Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 02, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Root Cause Analysis of Islamic Terrorism » Archive through February 02, 2007 « Previous Next »

Santu
Friday, February 02, 2007 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाल बहादुर शास्री व नेपोलियन यांची उची कमिच होति.
पण पाकड्या ६फ़ुटि आयुब ला, धुळ चारली च ना.


Santu
Friday, February 02, 2007 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बिजापोटि फ़ळे रसाळ हे
तुम्हाला माहित नाहि वाटते.
बी लहानच असते त्याचच पुढे वट व्रुक्ष होतो


Laalbhai
Friday, February 02, 2007 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईतके धडधडीत हत्या करणारा समुदाय दिसुनही त्याना असल्या तद्दन खोट्या, किळसवाण्या कहाण्या बनवुन वर हिन्दुनाच दोष देण्याची ही कोणती वृत्ती आहे.

>>

च्यायला, माफ करा. गोध्रा हत्याकांडात(?) मेलेले "हिंदुत्ववादी रामभक्त कारसेवक" होते, असा कोणताही पुरावा आजतागायत (प्र)सिद्ध झालेला नाही.

असल्यास कृपया लोकांच्या नजरेसमोर आणून द्यावा.

(दोन सरकारांच्या कारकीर्दीत दोन आयोग स्थापले गेले आणि दोघांनीही परस्पर विरोधी reports दिले. तुमचेच खरे का मानायचे? ही खालची rediff.com ची लिंक खरी का नाही मानायची?
http://in.rediff.com/news/2005/jan/17godhra.htm ) ( rediff.com चे कोणी नातेवाई कोणा राजकिय नेत्याशी संबंधित असल्याची मला कल्पना नाही!)
सत्य इतकेच की अपघात झाल्यावर घाई घाईने चौकशी उरकून परिस्थितीजन्य पुरावे मिटवण्यात आले. त्यामुळे "सत्य" काय हे केवळ म्रुतात्मांनाच ठाऊक आहे.

अर्थात, तुम्ही माझ्या ह्या म्हणण्याला वाट्टेल ती लेबलं लावा. मला फरक पडत नाही.

हत्या करणार्‍या कुणाचेही समर्थन मिडीयातल्या जबाबदार घटकांनी कधीही केलेले नाही. तीच मिडीया कोणीतरी एक लहान मुलगा विहिरीत अडकला होता ते नाट्य "live" दाखवत होते. आणि पुढे त्याला "celebrity" करण्यात आले.

प्रश्न हा नाहीये की मीडिया किती जबाबदार आहे आणि नाही. प्रश्न हा आहे की, शेवटी सत्य लोकांसमोर येते की नाही? आणि तुमच्यावर लोकांनी विश्वास का ठेवायचा? तुम्ही राष्ट्रवादी आहात असा दावा करता म्हणून?

म्हणजे आपोआप तुम्हाला विरोध केला की आम्ही राष्ट्रद्रोही ठरतो, नाही का?

म्हणजे धर्माज्ञा पाळण्याचा आदेश येतो. पण तिच्याबद्दल प्रतिप्रश्न विचारायचे नाहीत. विचारले की तुम्ही "धर्मभ्रष्ट".

इतके rigid न झाल्यास उत्तम.

आणि जे आरोप तुम्ही तुमच्या विरोधकांवर करता (म्हणजे आमच्यावर!) तेच आम्ही तुमच्यावरही करू शकतो.

इथे सुंता, बाटला, ह्या शब्दांचा "कडक" निषेध तुम्हीही कधीही केला नव्हता. रक्तरंजित फोटो इथे टाकण्याबद्दल तुम्ही एक अवाक्षरही इथे लिहिले नव्हते. म्हणजे, तुम्हचा ह्या गोष्टींना पाठिंबा नव्हता, हे आम्ही कसे समजायचे? तुम्ही सगळे घडून गेल्यावर आम्हाला सांगताय म्हणून? का बरे?

तसेच आहे. मीडियातल्या जबाबदार घटकांनी सर्वच हिंसाचाराचा सारखाच विरोध केला आहे. मीडियातला जबाबदार घटक नेहमीच माणूसकीशी बांधिल असतो. (ह्याचा अर्थ "कम्युनिस्टांशी बांधील असतो." असा तुम्ही घेतलात, तर तुम्ही आमचा सन्मानच करत आहात.:-))

तेंव्हा मीडियाच्या मागे लपू नका. सत्य जर पुराव्या सहित मांडता येत असेल तर ते नक्कीच स्वीकारू. पण उगाच कोणतेतरी फोटो द्यायचे आणि त्याखाली मुस्लिम, ख्रिश्चन, कम्युनिस्टद्वेशी काहीतरी लिहायचे आणि "हा घ्या पुरावा" म्हणायचे. ह्याला काहीच अर्थ नाही.

(वरती "विरोध" केला की हिंसात्मक विरोधाची कम्युनिस्टांची रितच आहे, अशी फुसकी सोडून गप्प व्हायचे. व्वा, च्यायला!:-))

Laalbhai
Friday, February 02, 2007 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://en.wikipedia.org/wiki/Godhra_Train_Burning

http://www.hindu.com/2005/01/23/stories/2005012303901400.htm

The Banerjee interim report bears all the hallmarks of a rush job, while the Nanavati panel's work shows no signs of concluding despite the passage of nearly three years.

ह्या लिंका पहा. "tribune" तुमचेच मत मांडत आहे की! कशाला उगाच ओरडता मीडियाच्या नावाने?


असो.

आता पुन्हा तुमचा विरोधाभास दाखवून द्यायचा तर.. संतू ह्यांनी गुजरातम्धे मोदी याने जे केले तेच सर्व भारतात करून (म्हणजे सामान्य इतरधर्मीयांविरुद्ध हिंसेचा मार्ग अवलंबून) हिंदू vote bank तयार करावी, असे म्हटले होते. त्याचा निषेध तुम्ही केला नाहीत.

तुमचा "ह्या" प्रकाराला, मार्गाला पाठिंबा आहे का?

माझ्यामते माझ्या ह्या दोन्ही पोस्ट्स मधे काहीही "वैयक्तिक" आणि "तेच तेच उगाळलेले" नाही. त्यामुळे तुम्हाला मुद्देसूद सविस्तर उत्तर देण्यास हरकत नसावी.


Laalbhai
Friday, February 02, 2007 - 1:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिन्दुनाच दोष देण्याची ही कोणती वृत्ती आहे.

>>>

well, शब्दांचा इतका कीस पाडल्याबद्दल क्षमस्व. पण "हिंदूंना" कोणीही दोष दिलेला नाही. किंवा कोणाही "राष्ट्रवाद्यांना" विरोध केलेला नाही.

विरोध आहे तो संघप्रणित धार्मिक कट्टरतेला.

तुमच्या तथाकथित राष्ट्रवादाचे शिक्के कपाळावर न मिरवणारी, ह्या देशात ९० टक्क्यांपेक्षा जास्त जनता आहे! (आणि लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचण्यात आपण - म्हणजे तुम्ही - कुठेतरी खुपच कमी पडतो आहोत, ह्याची तुम्हाला लवकरच जाणीव झाली, तर बरे होईल.)


Chyayla
Friday, February 02, 2007 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/cgi-bin/hitguj/discus.cgi?pg=prev&topic=46&page=122234 (2.06AM)

/hitguj/messages/46/120429.html?1165982572 (5.13PM)

काय म्हणता लालभाई, मी सन्तुला पण विरोध केला आहे, व बाटला शब्दाला पण... निदान असे तरी नका लिहु की सगळ्यानसमोर खोटे पडाल... जरा वरच्या लिन्क मधील माझ्या पोस्ट वाचा. मी तुम्हाला याच बद्दल लिहिले होते की ज्यावर उत्तर दीले आहे त्याला परत परत उगाळुन येरे माझ्या मागल्या आलेच.

रामभक्त हिन्दु असो वा कुणी असो पण निरपराध जनता तर मारल्या गेली ना. मारणारे मुस्लिम होते हे सत्य का लपवता? आणी निरपराध मरत असताना त्यात कोणती धार्मिक कट्टरता आली ते सान्गाल काय? तसे हिन्सा कोणतीही असो त्याचा निशेधच.

जर तथाकथीत सन्घप्रणीत धार्मिक कट्टरता असती तर गुजरातची एवढी प्रगती नसती झाली व काश्मिर मधल्या हिन्दुन्प्रमाणे तिथे मुस्लिम नामशेश झाला असता, तुमचा दाम्भिक सेक्युलारिस्म चा विरोध केला की लगेच तो धार्मिक कट्टर ठरतो काय? मस्त... चालु द्या...

हा अजुन दुट्टप्पीपणा तुम्हीच ईथे दाखवुन दीलात. मुस्लिमानी हल्ला केला की त्याबद्दल अवाक्षरही नाही. व हिन्दु समाजाने प्रतिक्रिया दीली की लगेच सन्घाचे, बजरन्ग दलाचे लेबल लावले की सम्पला विशय आणी मग बोलणेच खुन्टले... असामी मी तुला याच सन्दर्भात लिहिले होते. व असली लेबले उतरवण्याबद्दल लिहिले आहे हे ही स्पष्ट केले होते.


Laalbhai
Friday, February 02, 2007 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्तुच्या काही मुद्याना मी पण समर्थन दीलेले नाही हे लक्षात घ्या. विशेषता प्रत्येक मुस्लिम दहशतवादी असणे, व वैयक्तिक वाद याबद्दल लिहिले सुद्धा आहे.

>>>

तुम्ही "असे" म्हणालात. त्यावर टिका केली नाहीत.

मीडियाबद्दलही असेच म्हणता येईल. मीडिया कोणाच्याही हिंसाचाराचे समर्थन कधीच करत नाही!

पुन्हा एकदा, हिंदू "समाजाची प्रतिक्रिया" असे काहीही नाहीये. मोदीने तो व्यवस्थोत घडवून आणलेला plan होता. पुढे परिस्थिती त्याच्याही हाताबाहेर गेली.

मला सांगा, इस्लामी दहशतवादाचा प्रभाव संपूर्ण देशात कधी वाढला? १९९१ ला तुम्ही बाबरी मशिद पाडलीत, त्यानंतर. संघाने इतर धर्मियांविरुद्ध पद्धतशीरपणे मोहिम उघडल्यानंतर समाजातली अस्वस्थता वाढायला लागलेली. दोन्ही समाजतली "वरकरणी तेढ" त्यानंतर जास्तच दिसू लागली. दोन्ही बाजूचे माथेफिरू आणखीनच बेभान होताना दिसू लागले. so the provocation is from both sides . संघाने आणि बजरंगदलाने (हिंदू समाजाने नाही!) मुस्लिम अतिरेक्यांने जे काही केले (मुस्लिम समाजाने नाही!) त्याला प्रतिक्रिया दिली, असे म्हणताच येणार नाही.

हिंदू अथवा मुस्लिम, संपूर्ण समाजाला इथे कोणत्याही संदर्भात मधे आणू नका. ही चर्चा दोन्ही धर्मातल्या माथेफिरुंबद्दलची आहे, की ह्यांचे माथे इतके रिकामे कसे की एवढ्या तेवढ्यानेही फिरते? समाजातली अस्वस्थता ही दोन्ही धर्मातल्या माथेफिरूंमुळे आहे. you (I mean, those who support extrimism.) are equally responsible for the unrest in the society and now you trying to find out the "root cause" in other's religion. It is a fun!!! (or pun??)

Sorry sir, No offense meant. पण इथे "You" हे समुहाला उद्देशून वापरले आहे, व्यक्तीला नाही. १९९१ नंतर काश्मिरपुरता मर्यादित असलेला दहशतवाद संपूर्ण देशात पसरतोय, असे चित्र कसे निर्माण झाले? why after 1991? तसेही छोटे छोटे हिंदू - मुस्लिम दंगे होतच होते. पण मुस्लिम समाज १९९१ नंतर एकदम "शत्रु" का भासायला लागला? की तसा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला?

आताच का मुस्लिम मौलवी मशिदितून "मारो, काटो" ची बांग देतात आणि सरसंघचालक सार्वजनिक व्यासपीठावरून "मुस्लिम समाज शत्रू आहे" असे म्हणतात? what is the difference? where is the difference? I can see only one difference that one group claims to be "the" nationalist -- without knowing what is the Nation!


सुदैवाने, दोन्ही समाजातल्या ह्या माथेफिरुंची संख्या फार वेगाने वाढत नाहीये! स्थानिक, राज्यिय आणि केंद्रिय निवडणूकांच्या निकालावरून ते स्पष्टच होते आहे.


Laalbhai
Friday, February 02, 2007 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाजपाने (की संघाने?) मोदी आणि संजय जोशी ह्यांना राष्ट्रिय कार्यकारिणीतून हाकलले, हे वाचलेच असेल तुम्ही.

Saavat
Friday, February 02, 2007 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>तसेच रामायण, गीता, उपनिषद कोणतेच धर्म ग्रन्थ म्हणुन नाहीत

च्यायला,
काही प्रामाणिक प्रश्न,
म्हणजे हिंदूना 'धर्मग्रंथ' च नाहीत की काय?
मग वेद, रामायण, गीता(महाभारत) हे काय आहेत?


>>> त्यामुळेच हिन्दु सन्स्कृतीचे धर्म थोडे सम्जण्यास कठीण वाटतात पण अध्यात्मिक उन्नतित तेच खरे सहाय्यक होतात.
यातल्या 'हिन्दु सन्स्कृतीचे धर्म ' यावर थोड अजून स्पष्टिकरण द्याल का?

Laalbhai
Friday, February 02, 2007 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मारणारे मुस्लिम होते हे सत्य का लपवता?

>>>

मारणारे राक्षस होते.. जर कोणीखरेच मारले असेल तर. तसेच राक्षस खैरलांजीलाही आपल्याला दिसलेच. so, where is the difference?

Saavat
Friday, February 02, 2007 - 3:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>मारणारे राक्षस होते..
लालभाई,
हे एकदम मान्य, राक्षसांचा धर्म हा आसुराचा. त्यांना इतर कुठलाही धर्म नसतो!!


Asami
Friday, February 02, 2007 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जसा ईकडे पुरावा देउन मुद्दा मान्डला आहे तसाच तुही मान्डावा ही अपेक्षा.
>>>>सर्वात आधी मह्त्वाची गोष्ट हि कि मी रागावलो etc नाहिये. पण माझा साधा मुद्दा तुला लक्षात येत नाही म्हणुन irritate नक्की झालोय.

मला नाही वाटत कि मला पुरावा द्यायची गरज आहे करण मूळात मी अमकी बाजू खरी किंवा खोटी हे म्हणत नसून , जे अमकी बाजू खरी असे म्हणत आहेत त्यांची सत्यासत्यता पडताळून बघायचा प्रय्त्न करतोय. माझा प्रश्न अतिशय साधा आहे कि एक घटना घडली त्याला दोन बाजूंनी आपापले लेबल लावून त्याची आपल्याला सोयीस्कर अशी कारणमीमांसा केली. पण ह्या दोन बाजूंशिवाय बाकीच्यांचे काय ? त्यांनी कशावर विश्वास ठेवावा हे त्यांना ठरवू दे आणी त्यासाठी त्यांनी काही प्रश्न विचारले तर त्यात वावगे काय ? Even more important, this no way signifies that third party is less pariotic or biased with any particular notion. There is absolutely no conclusive evidence to point to such conclusions.

तुला उदाहरणच हवे तर गोध्राचेच बघ ना. जे झाले हे अतिशय क्रूर होते आणी अतिशय लाजिरवाणे होते ह्यात शंकाच नाही . त्याचे after effects etc हे सध्यापुरते बाजूला ठेवूया नि मूळ घटनेकडे बघू. दोन आयोग दोन वेगळे निषक्र्ष. बाकीच्या सटरफ़टर organizations चे अहवाल etc तर मी विचारातच घेत नाहीये. सामान्य मनुष्याच्या point of angle ने विचार कर नि मला सांग कि अमका खरा नि तमका नाही हे कसे ठरवायचे ? hence if one wants to sit on the fence here to decide upon what really happened, does not absolutely implies he is for what happened. It is merely pointing that he not buying either argument.

आयुष्यातली प्रत्येक घटना खरे - खोटे एव्हढ्या साध्या कार्यकारणभावावर चालत असती तर ते किती सुटसुटीत झाले असते ? दुर्दैवाने तसे फार क़्वचितच असते. And sheer refusal to acknowledge that both sides could be wrong and truth lies somewhere in between, is beyond me.

क्रुपा करून हे फक्त तुला उद्देशून आहे असे समजू नकोस. This is general rhetoric


Deshi
Friday, February 02, 2007 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयुष्यातली प्रत्येक घटना खरे - खोटे एव्हढ्या साध्या कार्यकारणभावावर चालत असती तर ते किती सुटसुटीत झाले असते ?>>>>..

रादर असामी सर्व गोष्टी ह्याच कार्यकारण्भावावर चालतात. फरक ईतकाच की मला जे वाटत ते मी सत्य ठरवतो व त्याला जे वाटत ते तो.

आता ह्या खरे सत्य माझ्येच असे धरल्यामुळे अशा गोष्टी होनारच. साध्या नवरा बायकोच्या भांडन्याचेच पहा.



And sheer refusal to acknowledge that both sides could be wrong and truth lies somewhere in between, is beyond me >>>

Now this the only truth. But nobody, nobody will ack. this fact.

Laalbhai
Friday, February 02, 2007 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि मीडियाबद्दल तुमचा परिवार नक्कीच इतका naive नाहीये. तुमच्या लोकांनी मीडियाला कसे वापरलेय, याची दोन उदाहरणेच देतो.

१. वाजपेयी PM झाल्यावर काही महिन्यात त्यांची तब्येत बिघडली, तेंव्हा next PM वेळ आलीच तर कोण? अशी चर्चा सुरु झाली आणि आघाडीचा सर्वमान्य नेता म्हणून फर्नांडिसाचे नाव पुढे आले. आता अडवाणींना PM व्हायची किती इच्छा आहे, हे मी सांगू? तेंव्हा अडवाणींनी फर्नांडिसांचे चारित्र्यहरण करण्यासाठी तेहलका घडवून आणले. आपोआपच फर्नांडिसांचा पत्ता कट झाला. पण देवानेच हे सगळे पाहिले आणि वाजपेयीनंतर कोण, असा प्रश्न आलाच नाही.

२. नुकतेच झलेले संजय जोशी प्रकरण. मोदीचीही उडी कुठे आहे, हे सांगण्याची गरज नाही. पण संजय जोशी आणि मोदी हे एकमेकांचे विरोधक, पण दिल्लीमधे जोशींचे प्रस्थ वाढायला लागले. हे मोदीला खपले नाही, म्हणून जोशींचे चारित्र्यहनन करण्यात आले. मी जोशींना जितके पाहिले आहे, त्यावरून जोशी "असे" असावेत असे मूळीच वाटत नाही.

ही उदाहरणे तुम्ही लोक मीडियाचा किती मस्त वापर करून घेऊ शकता. त्यावेळेस मीडियातली लोकं कम्युनिस्ट वगैरे हे नाही कुणाला दिसत.

anyway, मोदी, संघ ह्या कुणाला देश अथवा धर्माची चाड असती, तर तुम्ही इथे घसा फाडून सांगताय तेच "सत्य" मीडियाकरवी बाहेर आले असते. त्यांच्यात तेवढी ताकद नक्कीच आहे. मोदी तर गुजरातचा हुकुमशहा आहे. गुजरातच्या पेपरात तरी ह्या बातम्या येतात का?


Deshi
Friday, February 02, 2007 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोदी तर गुजरातचा हुकुमशहा आहे. गुजरातच्या पेपरात तरी ह्या बातम्या येतात का?

मान्य. पण त्याच गुजरातचा प्रगतीचा रेट भारतात सर्वात जास्त आहे.

बुश भाऊ अनेक देशांची वाट लावतात पण अमेरिकेची अर्थव्यवस्था जोमान चालु आहे म्हणुन लोक मजेत आहेत.
हेच उदा गुजरात च्या बाबतीत पण लागु होईल.


Chyayla
Friday, February 02, 2007 - 7:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला उदाहरणच हवे तर गोध्राचेच बघ ना. जे झाले हे अतिशय क्रूर होते आणी अतिशय लाजिरवाणे होते ह्यात शंकाच नाही

बस मला हेच ऐकायचे होते, मला पण हेही मान्य नाही व यामुळे दन्गल झाली त्यातही दोन्हीकडुन नरसन्हार झाला ते ही क्रुरच आहे, तुझ हे म्हणण आहे तेच माझही आहे की दोश दोन्हीकडे असु शकतो पण एकाच पक्षाला बदनाम करण्याचे जे कारस्थान आहे त्याला माझा विरोध आहे.

लालभाई मस्तच... जमतय तुम्हाला हळु हळु... हा लढा कैक शतके सुरु आहे त्याला एक व्यवस्थित लोकशाही पद्धतिने एक सन्घटन प्राप्त झाले आहे. त्यामुळे कस तुम्हाला लेबल लावायला मिळतय. का १९९१ च्या पुर्वीचा ईतिहास विसरले का राव? फ़क्त मतलबापुरताच ईतिहास आठवतो तुम्हाला? म्हणजे शिवाजी महाराजान्नी केल ते सुद्धा धार्मिक कट्टरताच म्हणाल ना? त्यान्नी तर चक्क हिन्दु पतशाहीची म्हणजे चक्क हिन्दुन्च नाव घेउन (तौबा तौबा) स्वराज्य स्थापन केल. म्हणजे कम्युनिस्टान्प्रमाणे तुम्हीही त्याना हिन्दु अतिरेकीच म्हणाल. तुम्हाला परकिय इस्लामी आक्रमकान्ची गुलामी चालते पण स्वताच्या लोकान्च राज्य नाही चालत ही गुलामगिरीची भावना अजुनही गेली नाही तुमची.
उलट १९९१ पेक्षा त्याच्या आधी या देशात जास्त दन्गली झाल्या त्याच्या पुर्वी १९४७ आणी त्यानन्तर कैक दन्गली झाल्या तेन्व्हा कुठे होत्या हिन्दुत्ववादी सन्घटना? तेन्व्हा त्या दन्गलीना कोणाच लेबल लावाल?
तुम्हीच आता ईथे जाणुन बुजुन एका पक्षाचा द्वेश करत आहात. पाकिस्तानची निर्मिती का झाली? का लाखोच्या सन्ख्येनी प्रेत भरुन रेल्वेने गाड्या येत होत्या का असन्ख्य स्त्रियान्वर अत्याचार झालेत? बरेच प्रश्न आहेत त्याची उत्तरे तुम्ही द्याल तर तुम्हाला इस्लामी दहशतवादाचे मुळ कळेल. तुमच्या मताप्रमाणे हा दहशतवाद १९९१ नन्तर सुरु झालेला नाही. आज सम्पुर्ण भारतच काय सम्पुर्ण जगातच तो पसरला आहे.

हे एकच उदाहरण देतो या सारखे कैक उदाहरणे आहेतच ही विकिपिडिया मधुन माहिती घेत आहे. या सर्व काळात सेक्युलर वाद्यान्च राज्य होत हे ही लक्षात घ्या.

Bhagalpur riots
Communal disturbances between Hindus and Muslims have been a part of the history of Bhagalpur and riots had occurred in 1924, 1936, 1946 and 1967. However, Bhagalpur became notorious after the riots in October 1989, and the name Bhagalpur riots usually refers to the 1989 riots. According to various accounts, some 1100 [7] to 1891 [8] people were killed, a majority of them muslims. According to some accounts, stoning of a Durga puja procession by some muslims triggered the riots. As a fall-out of the riots, the silk-weaving industry suffered a decline


Chyayla
Friday, February 02, 2007 - 9:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमची वाचा बसायला हे वरच एक उदाहरण पुरेसे आहे सगळ्यात भीषण दन्गल तर १९९१ पुर्वी केवळ २ वर्शे आधीच घडली त्यात गुजरातपेक्षा जास्त मुस्लिम मारल्या गेले आणी त्यावेळेस कॉन्ग्रेसचा मुख्यमन्त्री होता. काही दन्गली चक्क सहा सहा महिने चालल्या मग त्याबद्दल कोणीच बोलताना दीसत नाही.

केवळ एकाच दन्गली वरुन ईतका गदारोळ या बद्दलही बोला राव, माझ आवाहन आहे, ईथे ज्यान्ना गुजरात दन्ग्याची माहिती आहे त्यातल्या किती जणाना या दन्ग्या बद्दलची माहिती आहे, परत मिडियाला नावे नका ठेवु, बाकी त्यानी ह्या दन्गलीची चर्चा होउ नये म्हणुन मस्त काळजी घेतली. आणी आता रोज त्याना केवळ एकच २००२ ची दन्गल दीसते... केवळ लेबल लावुन दोष देणे सोपे आहे. तुम्ही एका दन्गलीचा जाब विचारता आहात कोणत्या तोन्डाने? त्यापुर्वी च्या शेकडो दन्गलीन्चा जाब द्यायची तयारी ठेवा. नुसते बीनबुडाचे आरोप लावायला काय जातय. आणी प्रत्येक वेळेस कागाळी एका विशिष्ट समुदायाकडुनच का होते? यातच तुम्हाला परत Root Cause लक्षात येत.


Vijaykulkarni
Friday, February 02, 2007 - 10:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी जोशींना जितके पाहिले आहे, त्यावरून जोशी "असे" असावेत असे मूळीच वाटत नाही
दिसते तसे नसते म्हणून जग फसते. :-)
असो,
दन्गलीत बळी पडलेल्या एखाद्या लहान बालिकेचे शव पाहून ज्यान्च्या डोळ्यात टचकन पाणी येते ती माणसे आणी त्या बालिकेचा धर्म कोणता हा प्रश्न आधी ज्यान्च्या मनात येतो ती राक्शसे.



Asami
Friday, February 02, 2007 - 10:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला माझ्यासाठी तरी प्रत्येक दंगल निशेधार्ह आहे. आमच्यावर अमकी वर्षे अन्याय झाला तेंव्हा आता आमची पाळी हे समर्थन ह्या प्रकाराला कधीच रोखू शकत नाही. political milage साठी विशिष्ट गटाला एकत्र करून परिस्थिती जैसे थे ठेवता येइल हा अतिशय naive समज आहे. मनुष्याच्या विचारसरणीनुसार सुडाची किंवा रागाची किंवा किमान गेला बाजार वैफ़ल्याची भावना निर्माण होणे हे साहजिक आहे पण त्याच्या परिणामांची कल्पना करणे सोपे नाही. It is easy to criticise one in the moments of afterthoughts as you can easily see effects generated by an incidence

दुर्दैवाने भारतापुरती तरी हि विभागणी आत्ता एव्हढ्या खोलवर गेलेली आहे कि ती इतर कुठल्याही बाह्य संप्रेरकाशिवाय सांधता येइल असे मला तरी वाटत नाही. economic power is very brute force and hopefully it will drive down these issues beyond significance. Lets keep fingers crossed. O&O


Shendenaxatra
Saturday, February 03, 2007 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आधुनिक भारतात धर्मांध मुस्लिमांना सर्वात आधी प्रतिष्ठा कुणी दिली असेल तर ती मोहनदास गांधीने. स्वार्थाने आंधळे होऊन खिलाफ़तची चळवळ सुरु केली. त्या चळवळीचा भारताशी काहीही संबंध नव्हता. त्यातून लोकशाहीपेक्षा मुस्लिम धर्म श्रेष्ठ असा संदेश दिला गेला. त्यामुळे धार्मिक मुस्लिमांना राजकारणात महत्त्व मिळाले आणि ते आजही आहे. जिनासारखा पुरोगामी, उच्चशिक्षित माणूस मागे पडावा म्हणून हा दुष्ट कावा रचला गेला. हा माणूस (गांधी) मुस्लिम लांगूलचालनाचा, तुष्टीकरणाचा जनक. कॉंगेसने व अन्य पक्षांनी (भाजपही) हीच उज्ज्वल परंपरा पुढे चालू ठेवली.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators