Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 02, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Saddam husain yaanchi faashi yogya ki ayogya? » Archive through January 02, 2007 « Previous Next »

Jaymaharashtra
Saturday, December 30, 2006 - 8:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईराकचे हुकुमशहा व पुर्व राष्ट्रपति सद्दाम हुसैन यांना आज सकाळी फ़ाशि दिले गेले अमेरिकेने पुन्हा एकदा स्वतःचे वर्चस्व अनैतिक मार्गाने सिद्ध केले.
ईराकवर आक्रमण करण्यामागे अमेरिकेचा काय हेतु होता हे तर आता सगळ्या जगाच्या लक्षात आलेच आहे. दुर्बल देशांवर आक्रमण करुन त्यांना आपल्या अधिपत्याखालि ठेवुन त्यांचा पुरेपुर वापर आपल्या फ़ायद्यासाठी करुन त्यांचे शोषण करणे हाच आमेरिकेचा एककलमि कार्यक्रम आहे.
नरसंहाराचा आरोप ठेवुन सद्दामना फ़ाशि दिले पण ज्या बुशने स्वतःच्या स्वार्थासाठि आणि स्वतःचि पाठ थोपटुन घेण्यासाठि हजारो निरपराध आणि निष्पाप ईराकि नागरिकांचे प्राण घेतले त्या नराधम बुशला कोण फ़ाशि देणार?
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Chyayla
Saturday, December 30, 2006 - 9:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी बरोबर आहे जयमहाराष्ट्र मला तर त्याची फ़ाशी अजिबात पटली नाही, काही मुळ प्रश्न

मुळात अमेरिकेला काय अधिकार आहे त्या देशामधे लुडबुड करण्याचा?

स्वता:ला जागाचे पोलिस किन्वा न्यायाधीश दाखवण्याचा प्रयत्न. जर सद्दाम चा अपराध हा की त्याने १४० शियान्चे व कुर्द लोकान्चि हिन्सा केली तरी ते त्या देशाच्या सार्वभौमत्वाच्या मर्यादेत येते. त्यात ईतर राष्ट्रानी न्याय करण्याचा हक्क नाही. असे तर बरेच हुकुमशहा जगात मिळतील मग त्याकडे का दुर्लक्ष.

ईराक जवळ सन्हारक रासायनिक शस्त्रे, अण्वस्त्र असल्याचा दावा ज्याधारे त्यानी ईराकवर हला केला तो पोकळ निघाला त्यामुळे नैतिक पातळीवर बुश केन्व्हाच पराभुत झाले.


Ajjuka
Sunday, December 31, 2006 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्या क्रूर कामांसाठी त्याला फाशी दिली... त्याच्या कैक पटीने क्रूर कामे त्या बुशने केलीयेत.. मग त्यालाही तोच न्याय का नको? इथे बुश, क्लिंटन व सर्व अध्यक्षांना मिळून बुश ही संज्ञा वापरली आहे. जगाला शहाणपण शिकवणे, इतर संस्कृती व देश यांना वेळोवेळी कमी लेखून त्यांचा अपमान करत रहाणे, स्वतःची महासत्ता ही ओळख टिकवण्यासाठी कुठल्याही थराला जाणे यामधे एकही अध्यक्षाने कसर ठेवली नव्हती... WTC मधे निरपराध मेले... नेहमी तेच मरतात.. पण US as a nation deserved it. दुर्दैवाने त्यानंतरही अक्कल आलीच नाही.. इराक प्रकरणात स्वतःचे पूर्ण हसे करून घेतल्यावरही... तेच...
american arrogance कुठल्या थराला पोचून मग संपणारे?
बाकी काही नाही.. अमेरिकेचे.. विनाशकाले विपरीत बुद्धी असे चालले आहे..


Jaymaharashtra
Sunday, December 31, 2006 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्या अज्जुका
अगदि बरोबर.पण ज्या सद्दामने काश्मिर प्रश्नी कायम भारताचि बाजु घेतली आणि भारताचे परम मित्र असल्याचा प्रत्यय वेळोवेळी दिला अश्या थोर योध्याला इतक्या निर्दयपणे,आणि असंवैधानिक मार्गाने फ़ाशि दिले गेले आणि या वर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इतकि गुळमुळित प्रतिक्रिय द्यावी या सारखी लाजिरवाणी गोष्ट दुसरि नसावि.
आपलि परखड मते मांडायला आपण कधि धजावणार?............................
अमेरिका महासत्ता आहे म्हणुन तिचि तळि उचलुन धरणे कितपत योग्या आहे? आणि शेवटि जे चुक आहे ते चुकच ठरते. अमेरिकेने कितिहि ओरड केलि तरि तिचे खरे स्वरुप आत्ता सर्वश्रुत झाले आहे.पण त्याचा स्विकार करायला कुणिहि धजावत नाहि.....................
सद्दामना फ़ाशि दिल्याने ईराकचे काय भले होणार आहे त्याचे मुर्तिमंत उदाहरण अफ़गाणिस्तानच्या स्वरुपात आपल्या आणि पर्यायाने जगाच्या समोर आहेच.
ज्या सद्दामने कायम ईराकच्या प्रगतिचा विचार केला तेथिल स्त्रियाना मानाने जगायला प्रव्रुत्त केले.सर्व इस्लामि देशांमधे ईराक या एकाच देशामधे सद्दामच्या काळात स्त्रियाना बुरखा वापरायचि सक्ति नव्हति. पण शेवटि फ़ितुरिचा शाप प्रत्येक थोर योध्याच्या नशिबि नियतिनेच लिहिलेला असावा बहुतेक आपले" शिवाजि महाराज,संभाजि महाराज" तसेच पेशवाईला देखिल फ़ितुरिचा शाप होताच सद्दामचा घात देखिल या फ़ितुरिनेच केला याचे दुःख जास्त आहे. आता ईराकि नागरिकांना सद्दामच्या नसण्याचि फ़ार मोठि किंमत मोजावि लागणार हे मात्र नक्कि!
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Drabhi04
Sunday, December 31, 2006 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

usa swatala jagache police samajte...phar shane rahtat uas madhe....saglyana tuchetene vagvtat jagat janu hech jagache malak....saddam la phashu deun tyala hero kela tyani...usa che nuksan thodya dibvsat kalel tyana

Santu
Sunday, December 31, 2006 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सद्दाम ल फ़ाशि हि इराक़ सरकारने दिली
त्यात अमेरिकेचा काय सबंध.
त्याला फ़ाशी दिलि हे फ़ार चांगले झाले.
बरयाच वर्षानंतर कुर्द लोकांना न्याय मिळाला.


Santu
Sunday, December 31, 2006 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सद्दाम ला फ़ाशी दिले तो unsensored vidio
http://one.revver.com/watch/130549 वर पाहायला मिळेल

Jaymaharashtra
Sunday, December 31, 2006 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतु,
प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर मला तुमचि प्रतिक्रिया वाचुन आश्चर्य वाटले पण त्याही पेक्षा मला जास्त वाईट वाटले. आज पर्यंत आपण मांडलेलि सर्व मते मला पटली आहेत.
मला एक सांगा सद्दामना फ़ाशि देण्याचा अधिकार अमेरिकेला कुणि दिला? रासायनिक आणि जैविक हत्यारे बाळगण्याच्या कारणावरुन अमेरिकेने ईराकवर आक्रमण केले आणि कित्येक निरपराध ईराकि नागरिकांचे त्यात बळी गेले.त्या नागरिकांच्या हत्येचे पातक अमेरिका आपल्या माथी घेणार आहे का?आणि या हत्यांबद्दल फ़ाशि कुणाला देणार?
सारे जग स्वतचि खासगि मालमत्ता असल्याच्या थाटात अमेरिका एकामागुन एक आक्रमणे करते आहे.याला थोपवणे जरुरि आहे कि नाहि? सद्दामनि जे काहि केले तो त्यांच्या देशाचा आंतरिक मामला होता त्यासाठि सद्दामवर आरोपपत्र ठेवुन त्यांना फ़ाशि देण्याचा अधिकार अमेरिकेला कुणी दिला. आज अमेरिका कुवैतचे ज्या प्रकारे शोषण करते आहे ते आम्हि स्वतःच्या डोळ्यानि बघतो आहे.
सद्दामनि जो नरसंहार केला त्याचे मी समर्थन मुळीच करु ईच्छित नाहि. पण त्यासाठि अमेरिकेने हुकुमशाही पद्धतिने एका हुकुमशहाला संपविले हे सत्य नाकारता येणार नाहि!
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Vijaykulkarni
Sunday, December 31, 2006 - 10:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इस्लामी मूलतत्ववाद्याना शरण न गेलेला सद्दाम हा एकमेव अरब नेता होता.
महीलाना स्वातन्त्र्य देण्याच्या बबतीत ही तो अरबान्मध्ये फारच पुढे होता.
ओसामाला मुशर्रफ च्या आश्रयाखाली जिवन्त सोडून
सद्दाम ला फाशी देणे म्हणजे



Shendenaxatra
Monday, January 01, 2007 - 12:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कितीही झाले तरी हा एक खुनशी व निर्दय मनुष्य होता. अमेरिकेने त्याला शस्त्रे पुरवली पण ती मदत स्वीकारायाचा व आपल्याच लोकांविरुद्ध ती वापरायचा निर्णय ह्याच नराधमाचा होता. ज्या देशात तो घडला तिथे असंस्कृत लोक रहातात. देशाचा नेता बनायला खून, कारस्थानेहे करावेच लागते. हा इसम त्यातही मेरुमणी. आपल्या शत्रूंबरोबर विश्वासू सहकारी डोईजड होतायत असा संशय येताच त्यांचा काटा काढणे, स्वत:च्या नातेवाईकांना मारणे हे तर ह्याच्या हातचे खेळ.

एकदा का अमेरिकेच्या दावणीला बांधून घेतले की पोसणारही तीच आणि वेळ आली की कापणारही तीच. एखाद्या टोळीयुद्धात जसे आज छोटा राजन मरणार तर उद्या मोठा शकील तसेच हे टोळीयुद्ध आहे.

असल्या क्रूरकर्म्याला मारल्याने काही नुकसान झालेले नाही. नेता असताना मारे निधर्मी बनला होता कारण स्वत:ला सोयीचे होते. पण अटक झाल्यापासून एकदम धर्मात्मा बनला होता. अल्लाहु अकबरचा जाप, जेहादची भलावण मरताना कुराण हातात वगैरे. सगळी ढोंगे.
ह्याला अमेरिकेनेच पुढे आणले होते म्हणून अमेरिकेनेच मारले. चालायचच.


Kedarjoshi
Monday, January 01, 2007 - 1:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिरीयाना पिक्चर मध्ये एका अरब राष्ट्राचे दोन राजपुत्र दाखवीले आहेत. त्यातील एक जन जो मोठा असतो तो अमेरिका सोडुन चिन च्या पाठीमागे जातो कारण त्याला नुसती संपत्ती नाहीतर त्याचा देश ही सुधारायचा असतो. पण अमेरिकेला तसे होऊ द्यायचे नसते. ते त्याचा लहान भावाला हाती धरुन मोठ्या भावाचा खुन करतात. OIL Business .

सद्दाम काही फार चांगला न्हवता. तो मेला तरी काय नी न मेला तरी आपल्याला काय? सद्दाम ची तुलना त्या मोठ्या भावाशी नाही. पण तो त्या देशाचा अंतर्गत प्रश्न होता.

उद्या भारतावर कब्जा मिळवल्यावर लालू ला देखील अमेरिका मारणार काय?

मिडल ईस्ट मधील एकमेव सुधारलेले राष्ट्र म्हणजे लेबनान. पण ते पुर्न मुस्लीम नाही. अर्ध ख्रिश्चन आहे.

ईराक सुधारणे कडे वळु पाहात होते. आता साहेब ईराण कडे वळनारच. (कारण त्यातला त्यात तो देश सध्या चांगला आहे) (रिड ख्रिश्चन विरोधी आहे).

शेवटी आपल्या सहीत सर्व थर्ड वल्ड कंट्रींज ना अमेरिका हे बाजारपेठ म्हणुन पाहात आहे.

मी त्यला मारताना CNN Live पाहात होतो. एका analyst ने म्हंटले देखील की HE went for oil and did finished what his father started . & thats the fact


Dineshvs
Monday, January 01, 2007 - 3:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथे मला फक्त एक मुद्दा मांडायचा होता, कि सद्दामने जी क्रुरकर्मे केलीत, ती जगाने बघितली नाहीत, पण त्याला फाशी देण्याचा प्रसंग सर्व जगाने बघितला.
आता त्याचे परिणाम काय होणार आहेत, ते दिसतीलच.


Dineshvs
Monday, January 01, 2007 - 8:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घाशीराम कोतवालाची जी सीडी आहे, त्यात भास्कर चंदावरकरांच्या निवेदनात हा मुद्दा आलाय.
घाशीराम वारंवार निर्माण केला जातो, आणि त्याचा शेवटहि असाच होतो.


Laalbhai
Monday, January 01, 2007 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सत्तेची, वर्णश्रेष्ठत्वची, पैशाची धुंदी चढलेल्या अनेकांची मस्ती विसाव्या शतकाने उतरवली. एक अमेरिका बाकी राहिले होते. अनेक पराभव, मानहानी सोसूनही केवळ काळ त्यांच्या बाजूने होता म्हणून अनेक युद्धे हरूनही त्यांचे वर्चस्व राहिले. As someone said, It's just matter of time.........

Shendenaxatra
Monday, January 01, 2007 - 8:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सद्दामला फाशी दिले म्हणून भारतातले मुसलमान मोर्चे, बुशच्या प्रतिमेचे दहन, ईद न साजरी करणे वगैरे प्रकार करत आहेत. (बुशला ह्या घटना पाहून सद्दामला फाशी दिल्याचा विलक्षण पश्चात्ताप होत असेल हे तर उघड आहे!)
पण हे मुसलमान नक्की का चिडले आहेत? सद्दाम सत्तेवर असताना त्याने बुरख्यावर बंदी घातली होती ती ह्यांना पसंत होती का? त्याचे निधर्मी सरकार आवडत होते का? वाटत नाही. शिया सत्तेत येत आहेत म्हणून दु:ख आहे का? वाटत नाही. भारतातील मुस्लिम जुनाट धार्मिक रुढींमधे गुरफटलेले आहेत. त्यामुळे इराकमधे धर्मपिसाट सरकार आले तर ह्यांना बरेच वाटले पाहिजे. इराकच्या जनतेविषयी कळवळा आहे म्हणावे तर जेव्हा सद्दाम अत्याचार करत होता ह्यांनी मोर्चा काढल्याचे वाचले नाही.
तेव्हा हा क्षोभ नक्की कशाविरुद्ध आहे?


Kedarjoshi
Monday, January 01, 2007 - 10:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भारतातले मुसलमान मोर्चे, बुशच्या प्रतिमेचे दहन, ईद न साजरी करणे वगैरे प्रकार करत आहेत.>>>>.
LOL
हे अगदीच अपेक्षित होते. दुसरे ते काय करु शकतात. आता फक्त त्यांनी त्याचा बदला बाकीच्या भारतीय जनतेवर काढु नये.


Savyasachi
Tuesday, January 02, 2007 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ठाण्यातल्या आमदाराने एक भला मोठा बोर्ड लावला आहे. त्यात 'शहीद' सद्दामला 'पाठिंबा' दर्शवला आहे सद्दाम म्हणेल काय साला दिन आयेला है :-)

Santu
Tuesday, January 02, 2007 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जय महाराष्ट्र
इथे सद्दाम चांगला होता का नाहि हा प्रश्न नाहि.
किंवा बुश वाईट आहे हाही नाहि. व्यक्तीगत रागालोभा ला आंतरराष्ट्रिय
कुटनितित महत्व नाहि. आपल्या राष्ट्राचे काय हित आहे हे सर्वात महत्वाचे. येणारया २१व्या शतकात हंटिग्टन ने म्हटल्या प्रमाणे clash
of civilisation चा प्रचंड प्रमाणात संघर्ष होणार आहे. मुस्लिम व मुस्लिमेतर असा हा संघर्ष साधारण पणे असणार आहे यात आपण हिन्दु
बहुल राष्ट्र यांचा natural ally हा अमेरिका च आहे न की मुस्लिम बहुल राष्ट्रे. या संघर्षा च्या अंधुक खुणा. ९११,किंवा भारतात होणारे दह्शत वादि हल्ले या आहेत. अजुन हा संघर्ष बाल्यावस्थेत आहे कारण मुसल्माना च्या
हातात अतिसंहारक अशि अस्त्रे atom bomb,hyadrogen bomb
वैगेरे नाहित पण पुढे अशी परिस्थीती राहणार नाहि. हि अस्त्रे आत्ता पाकिस्तान,इराण,यांच्या कडे आहेत.पुढे हि सर्व मुस्लिम राष्ट्रा कडे
जाणार यात काही शंका नाहि्इ अस्त्रे जेव्हा अतिरेक्याच्या हाती पडतिल
तेव्हा हा संघर्ष एका टोकाला जाणार आहे.यात जो बलवान तोच टिकणार
आहे.
काहि लोकांना सद्दाम नी काश्मिर प्रश्नी आपल्याला सद्दाम नी पाठींबा दिला म्हणुन त्याच्या बद्दल प्रेम आहे. पण आता संदर्भ बदलेले आहेत.
एकिकडे अमेरिका व इराक़ मधिल शिया बहुल सरकार व दुसरिकडे
कैदेत असलेला सद्दाम यात अमेरिकेची बाजु घेणेच आपल्या हिताचे.
सद्दाम हा खर तर अमेरिकेनी इराक़ वर कबजा केला त्यादिवशिच राजकीय द्रीष्ट्या मेला होता पण शारिरिक द्रुष्ट्या तो परवा
मेला एवढेच.


Santu
Tuesday, January 02, 2007 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेंडेनक्षत्र
पण हे मुसल्मान का चिडले))))) हे चि डले कारण सद्दाम हा सुन्नि होता
जरि इराक़ मधे शिया मुस्लिम बहुसन्ख्य होते तरी सद्दाम मुळे
सुन्नि चे वर्चस्व जास्त होते. आता शिया मुसलमान लोकशाही
मधे वर्चस्व गाजवणार म्हणुन
भारतियमुसलमानाच्या(भारतात सुन्नि बहुसंख्या आहे)
पोटात गोळा
उठला आहे.


Santu
Tuesday, January 02, 2007 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बुशने तेला साठि इराक़ वर हल्ला केला यात काहि
शंका नाहि.पण स्वदेशा चे हित पाहणे यात गैर काहिच
नाहि.बुश चे कामच आहे.
बुश काहि इर्राक़ चे भले करायला अध्यक्ष झाला नाहि.

चिन च्या वाढत्या सामर्थ्या ला पायबंद घालण्या साठि जास्तित जास्त
तेल क्षेत्र स्वताच्या ताब्यात ठेवणे हे पुढिल राजकारणाच्या
द्रुश्टिने जरुरिचे आहे.
नाहितरी चिन सुध्दा पाकिस्तानात gwaader port त्यासाठिच विकसित करत आहे.



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators