|
Zakki
| |
| Tuesday, January 09, 2007 - 11:58 am: |
| 
|
माझ्या अनेऽक समवयस्क नि बर्याच वर्षापूर्वी इथे येऊन स्थायिक झालेल्या लोकांशी बोलताना मला आता असे वाटू लागले आहे, की आमच्या मुलांना ABCD म्हणण्या ऐवजी आम्हालाच IBCA म्हणायला पाहिजे. बरेच लोक माझ्या सारखे, भारतात जावे की इथेच रहावे याबद्दल गोंधळून गेले आहेत. कारण इथे काही 'पटत' नाही, नि तिथेहि काही 'पटत' नाही! ज्या दिवशी इकडचे प्रेम येते तेंव्हा 'तिकडच्यांना' 'भडक' शिव्या द्यायच्या नि नाहीतर इथे बसून इकडच्यांना शिव्या द्यायच्या! confused असल्याचेच हे लक्षण! इथले डोके ठिकाणावर असलेले लोक सुद्धा मी बोलतो तसेच बोलतात, मी फक्त एक पायरी ओलांडून लिहितो, ते न लिहून शहाणे! ति ABCD मुले बिचारी मोठी होऊन त्यांचे confusion पूर्णपणे संपले आहे असे वाटते, ते इथे अगदी रमून गेली आहेत.
|
च्यायला १०० टक्के बरोबर!! या उपर आणखी काही या मुद्दयावर बोलण्यासारखं नाही.
|
Laalbhai
| |
| Thursday, January 11, 2007 - 2:59 pm: |
| 
|
There was a post by someone Mukund here, few days back. I read but could not answer. Whether he deleted that or it was deleted by mods? I did not find anything offending in his post. Anyway, I wanted to answer that. But my purpose is defuncted as post itself is not there. Do I still need to answer Mukund? If yes, I will do it after some days. Thanks. Today I came here to answer that post itself. Anyway.. 
|
Zakasrao
| |
| Saturday, January 13, 2007 - 4:17 am: |
| 
|
नमस्कार मायबोलिकरांनो, तूम्हा सर्वाना माझ्याकडुन मकर संक्रातीच्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या गोड बोला असेच हितगुजवर येत जा, आपल्या मनीचे हितगुज करा. भान्डु नका, भरपुर ईब्लिसपणा करा, येथे लिहा, सर्वाना हसवा. नविन, नविन अशाच अनेक गोष्टि लिहा (पण वेळेत लिहा आणि एकता कपुरच्या सिरिअलसारखे वाढवत बसु नका). भरपुर विडम्बन लिहा, ललित लिहा, सर्व कला दाखवा. माझ्यासारख्या वाचकांना भरपुर मेजवानी मिळु द्या. पण हे सर्व advance मधे कारण उद्या company ला सुटि असते. हि... हि... ही आणी सर्वात महत्वाचे भांडण थांबवा \
|
Chyayla
| |
| Monday, January 15, 2007 - 2:03 am: |
| 
|
NRI साठी हा एक विचार करण्यासारखा लेख तरुण भारत मधे आला आहे. खरच का आपण वापरुन घेतल्या जात आहोत युरोप, अमेरिकेकडुन? आता गरज सम्पली म्हणुन काय ३०,००० भारतियाना देश सोडण्याचे सान्गितले आहे इन्ग्लन्ड मधे? या BB वर NRI भारतिय असे का विषय आला आहे म्हणुन NRI न्च्या विचार करण्यासाठी म्हणुन हा लेख देत आहे.
|
Mukund
| |
| Monday, January 15, 2007 - 7:05 am: |
| 
|
Lalbhai....you dont have to answer...as long as you read the post.I hope Chyala(Sameer) too, read my post. I deleted that post myself. I am glad you didnt find my posting offensive...I deleted it because I am trying to stay away from these kind of controversial topics. I am an old member of this wonderful website and my experience in the past is not pleasant on V and C.But when I see people like you or Chyala(Sameer)with great intellect and good points wasting the knowledge and talent you guys have in bickering and personal attacks......it is very disappointing.I want to just remind people that this is a great forum where people can voice their opinions and ideas. This forum gives freedom to write and voice your thoughts and opinions... which otherwise you wont be able to voice to the world ...unless you are a reporter or news paper columnist.....so in a way we all because of this medium became reporters and columnist. I think along with this freedom and privilage.. comes a responsibility to write with same journalistic principles and dignity which great journalist abide by. Basic among those principles is to use this medium with courtesy and respect for one onother.We all should rememberलेखणी ही तलवारीपेक्षा धारदार असते! We all make our opinions and ideas based on our experiences in life and our interpretation of events around us. We should have a respect for others opinion even though you may not agree with it. You can say why you feel... like the way you feel... by giving the rationale and reasons behind it. People who disagree with those reasons and rationale should point out how those reasons are wrong with counterpoints and counterarguments...instaed of personal attacks on who presented those views... Unfortunatly such personal attacks are very commonplace here.Then this forum ...which is supposed to be for give and take of thoughts and ideas......it becomes a forum for give and take of personal punches!So instead of growing from each others opinions and ideas and using this forum for apriciating intellectual diversity, people spend all their talent and energy.... trying to proove their point at any cost!We Indians are gifted with such intellectual and cultural diversity...but instead of using this diversity to our advantage ..we use it as a curse! Sometimes in life our greatest personal growth happens when we learn to accept new views and new ideas which we were never exposed to and/or shown to us in entirely different light!बघा पटतय का.. नाहीतर.. चालु द्यात! Moderator: If you think this post doesnt belong here....you can delete it.
|
Zakki
| |
| Monday, January 15, 2007 - 4:41 pm: |
| 
|
खरच का आपण वापरुन घेतल्या जात आहोत युरोप, अमेरिकेकडुन? म्हणजे काय? अर्थातच! आपणच काय, एक जात सगळे लोक सगळ्या धंद्यात 'वापरलेच' जातात! लोकांना 'वापरूनच' धंदा होतो. जसे एखाद्या गोष्टीचा आपल्याला चांगला उपयोग होतो, ती गोष्ट आपण ठेवून घेतो, जी चांगली चालत नाही ती फेकून देतो, तसेच लोक सुद्धा केवळ साधन आहेत. लोकांसाठी कंपनी नाही, कंपनी साठी लोक. भांडवलवादात हे असेच असते. फक्त कम्म्युनिस्ट तत्वज्ञानात म्हणतात की लोकांचे कल्याण करावे! ! प्रत्यक्षात USSR चे दिवाळे वाजले, नि चीनला पण अमेरिकेची कास धरावी लागली! तेंव्हा इंग्लंडच काय, अगदी भारतीय कंपन्या देखील असेच करतात! फायदा होत नसेल तर धंदा काय लोक कल्याणासाठी चालवायचा? मला नाही वाटत त्या तीस हजार लोकांना काही अडचण येईल. शिकलेले, अनुभवी, नि काम करणारे लोक. जगात कुठेहि गेले तरी छान मजेत रहातील. उलट कदाचित् भारतात परत आले तर भारताचे पण कल्याण करतील.
|
Chyayla
| |
| Monday, January 15, 2007 - 6:07 pm: |
| 
|
झक्की... क्या बात है! तुमच्याकडुन अपेक्षित असे योग्य उत्तर मीळाले. मला पुरेपुर पटले ही. मुकुल तुमच्या पोस्ट मधे माझा उल्लेख आला पण मला नाही आठवत की तुमच्या पोस्टवर कधी उत्तरलो. आणी तुमची आधीची पोस्ट सुद्धा मी वाचली नाही. त्यामुळे हा काय प्रकार सुरु आहे मला कळाले नाही. त्यामुळे तुमच्याशी आणी त्या पोस्टशी माझा कसा सम्बन्ध आला कुणास ठाउक. तरी तुम्हाला ईतर BB किन्वा याच BB वर मी कुणावर वैयक्तिक चिखलफ़ेक केली आहे असे वाटते तर माझ्या निदर्शनास आणुन दील्यास आभारी राहील. उलट माझ्याशिवाय ईतरच या BB वर हमरी तुमरी करत होते. तरी मी मान्य करतो की ईस्लामी दहशतवादाच्या BB वर सुरुवातीच्या काळात वैयक्तिक चिखल्फ़ेकीला प्रत्युत्तर दीले होते. त्यामुळे तुमच्या मनात अशी भावना निर्माण झाली असेल पण तेन्व्हा मी अगदीच नवीन होतो. तुम्ही सुद्धा V&C केले होते ना आधी, तसाच प्रकार माझ्याही सोबत झाला होता. आता थोडे थोडे कळायला लागले म्हणुन या वैयक्तिक वादापासुन दुरच रहाणाच्या प्रयत्न करतो. Mods ला विनन्ती की माझी ही पण पोस्ट उडवु शकता. धन्यवाद.
|
Saavat
| |
| Tuesday, January 16, 2007 - 7:06 am: |
| 
|
छान झक्की, एकदम पटल!
|
Laalbhai
| |
| Tuesday, January 16, 2007 - 11:40 am: |
| 
|
Mukund, I still wish to answer. १. राजकारणात पडायचे म्हणजे निवडणूकाच लढवायच्या, असा समज का? समाजकारण हेही एका प्रकारचे राजकारणच असते. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात मी काय करतो, हे जाऊ द्या, पण इथे एकांगी विचारसरणीचा मी विरोध करतो, हेही एक समाजकारणच आहे. म्हणजेच राजकारण आहे. समाजकारण आणि राजकारण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू समजल्या जातात. २. personal attack: संपूर्ण अनिवासी भारतीय जमातीबद्दल मी कधीही काही म्हतले नाहीये. माझा आक्षेप सरळ आणि साधा आहे की भारतीय समाजात अनेक दोष असले तरी त्याला "भिकारी, निकमा" हे पूर्वाश्रमीच्या भारतीयांनीच म्हणावे हे दुर्दैव आहे. पण संबंधित व्यक्तींने स्वतःच्या वक्तव्याबद्दल कधीही खेद व्यक्त केला नाही! मला मी केले त्यात काहीही चूक वाटत नाही. To broadan towhat you have said about "respinsibility of writing", I think it applies to everyone and in all subjects! I wonder why and how you are sparing "such" people. And explect only we to bear "responsible behaviour". Anyway.. let's say that we may not agree on this point. ------------------------------------ my experience in the past is not pleasant on V and C. >>>> I hope it is not because of people who, in some way or the other, follow/support my principles. Only extremists of some kind (let's not utter "their" name!) are throwing tantrums here, always. I think you are "a" victim (one among many!) of the same ideological idiotism, aren't you?
|
भान्डु नका, भरपुर ईब्लिसपणा करा, येथे लिहा, सर्वाना हसवा.>>>>>>इथे सर्वांना हसवण्यासाठी लिहितात होय तरीच म्हटल इथल्या बर्याच जणांचे post इतके हास्यास्पद का असते..
.... Post edited by moderator 8:40 am
|
वैयक्तिक हल्ले आता बास झाले. हे सर्वांना लागू आहे. उगाच दुसर्याकडे बोट दाखवू नका. विषयाला धरून लिहीता आले तरच लिहा.
|
Laalbhai
| |
| Tuesday, January 16, 2007 - 1:53 pm: |
| 
|
moderator, sorry to say पण तुम्ही योग्य भुमिका घेतलीत आणि वाद निर्माण करणारे "दोन्ही बाजूचे" पोस्ट्स काढून टाकलेत तर पुढे वाद वाढणारच नाहीत. एक मूर्ख व्यक्ती खुशाल तुमच्या web site वर येऊन अख्ख्या देशाला "भिकारी आणि निकम्मा" म्हणते, ते तुम्हाला खपते, आणि मग त्या व्यक्तीवर मी टिका केली की माझे पोस्ट्स तत्परतेने काढून टाकले जातात. मजाच आहे सगळी! (वरती मुकुंद येऊन मलाच म्हणतात, की जबाबदारीने वागा! म्हणजे संपूर्ण समाजाला "भिकारी आणि निकम्मा" म्हणणे, हे मतस्वातंत्र्य आणि असे म्हणणार्या व्यक्तीला "हलकट" म्हणणे, हा personal attack . वाह रे खुदाई!) व्यक्तीस्वातंत्र्याची, मतस्वातंत्र्याची तुम्ही नक्की काय व्याख्या करता हे कळेल का? ज्या पोस्ट्समुळी हा वाद उद्भवला ती पोस्ट्स अजुनही ह्या बीबीवर शाबूत का आहेत, हे कळेल का? कुणाची तक्रार नाही म्हणून?
|
Laalbhai
| |
| Tuesday, January 16, 2007 - 2:29 pm: |
| 
|
Moderator_7 & Administrator /hitguj/messages/46/120466.html?1166233802 Wednesday, December 13, 2006 - 9:27 am: झक्की यांचे हे पोस्ट पहा. "भिकारी आणि निकम्मे" म्हटलेले पोस्ट अजुनही तिथे आहे. त्यानंतरच मी या वादात पडलो. वास्तविक, दोघातिघांनी विरोध केल्यानंतर झक्की ह्यांच्या "आपले चुकले" हे लक्षत यायला हवे होते. पण "माझेच खरे" असा हेका त्यांनी लावून धरला. आणि नंतरचे नाट्य झाले! ह्यात तुम्ही माझे पोस्ट, माझी तक्रार काढून टाकलीत हे ठिक (म्हणजे ठिक नाही, पण आता काय करणार?), पण झक्की ह्यांचे हे "मतस्वातंत्र्य" प्रमाणापेक्षा जास्त पसरले आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?
|
Chaffa
| |
| Tuesday, January 16, 2007 - 3:43 pm: |
| 
|
बरेच दिवस मी हा BB वाचतोय पण ज्या कारणावरुन ईतके वाद होतायत तो विषय शोधुन काढणार्या व्यक्तिला आधि साष्टांग दंडवत. मुळात घरातले विषय चव्हाट्यावर आणुन नक्की काय मिळवतोय आपण.? तुम्ही भारतिय जर भारतात असाल तर आधी नुसते शब्दांचे वाफ़ारे सोडुन गप्प बसणे सोडा आणी काहीतरी भरीव काम निदान आपल्या क्षेत्रात तरी करुन दाखवा आणी जर तुम्ही भारतात नसाल तर कमीतकमी स्वदेशाच्या त्रोटक माहीतिवरुन सबंधं देशावर राग ठेवु नका आणी ईतरांची मते कलुषीत करु नका. तुम्ही एक महत्वाची चुक करता ती म्हणजे तुम्ही आधिच पुढारलेल्या देशांशी आपल्या देशाची तुलना करता कधी मागास देशात गेलात तर मझ्या या शब्दांचा अर्थ नक्की कळेल. आणी बरेच जणांना ( कदाचीत ) असलेला गैरसमज मी दुर करु ईच्छीतो या मायबोलीवर फ़क्त भारतीय ( निवासी,अनिवासी ) येतात. आगदी माझ्या परिचयातल्या परकीय व्यक्तिने मल सरळ मेल करुन ह्या आधिच असलेल्या माहितीत भर घातली म्हणुन आज मी ईथे लिहितोय. आता आपल्याला हे आणखी एक विशेषण नक्की लावता येईल कि आपलीच अब्रु आपणच चव्हाट्यावर आणणारे.!!!! }
|
ते झक्कीबोवा काय म्हणले ते जाऊदे, ते एन आराय हेत हेच मूळ दुखण हे ना? असुद्या.....! आता मीच म्हणतो, या देशात या देशाचा नागरीक म्हणुन म्हणतो, अनुभवाने म्हणतो... अनुभुतीने म्हणतो.... आम्ही, होय माझ्यासहीत आम्ही निकम्मे आहोत, भिकारी आहोत, फुकटे आहोत! आम्ही एकमेकान्ना फसविण्यातच नव्हे तर स्वतःलाही फसविण्यात मश्गुल असतो! आणि अस फसविताना आम्हाला आमची सन्स्कृती, देव, पाप पुण्य वगैरे काही एक आठवत नाही......! आमचा निकम्मेपणा, फुकटेगिरी, भीक मागितल्यासारखी कष्ट न करता हात पसरायची, फसवेगीरीची कितीकिती उदाहरणे कुणाकुणाला अजुनही हवी हेत? साध बस ट्रेन मधे तिकीट काढुन प्रवास करायची आम्हाला शिस्त नाही.... त्या करता तिकीट चेकर ही जमात अस्तित्वात आणावी लागते.....! रस्त्यावरच्या रहदारीचे साधेसाधे नियमही आम्ही पाळु इच्छीत नाही....! पाळणार्यालाच वेड्यात काढले जाते! आजही अगदी पुणे बेन्गलोर हायवेवर जरी आम्हाला ऍक्सिडेण्ट झाला तर आमच्या गाडीतल्याच नव्हेत तर आमच्या प्रेतान्वरच्या चीजवस्तू लुटावयास तत्काळ धावून येणारे कमी नाहीत....! अन म्हणे आम्ही सुसन्कृत.......! कुणाकडे बघुन म्हणावे???? ते जावुदेच, ऑफिसच्या किन्वा सप्लायर वगैरेन्कडुन मिळालेल्या पार्टीत फुकटात मिळते म्हणुन स्वतःचा आवाका न पहाता ढोसुन ढोसुन, हादडुन हादडुन नन्तर ओकुन काढणारे लोक रोज रात्री येथल्या जवळपास प्रत्येक रेस्टॉरण्ट बार आणि स्टार हॉटेल मधे दिसतील......! ते झाल सामान्यान्च... विमान प्रवासात फुकट (खर तर तिकीटाच्या रक्कमेतून पण तिकीट कम्पनीच्या खर्चाने!) पण मिळतात म्हणुन नको असताना चॉकलेट्स वगैरे वसुल करणारी जमात आमच्यात आहेच ना? सर्वप्रथम मान्य करायला हव की आमच्यात काही एक नव्हे तर बर्याच मोठ्या प्रमाणात तृटी हेत.... स्वयम्शिस्तीचा, सार्वजनिक शिस्तीचा अभाव हे, व्यावहारीक नितीमत्तेची चाड नाही, अन जोवर हे मान्य करुन सुधरावयाचा प्रयत्न करीत नाही तोवर काही खरे नाही.......! लक्षात घ्या, आम्ही मारे मोठ्या तोर्यात आमच्या सान्स्कृतीक वारशाचे दाखले देण्यासाठी अनेकानेक सन्तान्ची नावे घेतो...... जाज्वल्य देशाभिमान, धर्माभिमानासाठी सम्भाजिदीकान्च्या बलिदानाची उदाहरणे देतो........! पण ज्या भागात येवढ्या मोठ्या सन्ख्येने सन्त महात्मे जन्माला यावे लागताहेत,.... त्यान्ची गरज पडती हे, याचाच अर्थ एक दोन नाही तर कित्येक शे वर्षे येवढे सन्त महात्मे होऊन, येवढी बलिदाने होऊन आम्ही दगड ते दगडच राहिलोत........! आणि हे मान्यच करायचे नसेल, तर बसा बोम्बलत झक्कीच्या नावाने शिमगा करीत.......! DDD अगेन आय रिक्वेस्ट, कम टु द पॉईण्ट...!
|
Chyayla
| |
| Wednesday, January 17, 2007 - 6:09 am: |
| 
|
लिम्बु टिम्बु... अरे बाबा तुझे सगळे मुद्दे बरोबर आहेत.. काहिच चुक नाही. आमचा पण मुद्दा समजुन घे लक्षात घ्या, आम्ही मारे मोठ्या तोर्यात आमच्या सान्स्कृतीक वारशाचे दाखले देण्यासाठी अनेकानेक सन्तान्ची नावे घेतो...... जाज्वल्य देशाभिमान, धर्माभिमानासाठी सम्भाजिदीकान्च्या बलिदानाची उदाहरणे देतो........! यात मला एवढेच म्हणायचे आहेत का हे सगळे दाखले खोटे आहेत त्यान्ची काही किम्मत नाही? अरे असे दाखले नेहमी द्यावे लागतात कारण त्याशिवाय समाजापुढे एकन्दरित सुधारणा व्हायला आदर्श कुठुन मिळतील. जर सगळे एकदम सज्जन असते तर यान्ची गरजच नसती पडली. भयाण अन्धारात मन्द तेवणार्या पणतीचा प्रकाशालाही तेवढच महत्व आहे. या BB वर फ़क्त हा अन्धारच दाखवणे सुरु आहे आम्ही आपला त्यातल्या छोट्या पणतीचा प्रकाशकिरण दाखवत आहे. ईथे मी अन्धाराकडे दुर्लक्ष करत नाही पण त्यासाठी का नुसत रडत बसणार की प्रकाशाची कास धरुन पुढे जाणार? पण तुम्ही तरी पणतीची कडे का दुर्लक्ष कराताहात ते कळाले नाही. मग काय फ़रक करावा तुमच्यात आणी या देशाचा, राष्ट्राचा, सन्स्कृतीचा सतत तेजोभन्ग करणार्या गिधाडान्चा. तुम्ही एक प्रकारे त्यानाच मदत करत आहे असे नाही का वाटत... तुम्हाला चुक दाखवायची दाखवा स्वागत आहे आणी स्विकार पण आहे... पण नुसती चुक दाखवण्यापेक्षा काही मार्ग दाखवला तर चान्गले. आता झक्की म्हणतिल परक्यानी येउन सुधारणा करावी ही अपेक्षा का करता? मग परक्यानी या देशाबद्दल तरी का बोलाव त्याना काय अधिकार आहे? नुसते दोश दाखवणे फ़ार सोपे आहे. पण तुम्ही ज्या पद्धतीनी Attitude ने दोष दाखवत आहेत ते पटण्यासारखे नाही, आणी अशा प्रकारे चुका दाखवणे हीच चुक आहे. कोण मान्य करेल तुमचे नुसते दोषारोपण. म्हणजे आम्ही काही करणार नाही नुसत्या शिव्या देणार त्या शिव्या ऐकुन तुमचे दोष लक्षात घ्या आणी सुधारा... असेच ना? माफ़ करा अगदीच रहावले गेले नाही म्हणुन जास्त बोललो. चु. भु. दे. घे.
|
Saavat
| |
| Wednesday, January 17, 2007 - 7:34 am: |
| 
|
>>>पण ज्या भागात येवढ्या मोठ्या सन्ख्येने सन्त महात्मे जन्माला यावे लागताहेत,.... त्यान्ची गरज पडती हे, याचाच अर्थ एक दोन नाही तर कित्येक शे वर्षे येवढे सन्त महात्मे होऊन, येवढी बलिदाने होऊन आम्ही दगड ते दगडच राहिलोत........! अरे बापरे! मी तर आजवर 'उलट' समजत होतो, म्हणजे संताना फ़क्त इथलेच 'दगड' सुधारु शकतात याची खात्री आहे, बाकी सगळे सुधारायच्या पलीकडे गेलेत. म्हणुनच 'संत' मंडळी जास्त संख्येने इथ 'बी' पेरत असतील. ... >>>फायदा होत नसेल तर धंदा काय लोक कल्याणासाठी चालवायचा? वरच झक्कीच वाक्य, वेगळ्या अर्थान इथ पण लागू व्हायला पाहीजे! "फ़ायदा होत नसेल तर, बी पेरायला, लोककल्याण म्हणजे काय धंदा नाही"(संत मंडळी करिता) खाली LT च मला सगळ्यात आवडलेल वाक्य टाकतो... "प्लिज, कम टू दी पोइंट..!" आवडायच कारण, हे वाक्य अस शेवटी टाकलकी, वरची सगळी 'पोष्ट', to the point आपोआप convert होते. काय खतरनाक conversion, method आहे, एकदम पटली हे! जियो मेरे दोस्त DDD
|
Laalbhai
| |
| Thursday, January 18, 2007 - 7:45 am: |
| 
|
admin नी त्यांचे मत जाहिर केल्यावर मला या विषयावर काही बोलण्याचे कारण नाही. पण संबंधित व्यक्ती NRI असल्यामुळे ते चूक आहेत, असे मी म्हणतो, असा कुणाचा समज असेल, किंवा कुणी समज करून देत असेल, तर ते सर्वथा चूक आहे. माझा विरोध मुद्द्याला आहे. व्यक्तीला नाही. अर्थात, हे सगळ्यांना पटेलच असे नाही. ज्यांना पटते त्यांच्यासाठी! नुसते दोश दाखवणे फ़ार सोपे आहे. पण तुम्ही ज्या पद्धतीनी Attitude ने दोष दाखवत आहेत ते पटण्यासारखे नाही, >>> You said it chyayala. किमान ह्या मुद्द्यावर आपले एकमत. 
|
>>>>> चळ लागलेल्या व्यक्तीने संपूर्ण समाजाला "भिकारी आणि निकम्मा" म्हणणे, तो चळाचा वगैरे विचार तुम्ही पण करुन ठेवा लालभाई! कारण त्याचा सम्बन्ध तुम्ही देखिल केवळ वाढत्या वयामुळे आलेल्या म्हातारपणाशी लावला हेत! आत्ता नसाल, पण जिवन्त शिल्लक प्रत्येकाला ठराविक वयानन्तर "म्हातारच" म्हणतात....... DDD पण.....एक उदाहरण देतो! (हव तर घरी करुन बघा) एका पातेल्यात पाणि घ्या! शुद्ध स्वच्छ पाणी! त्या पाण्याला समजा थोऽऽऽर हजारो वर्षान्चा सुसन्स्कृत सम्पूऽऽऽर्ण भारतीय समाज! आता त्यात एक मुठ चान्गली बारीक माती टाका अन ते पाणी ढवळा........! (होऽऽऽ, आणि तुम्हालाच ते चान्गलच जमेल! तेच ते हो.... माती कालवणं आणि ढवळाढवळी करण DDD ) आता काय दिसेल????????? सगळ पाणि गढुळ झाल हे! आता मला सान्गा की, मुठभर माती साठी खर तर चुळकाभर पाणी पुरेल ना भिजायला? म्हणजेच पातेल्यातल्या चुळकाभर पाण्या ऐवजी बाकीचे शिल्लक पाणि अजुनही शुद्धच स्वच्छच हे अस म्हणायच धाडस कराऽऽवऽऽऽ? की नकोऽऽऽ? सगळच पाणी गढूळ हे अस म्हणाव? की नाही नाही, त्यातल्या प्रत्येक मातीच्या कणाला डकलेल पाणि तेवढच गढूळ हे अन बाकिच स्वच्छ हे अस म्हणाव? (मला इयत्ता तिसरी क वर्गाचा विज्ञानाचा तास घेतल्यासारख वाटल.... ) याच सम्पुर्ण गढुळ, अस्वच्छ पाण्याचा दाखला घेत आम्ही काही "चळ लागलेले विचारवन्त" म्हणतो की एकेकट्या "थोर सुसन्स्कृत वगैरे वगैरे विशेषणान्नी युक्त असलेल्यान्चा" विचार न करता जर सम्पुर्ण समाजाकडे पाहीले तर तो या गढूळ पाण्याप्रमाणेच भासतो, जरी त्यात शुद्ध पाण्याचे विखुरलेले कण असतील......! आज घरी प्रयोग करुन बघा, आणि उत्तर उद्या द्या वा नका देवू!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|