|
Sas
| |
| Tuesday, December 19, 2006 - 8:41 pm: |
| 
|
Weekend, Long Weekend, Holiday ला काय कराव? आम्हि दोघेच आहोच . मी व माझा नवरा, अमेरिकेत आमच नात्यातल कोणि नाही. सध्या आम्हि जिथे आहोत तिथे कुणि मैत्र, मैत्रिणिहि नाहित.सुट्टिच्या दिवशि काय कराव हे आम्हाला सुचत नाही. प्रतेक्य Weekend ला लांब कुठे तरि जाण श्क्य व परवडनार नाहि. रेग्युलर विक एन्ड चा एक दिवस तर गरजेचि खरेदि, घरातली पुढच्या आठवड्यातली काम यात जातो पण मग दुसरे दिवशी काय? आत्ता पर्यंत आम्हि रविवारि उशिरा उठा सावकाश सार उरका मग हिंदि सिनेमा बघा असा दिवस घालवाय्चो पण आता तेहि बोर झालय. Weekday लाहि सायंकाळि काहि करायला नसत मग आम्हि टि.व्हि. , सिनेमा बघण हेच करतो. Weekend, Long Weekend ला काय कराव ह्याच्या वेगवेगळ्या Indoor Outdoor Ideas मला हव्या आहेत.माझ्या शेजारी एक कुटंब आहे. तेलगु. त्यांना मुल आहे. त्यांना हि सुचत नाहि सुट्टिच्या दिवशि काय कराव, पार्क मध्य जाण वै. सोडुन. Please share how you spend your Weedends and Long Weekends. How should couple plan Weekend or Long Weekend?
|
Sashal
| |
| Tuesday, December 19, 2006 - 8:49 pm: |
| 
|
तुम्ही भारतात असता तर काय केलं असतं?
|
Prady
| |
| Tuesday, December 19, 2006 - 9:30 pm: |
| 
|
sas आम्ही दर शनिवारी county liabrary मधे जातो. वाचनाची आवड असेल तर join करायला हरकत नाही. इथली लायब्ररी सिस्टीम खूप छान आहे. एखादं पुस्तक हवं असेल तर आधीच नेटवरून बुक करता येतं. एकावेळी तुम्ही जास्तीतजास्त २५ पुस्तकं आणू शकता. तुम्हाला ऑनलाईन इंडीकेशन मिळतं पुस्तक आलं की. परत करायची डेट आली की त्याचंही. मुख्य म्हणजे तुम्ही इतर काऊंटी लायब्ररीमधून लोनवर पुस्तकं मागवू शकता. जवळपासच्या universities च्या पण लायब्ररीज ह्या सिस्टीम मधे कनेक्टेड असतात. मुख्य म्हणजे मेंबरशिप फ्री आहे. तुम्ही त्या त्या स्टेटचे taxes भरता त्यामुळे हे चार्जेस त्यातच inclusive असतात. फक्त address proof दाखवावं लागतं. पुस्तकांबरोबरच पिक्चर्स च्या, discovery, PBS, History चॅनेलच्या निवडक कर्यक्रमांच्या सीडीज पण उपलब्ध असतात. ठरलेल्या वेळेत पुस्तक अथवा सीडी परत करता येणं शक्य नसेल काही कारणाने तर नेटवरच तुम्ही due date एक्स्टेंड करू शकता. बर्याचदा त्यांच्या संग्रहात आपले हिंदी सिनेमे पण असतात. बघा आवड असेल तर जवळपासची अशी लायब्ररी जॉईन करू शकता.
|
outdoor games मधे interest असेल तर apt मधे किवा जावळ्चा school/Univ मधे खेळायला जावू शक्ता...आम्ही दर रविवारी tennis खेळायला जातो, व्यायाम पण होतो अणी करमणुक पण. जर जवळ पास मन्दिर असेल तर तिथे volunteering करू शक्ता...
|
तुम्ही भारतात असता तर काय केलं असतं? सशल भारतात हा प्रश्न पडत नाही. कारण social life .
|
Sas
| |
| Tuesday, December 19, 2006 - 11:33 pm: |
| 
|
भाततात काय केल असत ???????????????? भारतात असते तर काय काय केल असत, करता आल असत हे मी नवर्याला रोज अगदि रोज सांगते. Sharing with u all. भारतात हं!!! काय धम्माल असति ना भारतात असते तर मी जर पुण्यात राहिलेतर एका Weekend ला तुळशि बाग एकला डेक्कन मग चतुश्रुंगि, सारस बाग....Weekends कमि पडतिल भारतात. इतक काहि करण्या सारख आहे देशात. Even on weekday ला रात्र जेवणा नंतर वा जेव्हा इच्छ होईल तेव्हा रात्रि १०-११ वा १२ पर्यंत आआहा भेळ, पाणिपुरि, दाबेली....खायला जाता येत. जागो जागि शाकाहारि Hotel, Restaurants असल्याने कधिहि जाउन ताव मारता येतो. इथे समोर Mc D Pizza Hut but काहि उपयोग नाही.(We r Pure Vegetarian n following it Strictly so can't go out to eat frequently as there r very few pure veg restaurants r here) जिवनातलि सारि मजा आणि धम्मालच संपलिय जणु. मुख्य म्हणजे भारतात बस, रिक्षा, लोकल किति तरि Transportation सुविधा आहेत गाडि यायलाच हवि अस नाहि (I miss India) ह्यात आणखि एक म्हणजे (जस गोडात गोड) सोशल लाईफ कधि लग्न, कधि साखरपुडा, बारस, हळदि-कंकु.... आमंत्रण. आपले सण त्यांचि तयारि -खरेदि आयुष्य कधि पुर्णविरामावर येईल कळणारहि नाही. आपल्या देशात मिळ्णार्या भेळ-पाणिपुरि ची चव Indian Store च्या भेळ-पाणीपुरी ला नाहिच येउ शकत आणि तो ठेल्यावर खाण्याचा आनंद हि नाहि देउ शकत. बस stop, बसचि वाट पाहाणारि माणस, सिनेमा घर , स्टेशन व जाजो जागि अससलेलि गर्दि, धावपळ ह्याचा आंनद व सुख कशातच नाहि सार निट नेटक सार्या सुविधा हे Perfect जिवन निर्ज़ीव वाटत गिरणित जाउन दळ्ण करण I miss it sometime. घर-संसार फर्निचर,गाडि यापेक्शा माणसांनि भरलेला असायला हवा अस मला वाटत. इथ माणसच नाहित. In India 12 month good weather no Snow, No too much cold, is another advantage of India
|
Supermom
| |
| Wednesday, December 20, 2006 - 2:41 am: |
| 
|
सास, रागावू नकोस ग.तुझ्याहून मोठी आहे म्हणून चार शब्द सांगतेय. आपल्या देशाची सर येत नाही कशालाच हे खरंय, पण जिथे आहोत ती जागा enjoy करायला शिकावं. इथेही खूप गोष्टी आहेत मन रमवायला. तू जे आयुष्यातली सगळी धमाल संपली वगैरे म्हणतेस ना, ते अजिबात पटत नाही. तुझा हा निराशावादी दृष्टीकोन तर मुळीच पटत नाही. अन आता मुलं नसताना तर बरंच काही करता येतं. नंतर आपल्या वेळावर फ़क्त मुलांचाच हक्क असतो. मला लग्नानंतर पाच वर्षांनी दिवस राहिले. तोवर नवरा दिवसभर office मधे अन मी घरी. भारतात मी नोकरी करत होते.इथे एच ४ असल्याने ते शक्य नव्हतं. पण मला मुळीच बोअर वगैरे नाही झालं. यात मी काही खूप फ़ुशारकी मारतेय असं नको समजूस. म्हणण्याचा अर्थ इतकाच की मन रमवून घ्यावं लागतं. खूप मैत्रिणी होत्या. सकाळ संध्याकाळ फ़िरायला जाणे, मैत्रिणींबरोबर त्यांचे तमिल,तेलगू,पंजाबी पदार्थ शिकणे. नेट तर असतंच.कधी पेंटिंग करावं.खूप खूप गोष्टी आहेत. अन वीकएंडला बाहेर siteseeing ला जाऊन पैसेच खर्च करावेत असं नाही. नुसतं long drive ला दोघांनीच जाण्यात कितीतरी मजा येते. हे दिवस पुन्हा येणार नाहीत ग बाई. एकदा मुलं झाली की एकमेकांशी निवांत बोलणं ही सुद्धा luxury होते.
|
Shonoo
| |
| Wednesday, December 20, 2006 - 2:13 pm: |
| 
|
जवळपास मराठी मंडळ, भारतीय मन्डळ असतील त्यांना विचारावे त्यांच्या कार्यक्रमात मदत नेहेमीच हवी असते. अगदी नाटकात, नाचात कामं करणे, वेळ प्रसंगी मेकप ला मदत करणे, तिकीट विक्री करणे, कार्यक्रमाच्या अगोदर लोकांना फोन करून RSVP करायची आठवण करून देणे कितीतरी उचापत्या असतात. तिथे गेलात, काही मदत केलीत तर चार लोकांच्या ओळखी पण होतील. अगदी इतर देशी लोकांशी सम्पर्क नसेल ठेवायचा तर Big Brothers Big Sisters मधे भाग घेता येईल. जवळच्या शाळेत काही Volunteering करता येईल. लहान मुलांना मैदानी खेळांचं coaching करता येइल. असे छोट्यांचे लोकक लीग्स कितीतरी असतात. शिवाय बूक क्लब, वाईन टेस्टिन्ग, Quilting Bee असल्या activities लोकल वर्तमानपत्रातून, लायब्ररीतून शोधून काढता येतील. इथल्या बहुसंख्य लोकांना वेळ अपुरा पडतो. तुम्हाला वेळ घालवायला काही सापडत नाही म्हणजे नवलच आहे.
|
Sas
| |
| Wednesday, December 20, 2006 - 6:03 pm: |
| 
|
Thanks a lot Supermom n Shono
|
Maitreyee
| |
| Wednesday, December 20, 2006 - 6:12 pm: |
| 
|
Sas अग तू फ़्रीमॉन्ट ला अहेस ना!! मग तिथे तर देशी खाण्याचे बर्एच options आहेत की! शिवाय देशी लोक भरपूर, मग मित्र मंडळ जमवायला किती वेळ लागतो! इथे पण हव्या तितक्या malls, shopping complexes असतात की.. वीक एन्ड कमी पडतात फ़िरायचे तर माझा अनुभव असाय की एकदा मित्र मैत्रिणी जमले की मग इथेही भरपूर get togethers, parties , गप्पांच्या मैफ़ली सगळे होते, नन्तर मग 'हा वीकेन्ड काही न करता घरीच रहायला मिळालं तर किती बरं' असं म्हणायची वेळ येते!! त्यात तुम्ही दोघेच आहात मग 'धमाल' करायला अडचण कसली!! गाडी शिकणे हे काही फ़ार मोठे काम नाहीय, थोडा प्रयत्न कर, काहीही अवघड नाही. बाकी दळण आणणे वगैरे मिस करत असशील तर तेवढी उणीव (?) आहे बाई ~D
|
Sami
| |
| Wednesday, December 20, 2006 - 7:06 pm: |
| 
|
ही ही ही MT मलाही असंच वाटतं sas .
|
Lopamudraa
| |
| Wednesday, December 20, 2006 - 7:23 pm: |
| 
|
अरेच्चा इथे भटकायला कित्ति आहे मला तर दिवस कमी पडतो घर सजवण्याने सुध्दा खुप छान वेळ जातो. इथल्या लयब्रररी वा वा.. फ़ारच सुंदर आणि जवळ्पास सुध्दा इतकी छान छान ठिकाण असतात की जाउन धमाल करायची. नव्या मैत्रीणी जमवाय्च्या. (आणि भारतातल्या पाणीपुरीने पोटात बिघडतते, दळण टाकायला गेले की light जातात, नाहीतर गिरणीवर खुप गर्दी असते खुप फ़ेर्या कराव्या लागत्तत हे मनात सारख घोकत जा म्हणजे तुला वाईट वाटाणार नाही) ... मित्र मैत्रिणी आणि सणावार मी पण miss करते. पण आता यावर्षी भरपुर ओळखी झल्यात तर इथल्या सणवारांची पण निमंत्रण यायला लागली.. त्यातच समाधान मानायचे.. चला आज ख्रिसमस dinner ला जायचेय आल्यावर लिहिते.. enjoy आयुष्य एकदाच मिळते...
|
Manuswini
| |
| Wednesday, December 20, 2006 - 7:30 pm: |
| 
|
मैत्रेयी, दळण वगैरे LOL सास, काहीच सुचत नसेल तर तेच पदार्थ भेळ,पाणे पुरी वगैरे घरी निवांत बनव आणी india ची चव आणायचा प्रयत्न कर. . पाणी पुरी बनवताना वाटल्यास हात न धुता बनव तीच चव येईल बघ नवरा पण खुश
|
Sas
| |
| Wednesday, December 20, 2006 - 8:15 pm: |
| 
|
बरोबर आहे एकदा का मी गाडि शिकलेना कि माझे बरेच प्रश्न सुटतिल कारण मैत्रिणि हव्या म्हणजे जाण येण कराव लागत व प्रत्येक वेळि काहि कोणि मला लिफ्ट नाहि देणार. (एकदा अपघात झालाय भारतात तेव्हा पासुन हिंमतच होत नाहि गाडिची.) इथल म.म. जोइन करावस वाटत पण माझा नवरा तेलगु भाषिक त्याला मराठिचा गंध नाहि व मला तेलगुचा. असो . तुम्हा सार्यांचे सल्ले सहिच आहेत मी जे जमतिल ते नक्कि करिन. Actually alone I do not go out at all which I should start. I can use BART or BUS. मला अमेरिका म्हणजे गोष्टिच पुस्तक वाटत कधि कधि , जणु काही गोष्ट नगरित आहोत. स्वछता, निट नेटके रस्ते इमारति...कधि लाईट ही जात नाही, नळाला पाणि येण्याची वेळ हि होत नाहि कारण २४ तास पाणी. घराला २-३ दिवसातुन एकदा Vaccum आपल्या कडे रोज झाडु हातात.घरि रहाणार्या बायाकाहि नेहमी कामात. किति फरक आहे ना. पण Supermom म्हणतात ते खर आहे मी इथे रहायच तर इथे काय करता येईल हे शोधल केल पाहिजे & now I have suggestions n Ideas from u all.Thanks to All.
|
Sashal
| |
| Wednesday, December 20, 2006 - 8:20 pm: |
| 
|
पण माझा नवरा तेलगु भाषिक त्याला मराठिचा गंध नाहि व मला तेलगुचा. >>> मग तुम्ही एकमेकांशी कायम English मध्ये बोलता की हिंदीतून?
|
Disha013
| |
| Wednesday, December 20, 2006 - 8:37 pm: |
| 
|
हा हा हा! सास,अगदी खरे! गोष्टीतले गाव! btw ,मला दे थोडासा वेळ. मला स्वतसाठी अजिबातच नाही मिळत गं. आणि खरेच,तुम्ही दोघे कोणत्या भाषेत बोलता? त्यामुळे तर नाही होत ना तुला बोअर?
|
Savani
| |
| Wednesday, December 20, 2006 - 9:40 pm: |
| 
|
पण माझा नवरा तेलगु भाषिक त्याला मराठिचा गंध नाहि व मला तेलगुचा. >>> मग तुम्ही एकमेकांशी कायम English मध्ये बोलता की हिंदीतून? >>> त्यात काय? मी तर कितीतरी अशी जोडपी पाहिली आहेत की जे इंग्लिश मधुनच एकमेकांशी संवाद साधतात. असो. सास, तू गाडी शिक. तुझे बरेच प्रॉब्लेम दूर होतील. प्रत्येक वेळी तुला नवर्यावर अवलंबून रहायला लागणार नाही. तुझा नवरा आठवडाभर ऑफ़ीसच्या निमित्ताने बाहेर असतो त्यामुळे त्याला कदाचित वीकेंड आरामात घालवला तरी चालत असेल. पण तुला आठवडाभर घरात असल्याने वीकेंडला परत काय करावं असा प्रश्न पडत असेल. तु लायब्ररी किंवा शाळेत volunteer चे काम कर. आठवड्याची जी groceries असतात ते असच मधेच केव्हातरी आणत जा. हवे तर आठवड्यातून दोनदा जात जा. त्यानिमित्ताने बाहेर जाणं होईल. तुला arts n crafts ची आवड असेल तर घराच्या सजावटीसाठी कितीतरी छोटे छोटे प्रोजेक्ट्स करता येतील. आणि हे सगळं काही महागडं नसतं. खरच SM म्हणाली तसं दोघे आहात तर छान स्वतासाठी वेळ दे. तू खरच गाडी शिक. अगदी खुपच कंटाळा आला तर कधीतरी सरळ गाडी काढायची आणि छान लांबवर चक्कर मारून यायची. हे दिवस असं उदास राहुन घालवू नकोस. नंतर खरच तुला कधीही अशी वेळ येणार नाही. मी तर माझे h4 वर असतानाचे ६-७ महिने खूप मिस करते. आता कित्ती गोष्टी कराव्याश्या वाटतात पण... वेळ नाही...
|
Shonoo
| |
| Thursday, December 21, 2006 - 2:51 am: |
| 
|
मी मराठी आणि माझा नवरा पण तेलगु भाषिक. नेहेमी आम्ही हिंदी किंवा इंग्रजी बोलतो. पण गरज पडली तर मी मराठीतून बोलते आणि तो तेलगू उत्तर देतो किंवा भारतात असताना कोणाला समजू नये असं काही बोलायचं असलं तर आम्ही चक्क स्पॅनिश बोलतो एकमेकांशी आहे काय आणि नाही काय? मी कोरिअन मल्याळी, रशियन्-मराठी, डच्-मद्राशी, डच्-तैवानी, मेक्सिकन्-तैवानी अशी जोडपी पण पाहिली आहेत. त्यांची मुलं आईवडिलांच्या भाषा अगदी फ़स्किलास बोलतात.
|
Seema_
| |
| Thursday, December 21, 2006 - 6:11 am: |
| 
|
२१ वर्ष ( लग्न तेव्हा झालय अस गृहित धरुन ) भारतात राहुन दळण दळुन आणल असेल,किंवा ठेल्यावरची पाणीपुरी खाल्ली असेल किंवा हव तेव्हा हव्या त्या veg hotel मध्ये गेला असाल . नातलगांबरोबर बारस , सण , लग्न सगळे सभारंभ पण साजरे केले असतील . बसच्या गर्दीचा आनंद ( ? ) ही लुटला असेल . मग आता थोडे दिवस आयत पीठही वापरुन पहायला काय हरकत आहे ?. इतके दिवस भारतात राहुन हे सगळ enjoy केलय ना ? मग आता थोडे दिवस इथल्या सोई गैरसोइंचा अनुभव घ्या . फ़रक आहे . ते तुम्ही पण कबुल करताय . मग हे माहित असताना comparision कशासाठी ?. डोळस पणे इथे रहायच निर्णय घेतला असेल तर तो ' फ़रक ' accept करावाच लागेल . इथे ही भरपुर माणस आहेत . करण्यासारख खुप आहे . इथला fall,spring पाहिला असेलच . इतक्या सुंदर crisp perfect mornings/evenings मला तरी कधीच निर्जीव दिसल्या नाहीत . आता तुम्हाला spring allergies असतील तर गोष्ट अलहिदा . ~D My apologies if I sound judgmental.
|
Soha
| |
| Thursday, December 21, 2006 - 8:39 am: |
| 
|
I always had this doubt in my mind. How difficult it is to get h1 visa when you are on h4, especially when you have good work experience in India? a experience of working for a US company?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|