण्यास मी उत्सुक आहे. हिंदूधर्माची ध्वजपताका रोवण्यास अधिर झालेल्या, समर्थ रामदास आणि संत तुकाराम यांनी दाखवून दिलेल्या धर्ममार्गावर चालणार्या,छत्रपति शिवाजी महाराजांचा,अल्लाची करुणा भाकणार्या,नमाज पडणार्याऔरंगजेबास हात न लावण्याचा, धगधगता विवेक जागृत होता. या गोष्टीतल्या 'सत्याकडे'आपण काना डोळा करता कामा नये. हिंदूत झालेला, महाभारताचा महासंग्राम हा 'सत्य आणि असत्य', 'प्रखर वैराग्याने जागृत होणारा विवेक आणि अधर्मामधील लढा होता', हे सत्य, आपले दिशादर्शक असले पाहीजे. च्यायला, तुम्ही छान सांगितल आहे. धन्यवाद! खालील माझी मते ही वैयक्तिक आहेत. इतर कॊणाचेही मते खोडुन काढण्याचा उद्देश नक्कीच नाही, हे तुम्ही लक्षात घ्याल अशी खात्री आहे. तुमचे काही ठळक विचार ... १)वेदान्तान्ची घोषणा हीच "अहम ब्रह्मास्मी" त्याला जाणणे म्हणजेच परमेश्वर प्राप्ती होय. २)पण जेन्व्हा त्यानी वेदान्तान्चा अभ्यास केला व गुरुच्या आशिर्वादामुळे अध्यात्मिक सत्य त्यान्च्यात प्रगट झाले. ३)"हिन्दुत्वाचा खरा अर्थ म्हणजे नर सेवा हीच नारायण सेवा हा" प्रथम 'अहं ब्रम्हास्मी'याचा बोध गुरु शिष्याला करुन देतात, हे खरे आहे. पण हा बोध म्हणजे पुर्णज्ञान नव्हे, कारण 'मी म्हणजे ब्रम्ह ' , पण मग समोरचा कोण? हा प्रश्न अजून शिल्लक रहातो, म्हणजेच शिष्यात 'द्वैतभाव'अजून शिल्लक असतो.(आईच्या गर्भातील गर्भास, पुर्णज्ञान असते,हे चुकीच आहे.कारण जो पुर्णआत्मज्ञानी असतो,त्याला जन्मही नसतो. ज्या गर्भास आपल्या आईचे वय ही माहीत नसते, तीथे त्याला 'आत्मज्ञान'कसे असू शकेल?) म्हणूनच बोधाची पुढची पायरी असते, 'तत्वमसी', म्हणजेच समोरचाही 'ब्रम्हच'! आता तो ब्रम्ह, मी ब्रम्ह, म्हणजेच ही पुढच्या 'सर्वं खल्विदं ब्रम्हा ' या अंतिम बोधाची स्थिती असते. सगुणातून-निर्गुणाकडे, द्वैत्यातून- अद्वैताकडे जाणारा हा बोधप्रवास ही शिष्याची आतंरिक उत्क्रांती असते. या तीन टप्यातील काळसापेक्ष अंतर हे कित्येक वर्षाच असू शकत. आपण पुर्णज्ञानी झालो आहोत, हा त्यावेळच्या शिष्याच्या स्थितीतील भाव ही सगळ्यात शेवटी नष्ट होणे जरुरी असते. यात नुसत पुस्तकी ज्ञान अपेक्षित नसून, अनुभवजन्य ज्ञान महत्त्वाचे आहे.असे नसते तर जगातील तत्वज्ञानाचे सगळे प्रोफ़ेसर कधीच मुक्त झाले असते, नाही का? हिंदूवैदिकधर्मतत्वज्ञानानुसार, सगळ्यात श्रेष्ठ दान आहे ते 'आत्मज्ञानदान '. कारण हे ज्ञानच अंतिम ध्येय असणार्या 'मोक्षाकरिता'जरूरी पडते.त्यामूळेच आत्मज्ञानाच दान शिष्याला देणारे गुरुच, सद्गुरुंच स्थान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्यामुळेच आपण कायम विचार करताना, हा वरचा मूळ तत्वविचार कायम पडताळून पहावा, म्हणजे विचाराची दिशा सुरळीत होते. "हिन्दुत्वाचा खरा अर्थ म्हणजे नर सेवा हीच नारायण सेवा हा" हेच जर सत्य आहे असे मानले, तर वरील 'तत्वविचार'जुळत नाही, असे प्रथमदर्शनी वाटेल. पण खोल विचार केला असता असे जाणवते की तुम्हीं सांगितल्याप्रमाणे भुकेल्या माणसाचा धर्म कोणता, तर आपली भूक येनकेन प्रकारे पुर्ण करने हाच. भुकेल्या माणसास तत्वज्ञान सांगत बसणे, हा मुर्खपणाआहेच, पण समोरच्याच्या धर्माची खिल्ली उडवण्यासारखे आहे. जर त्याला ज्ञानप्राप्ती होणे हे त्याच्या अंतिम ध्येया करिता अतिशय जरूरी आहे, तर त्याची भूक पुर्ण होणे तेवढेच जरुरी असते, जेणेकरून तो मुख्य ध्येयाचा विचार करु शकेल. ह्या एकमेव सुविचारातूनच 'अन्न हे परब्रम्ह'हे सत्य आहे. म्हणूनच 'नर सेवा हीच नारायण सेवा'होय! ४)कर्म, उपासना, मन्:सयम वा ज्ञान यापैकी कोणत्याही एकाचा वा एकापेक्षा अधिकान्चा किन्वा सर्वच उपायान्चा अवलम्ब करुन ते उद्दीष्ट साधा आणी मुक्त व्हा. यातच सगळा धर्म आला, मते, वाद, क्रियाकान्ड, अनुष्ठाने, शास्त्रे, मन्दीरे वा ईतर बाह्य गोष्टी केवळ गौण तपशिलाच्या बाबी होत." या वरिल गोष्टिचा विचार करताना काही गोष्टिकडे आपले दुर्लक्ष होता कामा नये. स्वामी विवेकानंदाचा 'ज्ञानमा्र्ग'जर व्यवस्थित आकळायचा असेल तर, हे फ़ूल ज्या महावृक्षावर जन्मले त्या 'भक्तिमार्गी'परमहंस रामकृष्णांच चरित्र सखोल अभ्यास अतिशय जरुरी आहे. मूळ वृक्ष महत्त्वाचा, त्याची फ़ुले अनेक असू शकतात, पण त्याचा सुगंध,त्यातील सुरस ही देण असते ती त्या महावृक्षाची. दोघेही एकमेकावाचून अपुर्णच असतात. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा 'कर्ममार्ग'आकाळायचा असेल तर, समर्थरामदास स्वामीं आणि संत तुकारामांचा 'भक्तीमार्ग'जाणून घ्यावा लागेल. १२ व्या शतकात, अजून एक महावृक्षाच फ़ुल होऊन गेले. संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराज. अवघ्या २१ वर्षात ज्ञानेश्वरी,अमृतानुभव, चांगदेव पासष्ठी इ.सारख्या अमुल्यग्रंथसांभाराचे जनक असलेले माउली, हे एकमेवाद्वितिय अनुभवसिद्ध होते. कर्मकांड गौण आहेत, असे म्हणने धारिष्ठ्याचे ठरेल. पण हे 'साधन ' आहे हे मधल्या काळात विसरले जाऊन, त्याला 'साध्याचा' दर्जा असण्याचा आभास निर्माण झाला-करण्यात आला हे तेवढेच 'सत्य' आहे. शिष्याच्या एका विशीष्ठ स्थितीनंतरच हे गौण होऊ शकते, त्यामूळे सरसकट सगळ्यासाठी हे विधान चुकीचे असु शकते. तसे पाहायला गेले तर ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, भक्तीमार्ग हा वेगवेगळा मानन-अभ्यासन चुकीच आहे. कारण ज्ञानमार्गाने जाणार्याशिष्याची अंतिम अवस्था ही 'परमभक्ताची'असते. मोक्षाचा अधिकार, संधी ही जातीपाती वर आधारलेली नाही.उलट तो प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे.
|
Soha
| |
| Friday, April 06, 2007 - 10:46 am: |
| 
|
त्यांचे ब्रेन वाशिंग होऊ नये असे जर वाटत असेल तर त्यांना आपाण आपल्या सणा-समारंभात सामील करून घेतले पाहिजे. जर एखाद्या क्रिश्चन माणसाने घरात सत्यनारयणाची पुजा करायची ठरवली तर आपण त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. म्हंजेच त्या घरातील लहान मुलांना आपल्या सण्-समारंभ, पुजा इ. बद्दल आस्था वाटू शकेल. तसं बघीतलं तर हेकेखोर, कडवे लोक सर्वच जाती-धर्मात असतात. असे लोक कुठे ही गेले तरी दुसर्याची उणी-दुणी काढण्यातच धन्यता मानतात. त्यांच्याकडे दुलर्क्ष कारावे. किंवा अगदिच गरज पडली तर भांडवे. पण एखाद्या परधर्मी व्यक्तीला जर माझ्या धर्मा बद्दल आस्था असेल तर त्याच्याशी फटकून वागणे मला योग्य वाटत नाही. माझ्या भावच्या शाळेत दरवर्शी गणपतीच्य दिवसात अथर्वशीर्ष म्हणण्याची स्पर्धा होते. एका वर्षी काही करणाने ती होउ शकली नाही. एका मुसल्मान मुलाने आपल्या मित्राच्या मदतीने त्या स्पर्धेत भाग घ्यायची जोरदार तयरी केली होती. त्याने बाईंकडे जाऊन "स्पर्धा घ्या" असा लकडा लावला आणि स्पर्धेत भाग ही घेतला.
|
Chyayla
| |
| Friday, April 06, 2007 - 2:16 pm: |
| 
|
म्हणूनच बोधाची पुढची पायरी असते, 'तत्वमसी', म्हणजेच समोरचाही 'ब्रम्हच'! आता तो ब्रम्ह, मी ब्रम्ह, म्हणजेच ही पुढच्या 'सर्वं खल्विदं ब्रम्हा ' या अंतिम बोधाची स्थिती असते. सगुणातून-निर्गुणाकडे, द्वैत्यातून- अद्वैताकडे जाणारा हा बोधप्रवास ही शिष्याची आतंरिक उत्क्रांती असते. या तीन टप्यातील काळसापेक्ष अंतर हे कित्येक वर्षाच असू शकत. आपण पुर्णज्ञानी झालो आहोत, हा त्यावेळच्या शिष्याच्या स्थितीतील भाव ही सगळ्यात शेवटी नष्ट होणे जरुरी असते सावट आज तुमच्याकडुन ईतकी सर्वान्ग सुन्दर पोस्ट वाचायला मिळाली, धन्य झालो.. अगदी बरोबर आहे "अहम ब्रह्मास्मी" चा पुढचा टप्पा "तत्वमसी"... मी याला अजुन एका द्रुष्टीतुन पहातो. (अर्थातच यात माझे स्वता:चे काही नाही स्वामी विवेकानन्दाचे विचार वाचुनच वेगळ्या शब्दात म्हणतोय) जसे ख्रिश्चन व मुस्लिम ह्यान्च "बन्धुता" हे तत्व आहे त्यावर ते अम्मल ही छान करतात जसे नमाज पढताना (निदान शिया, सुन्नी कोणी विषिष्ट समुदायतच का असेना) सगळे एकाच रान्गेत उच्च्-निच्च असा भेद पाळत नाहीत त्यामुळे आपसुकच एक "बन्धुत्वाची" भावना निर्माण होते तोच प्रकार ख्रिश्चनान्मधे... ह्या बन्धुत्वाचे फ़ायदे आपण पहातोच की एकाला काही अडचण आली तर सगळे मदत करतील कीन्वा एकानी जरी आवाज दीला की "इस्लाम खतरेमे है" सगळे धावुन येतिल. वरवर पहाता हे तत्व खुप छान वाटत. दुसरीकडे हिन्दु तत्व्ज्ञानात बन्धुत्वाची चर्चा दीसत नाही त्यामुळे त्याचा असा सामाजिक फ़ायदाही होत नसावा पण सुक्ष्म विचार केला तर असे लक्षात येते की बन्धुत्वा पेक्षा ही उच्च असे "आत्मतत्व" अन्गिकारले आहे. शेवटी भाउ सुद्धा एकामेकाच्या जीवावर उठतोच ना... पण आत्म तत्वामधे जे ब्रह्म माझ्यात आहे तेच तुझ्यात आहे सगळे ब्रह्मस्वरुप आहेत म्हणजे जर समोरचा जर भुकेला असेल तर ती जाणीव, ते दुख मलाही होणारच व हे दुर करायचे तर त्याला अन्न देउनच करता येइल. आणी मला वाटत या सगळ्यान्ची सान्गड या ठिकाणी "नर सेवा ही नारायण सेवा" यात येते. तुमच्यासोबत चर्चा करुन आनन्द झाला. तुमच्या कडुन असेच वाचण्याचा लोभ वाढत आहे. सोहा तुमचाही मुद्दा एकदम योग्य आहे, आणी हीच चुक पुर्ण हिन्दु समाजही करतोय व यावर मात करण्यासाठी आपणच आपली ईतर धर्मातुन येणार्यान्साठी स्वीकार्यता वाढवली पाहिजे उद्या जर कोणी मुस्लिम मुलगी, मुलगा जर हिन्दुमधे येत असेल तर तो मुस्लिम आहे म्हणुन आपण स्वीकारणार नाही असे होउ नये, जर तुम्हाला त्याच्यात रस नसेल तर तोही कशाला येइल तुमच्यात?.. दुसरीकडे ख्रिश्चन व मुस्लिम ईतर धर्मियाना कसेही करुन याच म्हणतात एवढेच नव्हे तर त्याच्याशी रोटी-बेटी व्यव्हारही करतात व समाजात पुर्णपणे सामावुन घेतात हा त्यान्च्या Strong Point आहे तर तोच आपला Weak Point ... विचार करा जर उद्या कुणी ख्रिश्चन, मुस्लिम हिन्दुत आला तर आपली त्याच्याशी रोटी-बेटी व्यव्हार करुन आपल्यात सामावुन घ्यायला कितपत मानसिक तयारी आहे.? अनामिकाची गोष्ट थोडीफ़ार अशीच आहे तीने असे वाटते तीने ते केलेही असते पण तीच्या पोस्टवरुन असे वाटते की जीथे स्वता:च्या रक्ताच्या नात्यातच ईतका दुरावा आला होता की कदाचित ते तिच्या हातापलिकडे गेले असावे. घर, नाती हे घरातल्या स्त्रीवरच अवल्म्बुन असते, आणी त्याबाबतित तिची सासु पुर्णपणे अपयशी ठरली असे दीसते... तरी पुढे मागे अशी सन्धी आली तर अनामिकाने पण विचार करावा, असे सुचवावेसे वाटते.
|
मी अत्यन्त नास्तिक माणूस आहे. धर्माच्या दृष्टीने अत्यन्त पाखन्डी आहे. मी सर्वच धर्मांचा आत्यन्तिक राग करतो. असे असले तरी मला सावट आणि च्यायला सोहा यांची विचार मांडण्याची पद्धत आवडली. आपल्याकडील दर्शनांत खण्डन मंडन जसे केले जाते तसे. यामंडळीना त्या इस्लामिक बीबी वर गेल्यावरच काय होते ते कळत नाही...
|
Gobu
| |
| Friday, April 06, 2007 - 6:15 pm: |
| 
|
बापरे, काय वेगवेगळे विचार वाचायला मिळतात इथे रोबिन्हूड, तुमचा प्रान्जळपणा मनाला भावला बुवा! झक्की, उगीच इतर लोकांना दोष देण्याधी आपण हिंदू, इतर गरीब व अशिक्षित हिंदूंसाठी काय करतो हे पाहिले पाहिजे. ... इतक्या दिवसात पहील्यान्दा तुमच्याकडुन विचारपुर्वक लिखाण झाले आहे मनापासुन अभिनन्दन! (ही थट्टा मुळीच नाही) कुलकर्नी, मनाला लावुन घेवु नका वादविवादात असे होतेच तुम्ही लिहीत जा आपले विचार मान्ड्णे हे काही चुक नाही
|
Sunidhee
| |
| Friday, April 06, 2007 - 6:41 pm: |
| 
|
हो, वर छान विवेचन लिहिले आहे तुम्ही.. पण झक्किनी लिहिलेला मुद्दा वाहून जाऊ देऊ नये.. फार फार महत्त्वाचा आहे... conversion थांबवण्यासाठी आपण काय करु शकतो ते पण विचार करणे जरूरी आहे. गरीब लोकांना फक्त रोज थोडेतरी जेवायला कसे मिळेल ह्याची चिंता असते. कपडे, निवारा दूरची गोष्ट. त्या मुळे त्याना धर्म, देव, देवळे, अभ्यास ह्या सर्वांचा विचार पण सुचत नसतील. म्हणुन 'ते' लोक जेव्हा त्याना आमिष दाखवुन धर्मांतर करायला भाग पाडतात तेव्हा सोपे जाते. ह्यात त्यांचे शोषण झाले आहे हे पण कळत नसते. किंवा एकदा धर्म बदलला, थोडे दिवस बरे गेले, पुढे काय होईल हा पण विचार ते करत नसतील. अहो, एखादा दिवस २-३ तास जेवायला उशीर झाला तर आम्हाला त्रास होतो.. आपल्या मुलांनी एक दिवस नीट जेवण नाही केले तर आम्हाला वाईट वाटते. मग हे लोक, त्यांची मुले तर रोज अर्धपोटी असतात. ते का नाही म्हणतील? बाकी मोठमोठ्या मंत्र्याना काय काय लाच देत असतील तो वेगळा भाग.. तो हावरटपणा झाला.. (तरी साधा शब्द वापरला आहे). आणि अनामिका चा अनुभव वेगळा. सगळ्याला एकच उपाय लागू होत नाही. मला तरी सध्या एकच माहिती आहे. संघाच्या वनवासी आश्रम कार्यक्रमासाठी आर्थिक मदत करणे. अजुन काही असेल तर सांगावे. सोलापुरजवळ (बहुतेक, नक्कि गावाचे नाव विसरले) एक मुलींसाठी संघाचा आश्रम आहे. त्यात आदिवासींच्या ४०-४५ मुली कायम रहातात. तिथेच शाळा अहे, शिकतात. त्यांचे सर्व शिक्षण तिथेच पुर्ण करतात, स्वतंत्र होइतोवर. ही माहिती मला ३ वर्षापुर्वी मिळाली होती म्हणुन details जरा नीट आठवत नाहियेत. अश्या संघाच्याच नाही, अनेक योजना चालु असतील, ते पण सर्वाना कळु द्या.
|
Zakki
| |
| Friday, April 06, 2007 - 8:38 pm: |
| 
|
मी जो मुद्दा मांडला तो खरे तर इथे पूर्वीच निरनिराळ्या शब्दात इतरांनी मांडला होता. जसे अत्यंत 'ढ' मुलाने एखादे गणित सोडवून दाखवले की त्याचे कौतुक होते, तसे एरवी धड न लिहिणार्या मी, काहीतरी बरे लिहीले. तुम्ही ते जाणून मला चांगले म्हंटलेत. धन्यवाद.
|
Zakki
| |
| Friday, April 06, 2007 - 10:21 pm: |
| 
|
सावट, सोहा यांनी लिहीलेले वाचून मी अत्यंत प्रभावित झालेलो आहे. अगदी 'नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा' असे झाले. धर्म ही संकल्पनाच संकुचित् आहे. तत्वज्ञान असे जबरदस्त आहे की त्यापुढे इतर सर्व फिके पडते. त्याची अनुभूति घेणे हे सुद्धा गीतेमध्ये सांगीतलेल्या मार्गाने शक्य आहे. फक्त एकमार्गी प्रयत्न केला पाहिजे. इतरत्र लक्ष जाऊ दिले नाही पाहिजे. यापुढे कधीहि कुठल्याहि गोष्टीकडे पहाताना धर्माचा विचार करणार नाही. 'ब्रम्ह सत्यं जगन्मिथ्या' असे जर आहे, तर काय फरक पडतो कोण हिंदू, कोण मुस्लिम, कोण ख्रिश्चन. जाईनात अगदी सर्व नोकर्या मुस्लिमांना नि ख्रिश्चनांना. शेवटी तेहि 'ब्रम्हच'. आता मुसलमानांच्या मते काफिरांची हत्या करणे हा त्यांचा धर्म. मग त्यांना त्यांच्या धर्माने वागू दे! शेवटी मरते ते शरीर, त्याला पुनर्जन्म आहेच! ख्रिश्चनांच्या धर्मात फक्त ख्रिस्ती लोकांना ' salvation ' मिळते, म्हणून उदार बुद्धीने ते इतरांना ख्रिश्चन बनवण्याचा उद्योग करतात. हा त्यांचा धर्मच. तेहि 'ब्रम्ह' च. या कुणाला प्रत्यक्ष विरोध तर करूच नये, पण अहिंसेच्या तत्वाप्रमाणे त्यांच्या मनाला देखील त्रास होऊ नये, म्हणून हिंदू धर्माचे गोडवे गाऊ नयेत. हेच खरे, नि त्यातच सर्वांचे कल्याण आहे. तेंव्हा सर्वजण आता भांडणे सोडून द्या. आपल्या तत्वज्ञानाचे प्रत्यक्षात आचरण पराकोटीला तेंव्हाच पोचेल, जेंव्हा आपण मुसलमान व ख्रिश्चन यांना सर्वस्व अर्पण करून, आपण परमेश्वराकडे वळू.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|