Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 22, 2006

Hitguj » Views and Comments » General » Why are we (Indians) like this? » Archive through December 22, 2006 « Previous Next »

Limbutimbu
Thursday, December 21, 2006 - 9:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजाभाऊ, भावना पोचल्या बर का!
(अन आता इथुन पुढ या बीबीवरची चर्चा येल्ट्या की पोलिस की कायदे, त्यातुन तेही भारतीय कायदे कसे चूक, की बरोबर यावर जोमदार चर्चा रन्गेल, अशी आशा नको ना करू?)
DDD

Lopamudraa
Thursday, December 21, 2006 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरीही परदेशातील तू सान्गत असलेली उदाहरणे मला मान्य करवत नाहीत हे ही तितकेच खरे! >>>>
नको मान्य करु तु मान्य न केल्याने इथले कायदे बदलत नाहित.
इथले लोक कायदे पाळातात हेच खरे शेवटी कारण.. इथे लोकसंख्येच्या कमी मुळे सगळीकडे लक्ष द्यायला कॅमेरे असतात. ते बर्‍याचदा चुकवता येतात आपल्याकडे तर लोकांनि फ़ोडुन टाकले असते हे कॅमेरे.

आणी वेळ मिळाला तर BBC Uk 4 वरिल इथल्यान छोटे छोटे कायदे मोडणार्‍या लोकांसाठी काय शिक्षा केली जाते हे दाखवणारा कारय्क्रम बघ..
जे लोक छोटे छोटे कायदे पाळत नाहीत यात लाच देतात त्यांनी देशाबद्दल कळावाळा दाखवावा.. फ़ार मोठ्ठा विरोड्धाभास आहे...
निर्जन रस्त्यावर आपल्या कुत्राने विष्टा टाकली ती उचल्लय्ची तीथे बघणारे कोणी नसते तरी हे लोक उचलतात शिक्षा करायला police प्रत्येक ठिकाणी नसतो. तरिही हे लोक कायदा पाळतात.
गजानन ...
नुसता belt लावला नाही तरी १४ pound शिक्षा असते गाडी चल्वताताना mobile वर बोलत्ताना आढळलात तर ६० pound म्हनजे 60 x80 =4800 rs. करुन बघ, इतका दंड होतो.



Limbutimbu
Thursday, December 21, 2006 - 10:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग अग लोपे, आता कशी गाडी रुळावर आली!
मला हेच म्हणायच होत की भारतात ना भारतीय लोक सुद्ज्ञ हेत ना त्यान्नी बनविलेले कायदे वा ते राबवनारी यन्त्रणा! पेशवा तेच म्हणत होता, उधारी उसनवारीचे कालबाह्य अवास्तव असन्ख्य कायदे! (केदार, यादीकरता एक विषय मिळाला रे भो! आता कायद्यान्वर आमचे दोष ढकलायला आम्ही मोकळे, कस?)
(एका अर्थान बर हे की मी भारतातच हे! इन्ग्लन्डात नाही! मला तर बोवा एक चिमुट बार लावल्याशिवाय गाडीच चालविता येत नाही )
DDD

Limbutimbu
Thursday, December 21, 2006 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बायदीवे, लोपा, तिकडे (कार वापरु शकणार्‍यान्चा) मिनिमम पगार किती पौन्डापासुन सुरू होतो, जरा कल्पना देवु शकशील का?
मला दन्डाच्या रकमेची तुलना उत्पन्नाशी करायची हे! :-)


Mahesh
Thursday, December 21, 2006 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>मला दन्डाच्या रकमेची तुलना उत्पन्नाशी करायची हे!

Limbutimbu
Thursday, December 21, 2006 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यात येवढ हसण्यासारख काय हे?
महेशराव, दण्ड ठरविताना त्या त्या काळातील दरडोई उत्पन्न विचारात घेतल जात असणारच! मला फक्त आकडेमोड हवी हे!
निष्कर्ष माझा मी काढीन!


Kedarjoshi
Friday, December 22, 2006 - 4:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Just FYI


गेल्या तिमाहीत भारताने ९.२ टक्क्याने प्रगती केली.
ईतर प्रगत देशांसारखीच सोशल सिक्युरीटी सिस्टीम भारतात येत आहे.



Social Security coming to India.

http://loksatta.com/daily/20061217/lr01.htm

Patilchintaman
Friday, December 22, 2006 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी भारतीयांच्या या मनोव्रुतीवर औषध विचारलं होत. सगळे एक तर उपदेशाचे डोस पाजताहेत, नाही तर टिकेची झोड उठवित आहात.

RSS च्या मार्गदर्शक कर्यक्रमात शिस्तिच्या चार गोष्टी शिकविल्या जात असतात. पण तुम्हा लोकाना हे माहीत आहे का? तुम्ही तर संघालाही दहशतवाद्यांच्या रांगेत नेऊन बसवतात.

राष्ट्रीय सम्पतीचे नुकसान करु नका, देश हिताचे कायदे पाळा, व्यसने टाळा. (कारण ठिकठिकाणी थुंकत बसतात ना!) वगैरे गोष्टी तिथे सांगितले जाते. त्यामुळेच आम्ही म्हणतो की, भारतियांवर नुसती कोरडी आग पाखड करुन आपल्या COmputarchee वाफ ( तोंडाची वाफ या अर्थाने बरं का!) कशाला दवडतोय?



Satishmadhekar
Friday, December 22, 2006 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिंतामणराव पाटील, माझ्या अल्पबुद्धीची अशी ठाम समजूत झाली आहे की, भारतीयांच्या मनोवृत्तीला काहिही औषध नाही. कोणत्याही औषधाने सुधारण्यासारखा हा विकार नाही. मुळात रोग झाला आहे हेच या आजार्‍यांना मान्य नाही. मग औषधयोजना जशी करणार? ज्या दिवशी त्यांना स्वत:लाच काही चूक आहे असे वाटेल, तेव्हांच सुधारायला सुरवात होईल. तोपर्यंत अधोगती चालू राहील.

कायद्याच्या बंधनाने थोडासा फरक पडू शकेल. जर वाहतुकीचे नियम तोडले किंवा रात्रीबेरात्री मोठ्यांदा गाणी लावली, तर तुरुंगवासाची शिक्षा, कोणताही पक्षपातीपणा न करता दिली, तर काही प्रमाणात सुधारण होऊ शकेल. परंतु असे होण्यासाठी कायद्याच्या रक्षकांनी नि:पक्षपातीपणे कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी राजकीय हस्तक्षेप थांबविणे आवश्यक आहे. पण हे करणार कोण? हे करण्याची राजकीय आणि सामाजिक ईच्छाशक्ती कोणाकडेच नाही. म्हणूनच भारतीय सुधारण्याची शक्यता अतिशय कमी आहे.

जर ते स्वत:हून सुधारले तरच सुधारणा होईल. अन्यथा नाही.


Limbutimbu
Friday, December 22, 2006 - 7:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाटील नि सतिश, माझ मन थोड वेगळ सान्गत मला!
मला सहज आठवते आळन्दीचे १९८७ चे सन्मेलन, मग १९८९ चे रामशीला पुजन, १९९२ ची अयोद्ध्या यात्रा.....! फार जुना इतिहास नाही
या सर्व कार्यक्रमान्ना, पदरचे पैसे खर्चुन (विनातिकिट नव्हे) देशभरातून लाखोन्नी लोक आले होते, ते आले, त्यान्नी कारसेवा केली आणि ते परत गेले!
येताना जाताना वाटेत कुठेही लुटालुट, जाळपोळ, दगडफेक, बलात्कार, रेल्वेतुन फेकुन देणे असली कृत्ये झाली नाहीत
त्यान्च्या स्वागतासाठी कुठेही सरकारी धाबे लागले नव्हते की नव्हत्या कोणा राजकीय पक्षान्च्या टपर्‍या अन्नवाटपासाठी......!
जे काही होत होते ते एकीच्या व स्वयम्शिस्तीच्या भावनेतून, एकमेकान्ना आधार देत.....!
उण्यापुर्‍या चौदा वर्षान्पुर्वी हे असेही घडु शकते हे जर वास्तव असेल तर हा समाज नक्कीच सुधारेल, थोडी कळ काढावी लागेल :-)
अर्थात जेव्हा ते श्रीकृष्णरुपाचे विराट दर्शन झाले तेव्हा त्यावरचे निरनिराळे उतारे शोधण्यात येवुन त्यान्ची अम्मलबजावणी होवु लागली त्याची फळे आपण मध्यन्तरीच्या राज्यभरच्या दन्गलीन्मधे, ठिकठिकाणच्या सातत्याने होत असलेल्या बॉम्बस्फोटात अनुभवली!
हे आपले माझे मत बर का! कुणाला पटेल अस नाही!


Manyah
Friday, December 22, 2006 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कायदे पाळन्या साटि मला एक उपाय सुचला होता......
हे लोक सैन्य दला प्रमाने पोलिस खाते सुध्धा केन्द्रिय सर्कार कडे का देत नाहित म्हनजे समान्य पातळि वर होनारा भ्रष्टाचार भरपुर थान्बेल....
पोलिसाना सगलि महिति असते ते फ़क्त राजकरनि लोकान्च्या दबावामुळे गप्प बसतात....

Mahesh
Friday, December 22, 2006 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक राज्याचे पोलिस दल वेगळे ठेवण्यामागे मुळातच योजना ही आहे की देशांतर्गत सुरक्षेसारख्या गोष्टीचा केंद्र सरकारवर ताण न पडता जलद कामे व्हावीत. पण ती निट होत नाहीत म्हणुन परत त्याचे केंद्रिकरण करणे हा उपाय नाही. काही काळ म्हणत असाल तर मान्य आहे. मग तसे तर राज्य सरकारे तरी कशाला हवीत. एकच केंद्र सरकार का असू नये. हे व्यवस्थापनाच्या सोयीसाठी केले आहे. अर्थात भौगोलिक, सांस्कृतिक फरक पण आहेतच.

Laalbhai
Friday, December 22, 2006 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार, अज्जुका.

पेशवा केवळ मला डिवचण्यासाठी इथे मूर्खपणा करत आहे. अर्थात हे त्यांनी आत्तापर्यंत अनेकवेळा केलेले आहे.

इथे दुर्दैव इतकेच की मला डिवचण्यासाठी संपूर्ण भारत देशाला किंवा समाजाला (चुकीच्या पद्धतीने) नावे ठेवण्याचा अक्कलशून्यपणा ते करत आहे.

आता माझे हे पोस्ट काढून टाकले गेले तर मी काय लिहिले होते ते मेल ने कळवीनच. पण तुम्ही त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करा, ही विनंती.


Laalbhai
Friday, December 22, 2006 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरी लिहायला नको होते असे मी कबूल केले आहे.

>>>

मग मोकळेपणाने माफी मागायला हरकत नव्हती! (की "भिकारी, निकम्म्या" समाजातल्या लोकांची माफी कशी मागायची असा गुंता आहे?)

Laalbhai
Friday, December 22, 2006 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांची मतं वाचली. काही पटली काही पटली नाहीत.

पण मला एक मुलभूत प्रश्न आहे. किती लोक समाजात जवळून मिसळतात? आणि समाजात जी अनेक स्तराची, भिन्न आर्थिक परिस्थितीची, भिन्न सांकृतिक परिस्थितीची लोकं नांदत आहेत, त्यांना जवळून पहाण्याचा प्रयत्न करतात?

अर्थात, हे विचारण्यामागे कुणाला कमी लेखण्याचा प्रश्नच नाही. किंवा आपल्या समाजातल्या ज्या गोष्टी सुधराव्या वाटतात, त्यामागची भावना खोटी आहे, असेही म्हणण्याचा प्रश्न नाही. I have 100% respect for your views.

पण कुणी रस्त्यावर थुंकताना दिसला तर किती जण जाऊन त्याला सांगतात की बाबारे किंवा बाई गं, थुंकणे चूक आहे, त्यामुळे रोगराई पसरते. नैसर्गिक विधी बिनधास्त रस्त्याच्या कडेला उरकणार्‍या किती जणांना अडवण्याचा, शिक्षित करण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही केलेला आहे?

वरच्या प्रश्नांची ९९ % उत्तरे नकारार्थी येतील.

कारण सुधारणेसाठी झीज सोसण्याची आपली तयारी नसते.

नेहरूंनी काही फार कमी चांगल्या गोष्टी केल्या त्यापैकी एक म्हणजे त्यांनी IIT ची स्थापना केली. ह्यामागे हेतू हा की उच्च ज्ञान मिळवून ते समाजाच्या विकासासाठी वापरले जावे. पण IITans नी स्वतःची प्रगती करून घेतली देश तसाच राहिला. (ह्यात आता अनेक वादाचे मुद्दे असतील की, कामाचे स्वातंत्र्य वगैरे, पण काम करायचे असेल तर अडथळे येणारच! त्यांच्याशी झुंजायचीही तयारी हवी.)

पहिल्या मुस्लिम आक्रमकाला उच्चवर्णीय हिंदूच्या भ्याड कारस्थानामुळेच भारतात प्रवेश मिळाला हे सत्य आपण नाकारू शकतो का? पुढे संपूर्ण देशाचे हित पहाण्यापेक्षा आपापल्या छोट्या छोट्या परगण्याचे हित पहाण्याचा नालायकपणा, काही मोजके राजे सोडून सगळ्यांनीच केला, हे आपण नाकारू शकतो का? स्वातंत्र्यानंतरही संस्थानांवरचा हक्क सोडता सोडवत नव्हता.

तर समाजाच्या मनोवृतीवर टिका जरूर करा. चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींची संख्या निश्चितच जास्त आहे. पण एखाद्या वाईट गोष्टीवर आपण टिका करतो, तेंव्हा ती संपवण्याची कोणती जबाबदारी आपण उचलतो, ह्याचाही विचार केला जावा असेल मला वाटते.

दुसरे असे की प्रत्येक गोष्टीत "सरकार हे करत नाही" "सरकार ते करत नाही" अशी ओरड आपण करत असतो. मी कॉंग्रेसचा समर्थक नाही. पण गैरसरकारी पातळीवर ज्या काही खूप गोष्टी करण्यासारख्या होत्या त्यातरी कॉंग्रेसच्या विरोधकांनी कुठे बरे केल्या? त्यामुळे कॉंग्रेस जितके दोषी आहे, सरकार - प्रशासन जितके दोषी आहे, तितकाच दोष आपल्या सर्वाकंकडे येतो. शेवटी सरकार, प्रशासन चालवते कोण? तर तुम्ही आम्हीच ना?

अर्थात, ह्यात कुणाला शहाणपणा अथवा अक्कल शिकवण्याचा उद्देश नाही. शिकत असताना मीही काहीसा असाच होतो, प्रत्येक गोष्टीला शिव्या द्यायचो. सुदैवानी काही घटनांमुळे समाजातल्या सर्वात खालच्या स्तरात मिसळण्याची संधी लाभली. त्यावरून माझी मते बदलली. त्या अनुभवावरून हे लिहितोय. कुणाच्याही व्यक्तीमत्वाचा, भावनेचा, दृष्टीकोनाचा उपमर्द करण्याचा हेतू नाही.

Everyone here (those who consider themselves as Indian) is an integral part of the socity and if you are accusing the socity for some reasone, then my dear citizens, you too are guilty for the same reason!


Zakki
Friday, December 22, 2006 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण कुणी रस्त्यावर थुंकताना दिसला तर किती जण जाऊन त्याला सांगतात की बाबारे किंवा बाई गं, थुंकणे चूक आहे, त्यामुळे रोगराई पसरते. नैसर्गिक विधी बिनधास्त रस्त्याच्या कडेला उरकणार्‍या किती जणांना अडवण्याचा, शिक्षित करण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही केलेला आहे?

माझ्या एका मित्राने बडोद्यातील एका उच्चशिक्षित नि श्रीमंत वस्तीत असाच प्रयत्न केला होता. बागेत खास चालण्यासाठी असलेल्या मार्गावर हे सुशिक्षित नि श्रीमंत लोक थुंकत. आता माझा मित्र, ज्याने सर्व आयुष्य भारतात घालवले, त्या मित्राचा अनुभव असा की सहा महिने दररोज लोकांना सांगितले की थुंकू नका, तर दहापैकी एकजण पहिल्यांदा ऐकून थुंकण्याचे थांबवतो. दहापैकी तीन जण, चार पाच वेळा ऐकून थांबले पण उरलेले सहा तस्सेच!

त्याच मित्राने आमच्या जुन्या कॉलेजच्या उद्धारासाठी आमच्या सर्वांकडून पैसे जमवले, स्वत: जुन्या विद्यार्थ्यांना बोलावून, विद्यापीठ व कॉलेजच्या अधिकार्‍यांशी बोलणि केली, पैसे दिले, पण पुढे काही नाही. अजून त्यांचे राजकारण, कुणी करायचे, का करायचे अश्या प्रश्नांमधे थोडासा पैसा तसाच (मीटींग च्या चहापाण्यात) खर्च झाला पुढे काही नाही. आता माझा मित्र केमिकल इंजिनियर असून भारतातल्याच रिलायन्स कंपनीत अनेक वर्षे Vice President होता, त्याला तर तुमच्या मते 'भारतातले' कळत असेल ना! त्याची तर लायकी असेल ना!

त्यानेच त्याच्या विदर्भातील एका खेडेगावातील मुलांना सांगीतले की तुम्हाला कॉलेजात जायचे असेल तर पैसे मी देतो, पण जरा चांगल्या कॉलेजात जा, सायन्स, इंजिनियरिंग, डॉक्टरकी शिका, पण कुणि तयार नाहीत!

नि ही सर्व सुशिक्षित नि श्रीमंत लोकांची लक्षणे. गरिब नि अशिक्षित, ज्यांची संख्या प्रामुख्याने भारतात आहे, त्यांना काय बोलणार?

चीड नि संताप येणे साहाजिकच आहे हो, कुणाला कशाचा संताप येतो तर कुणाला कशाला, पण म्हणून कुणि वैयक्तिक टीका करत नाहीत. बरे तर बरे माझ्यावरच केलीत. मी इथले असले काही मनावर घेत नाही, पण इतर कुणाला आवडणार नाही, नि तुमचे पोस्ट उडवून लावतील!


पण IITans नी स्वतःची प्रगती करून घेतली देश तसाच राहिला.

आजच्या लोकसत्ता किंवा सकाळ मधली बातमी आहे की राष्ट्रोद्धारासाठी आयआयटीयन्स नि कंबर कसली! आता आशा आहे की कुणि त्यांना म्हणणार नाही की 'तुम्ही आयआयटी त शिकला म्हणजे तुम्हाला काय जास्त अक्कल आली का, किंवा अशी काय तुमची लायकी आहे की तुम्हाला काही काम करू द्यावे,' वगैरे. जोपर्यंत मायबोलीवर जसे नुसतेच अरे ला कारे म्हणणारे लोक, भारतातहि इतरत्र आहेत, तोपर्यंत काय करणार? असेच चालायचे. आपण नुसतेच चिडून कुणाला तरी डिवचायचे.

चालू दे. शेवटी असे म्हणतात की आपल्या उच्च संस्कृतीत स्वत:ची उन्नति स्वत:च करायची, बायको, मुलगा, समाज यांचे पाश तोडून. जसे वाल्या चा वाल्मिकी झाला तसे!

तेंव्हा माझ्यासाठी, या सनसनाटी, गरमागरम, त्वेषपूर्ण वादातून झालेला तत्वबोध असा की, एकंदरीत समाज राष्ट्र यांच्या नादी न लागलेलेच बरे! अगदी 'आपल्या' भारताचा सुद्धा मोह सोडा!



Laalbhai
Friday, December 22, 2006 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यानेच त्याच्या विदर्भातील एका खेडेगावातील मुलांना सांगीतले की तुम्हाला कॉलेजात जायचे असेल तर पैसे मी देतो, पण जरा चांगल्या कॉलेजात जा, सायन्स, इंजिनियरिंग, डॉक्टरकी शिका, पण कुणि तयार नाहीत!

>>>

अर्धवट माहिती, पूर्वग्रह आणि सामाजिक परिस्थितीची जाण नसताना, चुकीची मते कशी बनवली जातात, ह्याचे हे उत्तम उदाहरण! ह्याच वृत्तीची पराकोटीची चीड आहे.

ज्या कुटुंबाच्या शेकडो पिढ्यांनी शिक्षणाची चवच चाखली नाहीये, त्याला आपल्याला आहे, तितकीच शिक्षणाची आस्था असावी, अशी अपेक्षा करणेच मूळात वेडेपणा आहे.

मी अशी कामे थोडी फार करतो. माझ्या अनुभवानुसार, शिक्षण सुविधा वगैरे गोष्टींपेक्षा "मानसिकता" हेच फार मोठे आव्हान आहे. आणि त्याबद्दल त्या लोकांना दोष देणेच शक्य नाही!

"शिकायचे तर मग पैसे कसे मिळवायचे?" हा प्रश्न ज्या व्यक्तीसमोर असतो, त्याने अमेरिकेत जाऊन settled होणार्‍यांइतके सुसंकृत(!!) असावे, ही अपेक्षाच संपूर्णतह चूक आहे.


भारताचा सुद्धा मोह सोडा!

>>>

लवकर, जरा लवकर सोडा. भले होईल दोन्ही बाजूंचे!

Laalbhai
Friday, December 22, 2006 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपण नुसतेच चिडून कुणाला तरी डिवचायचे.

>>>

The cat is out of the bag!! Administrator, please take a note of it.

हे करताना, तुम्ही कधी काळी ज्या समाजाचा एक भाग होता, त्या संपूर्ण समाजाला आणि देशाला शिव्या देण्याचा नादानपणा करत आहात. डिवचण्याचे शेकडो मार्ग उपलब्ध आहेत. समाज आणि देशाला वेठीला धरू नका!!! वैयक्तिक टिकेची झळ आणि मनस्ताप दोन्ही सहन करावी लागणार नाही.

Zakki
Friday, December 22, 2006 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्धवट माहिती, पूर्वग्रह आणि सामाजिक परिस्थितीची जाण नसताना, चुकीची मते कशी बनवली जातात, ह्याचे हे उत्तम उदाहरण! ह्याच वृत्तीची पराकोटीची चीड आहे.
जरा नीट वाचा की. माझा मित्र भारतातला, त्याच खेड्यातल्या, लोकांना ओळखणारा, पूर्ण माहिती असणारा, पूर्वग्रह नसणारा आहे. नि जे कॉलेजात जाऊ इच्छित होते, नि चांगल्या कॉलेजात जाऊ शकले असते, अश्यांनाच तो हे म्हणाला! त्याच्या जवळ पैसा, ओळखी, भारतातली माहिति असे सर्व काही आहे, त्याचा तो उपयोग करू इच्छितो म्हणूनच तो असे करतो.

त्याला तुम्ही ओळखता का? त्याला एकदम चूक कसे ठरवता? की फक्त काही लोक करतात ते बरोबर नि बाकीचे त्यांच्यापरीने करतात ते सगळे चूक, नि तुमच्याकडून नावे ठेवून घेण्याच्या लायकीचे? माझे सोडा, त्या मित्राबद्दल असे बोलू नका.

तुम्ही स्वत:च इथे येऊन लिहिण्यात वेळ घालवून, तुमच्याच समाजातल्या, तुमच्याच राष्ट्रातल्या लोकांना तुम्ही इतकी सतत नावे ठेवता, बाकीच्यांना का बोलता?


Laalbhai
Friday, December 22, 2006 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्ण तुम्हीच वाचा!
१.
तुमच्या मित्राला मी नाही चूक ठरवले. त्या सद्गृहस्थांचे काय मत आहे, हेही मला माहिती नाही.

मी चूक तुम्हाला ठरवले आहे! तुमच्या मित्राच्या ऐकिव अनुभवावर तुम्ही संपूर्ण समाजाबद्दल मत ठरवून मोकळे झालात! भले शाब्बास!!

आणि त्या मनुष्याचे "असे" मत असले तरी तुम्ही इतके गंभिर मत त्याच्या शब्दावर विसंबून बनवून टाकलेत? इतक्या हलक्या कानाचे का तुम्ही? गोष्टी स्वतः पडताळून पहाण्याचे कष्ट तुम्ही घेतच नाही का?

२.
मी संपूर्ण समाज निकम्मा आहे आणि भिकारी आहे, असे विधान कधीही केलेले नाही. करणारही नाही. काही लोक (माझ्यादृष्टीने) चुकीचे असले तरी, सगळा समाज "भिकारी, निकम्मा" होत नाही!

हेच मला कळते, तुम्हाला कळत नाही. झापडे, पूर्वग्रह म्हणतात तो हाच!


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators