|
बी, परत वाच... मी ते उदाहरण माझं आहे असं म्हटलय का? आणि हो, उपदेशाचे डोस पाजून काहीही होत नाही. त्यासाठी मनाचा ठाम निर्धारच लागतो. आणि मन तर.. वढाय वढाय
|
आयला, काय सणसणीत उदाहरण दिलं.. सगळे गायबच झाले... ok वादविवाद finnisshh
|
Bee
| |
| Friday, February 02, 2007 - 8:15 am: |
| 
|
नंदीनी, ते उदाहरण आहे हे कळलं पण तू ज्या पद्धतीने ते लिहिलस त्यावरुन मला वाटलं तू तुझ्याबद्दल बोलत आहेस आता परत एकदा वाचून तू काय म्हणते आहेस ते लक्षात आलं. रागवू नकोस
|
अरे, रागावण्यसारखं काय आहे त्यात? पण हे उदाहरण पूर्णपणे सत्य आहे... बाकी मी ज्या व्यक्तिबद्दल बोलतेय तिचा दारू आणि सिगरेटवरचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे. मदिरा हे एक शास्त्र आहे हे मला त्याच्याकडुनच कळाले.
|
आर्च, family crisis मुद्दा बर्याच व्यसनान्ना लागू पडतो त्याचबरोबर वाईट सन्गत, शायनिन्ग मारणे, शूरपणा वाटणे, चाळा म्हणुन अशी अनेक कारणे हेत.....! एनिवे! मी वयाच्या कितव्या वर्षी पहिल थोटूक ओढुन बघितल ते आठवत नाही पण वय वर्षे अठरा ते वीस दरम्यान शिगारेटिन्च व्यसन लागल, वयवर्षे २३ असताना दिवसाला २३ / २४ शिगारेटीन्वर काऊण्ट असताना एका झटक्यात सोडल! फार विशेष नाही काही केल, पण एक सोडण्याकरता दुसर तम्बाखू चघळायच लावुन घेतल गेल! ते अजुनही चालूच हे! कित्येक जणान्ना शिगारेटीचा वास जराही सहन होत नाही, माझ्या लिम्बीला पण होत नाही! सार्वजनिक जागी शिगारेटी फुन्कण्यावरील बन्दीचा कायदा यायच्या आधिपासुन माझी लिम्बीला त्रास होण्यामुळे अनेकान्शी अनेक ठिकाणी भाण्डणे झाली हेत, तेव्हा आम्ही काय तुझ्या बापाच्या पैशाने ओढतो कारे भो XXXX , इथपासुन ते हिथुन टळायच बघा सहन होत नाही तर, इथपर्यन्त ऐकलेल हे, आणि मग ऐकवायला जायचो ते कानाखाली जाळ काढायलाच तेव्हा कुठे त्यान्च्या हातुन शिगारेटी गळुन पडायच्या! अजुन एक प्रवाद आढळतो, तो म्हणजे अग्निला पाय कसा लावायचा म्हणुन रस्त्यावर टाकलेल थोटुन तसच जळत ठेवणारे असन्ख्य नरपुन्गव रोज दिसतात! कोण अनवाणीचा त्या थोटकावर पाय पडला तर विन्चू चावल्या प्रमाणे कशा वेदना होतात या दोन्हीन्चा मला अनुभव हे! बाकी काय? युवराज महाशय, आपल्या मुळे दुसर्यास कसलाच त्रास होवु नये ही वृत्ती अन्गात असेल तर शिगारेट कुठे प्यावी हा प्रश्ण निकालात निघतो!
|
Rajabhau
| |
| Tuesday, April 03, 2007 - 5:41 pm: |
| 
|
मी सिगरेट सोडु नका पण प्रमाण तरी कमि करता येवु शकते.
|
Disha013
| |
| Tuesday, April 03, 2007 - 9:11 pm: |
| 
|
आज सगळा BB वाचला. सोन्यासारखे आयुष्य असे वाया घालवणारी माणसे पाहिली ना की फ़ार वाईट वाटते. मला स्मोकिन्ग करणा-यांना एक फ़ुकटचा सल्ल्ला द्यायचाय. काही गैर नाहीये ना त्यात, मग हे काम घरी करुन बाहेर पडावे. तुमच्या घरात म्हातारे आजी, आजोबा, भावंडे, आई,वडील, बायको, तुमची तान्ही,छोटी गोजिरवाणी मुले असतील ना, त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडावर सोडा तो धुर.... मला वाटते, कुणाचीही हरकत नसेल. मुले थोडी कळती झाली ना, की स्वत्:च द्या ना सिगारटेचे पाकीट हातात. कशी निर्भीड होईल ना ती पिढी मग...येणार्या संकटांचा सामना करायला. बाहेरच्या लोकांना का देता त्रास?
|
माझ्या ऑफिसशेजारी एक बीपीओ चे ऑफिस आहे. रोज तिथल्या अनेक मुली उघडपणे धूम्रपानाचा आनंद घेताना दिसतात. आश्चर्य म्हणजे माझ्या आयटी कंपनीतल्या मुलींमध्ये धूम्रपानाचे प्रमाण अतिशय कमी आहे. दोन शेजारीशेजारी असलेल्या आणि जवळपास एकसारख्याच व्यवसायात असलेल्या मुलींमध्ये हा फरक का? बीपीओ संस्कृतीने काही प्रमाणात रोजगार आणि सुबत्ता दिली असली तरी तिथल्या कर्मचार्यांवर एकंदरीत वाईट परिणामच केलेला दिसतोय. तिथल्या मुली इतक्या मोठ्या प्रमाणावर उघडपणे धूम्रपान करत असतील तर कदाचित अजून अनेक गोष्टी करत असाव्यात.
|
सतिश, मूर्खपणाचा मक्ता काही मुलानीच घेतलेला नसतो...
|
Zakki
| |
| Wednesday, April 04, 2007 - 4:37 pm: |
| 
|
मुली सिगरेट पीत होत्या म्हणून तुम्हाला जास्त खटकलेले दिसताय्. मुले असती तर लक्ष गेले असते का तुमचे? नि बीपीओ म्हणजे काय? त्यांची संस्कृति म्हणजे काय? संस्कृति घरच्या शिक्षणाने मिळते. तुम्हाला कदाचित् वाईट सवयी असे म्हणायचे असेल. त्या काय, बीपीओ नसेल तरी लागू शकतात. त्याचा नि रोजगार नि पैसे असण्याचा काही संबंध नाही!
|
Asami
| |
| Wednesday, April 04, 2007 - 5:55 pm: |
| 
|
मुले असती तर लक्ष गेले असते का तुमचे? >> अहो अजुन देश एव्हढा नाहि पुढारलेला !!! अजून पोरे पोरीच बघतात तिथे
|
asamya, lol.. sahi javab.. 
|
Deshi
| |
| Wednesday, April 04, 2007 - 10:00 pm: |
| 
|
अजून पोरे पोरीच बघतात तिथे >>>> On serious Note tikde he "to" trend change hot aahe.
|
भारतातली नवीन पिढी, विशेषत: नवीन पिढीतल्या महिला जागतिक स्पर्धेत जोमाने टक्कर देत आहेत आणि कुठेही कमी पडत नाहीत, हे बघून ऊर अभिमानाने भरून आला. भारतीय महिला आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेली आणि पुरुषांची मक्तेदारी असलेली एकेक क्षेत्रे वेगाने काबीज करत आहेत. भारताचा भविष्यकाळ नक्कीच उज्वल आहे. भारत २०२० च्या कितीतरी आधी महासत्ता होणार.
|
मी कुठल्याही पद्धतीने स्मोकिंगला योग्य म्हणत नाही.. पण जर एखाद्या मुलीने सिगरेट ओढली तर त्यात एवढे तिरके बोलण्यासारखे काय आहे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे,,, सिगरेट ओढणारी मुलगी स्वत्:बरोबरच होणर्या बाळाचा जीव धोक्यात घालत असते.. पण अशावेळेला सर्वच मुलीना त्या रांगेत नेऊन बसवणे किती योग्य,,, आणि वर बाजूच्या बी पी ओ मधल्या मुलीच सिगरेट ओढतात.... "माझ्या" आयटी कंपनीत हे प्रमाण कमी आहे,,, !!!! आणि त्याच मुली अजून "बर्याच गोष्टी करत असाव्यात"!!!!! हा अंदाज... सतीशजी, माफ़ करा.. पण एक मुलगी म्हणून मला तुमचे हे बोलणे खटकले आहे.
|
नंदिनी, ही बीपीओ कंपनी आणि मी काम करतो ती आयटी कंपनी या एकाच ग्रुपच्या कंपन्या आहेत. त्यांच्या इमारती शेजारी शेजारी आह्त. म्हणून रोज जातायेताना हे दृश्य दिसते. माझ्या पूर्वीच्या कंपनीत अगदी हेच दृश्य होते. आयटीमधल्या मुली क्वचितच धूम्रपान करताना दिसतात. त्याच कंपनीच्या बीपीओ मध्ये हे प्रमाण खूपच जास्त आहे. माझ्या दृष्टीने मुलींनी उघड उघड पुण्यासारख्या शहरात धूम्रपान करणे हे सर्वाधिक धाडसाचे काम आहे. इतर गोष्टी या कृत्यापुढे फिक्या पडतात. भारतात चित्रपटांतून किंवा सासू-सुनांच्या मालिकांतून सुद्धा काही खलनायिका बर्याच वाईट गोष्टी करताना दाखवितात. पण धूम्रपान करणार्या खलनायिका फारश्या दिसत नाहीत. (याचा अर्थ सर्व धूम्रपान करणार्या महिला खलनायिका असतात असा कृपया घेऊ नका.) भारतात महिलांनी उघडपणे धूम्रपान करणे अजूनतरी समाजमान्य नाही.
|
पण ते पुण्यामधे सर्वमान्य आहे बहुतेक. जिकडे गेलो तिकडे निदान १ २ मुली धुम्रपान करताना दिसल्या. मुंबईत हे प्रमाण कमी दिसल. हे फ़क्त निरीक्षण सांगितल. तात्पर्य नाही
|
बाकी युवराजने सिगरेट सोडलेली दिसते. अर्चच्या सांगण्याचा परिणाम झाला बहुतेक. bravo...
|
Arch
| |
| Thursday, April 05, 2007 - 10:47 pm: |
| 
|
पण जर एखाद्या मुलीने सिगरेट ओढली तर त्यात एवढे तिरके बोलण्यासारखे काय आहे >> माझ्यामते मुली तल्लख बुध्दीच्या असतात. त्यांना धुम्रपानाचे धोके माहित असतात, समजतात आणि त्या नकीच ते टाळतात अस मला वाटायच. त्यामुळे त्यांनी धूम्रपान केल तर नक्कीच आश्चर्य वाटत. Now I have to change my hypothesis
|
नाही.. आर्च.. हल्ली मुलीमध्ये ही धूम्रपानाचे प्रमाण वाढत आहे. त्यामागे जर पुरुष करतात मग मी का नाही ही भावना जास्त आहे. बाकी सिगरेटमुळे सगळ्यात जास्त त्रास स्त्रियाना होतो ही गोष्ट सांगूनही पटत नाही... आणि हे पुण्या मुंबईचे उदाहरण मी ही पाहिलं आहे. मुंबईमधे मुलीचे स्मोकिंगचे प्रमाण खरंच कमी आहे.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|