|
न्युझीलंड नी जर RSA चा सामना जिंकला तर कदाचीत worldcup ते जिंकतील. (ऑफकोर्स ऑस्ट्रेलिया ला हारवुन). जर ते RSA सोबत हारले तर मात्र RSA vs AUS .
|
Gobu
| |
| Saturday, March 31, 2007 - 7:53 am: |
| 
|
नान्या, मन्स्मि, दोघेही ग्रेट आहात  हसुन हसुन पुरेवाट झाली!!!
|
आजच्या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकल्यास प्रथम फलंदाजी करावी. श्रीलंका धावांचा पाठलाग करण्यात फारसे यशस्वी होत नाहीत. विशेषत: भारत आणि वेस्ट इंडिज त्यांच्याविरूद्ध दुसरी फलंदाजी असेल तर बहुतेकवेळा दबावाखाली हरतात. २००३ विश्वचषकामध्ये सुद्धा श्रीलंकेच्या २२९ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज फक्त २२३ धावाच करू शकले. म्हणून प्रथम फलंदाजी करणेच योग्य.
|
Aaspaas
| |
| Sunday, April 01, 2007 - 4:38 pm: |
| 
|
सतिश, बरोबर आहे तुमचे, आपण स्पर्धा सुरु होण्यापूर्वी जो अंदाज बांधला होता तसेच होत आहे, फक्त भारताचा अपवाद. से फा मधील पहिले तीन संघ पक्के आहेत, सा अफ्रिका, ऑस्त्रेलिया, न्युझीलंड. ४थ्या क्र. साठी चुरस होती. त्यातील भारत बाहेर पडला. पण हे अनपेक्षित नव्हते. तुम्ही लिहिलेल्या ३ही संघात दुबळा सध्या इंग्लंड वाटतोय. विंडीजचे सातत्य नाही. लंका ही उतार चढाव चालू आहेत. अंदाज लावणे कठीण आहे. पण ऑस्त्रेलियाला से फा मधून फायनल मधे जाणे सोपे आहे कारण पहिल्या संघाचा ४थ्या संघाशी सामना होणार. त्यामुळे फायनल मधील एक संघ पक्का आहे. न्युझी व द. अफ्रिका त्या दिवशीच्या खेळावरच अवलंबून आहेत. ४थ्या क्र. वरील संघाचे भविष्य काही नाही, सध्याच्या फॉर्म पेक्षा वेगळे घडल्यासच. त्यामुळे मला वाटते पहिल्या तिघांपैकीच विजेता असणार. वेळापत्रक हि थोडे चुकीचे वाटते १ल्या संघाची लढत वास्तविक ३र्या संघाशी व २र्या ची ४थ्याशी किंवा या चारपैकी प्रत्येकाचा सामना एकमेकांशी व्हायला हवा होता. पहिली फेरी न ठेवता प्रत्येक संघाचा प्रत्येकाशी सामना व्हायला हवा होता व गुणावर पहिले ४ संघ निवडले असते तर वेगळी मजा आली असती व सर्व संघांना एकमेकाशी एकदातरी खेळता आले असते. सतिश आणखी एक सुचवावेसे वाटते तुम्ही ७५ च्या आठवणी सांगून खूपच बरे केलेत, असेच ७५ व ८३ च्या आणखी आठवणी असतील किंवा माहिती असल्यास जरुर लिहावी.
|
जी घोडचूक द्रविडने केली तीच चूक काल लाराने केली. श्रीलंकेविरूद्ध नाणेफेक जिंकल्यास प्रथम फलंदाजी करणे आवश्यक असते. जर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली तर ते २५० च्या पुढे मजल मारतात आणि नंतर पाठलाग करणार्या संघाला मुरलीधरन, जयसूर्या अशा गोलंदाजांसमोर धावा करणे अवघड जाते. काल लाराने नाणेफेक जिंकून सुद्धा गोलंदाजी घेतली आणि तिथेच त्यांचा पराभव नक्की झाला. अर्थात वेस्ट इंडिजचे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी सुद्धा अतिशय खराब झाली. परंतु श्रीलंका संघ पाठलाग करण्यात फारसा यशस्वी होत नाही, म्हणून त्यांच्याविरूद्ध प्रथम फलंदाजी केली तर जिंकण्याची शक्यता खूपच जास्त असते. वेस्ट इंडिज उपांत्य फेरीत यावा अशी माझी इच्छा होती. परंतु आता ते जवळजवळ अशक्य दिसते. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका नक्कीच उपांत्य फेरीत येणार. इंग्लंडने आयर्लंड विरूद्धचा सामना जिंकून २ गुण मिळविले आहेत. त्यंचे अजून बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेविरूद्धचे सामने शिल्लक आहेत. बांगलदेश आणि वेस्ट इंडिज विरूद्ध ईंग्लंड नक्की जिंकेल. श्रीलंकेचे एकून ४ गुण असून त्यांचे ४ सामने शिल्लक आहेत (ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि आयर्लंड विरूद्ध). श्रीलंका आयर्लंड विरूद्ध नक्की जिंकेल. म्हणजे इंग्लंड आणि श्रीलंकेच्या सामन्यातील विजेता बहुतेक उपांत्य फेरीतला चौथा संघ असेल. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड किंवा श्रीलंका यांच्यामध्ये उपांत्य फेरीची पहिली लढत होईल. दुसरी लढत न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होईल. अंतिम फेरीत बहुतेक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड असतील.
|
Mandard
| |
| Monday, April 02, 2007 - 5:35 am: |
| 
|
आता एक नवीन बी बी उघडायला हवा 'नीरुपयोगी क्रिकेट' नावाचा
|
"चाचपडत खेळण्यापेक्षा निवृत्त झालेलं चांगलं." रवि शास्त्रीचा सचिनला सल्ला! वनराज अडचणीत सापडला की गाढवं सुद्धा त्याला उपदेश करायला लागतात! ह्या रवि शास्त्रीने टुकुटुकु खेळून असंख्य सामन्यांत भारताचा पराभव घडवून आणला. १९९२ च्या विश्वचषकाच्यावेळी संपूर्ण भारतात याच्याविरूद्ध (त्याच्या संथ खेळामुळे) संतापाची लाट पसरली होती. तरी सुद्धा हा निवृत्तीचे नाव काढत नव्हता. शेवटी त्याला १९९२-९३ च्या दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यानंतर कायमचे हाकलून दिले. अशा माणसाने सचिनला निवृत्तीचा सल्ला द्यावा हे सचिनचे आणि आपले दुर्दैव!
|
>>>> सतिश आणखी एक सुचवावेसे वाटते तुम्ही ७५ च्या आठवणी सांगून खूपच बरे केलेत, असेच ७५ व ८३ च्या आणखी आठवणी असतील किंवा माहिती असल्यास जरुर लिहावी. सचिनवर टीकेची झोड उठवून त्याच्या हकालपट्टीची मागणी करणार्यांनी १९८३ च्या विश्वचषकातील गावसकरच्या कामगिरीची आठवण ठेवावी. त्यावेळि बहुतेक सर्व सामन्यात गावसकर अपयशी ठरला होता. त्याने सर्वाधिक २४ धावा इंग्लंडविरूद्ध उपांत्य फेरीत केल्या. अंतिम फेरीत त्याला फक्त २ धावा करता आल्या. परंतु कोणीही त्याला हाकलण्याची मागणी केली नाही. नंतर १९८७ च्या विश्वचषकानंतर निव्रुत्त होईपर्यंत गावसकर बर्यापैकी खेळला. मला अशी खात्री आहे की सचिन सुद्धा २०११ च्या विश्वचषकापर्यंत चांगला खेळेल.
|
Farend
| |
| Monday, April 02, 2007 - 7:32 am: |
| 
|
सतिश ही तुलना मला वाटते बरोबर नाही (मी 'सचिनला हाकला' मधे नाही, मला वाटते की जी २-३ वर्षे उरलीयेत ती त्याने कसलेही प्रेशर न घेता खेळावीत, सद्ध्या तो उगाचच काहीतरी 'रोल' करायला जातो असे वाटते). गावसकर कडून कोणीही कधीही वन डे मधे खेळाची फार अपेक्षा केली नाही. १९८३ मधे वर्ल्ड कप मधे काही केले नाही तरी त्याच वर्षी त्याच विंडीज विरुद्ध ३ कसोटी शतके ठोकली होती, त्यातले एक ९१ चेंडूत मार्शल व होल्डिंग ला धुवून काढले होते. तो १९८५ ते १९८७ ला निवृत्त होईपर्यंत वन डे मधे सुद्धा चांगला खेळून गेला. मला वाटतं मागच्या २०-३० वर्षांत तो एकच असा (भारतीय) खेळाडू आहे की जो चांगला खेळत असताना निवृत्त झाला. आणि मुळात गावस्कर च्या हकालपट्टीची मागणी फारशी तग धरू शकली नाही कारण त्याच्या कसोटी मधील फॉर्म बद्दल कधीच शंका नव्हती (१९८४ च्या आसपास चा थोडा काळ सोडून). त्याचा शेवटचा डाव सुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काढलेल्या ९६ धावांमुळे लक्षात आहे.
|
माझी क्रिकेट मधिल समज तुम्हा सर्वांपेक्षा नक्किच कमी आहे पण तरिहि माझे मत असे कि आता सचिनला फ़लंदाज म्हणुन न खेळवता all rounder म्हणुन खेळवावे जसे जयसुर्याला श्रिलंका खेळवत आहे. कुणि कितिहि सल्ले दिले किंवा सचिनवर टिकेची झोड उठवली तरिहि सचिनचे श्रेष्ठत्व अजिबात कमि होणार नाहि. शेवटि सचिन हा सचिन आहे आणि त्याच्या सारखे दुसरे कुणि होणे शक्य नाहि. आता उपट्सुंभांसारखे सल्ले सगळेच महान(तथाकथित) खेळाडु सचिनला देतील पण सचिन स्वत सुज्ञ आहे तेव्हा त्यास सांगणे न लागे! चु भु द्या घ्या जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
भारतातली सगळी माध्यमं आता हात धुऊन सचिनच्या मागे लागलेली आहेत. अनेक वाहिन्यांनी, वृत्तपत्रांनी "सचिनने निवृत्त व्हावे का?" या विषयावर मतचाचण्या सुरू केल्या आहेत. अतिशय सामान्य दर्जा असलेले आणि वर्षानुवर्षे कोणाच्या तरी मेहेरबानीने संघात जागा अडवून बसलेले रवि शास्त्रीसारखे त्याला निवृत्त व्हायचा न मागता शहाजोग सल्ला देत आहेत. हे सर्वजण याचा विचारच करत नाहियेत की भारताच्या पराभवाला फक्त एकटा सचिनच जबाबदार नव्हता. सचिनप्रमाणेच उरलेले १० खेळाडू सुद्धा अपयशी ठरले. आणि समजा सचिनला काढले तर त्याची जागा सध्याचा कोणता खेळाडू घेऊ शकेल? सुरेश रैना, गंभीर, लक्ष्मण, कैफ इ. खेळाडूंना पुरेशी संधी देऊन झालेली आहे. यांच्यापैकी कोणीही सचिनपेक्षा जास्त चांगलं खेळू शकणार आहे काय? आणि सर्व सामन्यात अपयशी ठरलेले सेहवाग, धोनी, हरभजन यांचं काय? जो न्याय सचिनला तोच न्याय यांना सुद्धा नको का? हरभजनच्या जागी पोवारला घेता येईल, कार्तिक धोनीच्या ऐवजी येऊ शकेल. पण सचिनची जागा सध्या उपलब्ध असलेल्या खेळाडूंपैकी कोण घेणार? माध्यमे आता सचिनचा बळी घेतल्याशिवाय तृप्त होणार नाहीत असं दिसतय.
|
Mandard
| |
| Monday, April 02, 2007 - 12:40 pm: |
| 
|
सचिन मस्त नीगरगट्ट आहे तो रिटायर होत नाही. बांगलादेशच्या टुरवर थोड्या धावा काढल्या की झाले. असो पण सचिनने भारताला एकहाती सामने कधीच जिंकुन दिलेले नाहीत अपवाद शारजाचे दोन सामने. त्यात पण तो मैदानावर शेवट पर्यंत नव्हता. जयसुर्याने काल जसा खेळ केला तसा सचिन क्वचितच खेळतो. ज्या मिडीयाच्या नावाने आपण बोंबा मारता आहात त्यानीच सचिनला मोठा केला आहे. जर जिंकलो असतो तर त्यानीच याला डोक्यावर घेतला असता. सध्या लोक चिडले आहेत. तवा गरम आहे. मिडीया सचिनवर हात धुन घेत आहे. बाकीच्या टीम ला टारगेट करुन जास्त फ़ायदा नाही. काही दिवसात सर्व थंड होइल. मग परत आहेच... boost is the secret of my energy.
|
जयसुर्या हा पण 'ग्रेट होता' म्हणावा असला खेळाडू आहे.. आता लागला मटका तर शंभर नाहीतर पाच दहा... विरेंद्र सेहवागची कॉपी
|
Lukkhi
| |
| Monday, April 02, 2007 - 1:30 pm: |
| 
|
सचिनने भारताला एकहाती सामने कधीच जिंकुन दिलेले नाहीत हे जरी खरे असले तरी सचिन हा एक उपयुक्त खेळाडू आहे हे मान्य करावेच लागेल. मागच्या २ वर्षात त्याची सरासरी ३७.५ आहे... जी वाईट नक्कीच नाही. धोणी(४५.७) आणि द्रवीड(४२.४) इतकी चांगली नसली तरी, कैफ़ (३१) आणि युवराज(३७.५) बरोबर तुलना केल्यास बरी दिसते. सचिन इतका काही टाकाऊ खेळाडू नाही की त्याने निवृत्त व्हावं
|
Anamikaa
| |
| Monday, April 02, 2007 - 3:00 pm: |
| 
|
सचिन तेंडुलकर या नावाची काविळ झालेले बरेच महाभाग इथे दिसत आहेत.मराठी माणुस दुसर्याचे पाय ओढण्यात पुढे असतो हे पुन्हा एकदा सिद्ध होताना दिसतय. वरिल वाक्याने बर्याच लोकांच्या नाकाला मिरच्या झोंबणार हे नक्कि. पण सचिनवर टिका करणे हे सुर्यावर चिखलफ़ेक करण्यासारखे आहे. म्हणतात ना "मारणार्याचा हात धरता येतो पण बोलणार्याचे तोंड नाही धरता येत". विश्वकप स्पर्धेतुन भारत बाहेर झाला तेंव्हा माननिय(?) शरद पवार यांची प्रथम अतिशय तिव्र प्रतिक्रिया आली पण जेंव्हा राष्ट्रवादिच्या कार्यकर्त्यांनी सचिनचा पुतळा जाळला आणि जसे "सामना"मधे खेळाडुंवर हल्ले होता कामा नये अशी विनंतिवजा तंबी छापुन आली तसे लगेच शरदराव थंड पडले आणि लगेच खेळाडुंची बाजु मांडायला सुरुवात झाली. असो सध्या भारतात बर्याच रिकामटेकड्या लोकांना काम मिळाले आहे क्रिकेटवर आणि सचिन,सौरव,राहुल यांसारख्या स्वतःचे कर्तुत्व सिद्ध केलेल्या खेळाडुंवर टिका करण्याचे.करा करा हवि तेव्हढी टिका करा.बरे आहे यातुन भारतिय क्रिकेटला बरेच फ़ुकटचे सल्लागार आणि चुकुन माकुन चांगले सल्ले देखिल मिळतिल कदाचित ज्यावर अंमल करुन आपला संघ उत्कृष्ट कामगिरी करु शकेल.!!!!!!!!!!!!!!!!!! चालु द्या!
|
Adi787
| |
| Tuesday, April 03, 2007 - 12:48 am: |
| 
|
आज ज़ी news बघतांना सचिन च्या बद्दल बातमी होती... खुप छन शब्दांकन केलेले... सचिन नावचि कावीळ झालेल्यांनी बघायला पाहिजे अशी... सचिनने ४१ शतक ठोकलीत.. त्यामध्ये २९ वेळेस आपण जिंकलोय.. आश्चर्य वाटतय ना..??? सचिनकडे द्वेशाचा चश्मा न घालता बघा... आश्चर्य वाटणार नाही. आणी ज्यांना या कावीळी मधुन बाहेर यायचे असेल, त्यांनी (http://gleez.com/articles/did-you-know/this-is-what-we-hear-from-most-of-sachins-critics) या दुव्यावर जावुन आपले अज्ञान दुर करावे... zee च्य बातमी मध्ये एक वाक्य छान होते... "सचिन की replacement कौन हो सकता है.? किसिका भी नाम लेना जैसे.. दिये की सुरज से तुलना करना होगा"... tip: सचिन द्वेशाचा चश्मा घतलेल्यांकरीता.. इथे सुर्य हे सचिनला संबोधले आहे.

|
>>> पण सचिनने भारताला एकहाती सामने कधीच जिंकुन दिलेले नाहीत मंदार, क्रिकेट म्हणजे टेनिसचा एकेरी सामना नव्हे ज्याच्यात एकाच खेळाडूला एका बाजूने खेळायचे असते. क्रिकेट हा ११ जणांनी खेळायचा खेळ आहे. त्यामुळे इतर खेळाडूंच्या मदतीशिवाय कोणीही एकहाती सामना जिंकू शकत नाही. अगदी शतक करणार्या खेळाडूला सुद्धा दुसर्या बाजूने साथ देणारा एक खेळाडू लागतो किंवा प्रतिपक्षाच्या सर्व १० खेळाडूंना बाद करण्यासाठी सुद्धा उरलेल्या खेळाडूंची मदत लागते. नुकत्याच २ महिन्यांपूर्वी संपलेल्या वेस्ट इंडिजविरूद्धच्या भारतातील मालिकेत सचिन मालिकावीर होता. भारताने ही मालिका ३-१ अशी जिंकली. २००३ च्या विश्वचषकामध्ये सचिनने १ शतक आणि ६ अर्धशतके करून विश्वचषकाचा "मालिकावीर" हा बहुमान मिळविला होता. मला वाटते ही दोन उदाहरणे पुरेशी आहेत.
|
Anamikaa
| |
| Tuesday, April 03, 2007 - 5:08 am: |
| 
|
आदि,सतिश योग्य उत्तर दिलेत.पण काय आहे ज्यांचे स्वतःचे काहि कर्तुत्व नाही अश्याच लोकांना दुसर्याची उठाठेव करायला आणि नाहक एखाद्याला दुषणे देणे जमते.भारतात अश्या तथाकथित विद्वानांची कमतरता नाहि. लाखोनी सांडलेत
|
Adi787, खूपच सविस्तर माहिती दिली आहे तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये. ही माहिती वाचल्यावर तरी सचिनची टिंगल उडविणार्यांचे डोळे उघडतील.
|
Mandard
| |
| Tuesday, April 03, 2007 - 6:06 am: |
| 
|
अनामिका काविळ आपल्याला झाली असेल. येथे मराठी अमराठी चा काहीही संम्बन्ध नाही. सतिश यांनी गावस्करवर टिका केली आहे तो पण मराठी आहे. उगीच मोठी वाक्ये लिहीली की आपण बरोबर ठरत नाही. तसेच शरद पवार सामना मधील लेख वाचुन घाबरतात हा एक मोठा विनोद आहे. आणि आपल्या शेवटच्या पोस्ट मधुन वैयक्तिक टिका करुन तुमच्याकडे अजुन कुठलेही मुद्दे नाहीत हे समजले आहे. सतिश सचिन कडुन मागच्या कप च्या फ़ायनलला मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण तो फ़ेल झाला. तसेच परवा लंके बरोबर. मी आता सांगतो आगामी बांगला दौर्यात सचिन भरपुर धावा काढणार आणि आपण त्याला डोक्यावर घेणार. कपाच अपयश बहुदा चपेलच्या माथी मारतील.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|