Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 24, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » General » Archive through January 24, 2007 « Previous Next »

Laalbhai
Thursday, January 18, 2007 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला,

जास्त उदाहरणे देत नाही पण काही आठवड्यांपूर्वीच सरसंघचालक सुदर्शन यांनी "मुस्लिम, ख्रिश्चन आणि पाश्चात्यांपासून हिंदू धर्माला धोका" असे जाहीर विधान केले होते. त्याचा अर्थ काय होतो, हे मी सांगण्याची गरज नाही. :-)


Shree_tirthe
Thursday, January 18, 2007 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्वी लिहिलेली एक चारोळी

माझा भगवा, माझा निळा माझा हिरवा
असं म्हणता-म्हणता सारा हिंदुस्तान जळत आहे
राजकीयांनी लावलेली आग
दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे.


Chyayla
Thursday, January 18, 2007 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जिहादी चष्म्यातुन पहाण्याचा प्रयत्न...

माझ हे वाक्य सोयिस्कर विसरलात. जिहादी साठी धर्म हा एक ठरावीक पुस्तकाला प्रेशिताला मानणारा असहिष्णु सम्प्रदाय आहे, तर हिन्दु धर्म म्हणजे एक जीवन मार्ग हा मुलभुत फ़रक आहे. त्यामुळे तुम्ही जो यातुन अर्थ काढताहात तो चुकिचा आहे. नाहीतर ओरडायला तयार बघा कसे भीती निर्माण करत आहेत.

झक्कीनी जी अरब महिलेची लिन्क दिली होती त्यात तिनी खरच एक चान्गला मुद्दा मान्डला. ज्यु सुद्धा Holocaust मधुन आलेत पण ते केवळ मुस्लिमानप्रमाणे रडत बसले नाहीत की बॉम्बस्फ़ोट करत बसले नाहीत, किन्वा निरपराधाना मारण्यासाठी मानवी बॉम्ब ही बनले नाहीत तर स्वताच्या कर्तुत्वाने, एकत्र येवुन स्वताच्या सामर्थ्याचा परिचय दिला. आज खरच लेबनान वर हला करुन त्याना चान्गली जरब बसवली आज ते इस्रायल विरुद्ध कागाळी करायाला १०दा विचार करतील.

आणी हे काही खोट नाही की जिहादी, मिशनरी यान्पासुन समस्त हिन्दुना धोका आहे शिवाय मानवतेला धोका आहे. आज हिन्दु खतरेमे है म्हणुन कोणी मुस्लिमानविरुद्ध बॉम्बस्फ़ोट, मानवी बॉम्ब, निरपराधान्ची हत्या, गोळीबार, अपहरणे वैगेरे करत नाही किन्वा ते अपेक्षितही नाही. फ़क्त हा धोका ओळखुन एकत्र येणे हे महत्वाचे. आणी हे सगळ समाजातुनच उभ राहाव ही अपेक्षा.

श्री तिर्थे तुमच्या चिन्तेशी सहमत पण मला सान्गा हे राजकारणी निवडुन आणणारी जनताच ना मग नुसते राजकारण्याना दोश देवुन आपण आपल्या जबाबदारीतुन मुक्त होउ शकतो का?


Chyayla
Thursday, January 18, 2007 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार भावे, या लिन्क बद्दल धन्यवाद... ए. पि. जे. अब्दुल कलाम सारखेही आज राष्ट्रपती आहेत हे केवढे भाग्य म्हणायचे भारताचे. खरच मला या व्यक्ति बद्दल खुप आदर आहे व आशा आहे. त्यानीच व त्यान्च्या सारख्या वैज्ञानिक व ईतर राष्ट्रवादी विचारसरणीच्या लोकानपासुनच भारताला काही तरी आशा आहे. नाहीतर आहेच मनमोहन, सोनिया या सेक्युलर देशात काही विशिष्ट समाज मुस्लिम होते म्हणुन त्यान्चा विकास झाला नाही म्हणुन रडणारे.

Santu
Friday, January 19, 2007 - 4:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एपीजे कलाम यांच्या सारखे
राष्ट्र्पती हे आपले भाग्य)))))च्यायला कलाम हे चांगले माणुस आहेत
यात काय शंका नाहि.पण त्यापेक्षा कौतुकास्पद आहेत ते बहुसंख्याक
हिन्दु लोक की ज्यानी एक मुस्लिम राष्ट्र्पती हसतमुखाने
स्विकारला.व मनोमन स्विकारला. हिच तर आपली सनातन संस्क्रुति आहे. हिन्दु ना "धर्म्निरपेक्षता"शिकवायची गरज नाहि ति त्यांच्या हाडात्च आहे.
दुसरया मुस्लिम बहुल राष्ट्रात हि गोष्ट कधि स्वप्नात पण
झालि नसति
.

चला सुप्रिम कोर्टाने पण हज सबसिडि बद्दल सरकारला
नोटिस पाठवलि आहे.
संबंधित लिन्क.
http://www.rediff.com/news/2007/jan/18haj.htm

Laalbhai
Monday, January 22, 2007 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्यु सुद्धा Holocaust मधुन आलेत पण ते केवळ मुस्लिमानप्रमाणे रडत बसले नाहीत की बॉम्बस्फ़ोट करत बसले नाहीत, किन्वा निरपराधाना मारण्यासाठी मानवी बॉम्ब ही बनले नाहीत तर स्वताच्या कर्तुत्वाने, एकत्र येवुन स्वताच्या सामर्थ्याचा परिचय दिला. आज खरच लेबनान वर हला करुन त्याना चान्गली जरब बसवली आज ते इस्रायल विरुद्ध कागाळी करायाला १०दा विचार करतील.

>>>

खरे म्हणजे आता दिशाभूल कोण करते आहे, असाच प्रश्न विचारावा लागेल. इस्राईलचा इतिहास, सद्यस्थिती याची आपणास काहीच कल्पना नसावी, ह्यावर विश्वास बसत नाही. तरीही इस्राईलला त्याच्या तथाकथित सामर्थ्यासाठी ताम्रपट देऊन आपण मोकळे झालात! आता काय बोलायचे?

(इस्राईलच्या शेतीविषयक प्रगतीबद्दल मला अत्यंत आदर आहे.)


आज हिन्दु खतरेमे है म्हणुन कोणी मुस्लिमानविरुद्ध बॉम्बस्फ़ोट, मानवी बॉम्ब, निरपराधान्ची हत्या, गोळीबार, अपहरणे वैगेरे करत नाही किन्वा ते अपेक्षितही नाही. फ़क्त हा धोका ओळखुन एकत्र येणे हे महत्वाचे. आणी हे सगळ समाजातुनच उभ राहाव ही अपेक्षा.

>>>

तुम्हाला असे वाटत नाही का की retaliation म्हणून हिंदू समाजातून "असे काही" होत नाही, ही चांगलीच गोष्ट आहे? (म्हणजे, "असे काही" होत नाही, हे पूर्णतः खरे नाहीच. "हिंदू जिहादाला" support करणारा वर्ग अतिशयच छोटा आहे, हे देशाचे एकप्रकारे नशिबच! आता मायबोलीवरच पाहिले तर काही जिहादी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी रक्तलांछित फोटो पोस्ट करून मुस्लिम समाजाबद्दल भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. आता फोटो टाकायला मनाई केली तर लिंका देऊन तेच उद्योग चालू आहेत. ह्याच मार्गाने आणि ह्याच प्रकारचे "एकत्रिकरण" तुम्हाला अपेक्षित आहे का?)

एकत्र येणे, हे ठिक आहे. अत्यंत वाजवी आहे. पण एकत्र येऊन काय करणे तुम्हाला अपेक्षित आहे? तसेही अनेक सार्वजनिक धार्मिक उत्सवात हिंदू एकत्र येतच असतात. मागच्याच आठवड्यात झालेल्या शाही स्नानाला उपस्थित राहिलेल्या हिंदूंची संख्या अनेक लाखात होती!

ह्यापेक्षा कशा प्रकारचे वेगळे एकत्रिकरण अपेक्षित आहे? आणि हिंदूंनी एकत्रित येऊन काय करणे अपेक्षित आहे? (तुम्ही "असे सगळे" करणे अपेक्षित नाही, हे म्हणताय, हे समजले.)


Laalbhai
Monday, January 22, 2007 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला,

दुसर्‍या एका BB वर तुम्ही लिहिलेत की कोणताही धर्म मुळात वाईट नसतो, त्याचे ठेकेदार त्या त्या धर्माच्या मूळ संहितेचा चुकीचा अर्थ (स्वतःच्या फायद्यासाठी) पसरवतात.

ह्याचा अर्थ, सध्याचा मुस्लिम जिहाद वगैरे जे काही fad आहे, ते अशा स्वार्थी लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी, अशिक्षित - बुरसटलेल्या मुस्लिमांना वेठीला धरून पसरवलेले फॅड आहे, असे होत नाही का? म्हणजे, केवळ भारताबद्दल बोलायचे तर "धार्मिक भडकावणीला" ही बुरसटलेल्या विचारांची मंडळी बळी पडतात, हे मान्य करायला तुम्हालाही काही problem नसावा. (आंतरराष्ट्रिय प्रश्नाच्या भुमिकेतून बोलायचे तर अनेक संदर्भ बदलतात!)

मग जर मुळातच ह्या प्रश्नाचे मूळ "मागास विचारासणीत" आहे, (असे तुमचेही मत आहे, हे दिसून येतेच.) तर ह्या मागास विचारसरणीवर उपाय म्हणून इतर धर्माच्या एकत्रिकरणाने काय साधणार? असा साहजिक प्रश्न मला पडतो.

म्हणजे, एका घरात खूप उंदिर झाले म्हणून दुसर्‍या घरातली लोकं काठ्या, उकळते पाणी, चादरी धरून सज्ज होऊन काय उपयोग? फार तर फार दुसर्‍या घरातून येणारा एखादा उंदीर पकडला जाईल. पण मुळातच ज्या घरात उंदिर आहेत, तिथेच औशधपाणी करणे जास्त योग्य नाही का?

म्हणूनच मागे एकदा केदार जोशी म्हणाले होते की ह्या त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, आणि तो त्यांनीच सोडवला पाहिजे. ह्यावर माझे त्यांना पूर्ण अनुमोदन आहे.

रहाता राहिला प्रश्न अंतर्गत सुरक्षेचा, तर पोलिस इत्यादी सरकरी यंत्रणा अत्यंत सक्षम रितीनी चालल्या पाहिजेत. त्या काही प्रमाणात चालतात, असेही दिसते आहे. तिथे सुधारणा आवश्यक आहेच.

तर मुद्दा असा की, हे जे तुम्ही "एकत्रिकरण" या मुद्द्यावर भर देताय, त्याचे प्रयोजन अजुनही ध्यानात येत नाही. त्यातून तुम्हाला नक्की काय साधायचे आहे, हे चित्र स्पष्ट होत नाही. म्हणून विस्ताराने विचारले.

उत्तर द्याल ही अपेक्षा.


Chyayla
Tuesday, January 23, 2007 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वार्थी लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी, अशिक्षित - बुरसटलेल्या मुस्लिमांना वेठीला धरून पसरवलेले फॅड आहे, असे होत नाही का?

नाही ना ईथेच तर चुक झाली जिहादी दहशतवादी हे चान्गले उच्चशिक्शित असुनही काही फ़रक पडत नाही ना. सेक्युलर शिरोमणी ओसामाचेच उदाहरण असल्या खोट्या तर्काला उत्तर देण्यासाठी पुरेसे आहे.

साधी गोष्ट आहे ते उन्दीर त्यान्च्या घरात राहिले असते तर ठिक आहे पण आमच्या घरात येवुन उपद्रव केला तर त्याचा बन्दोबस्त करावाच लागेल. तुमच्या विस्ताराने विचारलेल्या प्रश्नाला हे छोटेसे उत्तर पुरेसे आहे


Laalbhai
Tuesday, January 23, 2007 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा मूळ प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिलेच नाहीत की. मी "बुरसटलेले" असेही म्हणालो. वैचारिक मागासलेपण शिक्षित लोकातही असतेच! त्यामुळे सुशिक्षित लोकंही वैचारिक एकांगीपणाने बहकलेले पदोपदी आपल्याला दिसतातच. हे तुमचे अगदी बरोबर आहे.

पण माझ्या प्रश्नातला उंदराचा भाग महत्वाचा नव्हता! तर त्यानंतरचा प्रश्न, की "एकत्रिकरण" कसे असावे आणि त्या एकत्रित गटाने काय करावे - ह्याबद्दलचे तुमचे विचार स्पष्ट होत नाहीत. तुमच्याच भाषेत विचारायचे तर हा "बंदोबस्त" कशाप्रकारे व्हावा, अशी तुमची अपेक्षा आहे?

तर बाकी सगळे जाऊ द्या, आपण "एकत्रिकरण" ह्या मुद्द्यावर बोलूयात का?


Zakki
Tuesday, January 23, 2007 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण मुळातच ज्या घरात उंदिर आहेत, तिथेच औशधपाणी करणे जास्त योग्य नाही का?

बरोबर आहे. म्हणूनच इस्राएल ने वेळोवेळी शेजारी राष्ट्रांवर हल्ले केले नि अमेरिकेने अफगाणिस्तान नि इराकवर हल्ले केले.

भारतात priorities वेगळ्या आहेत. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारणे, ज्ञान विज्ञानात्त प्रगति करणे, देशातील कारभार नीट करणे, देशातील गरिबी हटवणे, अज्ञान हटवणे इ.

कदाचित् राज्यकर्त्यांच्या मते हे मुस्लिमांचे भारतावरील हल्ले, त्या मानाने, फारसे महत्वाचे नसावेत. कदाचित् मुस्लिमांचा प्रश्न केंद्रिय स्तरावर न नेता, स्थानिक लोकांकडून सुटण्यासारखा आहे असे त्यांना वाटत असेल. मला हि तसेच वाटते.

अमेरिकेत अजून तरी सगळे जण मस्त बसून खात पीत आहेत, विज्ञानात ते कुठूनहि लोक विकत आणू शकतात, नि लोक येतातहि. तेंव्हा खाऊन पिऊन माजलेला माणूस जसा निमित्त काढून मारामारी करायला उठतो, तसे झाले आहे.

इस्राएलला मात्र आजूबाजूचे लोक स्वस्थ बसू देणार नाहीत, तेंव्हा त्यांना मारामारी करणे आवश्यकच आहे.



Chyayla
Tuesday, January 23, 2007 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतात priorities वेगळ्या आहेत. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारणे, ज्ञान विज्ञानात्त प्रगति करणे, देशातील कारभार नीट करणे, देशातील गरिबी हटवणे, अज्ञान हटवणे इ.

भारतात तेच तर केल्या जात नाही ना उलट त्याना जास्त रस आहे समाजात दुही पसरवुन व्होट ब्यान्केचे राजकारण करुन सत्ता शाबुत ठेवणे आणी त्याविरुध कुणी बोलल की उलट त्यालाच साम्प्रदायिक म्हणुन लेबल लावल्या जात व दुशप्रचार केल्या जातो... झक्की तुमचे मुद्दे पटले.

थोडक्यात एकत्रिकरण म्हणजे भारतापुरता राष्ट्राला परमवैभवावर नेण्याकरता (कारण आपणच आधी समर्थ होणे आवश्यक आहे)तसेच मानवतेच्या कल्याणाकरीता हिन्दुत्वाच्या वैष्विक कुटुम्बाच्या सन्कल्पनेचा विचारान्चा प्रसार व्यक्तिन्च्या चारित्र्यातुन करणे. व तसे चरित्रनिर्माण हा उद्देश.

चाणक्य चे एक प्रसिद्ध वाक्य आहे "मुझे डर नही दुष्टोकी दुष्टतासे, मुझे डर है सज्जनोकी निश्क्रियतासे" हे एकत्रीकरण, जाग्रुत करणे म्हणजे सज्जन शक्तिला निष्क्रियतेपासुन परावृत्त करुन, सक्रिय करण्याचे प्रयत्न.

एक सत्य हेही आहे की जगात चान्गले / वाईट हे रहाणारच, ज्या प्रमाणे कुठे श्रीमन्ती आहे तर कुठे गरीबी रहाणारच पण म्हणुन त्यासाठी व्याव्हारिक जीवनात निश्क्रिय,निराश होउन कसे चालेल. चान्गले वाईट याच्या पार जायचे तर ते केवळ अध्यात्मातच, त्यामुळे हृदयात हे अध्यात्मिक सत्य बाळगुनही आपले व्यव्हारात कर्तव्य, पुरुषार्थ व ईतर कर्मे करत रहाणे हे ईष्ट.

यापुढचे तुमचे नेहमीचे प्रष्न आणी प्रश्नच मला माहिती आहे व त्यावर इतरत्रही उत्तरे दिली आहेत त्यामुळे परत तेच प्रश्न विचारायची तसदी घेउ नये... तुम्हाला नाही पटले सोडुन द्या... माझा आग्रह नाही की तुम्हाला पटायलाच पाहिजे... बाकीचे जाउ द्या म्हणुन टाळन्याची नामी युक्ति आहे. शिवाय त्यामुळे स्वता: उत्तर देण्याचे टाळल्या जाते... सहीच... माझ्यासारख्या नवोदीताना बरच काही शिकायला मिळतय... आभारी आहे


Laalbhai
Tuesday, January 23, 2007 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आग्रह नाही की तुम्हाला पटायलाच पाहिजे

>>
अहो महाराज खरोखरच विचारले होते. "एकत्रिकरण" या मुद्द्यावर आपण जिथे प्रबोधन केलेय ती लिंक तरी द्या किमान. तेवढेही पुरेसे आहे.

कुणी काही मुद्दा ठासून मांडते आणि तो नीटसा समजत नाही, तेंव्हा वारंवार "तो मुद्दा काय?" असा प्रश्न विचारला जाणे साहजिकच आहे.

आता पुन्हा तुम्ही "एकत्रिकरणाबद्दल" जे वाक्य वरती लिहिले ते मला काहीही कळले नाही!

एकत्रिकरण, व्यक्तींचे चारित्र्य, हिंदुत्वतली "वसुधैव कुटुंबकम्" संकल्पना - ह्या तिन्हींचा एकमेकांशी कसा आणि काय संबंध आहे? सध्या जे "एकत्रिकरणा" होतेय त्याचे दाखले मी दिले, ते कसे अपुरे आहे? तुम्ही कोणता नवीन उपाय सुचवता आहात, हे जाणून घेण्याची इच्छा आहे.

खरंच समजत नाहीये म्हणून विचारतोय. तुम्हाला जो अर्थ घ्यायचा तो घ्या. मी कोण अडवणारा? :-(


बाकी आजकाल "आम्ही असे - असे म्हणणार, पटले तर घ्या, नाही तर सोडून द्या. प्रतिप्रश्न विचारू नका. विरोध करू नका." असा attitude वाढतो आहे, असे दिसते. का ते कळत नाही.



Chyayla
Tuesday, January 23, 2007 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असा attitude वाढतो आहे, असे दिसते. का ते कळत नाही.

खरच याचा विचार करावा... केवळ माझ्या सोबत असे होत आहे असे नाही.

इस्लामी दहशतवादामधे या सगळ्यान्वर सविस्तर उत्तर दिले आहे... म्हणुनच मी तशी टिप्पणी केली आहे, लक्षात येइलच.


Zakki
Tuesday, January 23, 2007 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतात तेच तर केल्या जात नाही ना उलट त्याना जास्त रस आहे समाजात दुही पसरवुन व्होट ब्यान्केचे राजकारण करुन सत्ता शाबुत ठेवणे आणी त्याविरुध कुणी बोलल की उलट त्यालाच साम्प्रदायिक म्हणुन लेबल लावल्या जात व दुशप्रचार केल्या जातो..

माझी खात्री आहे, निदान थोड्याफार प्रमाणात चांगले काहीतरी घडतेच आहे, कारण भारताची प्रगति झालेली आहे, हे जगात कुणि नाकारू शकत नाही.

खंत एव्हढीच की खरे तर potential अफाट आहे पण बरेचसे वाया जात आहे, सत्ता, राजकारण, अंधश्रद्धा यामुळे.

(खंत हा फारच मिळमिळीत शब्द आहे. खरे तर भयंकर संताप येतो, डोके फिरून जाते! असल्या भडक डोक्यातून काही चांगले निघत नाही.)


Chyayla
Tuesday, January 23, 2007 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेन्व्हापासुन कम्युनिस्ट प्रभावित आर्थिक धोरण फ़ेकुन दिलीत तेन्व्हा पासुन हा बदल घडत आहे.

Laalbhai
Wednesday, January 24, 2007 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

की "स्वदेशीविरोधी" आर्थिक धोरण स्वीकारल्यापासून हे बदल घडत आहेत??? :-)

Zakki
Wednesday, January 24, 2007 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्वी भारतात स्वदेशीला संक्षण म्हणून परदेशी मालावर जबरदस्त Custom Duty आकारली जात असे. त्यामुळे भारतीयांना मालाचा दर्जा सुधारणे, उत्पादन वाढवणे, काही नवीन कल्पना असतील धंद्याबाबत तर त्या वापरून बघणे इ. करायला थोडा वेळ मिळेल असे वाटले होते. पण भारताची काही प्रगति होताना दिसेना. लोक कमी दर्जाचा माल खपवून घेत, भेसळ भरपूर इ. नि भारतात परदेशी माल घेत नाहीत, म्हणून परदेशी कं सुद्धा भारताचा माल घेत नसत.

नंतर जेंव्हा संगणकशास्त्रात भारतीयांनी प्रगति केली नि त्यांना परदेशात धंदा करायची इच्छा झाली, तेंव्हा अर्थातच् परदेशी कं म्हणाल्या, आम्हालाहि आमचा माल भारतात विकू द्या. मग एकदम भारत 'खुला' झाला, ' global ' झाला. आता कदाचित् भारत जास्त सुधारेल अशी आशा आहे. कदाचित् भारताकडे नुसते 'स्वस्त' या भावनेने न बघता, तंत्रज्ञानात पुढारलेले म्हणूनहि बघू लागतील अशी आशा आहे.


Asami
Wednesday, January 24, 2007 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भीषण

खरच आपण पुढारलेले etc आहोत का ? मान्य आहे कि अशा टोकाच्या घटना किरकोळ असतील पण देशाची average विचारद्रुष्टी खरच बदललेली आहे का ? :-(

Kedarjoshi
Wednesday, January 24, 2007 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

average विचारद्रुष्टी खरच बदललेली आहे का?

खर तर आता तिन avg काढावे लागतील.

१.श्रिमंत लोक त्यांना कशाचाही फरक पडत नाही.
२. मध्यम वर्गीय ज्यांना पोटा पुढे बाकी काहीही चालते. गरिब लोकच त्यांना नकोसे असतात. कसेही करुन एक पोरगा अमेरिकेत पाठवलाकी झाले. आणि हो रोज राजकारन्यांना शिव्या दिले की यांचे कर्त्यव संपते. (यात आपण येतो).
३.गरिब पर्यायाने खरे भारतीय. जे जगन्यासाठी काहीही करतात. यांची संख्या आता साधारन ४० टक्के आहे. बरेच लोक या क्लास मधुन मध्यमवर्गीय झाले. हुंडा देन्या पेक्षा पोरीला मारने सोपे असते. वेळ आली तर स्वत्: मेलेले परवडते पण आण्खी घास शेअर करने म्हणजे महापाप. भले मारे आप्ण अजुनही ईंडीया शायनींग म्हणत असु पण ईंडीया व भारत ह्या फार फरक आहे. वरिल उदा हे अनेकांपैकी एक.
(आता माझ्यातला मध्यमवर्गीय काय करेल. ते पानच वाचनार नाही. कारण वाचले तर उगीच मनाला त्रास होतो व खरे रुप कळते.)



Peshawa
Wednesday, January 24, 2007 - 6:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गरिब पर्यायाने खरे भारतीय>>
हे काय नवीन?

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators