Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Teenagers and their parents

Hitguj » Views and Comments » Relationships » नवरा, बायको, संसार, तडजोड इ. » Teenagers and their parents « Previous Next »

Vidya_joshi
Monday, January 29, 2007 - 8:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वयात येणारी आपली मुलं आणि पालक यांचे संबंध कसे असावेत? मैत्रीच्या रुपात असेल तर उत्तमं. नाहीतर आपले काय मत आहे?

Avv
Monday, January 29, 2007 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किशोरावस्थेतली मुलं एका शारिरीक आणि मानसिक ट्रान्झिशनमधून जात असतात. ही मनोवस्था जाणून घेणं सर्वात महत्वाचं आहे. पुलंनी या वयाचा उल्लेख इमोशनल सी-सिकनेस असा केलाय. (प्रकाश संतांच्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत बहुधा. असो. तर त्यांना एकाच वेळी आधाराची, मोकळिकिची गरज असू शकते. हाच काळ थोडासा आत्मशोधाचा पण असतो. त्यामुळे हे `वय' समजून घेणं आईबाबांनी अतिशय महत्वाचं आहे. या प्रेमळ जाणिवेतून मुलांबरोबरचे नातेसंबंध आपोआप उमलतील. शुभेच्छा.

Yuvrajshekhar
Friday, February 02, 2007 - 9:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटतेय की वयात येणा-या मुलींपेक्षा वयात येणा-या मुलांचे प्रॉब्लेम्स मोठे आहेत मुलीला जेव्हा मासिक पाळी येण्याची सुरुवात होते त्यावेळी घरातली मोठी स्त्री विशेषता आई तिला त्याबाबतीत मदत करते कारण ती स्वत: या अनुभवातून गेलेली असते पण मुलगा जेव्हा वयात येतो आणि पहिल्यांदा त्याचे वीर्यपतन होते त्यावेळी आई काय घाणेरडेपणा करतोयस? असं म्हणून दूर लोटते वडील त्या अनुभवातून गेलेले असूनही कामा निमीत्ताने किंवा इतर काही कारणाने त्याकडे लक्ष देत नाहीत,अशावेळी मुलामध्ये ब-याच वेळेला आपल्या बरोबर काहीतरी चुकिचं घडतंय असा न्यूनगंड निर्माण होतो आणि मग तो ह्या गोष्टी आई-बाबांशी शेअर न करता त्याच्या समवयीन मुलांबरोबर शेअर करतो आणि तिथे त्याला चुकीचं मार्गदर्शन मिळण्याची दाट शक्यता असते.
त्यामूळे वयात येणा-या मुलांबरोबर वागताना पालकांनी त्यांना लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे.

उदा. जेव्हा मुलीला मासिक पाळी येते तेव्हा तिला तुला कावळा शिवलाय असं सांगण्यापेक्षा पाळी का व कशी येते? हे शास्त्रीयदृष्ट्या सांगणं पालकांच कर्तव्य आहे.जेणेकरून तिला याबद्दल वाटणारं कुतूहल किंवा भीती कमी होईल.


Abhishruti
Wednesday, September 26, 2007 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी या BB वर कशी काय आले नाही माहित नाही. पण आज लक्ष गेल. वरचं म्हणणं मलाही पटतय. मुलींइतकच मुलांनाही या गोष्टी समजावून देण कदाचित जास्तच जरुरीच आहे. आणि हे काम माझ्या मुलीच्या शाळेत उत्तम रीतीने handle केलं गेलय. माझी मुलगी आता दहावीत आहे पण आठवीपासून त्याना शाळेत वेगवेगळे workshops, roleplays वगैरे घेऊन आणि वेगवेगळ्या Heath Organizations, Counsellors च्या मदतीने या गोष्टी पद्धतशीर रित्या समजावण्यात आल्या. तसा CBSE चा Adolescence Education Program आहे पण तो सर्व शाळेत इतक्या छान रित्या राबविला जात नाही. आटपायचा म्हणुन एकदा काहितरी (म्हणजे एखादं HIV or Aids वरती व्याख्यान ठेवुन पार पाडतात(?) त्यामुळे मुलाना माहिती मिळण्या ऐवजी त्याना जास्त confuse करतात. हे मी पाहिलेलं आहे.) पण माझ्या मुलीच्या शाळेत (गुरुकुल, पुणे) अगदी puberty, teenage problems - peer pressure पासून substance abuse पर्यंत सर्व नीट cover केलं त्यात त्याना काही rehab centers ना पण घेऊन गेले होते .
Overall I felt it was a very good, necessary and important program. It was very difficult for even well-educated parents to talk with their kids regarding this subject, break the barrier (although we knew that it is very necessary). But school's/teachers' approach was so good that we all were relieved and now our kids feel free to discuss any topic/issue with us without any hesitation.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती







Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators