Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 23, 2007

Hitguj » Views and Comments » General » Smoking » Archive through January 23, 2007 « Previous Next »

Yuvrajshekhar
Sunday, January 21, 2007 - 8:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनुपमाबाई तुम्ही दिलेल्या उदाहरणात त्या व्यक्तीने घरी स्मोक करू नये इतकंच मी म्हणेन कारण स्मोक करायला विशीष्ट जागा लागते किंवा घरीच स्मोक केलं पाहिजे हा प्रकार नसतो आणि घराबाहेर ज्या प्रकारे तुम्ही इतर प्रकारचे धूर सहन करता त्यापुढे हा धूर क्षुल्लक आहे मग तो सहन करणं इतकंही कठीण नाहिये हे मला म्हणायचं होतं.

Anupama
Sunday, January 21, 2007 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हंम... म्हणजे आपल्या सवयीचा दुसार्याला त्रास होत आहे याबद्दल काहीच सोयरसुतक नाही उलट बाकीच्या धूराबरोबर हा पण धूर सहन करा हा स्वार्थी सल्ला...माफ़ करा पण पटला नाही.
तुम्ही सज्ञान झाल्यावर ही सवय लावुन घेतली ना? मग तुमच्या पुरती ठेवा.. काहीच म्हणणे नाही, पण बाकीच्या सज्ञानी लोकांनी या पासून दूर रहायाचे ठरवले त्याचा काही respect ठेवाल का नाही? का उगाच दुसरे धूर, दुसरे धूर म्हणत
passive smoke च्या होणार्या परीणामांकडे दुर्लक्श कराल?

Chyayla
Sunday, January 21, 2007 - 11:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण स्मोकर्सचा त्रासच होतो, अरे बस मधे, ट्रेन मधे, अगदी खुप उकडत असेल तरी ही मन्डळी बीडी, सिगरेट काढुन खुशाल धुम्रपान करत असतात कुणाला त्रास होतो आहे याचा विचारच नाही. मी तर माझ्या बाजुला कोणी धुम्रपान करत असेल तर लगेच टोकतो व धुम्रपान बन्द करायला सान्गतो.

ते चेन स्मोकर्स तर आणखीन भयन्कर प्रकार आहे त्याना किती ही सान्गितल तरी सुरुच, सगळा विचका होतो प्रवासाचा. ज्याना स्मोक करायचेच आहे तर दुसर्याला त्रास होउ नये अशाच ठीकाणी करावे हेही सुचु नये.


Dineshvs
Monday, January 22, 2007 - 2:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, अनुपमा,
माझ्या माहितीप्रमाणे, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे बेकायदेशीर आहे. तेंव्हा अशी व्यक्ती दिसल्यास, ठामपणे, त्याला विरोध करा.
सरळ पोलिसाना बोलवा.
पण त्याची गरज पडणार नाही, ठाम निषेध, परिणामकारक ठरतो, असा माझा अनुभव आहे.


Shendenaxatra
Monday, January 22, 2007 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकेत रहाण्यात एक अत्यंत आनंददायक भाग म्हणजे धूम्रपानावर असणारे आणि पाळले जाणारे कडक निर्बंध. जिथे जिथे शक्य आहे तिथे धूम्रपानाला बंदी. ऑफिसे, स्टेशन, विमानतळ हे तर आहेतच शिवाय रेस्तरॉ, फ़ास्ट फूडची दुकाने, अगदी पब व बारही.
खुद्द धूम्रपान बेकायदा ठरवणे इतकेच उरले आहे. तेही होईल अशी आशा.
भारतात गेलो की अनेकदा ह्या धुराचा दर्प येतो आणि कधी अमेरिकेप्रमाणे भारतात हे सुख येईल असे वाटते.


Manishalimaye
Monday, January 22, 2007 - 3:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी कुठेही धुर सोडणारा दिसला की अत्यंत वाईट तोंड करुन नाकासमोर जोरजोरात हात हलवते.जेणेकरुन आपले धुर सोडणे हीला त्रासदायक होते आहे हे लक्षात यावे आणि त्या व्यक्तीने धुर सोडणे बंद करावे. पण शहाण्याला हे कळते इतरांचे काय?? जर कुठे धुम्रपान निषेध असे लिहिलेले असेल तर त्या व्यक्तीचे लक्ष तिथे वेधावे. तरीही एकत नसेल तर कडक शब्दात निषेध नोंदवल्यास फरक पडतो हा माझा अनुभव आहे.

Bee
Monday, January 22, 2007 - 3:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनिशा, असे करुनही काही उपयोग होत नाही उलट आपण बावळट आहोत अशा रितिने ते आपल्याकडे बघतात. पण ह्या बाबतीत एक odd experience मला आला. एकदा मी इथल्या एका food court मधे एका रिकाम्या टेबलावर जेवायला बसलो आणि समोरुन दोन चिनी माणसे हातात सिगारेट घेऊन माझ्याच बाकावर्बसली. मला सिगारेटीच्या धुराचा इतका त्रास झाला आणि इतकी प्रचंड चीड आली की मी तणफ़णत माझे जेवनाचे ताट उचलून चक्क उभ्याने जेवायला सुरवात केली. लोकांच्या माना माझ्याकडे वळल्या. नंतर त्या चिनी माणसाने मला क्षमा मागून तिथून ते दोघेही पसार झाले. मला एक शब्दही बोलायची गरज भासली नाही. तर कधीकधी आपला ज्वालामुखी सारखा उफ़ाळून येणारा राग work out होतो. पण बहुतेक लोकांना सामाजिक संवेदना नसतेच तेंव्हा अशा लोकांना आपणच चालवून घ्यायला शिकतो.

Manishalimaye
Monday, January 22, 2007 - 3:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bee हम्म!!

तसेच हे लोक जळती सिगरेट सरळ कुठेही रस्त्यात फेकतात. मागे एकदा मी एकाने सिग्नलला टाकलेली जळती सिगरेट परत उचलुन त्याच्याच गाडीत टाकली असला चिडला होता ना तो माझ्यावर...ऽजुनही आठवल तरी हसु येत यांना असच करायला हव. अशी कुठेही आग लागु शकते हे कसे कळत नाही यांना????




Ajjuka
Monday, January 22, 2007 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण यावर या लोकांचे एकच statement आम्हाला सगळं माहितीये पण आम्हाला आनंद मिळतो त्याचे काय..
दिनेश, बंदी आहे पण ती पाळली जाते का? गोव्यात पाळली जाते किंवा पोलिसांच लक्ष असतं हे मी पाह्यलेय. पण तेही काही ठीकाणीच.
वर कुणीतरी म्हणालं तसं US मधे रहाण्याचा हा फायदा आहे (म्हणजे North Carolina सोडून) की सार्वजनिक ठिकाणे smoking मान्यच नाही आणि सगळीकडे वेगळे smoking zones केलेले असतात. फुका किती फुकायचं तेवढं.
दुसरं असं की बरेचसे लोक ग्रुप मधे बसलेले असताना सगळ्यांना विचारून ओढत नाहीत. सरळ काढतात आणि धुराडे सुरू. विचारायची courtsy पाळणे हा बहुतांशी भारतीय male smokers ना आपला अपमान वाटतो बहुतेक. त्यातून बरोबर परदेशी बाई असेल तर विचारतीलही is it ok if I smoke here? पण देशी असेल तर गृहित.. तिला नाही आवडले तर जाईल उठून हा approach ..


Zakasrao
Monday, January 22, 2007 - 6:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

smoking is injurios to health हे वाचुनसुद्धा smoking करणारे लोकांकडुन आपण काय अपेक्षा ठेवणार. जर smoke करणारयाला आंनद मिळणार आहे तर त्याने दुसरयाला त्रास देवु नये.
smoking सोडण्यासठी द्रुढनिश्चय पाहिजे. आपल्या वाइट सवयीच्या योग्यतेची कारणे सांगणारे लोक काय सोडणार?


Bsk
Monday, January 22, 2007 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते, युवराजशेखर यांनी या बीबी वर येऊन चुक केली.. पहिल पोस्ट वाचल्यावर लक्षात येईल, हा बीबी, "स्मोकींग सोडण्यासाठिचे उपाय" वगैरे वगैरे साठि आहे.. स्मोकींग मधे आनंद मानणार्या लोकांसाठी नसावा..

Yuvrajshekhar
Monday, January 22, 2007 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बीएसकेसाहेब मी पूर्ण विचार करूनच या BB वर आलो आहे प्रथमत: हा BB smoking असा आहे त्यामुळे मी इथे आलो.
मुळात सर्व गोष्टी माहीत असून जेव्हा कुणी स्मोकिंग करतो ते स्मोकिंग सोडण्यासाठी नव्हे तर त्यातून आनंद मिळतो म्हणून.
मी आधी पण म्हटले आहे की स्मोक करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे ज्याला तुम्ही विरोध करणे बाळबोध आहे आणि मुंबईत ट्रेन,बस,सिनेमा हॉल आदी सार्वजनिक ठिकाणी स्मोक केले जात नाही.

मला एक प्रश्न विचारायचा आहे
जर एखाद्याला स्मोकिंग करायची असेल तर त्याने ती कुठे करावी? खासकरून आपल्या इथे स्मोकिंग झोन ही पद्धत अस्तित्वात नसताना
घरात स्त्रिया आणि लहान मूले यांना त्रास होणार आणि बाहेरसुद्धा तुमच्यासारख्या लोकांना त्रास होणार मग अशावेळी कुठे स्मोक करावे?
यावर जर तुम्ही सिगारेट सोडा असा सल्ला देऊ नये ही अपेक्षा.

अनुपमाबाई कुणीही कुणाला स्मोक करायला शिकवत नाही जो तो आपल्या मर्जीने सुरू करतो त्यामुळे कुणाला दूर ठेवण्याचा कुणाला जवळ करण्याचा प्रश्नच उदभवत नाही.


Bsk
Monday, January 22, 2007 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वप्रथम,मी 'तो' नसुन 'ती' आहे. आता तुमच्या आनंदाबद्दल, तुम्ही घ्या हो आनंद.. पण तुम्हाला जे वाटतय की 'ईतर इतके धूर घेता अंगावर, त्यामानानी हा अगदीच क्षुल्लक आहे', हा विचार करणे बंद करा! स्मोकींग करणे हे तुम्हाला जसे आनंददायक वाटु शकते, तसे ते ईतरांना त्रासदायक आणि नकोसे वाटु शकत असेल एव्हढी जाणिव ठेवा...

Nandini2911
Monday, January 22, 2007 - 11:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा विषय खरं तर एकांगी सुरू आहे.. बरेचसे नॉन स्मोकर्स इथे आहेत आणि त्यामुळे विषय आम्हाला स्मोकिंगचा होणारा त्रास असा झाला आहे...
मुळात स्मोकिंगचे जितके तोटे आहेत तसेच फ़ायदेही आहेत. (ऐकायला विचित्र वाटेल पण मर्यादित स्मोकिंग हे उपयोगी ठरू शकतं) याचा अर्थ सर्वानी स्मोक करावं असा नाही. हे लक्षात घ्या..
आणि वरती अठरा वर्षाचा मुद्दा आला आहे तो हास्यास्पद आहे.. मी नववीपासून स्मोक करणार्‍याला ओळखते आणि तो अजूनही धडधाकट आहे. (त्याचं वय सध्या ४५ आहे.) कुठच्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.. शेवटी व्यसन हे वाईटच..


Anupama
Monday, January 22, 2007 - 12:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

युवराजशेखर, मी तुम्हाला कुठेही म्हणाले नाहिये कि कोणी कोणाला smoke करायला शिकवते, आधी माझी पोस्ट्स नीट वाचा आणि मग लिहा.

Vinaydesai
Monday, January 22, 2007 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग अशावेळी कुठे स्मोक करावे?

आत्महत्या कुठे करावी हा प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे.. फक्त आमच्या समोर किंवा आम्हाला त्रास होईल अश्या ठिकाणी करू नका, म्हणजे झालं...

:-)

Yuvrajshekhar
Monday, January 22, 2007 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्महत्या आणि स्मोक यात फरक आहे मिस्टर विनय देसाई आणि चर्चा करता येत नसेल तर भाग घेऊ नका मी सरळ प्रश्न विचारला होता तुम्ही जे लिहिलं आहे ते माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हे.

अनुपमाबाई
'पण बाकीच्या सज्ञानी लोकांनी या पासून दूर रहायाचे ठरवले त्याचा काही
respect ठेवाल का नाही?'या तुमच्या वाक्यावर मी ती comment केली होती.

आणि नंदिनी तू माझं मत नीट वाचलं नाहीस
'नियमानुसार १८ वर्षांखालील व्यक्तीस धूम्रपान करण्यास मनाई असल्यामुळे
स्मोकिंग करणा-या ब-याच व्यक्ती या १८ वर्षांवरील असतात.'
१८ वर्षांखालील व्यक्तीदेखील स्मोक करतात पण त्यांचं प्रमाण कमी आहे.

भाग्यश्री जर तू शाळेत विज्ञान शिकली असशील तर तुला माहित असेल की वाहनांतील धूरामध्ये
carbon monoxide चे प्रमाण जस्त असते व ज्यामुळे श्वसनाचे आणि हृदयाचे विकार संभवतात आता तूच सांग मग हा विचार मी डोक्यातून का काढू?

Anupama
Monday, January 22, 2007 - 8:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

<<'पण बाकीच्या सज्ञानी लोकांनी या पासून दूर रहायाचे ठरवले त्याचा काही respect ठेवाल का नाही?'या तुमच्या वाक्यावर मी ती comment केली होती.>>

अहो दादा, याचा अर्थ असा होतो की जे लोक smoke करत नाहीत त्यांच्यापुढे तुम्ही smoking करता, त्याचा धुर त्यांच्या नाका तोंडात जातो व त्यांच्या आरोग्यावर त्या दुसर्‍याने फ़ुंकलेल्या cigarette मुळे परिणाम होऊ शकतो. तर respect ठेवणे म्हणजे त्यांनी म्हणजे दुसर्‍या सज्ञानी लोकांनी cigarette पासुन होणार्‍या दुष्परिणामांपासुन दुर रहायाचे ठरवले आहे ना मग त्यांच्या या इच्छेला मान देणे आणि त्यांच्यापुढे स्मोकींग न करणे.

आता तुमच्या लक्षात आले का मला काय म्हणायचे होते ते...छे! शाळेत शिकवल्यासारखे वाटतय! :-)


Vinaydesai
Monday, January 22, 2007 - 9:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

' smoking करणे म्हणजे आत्महत्याच नव्हे' हे मलाही पटतं बरं का, कारण यात दुसर्‍याचा जीवही जाऊ शकतो...

पण त्यात आणि आत्महत्येत फारसा फरक नाही, हे आत्तापर्यंत हजारो studies नी निष्कर्ष काढूनही तुम्ही मानत नसाल, तर तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे (सिगरेट हातात घेऊन) चर्चा करण्याची नाही...
स्वतः Philip Morris आता सरकारी दबावामुळे का असेना Discourage Smoking च्या जाहीराती सर्रास करत असताना ही तुम्ही 'ही आत्महत्या नव्हे' हे काय पिऊन म्हणताय ते कळत नाही..
पण ती करायचीच असेल तर इतरांचा जीव घेऊ नका, अशी Request होती...

(चर्चेत भाग घेणे, इथे सगळ्यांचाच हक्क आहे, राग नसावा)


Zakki
Tuesday, January 23, 2007 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चर्चेत भाग घेणे, इथे सगळ्यांचाच हक्क आहे, राग नसावा
बरे झाले तुम्ही असे लिहीले. आता मी पण एक गंमत सांगतो.

एकदा एका सिगारेट पिणार्‍याला कुणि म्हंटले, अरे, धूम्रपान म्हणजे स्वत:बरोबर इतरांनाहि हळू हळू मृत्युकडे खेचण्यासारखे आहे. त्या माणसाने एक प्रदीर्घ झुरका घेतला नाकातोंडातून धूर सोडला, धुराची एक दोन वलये काढली, नि म्हणाला, हळुहळूच ना, मग मला तरी कुठे घाई आहे?

प्रदूषणाबद्दल पुण्यातील लोकांना आंतरराष्ट्रीय प्रदूषण विरोधी संस्थेच्या सभासदांनी म्हंटले, You realize you are slowly destroying the city! पुणेकरांनी उत्तर दिले, That's OK, we are not in a hurry !


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators