|
Daku
| |
| Thursday, September 07, 2006 - 12:34 pm: |
| 
|
तुमच्यापैकी काही जणांना स्मोकिंग ची सवय असेल. काहिंच्या 'ह्यांना' असेल. ही सवय कोणि सोडली आहे का? तुम्ही,तुमच्या मीत्राने किंवा तुमच्या बेटर हाफ़ ने काय केले हि सवय सोडायला? अनुभव सांगावे. हा बीबी वाचानार्याला नक्की फ़ायदा होईल, आणी मलाही. ;) आणी सध्या जे स्मोक करतात त्यांना पण ते सोडण्यची ईच्छा होईल.
|
Maudee
| |
| Monday, September 11, 2006 - 11:48 am: |
| 
|
आमच्या ह्याना नाहिये पण माझ्या बाबाना होती. आणि माझ्या आईने ती सोडायला लावली. म्हणजे झाल अस की मी आमच्या आई बाबांच पहिलं अपत्य. मी ३-साडे ३ वर्षांची असेल तेव्हा बाबांच्याच style ने सिगारेट च्या ऐवजी एक काडी हातात घेऊन action करत होते. तेव्हा आईने बाबाना दाख़वल. तेव्हापासून ते आजतागायत बाबानी सिगारेटला हात लावला नाहीये.
|
Daku
| |
| Monday, September 11, 2006 - 12:33 pm: |
| 
|
at least some one has said something. It seems there are not many friend who has something to share here. Smoking is really bad. but it takes lot of efforts and guts to come out of it. The main reason I feels is cigarettes are available so easily. and its very easy to hide that one is not smoking. If he is smoking 2-3 cigarretts a day. I am not habitual to it. I mean if I don't smoke, I dont feel anything wrong. I can live without smoking for any amount of time. But the thought that I am not smoking contineously haunts me, so instead of being contineously in the thought of ' I am not smoking' I give up and have one fag. Its my story. But On any day Smoking is bad.
|
I am not habitual to it. I mean if I don't smoke, I dont feel anything wrong. I can live without smoking for any amount of time. But the thought that I am not smoking contineously haunts me, so instead of being contineously in the thought of ' I am not smoking' I give up and have one fag. Its my story. हे वाक्य म्हणजे व्यसनी माणसचं पहिलं लक्षण आहे
|
Meggi
| |
| Thursday, September 14, 2006 - 1:06 pm: |
| 
|
पुण्य, मला कि अगदी असचं वाटलं ते पोस्ट वाचुन.
|
Moodi
| |
| Thursday, September 14, 2006 - 1:19 pm: |
| 
|
एकदा समर्थ श्री रामदास स्वामी आपल्या शिष्यांसह एका गावात एका मोठ्या कुटुंबाकडे रात्रीचे जेवायला म्हणून थांबले. त्या व्यक्तीने तसा आग्रहच केला होता त्यांना. नंतर तो माणूस म्हणाला की त्याला पण आध्यात्माची आणि संत सहवासाची ओढ आहे, परंतु काही कारणांनी त्याची संसाराची आशा सुटत नाही, मोह सुटत नाही. दुसर्या दिवशी सकाळी समर्थ उठले, सर्वांची जायची तयारी झाली. शिष्यगण परत त्यांना बोलवायला गेले तर पहातात तो काय की समर्थांनी वाड्यातील मध्यभागी असलेल्या खांबाला घट्ट मिठी मारलीय आणि ते त्याला उद्देशुन अरे मला सोड, अरे मला सोड असे बोलत आहे असे दिसले. तो माणूस( मालक) पुढे गेला त्यांना सोडवले आणि म्हणाला हे काय? तुम्हीच त्या खांबाला मिठी मारुन बसलात आणि सोड सोड काय म्हणताय? तो निर्जीव आहे ना? मग समर्थ हसून म्हणाले अरे वेड्या हेच तर तुझे आहे, की तू मोहाला मिठी मारुन बसलायस आणि वरतुन तू तो मोह सोडायच्या ऐवजी त्यालाच सोड म्हणतोयस. मग तो खजील झाला, त्याचा मोहही सुटला व्यसन असेच असते. मनावर ताबा हवा. आपण व्यसनाला सोडायचे. 
|
धूम्रपान सोडण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे धूम्रपान सोडून देणे. दुसरा कोणताही उपाय नाही.
|
Pooh
| |
| Wednesday, September 20, 2006 - 12:43 pm: |
| 
|
Quitting smoking is very easy. I have done it so many times. - Mark Twain
|
Manyah
| |
| Monday, November 20, 2006 - 4:36 pm: |
| 
|
नमस्कार, मी पन स्मोकिन्ग सोदले आहे. अगदि कालच.... क्रुपया हसु नये......... मी खरेच सोदले आहे......मज़ि बायको जाम कतकत करते त्यावरुन..... आनि हो कधि कधि धमक्या पन देते
|
कोणी म्हणून गेले आहे की "मूळाशीच घाव घातला की फांद्या आपोआप खाली येतात." त्यामुळे मूळाशी घाव घालणे हाच एकमेव उपाय.
|
इथे मूळ म्हणजे हात आणि तोंड का
|
मुळात स्मोकिंग हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे,कुणीही कुणासाठी काहीही सोडू नये जेव्हा वाटेल तेव्हा ती व्यक्ती स्मोकिंग सोडून देईलच की. थोडीतरी मोकळीक राहू द्या प्रत्येकाला.
|
Ajjuka
| |
| Thursday, January 18, 2007 - 5:20 am: |
| 
|
मोकळीक.. ह्म्म्म.. माझ्यामते स्मोकिंग ही खूप arrogant सवय आहे. तुम्ही एखाद्या छान ठिकाणी उभे आहात किंवा छान मूड मधे आहात आणि अचानक भसकन कुणाच्या तरी थोबाडातून सुटलेला धूर तुमच्या नाकात शिरतो आणि सगळ्याची वाट लागते. स्मोकून आल्यावर साधारण ३ फुटांच्या अंतरात जरी हे स्मोकर्स आले तरी उलटी येईल इतका घाण वास यांच्या तोंडाला येत असतो. आमच्यात (मी आणी नवरा) होणार्य भांडणातला हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा असतो. कसली डोंबलाची मोकळीक? आम्हाला इतर सगळ्या प्रदूषणातून जी काय किंचित शुद्ध हवा मिळते ती तरी मिळू द्या. तुमच्या आनंदापायी दुसर्याला त्रास का?
|
Anupama
| |
| Thursday, January 18, 2007 - 3:02 pm: |
| 
|
अज्जुका, १००% बरोबर, स्मोकिन्ग करायचे तर करा हो, पण त्याच्या second hand धूरचा आम्हाल का त्रास?
|
Bee
| |
| Thursday, January 18, 2007 - 3:43 pm: |
| 
|
अगदी बरोबर तंतोतंत बरोबर..
|
आमच्यात (मी आणी नवरा) होणार्य भांडणातला हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा असतो>>>> अच्छा? म्हणजे या तक्रारी संदीपच्या आहेत होय? मला वाटले की... होत असेल, होत असेल संदीपला उलटी...
|
अहो अज्जुका मग उद्या म्हणाल गाडीच्या धुराचा त्रास होतो म्हणून काय गाड्या चालवण्यावर बंदी घालणार काय? आणि एखाद्याला जर स्मोकिंग मधून आनंद मिळत असेल तर त्याला तुमचा विरोध का? तुम्हाला शुद्ध हवा हवी म्हणून दुस-याला त्रास का? आणि स्मोकिंग करण्यात कसला आलाय arrogance? जो तो आपापल्या खुशीसाठीच स्मोक करतो,तुमचा नवरादेखील माझ्या मताशी सहमत असेल.जसे इतर प्रकारचे धूर सहन करता तसा हा पण सहन करा ना. अनुपमाबाई तुम्हालाही तुमचं उत्तर मिळालंय असं मी समजतो
|
आणखी एक म्हणजे प्रत्येक स्मोक करणारी व्यक्ती सगळ्या गोष्टी माहीत असून स्मोक करते, बरं नियमानुसार १८ वर्षांखालील व्यक्तीस धूम्रपान करण्यास मनाई असल्यामुळे स्मोकिंग करणा-या ब-याच व्यक्ती या १८ वर्षांवरील असतात.म्हणजे ते कुणी दूधखुळे नव्हेत त्यांना थोडी तरी समज असेलंच की आणि स्मोकिंगचे सर्व फायदे,तोटे माहित असूनदेखील ते स्मोक करतात मग इतकं सगळं असून तुमचा त्रागा का आणि कशाला?
|
Ajjuka
| |
| Sunday, January 21, 2007 - 7:29 am: |
| 
|
धूर सोडणार्या गाडीचा उपयोग असतो काहीतरी. तुमच्या smoking काय उपयोग हो? मग कुणाला दुसर्याच्या तोंडावर थुंकून आनंद मिळत असेल तर तेव्हाही तुम्ही हेच म्हणाल. दुसरं असं माझा नवरा तुमच्याशी सहमत असेल किंवा नाही याने माझ्या मतावर काहीही फरक पडत नाही. smoking चे फायदे काहीही नाहीत. तोटे माहित असून ते करायचे तर करा. पण हे शास्त्रीय सत्य आहे की passive smoking मुळे जास्त हानी होते. म्हणजे तुमच्या आनंदासाठी तुम्ही दुसर्यांना हानी पोचवता. एवढच असेल तर जिथे कुणाला धुराचा त्रास होणार नाही अश्या ठिकाणी का नाही जात तुम्ही फ़ुकायला? आपल्या धुराचा दुसर्याला त्रास होत असेल इतकं साधं का नाही तुम्हाला कळत? त्रागा बिगा शब्द वापरून उगाच कांगावा करू नका.
|
Anupama
| |
| Sunday, January 21, 2007 - 4:16 pm: |
| 
|
युवराजशेखरदादा, आम्हाला जर नसेल होत धूर सहन तर सहन करा की म्हणुन तुमची का हो जबरदस्ती? ह्यालाच arrogance म्हणतात का? passive smoke चा smoking न करणर्या प्रत्येक व्यक्तिच्या आरोग्यावर परीणाम होतो, त्यामध्ये लहान मुले, unborn children हे सगळेच आले. उद्या जर तुमच्याच घरातील एखदि स्त्री pregnant असेल अथवा लहान मुल घरात असेल तर त्यांनापण तुम्ही वरील उत्तर देणार का?आणि उत्तर नाही असे असेल तर तुमची हिच जवाबदारी बाकी समाजाला लागू पडत नाही का? smoking is your choice, you cann't impose it on us.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|