Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 28, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Root Cause Analysis of Islamic Terrorism » Archive through January 28, 2007 « Previous Next »

Laalbhai
Saturday, January 27, 2007 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केवळ भा. ज. पा. सोडुन कुणीही ३७० कलम, समान नागरी कायदा बद्दल बोलत नाही.

>>>

Well, राजकिय पक्षांशी तुम्हाला काही घेणे देणे नाही, असे मागे एकदा म्हणाला होता, असे अंधुकसे आठवते. खरे काय?

Giriraj
Saturday, January 27, 2007 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय सापडतेय का काही मूळ कारण?
की आपले तुझे माझेच चालू आहे?


Ganeshbehere
Saturday, January 27, 2007 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे गिरी सापडेल रे, प्रयत्न चालु आहेत, सगळे जण आप आपल्या परिने मेहनत घेत आहेत....

Chyayla
Saturday, January 27, 2007 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळ कारण कधीचेच सापडले, खर म्हणजे सापडायची आवश्यकताच नाही ते धडधडीत समोरच दिसत आहेत.
मला वातत सगळ्या चर्चेतुन Root Cause सारान्श मधे असे मान्डता येइल.

१) ईस्लाम हा सुरवातीला समाजसुधारणेसाठी स्थापन झाला होता, व त्या कळात अरबस्तनानात त्याने तिथल्या रानटी लोकाना एक सन्स्कृती देउन बरीच सुधारणा केली.

२) जे लोक अजुनही अल्ला च्या नावाखाली एकत्र नव्हते आले त्यासाठी जिहाद सुरु करण्यात आला होता. व त्या लोकान्साठी काफ़िर हा शब्द पुढे आला. काफ़िराना इस्लाममधे आणुन त्याना सुसन्कृत करण्याचे प्रयत्न झालेत.

३) पुढे ह्याच इस्लामचा ईतर सन्कृतीशी, धर्मियान्शी, विचारान्शी सम्बन्ध आला तेन्व्हाही त्यानी आधीच सुससन्कृत असलेल्यान्शी पण जिहाद सुरु केला.

४)दरम्यान दुसर्या सन्स्कृतीशी व बदलत्या काळाशी ईस्लाममधे परिवर्तन शक्य झाले नाही, कारण तो पुर्णपणे मुल्ला मोलवीन्च्या कचाट्यात सापडला होता व आजही आहे.

५) अशाप्रकारे समाजसुधारणेचा मुळ उद्देश हा बाजुला राहीला व उलट टोळी सन्स्कृतीला एका धर्माचे व्यापक स्वरुप लाभले व तो एक दहशतवादाच्या रुपाने अखिल मानव सन्कृतीवरच सन्कट म्हणुन उभे ठाकला.

जागतिक सन्दर्भात Root cause चे मुद्दे वर मान्डलेत, भारता सन्दर्भात खाली थोडक्यात लिहित आहे.

१) भारतापुरता विचार केल्यास, भारतातही त्यान्ची सरशी झालीच होती व कित्येक वर्ष भारतात इस्लामी राज्य होते, व सारा भारत गुलाम बनला होता परन्तु ईथल्या मातित जेन्व्हा राष्ट्रावादाचा जागर झाला, क्षात्रशक्ती, ब्रह्मशक्ती, व सगळा समाज एकत्र आला तेन्व्हा शिवाजी महाराज, राणा प्रताप, शिखान्चा खालसा पन्थ, राजपुत यान्नी कडवा प्रतिकार करुन स्वराज्य, स्वातन्त्र्य मिळवले.

२) पुढे ईन्ग्राजान्च्या गुलामगिरी विरुध्ह हिन्दु मुस्लिम एक आले होते कारण दोघान्चा शत्रु एकच होता व मुस्लिम म्हणजे मुळचे धर्मान्तरित केलेले हिन्दुच होते म्हणुन, 1857 चा उठाव हे चान्गले उदाहरण देत येइल

३) ईन्ग्रजान्पासुन मुक्त होताना मुळ इस्लामी असहिष्णुता परत जागी झाली व त्यान्नी वेगळ्या राष्ट्राची मागणी करुन देशाचे तुकडे धर्माच्या नावावर केलेत.

४) गान्धीन्सारख्या महात्म्याने पण प्रयत्न करुन हे विभाजन थाम्बवता आले नाही. त्यासाठी मुस्लिमाना वळवण्यासाठी खिलापत चळवळीला समर्थन दीले व नकळत त्यान्ना परकिय असल्याची भावना पेरली व ईथुनच एका महा चुकीला प्रारम्भ झाला.

५) पुढे विभाजन होताना असन्ख्य दन्गे झालेत, त्यातल्या त्यात पाकिस्तानात राहिलेल्या हिन्दुना मारण्यात आले जेन्व्हा नाईलाजाने त्याना भारतात यावे लागले तेन्व्हा पाकिस्तानातुन लाखो हिन्दुन्चे प्रेत व बलात्कारित स्त्रियान्चे लोन्ढेच भारतात आले व मग हिन्दुनी पण प्रतिक्रिया दीली व एक द्वेश भावना निर्माण झाली. त्याचे प्रन्त्यन्तर अजुनही मधे मधे दिसुन पडते.

६) स्वतन्त्र भारतात सत्ता मिळवण्यासाठी व्होट्ब्यान्केचे महत्व अतोनात वाढले त्यामुळे विशीष्ट समाजाचे एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी लान्गुलचालनाची परम्परा निर्माण झाली त्यामुळे मुस्लिमाना परत ते वेगळे असल्याची भावना निर्माण करण्यात आली व राष्ट्रीय प्रवाहापासुन दुर ठेवण्यात आले.

७) या व्होट्ब्यान्केच्या राजकारणापायी सेक्युलरिज्म च्या गोन्डस नावाखाली राष्ट्रीय एक्याची गळचेपी करण्यासाचा नन्गा नाच सुरु झाला. समान नागरी कायदा, काश्मिरच्या बाबतित ३७० कलम, शहाबानो प्रकरण, मुलायमसिन्गचे राजकारण त्याला शह देण्यासाठी मनमोहनसिन्गाची राष्ट्रीय सम्पत्तीवर मुस्लिमान्चा पहिला हक्क असल्याची घोषणा करुन हे दुष्टचक्र अजुनही सुरुच आहे.

८) या सगळ्या बाबीन्चा फ़ायदा घेउन पाकिस्तान्च्या ISI द्वारे देशात दहशतवादाचे जाळे पसरवण्यात ते यशस्वी झाले, त्यातुन सिमी सारख्या सन्घटना व तशी मानसिकता बर्याच ठिकाणी पसरली व आज आपला देश दहशतवादाचे चटके सोसत आहे.

९) आज एकिकडे जातिय, धार्मिक, प्रान्तिय भेद दुर सारुन राष्ट्रीय भावनेने देशाला एकत्र आणणार्या राष्ट्रीय प्रयत्नान्ची मुस्लिमाना भीती दाखवणे दुसरीकडे त्यान्च्यात अलगतेची भावना निर्माण करणे हे भारतातील दहशत्वादाचे एक कारण बनले आहे.

मला वाटत जागतिक सन्दर्भात जे Root Cause चे मुद्दे आपण ईथे मान्डलेत त्यावर कुणाला आक्षेप नसावा.

यापुढे चर्चा वैयक्तिक वादावर न जाता पुढे गेली तर ठीक आहे नाहीतर ह्या BB चा उद्देश ईथेच सम्पला. ईथे काही मुद्दे सुटले असतील तर जरुर सान्गावे. तरी चर्चेत भाग घेतल्याबद्दल सगळ्यान्चे आभार व अभिनन्दन.


Laalbhai
Saturday, January 27, 2007 - 6:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यापुढे चर्चा वैयक्तिक वादावर न जाता पुढे गेली तर ठीक आहे नाहीतर

>>

हो बरोबर आहे. हे कुणीतरी संतू यांना खडसावून सांगितले पाहिजे. नाही का?



Laalbhai
Saturday, January 27, 2007 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरे फार टाळता बुवा. रागवीन हां मी तुम्हाला, सांगून ठेवतो!!

Laalbhai
Saturday, January 27, 2007 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय सापडतेय का काही मूळ कारण?

>>

कारण BB सुरु करायच्या आधीच "सापडले" होते!

पूर्वीच्या राजे महाराजांच्या महालात संताप आला तर एक खास "कक्ष" असायचा म्हणे. (काय म्हणतात त्याला, हे विसरलो!) संताप, राग आला की त्या कक्षात जाऊन काय आदळाअपट, चिडचिड करायची ती करायची.

मायबोलीवरचे बरेचसे BB , हे त्या कक्षासारखे झालेले आहेत, असे आपले माझे वैयक्तिक मत! कुणाला संपूर्ण जमातीवर राग. कुणाचा संपूर्ण संपूर्ण देशावर राग. कुणाचा एखाद्या आयडीवर राद. कुणाचा एखाद्या विचारसरणीवर राग. कुणाचा एखाद्या राजकिय पक्षावर राग. इत्यादी इत्यादी.


Marhatmoli
Saturday, January 27, 2007 - 7:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chyayalaa ,
मी पण हि चर्चा वैय्यत्तिक पातळिवर जातेय म्हणुन लिहायच नाहि अस ठरवल होत.

तु भारतासंदर्भात जे विचार मांडलेस त्यात थोडि भर घालावि अस वाटल म्हणुन आज लिहितेय.

मला अस वाटत कि भारतात हिंदु मुस्लिम तेढ मधल्या काळात नव्हति (१८-१९ वे शतक) त्यावेलि इंग्रजि अम्मल नुकताच सुरु झला होत आणि सहजिकच अस्वस्तता हि त्यासनंदर्भात च होति. (मुळातच बहुसन्ख्य मुस्लिम हे धर्मांतरित होते त्यामुळे अर्थतच ते स्थानिक होते इंग्रज मात्र परके) सुफ़ि पंथाच्या उदय आणि कबिर वगैरे संताच्या शिकवणुकिचा प्रभाव समाजावर दिसत होत. याचच प्रतिबिंब १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात दिसल. खरतर १८५७ चा लढा हा इंग्रजि सत्तेवर आलेल अतिशय बाका प्रसंग होत पण superior Technology आणि भारतिय सैन्यातिल फ़ितुरि यांच्या जोरावर ते त्यातुन बचावलेत.

यानंअतरच इंग्रजानि 'फ़ोडा आणि झोडा' धोरणाचा अवलंब करुन हिंदु- मुस्लिम तेढ पध्धतशिर पणे वाढवायला सुरुवात केलि. (उदा. बंगालचि फ़ाळणी) .याच धोरणाला शह म्हणुन पुढे गांधिजिंनि खिलाफ़त चळवळि ला पाठिंबा दिला होता पण दुर्दैवाने इंग्रजांचे हे धोरण कमालिचे यशस्वि झाले आणि भारताचि फ़ाळणि झालि.
स्वातंत्र्योत्तर काळात भारतिय मुस्लिम समाजात मध्यम वर्ग हा तुलनेनि कमि प्रमाणात निर्माण झाला. शिक्शणाचा अभाव आणि दारिद्र्य ह्या दुश्ट्चक्रामुळे हळुहळु त्यांच्या मध्ये त्याअंच्याअमध्ये धर्मांध नेत्यांचे प्रस्थ वाढिस लागले. या नेत्यानादेखिल समाजाचे भले करण्याऐवजि स्वत्:च्या तुंबड्या भरण्यातच जास्त रस होता आणि आःए.

यावर उपाय म्हणजे अर्थातच समान नागरि कायद, शिक्शणाचा प्रसार, रोजगाराच्या वाढिव संधि इत्यादि Long Term उपाय योजना आहेत.

पण एक गोश्ट मात्र नक्कि, यावर 'कट्टर हिंदुत्व हा उपाय नाहि. 'ह्यांना हाकलुन लाव' अश्या व अश्यांसारख्या impractical suggestions नि दोन्हि बाजुंमध्ये तेढ वाढुन आपल्या समस्या कायम राहातिल. प्रश्ण हे सामंजस्यानेच सुटु शकतिल हे दोन्हि बाजुंनि लक्शात घेण्याचि गरज आहे.


Santu
Sunday, January 28, 2007 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतु याना खडसावुन सांगितले पाहिजे.))))))लालभाई मी फ़ार घाबरलोय बर का?
अगदी पांढराफ़टक नाही नाहि अगदी..... लाल पडलोय



Chyayla
Sunday, January 28, 2007 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई राग नाही हो पण वारन्वार तेच प्रश्न ज्याची चर्चा आधीच झाली असते तेच मुद्दे वेगळ्या शब्दात परत परत सान्गणे म्हणुन टाळले. शिवाय प्रत्येक शब्दाचा किस काढणे व ते शेवटी वैयक्तिक वादावर जाणे नको.

सन्तुच्या काही मुद्याना मी पण समर्थन दीलेले नाही हे लक्षात घ्या. विशेषता प्रत्येक मुस्लिम दहशतवादी असणे, व वैयक्तिक वाद याबद्दल लिहिले सुद्धा आहे.

पण तुम्ही सुद्धा एकतर्फ़ी टिका करताना हे लक्षात घ्या तुम्ही प्रत्यक्ष पणे कोणाचे समर्थन करता आहात? तुम्ही कधी समान नागरी कायदा, मुलायमसिन्ग, लालु, कॉन्ग्रेसची चुकीची धोरणे मुस्लिम लान्गुलचालन, दहशतवाद्याबद्दल कधी बोलताना दीसत नाहीत. शिवाय विजय यानी काश्मिर पाकिस्तानला देउन टाकणे, अफ़जलल फ़ाशी प्रकरण याबाबतित कधी लिहिलेले दीसत नाही.

मराठमोळी तुझ्याप्रमाणेच ही चर्चा वैयक्तिक वादावर घसरत आहे ती चिन्ता मला पण होती व पुढे पण जाउ नये ही ईछा:
या चर्चेतुन एक चान्गले निष्पन्न निघाले की जागतिक इस्लामी दहशतवाद निर्मान होण्याच्या Root Cause वर तरी एकमत झाले आहे. चर्चा आता सध्या भारतातल्या दहशतवादावर आली आहे.
तु पण काही विचार ईथे मान्डले त्याबद्दल धन्यवाद.

भारतिय सन्स्कृतीचा प्रभाव फ़ार मोठा होता इस्लामी आक्रमणापुर्वी जे पण भारताच्या सम्पर्कात शत्रु वा मित्र या नात्याने आलेत त्यान्च्यावर भारतिय सन्कृतीनी प्रभावीत केले ग्रीक आक्रमणाच्या वेळेस सिकन्दर ही प्रभावीत झाला होता त्यानन्तर त्याचा सेनापति सेल्युकस भारतात काही काळ होता. नन्तर आलेल्या मिन्यान्डरने तर बौद्ध धर्म स्विकारुन मिलिन्द नाव धारण केले होते, याशिवाय शक, हुण, पारशी, ज्यु यान्ना पण भारतिय सन्स्कृतीने आसरा दीला.

पण जेन्व्हा कमालीचे असहिष्णू अश्या मुस्लिमान्शी सम्बन्ध आला तेन्व्हा त्याना पण कडवा प्रतिकार मिळाला पण तरिही मुस्लिमान्चे भारतियकरण झालेच आजही तुम्ही पाकिस्तानतही जाल तर तुम्हाला भारतिय सन्स्कृतीचे दर्शन घडेल जसे पेहराव, पान खाणे, मेहन्दी, बान्गड्या भरणे, जावाहिरात, एवढेच काय हिन्दुस्तानी शास्त्रिय सन्गितातले कित्येक उस्ताद हे मुस्लिमच आहे ते सुद्धा तितक्याच आर्ततेने सरस्वतीची, कृष्णाचे, व ईतर देव देवतान्चे गुणगाण करतात. रसखान तर कृष्णभक्त होता. तु म्हणते त्याप्रमाणे सन्त कबीर व सुफ़ी पन्थ तर पुर्ण भारतिय स्वरुपातच आहेत. कुणाला माहिती आहे का नवनाथान्चा एक सम्प्रदाय तर मुस्लिम आहे, त्यान्च्यातले फ़किर हे तर हिन्दु सन्तासारखेच आहेत. सन्स्क्रुती व राष्ट्र उभारणीमधे अश्या मुस्लिमान्चे पण योगदान आहे व आज त्यान्ची गरज आहे त्याना नाकारुन चालणार नाही.

सन्तु आज असे मुस्लिम सन्स्कृतीद्वारे म्हणा किन्वा पुर्वाश्रमीचे हिन्दुच त्याना दुर लोटुन चालणार नाही. मागे मी म्हणुनच बाटला या शब्दाच्या वापरा बद्दल हीच भावना व्यक्त केली होती. आज भलेही त्यान्चा प्रभाव कमी दीसत आही. पण त्याना जिहादी होण्यापासुन काळजी घेणे गरजेचे आहे.

माझ म्हणण हेच आहे की सहिष्णु मुस्लिम हे सान्स्कृतीक द्रुष्ट्या एकच आहेत म्हणुन हिन्दुत्वाच्या व्याख्येमधे ते पण मोडतात. मराठमोळी तु जे कट्टर हिन्दुत्व समजत आहे त्यापुर्वी जर खरे हिन्दुत्व काय हे जर आपण पाहिले तर बरेच शन्का दुर होतील पण आता सध्या ह्या BB चा विशय नाही


Santu
Sunday, January 28, 2007 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठमोळी
हिन्दु मुस्लिम तेढ हि मधल्या काळात नव्हती)))))मला वाटते यात तुमची गफ़लत होतेय.

या कालात सुध्दा जिथे टिपु सारखे मुस्लिम शासक होते.तिथे ते अत्याचार करत होतेच.टिपुने जबरि धर्मांतरे करुन पुर्ण मलबार मुस्लिम बहुसंख्याक केला.(एकेदिवशि एक लाख मलबारि हिन्दुचे धर्मातर केल्याचा उल्लेख आहे)

फ़क्त एवढे झाले होते की जवळ जवळ १००० वर्शे चाललेले (घोरि पासुन) युध्द हे मराठ्यानी व काहि अंशी शिखानी जिन्कले होते.
व मुस्लिम अमल हा जवळ जवळ ८०% हिन्दुस्ताना तुन नष्ट झाला होता.दिल्लि चा बादशहा तर पाटिल बाबा चा( महदजि शिन्दे) अंकित होता.
हे शासक हे धर्मांध नव्हते म्हणुन जी काही शांतता देशात होति ती हिन्दुच्या मुळे होती.

यात मुसल्माना चा कसलाहि सह्भाग नव्हता.त्याना शक्य झाले असते तर पुर्ण हिन्दुस्थान त्यानी पाकिस्तान सारखा पुर्ण धर्मांतरित केला असता.
म्हणुन शिवभारतात कवी म्हणतो"अगर शिवाजी न होते तो सुन्नत(सुन्ता) होति सबकी."

अर्थात या साठी त्याना जबर किंमत मोजावी लागलि होति.
शिवाजी राना प्रताप, विजय नगरचे राजे,या सारख्या दिग्गजानी आपले आयुष्य खर्ची घातले होते.


Saavat
Sunday, January 28, 2007 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>एवढेच काय हिन्दुस्तानी शास्त्रिय सन्गितातले कित्येक उस्ताद हे मुस्लिमच आहे ते सुद्धा तितक्याच आर्ततेने सरस्वतीची, कृष्णाचे, व ईतर देव देवतान्चे गुणगाण करतात. रसखान तर कृष्णभक्त होता. तु म्हणते त्याप्रमाणे सन्त कबीर व सुफ़ी पन्थ तर पुर्ण भारतिय स्वरुपातच आहेत. कुणाला माहिती आहे का नवनाथान्चा एक सम्प्रदाय तर मुस्लिम आहे, त्यान्च्यातले फ़किर हे तर हिन्दु सन्तासारखेच आहेत.

च्यायला,
मानल तुम्हाला, तुमचे वाचन अफ़ाट आहे, त्यावर खोल असा विचारही आहे, आणि मुख्य म्हणजे सर्वांगी आहे. जियो मेरे दोस्त!
यात 'रामकृष्ण परमहंसांच' नावही आदरान घेता येईल,त्यांनाही महंमद पैंगबरसाहेबांच दर्शन झाल होत!त्याचबरोबर 'येशू ख्रिस्तांचही!!

तूम्ही संदर्भ दिलेल्या संप्रदायात नगरचे 'अवतार मेहरबाबा', शिर्डीचे साईबाबा, हुमनाबादचे माणिकप्रभू, पुण्यातील 'हजरत बाबाजान' ही स्त्री फ़कीर,तसेच जंगली महाराज, नागपुरचे हज़रत ताजुद्दिन बाबा इ. जवळची उदाहरणे देता येतील.

>>>त्यापुर्वी जर खरे हिन्दुत्व काय हे जर आपण पाहिले तर बरेच शन्का दुर होतील पण आता सध्या ह्या BB चा विशय नाही

नवीन B.B उघडला तर चालेल, पण,धर्मातीत, मूळ गोष्टींची चर्चा जरूर व्हावी अशी सगळ्यांना विनंती आहे!
आपण ठरवून, कूठल्याही धर्मात जन्म घेवू शकत नाही( no choice ) , धर्म हा आपल्या जन्माअगोदरपासुनच आस्तित्वात असतो.त्यामूळे प्रत्येकाला आपला,जन्माबरोबरच सोबत असणारा, अर्धवट कळालेला, धर्मच श्रेष्ठ वाटण, साहजिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजासारखा खरा धर्म समजून,उमजून कृती करणारा राजा खरच आपल भाग्य होत!! आणि सद्याच्या काळाची गरजपण हीच आहे! सज्जनांचा संग्रह आणि दुष्टांच निष्ठूरपणे निर्दालन करणारा अभूतपूर्व राजा!!मग धर्म कुठलाही असो. अर्थात हे झाल माझ मत!



Santu
Sunday, January 28, 2007 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संत कबिर व सुफ़ि हा पंथ पण भारतिय च आहे.))))))सवत तुम्हि म्हनताय ते खरे आहे.पन सध्या मुस्लिम समाजावर प्रभाव आहे तो वहाबी पंथाचा याना कुठे कुठे सलाफ़ी म्हणुन पण संबोधले जाते.या चा आश्रयदाता दाता देश आहे सौदि अरेबिया.

पहिल्यांदा या वह्हाबी पंथा बद्दल.

या पंथाचे जे कुराण आहे त्याला किताब अत्-तवाहिद म्हणजे book of unity याचा अर्थ सर्व मुस्लिम लोकाना एकत्र करने
याचा संस्थापक अब्दुल वहाब ह १७०३-१७९२ सौदि मधे जन्मला. याने मुसल्मानाना सुफ़ि पंथाच्या प्रभावतुन सोडवण्या साठि हा पंथ स्थापन केला.
हा पन्थ कुठल्याही मुर्ति पुजा किंवा संत पूजे च्या
विरोधात आहे.मोहमदाचा सुध्दा पुजा करण्याला यांचा विरोध आहे.
याचे शिक्षण सध्या मदरशा त दिले जाते.याचा पोशाख हा पुरुशानी लांडि विजार डोक्याला टोपि असा असतो. व बायकानी बुरखा असा असतो.
यात जे कुराण मानत त्याना ठार करावे असा स्पष्ट आदेश आहे.तसेच मुर्तिपूजेचा ते द्वेश करतात.म्हणुनच तालिबान ने बुध्द मुर्ती फ़ोडल्या.
कारण तालिबान हा वहाबी विचरसरणिचे आहेत.
आपल्याकडे पन जे मदरशे आहेत.त्यामुळेच आपल्या कडे हल्लि बुरखा घेतलेल्या बायका जास्त दिसायला लागल्या आहेत.


Santu
Sunday, January 28, 2007 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओसामा-बिन लादेन हा वहाबि आहे.काफ़िर यांच्या
विरोधात लढताना जो मरेल त्याला स्वर्गात प्रवेश मिळेल.
व ६९ हुर म्हणजे vergins मिळतिल असा यांचा विश्वास आहे.म्हणुन्च
या पंथातले लोक जिवन्त बॉम्ब व्हायला तयार होतात.
आत्तचे इब्न सौद हे जे राजघराणे सौदित सत्तेवर आहे.त्यान्चा व अब्दुल वहाब यांचा रक्ताचा संबंध होता.त्या मुळे सौदि अरेबिया सर्वत्र या पंथाच्या प्रसारकरता पैसे देतात म्हणुन्च भारतात मशिदि व मदरशा चे उदंड पिक आले.


Santu
Sunday, January 28, 2007 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाहाबी मुसल्माना चे जरी कुणि वाईट केले.तरी काफ़िराला
ठार करने हे त्यांचे धार्मिक कर्तव्य असे ते मानतात.
त्याना कुरानाचे चे rivision केले आहे ते मान्य नाहि.
त्याना पहिल्या चार खलिपा पर्य,न्त जसा इस्लाम होता तो आणायचा आहे.
कुठल्याहि इमामाची पुजा यांना मान्य नाहि इथेच त्यांचे शिया बरोबर
वाकडे आहे.

उत्तर प्रदेशातिल देवबन्द हे सुध्दा वहाबी विचार्सरणिचे आपत्य आहे.
जवल जवळ ९०%टक्के sucidal bombers हे वहाबि मुस्लिम आहेत.
algiria वहाबी मुस्लिम तर film projecter लावला म्हणुन एखाद्याचा जिव घ्याला मगे पुढे बघत नाहित.

अल्-कैदा,पाकिस्तानातिल हर्कत्-अल्-मुजाहिदिन,फिलिपिन्स मधिल अबु सय्यफ़ ग्रूप,उजेबेकिस्तान मधिल इस्लमिक ग्रुप ओफ़ जिहाद,इजिप्त मधिल इस्लामिक मुव्हमेन्ट
हे सलाफ़ि किंवा वहाबी विचार सरणी चे लोक आहेत.
या कट्टर विचार सरणितच इस्लामिक दह्शत्वादाची बिजे आहेत.


Marhatmoli
Sunday, January 28, 2007 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"नवीन B.B उघडला तर चालेल, पण,धर्मातीत, मूळ गोष्टींची चर्चा जरूर व्हावी अशी सगळ्यांना विनंती आहे! "

Saavat ला १०१% अनुमोदन. खरच एक नविन BB उघडायला हवा. मला इतिहास हा विषय खुप आवडतो पण माझे वाचन मर्यादित आहे. Chyayla, Saavat, Santu तुम्हा सर्वांकडुन बरच काहि शिकता येइल मला. 'भारताचा इतिहास' म्हणजे मोहेन्दजारो (किंवा त्याआधि म्हणजे मानव जेंव्हा मानव झाला ( Homo sapian ) तिथुन सुरुवात करुन ते अर्वाचिन काळापर्यंत म्हणजे स्वातंत्र्य लढ्यापर्यंत चा इतिहास यात समाविष्ट करावा अस मला वाटत.




Shendenaxatra
Sunday, January 28, 2007 - 7:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुस्लिम धर्माच्या कट्टरतेमागचे कारण म्हणजे त्या धर्माचा ताठर आणि कठोर स्वभाव. सुधारणांचे प्रमाण नगण्य आहे. कुठल्याही प्रकारची टीका केल्यास लोक जाळपोळ दंगली करत रस्त्यावर येतात. खून करतात.
मुस्लिम अतिरेकी कारवायांचा निषेध करायला मुस्लिम लोक इतक्या उत्साहाने रस्त्यावर येत नाहीत. मात्र ड्यानिश कार्टूनचा, पोपच्या तथाकथित वादग्रस्त विधानाचा विरोध करायला अक्षरश: लाखो मुस्लिम लोक रस्त्यावर येतात. अशाने बिगरमुस्लिमांनी काय मत बनवावे?
सरळमार्गी मुस्लिम लोकांनी हे बदलले पाहिजे.
कुठलेही कर्तृत्व नसताना अरबांना अफाट तेलाच्या रुपाने अमाप संपत्ती मिळाल्यामुळे त्या धर्माच्या सुधारणा अजूनच खुंटल्या आहेत.
हा धर्म अरबी भाषा, अरब संस्कृतीला अवाजवी महत्त्व देतो. मुस्लिम लोकांना नमाज पढताना अरबीखेरीज दुसरी कुठलीही भाषा वापरता येत नाही. मग त्या समूहातील कुठल्याही व्यक्तीला अरबी येत नसले तरी बेहत्तर.


Chyayla
Sunday, January 28, 2007 - 9:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्तु, शेन्डेनक्षत्र तुम्ही माहितीत चान्गली भर घातली. इस्लाम बद्दल अजुन कुणाला काही माहिती असेल तर जरुर सान्गावी यामुळे कित्येकान्च्या ज्ञानात भर पडेल.

धन्यवाद सावट, राम्कृष्ण परमहन्साबद्दल अजुन थोडे. ते पण ऋशी मुनीन्प्रमाणे आध्यात्मिक वैज्ञानिकच होते. प्रयोग म्हणुन त्यानी सगळ्या उपासना पद्धतीन्चा अभ्यास केला नुसता वर वरचा नव्हे तर प्रत्यक्ष आचरण करुन मुस्लिम बनुन त्यानी नमाज पढली. व शेवटी त्यान्चा निष्कर्श हाच की वेदानमधील वर्णीत अद्वैत हे ईश्वर जाणण्यासाठी सर्वोत्तम साधन आहे यात ईतर मार्गाना कमी लेखणे असा प्रकार नाही कारण त्या वेदानमधेच हा विचार आहे "ज्याप्रकारे सगळ्या नदीन्चे पाणी हे शेवटी सागराला जाउन मिळते त्याचप्रमाणे तुम्ही ईश्वराला कोणत्याही स्वरुपात पुजा कोणत्याही नावाने पुजा ते शेवटी एकाच परमेश्वराला जाउन मिळतात." अशा सर्वव्यापी विचारान्मुळे त्याना वेदान्ची महती पटली तर दुसरीकडे ईतर उपासना पद्धती या अजुनही सन्कुचित आहेत व एका ठराविक साच्याच्या बाहेर पडणे म्हणजे त्यान्च अस्तित्वच नष्ट होणे आहे.

सन्तु तुम्ही म्हटल्या प्रमाणे हा वहाबी पन्थच इस्लामी दहशतवादाचा मुळ आधार आहे. ते तर ईतर पन्थान्ना इस्लाम म्हणुन मानतच नाहीत.
मदरशा मधे अरबी येवो ना येवो लहानपणीच कुराण कन्ठस्थ करवल्या जात वर त्यान्चे जिहादी विचारान्चे सन्स्कार केल्या जातात. भलेही त्याला त्या कुरणात काय लिहिले आहे त्याचा अर्थ माहित नसतो पण हे जे विचार ऐकवल्या जातात तेच मग पुढे चालवल्या जातात.माझ्या माहितीप्रमाणे या कुराणाचे १३ खन्ड आहेत आणे जो हे पुर्ण कन्ठस्थ करेल त्याला "हिज्ब" म्हणुन पदवी दील्या जाते. व तो एक फ़ार मोठा सन्मान असतो. अशा शिकवणुकीतुन कुणी दहशतवादी नाही झाला तरच नवल.


Chyayla
Sunday, January 28, 2007 - 10:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


नन्दिनीने मागे एकदा म्हटले होते की कोणताही धर्म विनाश शिकवत नाही, यावर थोडी माहिती मिळवली तर एक लक्षात येत की भारतभुमीवर जे धर्म निर्माण झालेत व भारताबाहेर जे धर्म निर्माण झाले त्यान्चामधे बराच मोठा फ़रक आहे. भारतातील हिन्दु, जैन, बौध, शिख व ईतर अनेक सम्प्रदाय यान्च्या बाबतित हे विधान चपखल लागु पडत पण इस्लाम व ख़्रिश्चनान्साठी हे विधान करणे धाडसाचे ठरेल. भारतभुमी ही अनेक विचारान्ची जननी आहे ईथे चार्वाक सारख्या विचारानाही मान्यता मिळते त्यामुळे त्याना चान्गले ठाउक आहे की परधर्माशी दुसर्या विचारान्शी कसे सहिष्णु रहावे. यान्नी जे पण युद्ध केलेत ते स्वसरन्क्षणासाठी कधीही दुसर्या भुमीवर धर्माच्या नावानी आक्रमण केले नाही.

तर इस्लाम हा अरबस्तानात जन्मलेला तसेच ख़्रिश्चन हा युरोपात आणी तो ही येशु ख़्रिस्तानन्तर त्यान्चा अनुयायानी निर्माण केलेला व त्याची मालकी, मार्केटिन्ग ही चर्च नावाची एक सन्स्था बनवुन तीला बहाल केली. आणी ह्या चर्चच्या शिकवणुकीत व येशु ख़्रिस्तान्च्या शिकवणुकीत कमालीची तफ़ावत आहे त्यामुळे चर्च जी ख़्रिश्च्यानिटी सान्गते ती काही पटत नाही. विशेषता: तुम्हाला मुक्ती मिळवायची आहे तर चर्चच्या माध्यमातुनच व ख़्रिश्चन होउनच पण मला सान्गा स्वता: येशु ख़्रिस्त हा ख़्रिश्चन होता का?

या सगळ्या परकिय भुमीवर निर्माण झालेल्या धर्मात कमालीची असहिष्णुता आहे. जसे इस्लाम चा खरा अर्थ आहे शान्ती पण कृती एकदम विरुद्ध कारण ही शान्ती मिळवायची तर तलवारीने, हिन्सेनी असा काही विचित्र विचार आहेत. बरे जे देश पुर्ण इस्लामी झालेत त्यातले निवडक सोडुन कोणत्या देशात शान्तता आहे.

मुस्लिमान्चे जिहाद व ख़्रिश्चनान्चे क्रुसेड, इन्क्वीजीशन हे म्हणजे सरळ सरळ विरोधकाना कन्ठस्नान द्यायचेच आदेश देते. व त्याची प्रत्यक्ष अम्मलबजावणी केल्या जातेच. इस्लाममधे दार्-उल्-हरब व दार्-उल्-इस्लम असे म्हणुन जमीनीची वाटणी केली आही व प्रत्येक मुसल्मानाने जिहाद करुन दार्-उल्-हरब (नापाक जमीन) वर आक्रमण करुन त्याला दार्-उल्-इस्लाम म्हणजे इस्लामी करने हे कर्तव्य आहे. तसा कुराणातले आदेशाचे अर्थ दोन्ही प्रकारे काढल्या जातात कोणता खरा कोणता खोटा हे कुणालाच महिती नाही. पण मला वाटत धर्माची खरी शिकवण त्यान्च्या कृतीतुन प्रगट होत असते त्यामुळे दुर्दैवाने त्याचा विनाशक अर्थच प्रस्थापित होतोय. आणी आपल्याला त्याची दखल घ्यावी लागतेय कारण ते इतक्या सहस्त्रकानपासुन आपणही ते सोसतोय.

अजुन एक फ़रक बघा भारतात बौद्धानी तत्कालिक समाजव्यवस्थेविरुद्ध बन्ड करुन बौद्धमत स्थापन केले पण त्यान्चा ईतरानी छळ, अत्याचार केला नाही उलट आदरच केला एवढेच नव्हे तर कित्येकानी त्याचा अभ्यास करुन पटल्यावरच बौध धर्माची दीक्षा घेतली व पुढे बीना तलवारीनेच या धर्माचा प्रचार जगाच्या पाठीवर झाला आज जी सर्वदुर भारतिय सन्स्क्रुती दीसते त्याचे बरेचसे श्रेय बौद्ध धर्माला जाते. असो माझा मुद्दा हा की विरोधी मत मान्डुनही बौद्धाना सन्मानच मिळाला तर दुसरीकडे युरोपात येशुला सरळ क्रुसावर चढवण्यात आले, त्यानन्तरही क्रुसेडच्या नावानी आता त्याच्या अनुयायान्नी सुडाचा व विनाशाचा सुरु केलेला नन्गा नाच अजुनही सुरुच आहे

नन्दीनी तुला जर माझे मुद्दे नाही पटले तरी तुझ्या मुद्यासाठी पुरावे दीले तर मला पण माहितीत भर पडेल पण दुर्दैवानी व प्रत्यक्षात तुझे विधान बरोबर वाटत नाही. तरीही मी इस्लामच्या चान्गल्या गुणान्ची चर्चा आपण आधीच केली आहे पण त्यात दहशतवादी स्वरुप का आले असावे तेवढ्यासाठी ही चर्चा करत आहे.


Chaffa
Monday, January 29, 2007 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या BB वर पहिल्यांदाच लिहीतोय पण सगळ्यांची मते वाचल्यावर असे दिसते की दहशदवादाच्या मुळ कारणा कडे जरा दुर्लक्ष होतेय. प्रांजळ पणे लिहायचं तर यामागे तिव्र सत्ताहव्यास हे एकच कारण दिसते या एकाच कारणासाठी हा गदारोळ चाललाय आता मुस्लीम धर्म फ़ार मोठी व्याप्ती असलेला आहे म्हणुन तो वेठीस धरल्या गेला आहे.
दुसरा एखादा धर्म सापडला असता तर त्याला कामाला लावल्या गेले असते नाही का.?


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators