Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 27, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » General » Archive through January 27, 2007 « Previous Next »

Chyayla
Wednesday, January 24, 2007 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच फ़ारच भयन्कर आहे हे सगळ, पण वास्तव आहे.

माझ्या मित्राने सान्गितलेला हा प्रत्यक्ष अनुभव ते जेन्व्हा एक वनवासी कुटुम्बाला भेटायला गेले असता बाहेर केवळ आई-बापच होते आणी मुलगी कुठे आहे विचारले तर ही बाई आत गेली व थोड्यावेळाने मुलगी बाहेर आली कारण काय तर अन्गावर नेसायला एकच कापड होते.

भारतातली ही परिस्थिती खरोखरच आहे, एकिकडे श्रीमन्त अधीक श्रीमन्त होत आहेत तर दुसरीकडे गरीबी अजुनच खालावत आहे. दोघानमधली दरी वाढतच जात आहे. त्यामुळे स्वातन्त्र्य मिळुनही ईतकी वर्षे झाली पण त्यान्ची परिस्थिती सुधरण्याची अजुनही काही चिन्हे नाही. आजकाल तर Inflation म्हणुन महागाईचे ही समर्थन केल्या जाते पण या गरीबाना हातावर पोट असणार्याना काय करायचे ते Inflation . "गरीबी हटाव" च्या नावाखाली त्यानी स्वता:चीच गरीबी हटवली पण खरा गरीब तर गरीबच राहीला.

त्यान्च्या गरीबीची जाणीव ईथे रहाणार्याना शक्य नाही. मागे एक मेल आली होती त्यात एका श्रीमन्त मुलीला "गरीबी" या विशयावर निबन्ध लिहायला सान्गितला तिने त्या निबन्धात गरीबीचे वर्णन या प्रकारे केले.
..... एक बहुत गरीब परीवार था, उनके घरमे सभी बहुतही गरीब थे, ४ नौकर थे वो भी गरीब थे उनको तो Uniform भी नही था. ३ कारोका Maintenance भी ४ महीनोसे नही किया था. AC का सर्विसिन्ग भी बहोत दीनोसे नही किया था. एक AC तो खराब हो गया था. बच्चोके लिये नया Video Game भी नही लाया था....


Kedarjoshi
Wednesday, January 24, 2007 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गरिब पर्यायाने खरे भारतीय>>
हे काय नवीन?

पेशवे
ती शाब्दीक गंमत, मी ईंडीयन नी भारत असा फरक दाखवायचा प्रयत्न करत होतो.


Asami
Wednesday, January 24, 2007 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गरिबी हा एक हिस्सा असेल पण मला नाही वाटत संपूर्ण जमात नक्कीच गरिब नाहिये. आणी हा प्रकार फ़क्त त्यात जमातीपर्यंत सिमित नक्कीच नाही. तीव्रता बदलते एव्हढेच फ़क्त.

Zakki
Wednesday, January 24, 2007 - 10:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फरक टक्केवारीचा आहे. भारतात खूपच जास्त लोक गरीब आहेत, अज्ञानि आहेत, अंधश्रद्ध आहेत, इतर देशात कमी. भारतातल्या लोकांना स्वत:चा उद्धार स्वत: करणे कठीण झाले आहे, म्हणून परिस्थिती आणखी वाईट होते आहे.

तर जास्तीत जास्त लोकांना पुरेसे अन्न धान्य, कपडे, रहायला जागा, शिक्षण, स्वच्छता इ. ची गरज आहे. ते होण्यासाठी फक्त देवाचे अनेऽक अनेऽक अवतार व्हावे लागतील, जे भारतात राहूनच ही कामे करतील! जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत नुसतीच चर्चा!


Laalbhai
Thursday, January 25, 2007 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण भारताची काही प्रगति होताना दिसेना.

>>>

झक्की, हे अर्धसत्य आहे!
भारताच्या प्रगतीसाठी कुणीच झटताना दिसेना, हे (संपूर्ण) सत्य होईल.

बंदिस्त अर्थव्यवस्थेतच टाटा, बिर्ला, रिलायन्स, किर्लोस्कर, गोदरेज ह्यासारखे अनेकानेक उद्योगसमुह उभे राहिले आणि मोठे झाले. लायसन्सराजचा अडथळा होता हे खरेच आहे! पण कुणीच "हुशार" "बुद्धीवादी" आणि "राष्ट्राविषयी तळमळ असणारे" परिस्थिती बदलण्याची तयारी दाखवत नव्हते. कारण त्यासाठी घ्याव्या लागणार्‍या कष्टांची फळे, ह्याच पिढीत मिळतील, ह्याची त्यांना खात्री नव्हती. त्यामुळे शक्य तेवढे स्वतःपुरते पहावे. कोणत्यातरी मोठ्या कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी शोधावी. किंवा average पेक्षा काकणभर अधिक बुद्धीमत्ता असेल तर परदेशात पळून जावे. हीच "पूर्वीच्या" पिढीची आकांक्शा, इच्छा, महत्वाकांक्शा होती.

अशात मग स्वार्थी राजकारण्यांनी स्वतःचा फायदा करुन घेतला नाही तर त्यात नवल काय?

आता हाच विचार करुन डोके तापते (खंत नाही, फार सौम्य शब्द आहे!) की अक्कल आणि हुशारी असुनही मागची पिढी जबाबदारीपासून पळाली, आणि आता हीच पिढी देशाच्या प्रगतीसाठी "तळमळते" आहे!

असो. ह्यात वैयक्तिक काही नाही. विरोधाभास दाखवुन देण्याचा (आणखी एक केविलवाणा) प्रयत्न आहे.

अजुन पन्नास वर्षांनी, तेव्हा वयोवृद्ध असलेली दुसरी पिढी, भारताची प्रगती होत नाही म्हणून "अशाच प्रकारे" तळमळताना आढळली तर नवल नसेल. :-)


Admin/Moderators,

ह्या लिखाणात काही आक्षेपार्ह सापडणार नाही, असे वाटते. सापडलेच तर कृपया उडवावे. तसदीबद्दल क्षमा असावी.

Laalbhai
Thursday, January 25, 2007 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक, की बंदिस्त अर्थव्यवस्थेतच "मारुती उद्योग" सारखे अतिशय मोठे आणि चांगले वाहनविषयक उद्योग भरभराटीस आले. जे अर्थव्यवस्था global झाल्यानंतरच्या जीवघेण्या स्पर्धेतही अतिशय ठामपणे टिकून आहेत.

तात्पर्य काय की, इच्छा असेल तर चांगले काम करता येतेच! नाही तर कोणतीही आणि कसलीही परिस्थिती खडे फोडत बसण्यासाठी पुरक असते.

अर्थव्यवस्था globalization च्या दिशेने वाटचाल करायला लागली तेंव्हा हे "स्वदेशी" उद्योग धोक्यात येतील, अशी बोंब ठोकणारे कोण होते ह्याची कल्पना सगळ्यांनाच आहे. कम्युनिस्टांचे एकवेळ समजता येईल की त्यांची तत्वच globalization ला पुरक नाहीत. पण इतरांनी बोंब मारण्यामागे काय कारण होते, हा फार काही संशोधनाचा विषय नाही!

मुख्य म्हणजे फार कमी उद्योगांनी अर्थव्यवस्थेतील बदलाला विरोध केला होता! विषयाच्या नुषंगाने आठवले, इतकेच.


Laalbhai
Thursday, January 25, 2007 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो च्यायला, तुम्ही लिहिलेले अत्यंत खरे आहे. पण तरीही India shining म्हणून बोंब मारणारे निपजतातच. ही कोणत्या बीजाची फळे, कोण जाणे?

Marhatmoli
Thursday, January 25, 2007 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही एक चांगली बातमी. तशि हि बातमी जुनि आहे पण मला ईतक्यातच कळलि.

http://www.goodnewsindia.com/index.php/Magazine/story/alkaZ/

Peshawa
Thursday, January 25, 2007 - 8:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

की अक्कल आणि हुशारी असुनही मागची पिढी जबाबदारीपासून पळाली >>

छे छे अहो त्या पिढिवर देखील बुरसटलेल्या समाजवाद आणि साम्यवादाचे सावट होते... म्हणुन तर लालफित कारभार खपवून घेतला गेला. ज्यांना हा वाद अमान्य होता त्यांना १९९० पुर्वीच्या भारतात भविश्यच नव्हते साम्यवाद हा त्या बाब्तीत ईस्लमिc देशा सारखा आहे.

जबाबदारी कशी निभवावी इथे गेल्या पिढीची गोची झाली... आणि ह्या आजच्या पिढीत देखील असे कालबाह्य वाद कवटाळुन त्याला "सुधारणा" म्हणाणारे विचारजंत आहेतच की ज्यांअना रशीया आणि चीन आदर्श वाटतात... चुकले इथे की अशा नत्द्रष्टांना वेळिच आवरले नाही. एखादा मेकार्थर भरतात योग्य वेळेस झाला नाही ह्याचे फ़ार दुक्ख आहे मला...

NAM सारखी संघटना साम्यवादी रशीयाचे खेळणे होते. फ़क्त उघड पणे साम्यवादी हा शिका मिरवायचा नव्हता इतकेच! त्यातून इंदिरा बाईन्ना आणिबाणिचा झटका बसल्यानंतर सगळी उच्चशिक्षण यंत्रणा ह्या कमुनिस्टांन्नी ताब्यात घेतली त्याची फ़ळे भोगतो आहोतच. इतके वाट्टोळे करूनही ही निर्ल्लज्ज जमात पांडित्य पाजळणास सैदैव पुढेच आहे. हे ह्या देशात चे दुर्दैव आहे...

अजून भारत गरीब आहे ह्याचे करण india shining नाही. फ़क्त पाच वर्शात ह्या भल्या मोठ्या देशाचा १०% भाग जरी shine झाला तरी ती achievement च आहे. साम्यवादी तत्वद्यान सोडुन खुले धोरन ५० वर्शपुर्वी अवलंबले असते तर तर आज पुर्ण भरत झगमगत असता पण देशाचे खरे दुर्दैव हे की गरिबिचा बौधीक व्यवसाय करून स्वत्:च्या vote bank जोपासाणारी साम्यवादी आणी समाजवादी तत्वद्याने अजुनही ह्या देशात जिवंत आहेत.

देशाचे भले करायचे असेल तर आधी ह्या किडिचा विनाश आवश्यक आहे.


Laalbhai
Friday, January 26, 2007 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा, बाजीरावांची वाचा परत आली. ~D

फ़क्त पाच वर्शात ह्या भल्या मोठ्या देशाचा १०% भाग जरी shine झाला तरी ती achievement च आहे.

>>

अगदी खरेय. ह्या बदलांची सुरवात श्री मनमोहन सिंग यांनी केली. जे पूर्वाश्रमीचे कम्युनिस्ट आहेत. अजुनही त्यांचे अनेक आर्थिक विषयातले दृष्टीकोन कम्युनिझमच्या तत्वांना पूरकच आहेत!

----------------------------------------
NAM सारखी संघटना साम्यवादी रशीयाचे खेळणे होते.

>>>

चालू द्या, अशा बिनबुडाच्या आरोपांचे काय उत्तर देणार?

(पण खेळणे होण्याचीच वेळ आली - ती आमच्या भारतावर कधीही आली नव्हती - तर रशियाच्या हातचे खेळणे होणे देशाच्या भल्याच्या दृष्टीने जास्त सोयीस्कर आहे. असे बघा ना, आता आण्विक उर्जा भारताला द्यावी यासाठी अमेरिकेने काय प्रपोगंडा, नाटके केली. त्याचवेळेस इस्त्राईलला मात्र सगळे तंत्रज्ञान कोणताही गाजावाजा न करता सुमडीत देऊन टाकले. रशियाने मात्र असा कोणताही गोंधळ, देखावा न करता आणखी ४ reactors बनवण्याची घोषणाही करुन टाकली. यापूर्वीच - म्हणजे अमेरिकेच्या ह्या सगल्या नाटकांच्या आधीच कित्येक वर्षे २ nuclear plants तामिळनाडूत कार्यरत आहेत. ते रशियाच्या मदतीने. अवकाश तंत्रद्नानातली मोठी प्रगती रशियाच्या मदतीनेच झाली आहे. क्रायोजेनिक इंजिनाचे तंत्रज्ञान, १९९८ च्या आण्विक स्फोटानंतर, भारताला देऊ नये, ह्या अमेरिकेच्या धमकीला भीक न घालता रशियाने आपल्याला मदत केली. १९७१ च्या युद्धात अमेरिका जेंव्हा पाकिस्तानच्या बाजुने उभी रहात होती, तेंव्हा रशियाने अमेरिकेला स्पष्टपणे सांगितले होते, की आम्ही भारताच्या बाजुने उभे राहू. महायुद्धाचा धोका टाळण्यासाठी अमेरिकेने माघार घेतली.

गेल्या ७० वर्शातला इतिहास सांगतो, की जगात आपला सगळ्यात चांगला एकमेव मित्र आहे, तो म्हणजे रशिया! ज्यांचे डोके ठिकाणावर आहे, असे कम्युनिझमचे विरोधकही ही गोष्ट मान्य करतील. अमेरिकेची सध्या जे काही तथाकथिक मेहरबानी आपल्यावर आहे, त्याचा एकमेव उद्देश म्हणजे "बाजरपेठ" आणि स्वस्तात उपलब्ध होणारे IT कामगार. एकदा हा उद्धेश संपला की हीच अमेरिका इराकसारखे काही ना काही कुरापती काढून आपल्याला बेचिराख करणार नाही, याची कोणतीही श्वाश्वती नाही - इराक, इराण युद्धात अमेरिका इराकच्या, म्हणजे सद्दम हुसेनच्या बाजुने होता!

ह्या सगळ्याची जाणीव आपल्या सध्याच्या नेत्यांना आहे, म्हणूनच पंतप्रधान मनमोहनसिंग सगळे राजनैतिक संकेत बाजुला सारून रशियाच्या अध्यक्षांच्या स्वागताला विमानतळावर गेले!)

तुमचे कम्युनिस्ट आणि पर्यायाने रशियावर टिका करणे चालू द्या. सुदैवाने, आपले राज्यकर्ते हुशार आहेत.


-------------------------------------------------
साम्यवादी तत्वद्यान सोडुन खुले धोरन ५० वर्शपुर्वी अवलंबले असते तर तर आज पुर्ण भरत झगमगत असता

>>>

हे वाक्य पुन्हा एकदा सिद्ध करते की तुम्ही कोणताही अभ्यास न करता केवळ वादासाठी वाद घालत आहात!

वास्तविक, "खुले धोरण" म्हणजे काय हे विचारले तर तुम्हाला नक्की सांगता येईल का, याची मला शंका वाटते.

पण उदाहरणच द्यायचे तर मलेशिया, इंडोनेशिया इत्यादी देशांची संपूर्ण अर्थव्यवस्था परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून आहे. त्यामुळे काही वर्षापोर्वी मलेशिया मधे काय आर्थिक संकट आले होते, ह्याचा जरा अभ्यास करावा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. (माहिती नसल्यास सांगा, तुमचे प्रबोधन करण्यात मला नक्कीच आनंद आहे.)

ह्या उलट आपल्या देशात आहे. म्हणजे अर्थव्यवस्था समाधानकारक आहे, असे मी तुमच्याशी वाद घालायचा म्हणूनही म्हणणार नाही. पण आपण संपूर्णतः परदेशी गुंतवणूकीवर अवलंबून नाही, ह्याचे श्रेय १९९० पुर्वीच्या अर्थव्यवस्थेला आहे.

ते कसे, ह्याचे एकच उदाहरण देतो. मागची मे का जुन (२००६) मधे परदेशी वित्त संस्थांनी मोठ्या प्रमाणावर त्यांचा पैसा काढून घेतल्याने शेअर बाजार २ तासात हजारो अंकांनी कोसळला होता. त्यावेळेस अर्थमंत्र्यांनी हस्तक्षेप करून शेअर बाजाराचा कारभार थांबवला आणि सांभाव्य संकटावर मात म्हणून स्वदेशी वित्त संस्थांना मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवण्यास सांगितले. अर्थमंत्र्यांच्या विनंतीला प्रतिसाद देऊन त्यांनी त्यांच्या कडची liquid state मधली मोठी रक्कम बाजारात गुंतवून शेअर बाजार सावरला.

स्वदेशी संस्था आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत, म्हणून देश त्या संकटावर मात करू शकला.

बंदिस्त अर्थ व्यवस्थेचे काही तोटे निश्चितच झाले. (जसे की beurocracy मुजोर झाली, त्यामुळे भ्रष्टाचार वाढला.) पण त्याचमुळे स्वदेशी उद्योगांना आवश्यक ते संरक्षण लाभले आणि ते तगले. आज हेच उद्योग, international brands म्हणून प्रतिष्ठा मिरवीत आहेत! (बंदिस्त आणि मुक्त अर्थव्यवस्था यांची सांगड घालण्यात कदाचित आम्ही कमी पडलो असू. अजुनही भारतातली सगळीच क्षेत्रे परदेशी गुंतवणुकीसाठी खुली नाहीत, याची जाणीव इथल्या हुशार लोकांना असेलच. हळू हळू क्षेत्रे खुली होत आहेत. पण सरकार सर्व गोष्टींचा योग्य विचार करते आहे, हे एक चांगली गोष्ट आहे.)


------------------------------------------------

छे छे अहो त्या पिढिवर देखील बुरसटलेल्या समाजवाद आणि साम्यवादाचे सावट होते... म्हणुन तर लालफित कारभार खपवून घेतला गेला.

>>>

बाजीराव, तुम्हाला "लालफितीचा कारभार" हा जो शब्दप्रयोग करतात, त्याचा अर्थ "साम्यवादी प्रवृत्तीचा किंवा लोकांचा कारभार" असा आहे, असे वाटते का?

तर ते तसे नाहीये बरं का! "लालफितीचा कारभार" म्हणजे प्रशासनात्मक दिरंगाईचा कारभार. म्हणजे एक लायसन्स मिळवण्यासाठी अनेक अर्ज भरावे लागणे, अनेक प्रकारच्या मंजुर्या मिळवायला लागणे एत्यादी.

म्हणजे एकदा एका केस ची फाईल तयार केली गेली (भारतीय प्रशासनात वापरतात ती फाईल जर तुम्ही पाहिली असेल, तर तिचे पुठ्ठे बंद केल्यावर ती व्यवस्थित बंद करायला लाल रंगाची पट्टी असते.) की ती कधी उघडेल आणि कधी पूर्ण होईल, काही सांगता येत नाहे, असा त्याचा अर्थ.

"लालफितीचा कारभार" हा शद्बप्रयोग आणि कम्युनिझम ह्यांचा काहीही संबंध नाही. असो.

--------------------------------------------------
त्यातून इंदिरा बाईन्ना आणिबाणिचा झटका बसल्यानंतर सगळी उच्चशिक्षण यंत्रणा ह्या कमुनिस्टांन्नी ताब्यात घेतली त्याची फ़ळे भोगतो आहोतच.

>>>

Well, काही म्हणता काही कळले नाही! आणीबाणी आणि कम्युनिस्टांनी शिक्षण संस्था ताब्यात घेणे ह्याचा काय संबंध? तसेही कम्य्नुस्टांच्या ताब्यात कोणत्या शिक्षणसंस्था आहेत, ह्याची माहिती दिलीत तर जरा बरे होई. म्हणजे असे की खळबळजनक विधाने जरून करावीत. (त्याशिवाय लोकांचे आपल्याकडे लक्ष कसे जाणार?) पण मग मी देतो तशी त्या विधानांच्या पुष्ट्यर्थ उदाहरणेही द्यावीत. तर हे विधान समजेल अशा भाषेत स्पष्ट करावे, हे विनंती. (म्हणजे शिकवणीचे पैसे लागतील, अशी भंपक विधाने करून टाळू नका. तुम्हाला स्पष्ट करता येत नाही, हे सिद्ध होईल.)

--------------------------------------------------
देशाचे भले करायचे असेल तर आधी ह्या किडिचा विनाश आवश्यक आहे.

>>>

well,देशाचे भले करण्याची तुमची हीच अट असेल तर तुमचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, हे वाईट बातमी तुम्हाला आत्ताच कळलेली बरी. म्हणजे तुम्हीही "देशाच्या भल्यासाठी" बाहेरून तळमळायला सुरवात करा, कसे?



Laalbhai
Friday, January 26, 2007 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा एक लेख मी बर्‍याच महिन्यांपूर्वी वाचला होता. हा बाजीरावांना प्रत्युत्तर देण्यासाठी नाही. पण हा एक दृष्टीकोन आहे.

The Lost World
By Jay Dubashi | Sep 26, 2006 | Email article to a friend


We Indians have a love-hate relationship with foreign companies, usually known as multinationals. We know that in this globalised world, we simply cannot avoid them and at the same time, we are not entirely happy about their presence in our midst.


So, from time to time, we crack the whip and ask them to behave. But they know they are here to stay and take it all in their stride. Fifteen years ago or so, before the economy was thrown open, things were different. Indian companies, whether in soft drinks or automobiles, were sitting pretty. They had a nice monopoly business going and since they never had to compete with foreign companies, they were clueless about their impact.


Ramesh Chauhan of Parle, who had built a profitable soft drink business from scratch, was initially rattled when news came that Coca-Cola had received a license to operate in India. Since I was all for Swadeshi, he believed that I might be of some use. So he came to see me.


I asked him if he knew Coca-Cola people. No, he said, he didn't. I told him that I knew some of them and had visited their offices in Atlanta. I told him that Coca-Cola's entry would be followed by Pepsi's-- or was it the other way round-- and Parle would have to take on two giant multinationals in a small market. Did he have the capacity to do that? A few weeks later, I heard that Parle had sold out to Coca-Cola for a hundred crore, which was a great deal of money then. That was the end of the nascent soft drink industry in India for it is either Coke or Pepsi now and there is no other choice for the consumer.


Things were a little different with the auto industry, but not all that different. When Maruti was taken over by Suzuki, I wrote in my column that companies like Premier Automobiles would soon be on their way out, just as Coke had replaced Parle. For Suzuki would be followed by other foreign auto companies and they would sweep the market.


Not so, wrote Vinod Doshi, who ran Premier Automobiles at the time. He actually took the first plane to Delhi from Bombay and came to see me. I have now forgotten what arguments he put forward, but within months he had signed up with Fiat of Itlay and had, in effect, sold out to them and virtually closed down his business, just as I had predicted.


I have not met Doshi for a long time, but, as far as I know, his Premier plant is no more. One more Indian business has fallen prey to yet another multinational.


It must be said both the soft drink business and the automobile businesses are flourishing. I am told that we are now producing or selling a million cars a year, about ten times more than what we did before liberalisation. The same must be the case with soft drinks.


I used to drive a Premier, now I drive a Maruti. But I neither drink Coke nor Pepsi because they don't suit me. Incidentally, I have never seen the inside of a McDonald's, either here or in the US, for reasons that have nothing to do with the fact that Mc Donald's is a foreign business. I just don't like hamburgers and I am allergic to French Fries.


Friends tell me that the Indian economy is booming and GDP growth is in the region of 7 to 8 per cent., if you go by RBI's calculations. Good luck to RBI and its bulging foreign exchange coffers. But I am not sure who the real winner is. The Indian consumer has certainly won. But, in my heart of heart, I cannot help feeling that India has lost. Jai Hind.




Laalbhai
Friday, January 26, 2007 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरील लेखातली उदाहरणे सिद्ध करतात की ज्यांच्यात आर्थिक ताकद नव्हती ते भारतीय उद्योग - उत्पादने उच्च दर्जाची असूनही - परदेशी उद्योगांनी विकत घेतले.

जर अर्थव्यवस्था स्वातंत्र्यानंतर लगेचच खुली केली असती तर आज टाटा, रिलायन्स, इन्फोसिस, गोदरेज अशा कंपन्या दिसल्याच नसत्या.

कशासाठी रडायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. As I have already said , कोणतीही आणि कसलीही परिस्थिती खडे फोडण्यासाठी पूरक असू शकते. प्रत्येकाच्या प्रवृत्तीचा हा प्रश्न आहे. असो.


Laalbhai
Friday, January 26, 2007 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता जरा वेगळा विषय!

as they say, all that glitters is not always gold! अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबद्दल आपण बर्‍याचदा वाह वाह करत असतो. असेलही! मला कल्पना नाही. तिकडे जाऊन आलेले माझे मित्र सांगतात की सर्वसामान्य आयुष्य बरेच सुसह्य आहे. उलट आपल्या देशात गरीबी वगैरे.

असेलही. अशी तुलना करण्याचे कोणतेही साधन माझ्याकडे नाही. कारण अमेरिकेविषयी ऐकीव आणि काही वाचीव माहितीव्यतिर्क्त माझ्याकडे काहीच नाही.

पण हा लेख फार वेगळा प्रकाश टाकणारा आहे. बर्‍याच्या terms अर्थतज्ञांच्या ओळखीच्या असतील. जरा किचकट वाटेल. पण एक वेगळाच दृष्टीकोन देणारा आहे.

जे अर्थ क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांनी त्यांची मते दिली तर बरे होईल. मलाही नवीन गोष्टी कळतील.


--------------------------------------------

Shape of Pyramid

One per cent of the world's population owns 40 per cent of its wealth. That on a base of 6.5 billion refers to 65 million people. The actual proportion of national wealth owned by the top one per cent varies and is measured by the Gini Coefficient, reported in the CIA Factbook.


Here is data on the US: The top one per cent owns roughly 38 per cent of all wealth, while the top five per cent owns roughly 60 per cent. The top 20 per cent owns 80 per cent of the wealth, down from 83 per cent in 1998. Average income disparity i.e. the skewness of income distribution has fallen continuously from 1929 (the year of the Great Depression) till 1970, but this (skewness) has doubled since then. The bottom 20 per cent has zero net worth i.e. no savings. Median wealth is at $62,000 (at the 50th percentile), which looks very good by Indian standards ($1100 by rough estimates) but their top one per cent have an average wealth of $ 12.5 million.


US GDP per capita is around $40,000-42,000 compared to India's $650. With nearly 70 times Indian income, their wealth ownership is sharply lower, only about 55 times. My numbers are approximate, because data taken is for varying years, but the ratio I want to calculate is important. Total US wealth is about $55- 60 trillion, but a third of that, roughly $11 trillion, is in foreign hands. More important, the flow of savings is completely dominated by foreigners, with US savings at one per cent (i.e. $125 billion on a total economy of $12.5 trillion). Foreigners bring in about $1.2 trillion, if you add up the current account deficit ($800 billion) and the fiscal deficit ($400-500 billion).


If you factor in indebtedness, you get a very different picture. The bottom 20 per cent has no net assets, i.e. net of debt. Half of them are bankrupt, facing legal proceedings for debt default. The rest are on social security. Blacks and single women (including single women with children) have the lowest levels of wealth i.e net income. Blacks have 60 per cent of average income, but only 18 per cent of average wealth. Single women with children have the highest bankruptcy ratios, now running at nearly 15 per cent.


Another significant trend thrown up is that of a non-household wealth. If you strip out house ownership, the top one per cent now owns over 50 per cent of all non-house wealth. They are predominantly concentrated in equity ownership, both listed and private. Ten per cent of the US population owns 85 per cent of the listed equities, 85 per cent of all financial securities and 90 per cent of business assets in the country. Compare this with the concentration of all kinds of wealth (38 per cent) and you know where you need to be if you want to get seriously rich. With per capita GDP of $42,000, US median wealth is at $62,000, i.e. a net worth of roughly 1.5 years' income. Much poorer India does far better. On a per capita GDP of roughly $650, we have net wealth of $1100 per capita, 1.7 years. But we know that from elsewhere our household savings rate is around 30 per cent.


Actually, this key ratio of net worth:income is much better. You need to factor in US indebtedness, low savings, foreign ownership of US assets and their very highly-valued stock markets (1.8 times GDP). If one factors in all these factors, the US ratio will drop and the Indian ratio will rise much more.


So let me make my points.

The US is one of the most unequal among the developed countries, except the UK. The Gini Coefficient (an index of income inequality) is at 45, against India's 32.5. It has been noticed that very high levels of inequality tends to slow down economic growth, because it distorts the allocation of resources away from basic public goods to luxuries.


When a nation is dominated by excessively rich people, tax collection as a proportion of wealth drops because the rich are better tax planners. Millionaires in the US have taxable incomes of just seven per cent of net worth, compared to more than nearly two to three those levels for the rest of the populace. Further, the quality of education (and public services) suffers because the rich are able to send their children to private schools, while the poor make do with public schooling, which is always starved of funds. We see this spectacularly in India.


Another important point is the role of innovative industries in exacerbating income inequality. Industries like IT and biotech tend to concentrate wealth in the hands of the educated elite. This kind of income inequality may be better than the feudal kind seen in, say, a Bihar, but it also distorts the allocation of resources to public goods, outlined above.


And the most important point is that markets accelerate income inequality, as the data shows above. Similar macro-economic data for India is not available, but we can all see anecdotal evidence around us. Those who have large proportions of their wealth in equities tend to do better over time. I have argued this at the micro-economic level in previous articles, where I pointed out that real estate returns are random and more uncertain over long periods of time. Equities outperform both in quantum and in predictability.


Equity returns measure entrepreneurship, the returns available to risk-seeking capital. High equity valuations are available to those countries that are relatively entrepreneurial and growth-oriented. The fruits of such growth get disproportionately distributed to the small risk-taking class. These are usually the educated elite, leading to results very similar to the innovation- drivers outlined above.


Qualitatively, this kind of wealth inequality is much better than the kind seen in, say, North Korea or Zimbabwe, which is feudal, power-driven and goes to the hegemonist. But still, thanks to a disproportionate control over the fruits of education, the educated elite in these democratic countries also tends to contribute their mite to the problem.It has been argued, very reasonably, that income inequality is the biggest spur to entrepreneurship and innovation. Without the potential for relative outperformance, nobody would have any incentive to do anything useful. This was the biggest reason for the death of communism. That is acceptable. But this is not an unmitigated virtue. Capitalism still bears the responsibility of ensuring that income inequality does not end up in wrong hands. We need to look at Nigeria/ Zimbabwe and the tinpot nations of Africa and the Middle East to see what excessive concentration of wealth can do.


Capitalism also needs to monitor who gets the wealth, and why? If the income inequality is happening Bihar style, with wealth being captured through political or muscle power, then you will have the vicious cycle of political power capturing wealth, then that economic power consolidating itself into further political power, creating and endless morass which perpetuates itself. The dons of Dhanbad started with crime, captured wealth, then political power, which created even further wealth.


So are the IT tycoons any better? They too perpetuate private monopolies, which just look better because they are white collar in nature. But the distortion in resource allocation is the same. The physical slavery of Dhanbad is not much better than the slavery foisted by dollar on the sweatshops of Asia…we make a container-load of garments, just to get back a CD with a computer programme. There are ethical and humanitarian dimensions to this problem, besides the usual economic and political arguments. The pursuit of innovation and entrepreneurship is of course a virtue but you need to question whether you are doing too much, if your Gini curve starts to look the same as Zimbabwe's.


I have argued for long that poverty in the US and London is far more debilitating than in Etah, UP, where everyone is poor. Poverty in the midst of riches creates far greater social problems than general, isolated poverty.


(Data Sources: The Hindustan Times, the CIA Factbook, Millionaire Next Door and Federal Reserve Board's Survey of Consumer Finance)

Sahilshah
Friday, January 26, 2007 - 1:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"जर अर्थव्यवस्था स्वातंत्र्यानंतर लगेचच खुली केली असती तर आज टाटा, रिलायन्स, इन्फोसिस, गोदरेज अशा कंपन्या दिसल्याच नसत्या. "

मी ह्या मताशी सहमत नाही. खुल्या अर्थव्यवस्थेत जो सक्षम आहे आणि जो परिस्तिथी नुसार बदल करतो तोच टिकुन रहतो.

प्रिमियर auto चेच उदाहरण घ्या. it was started by Walchand Hirachand in 1944 (in fact Tata, Birla , Godrej started before 1947) This company was doing well till 1980's but later they cann't keep the pace They have to stop the production of cars from 2000 since it was not able to produce Euro I vehicle. Reasons of the failures are mainly follows (by the way Walchand Hirachand belongs to Solapur which is my father’s native & I was staying in Kurla so I know the history)
1. They were not having strong R&D. Unlike Tata and M&MT, they were not ready with Euro standard which is government regulation for preventing pollution.
2 They were having very strong union led by Dr. Datta Samant. In 1985, they were having 10000 workers to produce 100 cards per day. (Tata needs half of the workforce for more than three times of production)
3 They misused the monopoly & did not upgraded their manufacturing line.
At the same time companies like Hindustan Construction, Ravalgaon which are Walachand group companies are doing excellent job.
Walchand Hirachand started many big companies during British Time competing with multinational companies. He started Hindustan Aeronautic. Shipping Corporation during British raj. These companies were nationalized during Indira Gandhi time. Even TOMCO was competing Uniliver. Cipla was cometing british pharma comapnies before 1947.

Now comapnies like TCS,HDFC, Infosys, Tata Steel, Wockhardt, Ranbaxy, Cipla, Hindlco, Mahindra & mahindra and many others are doing good. Some of the indian companies are going global.


जर आधी अर्थव्यवस्था खुली केली असती तर आजुन जास्त प्रगती झाली असती. मित्तल industires चे मुख्य कार्यालय युरोपात नसुन भारतात असते.
चिन ने १९७९ मध्ये अर्थव्यवस्था खुली केली म्हणुन चिन आपल्यापेक्षा सगळ्याच बाबतित पुढे आहे.


Laalbhai
Friday, January 26, 2007 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुल्या अर्थव्यवस्थेत जो सक्षम आहे आणि जो परिस्तिथी नुसार बदल करतो तोच टिकुन रहतो.

>>>

Exactly! याबाबत काहीच दुमत नाहीये की globalization काळाची गरज आहे. आणि भारतीय कंपन्यांना उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्याचा फायदाच होतो आहे. म्हणूनच ते global brands म्हणून पुढे येत आहेत. It is not sheer luck. You are perfect.

पण बर्‍याचशा भारतीय कंपन्यांना संरक्षणाचे कवच लाभले आणि त्यातूनच त्यांना फायदा झाला हे खरे नाही काय? याच संरक्षणाच्या आधारावर भारतीय कंपन्या तुम्ही म्हणता तशा R&D मधे पैसे गुंतवू शकल्या, त्यांचे brand बाजारात अधिक राहिल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक पाया मिळाला. त्याचा Tata सारख्या काही कंपन्यांनी फायदा घेतला तर प्रिमियर सारख्या कंपन्या - ज्यांनी स्वतःला dynamic ठेवले नाही - त्या झोपल्या.

दुसरे असे, की जर सुरवातीपासून अर्थव्यवस्था पूर्णतः खुली असती, तर आपली अवस्था मलेशियासारखी झाली नसती, याची काय खात्री आहे?

हे खरेय की त्या व्यवस्थेचे तोटे झाले आणि कदाचित काळाच्या बदलाला आपण जरा उशीराच प्रतिसाद दिला. पण सुरवातीपासून अर्थ व्यवस्था खुली असती तर अधिक फायदा झाला असता, हे मत, atleast I can not buy.


Chyayla
Friday, January 26, 2007 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आन्तराष्ट्रिय सम्बन्धात कोणी कायम शत्रु नसतो वा मित्र ही नसतो. राष्ट्रहीताला अनुसरुन सम्बन्ध बद्लत असतात. रशियाने भारताला मदत केली आणी करतही आहे त्याबद्दल दुमत नाही पण ईथे त्या कम्युनिस्मचा काही सम्बन्ध नाही आता तर कम्युनिस्म तिथेच सम्पले आहे पण भारतात त्या सर्पाचे शेपुट अजुन वळवळ्ते आहे.


"जर अर्थव्यवस्था स्वातंत्र्यानंतर लगेचच खुली केली असती तर आज टाटा, रिलायन्स, इन्फोसिस, गोदरेज अशा कंपन्या दिसल्याच नसत्या. "

हे विधान तेवढेच दीशाभुल करणारे आहे. इन्फ़ोस्य्स व ईतर कम्पन्या IT Boom मधे आताच पुढे आल्या आहेत. व आजही कित्येक कम्पन्या नवीनच आहेत व अल्पावधीतच भरभराट करत आहेत.
एवढेच नव्हे तर आज IT व्यतिर्क्त ईतरही अर्थव्यवस्थेत योगदान देत आहेत.

मलेशिया, ईन्डोनेशिया यान्ची अर्थ्व्यवस्था ही केवळ सेवा क्षेत्रान्वर आधारित होती ती ठीसुअलच होती त्यामुळे जशी प्रगती झाली तशी मन्दीपुढे टिकु शकली नाही. सेवा क्षेत्राव्यतिर्क्त उत्पादनावर आधारित अर्थ्व्यवस्था भलेही सुरुवातीला त्याना दीव्यातुन जावे लागते पण ती मजबुत असते. खरे म्हणजे दोन्ही क्षेत्रात सम्न्व्य असणे आवश्यक आहेत, पण एकाच क्षेत्रात अर्थव्यवस्था अधारित ठेवणे धोक्याचे आहे. त्यामुळे भारताची या देशान्शी तुलना करने व्यर्थ आहे.


Laalbhai
Saturday, January 27, 2007 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साहिल,

तुम्हाला माहितीच असेल की insurance sector मधे अजुनही परदेशी गुंतवणूकीला पूर्ण सवलत नाहीये. त्यामुळे झाले काय की LIC कडे लाखो करोड रुपये जमले आहेत. हाच निधी LIC आता अनेक mutual funds मार्फत शेअर बाजारात गुंतवून भारताच्या औद्योगिक विकासाला मदत करत आहे.

जर Insurance sector परदेशी कंपन्यांना सुरवातीलाच open केले असते, तर हा ह्यातला बहुतांश पैसा परदेशात गेला असता, नाही का? (काही दहा पंधरा टक्के कररुपी मिळाले असते, तेवढेच.)

तसेच banking sector चेही आहे.

government is going slow and safe. I think that is the right policy and will benifite in long run.

च्यायला,

म्हणूनच स्वावलंबनासासाठी Industrialization वर भर देऊन "स्वदेशी" उद्योगांना चालना, संरक्षण देणारी १९९० पूर्वीची अर्थव्यवस्था होती.(परिपूर्ण होती, असे मी कुठेही म्हटलेले नाही. नाहीतर त्यावरुन वाद घालाल. :-))

पुढे ह्या "स्वदेशी"चे काय काय राजकारण झाले, हे का मी तुम्हाला सांगावे?
:-)

Laalbhai
Saturday, January 27, 2007 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथे त्या कम्युनिस्मचा काही सम्बन्ध नाही

>>>

रशियाचे गूण सांगताना "साम्यवादा"चे कौतुक मी कुठेही केलेले नाही.

पण तुम्हा उजव्यांचा कायम आग्रह असतो की देशाला अमेरिकेच्या दावणीला बांधा, त्याचे रहस्य मला काही केल्या उलगडत नाही. असो. तीही कदाचित "प्रतिक्रियात्मक" मागणी असावी! (कम्युनिस्टांना विरोध म्हणून, म्हणजे कम्युनिस्ट रशिया म्हणाले तर तुम्ही म्हणणार अमेरिका. उद्या कम्युनिस्ट पाकिस्तानला उच्चरवात शिव्या देऊ लागले, तर तुम्ही पाकिस्तानशी मैत्री करा, असे म्हणणारच नाही, ह्याची मला कोणतीही खात्री नाही. :-)



Chyayla
Saturday, January 27, 2007 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकेपेक्षा रशिया कधिही जवळचा हे मला पण मान्य आहे, रशियानी भारताला खरच अडचणीच्या वेळेस मदत केली त्याबद्दल दुमत नसल्याचे मी म्हटले आहे. त्यामुळे मी रशियाला विरोध करतोय अशी तुमची समजुत होणे चुकीचे आहे.
उजव्यानी त्याच अमेरिकेला भीक न घालता अणुस्फ़ोट केलेत तर मनमोहन्सिन्गानी अणुकरार करुन त्यान्ची गुलामी पत्करली हे विसरले का राव? मला वाटत तुम्हीच उजव्यान्बद्दल (राष्ट्रीय विचारसरणीबद्दल) फ़ाजील समजुत करुन घेतलेली दिसते.

स्वदेशी शब्द हा मुळात गान्धीन्च्या काळापासुन जास्त वापरात आला व त्याला एक स्वाभिमानाचा एक आयामही आहे. त्याकाळी ईन्ग्रजान्नी भारतातले उद्योग बन्द पाडुन परकिय वस्तु बाजारात आणल्या होत्या. एकेकाळी सम्पुर्ण जगात भारतिय कापडाचा दबदबा होता, तलम कापड आठवतच असेल. तेन्व्हा त्या विदेशी मालाला विरोध करण्यासाठी खादी चा प्रचार करण्यात आला होता. व स्वदेश निर्मित वस्तुन्चाच उप्योग करण्याचा आग्रह धरण्यात आला होता.

स्वदेशी म्हणजे आन्धळेपणे तुम्ही काही तरी भयन्कर अशी समजुत करुन ठेवली आहे. आज स्वदेशी म्हणजे स्वावलम्बन व त्याद्वारे स्वदेशाचा विकास. मग त्यासाठी विदेशी तन्त्रज्ञानाचे, वस्तुन्चे वावडे नाही. आज स्वदेशीचा प्रकार बदलला पण मुळ उद्देश तोच आहे.

कारण जागतिकिकरणामधे कोणी एकटा, वेगळा राहुन विकास करुच शकत नाही. आज आम्हाला Potato Chips पेक्षा Electronics Chips ची जास्त गरज आहे. स्वदेशी व विदेशी विकसित तन्त्रज्ञान वापरुन आपण आपल्या कडील उपल्ब्ध सन्साधनान्चा उपयोग करु शकु व चान्गल्या दर्जाचे उत्पादन देशातच करु शकु ही त्यामागची खरी भावना. याद्वारे स्थानिक लोकाना रोजगार व देशाची आर्थिक व सर्वान्गिण प्रगती करु शकतो.



Laalbhai
Saturday, January 27, 2007 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनमोहन्सिन्गानी अणुकरार करुन त्यान्ची गुलामी पत्करली हे विसरले का राव?

>>

ही ही ही. आता तुम्हाला कंदहार प्रकरण आणि अणूकरार याचा काय संबंध आहे आणि मधे जसवंतसिंगाने जी बडबड केली, या सगळ्याचे समीकरण ठाऊक नसणारच. जाउ द्या. :-)

स्वदेशी म्हणजे आन्धळेपणे तुम्ही काही तरी भयन्कर अशी समजुत करुन ठेवली आहे.

>>

नाही, स्वदेशीबद्दल नक्कीच नाही. पण स्वदेशीचा भामटेपणाने ज्यांनी "वापर" केला, त्यांना मी चांगलाच समजून आहे!

(वरच्या post मधे शक्य असूनही कम्युनिझमला / कम्युनिस्टांना शिव्या नाहीत? का बुवा?)


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators