Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 26, 2007

Hitguj » Views and Comments » General » Smoking » Archive through January 26, 2007 « Previous Next »

Ajjuka
Thursday, January 25, 2007 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

|पण तुमचा त्यातला सहभाग फ़क्त मत देण्यापुरताच का? सिस्टममध्ये चेंज हवे आहेत पण त्यात हात घालण्याची जबाबदारी तुमची नाही काय? हे बदलायला हवं ते बदलायला हवं याच्या फ़क्त बाताच मारणार का? |
दुसर्‍याला त्रास झाला, तो मेला तरी चालेल मी माझा आनंद मिळवणारच असे म्हणणार्‍याच्या तोंडी हे शोभत नाही,


|मनोज भाऊ मी पण तेच तर म्हणतोय थोडं माणूसकीने घ्या की जसा आमच्या स्मोकिंगचा तुम्हाला त्रास होतो तसं स्मोकिंग पूर्णपणे बंद करणे आम्हाला शक्य नाही.शेवटी दोन्ही बाजूने थोडी एडजस्टमेंट करायला नको का? |
adjustment कधी होते जेव्हा दोनही बाजू काही फायदे मिळवण्यासाठी काही तोटा सहन करतात. इथे ते कुठेय? तुमच्या फुंकण्यातून आम्हाला काय मिळते? passive smoking बास. ज्याचा फायदा तर नाहीच तोटाच जास्त आहे. अर्थत हे शास्त्रीय सत्य मान्य करण्याइतकेही सामन्यज्ञान तुमच्याकडे नसावे असे वरती दिसतेच आहे. तर मुद्दा असा की आमचा फक्त तोटा होतो आणि तुम्हाला आनंद मिळतो तर आम्ही adjustment का करायची?

|असतील अमेरिकेत किंवा इतर देशांत वेगळे स्मोकिंग झोन म्हणून ते मुंबईत पण झाले पाहिजेत का? इथे लोकांना रहायला जागा नाहीये,कधीतरी पिक अवर्समध्ये दादर स्टेशन किंवा अंधेरी स्टेशन बाहेरून चालून बघा मग कळेल इथे काय अवस्था आहे. |
दुसर्‍या देशातला चंगळवाद फक्त उचलण्यापेक्षा काही चांगले उचलले तर काय हरकत आहे? आणि ज्या गर्दीची तुम्ही उदाहरणे देताय त्या गर्दीत माणसाचा आधीच जीव घुसमटून जात असतो त्यात तुमच्या धुराचा त्रास ह्या गर्दीने सहन केला पाहीजे? का?

परत वाहनांच्या प्रदूषणाचा मुद्दा सोडतच नाही तुम्ही.. धूर सोडणार्या वहानांचा काहीतरी उपयोग आहे जगाला. हे अधीही माझ्यासकट अनेकांनी म्हणून झालेय पण तरी तेच तुणतुणं. तुमच्या smoking चा तुम्हाला आनंद मिळणे या व्यतिरिक्त कुठला उपयोग आहे? किंवा passive smoking चा काय उपयोग आहे? या प्रश्नांना मात्र बगल देता तुम्ही.
मग त्रागा करू नका, चिडचिड करू नका, जमत नसेल तर चर्चा करू नका असल काहीतरी बोलत रहाताय.




Mahesh
Thursday, January 25, 2007 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाहन चालवणारा आणी त्यामधे बसणारे निदान त्यांच्या गंतव्य ठिकाणी तरी पोहोचत असतील. पण स्मोकिंग करणारे ( active आणी passive ) मात्र वरच जाऊ शकतात.
जपानबद्दल लिहिणार होतो, पण...


Nandini2911
Thursday, January 25, 2007 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिगरट स्मोकिंगचा मस्त विषय चालू आहे, चालू द्या...
मात्र मला सिगरेटचे लाईटर जमवायचा छंद आहे, कुणाला "असली नकली" चा म्युजिकल लाईटर कुठे मिळतो ही माहित असल्यास कळवा..


Zakasrao
Thursday, January 25, 2007 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युवराज भौ,
तुमच्या माहितीकरता एक सांगतो गाडी करणार्‍या प्रदुषणासाठी कडक कायदे आहेत. arai नावाची संस्था आहे ती नवीन गाडीसाठी emission चे norms पाळल्याशिवाय production साठी permission देत नाही. असे कोणतेही कायदे सिगारेटसाठी नाहित. त्यामुळे जर ओढणार्‍या लोकांकडुन काही अपेक्षा केली तर काय बिघडले?
कित्येक लोक सार्वजनिक ठिकाणी ध्रुमपान करतात त्या धुराचा त्रास होतोच ह्या गोष्टीचा विचार तुम्ही का करत नाही? आपल्यामुळे दुसर्‍याला त्रास होउ देवु नये हे एक सभ्य माणसाचे लक्षण आहे.
एखादा अडाणी मनुश्य असे करत असेल तर मी त्याला समजावुन संगितले आहे. पण तुमच्यासारखे सुशिक्षित मनुश्य असे करेल तर मग काय करायचे


Yogy
Thursday, January 25, 2007 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिगरेटी ओढणार्‍यांसाठी "emission certificate" किंवा पीयूसी हे सक्तीचे करावे. आणि त्यांनी ते कपाळाला किंवा इतर दर्शनी भागात चिकटवून हिंडावे म्हणजे इतर लोक आवश्यक ती खबरदारी घेतील.

Bsk
Thursday, January 25, 2007 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुकाशी पुर्णपणे सहमत..
कायद्यानि किती गोष्टी साद्ध्य होतात माहित नाही, पण स्मोकींग विरुद्ध कायदा झाला तर फारच बरे होईल..
बाकी इथे कितीही बोलले तरी व्यर्थच आहे! झोपलेल्या जाग करता येत, सोंग घेतलेल्याला नाही...


Vinaydesai
Thursday, January 25, 2007 - 2:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपले युवराज बरेच Confused आहेत... 'दुसर्‍याला मारू नका' हा स्वच्छ इशारा त्यांना कळत नाही.. आणि त्यावर नको ती (कोलेस्टेरॉल, वाहनांनी होणारे प्रदुषण) असली उदाहरणं देत आहेत...

कोलेस्टेरॉलचा त्रास खाणार्‍याला होतो..
प्रदुषणावर सरकार नवीन नवीन नियम आणतच आहे... आणि इथे कुणीही 'आम्हाला प्रदुषण चालेल' असं म्हटलेलं नाही..

'आत्महत्या करायची असेल तर करा, पण दुसर्‍याचा जीव घेऊ नका' ह्यात न कळण्यासारखं काय आहे, पण नाही...

दुसरीकडे म्हणतात, की 'कित्येक नवयुवक सिगरेट पितात, पण घरी सांगायची हिम्मत होत नाही', म्हणजे 'आपण चुकीचं करतो आहोत' याची जाणीव आहे.. (मी बाहेर जाऊन Icecream खाल्लं तर घरी सांगायला लाजत नाही..)

तुम्ही 'सिगरेट पिऊ नका' असा सल्ला तुम्हाला (तुमच्याच विनंती मुळे) कुणीही दिलेला नाही. पण घरी, शेजारी आणि आसपास इतरांचे जीव घेऊ नका एवढच समजावतोय मी.. घरच्यांचे जीव घेणार असलात तर तशी त्यांची तयारी असल्याची खात्री करून घ्या (तुम्हाला फुकायला मिळावे म्हणून आम्ही मरायला, घुसमटायला, वास सहन करायला आनंदाने तयार आहोत)...

Passive Smoking मध्ये सगळ्यांनाच मरायला होत नसेल.. पण तरी त्या घाणेरड्या वासाच्या धुराचा त्रास इतरांना का? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अजुनही देऊ शकत नाही हे दिसतंच आहे..(आणि ते चुकीचं आहे हे पण मान्य करताय)

असं म्हणतात 'खुद जियो औरोंको भी जीने दो' त्यात थोडा बदल करून 'खुद जियो या मरो, लेकीन औरोंको जीने दो'

(बघूया हिंदीत कळेल का तुम्हाला ते).
:-)

Zakki
Thursday, January 25, 2007 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे असे काय करता. सगळे समजून उमजून उगीच वाद वाढवायचा म्हणून हे सगळे चालले आहे. सगळीकडेच. कारण सगळ्यांनाच वाद विवाद करायला आवडते. खरे खोटे काहीहि घेऊन त्यावर वाद घालायचा. मला एकवेळ उद्योग नाही म्हणून मी करतो, पण तुम्ही कर्तबगार माणसे आपला वेळ का दवडता उगाच?

Laalbhai
Thursday, January 25, 2007 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे काही गरज नाही रे कायदे वगैरे करण्याची. किंवा कुणाला समजावण्याची. सिगारेट, दारू, तंबाखू, गुटखा ईत्यादी गोष्टींवर २००० % कर लावावा. आणि जमा होणारी रक्कम infrastructure development साठी वापरावी.

तसेही ही सगळी व्यसने करणारी लोकं देशावर, समाजावर उपकारच करत असतात.

असे बघा ना, की ह्या उत्पादनांच्या कंपनीतल्या लोकांना रोजगार मिळतो.

दुसरे असे की ही व्यसने करून माणून आजारी पडला की दीर्घ उपचारांसाठी लाखो रुपये खर्च करतो. म्हणजे औषधांच्या कंपन्यांचा खप अधिक, दवाखाने अधिक चालणार. रोजगार निर्मिती वाढणार!

आणि जास्तीत जास्त लोकांनी ही व्यसने जास्तीत जास्त प्रमाणात केली तर जास्तीत जास्त लोकसंख्या लवकरात लवकर कमी होणार.

म्हणजे सगळीकडून देशाचा फायदाच फायदा, कसे?

त्यामुळे उगाच ह्याबाबत लोकांचे प्रबोधन करण्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही. २००० (दोन हजार) टक्के (किंवा जास्त!) कर लावावा.


Yogy
Thursday, January 25, 2007 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या बीबी वर चाललेली चर्चा पाहून गूगल AdSense नेही Smokeless Tobacco, check gas emissions वगैरे जाहिराती खाली दिल्या आहेत. :-)

Zakki
Thursday, January 25, 2007 - 4:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे कुणि Thank for not smoking हा सिनेमा पाहिला आहे का?

Asami
Thursday, January 25, 2007 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पाहिलाय. बहुधा त्याचेच inspiration दिसतेय इथे :-) आणी त्त्याचे नाव Thank You for Smoking आहे

Mbhure
Thursday, January 25, 2007 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकी दिग्गज असताना, मला ईथे वादात अजिबात भाग घ्यायचा नाही आहे. मी अप्पल्पोटा असलो तरी एखाद्यावर येणारे (पुढील आयुष्यात) अरीष्ट थांबतवता येत असेल तर प्रयत्न करू पहातो. हे एक उदा. आहेः
http://cbccusa.com/CigSmoke1.htm . स्वतः युवराज हे कॉम्प्युटर जाणकार आहेत. त्यांनी अश्या साईट अवश्य पाहिल्या असतीलच. ह्यातुन काही उपयोगी असल्यास ते आत्मसात करावे. मी अज्ञानी काय बोलणार?

एक मुर्ख प्रस्नः Benefit of Smoking असा वेबवर शोध घेतला पण काही आढळले नाही. तसे कुठे काही आहे का? म्हणजे सिगारेटी ओढायला सुरुवात करता येईल.

Vinaydesai
Thursday, January 25, 2007 - 8:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भूषण, Benefits ची यादी वरती लालभाईनी दिली आहेच... :-)

Yuvrajshekhar
Thursday, January 25, 2007 - 10:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनयभाई तुम्हाला मी कन्फ़्युज आहे असं वाटत असेल तर असो पण तुम्हाला असं का वाटतं की passive smoking ने माणूस मरतो? बघावं तेव्हा तुम्ही दुस्-याला मारू नका,दुस-याला आत्महत्या करायला लावू नका असंच म्हणताय आणि त्यावरच माझ आक्षेप आहे.
विनय साहेब तुम्हीच म्हणता की

फक्त आमच्या समोर किंवा आम्हाला त्रास होईल अश्या ठिकाणी करू नका, म्हणजे झालं...

स्वत: विचार करा आणि सांगा असं कुठलं ठिकाण आहे जिथे तुम्हाला त्रास होणार नाही?

मी असं कधीच म्हटलं नाहीये की तुम्ही सर्वांनी स्मोकिंग सुरू करा मी किंवा स्मोकिंगचा पुरस्कार\प्रचार करा माझ्या पहिल्याच पोस्टमध्ये म्हटलं होतं की स्मोकिंग करणा-या कुठल्याही व्यक्तीवर स्मोकिंग करणं बंद कर ही जबरदस्ती करू नये ज्याने त्याने आपापल्या मर्जीने ती सोडावी आणि तेवढी मोकळीक त्याला असावी इतकंच.

स्मोकिंगचे दुष्परिणाम प्रत्येक स्मोकरला माहित असतात आणि तरीसुद्धा प्रत्येक स्मोकर आपल्या रिस्कवर स्मोकिंग करतोय मग त्याला ती गोष्ट पूर्णपणे बंद कर असे सांगणारे तुम्ही कोण? आणि त्याने ती पूर्णपणे बंद का करावी?

एकूणच काय की तुम्ही सर्व नोन्-स्मोकर्स तुमच्या दृष्टीकोनातून या सगळ्याकडे बघणार, तुम्हाला होणारा त्रास मग तो शास्त्रीय दृष्ट्या किती भयानक आहे वैगरे वैगरे आणि मी एका स्मोकरच्या दृष्टीकोनातून बघणार तुम्हाला धूराचा होणारा त्रास मी काही अंशी समजूही शकतो पण त्यावर नाईलाज आहे कारण कोणीतरी स्मोक केलं तर कोणाला तरी त्रास होणारच दोन्ही स्मोकर्स आणि नोन-स्मोकर्स यापैकी कुणालाही त्रास होणार नाही अशी आयडीयल परिस्थिती शक्य नाहीये. स्मोकिंग पूर्णपणे बंद करणे हा उपाय\विचार मला अजिबात पटत नाहीये आणि तशी जबरदस्ती करणे मुळीच नाही.

'व्यर्थ सारे सिद्ध झाले बोललो जे जे तुझ्याशी
शेवटी इतकेच कळले मीच समजूतदार नाही'



Saurabh
Thursday, January 25, 2007 - 10:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युवराजशेखर, तुमच्या पासुन १५ फ़ुटांच्या परिसरात कोणताही (नॉन स्मोकर)माणुस नाही ह्याची खात्री करून कुठल्याही ठिकाणी स्मोकींग करा. आणि खात्री नसेल तर आधी 'फुंकू का?' असं विचारण्याची तसदी घ्या आणि उत्तर नाही आल्यास 'त्या' ठिकाणी 'त्या' वेळी न फ़ुंकण्याची तयारी ठेवा.
howz that for an answer?


Fulpakhru
Thursday, January 25, 2007 - 10:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Yuvraj no one is asking you to quit smoking here. Again it is everyone's personal choice.
But it is your responsibility to try your level best that your smoking wont hurt anyone else. That could be your family, or any one walking on the road.

You are saying it is not possible but you never said you will try....
and at the same time you are saying you smoke outside so that your family wont be the victim of passiv smoking.
But remember one thing when you smoke outside someone else's family becomes victim of your passive smoking.

I hope you get my point.
and if you still dont then we have no words to make you understand our point.

and no one can really quit smoking unless and until he/she really want to quit.
your wife/husband/parents can request you, ocasionaly threaten or blackmail you to do so but the imp thing is you should have tremendous control on you to quit smoking or any other bad habit



Marhatmoli
Friday, January 26, 2007 - 1:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Yuvrajshekhar ,

Vinaydesai अतिशयोक्ति करतायत अस please म्हणु नका, passive smoking खरोखर एखद्यच्या जिवावर बेतु शकत. एक उदाहरण म्हणुन अशि कल्पना करा की, Mr. X यांच्या genetic make-up मध्ये काहि oncogenes (cancer provoking genes) आहेत. हे genes काहि विशिष्ट व्यक्तिंमध्येच का असतात activate होतात याचि कार्णे (मझ्या माहिति प्रमाणे) अजुन पुरेशि स्पष्ट नाहित. तर आपल्या Mr. X मध्ये हि oncogenes Carbon Monoxide plus nicotine या combination ला एक्ष्पोसे झाल्यामुळे activate होतिल परिणामि त्याना lung Cancer होणार, या रोगावर आजच्या तारखेला कुठलाहि उपाय नाहि सो १.५-२ वर्षात त्यांचा म्रुत्यु निश्चित आहे. आता मला अस सांगा कि तुमच्या व्यसनापायि त्या व्यक्तिने आपला जीव काय म्हणुन गमवावा?

शिवाय अशि कल्पना करा कि तुमच्या सारखा attitude प्रत्येक smoker ने ठेवला तर त्याचे दुश्परिणाम तुमच्या कुटुम्बियांनाहि भोगावे लागतिल ते तुम्हाला चालणार आहेत का?


Yogy
Friday, January 26, 2007 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या पाटीविषयी युवराजांचे काय मत आहे?



Prajaktad
Friday, January 26, 2007 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कारण कोणीतरी स्मोक केलं तर कोणाला तरी त्रास होणारच दोन्ही स्मोकर्स आणि नोन-स्मोकर्स यापैकी कुणालाही त्रास होणार नाही अशी आयडीयल परिस्थिती शक्य नाहीये. >>>अरे वा ! कळतय पण वळत नाही अशी परिस्थीती आहे तर...
स्वत: विचार करा आणि सांगा असं कुठलं ठिकाण आहे जिथे तुम्हाला त्रास होणार नाही?
घ्या ! तो विचार सुद्धा तुमच्यासाठी इतरांनी करायचा का? smoke तुम्ही करताय आम्ही नाही.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators