Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 14, 2007

Hitguj » Views and Comments » General » तर, मराठी माणूस खड्ड्यात गेलेलाच बरा » Archive through March 14, 2007 « Previous Next »

Mansmi18
Wednesday, February 28, 2007 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन्दार,

तुमचे म्हणणे योग्य आहे. स्थानसपेक्षता मान्य आहे. पण जे लोक ठाणे, मुम्बई, पुणे येथे राहतात किव्वा अशा ठिकाणी राहतात कि जिथे मराठि शिक्षण मिळु शकते त्यान्ना मी विचारतो आहे.

आपल्या मुलाना कोन्वेन्ट मधे घालुन वर जर कोणि मराठिचा अभिमान वगैरेवर तावातावाने बोलत असेल तर तो मात्र खोटेपणा होईल.

योगि,
मी ग्रुहित धरतो कि तुम्हि भीश्मपतिज्ञा वगैरे घेतलेलि नाही.:-)
पुढे तुमच्या मुलाना शाळेत घालाल तेव्हा जर मराठि पर्याय उपलब्ध असेल तर तुम्हि मराठित घालाल का?

मला स्वत:ला मराठिचा अभिमान आहे पण शाळा मी एन्ग्लिशच निवडिन कदाचित. किमान मी प्रामाणिकपणे मान्य करतोय.


Yogy
Wednesday, February 28, 2007 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होय :-) मराठी माध्यमाच्या (तोपर्यंत राहिल्या तर) शाळेत घालीन. माझे स्वत:चे शिक्षण मराठी माध्यमात झाले आहे आणि मला तरी मराठी माध्यमात शिकूनही पोटापाण्याचा काही प्रश्न आलेला नाही.

Zakki
Wednesday, February 28, 2007 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळा दोष या शाळांचा आहे. इंग्रजी हा ऐच्छिक विषय ठेवावा. ज्यांना गरज, इच्छा, असेल ते काय वाट्टेल ते करून इंग्रजीच काय, फ्रेंच, जपानि, जर्मन सगळ्या भाषा शिकतील, आजकाल शिकतातच आहेत की!

आमच्या वेळी १९५५ ते १९६२ पर्यंत इंग्रजीचे महत्व कमी करा अशी मोहिम होती. आम्हाला आठवीपासून इंग्रजी ABCD शिकवले. मग कॉलेजमधे जे इंजिनीयरिंग किंवा मेडिकलला जाणार असतील त्यांना इंग्रजीत ३२ मार्क मिळाले तरी चालेल, त्यांचा क्लास फक्त गणित किंवा बायालॉजी, रसायनशास्त्र, नि पदार्थविज्ञानशास्त्र, यातले मार्क धरूनच ठरवल्या जाई. आमच्या वेळचे लाखाने लोक इंजिनीयरिंग नि डॉक्टरकी इंग्रजीत शिकले, इंग्लंड, अमेरिकेत आरामात राहिले. कारण त्यांना गरज होती इंग्रजी शिकायची म्हणून त्यांनी आपणहून अभ्यास केला.

आता तर काय इंटरनेट, व्हिडिओ सगळे काही उपलब्ध आहे स्वत:चे स्वत: शिकायला!

इथे मायबोलीवर येऊन मला शिकवतात, आमचे विचार महत्वाचे, भाषा कुठली का असेना! मग सगळ्या विषयांचे मूलभूत ज्ञान जर आपल्या मातृभाषेत शिकणे सोपे आहे म्हणतात, तर का नाही ते मूलभूत ज्ञान सोप्या पद्धतिने शिकवत? ते जास्त महत्वाचे की भाषा?


Mahesh
Thursday, March 01, 2007 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, अगदी लाखाची गोष्ट बोललात (अर्थात आजकाल लाखाला फार किंमत राहिली नाहीये हा भाग वेगळा).

सर्व शिक्षण मातृभाषेतून दिले गेले तर तो सोन्याचा दिवस असेल. आणी तो दिवस लवकरच यावा यासाठी काय करता येईल हा एकच विचार माझ्या मनात चालू आहे. मी लवकरच भारतात परत जाऊन याबद्दल काही तरी काम करायचा विचार करत आहे. अगदी सगळे शिक्षण नाही तरी निदान आजकाल मातृभाषेबद्दलची अनास्था वाढते आहे ती कमी करून आस्था वाढीस लागेल असे काही करण्याचा मानस आहे. त्यातुन खरोखर काही बदल होईल की नाही सांगता येत नाही. पण प्रयत्न नक्की करणार आहे.

मी आणी बायकोने आमच्या मुलीला जेव्हा मराठी शाळेत घालायचे ठरवले तेव्हा एक दोन अपवाद सोडता जवळ जवळ सर्व नातेवाईक, ओळखीचे यांनी वेड्यात काढले. मला हा प्रकार अतिशय धक्कादायक वाटतो आहे. मला वाटत होते त्यापेक्षा जास्त झपाट्याने लोक मातृभाषेकडे पाठ फिरवत आहेत.


Zakki
Thursday, March 01, 2007 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो महेश, धन्यवाद. मातृभाषेची सवय रहावी परदेशात म्हणून मायबोली सुरु केली तर इथे अनेक लोक सरसकट इंग्रजीतून, रोमन लिपीतून लिहितात! नि वर म्हणतात त्यात काय चुकले? चुकले काही नाही, मायबोलीवर यायचे तर मराठीसाठी यावे, नाहीतर इतर अनेक ठिकाणि तुम्हाला तुमचे विचार इतर भाषेत मांडायला परवानगी आहेच की!

Ek_veda
Thursday, March 01, 2007 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गूगल गप्पा( google chat ) मराठीतुन करता येतात. (म्हणजे देवनागरी वापरुन). किति जण करतात? मी नविनच शीकलो आहे. पण न चुकता मराठी वापरतो.

Vinaydesai
Thursday, March 01, 2007 - 9:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गम्मत म्हणजे 'सर्वांनी मराठी बोलावे' किंवा मराठीचा आग्रह करणारे लोकही काहीवेळा हा आग्रह इंग्रजीतून करतात... (kRipayaa, marathi tuun bolaa agar lihaa) ... तेव्हा काय बोलावे?

आणि याला शाळा नाही, आपण पालक जबाबदार आहोत.. मराठी शाळा ओस, आणि इंग्रजी शाळांमध्ये प्रवेशाला लाख लाख देणग्या.. दुसरं काय होणार...?




Chyayla
Friday, March 02, 2007 - 12:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण तुमच्या सगळ्यान्च म्हणण पटल. सावरकरान्नी म्हटल्याप्रमाणे मी ईन्ग्रजाना अन्गा खान्द्यावर खेळवले आहे, प्रसन्गी लोळवले आहे पण कधी डोक्यावर नाही बसवले. तसच ह्या ईन्ग्रजीच्या बाबतीत माझ मत आहे. ईन्ग्रजी आवश्यक तिथे शिकाच व आवश्यक तिथेच वापरा पण आपल्याही माणसान्शी बोलताना निदान मात्रुभाषा वापरा तिथे त्याला डोक्यावर घेण्याची काहीच गरज नाही.

योगी तुमच्या मताशी पुर्ण सहमत मातृभाषेतुन शिक्षण दील्यास पुढे ईतर भाषा ही लवकर अवगत होतात. व खर म्हणजे जगातल्या गोष्टी खुप चान्गल्या प्रकारे समजतात. फ़क्त प्रश्न येतो फ़ाडफ़ाड व व्यवस्थित इन्ग्रजी बोलायचे तर जीथे वातावरण मिळत तिथे बोलता येत. माझही शिक्षण मराठी माध्यमातुनच झाले, नौकरीच्या सुरुवातीच्या काळात बरेच ईन्ग्रजी माध्यमातुन आलेले सहकारी मित्र होते पण ईन्ग्रजी लिहिणे, वाचणे शिवाय बोलणेही या बाबतित बोम्बच होती त्यापेक्षा उलट मला चान्गल जमायच व आज त्यान्च्या बर्याच पुढे गेलो. आज मला ईकडे अमेरिकेतही त्याची काही एक अडचण येत नाहीये. कौतुक नव्हे पण माझा स्वता:चा हा अनुभव आहे. तर दुसरीकडे त्यान्ची कीव वाटते कारण धड स्वभाषा पण नाही व ईन्ग्रजीही नाही.


Prashantkhapane
Friday, March 02, 2007 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Zakki,
Malae he kahi patle nahi. Aho saglech kahi Bill-Gates-Windows vaprat nahit. KAhina linux vaapravi lagte, Firefox vagaire broweser madhun Devnagri post karne faar avaghad jaate. Tithe Roman lipitun marathi lihile tar kai bighadle?

Manasi,
Aaj kaal maharastrat he fad ale ahe. Mulala engraji madhymaat gahtle tar pudhe sope jaate. Kai te kunaas thauk?! Ghari aai-bapala dhad ek shabd nit bolat yet nasto engrajitun. Tyaat tya mulanchi kuchaMbana hote ani shevti nuksaan.
Ha sthan sapeksha he matra manya ahe. Mi Germany madhe 8 varshe zali ahe, ani ethe kunachehi engraji vachun adat nahi. Kharatar, mi ajun EU madhe kuthlach desh nahi pahila jithe adate.

Mansmi18
Friday, March 02, 2007 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,

सर्व मायबोलीकरान्ना होळिच्या हार्दिक शुभेच्छा.

होळि रे होळि पुरणाची पोळि
(गरजुन्नि पुढचे वाक्य पुर्ण करावे):-)



Satishmadhekar
Saturday, March 03, 2007 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साहेबाच्या खिशात लिमलेटची गोळी!!!

Dhulekar
Sunday, March 04, 2007 - 12:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साहेबांच्या तव्यावर भाजु आपली पोळी.

Jaideep
Monday, March 12, 2007 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज टाकरे यांनी परत एकदा मराठी अमराठी वादाला तोंड फ़ोडलं आहे. आता याला अनेक राजकीय रंग चढायला लागतील कारण वेध विधानसभेचे आहेत. पण त्यानिमीत्ताने तरी एका मह्त्वच्या विषयावर उहापोह होईल. त्यांच्या भाषणातला महत्वाचा मुद्दा मराठी माणसाला त्याचा विकास स्वत्: च करावा लागेल, इतर भाषिकांच्या कानफ़टात मारुन तो होणार नाही.

Satishmadhekar
Monday, March 12, 2007 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज ठाकरेला नक्की काय हवं आहे हे त्याचं त्याला तरी कळतं की नाही अशी मला शंका येत आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व महापौरपदांच्या निवडणुकीत 'मनसे'च्या नगरसेवकांनी कॉंग्रेसच्या उमेदवारांना मत दिले.

'मनसे'चे उमेदवार शिवसेनेप्रमाणे कॉंग्रेसच्या विरोधात सुद्धा निवडून आले होते. त्यामुळे कॉंग्रेसला मत देणे हा मतदारांचा विश्वासघात आहे. शिवसेना विरोध हा ठीक आहे, पण म्हणून कॉंग्रेसला मत देणे समर्थनीय ठरू शकत नाही. त्यांनी अशीच भूमिका चालू ठेवली तर, काही महिन्यांतच 'मनसे' संपुष्टात येईल, कारण शिवसेना विरोधात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी असे दोन समर्थ पर्याय असताना 'मनसे'ला कोण मत देणार?


Zakki
Monday, March 12, 2007 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधू संत म्हणतात (आणि त्यांचे ऐकून मी सुद्धा) ब्रम्ह सत्यं जगन्मिथ्या!
राजकारणी म्हणतात सत्ता, पैसा सत्यं, बाकी सर्व मिथ्या! तर सगळ्या राजकारण्यांना १०० टक्के माहित असते त्यांना काय हवे आहे. सत्ता नि पैसा. बाकी सगळे मिथ्याच, काय फरक पडतो?


Satishmadhekar
Tuesday, March 13, 2007 - 12:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'मनसे'मध्ये पडझडलीला सुरवात झाली आहे. कालच मुंबईच्या 'मनसे'च्या एका नगरसेविकेने पक्षाचा राजीनामा दिला. महापौरपदाच्या निवडणुकीत कॉन्ग्रेसला पाठिंबा दिल्याच्या निषेधार्थ तिने राजीनामा दिला.

राज ठाकरेनी आपलं कॉन्ग्रेसला पाठिंबा देण्याचे धोरण जर बदललं नाही, तर काही दिवसातच त्या पक्षाची अवस्था 'रिपब्लिकन' पक्षासारखी होईल. भाजप-शिवसेनेला कोणत्याही मार्गाने विरोध करण्याच्या 'रिपब्लिकन'च्या धोरणामुळे, तो पक्ष कधीच पुढे येऊ शकत नाही. कॉन्ग्रेस किंवा शरद पवारांनी फेकलेल्या शिळ्या भाकरीच्या तुकड्यावर 'रिपब्लिकन' पक्षाला आनंद मानावा लागतो. भाजप-शिवसेनेला आंधळा विरोध करण्याच्या धोरणामुळे या पक्षाला कधीही स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करता आले नाही. काशीराम-मायावतीने कधीही कोणत्याही पक्षाला आंधळ विरोध न करता स्वत:ची ताकद वाढविली. वेळोवेळी 'बसप'ने अनेक युत्या केल्या आणि स्वत:च्या स्वार्थासाठी त्या लगेच मोडूनही टाकल्या.

'मनसे'ने शिवसेनेला आंधळा विरोध करण्याचे सोडले नाही आणि कॉन्ग्रेसला पाठिंबा चालू ठेवला तर थोड्याच दिवसात त्याची अवस्था 'रिपब्लिकन' सारखी होईल.


Mandard
Tuesday, March 13, 2007 - 12:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माढेकर साहेब वरचे सर्व राजकारणाच्या बी बी वर हलवा आणि मराठी माणसाला खड्ड्यातुन वर काढा

Satishmadhekar
Tuesday, March 13, 2007 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंदारपंत,

मराठी माणसापासून राजकारण वेगळे काढता येत नाही. राजकारण हे मराठी माणसाचे अविभाज्य अंग आहे. मराठी माणूस एक वेळ खड्ड्यात जायला तयार होईल पण राजकारणावरचा काथ्याकूट थांबविणार नाही. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावरची निरूपयोगी चर्चा हे मराठीपणचे लक्षण आहे.


Mahesh
Tuesday, March 13, 2007 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निरूपयोगी नका म्हणू. कारण या असल्या चर्चांमधुनच कधी कधी काही चांगले घडून जाते.

Avinash_kale
Wednesday, March 14, 2007 - 9:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोण म्हणतय मराठी माणूस खड्ड्यात चाललाय मी रशियात शिकतो इथे मझ्याबरोबर काही इतर मराठी विद्यार्थीही आहेत. आम्ही सर्वान्नी मिळुन यावेळची शिवाजी महाराज जयन्ती इथे उत्साहात साजरी केली. अगदी अफ़जल खानाच्या वधाचे नाटकही साकारले. या कार्यक्रमाची छायाचित्रे आपण खाली दिलेल्या ब्लॉगवर पाहु शकता. हा ब्लॉग अजुन अपुर्णावस्थेत आहे लवकरच तो पुर्ण होईल तसेच कार्यक्रमाची ध्वनीचित्रफ़ितही उपलब्ध होईल. ब्लॉगचे नाव आहे, shivajayanti2007.blogspot.com

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators