Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 24, 2006

Hitguj » Views and Comments » General » Why are we (Indians) like this? » Archive through December 24, 2006 « Previous Next »

Zakki
Friday, December 22, 2006 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो पण ऐकिव असला तरी माझ्या मित्राकडून ज्याला, मी गेली पन्नास वर्षे ओळखतो, अश्या मित्राकडून ऐकले! शिवाय मी काही अगदीच यडा नाहीये, बरेच काही काही भारतात पाहिले, भारतातल्या बर्‍याच लोकांशी बोललो, त्यामुळेच माझी मते तशी झाली आहेत. तुम्हाला आवडत नसतील.

उगीच 'हलक्या कानाचा' वगैरे तुम्ही मला वैयक्तिक रीत्या म्हणता आहात की माझ्यासारख्या अमेरिकेत रहाणार्‍या सर्वांनाच? म्हणजे काय, की तुम्ही कधीच वैयक्तिक पातळीवर टीका करत नाही, नि अमेरिकेत रहाणार्‍या दहा लाख लोकांपैकी एकाचे मत वाचून तुम्ही कुठलेहि मत बनवले ते खरे नि आम्ही दहा लाख लोक बघून बनवलेले खोटे असे तुमचे म्हणणे दिसते!

छ्या, सगळेच कसे 'कन्फ्यूजन!'

Laalbhai
Friday, December 22, 2006 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही मला वैयक्तिक रीत्या म्हणता आहात की

>>>
मी फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच म्हणतोय. "झक्की" हा id वापरून त्या शब्दाचा अर्थ सार्थ करणार्‍या व्यक्तीलाच मी हे म्हणत आहे.

मी दहा लाख अमेरिकनांबद्दल कोणतेही मत बनवलेले नाही.


They say, don't hate in plurals! You might have heard this sometime, somewhere!

Zakki
Friday, December 22, 2006 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ठीक आहे, झक्की हलकट आहे हे तुमचे मत, निर्लज्ज हे अनेकांचेच! तेंव्हा मला का बरे वाईट वाटावे?

तर हे लक्षात घेऊन वादात वैयक्तिक पणा न आणता फक्त मुद्द्यांवर टीका करा, ते चूक आहेत असे लिहा, तुम्हाला जे चूक नि वाईट वाटते ते वारंवार उकरून काढत बसू नका. अहो 'आम्ही भारतीय' असे का याकडे परत वळा!

Laalbhai
Friday, December 22, 2006 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"संपूर्ण भारतीय समाजाला" "भिकारी आणि निकम्मा" म्हणताना, तुम्हीही माझा वैयक्तिक अपमान केलेला आहे! कारण भारतीय समाजाचा अविभाज्य भाग, या नात्याने तुमची चुकीची दुषणे माझ्यावरही उडतात. हा माझा वैयक्तिक अपमान तुम्ही केला आहेत!

तसा इथल्या प्रत्येक भारतीयाचाही केलाच आहे तुम्ही अपमान, पण ते माझ्यापेक्षा जास्त सहिष्णू असावेत. किंवा तुमच्या कायमच्या बडबडीकडे दुर्लक्ष करायला शिकले असावेत.

एक लिंबुटिंबू आणि पेशवा सोडून कुणीही तुमचे समर्थन केलेले नाही. दोघांचीही कारणे तुम्हाला चांगलीच ठाऊक आहेत, ती काय मी सांगू?

तुमच्याशी वगळता इतरत्र मी मुद्द्यांनीच बोलतो आहे. तुमच्याशीच असे का झाले, याचे परिक्षण तुम्ही करा!


Laalbhai
Friday, December 22, 2006 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरेच काही काही भारतात पाहिले,

>>>

काय काय पाहिले? कराच च्यायला detail मधे अनुभवकथन. आणि एखाद दुसरा अनुभव नको हां! चांगली आत्मचरित्रासारखी भलीमोठी कादंबरीच लिहा. ठरवा पाहू मला मुद्द्यांनी खोटे! कळू दे तरी अवघे पाव आयुष्य भारतात काढलेल्या तुम्हाला "ऊब" यावी इतके काय घाण अनुभव आले? च्यामारी, जन्मापासून इथेच आहे, जितके वाईट अनुभव आले, तितकेच चांगलेही अनुभव आले. कळू द्या तरी तुम्ही अशा कोणत्या विश्वात (नंदनवनात!) वावरत होता, की तुम्हालाच सगळे वाईट, घृणा यावी, "भिकारी, निकम्मे" वाटावे, असे अनुभव आले.

नाही झक्की, आता होऊनच जाऊ द्या एक कादंबरी. मी माझ्या खर्चाने प्रकाशित करेन. भारतातल्या लोकांना तितके पैसे मिळतात अजुन!

करा सिद्ध तुम्ही अगदीच येडे की पूर्णच येडे!


Zakki
Friday, December 22, 2006 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे आहे. इतरत्र मुद्देसूद चर्चा करता! पण तुमचा वैयक्तिक अपमान झाला तर मायबोलीला कशाला सांगता? त्यांचा वेळ, disk space का घेता? पुन: पुन: वाईट, चुकीच्या वाटणार्‍या गोष्टी उकरून काढून एकट्या मलाच 'उपयोगी' पडतील अश्या गोष्टी का लिहिता? त्या मला मेल करून कळवा. बरेच लोक लिहितात.

इथला वेळ नि disk space मुद्द्याचे बोलायला, किंवा इतरांसारखे, ज्यांना राग येत नाही अश्यांची टिंगल टवाळी, विनोद करायला, सुसंवाद करण्यासाठी ठेवा. असे माझे सर्वांनाच सांगणे!


Laalbhai
Friday, December 22, 2006 - 5:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमचा वैयक्तिक अपमान झाला तर मायबोलीला कशाला सांगता?

>>

आता मायबोलीच्या disk space ची काळजी का? ती करू नका तुम्ही, त्यासाठी ती लोकं समर्थ आहेत. delete करण्याचे सगळे हक्क त्यांचेच आहेत.

जाहिर अशासाठी लिहितो की तुम्ही जाहिर बडबड केली आहे. त्याबद्दल जाहिर माफी मागण्याची लाज वाटते आहे तुम्हाला.

तुम्ही माफी मागून नाहीतर अनुभवकथन करून मोकळे व्हा, मग आपल्याकडे वेळच वेळ आणि स्पेसच स्पेस असेल की!


Laalbhai
Friday, December 22, 2006 - 5:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही विषय घाई घाईने संपवण्याच्या प्रयत्नात का आहात?

Laalbhai
Friday, December 22, 2006 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ठिक आहे, माझ्याकडून हा विषय मी संपवतो. इथुन पुढे काय बोलायचे याचे भान ठेवाल ही (व्यर्थ) अपेक्षा!

Zakki
Friday, December 22, 2006 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो मी मागेच लिहीले आहे. मला माझी मते खरीच वाटतात, त्याची लाजच नाही, तर माफी कशाबद्दल? आता माझी मते ऐकून चर्चेला उपयोग झाला तर लोक करून घेतील नाहीतर नाही. वैयक्तिक काही असेल तर मेल करतील! समाज, राष्ट्र म्हणजे एकटाच माणूस नव्हे, तो जरी त्यातला एक घटक असला तरी. जेंव्हा तुम्ही म्हणता की भारतात गरीब, अशिक्षित लोक जास्त आहेत, तेंव्हा तुम्ही टाटा ला पण गरीब म्हणता का? राष्ट्रपतींना पण अशिक्षित म्हणता का? (भारताच्या हो! अमेरिकेचे कसे आहेत यावर म्हंटले तर वाद होऊ शकतो!)
फक्त लिहायला नको होते, नि तसे कबूल पण केले आहे, जाहीरपणे. नि अनुभव बरे, वाईट गेल्या सात वर्षात इथेच अनेकदा लिहीले आहेत, पुन: पुन; काय लिहायचे वाईट अनुभव. त्यापेक्षा कुठे काय चांगले असेल तर बघावे. नि हे आपलेतुपले संपले म्हणजे इतर भारतीयांना पण आम्ही असे का? याचा शोध घेता येईल, म्हणून घाई.


Laalbhai
Friday, December 22, 2006 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, मला पुन्हा लिहायला का प्रवृत्त करत आहात?

"गरिब आणि अशिक्षित" ही विशेषणे आणि "(वृत्तीने) भिकारी आणि निकम्मे" ही विशेषणे एकाच तागडीत तोलता येतात का?

आता मी विषय संपवतो आहे तर कशाला वाढवता? गप बसा की! आणि उगाच काहीतरी मुद्दे मांडायचे तर भाषा तरी नीट वापरा.

भांडायचेच असेल तर आपली तयारी आहे. तुम्हालाच गुदमरल्यासारखे होत होते म्हणून मी थांबवले होते. वाढवायचे असेल तर वाढवा...


Moderator_5
Friday, December 22, 2006 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता पुरे झालं, वैयक्तिक भांडणं नि गुद्दे कृपया इथे नकोत. मुद्द्यांनी चर्चा करा हवी तेवढी

Peshawa
Friday, December 22, 2006 - 11:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाल hydrant फ़ुटला.. लोकशाहीची जरा कदर नाही. नत्द्रष्ट ते नतद्रष्ट.. सगळ्या गोष्टींची अशीच वाट लावतात आणि वर नावे ठेवली की दंगल करतात संप करतात, लोकांच्या तोंडाला काळे फ़ासतात. वर ह्यांच्या अकलेच्या तंगड्या वरती करून लोकांन्वर xxx करणे चलुच ह्यांचे! आरे ह्यालाच ह्यालाच दांभिकता म्हणतो मी. तो देशाचा PM पल्लु minister असल्या सारखा वागतो. कुल्ल्या खाली seat मिळली ना मग हुजरे गिरी केली तरी केवळ Dr. मह्नून ह्याची पाठ ठोपटायची? नुस्ते ते नाही तर आदराने बोलायचे service economy कडे चल्लोय म्हणजे अस servent PM हवाच नाही का! आणि सेवा म्हटले की NGO ची दुकाने उघडून बसलेले साला सेवकही आलेच. अगदी भिकारीच हो पण organized ! प्रगतीचा व्यापार आहेच... पण गरिबीचाही इतका चोक्कस व्यापार बनवलाय $@!#$ नी बर लोकही कसे अगदी यथा राजा ही म्हण सार्थ करणारे! ह्याना स्वत्:च्या मिशीखालि माशी बसली तरी सब्सिड्या, समाज्सेवक आणि सरकारी योजना लागतात ती उठवायला वर अभिमान कीती ह्या हुजरे गिरीचा!

ह्यांच भविष्य लालच आहे... दंगलिच किंवा शोषणाच किंवा त्या दळ्भद्र्या कम्युनिस्टांच्या पायाखालच लोकशाही साठि लागणारी ना नितीमुल्य ह्यांच्याकडे आहेत ना अक्कल! आहे ना अगडि सार्थ अभिमान आहे मला ह्या समाजाचा!

hydrant हा देशात लाल रंगाचाच असतो. नाम व रंग साधर्म्याने कुणाला स्वत्:चा अपमान झाला असे वाटल्यास त्याने सरकारला hydrant चा रंग बदलण्यास सांगावे अथवा स्वत्: रंगित पाणि घेउन गप निजावे!


Mahesh
Saturday, December 23, 2006 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे अरे काय हे ?
आपणा भारतीयांची ही अशी एकमेकांची उणीदुणी काढण्याची जी मानसिकता आहे. तीच प्रगतीला मारक आहे.
राष्ट्रहित राहते बाजुलाच आणी आपण माझे बरोबर तुझे चुक हेच करत बसतो. वरचे वादविवाद पाहुन लिहावेसे वाटले.


Laalbhai
Saturday, December 23, 2006 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Well, peshava एखाद्या गटाला शिव्या द्यायच्या तर द्या. भूंकण्याने काय फरक पडणारे कुणाच्या? संपूर्ण देश आणि समाजाला शिव्या देताना जरा कुणाकडून तरी अक्कल उधार घ्या!

एक general अपुर्या माहितीवर आधारित एखाद्या संपूर्ण विचारसरणीचा द्वेष करण्याची परंपराच जोपासली आहे काहींनी. आता तर "अति झाले आणि हसू आले" असेच होते आहे.

कुणीतरी गुलमोहरवर सुचवले तसे "हस्यास्पद लिखाण" हा बीबी लवकरच सुरु करावा, अशी मीही विनंती करतो. आणि पेशवे त्यात भरीव योगदान देतील अशे आशाही व्यक्त करतो. :-)

btw "पेशवा", तुम्ही पेशवा हा id दुसर्‍या बाजीराव पेशव्याला समोर ठेवून घेतला का?


Zakki
Saturday, December 23, 2006 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बापरे पेशवा, तुम्ही माझ्याहून जास्त भडकलेले दिसता! असे भडकलात म्हणजे कम्युनिस्टांचे फावते! कारण तेच त्यांचे काम! विधायक काम शून्य. भडकवा भडकवी हा यांचा धंदा. नशीब आपले, आपण शिकले सवरलेले आहोत. फार तर कुठेतरी काहीतरी लिहू! गरीब नि अशिक्षित नि निकम्म्या लोकांना भडकवून सगळीकडे नुसते दंगे, जाळपोळ करणे हे यांचे मुख्य काम! एव्हढे मोठे USSR , त्याची वाट लावली! चीनला सुद्धा शेवटी Capitalism स्वीकारून अमेरिकेचे, नि भारताचे पाय धरायला लावले.

यांना आता अनुल्लेखाने मारा, नि फक्त मुद्देसूद बोलणार्‍यांकडे लक्ष द्या! हा माझा अनाहूत सल्ला, माझे मत!


Zakki
Saturday, December 23, 2006 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश, तुम्हाला शंभर टक्के अनुमोदन!

Peshawa
Saturday, December 23, 2006 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

here is one how we work!
http://www.indianexpress.com/sunday/story/19243.html

Another thing about Indians (double standard hypocrites) we want us to be treated equally but we hardly ever treat others in same way! Hmmm so शनिवार वाडा बघायला देशी माणसाला ५ रु आणि विदेशी माणसाला ५० असे का? विसरलो लाल logic असावे!

Chyayla
Saturday, December 23, 2006 - 8:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या BB चा वाद विवाद पहिल्या पासुन वाचत आहे. झक्की, पेशवा, लिम्बुटिम्बु तुमचे मुद्दे जरी बरोबर आहेत की भारतात असे आहे तसे आहे अगदी मान्य. पण त्यासाठी पुर्ण भारतालाच नाव ठेवणे, भम्पक देश, Dead Country वैगेरे म्हणणे नाही पटत.

एक सान्गु ज्याप्रमाणे चिखलातच कमळ उगवत त्याचप्रमाणे ह्या बेशिस्त, भ्रष्टाचारी भारतातच जगातली सगळ्यात उच्च तत्वे, सन्स्क्रुती, विश्वकल्याणाचा विचार याच भुमीतुन आलेला आहे.

" क्या हस्ति है हमारी की मिटती नही" असे उर्दु शायर सुद्धा म्हणतो एवढ्या सगळ्या वाईट गोष्टी असुनही भारत हा जगाचा अध्यात्मिक गुरु आहे ज्याकडे हे जग मोठ्या आशेने पहात आहे. अशा भारतात देव, रुशी, महामानव सुद्धा जन्म घेण्यासाठी धडपडतात, पत्रकार मार्क टुली तर म्हणतो त्याला हिन्दु म्हणुन एकदा भारतात जन्म घ्यावासा वाटतो. मोहम्मद पैगम्बर चे बन्धु त्यान्ची ईछा होती की हिन्द मधे जन्म घ्यावा या अश्या दुर देशातल्या व्यक्तिना सुद्धा भारताविषयी ओढ आहे.

माझ्या ऑफ़िसमधे एक अमेरिकन आहे ती तर भारतासाठी अक्षरशा: वेडीच होते. भारतिय योग, ध्यान एवढच काय भारतिय पदार्थ, बन्गाली मिठाई म्हणजे जीव की प्राण तीने कधी भारत पाहिला नाही तीच्या सारखे कैक अमेरिकन माझ्या सम्पर्कात आहे. पण प्रामाणिक पणे वाटत त्यानी भारत पहायला येउही नाही निराषाच पदरी पडायची कारण कोळसा मधे हिरा शोधावा त्याप्रमाणे त्याना अपेक्षीत भारत शोधावा लागेल.

आज तुम्ही जिथे आहात तिथेच सुखी रहा "जननी जन्म्भुमीश्च स्वर्गादपी गरीयसी" हा मन्त्र विसरु नका याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही विदेशातच स्थाईक होउ नये, मी तर म्हणेल १०० कोटी पैकी अर्धी जनता जरी गेली तर उलट चान्गलेच आहे. जाताना भाराताचा सुगन्ध सगळीकडे घेउन जा "हे विश्वची माझे घर" अशी सन्कल्पना बाळगणार्याना कोणताही देश परका नाही "पर्देस को बनाये देस अपना".

पाश्चात्य व मुस्लिम ज्या ज्या देशात गेले त्यादेशाला गुलामी, युद्ध, नरसन्हार, भयन्कर शोषण हेच दीले तीच त्यान्ची सन्स्क्रुती, पण भारतिय जीथे गेले तिथे त्यानी मदतच केली आफ़्रिकेतल्या कित्येक देशात फ़ार पुर्वी जे मारवाडी, गुजराथी, व्यापारी लोक गेलेत त्यानी तिथली अर्थव्ययस्था भरभराटीस आणली माझ्या जवळ नेमका सन्दर्भ नाही. हा फ़रक दोन सन्स्क्रुतीन्मधला.

मला वाटत तुमच्यात सध्याच्या राजकिय घडमोडी, सत्ता, आरक्षण, भ्रष्टाचार यामुळे निराशा आली असावी. थोडा जातीय उपेक्षेची भावना पण असावी आज पर्यन्त सरकारी नौकर्यामधे बुद्धीमत्तेमुळे जागा होती आरक्षणामुळे आता नौकर्या नसल्यामुळे जे सधन सम्पन्न होते ते शिकुन मेहनतीवर विदेशात गेले पण ती बोच मनात ठेवुन. पण तुम्हाला नाही वाटत का की जे काही होते चान्गल्या साठी होते नाही तर कुठे आपण बर, आपली नौकरी बरी आणी आपला गाव व घर यामधुन तुम्ही बाहेर पडलात व आज सारे जग पहात आहात हे पथ्यावरच पडले की नाही. त्यामुळे आता ती बोच पण काढुन टाका. लक्षात ठेवा हे जे दीवस जी परिस्थिती भारतात आहे ती कायम रहाणार नाही भलेही ती आर्थिक, सामाजिक व राजकिय असो.

मायबोलीवरच वाचलेले To change the system, be the part of system सध्या तुम्ही त्याचे पार्ट नाहीत पण तुमच्याकडुन जितके होईल ते करा पण पुर्ण देशालाच असे हिणवु नका. मला माहिती आहे तुमच्या मधे पण भारताविशयी तळमळ आहे.


Ajjuka
Sunday, December 24, 2006 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेस्ट... मला आता वाटते की हा बीबी बंद करावा येथेच.. सगळ्या गदारोळात हे शेवटचेच पोस्ट balanced वाटतेय.
झक्की, जया,
समस्या आहेत आणि आहेतच हे मान्यच पण समस्येपासून पळून जाऊन नुसतीच शिविगाळ करणे म्हणजे तुम्ही योग्य का?
परिस्थितीमधे काहीही बदल करण्याचा प्रयत्न किंवा किमानपक्षी परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्नही झाल्याचे तुमच्या पोस्ट मधून दिसत नाही.
वरच्या दिलेल्या शिव्या ह्या इथे रहणार्‍या प्रत्येकाला तुम्ही दिल्यात.. तेव्हा त्यात तुमचे आईवडील आलेच आणि तुम्ही स्वतःही (इथून तिकडे गेलात म्हणून धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाही झालात. भारतीय पणाशी नाळ जुळलीये म्हणून तर इथे येता ना..).
परखड टीका हे पण ठीक पण भारतात रहाणारा प्रत्येक माणूस तुमच्यामते नालायक आहे हे बोलणे अति आहे.. तेही अश्या देशात राहून ज्या देशाचा अध्यक्ष world peace किंवा तत्सम नावाखाली राष्ट्रेच्या राष्ट्रे उध्वस्त करतोय..
असो...



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators