|
मराठी माणसांच्या नेहमीच्या अंगभूत गुणांचा पडताळा इथे सुद्धा येऊ लागलाय! या ठिकाणी मराठीऐवजी, सोयीसाठी, इंग्लिश आणि आता उर्दूत सुद्धा चर्चा सुरू झाली आहे!
|
Bee
| |
| Friday, February 09, 2007 - 9:30 am: |
| 
|
माढेकर.. मराठी माणसांचे काही special गुण असतात असे काही आहे का खरचं.. I am very curious to know!
|
Yogy
| |
| Friday, February 09, 2007 - 9:47 am: |
| 
|
मराठी माणसाच्या अंगभूत गुणांमुळे आलेली परिस्थिती येथे http://www.loksatta.com/lokprabha/20070209/tathya.htm , येथे http://www.loksatta.com/lokprabha/20070216/good.htm आणि येथे वाचा http://www.esakal.com/esakal/02092007/83E73329AB.htm
|
Zakki
| |
| Friday, February 09, 2007 - 1:07 pm: |
| 
|
जेंव्हा मराठी संमेलनात मराठी भाषा टिकून रहाण्यासाठी सरकारने काहीतरी केले पाहिजे असे म्हणण्यात आले तेंव्हाच हे जाहीर झाले की आता गेली मराठी भाषा!! सरकारने कधी काय कशाचे भले केले आहे? शेतकर्यांना फुकट वीज दिली पण शेतकरी अजून आत्महत्या करतातच आहेत! एरवी मात्र भारनियमन, विद्यार्थ्यांना अभ्यासापुरती सुद्धा वीज मिळत नाही, पण त्यांच्यावर झाडायला मात्र गोळ्या आहेत!! कसली लोकशाही नि लोकांचे राज्य! महत्वाचे काय आहे नि नाही हे समजत नाही. नुसतेच १०० कोटी लोक, पण देशात ही अवस्था! Outsource करून टाका रशिया, चीन नाहीतर अमेरिका, इंग्लंडला. नाहीतरी पाकिस्तानी टपून बसलेच आहेत, नि भारतात सगळेजण मुसलमानांचे पाय चाटतातच आहेत. तर पाकीस्तानला देऊन टाका देश! मग उर्दू शिका! इथे उर्दू लिहीणारेहि लोक आहेतच! ब्रिटिशांच्या काळी सत्ता ब्रिटिशांची, सरकार ब्रिटिशांचे, त्यांनी काही केल्याशिवाय कुणाला काही मिळत नसे. पण आता तर भारतीयांची लोकशाही आहे ना? भाषावार प्रांतरचनेसाठी लोकांनीच राक्त सांडले ना? मग आता सगळे मिळाल्यावर जर आपल्यालाच आपली भाषा संभाळता येत नसेल तर हे असेच होणार! खुद्द मायबोलीवर, की जी अमेरिकतून चालू केली अश्यासाठी की लोकांना मराठी लिहून, वाचून, मराठीत लेख कविता, चर्चा करून मराठी जागती ठेवावी, तर तिथेहि भारतातलेच, दळभद्रे मराठी लोक इंग्रजीतून, हिंदीतून लिहून वर म्हणतात, आम्हाला मराठीत लिहीताच येत नाही! आमचे विचार आम्हाला मराठीतून मांडता येत नाहीत! मग मरू दे तुमची भाषा भारतात! रडता कशाला? मराठी साठी? मुळीच रडू नका. जगात इतर देशात ती मज्जेत जिवंत राहील, वाढेल, पसरेल, फळेल, फुलेल!!
|
Raadhika
| |
| Friday, February 09, 2007 - 1:55 pm: |
| 
|
झक्की... तुमचे हे पोस्ट आणि आधीचे इग्लिश मधील (रोमन लिपीत इंग्लिश भाषेत लिहिलेले) वाचले. आता तुम्ही असं म्हणत असाल की तुमच्या देशातील मराठी लोक मराठी मध्ये लिहितात आणि आमच्या देशातील 'दळभद्री' लोक इंग्लिश मध्ये, तर तो वस्तुस्थितीचा विपर्यास आहे. माझ्या बर्याच देशबांधवांनी (आणि भगिनींनी) मराठी भाषा रोमन लिपीत लिहिली, ते इंग्लीश नाही, अर्थात आपण हे जाणताच..... लोकांचं म्हणणं असं होतं की देवनागरीत लिहिणे कठीण वाटते... आणि एखाद्या जाणकाराने उर्दू शेर (तोही समर्पक) सांगितला तर बिघडले कुठे? आणि हो, मराठी साहित्य संमेलन म्हणजे महाराष्ट्र अथवा मराठी भाषा नव्हे. महाराष्ट्रातील ५०% अडाणी लोक मराठी सोडून दुसरी भाषा बोलत नाहीत, आणि सुशिक्षितांपैकी २०-३०% बोलत नाहीत असं धरलं तरी जवळ्पास ८०-९०% लोक मराठीतच बोलतात. आणि भारतात कोण कुणाचे पाय चाटतात या आधी अमेरिकेतील भारतीय (तुम्ही स्वत्: नव्हे) किती स्वाभीमानाने राहतात याचा विचार करा. मला माझ्या देशाचा आणि भाषेचा रास्त अभिमान आहे, असले छचोर टोमणे मी सहन करणार नाही.
|
Raadhika
| |
| Friday, February 09, 2007 - 2:06 pm: |
| 
|
आणि हो, हळदी कुंकवाला दारू पिण्याबद्दल म्हणाल तर, आमच्या देशात असं कुणी करत नाही, कारण आम्हा स्त्रियांना (जवळपास सर्व, काही अपवाद सोडल्यास... अपवाद सगळीकडे असतात), दारू पिणे हळदी कुंकवालाच काय, कधीच प्रशस्त वाटत नाही...
|
Yogy
| |
| Friday, February 09, 2007 - 3:51 pm: |
| 
|
राधिकाताई, मराठी साहित्य संमेलन म्हणजे महाराष्ट्र अथवा मराठी भाषा नव्हे. महाराष्ट्रातील ५०% अडाणी लोक मराठी सोडून दुसरी भाषा बोलत नाहीत, आणि सुशिक्षितांपैकी २०-३०% बोलत नाहीत असं धरलं तरी जवळ्पास ८०-९०% लोक मराठीतच बोलतात. हे आपले म्हणणे अंशत: खरे असले. तरी सर्वच व्यवहारात मराठीचा वापर आता अतिशय कमी झाला आहे ही गोष्ट तितकीच खरी आहे. जी भाषा आर्थिक राजकीय सामाजिक इ. व्यवहारात वापरली जात नाही ती केवळ बोलीभाषा म्हणून मर्यादित राहते. व्यवहारातील अगदी साध्या साध्या गोष्टी उदा: मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर सर्रास हिंदी जाहिराती दाखवल्या जातात हे आपण कसे खपवून घेतो? पुण्यात असलेल्या एफ-एम वाहिन्या किती वेळ मराठी गाणी लावतात? रिक्षावाले आता कोणत्या भाषेत गिर्हाइकांना बोलावतात? किती बॅंकामध्ये पैसे भरण्यासाठी मराठीत अर्ज उपलब्ध असतात? महाराष्ट्रातील नागपूर येथून दुकान चालवणार्या हल्दीराम स्वीट्स या कंपनीच्या 'लसूण शेव' प्रकाराचे पाकीट जर आपण पाहिले तर त्यावर मराठी वगळता इतर प्रादेशिक भाषांमध्ये त्या पदार्थाचे नाव छापले आहे. (आता 'लहसून सेव' हे जर मराठी नाव असेल तर हा आक्षेप मी मागे घेतो. पण माझ्या माहितीप्रमाणे लहसून व सेव हे दोन्ही शब्द हिंदीच आहेत) टप्प्याटप्प्याने मराठी ही सर्वच क्षेत्रांतून हाकलली जात आहे. "दुकानदाराचं बोर्ड ज्या भाषेत असतं ती त्या गावची भाषा" हे पुलंचं (रावसाहेब या लेखातील) वाक्य आठवत असेलच. मात्र ज्या राज्याच्या मंत्रालयातल्या पाट्या देखील मराठीत नाहीत त्या राज्याची भाषा कोणती? पुण्यातल्या किती पाट्या आता मराठीत आहेत? आता तर मायबाप महाराष्ट्र सरकारने शिधापत्रिकाही इंग्रजीत छापायचे ठरवून मराठीला हद्दपार करण्याची सुपारीच घेतली आहे. http://www.loksatta.com/daily/20070208/raj01.htm
|
Raadhika
| |
| Friday, February 09, 2007 - 4:07 pm: |
| 
|
योगी, सरकार आणि उद्योजक काय करतात या पेक्षा माझ्यासारखी सामान्य भारतीय नागरिक काय करते यावर भाषेचं भविष्य अवलंबुन आहे असं वाटतं आणि ज्यांना अमेरिकेतील राजकीय आणि सामाजिक प्रवाहात सामिल होता येत नाही आणि भारतातील समस्यांबद्दल चर्चा करायची असते, त्यांनी उगाच उठून कुणालाही नावे ठेवलेली मला पटत नाही... म्हणून या पोस्ट चा प्रपंच. मराठी भाषेबद्दल बोला, इथल्या रहिवाशांवर उगीच टिका सहन होत नाही.
|
Zakki
| |
| Friday, February 09, 2007 - 5:27 pm: |
| 
|
भारतीय (तुम्ही स्वत्: नव्हे) किती स्वाभीमानाने राहतात याचा विचार करा आणि ज्यांना अमेरिकेतील राजकीय आणि सामाजिक प्रवाहात सामिल होता येत नाही आणि भारतातील समस्यांबद्दल चर्चा करायची असते, त्यांनी उगाच उठून कुणालाही नावे ठेवलेली मला पटत नाही या पोस्टवर मी विचार केला. आम्ही इथे स्वाभिमानाने रहात नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे का? म्हणा, म्हणा. खरे तर तुम्ही काय वाट्टेल ते म्हणा. खरे असेल तर आम्हाला लाज वाटेल, नसेल तर विचारतो कोण? पण टीका सहन करायला भरपूर संस्कृतिक, सामाजिक, धार्मीक, आर्थिक नि राजकीय बळ आहे. एक नमूद करावेसे वाटते, की भारत अमेरिका यांच्यात जो अणूकरार झाला त्यात अमेरिकानिवासी भारतीय संघटनेने मोठ्या प्रमाणावर lobbying केले. अनेकांनी त्यांच्या सिनेट व कॉंग्रेस मधल्या प्रतिनिधींना पत्रे लिहिली, संघटनेला पैसे पाठवले. हेहि राज्यकारभारात भाग घेण्याचे लक्षण आहे. प्रत्येक जण एकदम भारतातल्यासारखा 'फुडारी' होत नाही! पण आपापल्या परीने काय करायचे ते करतात! तसे एकूण जीवन सुखासमाधानाचे अस्ल्याने कधी जाळपोळ मोर्चे, नासधूस करण्याची वेळ येत नाही! आता सगळे होऊन गेल्यावर परत टीका करतातच की तो करार भारताला चांगला नाही, पण तुम्ही सगळे राजकारणात भाग घेणारे आधी गप्प बसतात, नि मागून बोंबाबोंब करतात. त्यालाच राज्यकारभारात सामिल होणे म्हणतात, असे दिसते.
|
कालाय तस्मे नमह दुसरे काय? काही वर्षानी अमेरिकेत मुलाच्या मुन्जीत आई त्याला हाम्बर्गर चा घास भरवते आहे आणी बाबा पन्गतीतल्या लोकाना पोर्क चॉप्स आणी स्कॉच चा आग्रह करत आहेत असेही दिसेल
|
शिवाय नाहीतरी हल्ली कैरीच्या सरबता ऐवजी कोका कोला दिला जातो परदेशी कम्पन्यानी तयार केलेले कीटकनाशक युक्त रन्गीत पाणी पिण्या ऐवजी आपल्या नाशिकच्या जिद्दी शेतकर्यानी द्राक्षान्पासून केलेली वाईन केव्हाही योग्यच नाही का?
|
Shonoo
| |
| Sunday, February 11, 2007 - 10:44 pm: |
| 
|
"मला माझ्या देशाचा आणि भाषेचा रास्त अभिमान आहे, असले छचोर टोमणे मी सहन करणार नाही. " झक्की आणि छचोर? भाषेचा अभिमान आहे म्हटलं की योग्य, चपखल शब्द वापरायची गरज सरत असावी बहुधा! वा गो आपट्यांच्या शब्द रत्नाकरमधे दिलेला छचोर चा अर्थ: चटोर, बदफैली; छचोरी: रंगेलपणा.
|
Mandard
| |
| Monday, February 12, 2007 - 9:12 am: |
| 
|
(खुद्द मायबोलीवर, की जी अमेरिकतून चालू केली अश्यासाठी की लोकांना मराठी लिहून, वाचून, मराठीत लेख कविता, चर्चा करून मराठी जागती ठेवावी, तर तिथेहि भारतातलेच, दळभद्रे मराठी लोक इंग्रजीतून, हिंदीतून लिहून वर म्हणतात, आम्हाला मराठीत लिहीताच येत नाही! आमचे विचार आम्हाला मराठीतून मांडता येत नाहीत! मग मरू दे तुमची भाषा भारतात! रडता कशाला? मराठी साठी? मुळीच रडू नका. जगात इतर देशात ती मज्जेत जिवंत राहील, वाढेल, पसरेल, फळेल, फुलेल!! ) थोडक्यात राधिकाताई मराठी भाषा साम्भाळन्यास अनीवासी मराठी माणसे समर्थ आहेत. तुमच्या आमच्या सारख्या दळभद्री देशी माणसांची गरज नाही. उगीचच येतात मायबोलीवर. बरोबर ना काका.
|
Suvikask
| |
| Monday, February 12, 2007 - 9:52 am: |
| 
|
सगळ्यांची गाडी हळदी कुंकु- दारु वरुन भाषेवर जोरदार घसरलेली दिसते आहे. भलतेच विषयांतर झाले आहे. भलतेच वळण लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.....
|
सुविकास्क, हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात प्राशन केलेल्या तीर्थाचा परिणाम दिसायला लागलाय.
|
Zakki
| |
| Monday, February 12, 2007 - 12:45 pm: |
| 
|
झक्की आणि छचोर? अरे देवा! या राधिका मला ओळखतात की काय? अहो पण मी फक्त जे मराठीत लिहीत नाहीत नि ते सुद्धा मायबोलीवर, नि वर म्हणतात आम्ही इथ्थेच येऊन आमचे इंग्रजी, उर्दू ज्ञान दाखवणार, तुम्ही मराठी साठी सुरु केलेल्या या उपक्रमाबद्दल आम्हाला काही आदर नाही! अश्या लोकांना मी दळभद्रे म्हणतो! त्यात काही छचोरपणा मला वाटत नाही! मला त्यात चूकहि वाटत नाही! मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर मराठीतून विचार मांडण्याची सवय करा, मराठी देवनागरीतून लिहायची सवय करा. त्यासाठीच तर हा उपद्व्याप. ते जेंव्हा जमेल तेंव्हा जरूर इथे येऊन लिहा. अगदी काय वाट्टेल ते लिहा. असे माझे म्हणणे!
|
Zakki
| |
| Monday, February 12, 2007 - 12:49 pm: |
| 
|
शिवाय ती चर्चा इथे नको. खरे तर संस्कृति जपण्याचे काम बायकांनीच जास्त केले आहे, असे माझे मत आहे. त्याचे काय आहे, धर्मापायी आयुष्य दु:ख्खी करून घेण्यात काय अर्थ आहे? आपल्या धर्मात अनेऽक उपाय आहेत, जीवनाचे सार्थक करण्यासाठी. खरे तर योग्य वेळी वानप्रस्थाश्रम, सन्यास असेहि आपल्या धर्मात सांगीतले आहेत. मग ते का नाही कुणि करत? तर बायकांच्या नादी लागू नका बायकांना पुरूषांनी काही सांगायची गरज नाही. हळदी कुंकवाबद्दल माझे एकच मत आहे, ते असे की बायकांनी वारंवार (लहान मुलांना घेऊन) हळदीकुंकू करावे. तिथे काय योग्य नि मनाला आनंददायक वाटेल ते करावे. शक्यतो उशीरा घरी परतावे. म्हणजे पुरुषांच्या जिवाला जरा स्वस्थता मिळेल!
|
Raadhika
| |
| Monday, February 12, 2007 - 1:34 pm: |
| 
|
छचोर हे विशेषण 'टोमणा' या नामासाठी वापरण्यात आले होते, आपणासाठी नाही... यापलीकडे मला जे म्हणायचे आहे ते आधी लिहिले आहेच.
|
झक्की आणि छचोर? काय यांची कीर्ती दिगंत पसरली आहे हो!
|
Zakki
| |
| Monday, February 12, 2007 - 2:32 pm: |
| 
|
ह्या: ह्या:! कस्चं कस्चं! आपल्यासारख्यांची कृपा! लोकांबद्दल जनमानसात खर्या खोट्या बातम्या पसरवण्यात तुमची बोटे कोण धरणार?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|