|
Zakki
| |
| Friday, February 02, 2007 - 12:51 am: |
| 
|
ही चर्चा मीडीया वर कशी घसरली ते माहित नाही. पण मिडीया मधे जे चालते त्याचा कदाचित् या दहशतवादाशी दूरान्वये संबंध जोडण्याचा प्रयत्न असावा. यामुळे उदाहरणे देण्यात आली की फक्त हिंदू सोडून बाकी कुठल्याहि धर्मीयांविरुद्ध काही जरी झाले तरी त्याची सनसनाटी जाहीरात करून मिडीयावाले हिंदूंविरुद्ध भावना भडकवतात, असा, काहीसा मुद्दा असावा. म्हणून मिडियाने जरा खरे खोटे, न्याय, अन्याय, समतोल यांचा विचार करावा पण ते करत नाहीत असे बर्याच जणांचे मत दिसते. निष्पक्ष न्याय न्यायालयाने द्यायचा असतो, अशी अपेक्षा आहे. ज्यांनी मिडीया ला पैसे दिले त्यांना त्यांच्या पैशावर नफा झाला पाहिजे. न्याय्य काय ते बघणे त्यांचे काम नाही. फक्त काही कायदे असतील तर त्याचे उल्लंघन होऊ नये, शक्यतो, एव्हढेच त्यांना माहित. पण भारतात काय, कायदा, न्याय हा केंव्हाहि पैशाने विकत घेता येतो. तेंव्हा त्यांना तीहि फारशी भीति नाही. जोपर्यंत कदाचित् दुसर्या मीडीया वाल्यांनीच एखाद्या मीडीया विरुद्ध बोंबाबोंब करून त्यांची गिर्हाईके काढून घेतली तरच काही होईल. पण बहुधा त्या सगळ्यांच्याच मागे कुणि ठराविक मताचे लोकच पैसे उभे करत असतील! त्यांना कशाला गरज आहे आपल्याच हाताची बोटे कापायची? रहाता राहिली जनता. जोपर्यंत जनता त्यांना जाहीरातीसाठी, वाचण्या बघण्या साठी पैसे देते तो पर्यंत ते जास्तीत जास्त सनसनाटी, दिलखेचक गोष्टी लिहीत, दाखवीत रहाणार. अमेरिकेचे राजकारण, संस्कृति, धर्म सोडा, फक्त इथली जनता किती जागृत आहे ते पहा. भारतात कसलाहि खराब माल चिक्कार खपतो. इथे कमी दर्जाचा माल बनवणारी कं तोट्यात जाते. इतकेच काय चांगल्या दर्जाचा माल बनवण्यार्या कं जर प्रदूषण जास्त करत असतील तर त्यांच्याहि विरुद्ध लोक जोरात आरडा ओरडा करून त्यांना बदलायला लावते. स्वस्त दिले म्हणून वाट्टेल तसे fatty , प्रक्रुतिला अपायकारक असे खाद्यपदार्थ विकतच घेत नाहीत, की त्यांना लगेच trans fat कमी, low cholesterol, sugar free इ. गोष्टी कराव्या लागतात. अशी जागृत जनता भारतात कधी येईल?
|
Asami
| |
| Friday, February 02, 2007 - 4:03 am: |
| 
|
च्यायला बघ मी media biased आहे कि नाही ह्यावर काहीहि मत नोंदवले नाहिये. तो विषय वेगळा आहे. तू जे म्हणतोयस त्याला तुझे म्हणणे सोडून दुसरा आधार दे एव्हढीच रास्त मागणी आहे , जी तुला कदाचित पटत नसेल. तुला उत्तर देता येत नसेल किंवा तुझ्याकडे ते नसेल तर तसे सांगायला काहीच प्रत्यवाय नसावा. त्यासाठी अमक्याला दोषी धरावे etc मी म्हणत नाहिये. Because, again as I said in my previous post, I do not believe truth lies with one side, it lies in between. बाकी तू मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे माझ्या वरच्या para मधे , गेला बाजार माझ्या root cause वाल्या post मधे तुला मिळतील असे मला वाटते. मला तरी ईथे कुणी तु म्हणतो तसे फ़ोटो दील्याचे आठवत नाही. >> त्याला माझा नाइलाज आहे. मी 98 पासून मायबोलीवर आहे , नि मी ते पाहिले आहेत. तू नवीन असल्यामूळे नसतील. तसेच ह्या BB वर एक धावती नजर टाकलीस तर , तुला मी म्हणतो तशी , इथे post करणार्यांना उद्देशून केलेली डझनावारी लेबले आढळतील. इथे फक्त एका हाताच्या बोटांवर मोजता येतील एव्हढेच लोक का फ़िरकतात असे तुला वाटते ?
|
Mahesh
| |
| Friday, February 02, 2007 - 4:41 am: |
| 
|
प्रसार माध्यमे पक्षपाती आहेत यात काही संशयच नाही. अगदी १०१% अनुमोदन.
|
Mandard
| |
| Friday, February 02, 2007 - 5:51 am: |
| 
|
इथे फक्त एका हाताच्या बोटांवर मोजता येतील एव्हढेच लोक का फ़िरकतात असे तुला वाटते ? कारण येथे सन्तु वगैरै लोकांना विरोध केला की ते विषय भरकवटवतात नाहीतर वैयक्तिक टिका करतात. त्यामुळे ती व्यक्ति परत फ़िरकत नाही.
|
Santu
| |
| Friday, February 02, 2007 - 6:03 am: |
| 
|
मन्दार अहो कराडकर या ना इथे. तुमचे स्वागतचच आहे. माझी पोस्ट पाहा मी काय वैयक्तिक टिका केली. आता कधी थोडी गंमत केली. तर काय तेव्हढे चालायचेच
|
Chyayla
| |
| Friday, February 02, 2007 - 6:25 am: |
| 
|
तो विषय वेगळा आहे. तू जे म्हणतोयस त्याला तुझे म्हणणे सोडून दुसरा आधार दे एव्हढीच रास्त मागणी आहे , जी तुला कदाचित पटत नसेल. असामी अरे तु रागावलास का रे बाबा. मी तुला घटनेची दुसरी बाजु सान्गितली ती घटनाच प्रत्यक्ष आधार आहे आता मी त्याला अजुन काय आधार देउ? हा आधार कसा द्यायचा ते तुच मला एखाद उदाहरण देउन सान्ग. म्हणजे मला कळेल. तु जो Root Cause चा मुद्दा मान्डला त्यावरही मी उत्तर दीलित ना, त्याबद्दल तुझे काय मत आहे? किन्वा माझ काही चुकत असेल तर त्याविरुद्ध माहिती, उदाहरणे देउन सान्ग बाबा. म्हणजे पटेल. फ़क्त तेही खर असेल आणी हे ही खोट असेल... अशी जर तर ची सम्भावना करुन काय उपयोग? जसा ईकडे पुरावा देउन मुद्दा मान्डला आहे तसाच तुही मान्डावा ही अपेक्षा.
|
Mahesh
| |
| Friday, February 02, 2007 - 8:04 am: |
| 
|
कमी फिरकतात म्हणजे कमी लिहितात... पण वाचक बरेच असावेत माझ्यासारखे.
|
Saavat
| |
| Friday, February 02, 2007 - 8:20 am: |
| 
|
>>>त्यातच हे ही सान्गितले आहे की कोणत्याही मार्गाने, रुपाने, नामाने, उपासना पद्धतिने शेवटी ते एकाच परमेश्वराला जाउन मिळतात हे बरोबर, पटल, धन्यवाद!
|
कारण येथे सन्तु वगैरै लोकांना विरोध केला की ते विषय भरकवटवतात नाहीतर वैयक्तिक टिका करतात. त्यामुळे ती व्यक्ति परत फ़िरकत नाही.>>>> खरय MADARAD इथे खुप जण आधी चर्चेत भाग घ्याय्चेत, छान वादविवाद रंगायचेत. आता एका सडक्या आ.ब्याने सगळी पेटी नासते तस झालय. आम्हालही खुप कळ्कळ वाटते कश्मिरी पंडितांबद्दल, मी काही भयानक अनुभव खुद्द त्या लोकांच्या तोंडुन ऐकलेय, इथे मी माझ्या british मैत्रिणिंशी पण " तुम्ही लोक पाकिस्तान्च्या बाजुन जास्त आहात म्हणुन वादविवाद करते " चांगल्या पधतीने इथे त्याब्द्दल काही मांडले जाणारे विचार नक्किच वाचायला आवडतात.उदा: असामीचे post . पण दुर्दैवाने इथे ती बाजु मांडणारी व्यक्ती त्या लायकीची नाही.... हे शेवटी राजकारणासारखेच झाले राजकिय क्षेत्रात गुंड प्रव्रुत्ती वाढतेय म्हणत चांगले लोक त्यापासुन लांब राहणेच पसांत करतात.तस झाल..
|
Saavat
| |
| Friday, February 02, 2007 - 8:44 am: |
| 
|
>>>सावट याचा अर्थ जरा समजला नाहि. काय ते सविस्तर सांगाल का. संतु, छत्रपती शिवाजीमहाराज ह्या 'जाणत्या राजाच' उदाहरण घेऊ. 'हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा', हे राजांच mission statement , त्यांची पक्की 'अध्यात्मिक बैठक' represent करत, जे 'वेदाच मूळ' आहे! राजांनी पण ' तलवार ' उचलली, पण उद्देश 'वरचा' होता. राजांचा 'भगवा ध्वज,' हा 'त्यागाची निशाणी' होती. पण इतिहासात-सध्या हा मूळ उद्देश लक्षात घेऊन, समाजाकरता लढलेले-लढणारे, फ़ार कमी आहेत, ही माझी खंत आहे! आपापली 'तुंबडी' भरण्याकरता, आसपासची झटापट पाहिली की, मन 'विषण्ण' होत.
|
लोपा, तुझं म्हणणं पुरेपूर पटलं, या नासक्या आंब्यानी जेव्हा माझ्या धर्मावरच प्रश्न उठवायला सुरूवात केली तेव्हापासून इथे लिहिणं बंद केलय.. हे लोक वाद घालत नाहीत तर आडदांडपणे स्वत्:चा मुद्दा मांडत बसतात.. जाऊ दे.
|
>>>> 'हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा', हे राजांच mission statement , त्यांची पक्की 'अध्यात्मिक बैठक' represent करत, जे 'वेदाच मूळ' आहे! राजांनी पण ' तलवार ' उचलली, पण उद्देश 'वरचा' होता. राजांचा 'भगवा ध्वज,' हा 'त्यागाची निशाणी' होती. सावट, मुद्दा बरोबर हे, निष्कर्ष चूक हे! शिवाजी राजे एकटे लढत नव्हते, तर त्यान्चा उद्देश समजुन तळहातावर शीर घेवुन लढणारे त्यान्च्या आधी व नन्तरही होते, आहेत, होत रहातिल! तरीही, तू मुद्दा नेमका मान्डलेला हेस! गुड! अरे काय काय सडके आम्बा, पेटी नासते वगैरे वगैरे लावलय? अहो आत्ताशीक कुठ मोहोर येवु लागलाय, औन्दा उशीरापर्यनच्या पावसाने थण्डी उशिरा त्यामुळे मोहोरही उशिरा......! मग आम्बे तरि कुठुन इतक्यात? आधी कैर्या येवुद्यात, त्यान्च लोणच चाखूद्या, मग अर्काईव्हजची आम्ब्यान्ची आढी घालुद्यात, मग बघु आढीत काय काय निघत, आत्ताच काय घाई करता?? DDD
|
Laalbhai
| |
| Friday, February 02, 2007 - 11:59 am: |
| 
|
अरे अरे.. एक दिवस जमले नाही तर किती पुढे गेलात? असो, सध्या निवडणूकांच्या धांदली.. त्यामुळे घाईत. चला एक बरे झाले.. शिवसेना, भाजपाला किमान मुंबईची महानगरपालिका तरी मिळतेय. म्हणजे, केंद्र गेले, राज्ये गेली (३ उरली!), अनेक नगरपालिका गेल्या. त्यामुळे पिसाळले होते बिचारे. त्यामुळेच "महानगरपालिकेची निवडणूक" प्रतिष्ठेची केली गेली. असो, प्रत्येकाला त्याच्या लायकीप्रमाणेच मिळते. नागपुर आणि मुंबई ह्या महानगरपालिका (आणि ३ राज्ये) इतकीच ह्यांची सत्ता उरणार असे दिसते आहे. (पुढे तीही जाणारच!) आलोच ह्यांना संपवून, तोवर चालू द्या! कमी फिरकतात म्हणजे कमी लिहितात... पण वाचक बरेच असावेत माझ्यासारखे. >>> म्हणूनच वेळात वेळ काढून मी लिहितो. chaMdyaa, माझी सगळी posts नीट वाचलीत तर मी कुणाकुणावर "वैयक्तिक" हल्ले करतो, हे तुम्हाला दिसेलच. च्यायला, केदार जोशी अशा माझ्या विरोधकांवर मी कधीही "वैयक्तिक हल्ले" केलेले नाहीत! (चेष्टा जरूर केली कधी कधी!) असो.. तुम्ही म्हणता तसे लिहिणे चालू आहे. अजुन एका मायबोलीवरच्या मित्रानी तसे लेखन मागितले आहे. लवकरच माझ्याकडून तसे लिखाण होईल ही अपेक्षा. (माफ करा, इतरांची उणीदुणी काढणारे लिखाण करण्यासाठी मी इतका वेळ घेणार नाही. माझी मते मांडण्याचा प्रयत्न करीन.) 
|
>>>>>> अरे अरे.. एक दिवस जमले नाही तर किती पुढे गेलात? कित्ती पुढे कुठ? कालच्या पुढ आज २ फेब्रुवारि २००७, येवढेच पुढ आलोत......! आता तुमीच वीसाव्व्या शतकाच्या पहिल्या दुसर्या दशकात अजुनही चाचपडत वावरताय त्याला बाकी कोण तरी काय करणार???? ओढुन ओढुन तुम्हाला एकविसाव्व्या शतकात ओढणार तरि किती आणि कोण???? DDD
|
Santu
| |
| Friday, February 02, 2007 - 12:34 pm: |
| 
|
शिवाजी राजे एकटे लढत नव्हते))))))लिम्बु तुमचे बरोबर आहे सावट शिवाजिच्या काळि च. राणा प्रताप,असु दे किंवा किंवा राणी पदमिनि असु दे अश्या सारख्या बरयाच लोकांनी आपले आयुष्य या साठि घातले आहे.शिवाजि च्या आधी सुध्दा ग्रीकांना पराभुत करणारा चन्द्रगुप्त तसेच बुध्दाचे घातक शांततावादि षंढ तत्वन्द्यान चा मोड करून सनातन धर्माचा पुन्रस्थापना करणारा पुश्यमित्रा असो या सर्वानी आपपाल्या परिने देशाचे रक्षण केले. १०३३ मधे सुध्दा मसुद(इरान चा राजा) ह एक लाख सैन्या सह.भारतावर चालुन आला. तेव्हा बहराइच (सध्या युपी)इथे भुतो न भविष्यति अशी लढाई झालि.तेव्हा सर्व उत्तरे तील राजाचा alliance होता यांनी यातील एक ही सैनिक परत जावु दिला नाहि. असे ते सर्व अज्ञात हिन्दु राजे. परत देवगिरी चा राजा हरपालदेव(याचे कातडे सोलुन ठार मारले) हा सुध्दा या मालिकेतील हिन्दु धर्मविर म्हटला पाहिजे. लिबु राव बर्याच दिवसानी हजेरी लावली ईकडे. आणखी काय विशेष
|
Santu
| |
| Friday, February 02, 2007 - 12:39 pm: |
| 
|
शिवसेनेला मुम्बई तरी मिळतेय)))))लालभाई तुम्ही भोपळा तरी फ़ोडलाय की नाही. का नेहमी प्रमाणे.
|
Laalbhai
| |
| Friday, February 02, 2007 - 12:48 pm: |
| 
|
लालभाई तुम्ही भोपळा तरी फ़ोडलाय की नाही. >> आम्ही उतरलोच नव्हतो. आणि आम्ही "वोह ही देश पे राज करेगा" वगैरे पुचाट घोषणांच्या भानगडीत पडत नाही. liMbooTiMboo, आलात का इकडे? मुद्द्याचे बोला आता. (ते कसे जमायचे म्हणा?) 
|
Saavat
| |
| Friday, February 02, 2007 - 12:58 pm: |
| 
|
संतु, 'उदाहरण' ह्या शब्दाकडे लक्ष द्यावे. LT , धन्यवाद! तूला पाहीजे असलेला 'निष्कर्ष' शेवटच्या दोन वाक्यात आहे,तू जीथ 'निष्कर्ष' हुडकतोहेस,तो 'मुद्दा' हे!! 'शिवाजी' हे वरिल उद्देश घेऊन लढणार्या सगळ्यांचच 'प्रतिनिधिक' रुप आहे. बाकी, काय दोस्ता कसा आहेस? >>>मग बघु आढीत काय काय निघत, हे बघणार कोण?
|
Santu
| |
| Friday, February 02, 2007 - 12:59 pm: |
| 
|
आम्हि उतरलोच नाही))))) तोंडी लावायला एखादा नगरसेवक तरी. पुचाट घोषणा करत नाहि)))))ध्येय तरी उत्तुंग ठेवावे.
|
Laalbhai
| |
| Friday, February 02, 2007 - 1:03 pm: |
| 
|
ध्येय तरी उत्तुंग ठेवावे. >>> बरोबर आहे. पाच फूट १ इंच उंची आणि अवघे ४५ किलो वजन असणार्याने "हिमालयाची उशी करून कुशीत घेईन" अशी कविता लिहिली तर काय चुकले? ध्येय तरी उत्तुंग असावे. (पुलं. धन्यवाद!)
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|