Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 04, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » General » Archive through April 04, 2007 « Previous Next »

Kedarjoshi
Tuesday, April 03, 2007 - 5:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला योग्य पाईंट.

पुण्यात वेस्ट एन्ड समोर मराठी चर्च आहे. तिथल्या पादर्याला खास जाऊन विचारले काहो नाव असे मराठी चर्च का? तुमचा धर्म तर एकच आहे आमच्या सारखी जात पात तुमच्यात नसेत. तो म्हणाला ' कोणी सांगीतल तुम्हाला आमच्यात जात नाही. जर महार किरीस्ताव झाला तर त्याचे लग्न महार किरीस्तावाशीच होते ईतर किरीस्ताव त्याला पोरगी देत नाहीत. ' ही परिस्तिथी आहे. आमच्यात पण भेद भाव आहे.(सन १९९६).

पण काय की त्यांचातला भेदभाव दाखवुन द्यायला आपण थोडी पुरोगामी आहोत? आपण तर तेच मागासलेले.

१९९० ते ९२ च्या सुमारास नांदेड मध्ये अचानक किरीस्ताव लोक वाढायला लागले. थोडा सोध घेतला तर कळाले की अनेक मिशनरी लोक आले आहेत. सर्व चोकात येशु कडे या तो तुम्हाला मदत करेल असे फलक होते. म्हणल जावच येशु कडे बघु काय होते ते. मस्त पैकी भर बाजारात बसलेल्या व येसु कडे या अशा प्त्रक वाटनार्यांना भेटलो म्हणल ' मी येतो येशु कडे पण आधी तुम्हाला पाठवतो कसें? ' सोबतच्या कार्यकर्त्यांनी मगे दिवसास्च आकाशातला बाप दाखवुन दिला. गरिब लोकांना भेटायचे त्यांना पैसे द्यायचे व सुशिक्षीत लोकांना येशु कसा मार्ग दाखवतो हे सांगुन भरीस पाडायचे.

मी ज्या येशुच्या कार्यकत्याला भेटलो त्याचे नाव राम होते. (ही हद्दच म्हणा)

तर सांगायचा मुद्दा छुप्या शत्रु पेक्षा उघड शत्रु चांगला.

आणि तो शाळेचा मुद्दा एकदम परफेक्ट.


Zakki
Tuesday, April 03, 2007 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिन्दुला बीफ बर्गर दीला तर तोही सन्तपेल ना?
पण त्याने तसे संतापायला नको असे म्हणायचे आहे का? मग कुणि मुसलमानांना किंवा ज्यू लोकांना हॅम किंवा पोर्क देऊन बघा! १ लाख मुस्लिम त्यांचे घर दार जाळायला उठतील. १ लाख ज्यू निदर्शने करून, तुमच्यावर खटला भरून, तुमची जाहीर निंदा नालस्ति करून, तुमची सगळी स्थावर, जंगम मालमत्ता गिळंकृत करतील!

त्यात तुम्हाला काही चूक दिसणार नाही का?

पण हिंदूने नुसता सात्विक संताप दाखवला तरी लोकांना बोचते?




Saurabh
Tuesday, April 03, 2007 - 11:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा लेख वाचा. लेखाचा मुख्य मुद्दा (शैक्षणिक क्षेत्रात परीक्षा पद्धतीत बदलाची गरज) जरी अत्यंत योग्य असला तरी 'प्रस्थापित' (ब्राह्मण म्हणायचे लेखकाने खुबीने टाळले आहे!) लोकांबद्दलचा पोटशूळ काही लपवता येत नाही हे दुर्दैव! संपूर्ण लेखात आकलनावर आधारीत परीक्षापद्धती, जसे की जेईई, ह्याबद्दल साधा उल्लेख नाही? त्या ऐवजी कशाला 'ज्ञान' म्हणायचे ह्याचीच व्याख्या बदलण्याची उठाठेव? (कारण विषयाच्या आकलनावर आधारीत परीक्षा घेऊनच प्रवेश देणार्‍या संस्थातही 'आरक्षण' ठेवण्याची गरज भासते म्हणून?)
कुछ जम्या नही...


Vijaykulkarni
Wednesday, April 04, 2007 - 12:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे,
थोडेसे अन्तर्मुख होवुन विचार करा.

१ हिन्दू धर्मला इतके का वाईट दिवस आलेत की हिन्दु धर्म श्रेष्ठ कसा हे सान्गणे इतर धर्मान्ची उणीदुणी काढल्याशिवाय जमू नये?

२ योगा योगाने आपण इतर धर्मात जन्मलो असतो तर त्या ही धर्माचे इतकेच हिरिहिरीने समर्थन केले असते?



Chyayla
Wednesday, April 04, 2007 - 12:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है... दुसर्या धर्माची उणी दुणी कुणी काढली नाहीत साहेब. तुम्ही जो सुर्यावर थुन्कायचा प्रयत्न केला तीच थुन्की तुमच्या स्वता:च्या तोन्डावर पडली. वरच्या पोस्ट नीट पहा सुरुवात कोणी केली? तुम्हीच जे खोडसाळ पोस्ट केले त्यालाच प्रत्युत्तर मिळाली आहेत.. आता एका तरी मुद्याचे प्रामाणिक उत्तर अपेक्षीत होत तुमच्या कडुन उलटा रडुबाईचा डाव खेळलात राव.

दुसर्या धर्मात जन्मले असता तर... तेही राहु द्या, ईथे आपल्याच सन्स्कृतीत (धर्मात नव्हे) जन्मलेले सेक्युलर पिल्लावळ दुसर्यान्च्या धर्माला चुकीच्या मार्गाने समर्थन करीत आहेत.
मुद्दा तोच सुरु आहे. सहिष्णुतेच्या नावाखाली दुसर्या धर्माची असहिष्णुता सहन करणे... म्हणजे अन्याय सहन करणेच होय.. अन्याय सहन करणे हे अन्याय करण्याएवढेच पाप आहे.



Shendenaxatra
Wednesday, April 04, 2007 - 1:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सेमेटिक धर्म म्हणजे ख्रिस्ती, ज्यू व मुस्लिम हे एकेश्वरवादी आहेत. त्यामुळे साहजिकच त्या धर्मात एक उपजत कडवेपणा आहे.
अनेक देव मानणारे हिंदूंसारखे धर्म इतर धर्मांना सहज सामावून घेतात. आपला राम, मारुती तसाच एखाद्या मुसलमानाचा अल्ला असे ते स्वीकारु शकतात. पण जे लोक अल्ला शिवाय कुणी देव नाही अशा आरोळ्या दिवसातून पाच वेळा रोज ठोकतात त्यांना सहिष्णूपणा सहजासहजी जमणार नाही.
हे धर्म मूर्तीपूजेचादेखील कमालीचा तिटकारा करतात त्यामुळे त्याही बाबतीत हिंदू धर्माला तेवढाच बरोबरीचा दर्जा देणे त्यांना जमत नाही. प्रत्येकाला आपापल्या संस्कृतीचा अभिमान असतोच पण तो ह्या धर्मात जास्त अधोरेखित होतो असे मला वाटते.


Mansmi18
Wednesday, April 04, 2007 - 2:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर कुलकर्णीकाका,

आम्ही सगळे चुकिचे आहोत असे समजा आणि तुमचा मुद्दा सान्गा बरे. कारण तुमचा मुद्दा काही कळत नाही बुवा!(जर चुकुन असलाच तर)



Kedarjoshi
Wednesday, April 04, 2007 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुलकर्णी तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. पण तो आयडीयल आहे. म्हणुनच स्वतच्या दुनीयेत जे राहातात त्यांचासाठी आहे.

जर सर्व धर्म समान तर दुसर्या धर्मानी ईतर धर्मावर का हल्ला करावा? वर जर हल्याल्या प्रत्युत्यर दिले तर तो समाज प्रतीगामी की पुरोगामी. स्वत च्या धर्माला राखने यात काहीच वाईट नाही. (तुम्हीच वर लिहिले की आपण जर मुसल्मान झालो असतो तर आपण ही तोच धर्म श्रेष्ट मानला असता मग असलेला हिंदु धर्म श्रेष्ट मानला तर काय चुकले?

आता तुम्ही म्हणाल सर्वधर्म समभाव हिंदु धर्मात सांगीतले आहे. बरोबर पण जर तुम्ही मला हे सांगाल की नाही तु किरिस्ताव वा मुस्लीम हो (असे समजु की तो तुमचा धर्म आहे व तुम्ही मला सांगता की धर्म बदल म्हणुन) मग तुम्ही बरोबर नी त्याला विरोध करनारा मी चुक कसा?

सर्व्धर्म समभाव फक्त हिंदुनीच किती दिवस चालवायचे. एक दिवस मग हाच धर्म नाहीसा नाही का होनार. (संस्कृत भाषे सारखा).

(जस्ट FYI गांधीना ईंग्लडांमध्ये गेल्यावर त्यांचा तेथील मित्रांनी त्यांना किरीस्ताव करन्याचा घाट घात्ला पण ते बधले नाहीत. ते म्हणाले मला माझाच धर्म निट कळाला नाही अजुन तर नविन किरीस्ताव धर्म कसा कळेल. मग त्यांनी हिंदु धर्माचा जास्त अभ्यास केला.)

तर लिहायच मुद्दा हा की जर दुसरे लोक धर्मातंआर करायला भाग पाडत असतील वा एकाध्या धर्मावर अत्याचार करत असतील तर त्या धर्मातील लोक शांत बसनार का? ( उदा ज्यु, किरीस्ताव व मुस्लीम) मग जर ते शांत बसनार नसतील तर फक्त हिंदुनीच बसावे असे तुम्ही का लादत आहात.


Mandard
Wednesday, April 04, 2007 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिंदु धर्माला जाती पातीचा शाप आहे. उत्तर भारतात तर ह्याचा पगडा खुप आहे. ह्याचाच फ़ायदा ख्रिस्ती लोक घेतात. धर्मांतर केलेले ९९% दलीत वा आदिवासी हिंदु असतात. संघ आदिवासी कल्याण आश्रमाद्वारे ह्याला थोडाफ़ार प्रतिकार करतो. पण संघाला ह्या लोकांसारखे आर्थिक पाठबळ नाही.

Zakasrao
Wednesday, April 04, 2007 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला,
तु खुप छान लिहितोस. मुद्देसुद लिहितोस. तो लेख वाचुन कळाल असेलच की नवीन गोष्टीना सामोरे जाताना पुराणातील गोष्टी पुराणात ठेवाव्यात पण नेमके त्यावेळी त्या नाइकांचा धर्म आडवा येतो. बाकी सर्व फ़ायद्याचा गोष्टी असतील तर धर्म आडवा येत नाही.
अरे प्रत्येक रविवारी सुधिंद्र कुलकर्णी यांचा लेख लोकसत्ता मधे येतो. मी वाचतो कारण खुप मुद्देसुद असतो.तु वाचत जा. लोकसत्ता रविवार मधे रविवार विशेष मधे असतो. त्याचा अनुवाद असतो. नक्की वाच. online मिळेल तुला.

Anamikaa
Wednesday, April 04, 2007 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुलकर्णी
तुमच्या मते माझे(जरा) काय चुकले हे जरा स्पष्ट केलेत तर उपकार होतिल.
अनामिका


Gobu
Wednesday, April 04, 2007 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुलकर्नी,
तुमचे मत योग्य आहे


Anamikaa
Wednesday, April 04, 2007 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुलकर्णी!
तुमच्या स्पष्टिकरणाच्या प्रतिक्षेत होते पण तुम्ही उत्तर देण्याच्या स्थितित दिसत नाहि कि कदाचित तुमच्याकडे उत्तरच नाही म्हणुन
असो! माझे संबंध बिघडल्याचे शल्य मला जरुर आहे पण मला त्याची खंत अजिबात नाही.
माझ्या सदसदविवेक बुद्धिला जे पटले त्यानुसार मी वागले.माझ्या नणंदेने घेतलेल्या एका आततायी निर्णयाचे कीती दुरगामी परिणाम झालेत ते मी बघितले आहेत. आमच्या घराचा आधारस्तंभ असलेल्या माझ्या सासर्‍यांना लेकिच्या या निर्णयापायी आपला जिव गमवावा लागला. आमच्या डोक्यावरचे छत्र हरवले आणि आज आमच्या घराची झालेली हि क्षति कुणीही कितिहि प्रयत्न केले तरि भरुन काढु शकत नाहि.
आमच्या घराचे तारु या प्रकारानंतर जे भरकटले ते पुन्हा कधिहि सुस्थितित येवु शकलेले नाहि. घरातच नात्यांमधे तयार झालेल्य अदृष्य भिंति कधिहि पाडता येणार नाहित.
हल्लि गुजरात मध्यप्रदेश,आसाम,या राज्यातुन चाललेल्या ख्रिस्तिकरणाने हिंदु धर्मावर संकट आले आहे तिथे किमान एक तरि आहे कि जि लोक धर्मांतर करीत आहेत ती गरिब आदिवासि जमात किंवा दारिद्र्य रेषेखालील माणसे आहेत.त्यांची दिशाभुल करुन त्यांना सक्तिने धर्मांतर करण्यास भाग पाडले जात आहे.पण माझी नणंद तर आर्थिक सुबत्ता असलेल्या सुशिक्षित,सुसंस्कारित घराण्यात जन्माला आली होती. मग तिने असे का करावे?.याही पेक्षा तिच्या नवर्‍याने तिला धर्मांतर करण्यास बाध्य का करावे? हिच उदारता तिच्या नवर्‍याने हिंदु धर्म स्विकारुन दाखवलि असति का?....
माझे स्वतःचे म्हणाल तर मी जन्माने आणि कर्माने हिंदु आहे आणि काहिहि झाले तरि हिंदु म्हणुनच मरणे पसंत करिन. अशी नतद्रष्ट अपत्ये जन्माला येण्यापेक्षा मी निपुत्रिक राहणे मी पसंत करीन.

अनामिका!


Nandini2911
Wednesday, April 04, 2007 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी जेव्हा माझगावच्या ख्रिश्चन हॉस्टेलमधे होते तेव्हा मला रातोरात हॉस्टेल सोडण्याची धमकी दिली होती.
माझ्या बाजूच्या रूममधे राहणारी सिल्वी कित्येकदा हिंदू धर्माबद्दल अपशब्द काढायची.. मी सुरुवातीला उत्तर दिलं नाही.. पण जेव्हा अतिरेक व्हायला लागला तेव्हा उलट उत्तर द्यायला सुरूवात केली. मी रोज सकाळी हॉस्टेलच्या चेपेलमधे जाऊन स्तोत्र म्हणायचे.. ही मात्र कधी प्रसाद दिला तरी घ्यायची नाही.. वर मी खात नाही असले हे ही सांगायची..
एक दिवस तुझ्या गेल्या सातही पिढ्या येशुची लेकरे आहेत हे सिद्ध कर आणि मग पुढे बोल... असे सुनावले. माझे बघून बाकीच्या मुलीनीही बोलायला सुरुवात केली.. वर ती प्रेयरला बसली की आम्ही सगळ्याजणी एका सुरात "घालीन लोटांगण सुरू करायचो.."
शेवटी तिने तक्रार केलीच.. चर्चाच्या फ़ादरपर्यन्त गोष्टी गेल्या.. पण आम्ही सगळ्या हिंदू मुली एकत्र राहून हीच कशी वागते हे सांगितले. आणि शेवटी पत्रकार आहे हे सांगून झाल्यावर सगळी शांतता झाली.
पण ही मुलगी बधली नाही. तिच्या मैत्रिणीने अगरबत्ती लावल्यावर मला दम्याचा अटेक आला असे खोटेच सांगितले.
मला स्वत्:ला कुठ्ल्याच धर्माचा राग येत नाही. ख्रिसमससाठी मी माझ्या मैत्रिणिकडे गोव्याला गेली आहे. पण हे लोक दुसर्या धर्माबद्दल जो कडवेपणा दाखवतात ते बघून राग येतो.
"इन्सान भी नही बन पाये तो भगवान को क्या पाओगे?"


Vijaykulkarni
Wednesday, April 04, 2007 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनामिका,
कोणत्याही स्त्रीला माहेरचा मोठा आधार वाटत असतो.
केवळ गळ्यात क्रॉस लटकविला म्हणून रक्ताची नाती तुटू नयेत,
राखीचा दोरा ख़्रोस च्या साखळीपेक्शा बळकट असतो.
शेवटी आपण सारे क्षणाचे प्रवासी,
असो, कोणालही दुकवायचा किन्वा जखमेवरची खपली काढायचा माझा हेतू नाही.
सर्वे सुखिन सन्तू.
सर्वे सन्तू निरामया.


Mansmi18
Wednesday, April 04, 2007 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व्धर्म समभाव फक्त हिंदुनीच किती दिवस चालवायचे. एक दिवस मग हाच धर्म नाहीसा नाही का होनार. (संस्कृत भाषे सारखा).

तर लिहायच मुद्दा हा की जर दुसरे लोक धर्मातंआर करायला भाग पाडत असतील वा एकाध्या धर्मावर अत्याचार करत असतील तर त्या धर्मातील लोक शांत बसनार का? ( उदा ज्यु, किरीस्ताव व मुस्लीम) मग जर ते शांत बसनार नसतील तर फक्त हिंदुनीच बसावे असे तुम्ही का लादत आहात.

---------------------------------------------------
केदार, १००% बरोबर.

सहिश्णुतेचा अर्थ दुबळेपणा घेतला जाउ नये.


Peshawa
Wednesday, April 04, 2007 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केवळ गळ्यात क्रॉस लटकविला म्हणून रक्ताची नाती तुटू नयेत, >>> पण केवळ मुर्तीपुजा करतात म्हणुन ति तोडली तर ते चालते? बप्तिस्मा क्रिस्त नसलेल्याचापण तो धर्म स्विकारताना होतोच! मुलाचा होणार नाही ही शुद्ध थाप! त्या स्त्रिने आपण्हुन धर्म बदलला असता तर तो वयक्तिक choice थरला असता. पण जे घडले ते forced conversion पण विजय तुमचे बरोबर आहे हिंदुनी सहिश्णुता म्हणुन गप्प बसणेच उत्तम!

the harvest is organized and well funded activity. the total number of souls is important to the harvester what Jesus said has no meaning or if there is any it is distorted beyond recognition but who cares... this approach of harvesting should be categorized as a form of terrorism. and it takes many forms marrying hindus and converting them to faith is just one way ( I find that most sickning), taking adavantage of their situation like in case of tsunamies earth quakes is another

ह्या देशाची परंपरा आहे ती अनुययी विचाराने जिंका पैशाने नाही. असेल हिंमत तर शकराचार्यांसारखे सर्वस्व पणाला लावून वाद घाला धर्ममतांवर आणि जिंका तोलामोलाचे अनुययी... कोण अडवतय?


Gobu
Wednesday, April 04, 2007 - 7:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुलकर्णी!
तुमच्या स्पष्टिकरणाच्या प्रतिक्षेत होते पण तुम्ही उत्तर देण्याच्या स्थितित दिसत नाहि कि कदाचित तुमच्याकडे उत्तरच नाही म्हणुन

मित्रहो,
वैयक्तीक टीका टाळावी
विषयाला धरुन लिहिणे हेच उत्तम.


Vijaykulkarni
Wednesday, April 04, 2007 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या स्त्रिने आपण्हुन धर्म बदलला असता तर तो वयक्तिक चॉईस फोर्सड
त्यात त्या बिचारिचा काय दोष?


Savyasachi
Wednesday, April 04, 2007 - 9:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुत्रिपुजा??? पेशवा, ठिक कर रे

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators