|
Saranga
| |
| Thursday, April 20, 2006 - 9:12 am: |
| 
|
namaskar mandali. ithe apan cricket vishayi bolut. kalcha ind-pak samna zakas hota. tari rahun rahun asa vatat rahte ki 1-1 draw he tharlele asave. tumhala kay vatate? btw, kalchya match madhye, arun lal ni madhech sixer marla by saying "and now sharad pawar comes into attack". dean jones la kahi kalale nahi, mag arun lal mhanal ramesh powar!
|
Mrdmahesh
| |
| Thursday, April 20, 2006 - 12:34 pm: |
| 
|
अरे श्रीरामा, भारत-पाक मालिका या mostly ठरलेल्याच असतात (हे माझे मत). ही मालिका तर नक्कीच ठरवून खेळली गेली. नाहीतर २ सामने कसे ठेवले? ३ नसते का ठेवले? (एक तुम्ही जिंका एक आम्ही.). ते युनुस खान आणि मोहम्मद युसुफ़ ज्या पद्धतीने बाद झाले त्यावरून तर ही tournament fix होती ही शंका घ्यायला वाव आहे.
|
Zakki
| |
| Thursday, April 20, 2006 - 1:13 pm: |
| 
|
शंका असो, पण क्रिकेटमधे केंव्हा काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून तर लोक बघतात, नाहीतर कोण बघेल? अगदी फक्त चांगली गोलंदाजी नि फलंदाजी बघायला आवडते, कुणि का जिंकेना, असे लोक किती असतील?
|
Jaaaswand
| |
| Thursday, April 20, 2006 - 2:15 pm: |
| 
|
मित्रांनो.. तुम्ही काहिही म्हणा.. match fixing किंवा वाटावाटी.. आपल्या देशात ( माझ्यासारखे ) भरपूर क्रिकेटवेडे आहेत.. त्यामुळे.. प्रत्येक सामना नव्या उत्साहाने पाहिला जाणारच.. Afterall, they say, Indians are eternal optimistic & CRICKET is their religion
|
Arnika
| |
| Thursday, April 20, 2006 - 4:39 pm: |
| 
|
हो ना, खरच खूप सिरीज हल्ली अगदी मोजून मापून बेतलेल्या वाटतात, पण असं माहिती असल्याने खेळाची मजाच जाते की! एवढ्या मोठ्या स्केल वर खेळाच्या राजकारणात काय काय होतय हे आपल्याला संपूर्ण समजणं किती कठीण आहे! मग अशा वेळी जे पुढ्यात आहे ते आनंदाने बघण्यात मजा आहे... निदान जिंकल्यावर तरी! सगळीकडे फिक्सिंग चं भूत आहेच, सवालच नाही... पण मी जितका खोलात जाऊन याचा विचार करते, तितकी खेळातली(किंवा जे चालू आहे) त्यातली मजा संपत जाते.म्हणून मग आहे त्यात मजा यावी म्हणून हा विचारच सोडून दिला... सगळ्या रणजी आणि टेस्ट प्लेअर्स ना पेन्शन द्यायची कल्पना कशी वाटली सगळ्यांना? ;) अर्निका.
|
Nandya
| |
| Wednesday, July 12, 2006 - 4:44 pm: |
| 
|
http://video.google.com/videoplay?docid=-1973377505966410253&q=cricket चार लिहावेच लागतात म्हणुन.. check it out 
|
This is really COOL
|
सचिनच्या लवकर बाद होण्याने जर का भारताला विजय मिळाला असता, तर गेल्या इंडीज दौर्यात 4-1 या फ़रकाने का म्हणुन नाक कापुन घेतलं भारताने... तेव्हाही सचीनची बॅट तळपली नव्हती. गावस्कर आणि सचीनची तुलना करण्याचा मुर्खपणा प्रत्येक जण करतो... सचिनचा काळ वेगळा गावस्करचा काळ वेगळा... त्यावेळी कसोटी क्रिकेटला जास्त प्राधान्य होतं, सचिनचं युग झटपट सामन्याचं. गावस्करचं झटपट सामन्यातील एकमेव शतक आणि सचिनचं चाळीसाव शतकं हे त्या बदलेल्या काळचे द्योतक आहे. >>>>विंडीचा तोफखाना इग्लंड ओस्ट्रेलिया चे वेग या सगळ्याच विचार न करता ही गावस्कर चा आनालिसिस बघा जरा खरयं की गावस्करने विडींजच्या तोफ़खान्याला तोंड दिलयं... पण त्याची ती एका दिवसात फ़क्त ३६ धांवाची कामगीरी विसरून चालणार नाही... उलट सचिनने ऑस्ट्रेलियाला वेळोवेळी त्यांची जागा दाखविली आहे. सध्याचा ऑस्ट्रेलियांचा तोफ़खाना हा त्या वेळच्या विंडिजच्या तोडीचाच आहे. जसे वाघाचे कातडे पांघरल्याने कोणी वाघ होतं नाही तसेच गार्ड वापरून कोणीही क्रिकेटपटू सचिन प्रमाणे जिनीयस होऊ शकत नाही... सचिन तो सचिनच... त्याच्या शरिरावरील जखमांपेक्षा त्याला चाहत्यांनी दिलेल्या जखमा अधिक आहेत... तरीही तो सवईप्रमाणे त्यातुन तावुन सुलाखुन बाहेर पडतो आणि शतक ठोकतो...
|
Farend
| |
| Saturday, September 23, 2006 - 4:36 am: |
| 
|
indradhanushya हे कोणत्या पोस्टचे उत्तर आहे? ती पोस्ट उडवलेली आहे का? सचिन व गावस्कर ची तुलना असलेली?
|
Adtvtk
| |
| Tuesday, October 10, 2006 - 9:27 pm: |
| 
|
एक गमतीदार लिन्क. http://media.putfile.com/CricketComedy
|
Mukund
| |
| Wednesday, February 14, 2007 - 11:33 am: |
| 
|
इंद्रधनुष्य...तु गावस्करच्या नाबाद ३६ खेळीविषयी बोलत आहेस त्यावरुन..... तुझे म्हणणे बरोबर आहे की गावस्करचा काळ वेगळा होता. तु जी ३६ नाबादची खेळी तु म्हणतोस ती १९७५ च्या पहिल्या विश्वकरंडकामधली इंग्लंड विरुद्धची होती. हे लक्षात घे की तेव्हाचा काळ हा एक दिवसिय सामन्यांचा अगदी बाल्यावस्थेतला काळ होता...जसा आता २०-२० चा आहे तसा... त्यामुळे इंग्लंड (ज्यांचे खेळाडु त्या तश्या सामन्यांमधे १० ते १५ वर्षे तरी अनुभवी होते) व वेस्ट इंडीज(ज्यांचे बहुतेक सगळे खेळाडु तेव्हा इंग्लंडमधे काउंटी क्रिकेट खेळायचे) सोडुन बाकीच्या देशातल्या खेळाडुंना हा एक दिवसिय सामना म्हणजे काय याचे पुरेसे आकलन झालेले नव्हते. १९७५ च्या विश्वकरंडकाआधी भारताचे खेळाडु मोजुन दोनपेक्षा जास्त तसे सामने खेळलेले नव्हते..एकटा फरुक इंजीनियर सोडुन.... जो तेव्हा लॅंकाशायर लीगमधे खेळत असे. गावस्कर तेव्हा अस म्हणाला होता की डेनीस एमीसच्या शतकाच्या जोरावर झालेला इंग्लंडचा ३३४ ला ३ आउट हा स्कोर ६० षटकात पार करणे शक्य नव्हते म्हणुन पुढच्या सामन्यासाठी प्रॅक्टीस करुन घेतली... हे आजच्या काळात कितीही हास्यास्पद वाटले तरी त्याची मानसीक चौकट काय होती ते लक्षात घे...त्या वेळेला तोच नाही तर बर्याच जणांना एक दिवसिय सामने म्हणजे क्रिकेटची मॉकरी वाटत होती..प्युरीस्ट क्रिकेटरांना कसोटी क्रिकेट म्हणजेच खरे क्रिकेट असे वाटत होते.. पॉंटींगलाही आज जसे २०-२० सामन्यांविषयी वाटते तसेच गावस्करला त्यावेळेला एक दिवसिय सामन्यांविषयी वाटत असण्याची शक्यता आहे..... असो.... जे त्याने केले त्याचे समर्थन मी करत नाही पण हेही लक्षात घे की १९८७ च्या विश्वकरंडकात त्याने न्युझीलंड बरोबर ८८ चेंडुतच शतक फडकावले होते..... आणी तुला जर असे वाटत असेल की गावस्कर नेहमीच संथ खेळायचा तर तुला एक सांगावेसे वाटते...१९७६ व १९७९ साली त्याने वेस्ट इंडीजच्या रफ़िक जुमाद्दिन ला हाफ़ पिच वर येउन कसे झोडले होते ते कुठे बघायला मिळले तर बघ तसेच १९७९ मधे मुंबई कसोटीत कालिचरणच्या विंडिज टीम विरुद्ध खेळताना वानखेडेवर २०५ (पहिल्या डावात) व ७० धावा(दुसर्या डावात)...ज्या पद्धतीने केल्या तेही कुठे पाहायला मिळाले तर बघ...झालच तर अब्दुल कादिरला १९७९ मधे बॅन्गलोरला व १९८७ मधे मद्रासला कसे चोपुन काढले होते तेही अवश्य बघ....आणी शेवटी १९८५ च्या बेंसन ऍंड हेजेस मिनिवर्ल्ड कपमधले सगळे सामने बघ व तो कप जिंकताना त्याचे धुर्तपणे निभावलेले कर्णधारपद बघ तेव्हा तुला कळेल की त्याला जेव्हा तशा सामन्यांचे आकलन झाले तेव्हा त्याने त्याची जबाबदारी कशी निभावली..... मग तु अस कधीच कुत्सिततेने गावस्करबद्दल त्याच्या नाबाद ३६ च्या खेळीविषयी बोलणार नाहीस.... आणी तेंडुलकरबद्दल बोलायचे तर या आर्टिकलमधे श्रिराम रंगनाथनने इतके अचुक विचार मांडले आहेत की बस्स.... http://ia.rediff.com/cricket/2007/feb/01sriram.htm
|
मुकुन्द हल्लि जो तो उठतो आणि सचिन वर तोंडसुख घेतो.ज्याचि लायकि नाहि अशी माणसे देखिल यात पुढे आहेत. "भारत हा एक असा देश आहे जिथे क्रिकेट मधिल सगळ्यांना सगळे कळते. "इति शिरिष कणेकर. ज्यांना क्रिकेट मधिल "क" देखिल कळत नाहि असे तथाकथित विद्वान स्वतहचि मते न विचारता छापत असतात.(कुणि वाचत नसताना) स्व. डॉन ब्रड्मन यांनी सचिनचे कौतुक केल्यावर आणि त्यानी सचिनला प्रमाणपत्र दिल्यावर सचिन बद्दल ईतर कोण काय विचार करतो याला काहि किंमत उरत नाहि(निदान आमच्या लेखि तरि). आणि मुळ मुद्दा हा कि "एका मराठि माणसाचे पाय ओढण्यात प्रत्येक वेळि मराठि माणुसच पुढे( "का" ?)असतो" गावसकर देखिल आपलेच आणि सचिनहि आपलाच, पण कोति मनोवृत्ती असणार्यांना कोण काय सांगणार,कारण मारणार्याचा हात धरता येतो पण बोलणार्याचे तोंड धरता येत नाहि. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, February 14, 2007 - 6:05 pm: |
| 
|
वल्डकप ला कोणी जानार का? खालील साइट्स टिकीट व ईतर माहीती साठी चांगल्या आहेत. Ticket Prize : http://cricketworldcup.indya.com/event/tickets.htm https://eticketing.co.uk/cwc/default.aspx
|
Farend
| |
| Wednesday, February 14, 2007 - 10:21 pm: |
| 
|
मलाही वाटते भारत १९८३ साली कप जिंकण्याच्या आधी भारतात एक दिवसाचे सामने विशेष लोकप्रिय नव्हते. त्यामुळे गावस्कर्च्या त्या खेळीबद्दल नंतर कोणीतरी उकरून काढले असेल. मला गावस्कर चे झोडपणे कसोटी मधले जास्त आवडते...ते दिल्ली चे १९८३ मधले मार्शल, होल्डिंग आणि इतरांविरुद्ध मारलेले ९१ चेंडुतले शतक, आधी च्या सामन्यात दणदणीत पराभव झाल्यानंतर गावस्कर एकदम आक्रमक झाला या मॅचमधे (आणि पुढच्या अहमदाबाद च्या मॅच मधेही). मला त्याने दिल्लीला मार्शलला हूक करून मारलेली सिक्स आणि अहमदाबाद ला त्याच्या पहिल्या तीन चेंडुंवर मारलेले तीन चौकार अजुनही आठवतात
|
Mukund
| |
| Thursday, February 15, 2007 - 10:20 am: |
| 
|
अमोल... अरे १९८३ चा विश्वकरंडक जिंकायच्या आधी भारताने केवळ एक...मोजुन एक सामना जिंकला होता....तोही इस्ट आफ़्रिके बरोबर! आणी १९८३ ला दिल्लीतले शतक म्हणत आहेस ते ज्या दिवशी त्याने मारले त्याच दिवशी माझ्या मोठ्या भावाचे लग्न होते...दिवाळीचे दिवस होते व लग्नाच्या दिवशी माझे अर्धे लक्ष गावस्करच्या इनिंगकडे होते....दादरच्या ब्राम्हण सहाय्यक संघात लग्न होते व त्या हॉलसमोरच एक टीव्हीचे दुकान होते...तिकडे दर १५ मिनिटांनी चक्कर टाकत होतो..आई म्हणायची कुठे गायब होतोस सारखा सारखा.... त्याच सिरीजमधले मद्रासमधले द्विशतक आठवते का? गावस्करवर इतके वर्षे आघाडीचा फलंदाज म्हणुन एवढा भार पडत होता म्हणुन त्याने २ डाउन यायचे असे नुकतेच ठरवले होते..कसचे काय आणी कसचे काय....मार्शलच्या पहील्या ओव्हरमधेच भारताने गायकवाड आणी वेंगसरकरला गमावले....व भारताचा स्कोर होता..२ आउट ०! मग गावस्कर मैदानात उतरला व २३६ नाबादची..त्याच्या वैयक्तीक सर्वोच्च धावा... खेळी तो खेळला... केवळ अविस्मरणीय! सगळ्यांना गावस्कर जलद गती गोलंदाजांना चांगला सामोरा जायचा हे चांगलेच ठाउक आहे पण फिरकी गोलंदाजांना तो असा झोडपायचा की विचारु नकोस.. काल मी काही उदाहरणे दिलीच होती..पण अजुन एक.....१९७७-७८ मधे ऑस्ट्रेलियाच्या दौर्यात टोनी मॅन व बॉबी सिंप्सनला दिलेला चोप...त्या दौर्यात त्याने पहिल्या ३ कसोटीत ३ शतके फडकवली होती. इंग्लंडचा डेरेक अंडरवुड हा असा एकच डावखुरा फिरकी गोलंदाज होता की ज्याने मात्र गावस्करला त्याच्यावर प्रभुत्व गाजवु दिले नाही. कालच्या श्रिलंकेबरोबरच्या सामन्यात द्रविड कप्तानाची इनींग खेळला. आता सगळे संघ निवडुन झाले आहेत... काय वाटते कोण जिंकेल यंदाचा विश्वकरंडक? खासकरुन इंग्लंडने ज्या अनपेक्षित रितीने ऑस्ट्रेलियाला हरवले त्यामुळे अचानक ऑस्ट्रेलिया हरु शकते ही भावना बाकी सगळ्या संघांच्या मनात घोळु लागली असेल. ऑस्ट्रेलियाची परिस्थीती भारतासारखीच आहे...बहुतेक खेळाडु ३० च्या पुढचे आहेत... आणी सीमंड्स च्या दुखापतीमुळे टीमचा समतोल बिघडल्यासारखा वाटतो. पॉंटींग, हेडन व गिलख्रिस्टला ऐन वेळेला जर सुर सापडला नाही तर साउथ आफ़्रिका कप घेउन जाइल असाच त्यांचा फ़ॉर्म आहे सध्या. पोलॉक ज्या पद्धतीने खेळत आहे त्यावरुन असे वाटते की त्याच्या खांद्यावर तो साउथ आफ़्रिकेला कप जिंकुन देउ शकेल.आपल्या बाबतीत म्हणायचे तर जर तेंडुलकर,गांगुली गेल्या वर्ल्ड कप सारखे खेळले व धोनीने आपला इंगा दाखवला आणी जहीर,आगरकर सध्या जसे गोलंदाजी करत आहेत तसे करत राहीले तर आपण उपांत्य फेरी गाठायला काही हरकत नाही.सेहवागचे मला अजुनतरी काही खरे दिसत नाही.एक प्रकारचा (मोजुन मापुन) जुगार निवड समीतीने खेळला आहे त्याला निवडुन.मला वाटत होते की उथप्पा व श्रिसंथच्या ऐवजी कैफ़ व रैनाला निवडावे...सेहवागला आघाडीला पाठवुन कैफ़ला मधल्या फळीत खेळवायला पाहीजे होते....फलंदाज म्हणुन जरी तो खेळला नाही तरी क्षेत्ररक्षणासाठी तो हवा होता संघात व रैनाला बारावा गडी ठेवुन त्याच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा पुरेपुर उपयोग करुन घ्यायला हवा होता. विचार करा... युवराज पॉइंटला,कैफ़ कव्हरला,रैना मिडविकेटला व भज्जु स्क्वेअर लेगला...काय बिशाद आहे कोणाची धाव चोरायची.... गेल्या विश्वकरंडकात कैफ़ने इंग्लंडच्या निक नाइटला धावबाद कसा केला ते आठवते का? पाकीस्तानबद्दल म्हणायचे तर आफ़्रीदी हा अननोन फ़ॅक्टर आहे..त्याच्या जिवावर ते कप जिंकु शकतील असे वाटत नाही. त्यांच्याकडे एक इंझुमाम सोडला तर पुरेसे मॅच विनर्स नाहीत.तिच गोष्ट न्युझीलंडची आहे. एक शेन बॉन्ड सोडला तर त्यांच्याकडेही पुरेसे मॅच विनर्स नाहीत. आणी नेथन ऍसलनेही निव्रुत्ती जाहीर केली आहे त्यामुळे तोही नाही.श्रिलंकेचे बोलायचे तर मुरली,व्यास,जयसुरीया हे मॅच विनर्स त्यांच्याकडे आहेत पण त्यांचेही वय लक्षात घेता कप जिंकण्याइतकी क्षमता त्यांच्यात आहे असे आज तरी वाटत नाही.आणी इंग्लंड... नुकतेच ऑस्ट्रेलियाला हरवले असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास बळावला असणार..पण एकटा कॉलींगवुडच फ़ॉर्म मधे आहे. केव्हीन पिटर्सन व फ़्लिंटॉफ़ हे धोकादायक खेळाडु आहेत हे खरे पण एकाच वेळेला ते तिघे क्लिक झालेले मला तरी आठ्वत नाही....तरी या स्पर्धेचा इतिहास बघता वेस्ट इंडीज व ऑस्ट्रेलियानंतर तेच फक्त ३ वेळा फ़ायनलला गेले आहेत. त्यामुळे मी तरी त्यांना दुर्लक्षीत करणार नाही.मला असे वाटते की ऑस्ट्रेलिया,इंग्लंड,साउथ आफ़्रिका हे ३ संघ उपांत्य फेरीपर्यंत जाउ शकतात. चौथी जागा भारत, पाकीस्तान,श्रिलंका व वेस्ट इंडीज या चौघांपैकी कोणालाही मिळु शकते. वेस्ट इंडीज आपल्या घरी खेळत असल्यामुळे त्यांनाही विसरुन चालणार नाही...खासकरुन लारा,गेल व सारवान हे त्रिकुट जर एकाच वेळेला चांगले खेळले तर....पण त्यांची गोलंदाजी जरा बेताचीच वाटते... तुम्हाला काय वाटते? पाहुया...एक महीन्यात काय होते ते...
|
कुंबळे, हरभजन आणि पठाण च्याऐवजी रमेश पोवार, गंभीर आणि कैफ किंवा रैनाला घ्यायला पाहिजे होते. बाकी संघ ठीक आहे. मला वाटते की वेस्ट इंडीज, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि आॅस्ट्रेलिया हे उपांत्य फेरीत येतील. भारत आणि पाजीस्तानला सुद्धा थोडिशी संधी आहे. बहुतेक आॅस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत धक्का बसून ते हरतील असे वाटते.
|
कुंबळे आणि सेहवाग या दोघांची निवड खटकली त्या ऐवजी संघात रमेश पोवार आणि सुरेश रैना किंवा मोहम्मद कैफ़ यापैकी एकाची निवड व्हायला पाहिजे होती.
|
बहुतेक आॅस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत धक्का बसून ते हरतील असे वाटते>>>> असे का वाटते याचे काही logic तू दिलेले नाही. की उगीचच आपले काहीतरी वर्तवून ठेवायचे आणि नन्तर म्हणायचे मी म्हणत होतो तसेच झाले मी किती द्रष्टा... मुख्य खेळाडू निवृत्त झाले असले तरी तरी कांगारू अजून खमके आहेत. आपली लंगडी टीम घेऊन आपण चषक जिंकायला निघालो आहोत. तोंडे बघा यांची...
|
Manya2804
| |
| Friday, February 16, 2007 - 12:27 pm: |
| 
|
आजच्या सामन्यात न्युझीलंडने आॅस्ट्रेलियाला १० वीकेट्स ने हरवलं. धावफलक : आॅस्ट्रेलिया - सर्वबाद १४८ न्युझीलंड - बिनबाद १४९ (२७ षटकात) आॅस्ट्रेलियाचा हा गेल्या ३ सामन्यातला तीसरा पराभव !
|
Asami
| |
| Friday, February 16, 2007 - 6:45 pm: |
| 
|
उथप्पा व श्रिसंथच्या ऐवजी कैफ़ व रैनाला निवडावे...सेहवागला आघाडीला पाठवुन कैफ़ला मधल्या फळीत खेळवायला पाहीजे होते....फलंदाज म्हणुन जरी तो खेळला नाही तरी क्षेत्ररक्षणासाठी तो हवा होता >> uthappa is one of the excellent fielders in indian circuit. Kaif does not qualify to be in team soley on basis of his form. santh is logical choice as he is only possible backup seamer available. I think selection is by elimination rather than anything else तरी या स्पर्धेचा इतिहास बघता वेस्ट इंडीज व ऑस्ट्रेलियानंतर तेच फक्त ३ वेळा फ़ायनलला गेले आहेत. >> They missed onto last 2 finals. Failed to qualify neyond primaries. Albait they are regaining their batting touch. But definately lack balling power necessary to cover up for failures. One can say we ride in same boat.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|