Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 27, 2007

Hitguj » Views and Comments » General » माझी आवडती मराठी मालिका » Archive through February 27, 2007 « Previous Next »

Mansmi18
Thursday, February 22, 2007 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का हो करणी फ़क्त मध्यमवर्गीय घाबरट लोकान्वरच क चालते का?.
आपले सरकार उगाच डिफ़ेन्स वर एवढा खर्च करते. या सगळ्या करणि आणि वशीकरण करणार्याना घाऊक कन्त्राट द्यायचे अणि आप्ल्या सगळ्या शत्रुराश्ट्रान्वर करणी करायचि प्रोब्लेम खतम.:-)



Dineshvs
Thursday, February 22, 2007 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रानो, हि असली विकतची डोकेदुखी घेण्यापेक्षा तुम्ही माझा मार्ग अनुसरा बघु. मी गेली कित्येक वर्षे टिव्हीच बघायचा सोडुन दिलाय.
त्यामुळे वाचन, संगीत, छंद अश्या सगळ्या गोष्टीना भरपुर वेळ मिळायला लागलाय.


Halkat
Friday, February 23, 2007 - 9:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश आणि नीलु -'वहिनीसाहेब' ह्या मालिकेच्या निर्मात्या आहेत स्मिता ठाकरे. त्या 'मातोश्री' नावाच्या एका बंगल्यात (कलानगर, वांद्रे, मुंबई)राहतात. तुम्हाला त्यांच्यावर "खटला करावा"त्यांना "जबरी शिक्षा व्हावी", असं पोटतिडीकेने वाटलं, म्हणून पत्ता दिला.

Mahesh
Saturday, February 24, 2007 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हलकट, धन्यवाद कळविल्याबद्दल. ठाकरे काय किंवा आणखी कोणी असले काय.
मी आधीच्या मेसेज मधे लिहिले आहेच की खटले भरून ते संपेपर्यंत खुप काळ जाईल आणी तोपर्यंत या असल्या अनेक मालिका अनेक वेळा दाखविल्या जातील.
संघमित्रा यांनी अगदी बरोबर लिहिले आहे. जनता जे दाखवाल ते पहाते. त्यामुळे लोकांची आवड आहे म्हणून आम्ही दाखवतो हे म्हणणे अतिशय चुकीचे आहे. जुने चांगले मराठी, हिंदी चित्रपट, नाटके, ई. मधून चांगले सामाजिक संदेश असत. आजकाल ते तर लांबच राहिले पण ज्या विकृती आहेत त्या भडकपणे दाखविणे चालले आहे. याला आळा घालण्यासाठी काही तरी उपाय करणे अत्यावश्यक आहे. आज्जुकासारखे अनुभवी लोक कदाचित काही माहिती सांगू शकतील.
असो लिहावे, बोलावे तेवढे कमीच आहे. प्रत्यक्ष काहीतरी काम सुरू केल्यावरच जास्त प्रभावीपणे बोलता येईल.


Suvikask
Monday, February 26, 2007 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोटावर मोजण्या ईतक्या सुद्धा मालिका दर्जेदार व हल्क्या फुलक्या नाहीत. त्या त्या वाहिन्यांवरुन प्रक्षेपित होणा-या एकूण मालिकांचे प्रमाण व त्यातिल आवर्जुन बघण्यासारख्या मालिका, यांचे व्यस्त प्रमाण हेच दाखविते की वाहिन्यांचा दर्जाच खालावलेला आहे. अशा वेळी प्रश्न पडतो की कुठे गेली मराठी प्रतिभा? प्रतिभावंत लेखक, कलाकार, दिग्दर्शक, यांची एवढी वाणवा आहे का महाराष्ट्रात? लहान मुलांचा तर कुठेच विचार केला गेला नाही. त्यांच्या वयाला झेपेल असे, सुप्त गुणांना वाव देणारे, निर्मिती क्षमता वाढ्विणारे असे किती कार्यक्रम दाखवले जातात या वाहिन्यांवरून?
याचा खरच विचार व्हायला हवा.


Ajjuka
Monday, February 26, 2007 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो महेश, माझा टेलिव्हिजन शी काही संबंध नाही हो. मी सिरीयल्सच्या वाट्याला जात नाही. पण इथे कोणीतरी स्टारवाली आहेत ना ते सांगतील.. अर्र्र्र्र्र्र नाही तेही नाही सांगू शकणार त्यांनाही झी मराठी वरच्या मालिका दर्जेदार वाटतायत.. आता काय करावे..
मुळात या सगळ्या मालिकांना टीआरपी मिळतो म्हणून तेच गुऱ्हाळ चालवले जाते. असं चॆनेलवाल्यांचं कारण आहे. त्याचबरोबर नवीन काही नसतं म्हणून आम्ही तेच बघतो हे प्रेक्षकांचे कारण आहे. आणि नवीन काही करायला गेलं तर चॆनेलला ते नको असतं अस निर्मात्यांचं कारण आहे. त्यावर चॆनेलवाले स्पॊन्सरशिपचं कारण दाखवतात.आणि यातल्या कोणालाच रिस्क घेणं परवडणारं नसतं असं त्यांचं म्हणणं. तर हे असं चक्र आहे. पण हा झाला वरचा थर. काही जानेमाने प्रॊडक्शन हाउसेस ची दादागिरी ही काही कमी नाहीये. नवं ताजं काही आलं तर आपलं गुऱ्हाळ बंद पडेल या भयाने असं काही येऊच द्यायचं नाही आणि त्यासाठी टेवलाखालची डील्स करायची हेही चालतं इथे. पर्यायाने भंगार आऊटपुट. हिंदी सिरीयल्समधे तर उत्तरेतून आलेला चिकणाचुपडा चेहरा असला की झालाच स्टार. मग त्याच्या थोबाडातून धड दोन ओळी नीट नसल्या बाहेर पडत तरी चालेल. काय आहे सिरीयल्समधल्या अभिनयाला काहीही टॆलेन्ट लागत नाही पाठांतराशिवाय त्यामुळे कोणी सोम्यागोम्या बनू शकतो स्टार.
असे कित्येक उत्तम पोटेन्शियल असलेले पण नवशिके अभिनेते/नेत्र्या या टेलिव्हिजन इंडस्ट्री नी गिळंकृत केल्यात. बेसिक पोटेन्शियल वर जमून जातं सिरीयल मधे आणि मग स्वतःला खूप वाढवायचंय हे सगळ्या झगमगाटात विसरलं जातं. मग कधी फिल्म केली तर घाबरायला होतं यांना नाहितर तिथेही तेच ४ भावनांच्यातलं गणित खेळत बसतात. परत प्रेक्षकांनी ’अस्सल’ ची चवच चाखलेली नाही त्यामुळे हाच फालतूपणा स्टॆंडर्ड बनलाय.

एकच उपाय.. जेवढ्यांना शक्य होईल तेवढ्यांनी हे चॆनेल्स बंद करून टाकायचे.

Nilsat
Monday, February 26, 2007 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते की आपण खुपच निराशावादी विचार करत आहोत. मला जरी स्टारवाला असे म्हणून टोमणा मारला तरी सर्वप्रथम मी एक अस्सल मराठी माणूस आहे. आज टीव्ही हे एक प्रभावी माध्यम आहे व मराठी भाषा टीकवण्यासाठी त्याचा आपण ऊपयोग करु शकतो. "एकच उपाय.. जेवढ्यांना शक्य होईल तेवढ्यांनी हे चॆनेल्स बंद करून टाकायचे." ह्याचा अर्थ आपण ओल्या बरोबर सुकेही जाळायचे का? मान्य करावेच लागेल की काही मालिका अजिबात पटत नाही पण हीच बाब सर्व मालिकांना लागू पडते का? आज जर हे मराठी चँनल नसते तर आपल्याला अत्यंत दर्जेदार असा आयडीया सारेगमप हा कार्यकम पहायला मिळाला असता का? २४ तारख़ेला ह्याचे थेट प्रसारण पाहील्यावर मन भरुन आले. मराठी चँनल हिंदी चँनलहुन जरही मागे नाही हे पुन्हा एकदा सिध्द झाले. मिडिया जगतामध्ये ह्या कार्यक्रमाला खुप प्रंशंसा मिळाली. आपणही झी मराठीला ह्या निमित्त शाबासकी देऊया.

Nilsat
Monday, February 26, 2007 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते की आपण खुपच निराशावादी विचार करत आहोत. मला जरी स्टारवाला असे म्हणून टोमणा मारला तरी सर्वप्रथम मी एक अस्सल मराठी माणूस आहे. आज टीव्ही हे एक प्रभावी माध्यम आहे व मराठी भाषा टीकवण्यासाठी त्याचा आपण ऊपयोग करु शकतो. "एकच उपाय.. जेवढ्यांना शक्य होईल तेवढ्यांनी हे चॆनेल्स बंद करून टाकायचे." ह्याचा अर्थ आपण ओल्या बरोबर सुकेही जाळायचे का? मान्य करावेच लागेल की काही मालिका अजिबात पटत नाही पण हीच बाब सर्व मालिकांना लागू पडते का? आज जर हे मराठी चँनल नसते तर आपल्याला अत्यंत दर्जेदार असा आयडीया सारेगमप हा कार्यकम पहायला मिळाला असता का? २४ तारख़ेला ह्याचे थेट प्रसारण पाहील्यावर मन भरुन आले. मराठी चँनल हिंदी चँनलहुन जरही मागे नाही हे पुन्हा एकदा सिध्द झाले. मिडिया जगतामध्ये ह्या कार्यक्रमाला खुप प्रंशंसा मिळाली. आपणही झी मराठीला ह्या निमित्त शाबासकी देऊया.

Ajjuka
Monday, February 26, 2007 - 6:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टोमणा नाहीये मारला मी. स्पष्ट बोलले आहे. या क्षेत्रातल्या कुणीतरी उत्तर द्यायला हवं की इतकं दर्जाहीन का सगळं ते परंतू तुम्हाला ते दर्जाहीन वाटत नाही हे तुम्हीच स्पष्ट केलं होतं आधी तेच म्हणाले मी. यात कसला आलाय टोमणा? आणि तुम्ही मराठी माणूस असण्याचा इथे काय संबंध? मराठी साहित्य इतकं प्रगल्भ आणि वैविध्यपूर्ण असतानाही मालिका इतक्या थुकरट का ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करा ना.
दुसरं असं की मराठी मालिकांनाच काय तुमच्या स्टार / झी / सोनी मधल्याही कुठल्या मालिकेला दर्जा नसतोच. चकचकाट असतो बास.
आणि चॆनेल नसतेच तर असं प्रतिपादन नाहीये इथे. नीट वाचा. या सगळ्या बकवास मालिकांवर बहिष्कार घाला असं आव्हान मी केलंय.

Savyasachi
Monday, February 26, 2007 - 10:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

darjedaar.... ani idea saregamapa????? hmmm....

Bee
Tuesday, February 27, 2007 - 1:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरचं IDEA SA RE GA MA PA दर्जेदार म्हणजे भारी विनोद झालाय. काय असतं अस special त्यात!

मराठी साहित्य जरी दर्जेदार आणि विविधांगी असले तरी त्यात दृष्य किती आहे हा विचार प्रत्येक दिग्दर्शकाला करावा लागतो. तो विचार करू शकणारे किती दिग्दर्शक आज हिन्दी आणि मराठी चित्रपट सृष्टीत उरलेले आहेत? आपण पुस्तक जसे वाचतो तसे ते पटावर दाखविले जाऊ शकत नाही. त्याला कदाचित भरपूर अडीअडचणी असू शकतील आणि ती गोष्ट resourses आणि वेळेच्या बाबतीत खूप महागडी पडू शकत असेल.

मला तर प्रश्न पडतो की ही कलाकार मंडळी साहित्यात रस घेतात का? जर घेत नसतील तर त्यांना लेखक बिखक काय माहिती असतील. नविन लेखाकांची तर नावेही माहिती नसतील. सरासरी मराठी माणसाला काय वाचता असे विचारले तर फ़ार फ़ार तर पुलंच एक नाव ते घेऊ शकतात. वाचक वर्ग खालावत चालला आहे..


Chyayla
Tuesday, February 27, 2007 - 2:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर जुन्या दर्जेदार मालिका अजुनही आठवतात. बी बघ तुला उदाहरणे देतो पुस्तकातले वास्तवात उतरवणे खरच कसोटी आहे पण ह्या मालिका पाहिल्यावर अशक्य नाही वाटत. तुला आठवत का गोट्या, चिमणरव, झोपी गेलेला जागा झाला याशिवाय बर्याच चान्गल्या मालिका आहेत. पण हे सगळे जुने झाले नवीन तरी काही दर्जेदार दीसत नाहिये. बाकी सगळे वेळ घालवण्यासाठीच. ठीक आहे यातुनही काही चान्गले येइल ही आशा.



Arati_halbe
Tuesday, February 27, 2007 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

idea sa re ga ma pa la darjedar mhananarya lokanni "darjaa" che moj map kuthun chalu kele aahe te baghayala mala nischitach awadel!!!

sonu nigam chya kaLateel saregama madhye sarva chehere marathi hote, tya sa re ga ma chya nirmatyankadun "he" sa re ga ma pa nakkick expected navate...

Bee
Tuesday, February 27, 2007 - 3:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला हो ही उदाहरणे लक्षात आहेत म्हणूनच आजच्या मालिकांची तुलना आपण करू शकतो.

अजून एक मुद्दा असा आहे की त्यावेळी फ़क्त 'दूरदर्शन' हे एकच channel होते. नंतर star TV channels वगैरे आलेत आणि त्यांनी बाजी मारली. मग दूरदर्शन मागे पडले ते अजून समोर आलेच नाही. तरीही अजून अशी काही मंडळी आहेत जे फ़क्त दूरदर्शनच बघतात. channels ची संख्या वाढल्यामुळे 'एक ना धड अन भारंभर चिंद्या' अशी गत झाली आहे. TV चे remote हातात ठेवून सतत channels बदलत ठेवतात आजकाल. जेवताना देखील एका हातात घास असतो आणि दुसर्‍या हातात remote ..

एकदा काय झाले माझ्या शेजारच्या आजोबांना मी प्रभातफ़ेरीला बाहेर घेऊन गेलो तो ७ वाजता परत आलो. ते म्हणालेत आता माझ्या बातम्या हुकल्यात पण काही हरकत नाही अजून संकृत मधील बातम्या व्हायच्या आहेत. मग त्यांनी संस्कृत मधील बातम्या ऐकल्यात आणि मी फ़क्त blank चेहरा ठेवून TV वर दिसणारे चित्र बघत राहिली. त्यात तो TV रंगीत नसून कृष्णधवलच होता. नाहीतर आजकाल लोकांकडे रंगीत TV घेण्यासाठी इतका पैसा जास्त झाला की १७ इन्चीचा रंगीत TV घरात असून 21 इंचीचा रंगीत TV विकत घेतात.


Mahesh
Tuesday, February 27, 2007 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विषय मला आवडणार्‍या मालिका असला तरी V&C मधे आहे त्यामुळे या चर्चेला कोणी आक्षेप घेणार नाही असे वाटते.
मला या सुखांनो या ही मालिका सुरूवातीला खुप छान वाटली.
विषेशत्: त्यामधे चंगळवाद आणी त्याग, एकत्र कुटुंब आणी विभक्त कुटुंब पद्धती, जुने आणी नवे, चांगले आणी वाईट, ई. गोष्टींची जुगलबंदी दाखविण्याचा प्रयत्न केला, तो चांगला वाटला. पण नंतर अतिरेकीपणा वाढायला लागला त्यामुळे बघण्यातला रस कमी होत गेला.


Mahesh
Tuesday, February 27, 2007 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकी आज्जुकाने लिहिले आहे ते बरोबर आहे.
वर गोट्या, चिमणराव, ई. उल्लेख आले आहेत.
हल्ली पुर्वीसारखे दर्जेदार साहित्य निर्माण होत नाहीये.
त्यामुळे माध्यमांना पण चांगले सादर करायला काही नाहीये. गदिमा, शांताबाईंच्या नंतर महाराष्ट्रात साहित्याचा दुष्काळ पडला आहे, आणी त्याचे कारण मराठी माणसाची स्वभाषेविषयीची अनास्था.

त्या सारेगमला दर्जेदार वगैरे म्हणू नका हो. स्पर्धा ही स्पर्धेसारखीच असावी, एकतर त्यामधे भाग घेतलेले आणी जिंकलेले लोक हे दर्जेदार गाणारे नाहीयेत, मला तरी एकाचाही आवाज भारी वाटला नाही. परीक्षक म्हणून जो कोणी बाबा होता तो प्रसिद्ध आहे म्हणे, पण मी त्याचे नाव देखिल ऐकले नव्हते, तसेच त्याने शेवटच्या भागात त्याची गाणी म्हणून दाखवली. तो तर कळस होता. खुद्द ह्रदयनाथ शाहीर विठ्ठल उमप यांच्या समोर बाई बाई मन मोराचा जय जय महाराष्ट्र माझा चे रेमिक्स


Ajjuka
Tuesday, February 27, 2007 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चित्रपटसृष्टीत काय किंवा कुठल्याही creative क्षेत्रात.. दर्जा ही गोष्ट ५% लोकांकडेच असते. बाकीचे नुसतं दळण टाकत असतात. पण सध्या टेलिव्हिजन मुळे संधी खूपच जास्त प्रमाणात उपलब्ध असल्याने दर्जा नसलेल्या लोकांचेही भले होते. खरंतर फावते. त्यामुळे होते काय की दर्जा असलेले लोक टेलिव्हिजन च्या वाट्याला जात नाहीत. दूरदर्शन ची आजची स्थिती न विचारलेलीच बरी. सरकारी मूर्खपणाचा आम्ही पुरेपूर अनुभव घेतलाय नुकताच आणि आयुष्यात परत दूरदर्शन बरोबर काहीही न करण्याची अट मी संदीपला घातलीये. तोटा आमचा नाहीच दूरदर्धनचाच आहे.थोड्याफार फरकाने सर्वच चॆनेल्सवर हेच चालते. हे एक उदाहरण. अश्यासाठी की अश्याच पद्धतीने दर्जेदार दिग्दर्शक दूरदर्शन गमावत असते. दूरदर्शन च नव्हे तर संपूर्ण टेलिव्हिजन इंडस्ट्री.

Satyen_velankar
Tuesday, February 27, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ajjuka,

tuzhe aniruddha bapu varche vichar vachle, ekdum masta, mi ya bapuche dhande baghun jaam vaitagloy, kon ahe ha bapu ani kaay mhanna ahe tyacha, aartya kaay, mantra kaay, khul vadhatach challay

Sanghamitra
Tuesday, February 27, 2007 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका अगदी खरंय.
अगं दळण म्हटलं तरी ते साधं सोपं तरी दाखवावं ना.
त्यात इतका बिभत्सतेच्या रेषेवरचा भडकपणा कशाला?
मराठीत तर काहीच कमी नाहीये स्क्रिप्ट्स ची. शिवाय नवे लेखक आणि विशेषतः प्रायोगिक नाट्यभूमी किती कसदार गोष्टी देतेय.
ते हिंदी सिरीयल्स चे पाहून "अरे बापरे मला हलवा करायला सांगितलाय सासूबाईंनी. आणि मला तर येतच नाही " म्हणून रडणार्‍या बायका दाखवताना यांना लाज कशी वाटत नाही काय माहित? काय फासावर चढवणार आहेत का एखादा पदार्थ नाही जमला तर? आणि त्यावर एक एक एपिसोड खर्च.
या सिरीयल्स बघून वाटेल की भारतात दोनच प्रकारच बायका असतात एकतर अत्यंत त्यागी आणि पर्यायाने मूर्ख ठरणार्‍या आणि दुसर्‍या म्हणजे अत्यंत क्रूर आणि सतत आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी वाट्टेल ते करणार्‍या. एकीचे आयुष्याचे ध्येय काय तर घर एकत्र रहावे आणि दुसरीचे कुणाचा तरी सूड घ्यावा हे. बस.
आणि म्हणे या डेली सोप्स चे शेड्युल्स इतके टाईट असतात की आजारी असताना सुद्धा लोक काम करत रहातात. अरे काही अडलंय का?
जाऊ दे आपण रक्त आटवून काही उपयोग नाही. लोक काहीतरी पहायचे म्हणून पहातातच.
आणि ते दुष्टचक्र सुरू रहाते.


Yog
Tuesday, February 27, 2007 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

savya,
बरेच दिवसानी उगवलास..?

बरे आहे इकडे सारेगमप दिसत नाही आणि तसल्या कार्यक्रमाच्या वाट्याला आम्ही जातही नाही. पण च्यानेल वाल्याना इतक्या शिव्या देण्यात काय अर्थ? मागणी तिथे / तसा पुरवठा.कुठेतरी प्रेक्षक देखिल या "टाळीचा" एक हात असतोच ना?
आमच्या लहान्पणी (म्हणजे फ़र फ़ार वर्षापूर्वी वगैरे नव्हे) घरात उच्च दर्जाचे गीत, सन्गीत, इत्यादी कानावर ऐकायला मिळे, चान्गले साहित्य, कला यान्ची पालकानी आवड लावली आणि इतर idea / किव्वा तत्सम भेसळीपासून दूर ठेवले याबद्दल त्यान्चे आभार मानावे तितके थोडे आहेत.
आता तेच उलटे चित्र पहातो. "तरूण" पालकाना त्यान्च्या मुला मुलिनी अशा उथळ कार्यक्रमातून " star " बनावे असे वाटत असते हे स्वतः पाहिले आहे. तेव्हा दर्जा, कमरमणूक, इत्यादी सर्व व्याख्या आणि परिमाणे बदलली आहेत. दिनेश म्हणतो तसे एकतर तुम्ही असे कार्यक्रम बघून नका किव्वा मग जे आहे त्यातले चान्गले घ्यायचा प्रयत्न करा. शेवटी remote आपल्याच हातात आहे नाही का?:-)
(स्वगत : सर्वच मालिका, news channel इत्यादी इतके डफ़्फ़ड असतिल तर Remote वापरायची ही गरज भासू नये नाही का?)


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators