Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 24, 2007

Hitguj » Views and Comments » General » Smoking » Archive through January 24, 2007 « Previous Next »

Yuvrajshekhar
Tuesday, January 23, 2007 - 9:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो अनुपमाबाई तुम्हीसुद्धा लहान मुलासारखं एकच रडगाणं लावलंय आता बाहेर स्मोक करताना कुणाच्यातरी नाकातोंडात धूर जाणारच आता वा-याची दिशा काय आम्ही ठरवणार का?हवेत सोडलेला धूर वा-याबरोबर वाहून कुणाच्यातरी नाका-तोंडात जाणारच
आम्ही काय मुद्दामहून तुमच्या(नॉन स्मोकर्सच्या)तोंडावर धूर सोडतो का?

आणि दुस-यांच्या रिस्पेक्टचा स्मोकिंगशी काही एक संबंध नाहीये इतर लोकांना चांगलं वाटतं किंवा वाईट वाटतं म्हणून कुणीही कुठली गोष्ट करत नाही आणि मी तरी कुणाचा रिस्पेक्ट करण्यासाठी सिगारेट सोडू शकत नाही त्याच्याबद्दल आदर मनात असणे माझ्यासाठी पुरेसे आहे,

मुळात तुम्हाला सिगारेटच्या धूराचा त्रास होतो तर तुम्ही त्या स्मोकर्सपासून दूर का जात नाही?
पण तिकडे आड येतो तुमचा हेकडीपणा इतर गोष्टी सहन करता पण नको तिथे वाद घालता तुमच्या एकूणच मतांवरून असंच जाणवतंय की तुम्हाला सिगारेटच्या धूराच्या त्रासापेक्षा फुंकणा-यांबद्दल जास्त चीड आहे.
आणि ज्या अर्थी मी विचारलेल्या प्रश्नाचं तुमच्याकडे नेमकं उत्तर नाहीये त्या अर्थी तुम्ही उगाचच चीडचीड करताय.
आता स्मोकिंग म्हटल्यावर थोडा त्रास हा होणारंच दोन पाऊलं तुम्ही चाला दोन पाऊलं आम्ही चालतो,घरात स्मोक करणा-या व्यक्तीला घराबाहेर स्मोक करायला सांगा जेणेकरून घरात कुणालाही त्रास होणार नाही,तोंडासमोर धूर सोडणा-याला वरती हवेत धूर सोडायची रिक्वेस्ट करा,कुणी जळते फिल्टर टाकत असेल तर त्याला ते विझवायला सांगा याप्रकारे तुम्हाला होणारा त्रास ब-याच प्रमाणात कमी होऊ शकतो
पण जर तुम्ही असा अट्टहास ठेवलात की तुमच्यासमोर कुणी स्मोक करू नये तर मग नाईलाज आहे.

आणि विनय देसाई साहेब हजारो निष्कर्ष हेही सांगतात की तेलकट तूपकट खाल्ल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढते व ज्यामुळे हृदय विकार होतात पण तरीही लोकं बाहेरच्या गाड्यांवरचे तेलकट पदार्थ खातातंच ना ती तुमच्या दृष्टीने आत्महत्या नव्हे काय? मग काय उद्यापासून तेल,तूपाचे पदार्थ खाणंही बंद करायचं का?


Vinaydesai
Tuesday, January 23, 2007 - 10:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी केलं आहे... तुम्ही करत असाल तर चांगलंच आहे.... :-)

बाकी तेलकट खाण्याने स्वतः चा जीव जातो, फुंकण्याने दुसर्‍याचा पण.. तो जाऊ देऊ नका, असं म्हणतोय मी...
(आत्महत्या स्वतःची करायला माझी हरकत नाही हो, पण दुसर्‍याची करू नका.., त्याला करायची असेल तर तो करेल पण स्वतःच्या मताने)

भजी वडे खाणारा माणूस, जास्तीत जास्त शेजार्‍याला 'वडा' फेकून मारू शकेल, पण त्यामुळे त्याचे कोलेस्टेरॉल वाढणार नाही हो..

वरची समर्थांची गोष्ट वाचलीच असेल सगळ्यांनी. त्याचा शेवट बदलायला हवा. समर्थानी त्या माणसाला समजावल्यावर तो म्हणतो, 'मी संसाराबद्दल बोलतोय, आणि तुम्ही खांबाची कसली उदाहरणं कसली देताय?...'

:-)

Kedarjoshi
Tuesday, January 23, 2007 - 10:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तोंडासमोर धूर सोडणा-याला वरती हवेत धूर सोडायची रिक्वेस्ट करा,कुणी जळते फिल्टर टाकत असेल तर त्याला ते विझवायला सांगा याप्रकारे तुम्हाला होणारा त्रास ब-याच प्रमाणात कमी होऊ शकतो>>>>
अरेच्चा. दुसर्यांना आम्ही का सांगावे की तुमचा धुर ईकडे सोडा किंवा चिमनी तिकडे क्रा वा जळके थोटुक विझावा म्हणून.

युवराज तुम्ही प्या की राव तुम्हाला कोण थांबवनार पण तुम्ही जे म्हणताय मी पिनार व तुम्हाला त्रास होतोय त्याचा माझा काय संबध, तो तुम्ही सहन करा.
ईथे गाडी आडवी येतीय.


Adi787
Wednesday, January 24, 2007 - 12:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message





Anupama
Wednesday, January 24, 2007 - 2:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युवराजशेखर, मला जे मुद्दे मांडायचे होते ते चिडचिड न करता मी मांडले आहेत, तुम्हाला ते समजले नाहीत म्हणुन ते रडगाणे होत नाही. एकंदर तुमच्या पोस्ट्स वरुन लक्षात येते कि ज्या issue बद्दल बोलले जात आहे त्याचे गांभीर्य समजावुन घेण्यापेक्षा त्याला फ़ाटे फ़ोडण्यात तुम्हाला जास्त स्वारस्य आहे. असो.
तुम्हाला 'हेकड' वैगरे म्हणुन personal वाद घालण्यान मला स्वारस्य नाही. बाकी तुम्ही विचारले होते ना कि तुम्ही smoking कुठे करावे?त्यासाठी विनय यांनी दिलेले ऊत्तर मला अगदी पटले, ते परत वाचायचे तर वाचा.
बाकी जर तुम्हाल passive smoking चे होणारे फ़ायदे माहिती असतील तरच माझ्याबरोबर वाद पुढे न्या otherwise तुमच्याशी वाद घालण्यात मला रस नाही.



Zakki
Wednesday, January 24, 2007 - 2:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युवराजशेखर, अमेरिकेमधे खरोखरच कायदे आहेत की smoking फक्त ठराविक ठिकाणी करायचे. त्या साठी स्मोकिंग करणार्‍यांनी कुठे तरी दुसरीकडे जायचे. त्यांना त्यात त्रास होत असेल तर Tough Luck .

याचे कारण अमेरिकेतील बहुमताला एकदाचे passive स्मोकिंग चे तोटे समजले, नि त्यांनी कायदा केला.

तेलकट गोष्टींबद्दल म्हणाल तर New York City त Trans fat पदार्थात न वापरण्याचा कायदा येऊ घातला आहे. McDonalds इ. वर दबाव आणला जात आहे की त्यांनी प्रकृतिला अपायकारक पदार्थ वापरू नये.

आता भारतातहि कदाचित् कायदा येईल की स्मोकिंग फक्त सर्वसाधारण लोकांपासून दूर जाऊन करावे. पण तसे भारतात अनेक कायदे आहेत म्हणा, वाहतुकीबद्दलचे वगैरे. भारतातले पोलीस 'समजूतदार' आहेत, नि लोकांजवळहि क्षणिक तलफेसाठी पन्नास एक रुपये फेकण्याइतके पैसे आहेत. त्यांना फक्त 'मला वाटेल ते मी करणार' असे म्हणता आले म्हणजे झाले! मग 'तुसि ग्रेट हो'!


इथे एक भारतीय विमानातून उतरले नि त्यांनी सिगारेट पेटवली, लगेच पोलीस आला नि म्हणाला सिगारेट प्यायला बंदी आहे. माझ्या भारतीय मित्राने म्हंटले तू त्याला एक पाच डॉलरची नोट का नाही देत?!
एक तर पाच दहा डॉलरसाठी इमान सोडणारा तो पोलीस नसतो, त्यामुळे उलट मलाच पोलीसला लाच द्यायचा प्रयत्न केला म्हणून तुरुंगात जावे लागले असते! शिवाय एका सिगारेट साठी पाच, दहा डॉलर?! का तर आम्हाला इथ्थेच सिगारेट ओढायची आहे! हे काय कळत नाही!


Ajjuka
Wednesday, January 24, 2007 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

|एक तर पाच दहा डॉलरसाठी इमान सोडणारा तो पोलीस नसतो, |

हा एक वेगळाच चर्चेचा विषय होईल. म्हणजे तुमचे म्हणणे खोटे असे नाही म्हणत मी पण 'फालतू रकमेसाठी इमान सोडणे' इत्यादी.. असो..

काय आहे की इथले सगळे राजपुत्र अमेरीकेत गेले की सुतासारखे सरळ येऊन कायदे बियदे पाळू लागतात.. इथे मात्र मला आनंद मिळतो.. दुसरा मेला तर मेला.. माझं कोण काही वाकडं करू शकत नाही.. असा attitude..


Zakki
Wednesday, January 24, 2007 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कदाचित् इमान हा शब्द चुकीचा वापरल्या गेला माझ्याकडून. म्हणजे काय, लाच खाल्ली नि ते पकडल्या गेले तर जबरदस्त शिक्षा होते इथे. म्हणून लाच फक्त ओळखीच्या लोकांकडून नि शिक्षेच्या मानाने तेव्हढा चान्स घ्यावा की नाही याचा विचार करून इथे लाच घेतली जाते.

त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन, सिगारेट पिणे इ. लहान सहान गोष्टीत लाच घेणे फायदेशीर होत नाही इथे. त्यातून 'समजूतदारपणा' नसतोच इथे! भारतातले पोलीस त्या मानाने दयाळू, हुषार असल्याने, लोकांचा जास्त वेळ न खाता, काही 'मार्ग' काढतात. ' win, win solution. '


Marhatmoli
Wednesday, January 24, 2007 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

yuvrajshekhar ,

मुळात passive smoking हा काहि फ़क्त इतरांना होणारा inconvinience नाहि तर त्याचा आरोग्यावरहि दुष्परिणाम होतो. त्यामुळे public placeses मध्ये कुणलाहि smoking करु नका असे म्हणण हा non-smokers चा हक्क आहे.

शिवाय कायदा असो अथवा नसो पण सार्वजनिक ठिकाणि दुसर्यांच्या inconvinience च भान ठेवण हे एक सुसंस्क्रुत नागरिक म्हणुन प्रत्येकाचे कर्तव्य नाहि का?


Mansmi18
Wednesday, January 24, 2007 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Yuvrakshekhar,

Let me tell you one thing. Humans are normally selfish people, I am one of them so if I tell you to stop smoking it is not because I am concerned about you it is because I am concerned about how it affects ME!!!!!!!

Koni kay khave, pyave, funkave ha jyacha tyacha personal prashna aahe. Pan jevha tyacha dusryala tras hoto tevha to personal rahat nahi. Mala gane eikayala avadate mhanun mee jorjorat mothyane speakervar gani lavali ani dusryanna tras dila tar to personal prashna rahat nahi.

ani yasathi konatahi kayada karanyachi garaj nahi jar loka thodi manusakine vagali tar.

Dhanyavad

Chafa
Wednesday, January 24, 2007 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशा काही बाबतीत भारत खरोखरच अनेक योजने मागे राहिलेला आहे. :-(

जिथे 'आपल्या smoking मुळे इतरांना त्रास होऊ शकतो' ही कल्पनाही लोकांना पटत नाही तिथे ती राबवली जाणे हे स्वप्नच म्हणायचे! इथे अनेक कंपन्या त्यांचा कँपस "smoke free" declare करतात. आमच्या कंपनीत आधी designated जागा होत्या smokers साठी. बाहेर जरी उणे २० तापमान असले तरी सर्व स्मोकर्सना त्या थंडीत उभे राहूनच smoking करता यायचे. एवढे काटेकोर नियम असूनही रस्त्याने, दरवाज्याने येणार्‍या जाणार्‍या लोकांनी अनेक तक्रारी केल्यावर, संपूर्ण आवार ( campus ) आता smoke free जाहीर केले आहे. म्हणजे धूम्रपान पूर्ण वर्ज्य, कुठेही, कधीही, कोणासाठीही. ते करणार्‍यांची सवय सुटावी म्हणून अनेक courses offer केले गेले. एवढेच नव्हे, तर पुढच्या काही महिन्यात, धूम्रपान न करणार्‍यांना आरोग्य विम्याच्या हप्त्यांमधे ( health insurance premiums ) भरघोस सूटही ( as against those who smoke! ) लागू होईल.

तेव्हा कोणीही येथे या युवराजशेखरांबरोबर वाद घालण्यात अर्थ नाही. मनस्मी, शेवटी झोपलेल्याचे सोंग घेतलेल्याला गोड बोलून जागे करता येत नाही, तिथे कायद्याचाच धबडगा हवा. :-)


Saurabh
Wednesday, January 24, 2007 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


US (Massachusettes) मधील कोणत्यातरी कंपनीने मध्यंतरी स्मोक करणार्‍या (कंपनीत नव्हे, बाहेर) कर्मचार्‍याला नोकरीवरून काढून टाकले. त्या कर्मचार्‍याने त्याविरोधात केस केली असता ते डिस्क्रिमिनेशन किंवा प्रायव्हसीचा भंग नसुन, अरोग्यविषयक सुविधांवर होणारा कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी घेतलेला निर्णय आणि कंपनीचा तो हक्क असल्याचा निकाल देण्यात आला होता (चु. भु. दे. घे.).

चांगलाच जालीम उपाय आहे.


Yuvrajshekhar
Wednesday, January 24, 2007 - 10:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे आपण आपल्या देशाबद्दल बोलतोय अमेरिका आणि इतर देशात काय चालतं आणि काय कायदे आहेत त्याची चर्चा इथे कशाला?
दरवेळी आपण इतर देशांपेक्षा मागे कसे याबद्दलच बोलत रहाणार का? पण आपल्या देशात आपल्या पद्धतीने काय करता येईल याबद्दल कधी बोलणार?
जरा काही झालं की राजकारण्यांच्या नावावर बोंब मारायला तुम्ही तयार
पण तुमचा त्यातला सहभाग फ़क्त मत देण्यापुरताच का? सिस्टममध्ये चेंज हवे आहेत पण त्यात हात घालण्याची जबाबदारी तुमची नाही काय? हे बदलायला हवं ते बदलायला हवं याच्या फ़क्त बाताच मारणार का?

अमेरिकेत बसून एक पोस्ट लिहायला तुमचं काय बिघडतं पण इकडे काय परिस्थिती आहे हे कोण जाणून घेणार? असतील अमेरिकेत किंवा इतर देशांत वेगळे स्मोकिंग झोन म्हणून ते मुंबईत पण झाले पाहिजेत का? इथे लोकांना रहायला जागा नाहीये,कधीतरी पिक अवर्समध्ये दादर स्टेशन किंवा अंधेरी स्टेशन बाहेरून चालून बघा मग कळेल इथे काय अवस्था आहे.

अनुपमाबाई विनय देसईंनी सांगितलेले उत्तर तुम्हाला पटले असेल तर सॉरी, ते प्रॅक्टिकल उत्तर नाहीये.तुम्हाला चर्चा नसेल करायची तर नका करू.आणि अशीच उत्तरे देणार असाल तर खरंच करू नका.

सार्वजनिक ठिकाणी स्मोक करू नये म्हणजे घर सोडून कुठेच स्मोक करू नये कारण रस्ते,कॉलेज,बाजार सर्व ठिकाणेही सार्वजनिकच आहेत मग अशावेळी रश्मीजी एखाद्याने स्मोक करायचं कुठे? तुम्हाला घरात स्मोक केलं तरी प्रॉब्लेम.

मनोज भाऊ मी पण तेच तर म्हणतोय थोडं माणूसकीने घ्या की जसा आमच्या स्मोकिंगचा तुम्हाला त्रास होतो तसं स्मोकिंग पूर्णपणे बंद करणे आम्हाला शक्य नाही.शेवटी दोन्ही बाजूने थोडी एडजस्टमेंट करायला नको का?

महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळे ही गोष्ट नाकारू शकत नाही की भारतात आज तरूण पिढीत स्मोक करण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे आणि ते वाढत चाललंय आणि सर्वात महत्त्वाचा मुद्द हा आहे की आजही कुठला मुलगा वा मुलगी मी सिगरेट पितो\पिते या गोष्टी विश्वासाने आपल्या आई-बाबांना का सांगत नाही? आई-बाबा त्यांना यावेळी का जवळचे अथवा समजून घेणारे वाटत नाहीत?हे मुद्दे जास्त लक्षात घेण्यासारखे आहेत.

सूचना: अमेरिकेत अथवा इतर देशात राहाणा-या मेंबर्सनी कृपया तिकडच्या गोष्टींबद्दल न बोलता भारतात काय करता येईल, काय करायला पहिजे त्याबद्दल इथली परिस्थिती आणि अर्थ व्यवस्था,समाज व्यवस्था ईत्यादी गोष्टी लक्षात घेऊन बोलावे.


Zakki
Wednesday, January 24, 2007 - 10:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतात प्रयत्न करून स्मोकिंग बंद करता येईल! काही बिघडत नाही स्मोकिंग न केल्याने, उलट चांगलेच होते, आपले नि बाकीच्यांचे.

माणूसकी आहे म्हणूनच केवळ ओढू नका म्हणतो आहे. निकोरेट सारखे, किंवा पॅचेस सारखे उपाय शोधून काढावे, किंवा अमेरिकेतून मागवून घ्यावेत.

अर्थात ते अमेरिकेतून ते घेणे बहुधा जमणार नाही, कारण अमेरिकेतला मायकेल जॅकसन, मॅक्डोनाल्ड, दारू, इ. चालते. त्याने इष्टाईल मारायला उपयोग होतो. तेंव्हा ते सोडा. चांगल्या गोष्टी चालत नाहीत.

किंवा सिगारेट पेटवली रे पेटवली की, कुणि एक दोन दणकट गड्यांनी एक दणदणित कानफटीत मारली, की सिगारेट फुकणे बंद होईल आपोआप. हे करता येईल भारतात! अमेरिकेतल्या सारखा कायदा नाही केला तरी.




Yuvrajshekhar
Wednesday, January 24, 2007 - 10:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय देसाई साहेब passive smoking ने माणूस लवकरात लवकर मरतो किंवा माणसाला जास्तीत जास्त त्रास हा passive smoking ने होतो असं चित्र तुम्ही उभं करताय आणि ते फारच हास्यास्पद आहे असं असेल तर तुम्ही वाहनांचा पण धूर सहन नाही केला पाहिजे,तुम्ही स्वत: driving बंद केली पाहिजे कारण त्यामुळे तुम्ही दुस-याला आत्महत्या करायला भाग पाडत आहात.

म-हाटमोळी उर्फ़ रश्मीच्या भाषेत सांगायचं तर सार्वजनिक ठिकाणी
driving करू नका कारण दुस-याच्या inconvinience चं भान असणं सुसंस्कृत नागरिकाचं कर्तव्य आहे.

आणि मनस्मी उर्फ़ मनोजच्या भाषेत सांगायचं तर


Humans are normally selfish people, I am one of them so if I tell you to stop driving it is not because I am concerned about you it is because I am concerned about how it affects us, the people walking on footpath!!!!!!!

आणि तुमच्याच भाषेत म्हणायचं तर कुठेही जा पण आम्हाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी जाऊन ड्राईव्ह करा.

ही अशी मतं
drivingबाबत पटतील का?

तर विनय साहेब तात्पर्य इतकंच की प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो सगळ्या गोष्टी एकच माप लावून बघता येत नाहीत.

अपेक्षा आहे तुम्हाला पटलं असेल


Zakki
Wednesday, January 24, 2007 - 11:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला एव्हढे तर्कशास्त्र समजत नाही. वाहनांचे प्रदूषण हा वेगळा विषय आहे, सिगारेट पिणे हे वेगळे. तुम्ही चर्चेला फाटे फोडण्यापेक्षा, मी जे लिहीले ते शक्य आहे का ते बघा. नाही पटले तर इस्पितळात जाऊन एन्फिसिमाचे पेशंट पहा, तरी स्मोकिंग करावेसे वाटले तर करा. देव करो नि तुम्हाला मी म्हंटले तसे एक दोन दणकट गडी भेटोत नि तुमचे कल्याण होवो, नि तुमच्याबरोबर बाकीच्यांचेहि!

Saurabh
Thursday, January 25, 2007 - 1:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


भारतात १०० प्रोब्लेम्स आहेत म्हणून १०१वा असला तर काय बिघडले हे तर्कदुष्ट आहे.

वाहन प्रदुषण आणि धुम्रपान ह्यांची तुलनाही तर्कदुष्टच आहे. वैयक्तीक आनंद आणि सर्वसाधारण जीवनावश्यक गरज अशी ती तफावत आहे.

त्याउपर सांगायचे तर वाहनांच्या एमिशनवर हळु हळु आणि कडक अशा स्वरुपाचे निर्बंध घातले जात आहेत. समस्त वाहन उद्योग वर्षाला कित्येक कोटी रुपये (डॉलर्स म्हणत नाही) हे एमिशन कमी घातक आणि प्रमाणने (वॉल्युम) कमी करण्याच्या उपायांवर खर्च करत आहे. त्यांनी ते तसे करावे म्हाणुन सरकारकडुन वेगवेगळे ईन्सेंटीव्हस दिले जात आहेत.

ह्याला समांतर एकतरी पाऊल धुम्रपान विषयक उत्पादकांनी घेतले आहे का? असल्यास कृपया माहिती द्यावी. विनयने म्हटल्याप्रमाणे phillip morris गेल्या काही वर्षांपासून सामाजिक संदेशांवर पैसा खर्च करु लागली आहे. बस!

तुलना करताना कशाची करतोय हे ध्यानात ठेवले पाहिजे. उगाच दिसला धूर मार बोंब असं नको.

>>> इथली परिस्थिती आणि अर्थ व्यवस्था,समाज व्यवस्था ईत्यादी गोष्टी लक्षात घेऊन तोंडचा धूर सोडावा?


Marhatmoli
Thursday, January 25, 2007 - 1:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

yuvrajshekhar ,

भारतात वाहनांच्या धुराने प्रदुशण होवु नये म्हणुन प्रत्येक वाहनधारकाला PUC Certificate एका ठराविक काळानंतर घेणे हे कायद्याने बंधन्कारक आहे ना? त्यामुळे अस म्हणता येइल कि भारतात वाहने चालवायला बंदि नसलि तरि इतरांना त्रास होइल (धुराचा) अश्या पध्दतिने चालवायला आहेच कि.

जोपर्यन्त अशि काहि सुविधा (म्हणजे carbon monoxide and nicotine बाहेर जाण्याआधिच filter करण्याचि ) सिगरेट च्या बाबतित उपलब्ध होत नाहि तो पर्यंत सार्वजनिक ठिकाणि जर कोणि तुम्हाला धुराच्या त्रासामुळे ओढु नका असे सांगितले तर त्यांच्या विनंतिला मान देणे तुम्हाला क्रमप्राप्त आहे.

आता तुम्हि म्हणताय कि घरात आणि सार्वजनिक ठिकाणि नाहि तर ओढायचि कुठे मला वाटत याच उत्तर तुम्हिच शोधायला हव कारण व्यसन तुम्हाला आहे passive smokers ना नाहि.


Anupama
Thursday, January 25, 2007 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहज आठवले म्हणुन, Oprah वर Dr.Oz यांचा health related episode झाला होता त्यामध्ये healthy lung आणि smoker's lung दाखवली होती त्याची लिन्क
http://www2.oprah.com/health/yourbody/slide/slide_yourbody_inside_06.jhtml
BTW ही लिन्क मी स्मोकिंग किती वाईट,स्मोकिंग सोडा वगैरे सांगण्यासाठी देत नाहिये, तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्ण आहे. वरती सांगितल्याप्रमाणे सहज आठवले म्हणून, कोणाला उपयोग झाला तर आनंदच आहे.

Anupama
Thursday, January 25, 2007 - 4:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्ण किंवा आनंद जेव्हा दुसर्‍यावर बळजबरीने लादला जातो..
http://www.who.int/tobacco/en/atlas10.pdf

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators