Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 15, 2007

Hitguj » Views and Comments » General » माझी आवडती मराठी मालिका » Archive through February 15, 2007 « Previous Next »

Psg
Friday, February 09, 2007 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सामनानी पंच काढून बातमी दिली आहे. आजच्या 'सकाळ'मधे असे आले आहे की अभिजीतला (अपेक्षेप्रमाणे) कमी sms आले, त्यामुळे नियमानुसार तो स्पर्धेबाहेर जायला हवा होता.. पण स्टुडीयोतल्या त्याच्या पाठीराख्यांनी तिथे गोंधळ घातला.. त्या वेळी त्यांना असा साक्षात्कार झाला की नुसते sms voting प्रमाणे बाहेर जाणे चुकीचे, अन्यायकारक वगैरे आहे आणि त्या दबावाखाली, अजून कोणता नकोसा प्रसंग होऊ नये म्हणून ऐनवेळी अंतिम स्पर्धा तिघांमधे करण्याचा निर्णय घ्यावा लागला..
आता बाकी स्पर्धकांवर अन्याय होत नाही का? आणि ज्यांनी sms वर ६-६ रु. खर्च केले ते गेले की वाया! :-)
अंतिम फ़ेरीतही अभिजीतच विजेता झाला तर नवल वाटायला नको!


Swa_26
Saturday, February 10, 2007 - 5:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला.. त्या वादळवाट वाल्यांनी तर पुरती वाटच लावली प्रेक्षकांची... एवढे दिवस एक छान serial म्हणून बघितली आणि शेवट चक्क गुंडाळला कि हो ह्यांनी
धड ना शोकांतिका म्हणू शकत त्याला आणि ना धड सुखांतिका... (वादळवाटची पण झाली अवंतिका.... ती पण अशीच गुंडाळून टाकलेली..)


Psg
Saturday, February 10, 2007 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो गं स्वा_२६! शेवटचा भाग म्हणून उत्साहानी पाहिला, तर धड शेवट केलाच नाही.. सगळंच प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीवर सोडलं! एकच कळलं की रमा जयला accept करते.. आणि आई कदाचित तिच्या इच्छाशक्तिवर बरी होईल..

Mansmi18
Sunday, February 11, 2007 - 12:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार

मी झी मराठीला माझा निशेध इमेल ने कळविला आहे.

त्यानि ५ जणाना शेवटि चान्स द्यावा किव्वा अभिजितला बाद करावे.
उद्या जर परत त्याला कमी एसेमेस आले तर परत त्याला विजेता घोशित कर्नार का?

एसेमेस ना काहि अर्थ राहिल नाही. गेल्या वेळेस जर ५००००० एसेमेस धरले तर ३ रु प्रमाणे १५००००० रु होतात आणि ६रु प्रमाणे ३००००००. लोकान्च्या मताला किम्मत नहि तर किमान नाटक तरि करु नका.



Prady
Monday, February 12, 2007 - 10:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेपर मधे बातम्या वाचून ऊत्सुकतेने आजचा भाग पाहिला. स्वत्:ची नाचक्की झाकण्यासाठी चॅनेलवाल्यांनी केवळ जे लोक आजच्या निर्णयाच्या बाजूने बोलले त्यांचंच मतप्रदर्शन दाखवलं. फक्त एक मत विरुध्द.. कमाल आहे. आणी वरून अभिजीतची प्रतिक्रीया की टेन्शन मधून सुटलो. अशीच वेळ मागच्या वर्षी एका मराठी मुलावर Indian Idol मधे आली होती. बराच आरडा ओरडा झाला. जजेसनी walk out केलं. पण शेवटी त्या सर्वांना शांत रहायला सांगून तो मुलगा स्वत्:च ग्रेसफुली निघून गेला. दोन टोकाची उदाहरणं. आणी इतकंच होतं तर SMS वगैरेचे फार्स करायचेच कशाला. आधीच सांगायचं की लोकाग्रहास्तव तिघांना संधी देतोय. कोणीच मग काही बोललं नसतं. कार्यक्रम सादर करताना अगदी साळसूदपणाचा आव आणतात.

Sayuri
Tuesday, February 13, 2007 - 2:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

well said Prady!
सारेगम ने शेवटी अभिजितला नॉट आऊट ठरवून लोकांचे smsचे पैसे पाण्यात घालवले आहेत. As usual मधल्या मधे ideaची चांदी. (आता या न्यायाने आतापर्यंत घालविलेले स्पर्धकही आणा की. ते सुद्ध उभरते हुए कलाकारच ना.)
पंडित आणि गुप्तेला आत्ताच एव्ह्ढा कळवळा आलाय अभिजितचा की आता फ़ायनलला बहुतेक दोघंही ढसाढसा रडतील. आता खरं तर जर हे एव्हढे 'हिरे' शोधलेत सारेगमने आणि त्यातल्या कोणालाच स्पर्धेबाहेर घालवायची इच्छाही नाहिये तर मग अजून एकदा एक छोटासा नियम जरासा वाकवून महाराष्ट्राला दोन महागायक आणि एक महागायिका मिळवून द्यावी. कोणीच जायला नको.


Neelu_n
Tuesday, February 13, 2007 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालचा सारेगमप चा भाग पाहुन फारच संताप आला. दर्शकांच्या मताला आणि पैश्यालाही काहीच किंमत नाही हे त्यांनी दाखवुन दिले. त्यांना त्यांचे नियम असे वाकवायचे होते तर SMS चा फार्स कशाला करायचा? सरळ देवकी पंडीत आणि गुप्ते यानांच निकाल लावायला सांगायचा की.
अजुन दुसरा मुद्दा म्हणजे ते शेवटी जे म्हणत होते की २४ फ़ेबला live performance ला फक्त दोनजणच गाणार हे बर वाटत नाहीय.. मग आनंदीने काय घोडे मारले होते? तीन तिथे चार का नको.. होवुन जावु देत होते ना.. दोन मुली आनि दोन मुलगे...आणि मग SMS मागवायचे ना. तेव्हा का ह्यांना नियमात बदल करावासा वाटला. आणि सर्वात शेवटी danger zone मध्ये कोण आहे हे का नाही दाखवले. म्हणजे या आठवड्यासाठी प्रेक्षकांची मागवलेली अम्ते पाण्यातच ना.. तो नक्कीच अभिजित असणार म्हणुनच एवढा आटापीटा...
विजय कदमला तर फक्त अभिजीतची बाजु सांभाळायला आणले असच वाटत होते.
खर म्हणजे ह अभिजीत झी मराथीच्या अनेक गाण्याच्या कार्यक्रमात गाताना दिसतो म्हणजे गाण्याच्या बाबतीत तो सर्वच द्रुश्टीने ईतर गायकांपेक्षा नक्कीच सरस ठरणार ना. मग आधिपासुनच सगळ्यांपेक्षा सरस असणारा आणि नवीनच गाणरे यात स्पर्धा कशी असु शकते?? हा प्रश्न तर मला सुरुवातीपासुन पडलेला.
आणि स्पर्धा म्हणुन पाहिलेच तर सुरुवातीपासुन अभिजितला 'ग' ची बाधा दिसत होती. पण निर्णय judeges पुरता मर्यादित तोपर्यंत ठीक होते.. निर्णय प्रेक्षकांच्या हाती गेल्यावर प्रेक्षकांनी बरोब्बर मत दिलीत. पण आता चॅनॅलवाले असे राजकारण खेळतायत... फारच वाईट गोष्ट आहे ही.. इतर सहगायक कितीही नाही म्हणाले तरी हा त्यांच्यावर होणार अन्याय आहे... आणि प्रेक्षकांची उघड उघड फसवणुक आहे हा भाग वेगळाच.


Psg
Tuesday, February 13, 2007 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटी danger zone मध्ये कोण आहे हे का नाही दाखवले
अगं अभिजीतला आलेच होते सर्वात कमी sms . त्याच्या पाठीराख्यांनी हुल्लडबाजी केली, ते सगळं एडीट केलं नंतर.. सगळं preplanned होतं असच वाटतय मला तरी.. TRP वाढवण्यासाठीचे खेळ सगळे!

Badbadi
Tuesday, February 13, 2007 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि उच्चांक म्हणजे तो अवधूत सारेगम आणि देशाची घटना या गोष्टींची तुलना करत होता!!! आणि केली ती पण किती चुकिची... घटनेत राष्ट्रपतींच्या निर्णयाची तरतूद आधीच केली आहे... या लोकांनी run time नियम बदलले....
त्या झी वाल्यांना या बीबी ची लिंक पाठवायला हवी..


Mansmi18
Tuesday, February 13, 2007 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एकच प्रश्न आहे कि जर अनघा किव्वा मन्गेश शेवटी आले असते तर देवकिला हा कळवळा आला असता का? आणि हा निर्णय घेउन ते सरळ्सरळ प्रेक्ष्कान्च्या आवडिला डावलत आहेत.

जर फ़ाय्ननलला अभिजितला कमी एसेमेस आले तर तेव्हाही आम्हाला अक्कल नाहि म्हणुन अभिजितला विजयी करणार का?


Varadakanitkar
Tuesday, February 13, 2007 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय मला जरा सांगा ना वादळवाट चा शेवट काय केला शेवटी नाही मिळत मला पहायला

Prady
Tuesday, February 13, 2007 - 10:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.loksatta.com/daily/20070214/mp06.htm sms च्या फार्सचं लोकसत्ता मधील वृत्त.

Kedarjoshi
Tuesday, February 13, 2007 - 11:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एकच प्रश्न आहे कि जर अनघा किव्वा मन्गेश शेवटी आले असते तर देवकिला हा कळवळा आला असता का>

१०० टक्के नाही.
समहाऊ त्यांना फक्त अभिजीत आवडतो. कोणी तो जल्लोष २००६ कार्यक्रम पाहीला का? त्या वेळी सर्व जन गाणे म्हणताना ओरडत होते (अपवाद मंगेश व आंनदी जोशी) ते बिलकुल ओरडले नाहीत त्यांच आवाज निदान ताला सुरात चांगला लागत होता. अवधुत नेहमी म्हणतो की तुम्ही आता परफॉर्मर आहात. अरे मग हा कसला परफॉर्मन्स?

मंगेश व अनघा च्या १ / २ प्रॉबेबीलीटीला आता त्यांनी ० करुन ठेवले आहे.


Psg
Wednesday, February 14, 2007 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच्या (मंगळवार रात्री) भागात पहिली राऊंड होती वाद्याशिवाय गाण्याची.. त्यातच आवाजाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.. अनघा तर एक गाणं म्हणेपर्यंत दमते :-( जर हे गायक नाहीत, performer अहेत, तर सलग ५ गाणी तरी म्हणू शकण्याइतका stamina नाही तिच्यात.. अभिजीतचा आवाज- किती चोरून गातो!.. मनमोकळा आवाज लागत नाही त्याचा.. मंगेशच त्या तिघांमधे बेस्ट आहे!
सोमवारच्या भागानंतर इतका रोष पसरला आहे.. मला तर वाटतं की कोणीही sms करूच नयेत.. मग समजेल यांना :-)


Mandard
Wednesday, February 14, 2007 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरदा, वादळवाट शेवटी जयसिन्ग, समशेर आणि देवराम यान्च्यात मारामारी होते त्यात समशेर मरतो. रमा जखमी होते. आबा तीला घेवुन दवाखान्यात जातात. रमा जयसिन्गला स्विकारते. जयसिन्ग रमाच्या गाडीकडे बघत बसतो. सिरियल समाप्त. बाकी लोकांचे काय होते तुम्ही ठरवा. इतका भिकारडा शेवट तर अवंतिकाचा पण नव्हता.

Mandard
Wednesday, February 14, 2007 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो आणि देवराम पण मरतो. त्याचा पुतण्या पळुन जातो. हे आधीच्या पोस्टमधे घालायचे राहीले.

Mansmi18
Wednesday, February 14, 2007 - 1:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोटी कोटी रुपे तुझी कोटि सुर्य चन्द्र तारे

हे गाणे आणि सन्गीत यशवन्त देव यान्चे आहे का?

काल सारेगमप मधे प्रभाकर जोग असे दाखवले.


Varadakanitkar
Wednesday, February 14, 2007 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ई हा काय शेवट झाला आणि मग त्या समर चं काय झालं त्या रमाचं तर त्याच्याशी ठरलं होतं ना? माफ करा हं पण फार दिवस पाहिली नसल्याने मला काहीच details माहीत नाहियेत.

Dhanu66
Thursday, February 15, 2007 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी बरोबर, वादळवाट चा शेवट खरच अर्धवट केलाय. कदाचीत त्यन सीरिअल बन्द करायला सान्गीतली म्हणून त्यानी असा राग काढला असेल.

सा रे ग म मध्ये सुद्धा जे काही ज़ाले ते चूकीचे होते.

नवीन असम्भव बरी वाटतीये.


Visoba_khechar
Thursday, February 15, 2007 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वादळवाट ही एक अत्यंत फाल्तू मालिका संपवल्याबद्दल वादळवाटच्या निर्मात्यांना आणि झी मराठी वाहिनीला माझे कोटी कोटी धन्यवाद! या सुखांनो या आणि अशाच इतरही काही बकवास मालिका लवकरात लवकर संपाव्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

--तात्या.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators