Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 17, 2007

Hitguj » Views and Comments » General » Haldi-Kunku and Alcohol Drinking by Marathi Women in America » Archive through January 17, 2007 « Previous Next »

Aschig
Tuesday, January 16, 2007 - 2:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

storvi चा मुद्दा मागेच राहिला की! हळ्दी-कुंकु ही प्रथाच बंद करावी का? (कारण ती विधवांना अपमानास्पद आहे).

मी म्हणेन की विधवांनी त्यांना हव्या त्या प्रकारचे नवे get togethers सुरु करावेत. cricket-lovers एकत्र येणे हे कबड्डी आवडणार्यांचा अपमानाखातीर हे काही पटत नाही. निदान कबड्डी वाल्यांनी तरी तसे वाटुन घ्यायची काहीच गरज नाही.

हळ्दी-कुंकवात न पुजेचा संबंध आहे ना धर्माचा. ती केवळ एक रुढी आहे, आणी रुढ्या बदलायच्याच. ज्यांना नाही बदलायच्या, त्यांनी त्यांना हव्या तश्या त्या continue कराव्यात.

american_desi , मैत्रिणी बरोबर wine पिणे आणी तमाशाला जाणे ही जरी freedom ची लक्षणे असली तरी दोन्हींना मी एका पारड्यात टाकणार नाही.


Satishmadhekar
Tuesday, January 16, 2007 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या बायका हळदीकुंकवाच्या कार्यक्रमामध्ये अपेयपान करत असतील किंवा अपेयपानाच्या कार्यक्रमामध्ये सोय बघून हळदीकुंकवाचा कार्यक्रम उरकून घेतला असेल?

अपेयपान सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये किंवा इतर केंव्हाही वाईटच! परंतु अभक्ष्यभक्षणापेक्षा कमी वाईट! अपेयपानामुळे माणूस फक्त (बहुतेकवेळा) स्वत:चेच नुकसान करून घेतो, पण अभक्ष्यभक्षणामध्ये जिभेचे चोचले पुरविण्याकरीता निष्पाप प्राण्यांची क्रूरपणे हत्या केली जाते!


Meenu
Tuesday, January 16, 2007 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी म्हणेन की विधवांनी त्यांना हव्या त्या प्रकारचे नवे get togethers सुरु करावेत.>>> त्यापेक्षा विधवांनापण हळादीकुंकु समारंभाला बोलावुन हळदी कुंकु द्यायचं. नवरा गेला तर त्याचा इतका गाजावाजा कशाला करायचा मरणारच आहे की प्रत्येक जण ..
आणि लावलं त्यांना हळदीकुंकु तर मेलेला नवरा जिवंत होऊन परत यायची भिती नाहीये दिवे घ्या


Bee
Tuesday, January 16, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Nanduk_ind छान पोष्ट!!!!

विधवा स्त्रियांनी वेगळा ग्रुप तयार करावा असे म्हणने आणखीनच अपमानास्पद वाटते. शिवाय तरुण विधवा स्त्रियांची आजूबाजूला दिसणारी संख्या खूपच कमी असते. मग असा ग्रुप तयार होणे अशक्यच आहे. वृद्ध विधवा स्त्रियांना ह्यात कमी लेखले काय की पुढे केले काय त्यांनी त्यांचे जीवन जगून घेतले असते. खरा प्रश्न फ़क्त तरुण विधवांचा असतो. अशा स्त्रियांना आपल्यात सामावून घेणे माणुसकीला शोभून दिसते.


Nandini2911
Tuesday, January 16, 2007 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे मी माझ्या आईचे उदाहरण देऊ इच्छिते.. तिची एक मैत्रीणिचा नवरा चार वर्षापूर्वी वारला. तिने घराबाहेर जाणं पूर्णपणे सोडलं होतं. आई हळदी कुंकवाच्या दिवशी त्याना घेऊन आली म्हणाली दरवर्षी आपण एकमेकीना मदत करतो.. या वर्षी नाही आलीस तर मी हळदी कुंकू करणार नाही.
असंही सांगितलं.. त्यावर्षी आमच्या घरी येणारी प्रत्येक सवाष्ण नारज होती.. कित्येकानीइ तर आडून बोलून दाखवलं..
पण तरीही आई दरवर्षी त्याना बोलावतेच.. आणि त्या येतात.


Aschig
Tuesday, January 16, 2007 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनि, तुझ्या आईचे उदा. प्रशंसनीय आहे. आडुन बोलण्यापेक्षा सगळ्याच बायका तसं करु लागल्या तर खुपच छान होईल.

bee , वरील प्रमाणे नाही झाले तर वीधवांनी तसे होण्याची वाट बघत बसायची का? ज्याप्रमाणे पुरुशांनी हजार म्हंटले की स्त्री-पुरुष समानता आहेहवी इ., तरी जोपर्यंत स्त्रीया स्वतः ते म्हणत नाहीत तो पर्यंत खरी समानता येणे शक्य नाहि त्याचप्रमाणे वीधवांनी देखील केवळ नवरा मेला म्हणुन त्यांचे आयुष्य संपले असे मानणे बंद केले पाहीजे. आणी आपली पीढी आपल्या वागण्यातुन ते साध्य करायला हातभार लावु शकेल.


Ajjuka
Tuesday, January 16, 2007 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळात ही दोन गृहितकेच मला थोडी घोटाळ्याची वाटतायत...
१. हळदी-कुंकू हे काहीतरी प्रचंड पवित्र इत्यादी आहे.
२. वाईन अथवा दारू पिणे हे पावित्र्यभंग करणारे आहे.

कारणे खालीलप्रमाणे..
१. हळदी-कुंकू आणि पावित्र्य
याठिकाणी देवघरातल्या वस्तू वापरल्या जातात व सगळ्या जणी देवाला नमस्कार करतात म्हणून हे पवित्र आहे का? पण ह्याच सगळ्या जणी केवळ आपला नवरा जिवंत आहे म्हणून नवरा जिवंत नसलेल्या व्यक्तीच्या जखमेवर मीठ चोळत मिरवतात. देवघरातले हळदीकुंकू मिरवण्यासाठी वापरतात. नवरा जिवंत असणं हे यांच सगळ्यात मोठ कर्तुत्व असल्याप्रमाणे नवरा जिवंत नसलेल्या बाईचं वागणं judge करायचा यांना अधिकार मिळतो. कसलं डोंबलाचं पावित्र्य..
नवरा जिवंत नसलेल्या वा नवरा सोडलेल्या (या बायकांच्या मते नवर्‍याने सोडलेल्या...) प्रत्येक बाईने बिचारं होऊन रहावं. आनंदात राहू नये असे यांचे विचार असतात... केवढे हे पावित्र्य...
याच बायका हजर नसलेल्या प्रत्येक बाईबद्दल gossiping करतात.. कुठेय पावित्र्य?
हळदीकुंकू हे बायकांचे gettogether चे एक साधन आहे. जेव्हा ते सुरू झाले तेव्हा देव धर्म इत्यादी बहाणे तयार करून ते सुरू झाले तेव्हा शिल्पा म्हणते तसं मुळात त्याचा relevance आजच्या काळात किती हे तपासायचीच गरज आहे. पावित्र्य इत्यादी गोष्टी म्हणजे निव्वळ भाबडा romanticism आहे.

२. वाईन अथवा दारू पिणे आणि पावित्र्य
वाईन वा दारूचे दुष्परिणाम सर्वांनाच माहित आहेत तेव्हा ते लिहित नाही पण moderate प्रमाणात घेतली गेली तर त्याचे काही चांगले परिणामही आहेत. तेव्हा तो मुद्दा बाजूला..
वेदांमधे यज्ञाच्या वेळी किंवा नंतर सोमरसपान करण्याला मुभा आहेच की.. मग अचानक ते अपवित्र कसं काय झालं?
मुळात ही गोष्ट वाईट नाही पण अति तिथे माती हे कुठल्याही बाबतीत खरेच आहे की.
मलातरी यात पवित्र वा अपवित्र काहेच जाणवत नाही.

हे मान्य आहे की ही usual practise नाही, सवयीचे नाही म्हणून ते खटकायला होते. पण म्हणजे ते चूकच आहे असे नाही आणि बरोबर आहे असेही नाही. हा पूर्णपणे त्य त्य group च्या choice चा प्रश्न आहे.




Asami
Tuesday, January 16, 2007 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परंतु अभक्ष्यभक्षणापेक्षा कमी वाईट!

>> पुढचा भाग ह्या link मधे बघा.
अभक्ष्यभक्षण

Ajjuka
Tuesday, January 16, 2007 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी न लिहिलेल्या गोष्टी माझ्या पोस्ट ला जोडू नयेत कृपया. अभक्ष्यभक्षणापेक्षा कमी वा जास्त वाईट असे मी काहीही म्हणले नाहीये. मुळात तो मुद्दाच मी काढला नाहीये.
आणि non veg चा फाटा कशाला फोडतोयस बिप्स? त्यावर हव्वे तेवढे वाद झालेले आहेत ना!
इथे मुळात कशाला पवित्र म्हणायचं आणि कशाला नाही याचाच घोळ आहे. superficial गोष्टींवरून हे ठरतंय.. problem तो आहे..


American_desi
Tuesday, January 16, 2007 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lokaho,

Thank you very very much for sharing your honest views on this topic. Based on this I have concluded that,

1) Take it easy. Things will change with time and let it as along as it does not become a addiction. May be when going will get tough ... again we will go back to original roots of the festivals.

I am going to start another thread now ... Tamasha and Marathi Sanskriti ...

Subject thoda borderline var ahe ... pan apan sagale open minded asalayne .. charcha changali hoil ashi apeksha ahe.

Storvi
Tuesday, January 16, 2007 - 8:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>त्यापेक्षा विधवांनापण हळादीकुंकु समारंभाला बोलावुन हळदी कुंकु द्यायचं. बरोब्बर! पण त्या बायकांचा त्यानेही अपमान होतो. म्हणजे आमच्या लहानपणी आई हळदी-कुंकू करायची तेंव्हा एक आजी आल्या. सगळ्या बायकांना हळदी-कुंकु देण्याचे काम माझ्याकडे होते. मला काय माहित मी त्या आजींना ही लावलं त्या कावर्या बावर्या झाल्या आणि आजुबाजुच्या सगळ्या बायका माझ्या आंगावर व्हस्कन ओरडल्या. नंतर मला कारण कळले. त्या आजीम्चे मन दुखावल्याचे मला केवढे वाईट वाटले. मग वाटले त्यांना बोलावलेच का? दाखवायला आम्ही हळदी-कुंकू घेतो तुम्ही बसुन बघा? वर नन्दिनी ने सांगितल्याप्रमाणेच माझ्या आईने त्यांना आवर्जुन बोलावले, पण त्यांना हळदी कुंकू लावुन घ्यायचे नव्हते. हेतु स्तुत्य असला तरीही चुकुन त्यांचे मन दुखावले गेलेच ना? मग त्यापेक्षा सरळ तिळगुळाला फ़क्त बोलावले आणि हळदी-कुंकुचे नावही नाही काढले तर किती बरे होईल? किंवा असेलच काही बायकांना अट्टाहास एवढा तर एका ठिकाणी हळदी-कुंकू ठेवुन द्याव. वाटलंच एखादीला तर घेईल आपण होऊन. बाकीचे सोडतील. पण तेही चालत नाही ना. मग नं ठेवलेलेच बरे.
माझ्या एका मैत्रिणीला म्हणाले की मला हळदी-कुंकू देणार नसलीस तर मी येते, तर ती राहुदे म्हणाली.
म्हणजे लोकांना तसेही चालत नाही. मग त्यापेक्षा न केलेलेच बरे...





Deepanjali
Tuesday, January 16, 2007 - 8:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पा ,
तुझ्या अगदी प्रत्येक शब्दाला अनुमोदन ! ::
अज्जुका ,
I guess असामीने दिलेली link ही satishmadhekar या user च्या 12:05 ला लिहिलेल्या post च्या संदर्भात आहे .


Sashal
Tuesday, January 16, 2007 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी लिहीतेय ते थोडं generalized विषयावर होईल ..

पण आपल्याकडे बायकांच्या आयुष्य हे मुलगी, बायको आणि आई ह्या categories मध्येच define केलेलं आहे .. ह्यापेक्षा स्वतंत्र अस्तित्वच नाहि त्यांना असं समजलं जातं .. आणि त्यातून सौभाग्यवति असणं dominates anything else .. त्यामुळे सगळ्या प्रथा, धार्मिक संस्कार इ. साठी सौभाग्यवति असणं हा eligibility criteria आहे .. आणि अर्थातच हा just किंवा rational approach नाहि .. त्यामुळे हळदी - कुंकू सकट खरंतर बर्‍याच प्रथा बंदच करायला हव्यात ..


Maitreyee
Tuesday, January 16, 2007 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा सही चाललय:-) मला पण स्तोर्वि चे सर्व मुद्दे पटले.

Sunidhee
Tuesday, January 16, 2007 - 10:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हळदि-कुन्कु कशाला करावे हा मुद्दा मांडला गेलाय. हल्लिच्या काळात तो प्रघात तसाही कमी झाला आहे का? कारण मी बर्‍याच वर्षात हा शब्द्च ऐकला नाहिये, अगदी भारतात पण. असो.
पण दारू, त्याबद्दल तर मला तर नेहमी वाटतं, दारू तरी कशाला घ्यावी. त्यात काही पवित्र-अपवित्र नसलं तरी ती केव्हा जास्त होइल आणि चढेल हे सांगता येत नाही. मग पिणार्‍याला त्रास, त्याच्या बरोबर असलेल्यांना त्रास आणि बी म्हणतो तसं सवयीच व्यसन झाल तर पुर्ण घरादाराला त्रास. म्हणुन वाटते, वाट्टोळं होइलच अस जरी नसल तरी, सुरुवात तरी का करावी अश्या सवयींची?



Lalu
Tuesday, January 16, 2007 - 10:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतातले माहित नाही, पण इथे तरी होतात अजून. कदाचित देशापासून लांब असल्यामुळे प्रथा चालू ठेवाव्यात असे मुद्दाम वाटत असेल.

जो स्त्रीवर्ग हळदी कुंकू करतो त्या वर्गाला ते जसे पूर्वापार चालत आले आहे तसेच होत रहावे असेच मुख्यतः वाटत असावे. इथे storvi ने लिहिल्या प्रमाणे मते असलेल्या स्त्रियांनी ते कधीच बन्द केले आहे. आता यात दिलेल्या उदाहरणांपैकीही स्त्रिया असतील की ज्या विधवांना बोलावतात पण त्यातून पुढे वर लिहिल्याप्रमाणेच अप्रिय घटना होतात. ही प्रथाच अशी आहे की त्याचे स्वरुप बदलता येणे अवघड आहे(वरचे storvi च्या मैत्रीणीचे उदाहरण), ती बंदच झाली पाहिजे. हळदी कुंकू करणारा स्त्रीवर्ग अजून काही काळ तरी असेलच. ज्यांना हे पटत नाही त्यांनी जाणे टाळावे.

अरे, पण ते अमेरिकन्_देसी भलतेच conclusion काढून निघून गेले!


Bee
Wednesday, January 17, 2007 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्याच प्रथा बंद केल्या तर रिति रिवाजांपासून जो निर्भेळ आनंद मिळतो तो निघून जाईल. हळदी कुंकू सारख्या प्रथा निदान घरात डांबुन ठेवलेल्या स्त्रियांन्ना बाहेरची मोकळी हवा खायला चांगल्या उपयोगी पडतात. पुर्वजांनी काहीतरी विचार विनिमय करुनच प्रथांचा पायंडा पाडला असे मला तरी वाटते. त्यावेळेसची परिस्थिती पाहून त्यांनी प्रथा निर्माण केल्या असतील हे तुम्हालाही पटत असेल. भारतात असे बरेच जण आहेत ज्यांना ह्या प्रथा मनापासून आवडतात. अतिसुशिक्षितांनी त्या आवडतात. एखाद्या विधवेला हळदी कुंकु लावणे जर आवडत नसेल तर सगळ्याच जणींना तसे करणे आवडणार नाही असा निष्कर्ष काढणेही चुकीचे आहे. स्तोनी जे उदाहरण दिले ते एका वृद्ध स्त्रिचे दिले. एखाद्या तरुण विधवेला हळदी कुंकु लावले तर कदाचित तिला आपले सौभाग्य परत यावे असेही वाटेल. अर्थात ती पुनर्विवाहाचा विचारही करेल. प्रथांचे मुळ खूप खोलवर रुजलेले असते. त्या अनादीन काळापासून चालत आलेल्या असतात. त्यांना सहजासहजी मरण नसते. सतीची चाल ही एक अमानुष प्रथा होती. ती बंद पडली हे चांगलेच झाले. पण माझ्या वाचनात इतर कुठल्या प्रथा बंद पडल्याचे आलेले नाही. अधुनमधुन कुठेनाकुठे त्या पाळल्या जातातच. बदलत्या काळानुसार आणि गरजेनुसार त्यांच्यात आधुनिकता येते पण त्या बंद पडत नाही.

Saavat
Wednesday, January 17, 2007 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देव... अध्यात्म.... ऋषी...संत..गुरू..शिष्य?
जग..समाज..धर्म..समाजकारण.. अर्थकारण.. राजकारण.. संस्कृती...देऊळ... रुढी.. परंपरा.. अंधश्रध्दा?
स्वर्ग.. नरक.. अमृत...सोमरस...दारू... wine.... alcohol .. अपेयपान..भक्ष.. अभक्ष?
मूल..स्त्री...पुरूष....पशू....पक्षी...दगड?
सुख...पैसा....मनोरंजन...घर....गाडी...बंगला..करिअर..प्रसिध्दी..मानसन्मान.. अपेक्षा..दुख:..समाधान...शांती?

सुरुवात कुठून करावी?नक्की काय बरोबर आहे? माझ नक्की काहीतरी चुकतय. पण कुठ चुकतय कळत नाही, माझ गाड अडून बसलय, काय कराव उमजत नाही!
मित्रांनो तुमच्या कडे फ़ार आशेने पहातो आहे, प्लिज मदत करा... धन्यवाद! अर्थात आपल्या ह्या "हळदी-कुंकूवाच्या",चर्चेतूनच! नवीन B.B. न उघडता त्याच काय आहे, "कुणालाही,कितीही नवीन B.B. उघडता येतात", ही 'मायबोलीची' जुनी परंपरा-प्रथा-रुढी-रीतीरिवाज आता बंद होणार आहे!... DDD!


Zakki
Wednesday, January 17, 2007 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला अज्जुक्का यांचे लिहीलेले एकदम आवडले.

मी इथे का लुडबूड करतो?

कारण मला यात vested interest आहे.

हळदी कुंकू करा किंवा नका करू. पण महिन्यातून निदान एक दिवस तरी फक्त बायकांनी (आपापल्या लहान मुलांना घेऊन) एकत्र भेटावे. हळद, कुंकू लावा, बुक्का लावा, काऽहीहि खा, का्हीहि प्या. पण सुखरूप, शक्यतो जरा उशीरानेच, पण घरी या!

म्हणजे आम्हा पुरुषांना जरा मोकळेपण मिळेल. - मोह दूर असल्याने, मधेच interruptions नसल्याने, ध्यान चिंतन, मनन, अध्यात्म इ. साठी!




Robeenhood
Wednesday, January 17, 2007 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला अज्जुक्का यांचे लिहीलेले एकदम आवडले.
>>>मुंगीने तर मेरू पर्वत गिळला नाही ना? बोवाजी २००७ हे तहाचे वर्ष आहे की काय?

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators