|
Koki
| |
| Tuesday, January 02, 2007 - 3:38 pm: |
| 
|
जगाचे राजकारण पाहिले की वाटते, अरे आपले राज्कारणी तर अगदीच किडुकमिडुक आहेत. इतकी दुरद्रुष्टी ठेवणे यांआ काय जमणार? जास्तीत्जास्त धार्मिक दंगली घडवण्यात यांचा हातखंडा. 'सरड्याची धाव कुंपणापर्यंत!' बाकी सद्दाम्चे १७ duplicates होते, असे इराक्-इराण युध्याच्या वेळी उघड झाले होते म्हणे!(मला नक्कि माहित नाहि. आनि पुरावाहि(न्युज वगैरे) नाहि.)
|
Chyayla
| |
| Wednesday, January 03, 2007 - 12:00 am: |
| 
|
कोकी लाख बोललात, खरच भारतियाना अजुनही ती दुरद्रुष्टी येउ नये हे दुर्दैव. सन्तु, तुमचा स्वदेश चे हीत पाहण्याचा मुद्दा एकदम मान्य, वास्तविक पहाता जागतिक राजकारणात शत्रु आणी मित्र हे काळानुसार व परिस्थितीनुसार बदलत असतात. सद्दाम भारताचा सच्चा मित्र वैगेरे तर नव्हता पण व्यापारी मीत्र होता, त्यालापण भारतासारखा एक ग्राहक मिळणार होता त्यामुळे असेल कदाचित पण त्याने भारताच्या काश्मिर प्रश्नाला पाठीम्बा दीला होता. व आपणही त्याला नैतिक पाठीम्बा दीला होता. या सगळ्या गदारोळात एक मुद्दा सगळे विसरलेले दिसतात आहे, याच सद्दामने कॉन्ग्रेस ला नटवरसिन्ग मार्फ़त घोटाळा करुन कोट्यवधी रुपये खाउ घातले होते. सोनिया किती भ्रष्टाचारी आहे ते उघडच आहे. बिचारा नटवरसिन्ग बळीचा बकरा बनला. क्वात्रोचीचा तर अजुनही पत्ता नाही. मला तरी सद्दाम विषयी सहानुभुती नाही किन्वा पाठीम्बा पण नाही फ़क्त माझा विरोध अमेरिकेच्या दन्डुकेशाहीला होता. असो तो त्याच्या जागी बरोबर असेलही. आता मात्र भारतातल्या मुस्लिमाना सद्दाम हा जवळचा वाटु लागला आहे, केदार यानी जी भिती व्यक्त केली ती पण रास्त आहे.
|
वर असे मत मांडले आहे की सद्दाम हा सुन्नी होता आणि भारतातले मुस्लिम सुन्नी आहेत आणि त्यांना सुन्नी ते शिया सत्तांतर डाचते आहे. मला हे खरे वाटत नाही. मोर्चात निव्वळ अमेरिकेची निंदा चालू आहे. शियांविरुद्ध एक चकार शब्द ऐकू येत नाही. हा सर्व उथळ प्रकार आहे. एका मुस्लिम राज्यकर्त्याला बिगर मुस्लिम सत्तेने हटवले म्हणून भारतातील मुस्लिमांचे पित्त खवळले आहे. त्याला कम्युनिस्टांची साथ आहे. हे एक निरर्थक शक्तीप्रदर्शन असावे. असो.
|
सामनाच्या उत्सव मधिल संजय राउत लिखित लेख वाचनिय आहे. http://saamana.com/ jay hi.Nda! jay mahaaraaShTra!
|
ज्या वाईट रीतीने फ़ाशी दिली... त्यापेक्षा त्याला जेल मध्ये पडु दिले असते.. ती फ़ाशी अतीशय निंदनीय होती याबद्दल वादच नाही.
|
Avdhut
| |
| Monday, January 08, 2007 - 4:07 pm: |
| 
|
खरा वाद हा का दिली या पेक्षा कशी दिली यावर आहे.
|
Disha013
| |
| Monday, January 08, 2007 - 4:11 pm: |
| 
|
लोपाचे पटले.सद्दाम क्रुरकर्मा होता. मान्य. १५० जणांच्या हत्येसाठी फ़ाशी, मान्य. पण ताची एतकी अवहेलना कराय्ची गरज न्हवती. बुश मुळे ३००० अमेरिकन सैनिक मेले,त्याचे काय? आणि निंदनीय बाब अशी की, त्या फ़ाशीचे चित्रीकरण करुन net वर दाखवणे. आता ते कोणी shoot केले,त्याचा शोध घेतायेत म्हणे. सगळे जाणुनबुजुन केल्यावर.
|
Zakki
| |
| Monday, January 08, 2007 - 4:14 pm: |
| 
|
जयमहाराष्ट्र, अमेरिकी वस्तूंवरच नव्हे तर अमेरिकी कंपन्यांवर बहिष्कार घालावा, त्यांची कंत्राटे रद्द करावी, भारतीयांनी अमेरिकेत येण्याचे बंद करावे, अमेरिकेत काऽहीहि निर्यात करू नये, अगदी ग्रोसरीसुद्धा! म्हणजेच अमेरिकेला कळेल की भारतीयांचे काय मत आहे, सद्दामच्या फाशीबद्दल. अमेरिकेला त्यांच्या खिशावर मार दिला तरच ते शहाणे होतील. वास्तविक अमेरिकेला ९ ट्रिलियनचे कर्ज आहे, त्यामानाने भारत हा अत्यंत श्रीमंत देश असून त्यांना बाहेरच्यांचे ज्ञान, व्यापार यांची काऽही गरज नाही. जगाला गरज असेल, तर त्यांनी भारतीयांचे ऐकावे नाहीतर गेले उडत! थेट १९९० च्या पूर्वीची स्थिति आणावी! त्यावेळी भारत कित्ती चांगला होता!
|
लोपे,इथे येऊन पांचटपणा करण्यापेक्षा तुझी ती विषामृत नावाची उत्तम कथा पूर्ण कर बघू आधी....
|
Zakki
| |
| Tuesday, January 09, 2007 - 12:15 pm: |
| 
|
पण ताची एतकी अवहेलना कराय्ची गरज न्हवती. बुश मुळे ३००० अमेरिकन सैनिक मेले,त्याचे काय? अमेरिकनांच्या मते, सद्दाम ला मारून टाकणे, इराकवर हल्ला करणे, इ. गोष्टी त्यांच्या देशाच्या सुरक्षिततेसाठी नि त्यांच्या मते सगळ्या जगातून अतिरेक्यांना दडपण्यासाठी ते आवश्यक होते. अमेरिकन सैनिक मरायला तयार झाले, देशाने भरपूर कर्ज मंजूर केले. हे सगळे निर्णय इथे लोकशाही पद्धतीने Congress , senate मधे घेण्यात आले.बहुमत असल्याखेरीज असले प्रकार इथे होत नाहीत. (सु) दुर्दैवाने घेतलेला निर्णय अंमलात आणण्याची त्यांच्यात ताकद होती. त्यामुळे कुणि कितीहि ओरडले तरी त्यांना फरक पडत नाही! तेंव्हा ओरडणार्यांनी हे ध्यानात घ्यावे. ज्या देशांना हे आवडले नाही त्यांनी अमेरिकेशी व्यापार करण्यावर बहिष्कार घातला तरच काही होण्याची शक्यता आहे, पण जगात उलटाच प्रकार चालतो. आता इराकमधील सर्व Oil industry येती तीस वर्षे अमेरिकन कंपन्या चालवतील असा निर्णय नव्या इराक सरकारने घेतला आहे, तेंव्हा निदान अमेरिकेची तेलाची परिस्थिति तरी सुधारली! कुणि काही का म्हणेना, अमेरिकेविरुद्ध काही करण्याची हिंमत नाही. मग उगीच जग काय म्हणेल म्हणून स्वत:च्या देशासाठी काही करू नये की काय? भारताने काश्मिर प्रश्न युनोकडे नेला, काय झाले त्याचे?
|
Zakki
| |
| Tuesday, January 09, 2007 - 12:26 pm: |
| 
|
माझे मत असे आहे की वैयक्तिक रीत्या भारतीयांची संस्कृति, मते ही उच्च आहेत. सहसा भांडाभांडी, हिंसाचार करण्याची त्यांची प्रवृत्ति नाही. पण 'राष्ट्र, देश' यांचा कारभार आजकालच्या जगात तरी, त्या पातळीवर राहून करणे कठिण आहे. राष्ट्रहित, देशहित यासाठी वैयक्तिक कल्पना बाजूला सारून अप्रिय गोष्टी कराव्या लागतात. या दृष्टीने श्री. छत्रपति शिवाजीमहाराज यांचे चरित्र पहावे.
|
Chyayla
| |
| Tuesday, January 09, 2007 - 8:06 pm: |
| 
|
झक्की बोवा तुमचे विचार एकदम मान्य, असाच देशहिताच विचार करणारे राज्यकर्ते आम्हाला पण परत मिळो.
|
Disha013
| |
| Tuesday, January 09, 2007 - 8:35 pm: |
| 
|
झक्किकाका खरे आहे. अमेरिकेत अध्यक्षापेक्षा military जास्त power ठेवुन आहे. एक scientist president होवुनही स्थिती जैसे थे. आला तसा परत जाईल्ही. त्या बुशबाबाने काहीतरी केले म्हणायचे.
|
Disha013
| |
| Tuesday, January 09, 2007 - 8:42 pm: |
| 
|
आता मला वाटायला लागलेय,आपल्याला हिटलर सारख्या नेत्याची गरज आहे. (म्हण्जे किडामुंगीगत माणसे मारणारा न्हवे.,तर तसे प्रभावि आणि आक्रमक नेतृत्व हवे. )
|
Zakki
| |
| Tuesday, January 09, 2007 - 10:10 pm: |
| 
|
अमेरिकेत अध्यक्षापेक्षा military जास्त power ठेवुन आहे. खरे तर सध्याचा इराकमधला गोंधळ हा मिलिटरी चे न ऐकता रम्स्फ़ेल्ड, छेनि इ. सिविलिअन लोकांनी केलेल्या आचरटपणाचा परिणाम आहे, असे आता बहुतेक लोकांनी (रम्स्फ़ेल्ड सकट) मान्य केले आहे.
|
फाशी देणे चूक वगैरे मला आजिबात पटले नाही. इराकमधे साधारण अशी प्रथा आहे की राज्यकर्ता पदच्युत होतो तेव्हा त्याचा अंत्यसंस्कार केला जातो. अशी उज्ज्वल परंपरा बघता त्याला फाशी दिले हे बरेच सभ्यपणाचे म्हटले पाहिजे. नाहीतर एखाद्या वाहनाला बंधून तो मरेपर्यंत बगदादच्या रस्त्यांवर फिरवणे, जाहीर छीथू व फाशी, दगडाने ठेचून मारणे वगैरे प्रेमळ प्रकार ह्या लोकांना नवीन नाहीत. अमेरिकेच्या दबावामुळे रीतसर फाशी झाली हेच खरे. भारतातील विचारवंत वाट्टेल ते तारे तोडत आहेत. कुणाला सद्दाम उदारधोरणी, प्रेमळ, निर्भय नेता वाटतो तर कुणी त्याच्या कुर्द लोकांवरील अत्याचारांची तुलना भारत काश्मिरमधे जे करतो (आणि म्हणून सद्दमचे कुठे चुकले अशी पुस्ती जोडतो) त्याच्याशी करतो. एका कुठल्यातरी क्रूर, खुनशी, स्वार्थी नेत्याविषयीचा उमाळा अनाकलनीय आहे.
|
जय महाराष्ट्र! बरेच दिवसांनी आले आहे मायबोलिवर. झक्कि अगदि लाखातले बोललात. अमेरिकेवर पुर्ण बहिष्कार टाकला तरच त्याना काहि गोष्टिंचि कल्पना येइल.
|
शेंडे! फ़ाशीचि शिक्षा योग्य कि अयोग्य? हा विषय नसुन सद्दाम याना ज्या प्रकारे फ़ाशि दिले गेले त्याबद्दल हा विषय सुरु केला होता मी सद्दामने जे काहि केलेय ते त्याच्या देशात आणि त्याचा देश एकसंघ ठेवण्यासाठि केले.पण त्यासाठि त्याला फ़ाशि देण्याचा अधिकार अमेरिकेला कुणि दिला?हा मुख्य प्रश्न आहे. स्वतःच्या देशावर प्रेम करणे हा त्याचा गुन्हा होता का?ईराक मधे ज्या काहि सुधारणा त्याने केल्या हा त्याचा दोष होता का?ईस्लामचि अनेक तत्वे अमान्यकरुन त्याने पुरोगामी असल्याचा पुरावा दिला हा त्याचा अपराध असु शकतो का?नाण्याला दुसरि बाजु असते हे जाणून न घेता स्वतःचे निर्णय लादणे हे कितपत योग्य आहे? जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Zakki
| |
| Friday, February 02, 2007 - 3:25 pm: |
| 
|
सर्व मुसलमान राष्ट्रात इराक जास्तीत जास्त secular नि पुरोगामी राष्ट्र होते, असा पूर्वी समज होता. त्याचे श्रेय सद्दामलाच जाणे अपरिहार्य आहे, कारण तोच राज्य करत होता. ज्या देशात प्रत्यक्ष महात्मा ग़ांधी, ईंदिरा गांधी, नि राजीव गांधी यांची निर्घृणपणे हत्या झाली, तिथल्या लोकांनी तरी समजून घ्यावे की लोक भडकले की नेत्यावर अशी वेळ येतेच. मग त्याला कारण अमेरिकेचा किंवा कुठल्याहि परकी सत्तेचा पाठिंबा असो वा नसो. म्हणूनच 'दैव जाणिले कुणी', पराधीन आहे जगती' ही गाणी ऐका. असे म्हणतात की, हिंदू धर्माप्रमाणे, प्रत्येकाला आपल्या या किंवा मागल्या जन्मातील कर्माचे फळ भोगावेच लागते. त्याच्यावर विश्वास बसायला हरकत नसावी.
|
Laalbhai
| |
| Friday, February 02, 2007 - 3:31 pm: |
| 
|
तिथल्या लोकांनी तरी समजून घ्यावे की लोक भडकले की नेत्यावर अशी वेळ येतेच. >>> व्यक्तीगत झक्कींना विरोध करायचा म्हणून नाही. पण तिन्ही नेत्यांची हत्या "लोक भडकल्यामुळे" झालेली नाही. समाजातला एक छोटा हिस्सा माथेफिरू झाला आणि त्या माथेफिरू हिस्श्याने हे कृत्य केले. हे काही मूर्खांचे "भडकणे" संपूर्ण समाजावर लादण्याचा अट्टाहास नको. बाकी सद्द्दाम वगैरे चालू द्या.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|