|
Chyayla
| |
| Monday, December 11, 2006 - 8:53 pm: |
| 
|
झक्कि मी आपल्या योग्यतेचा नाही (घ्रुणतेच्या नव्हे चान्गल्या अर्थाने) पण आता मला पण घ्रुणतेचा सामना करावा लागतोय ते का मला खरच कळाले नाही. अज्जुका, पहीली गोष्ट की मी त्या पोस्ट मधे विनोद केला नव्हता मी कन्फ़्युशियस चा एक किस्सा सान्गितला होता, दुसरी गोष्ट प्रतिक्रीया द्या पण चान्गल्या शब्दात द्या अगदी डोक गरगर फ़िरवण्याची काहीच आवश्यकता नव्हती, तुमचा प्रतिक्रिये पेक्षा उगीच आणी अगदी निष्कारण त्रागा, राग दिसुन येतो त्याचे मला वाईट वाटले, अरे मी कधी तरी तुम्हाला असे बोललो आहे का? तरी माझ्या मनात तुमच्याबद्दल मुळीच राग नाही, मी हा विषय ईथेच थाम्बवतो व तुम्ही पण सहकार्य कराल ही विनन्ती. मन्या मला पण दोन चान्गल्या गोष्टी कळाल्या त्याबद्दल मी पण आभारी आहे, व असेच पुढे पण येउ द्या.
|
>>>>> बायकोला निघून जायला माहेर असतं म्हणून निघून जाते.. नवरा काय कायमच आईच्या पदराला धरून त्याच्या माहेरी असतो तो कुठे आणि कशाला जाणार. कुठे म्हन्जे? तो पण बायकोच्या माहेरी निघुन जाणार! (मी तर कधी कधी लिम्बी जायच्या आधीच तिच्या माहेरी पोचलेला अस्तो!) DDD (आणि तस म्हणल तर सूऽऽज्ञ नवरे त्यान्च्या सासरी चान्गलाच "वठ" ठेवुन असतात!)
|
Chyayla
| |
| Tuesday, December 12, 2006 - 3:40 pm: |
| 
|
क्या बात है लिम्बुटिम्बु ईथे नवर्यानतर्फ़े बोलण्याची हिम्मत तुम्हीच केलेली आहे... असो एकन्दरीत ही चर्चा छान चालली आहे पण आतापर्यन्त एकच बाजु ऐकुन आहे, दुसरी बाजु पण येउ द्या... अजुन काही गोष्टी शिकायला मिळतील. धन्यवाद अज्जुका, तु तुझी पोस्टच उडवली... नाहीतर मी Mod ला विनन्ती करणार होतो की जर माझी पोस्ट कोणत्याही बाजुने Riduculous आणी सगळ्यान्चे विनोद कन्टाळवाणे वाटत असतील तर उडवुन टाका. डुप्लिकेट आयडी बद्दल ऐकले होते पण हे बोलवीता धनी वैगेरे नवीनच आहे मला, मायबोलीवर अजुन मी शिकतोच आहे असे वाटतय, ह्याप्रमाणे तो पण अनुभव येइल मला.
|
खरच आहे आम्हा बायकोंचि तेवढि बाजु इथे मांडली जातेय. नवरोबांनिही आपले अनुभव व विचार व्यक्त करावेत म्हणजे आम्हा बायकोंना आमच्या चुका कळतिल; कारण आम्हा बर्याच जणिंच्या अनुभवा नुसार पुरुष मन मोकळ करत-बोलत नाहित बायको पुढे अनेक वेळा. मागच्या आठवड्यात 'ओपरा शो' वर नवर्याने जाळुन मारण्याचा प्रयत्न केलेल्या व ह्या भयाण जिवधेण्या अमानुषतेतुन वाचलेल्या बायको ची मुलाखात बघितली. "अमेरिकेत दर १५ सेकंदाला एक स्त्री नवर्याचा अत्याचार सहन करते व दर वर्षि ३०% स्त्रीया नवर्याच्या अत्याचारने बळी जातात."..... 'ओपरा शो' 'त्या' स्त्री कडे पाहुन जाणवल आपला नवरा खूप खूप चांगला आहे तो कधि वाईट हि बोलत नाही (रागातही नाही) परी
|
Asmaani
| |
| Tuesday, December 12, 2006 - 6:41 pm: |
| 
|
बरोबर आहे परि तुझं. हे असलं काही ऐकलं वाचलं की मग लक्षात येतं की आपल्या तक्रारी किती क्षुल्लक आहेत! चांगले गुण बघायची नजर develop करायला हवी. नवरे आणि बायका दोघांनीही.
|
Chyayla
| |
| Thursday, December 14, 2006 - 4:13 am: |
| 
|
परी, अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशातही असे प्रकार म्हणजे नवरा आणी बायको हे प्राणी सगलीकडे सारखेच म्हणावे लागेल. माझ्या पाहण्यात बरेच उदाहरणे अशी आलीत की नवीन लग्न झाल्यानन्तर दोघान्च्या पण काही एकामेकाकडुन अपेक्षा असतात शिवाय नवीनच जबाबदारीच ओझ. अशात एकामेकाला समजायला स्वभाव कळायला खुप वेळ लागतो. त्यादर्म्यान काही गैर्समज व नाखुशी होणे स्वाभाविक आहे. एकीकडे नवीन लग्न झालेली मुलगी जी माहेर सोडुन आलेली असते तीच्या अपेक्षान्ची कदर करावी असे वाटते पण मुलाला पण घर, नातेवाईक, आई-वडील सगळ्यान्कडेच लक्ष द्यावे लागत. आणी पुष्कळदा मग यामुळे सन्घर्ष होत असतो. मग मुलगा सासुच्या धाकात आहे तो काही बोलत नाही माझ्याकडे लक्ष देत नाही. ह्या बाबी अशा असतात की कुणाची चुक आहे नेमक सान्गता येत नाही कधी सासु खाष्ट कारण मुलावर तीला हक्क वाटतो तर कधी मुली पण अतिशय अपेक्षा किन्वा बदललेल्या परिस्थितीला समजावुन घेत नाही, मग एक उपाय वेगळ घर किन्वा माहेरी निघुन जाणे. माझ्या नात्यातल्या एकीने वर्षभर सासुचा त्रास सहन केला वाट पाहिली की फ़रक पडेल पण काही नाही घरच्या चान्गल्या सन्स्कारामुळे तीनी कधी वेगळ घर करायची भाषा पण केली नाही, पण शेवटी जेन्व्हा तीच्या भावाने ही परिस्थिती पाहिली तेन्व्हा तोच माहेरी घेउन आला तोपर्यन्त तीनी सगळ सहन केल कधी बोलली नाही, हीच आशा की नवरा साथ देइल, फ़रक पडेल काही दीवसानी पण भ्रमनिरास झाला शिवाय आता एक मुलगा पण आहे, व या गोष्टीला वर्ष होत आले. तीला ईतकी भीती वाटते की परत जायची हिम्मत नाही, नवरा काही आइसमोर बोलत नाही म्हणतो मला दोन्हीकडे पहाव लागत म्हणतो तेन्व्हा तीला आधी घरी ये म्हणतो काही हितचिन्तकानी मध्यस्ती केली पण कशालाच दाद देत नाही आता तीला पण परत जायचे आहे कारण लहान मुलगा शिवाय घरात भावाच लग्न व्हायच आहे, भाउ खुप छान तो म्हणतो तु काळजी करु नको मी तुझ्या पाठीशी आहे. ईकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे, तीनी हिम्मत दाखवुन स्वता:च्या पायावर उभे राहण्याचे. शेवटी पडती भुमिका घेउन तीने म्हटले की मी आधी घरी येइल पण वेगळ घर करायचे... पाहु या काय होत.... मी तीला म्हटले की मायबोलीवर येत जा तुला खुप सवन्गडी आणी प्रेमाचा सल्ला देउन सुख दुख वाटुन घेणारे मिळतील. प्रष्न असा आहे अशा नवर्याना कसे समजवावे. कारण सासु खरच मनोरुग्ण आहे त्यानी लग्न ठरवताना ह्या गोष्टी लपवल्या होत्या आणी लग्नानन्तरच सम्बन्ध आल्यावर लक्षात आल्या. अगदी हात उगारणे, बोलणे, स्वता:च रडणे, मी आता जीवच देते असे धमकावणे असला प्रकार आहे. आश्चर्य वाटत की मुलाने एक वर्ष भरात हे प्रकार पाहिले तरी वेगळा का होत नाही आणी बायकोला विश्वासात का घेत नाही? पोटच्या मुलाबद्दल ही काहीच का वाटत नाही माझ्याकडे एक याच्या विरुद्ध दुसरे उदाहरण आहे ते नन्तर सान्गेन.
|
Sas
| |
| Thursday, December 14, 2006 - 7:19 am: |
| 
|
माझ्या शेजारि रहाणार कुटंब नवरा व बायको. लग्नाला ५ वर्षे झालित. दोघ ही नोकरी करतात. बायको आधि एच ४ (Dependent)विसावर होति तिने एच-1 (Work Visa) केल व नोकरि सुरु केली. आता तिला दुसरि कडे प्रोजेक्ट आलाय. नोकरि साठि (पैश्या साठि) नवरा-बायको ने दुर दुर , वेगळ राहाव का? मी पण मास्टर्स केलय, मी भारतात नोकरि करायचे लग्ना नंतर एच ४ विसा वर इथे आले पण मला एच १ नाहि करायचा कारण अस होउ शकत कि मला माझ्या नवर्या पासुन दुर कुठे तरि जाव लागेल प्रोजेक्ट साठि. आपण लग्न का करतो सोबत रहण्यासाठि कि पैसा कमविण्या साठि? ज्या घरात दोघ कमवितात ते लवकर प्रोग्रेस करतात (घर घेण, गाड्या घेण....) हे जरि खर असल तरी अस न करण Impractical आहे का? Is it wrong decision that I do not want to do H1 Visa n do not want do job?? फक्त नवरा कमवितोय म्हणुन आम्हाला खुप जपुन खर्च करावा लागतो. हौस-मौज, बाहेरचे खर्च विचार करुन करावे लागतात व अनेक वेळा टाळावे लागतात. जर मी नोकरि केली तर आम्हाला पैसा खर्च करतांना इतका विचार करावा लागणार नाही म्हणुन मी नोकरि करावि का? आज जस शेजारिण ४०$ देउन Hair Style करुन आलि तस मलाही नोकरि केलि तर करता येईल, बाहेरच जेवण आणुन खाता येईल बरेचदा. या साठि मी नोकरि करावि की हे गरजेचे नाहि ते खर्च न करता घरि रोज ताज करुन खाव व नवर्याला द्याव.??? मला कळ्त नाहिए. Should wife do job or not??
|
नमस्कार ंमण्डळि, परिणिता, मला अस वाटल कि इथे मन मोकळ करुन् तु तुझा अर्धा problem तर already salve केला आहेस. एकटॆपणामुळे (जो परदेशात रहाणार्याना हमखास जाणवतो) समस्या जास्त गम्भिर वाट्तात. शिवाय जशि जशि वर्ष जातिल तशया तुला आपोआप चाव्या मिळतिल पतिदेवन्च्या! (माझ्या लग्नाला आता तीन वर्षे होतिल त्यमुले हे अनुभवाचे बोल आहेत). तु बदलणार नाहिस पण पतिदेवाना diplomatically handle करायला शिकशिल. By the way 'नवरा कसा साम्भाळावा' हे द. पा. खाम्बोटे यान्च पुस्तक कोणि वाचल आहे काय? नसेल तर जरूर वाचा, धमाल आहे एकदम. SAS मला अस वाटत कि हा अपल्या द्रुष्टिकोणाचा प्रश्न आहे. समज तु नोकरि केलिस तरिहि बाहेरच जेवण किन्वा $ 40 चा haircut अश्या बाबिन्वर प्रमणाबाहेर पैसे तु खर्च करशिल? स्वत:लाच विचार. वेळेचा आणि घेतलेल्या शिकण्यावर घेतलेल्या मेहनतिचा सदुपयोग करण्याकरिता काहितरि नक्कि कर म्हणजे नोकरीच नाहि पण काहितरि volunteer work वगरे चा विचार कर. मी एथे नविन आहे, त्यामुळे चुकभुल द्यावि घ्यावि हि विनन्ति.
|
Prajaktad
| |
| Thursday, December 14, 2006 - 11:42 am: |
| 
|
सास ! जिथे बदली नाही किंवा project साठी फ़िरावे लागणार नाही अशा फ़िल्ड मधला job शोध की!..
|
Shravanip
| |
| Thursday, December 14, 2006 - 1:29 pm: |
| 
|
हो ना sas माझ्या कितीतरी मैत्रिणी इथे s/w मधे job करतायत. त्यानी ठरवलय जर जावं लागंलं कुठे तर job change करायचा पण म्हणून करायचा नाही असं काही नाही काही.
|
Savani
| |
| Thursday, December 14, 2006 - 1:46 pm: |
| 
|
sas ह्या विषयावर आधी इथे बरीच चर्चा झालीये. एकदा वाचून काढ बरं ती. /hitguj/messages/46/114697.html?1155850384
|
Shonoo
| |
| Friday, December 15, 2006 - 6:33 pm: |
| 
|
SAS तुला ती शेजारीण सांगायला आली का 'की तू नोकरी कर, पैसे कमव आणि चाळीस डॉलर ची हेअर स्टाईल कर '? तिला हवं तसं ती करते. तिने चाळीस डॉलर ची हेअर स्टाईल केली आणि तू नाही केलीस यात तुला का त्रास होतो? तुला ( आणि तुझ्या नवर्याला ) जे पटतंय, चांगलं वाटतंय ते तू कर. ती चांगली, तिचं बरोबर आणि तुझं चुकतंय, किंवा ती घोडचूक करतेय आणि तुझच बरोबर असं काही नसतं. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हण ऐकली असशीलच.
|
Shonoo
| |
| Friday, December 15, 2006 - 6:35 pm: |
| 
|
त्या बीने नविनता असा शब्द वापरला तर सगळे तुटून पडले होते त्याच्यावर. अन आता वरती घृणतेच्या असा शब्द आहे तर त्याकडे काणाडोळा :-) असो. विषयांतराबद्दल क्षमस्व!
|
Chyayla
| |
| Monday, December 18, 2006 - 6:22 pm: |
| 
|
शोनु, मला नाही माहिती असा काही वाद आधी झाला होता "ता" च्या बाबतित, असो भाषेतली शब्दसम्पदा अशीच वाढत जाते मला तसाच शब्द सुचला अजुन पर्यायी असेल तर सान्ग, पण मायबोलीकराना भावार्थ कळाला त्यातच समाधान. आयला हे काय तमाम नवर्या-बायकानी युद्धविराम केला काय? की सौजन्य मास वैगेरे सुरु आहे? कुणी लिहिले नाही अजुन ईथे. (दिवा घ्या... दिवा)
|
Bhagya
| |
| Monday, December 18, 2006 - 10:51 pm: |
| 
|
च्यायला, युद्धविराम कसला? भांडुन भांडून सगळे थकलेले दिसतायेत! किंवा युद्धापूर्वीची शान्तता म्हण!
|
Manyah
| |
| Tuesday, December 19, 2006 - 6:27 pm: |
| 
|
इथे नवरा बायको मधे का भान्डने होतात ते कलाले...... या बि बि वर बायकान्च्याच पोस्ट जास्त आहेत सगले नवरे फ़क्त वाचत होते..... काहि न बोलता..... आता बायकान्चे बोलुन झाले तर आले परत डिवचायला.... दिवा घ्या सगले....
|
Janakee
| |
| Tuesday, December 19, 2006 - 7:46 pm: |
| 
|
Hi All My Problem is my husband is very Timid person. He is in his Mid 30 but he can not take decisions or can not express himself, his thoughts or opinions.I have never seen him behaving aggressively. He is happy with life as it comes; everybody has Objective of growth, every body wants & plans for own house, estate, property but my husband is ok with what he is earning as in that we r surviving. Apart from this I hv another major relationship problem but I am not understanding how to mention my problem I m regular reader of maayboli all people here do help others in solving their problem if I will get help from all of u then it will b very great for me n I can open my problem here please help me.
|
Deshi
| |
| Tuesday, December 19, 2006 - 8:38 pm: |
| 
|
जानकी तुझ्या नवर्याला चित्ती असो द्यावे समाधान हे कळले आहे. ही तर तुझ्या अभिमानाची गोष्ट असायला पाहीजे.
|
Chaffa
| |
| Tuesday, December 19, 2006 - 9:09 pm: |
| 
|
भांडा सौख्यभरे.!! लग्नापुर्वी जरुर वाचावा असा हा BB वाचनिय झालाय.
|
Deshi
| |
| Tuesday, December 19, 2006 - 11:01 pm: |
| 
|
चाफ्या वाचुन काहीही फरक पडत नाही. नाहीतर कसे राहावे हयावर काय कमी पुस्तक आहेत का?(नाहीतर आपण शहाने झालो नसतो का?) लग्न झाल्यावर थोडी फार भांडन होनारच. पण सहसा पूरुष त्याच भांडवल करत नाहीत. कदाचीत हाच नेमका फरक असावा.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|