|
Kedarjoshi
| |
| Wednesday, December 20, 2006 - 2:55 pm: |
| 
|
स्वतःचे दोष शोधून स्वतःपासूनच उपायाला सुरूवात करता आली तरी पुरे आहे. अगदी बरोबर अज्जुका. प्रत्येकाने तेवढे देखील केले तर देश सुधाराय्ला वेळ तो कीती लागनार. आपण अजूनही परकीयांचा आणि परकीयांनी सोयीस्करपणे लिहीलेला आपला इतिहास शिकतो. हे मानसिक गुलामगिरीचेच लक्षण नाही का?>>>>>>> मेढेकर चला माझ्या वरिल मताशी सहमत असनारा कोनीतरी आहे. राष्ट्राचे चलन्वलन, Post, हे देखील कुणाची तरी देन आहे >> पेशवा ऐखाद्या TP करनार्या आयडी ने हे वाक्य लिहिले असते तर मी हा रिप्लाय दिला नसता पण तुम्ही लिहीले म्हणुन चलन वलन कोणाची तरी देन फार जुने उदाहरण देत नाही ईंग्रज यायच्या आधीचेच देतो १७६० च्या पानिपतात मराठ्यानीं दिल्ली जिंकली. सैन्या कडे अन्न घ्यायला पैसा न्हवता म्हणुन सदाशिवभाऊ नी दिल्लीचे सिंहासन फोडले व त्याचा मुद्रा केल्या. त्यांचा वेळेस पायी चालनार्या ला १ रु पगार व अन्न मिळत असे. शिलेदाराला १.५० पैसे. ह्या नोंदी आहेत. फार जुने द्यायचे झाले तर भारताचा व्यापार युरोप व अफ्रिके सोबत होता, त्या वेळेस barter scale जसे होते तसेच मुद्रा पण होत्या. पुण्याच्या केळकर संग्राहालयात ह्या मुद्रा सापडतील. ब्रिटीशांनी चलन दिले असे फक्त ज्यांना पुर्न माहीती नाही असेच लोक मानतात हा त्या देशाचा दोष नाही. आता पोस्ट. वरिल उदाहरण पुढे नेतो. त्याच सदाशिवरावांनी गोविंदपंत बुंदेल्यांना पैसे पाठवा असे अनेक खलीते धाडले. त्या पुर्वी शिवाजी महारांजानी पाठाविलेले अनेक पत्र आज उप्लब्ध आहेत. त्या ही आधी चे अनेक द्स्तैवज उपल्ब्ध आहेत. बर ह्या फक्त राजांनाच उपल्ब्ध होत्या असे नाही तर गावचा कुल्कर्णी, पाटील त्याला पण होत्या. तार हा एक बदल. पण तो टेक्नोलॉजीतील बदल होय. कदाचीत तो उशीरा आला असता. तुम्हाला हे माहीती नसेल असे नाही पण तरीही हे लिहावे वाटले. बाकी संप, वैगरे तुमच बरोबरच आहे. ता क. वरिल दोन उदा. फक्त ब्रिटीशांच्या आधी अशा सोई होत्या असे दाखवुन देन्या साठीच लिहिले परत कोणी सदाशिवरावांनी असे केले असेत तर पाणिपत जिंकले असते असे लिहीन्यासाठी नाही. लिम्ब्या यादी करुन हा प्र्शन सुटनारा नाहीये.
|
Sheshhnag
| |
| Wednesday, December 20, 2006 - 2:56 pm: |
| 
|
मुळात हा BB चा विषय ``आम्ही भारतीय असे का आहोत.'' यातील `आम्ही' हा शब्द महत्त्वाचा आहे.
|
Saavat
| |
| Wednesday, December 20, 2006 - 3:33 pm: |
| 
|
>>>म्हणुन मी फक्त मला आणि मझ्या कुटुंबियांना सुधारायचा प्रयत्न करतो. तूमच म्हणन भावने सहीत एकदम मान्य! आपण आपल्या "पायाखालचा अंधार" दूर केला की सगळीकडे, आपल्याला पाहीजे असणारा "उजेड" दिसायला लागेलच! हा तोपर्यंत सगळच अंधाराच राज्य! त्याकरता नजर कायम पायाकडे असावी आणि डोळ्यावरचा चष्मा काढलेला असावा,तरच तो अंधार दिसतो. नाहीतर ज्या रंगाचा चष्मा......! माणसान डोळस जरूर असाव, आपला फ़ायदा जरूर पहावा, पण ज्या समाजामूळे, हे बोलण्याच वा करण्याच धैर्य आपल्याला मिळत, त्या समाजाच ऋण कस विसरून चालेल? हे विसरन म्हणजेच, "अंधाराच राज्य".समाजच नसेल, तर 'कोण, कुणाला' शहाण समजणार, आणि पटवून देणार! मूळात 'दोन सख्या भावांची' जिथ सगळ्या बाजूने तुलना होणे शक्य नाही, तिथ दोन देशांची तुलना करण मुळातच चुकीचा प्रयत्न आहे. सगळ्यांच जे,जे चांगल आहे, ते,ते पुर्णपणे घ्यावे, आणि स्वत्: सहीत, सगळ्यांना सामावून घेणार्या, 'सुजलाम, सुफ़लाम' राष्ट्राचे स्वप्न पहावे! (हं! आता हे "चांगल", म्हणजे नक्की काय? ह्याच्या करिता नवीन V&C चालू करायला लागेल, तो भाग वेगळा!) तरच त्या स्वप्नाला काहीतरी अर्थ असेल आणि त्याच बरोबर ह्या चर्चेलाही!!( नाहितर आज पर्यंत किती आले, आणि सगळे इथेच ठेवून किती गेले, आहे कूणाला मोज़दाद! आणखी ७५ वर्षांनी आपल्यातल कोणच इथे "जिवंत"नसणार आहे, हेच सग़ळ्यात मोठ्ठ सत्य आहे! आणि तरिपण सगळ्यांच्या नाकावर टिच्चून, दुनिया अशीच चालू रहाणार!) "फ़क्त भारतातच अंधाराच राज्य आहे, आणि इतरत्र सगळ्या जगात, सगळा उजेडच उजेड पसरलाय" अशी स्वत:ची समजूत घालून, ते दुसर्याला पोटतिडकीने समजावून सांगणे, यातच प्रचंड मोठ्ठा विरोधाभास आहे! अस करण म्हणजे, " वेड पाघंरून, पेडगावला जाण्यासारखे",आहे!! ते पण शहाणेच, पण "उंटावर बसलेले!" (त्यांच्याकडे उंट नेईल तिकडे जाण्याशिवाय आणि तेच चांगल अस समजण्याशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नाही! I will repeat it again, "No other obtion available atall!", And I mean it!! )
|
Yog
| |
| Wednesday, December 20, 2006 - 6:33 pm: |
| 
|
Peshava, तुझ्या पोस्ट मधे फ़क्त भावनातीरेक आहे, तो कदाचित बराचसा खरा असेलही पण वस्तूनिष्ट नाही. जरा अवतीभोवती पाहिलेस तर निव्वळ तेलासाठी कुठलाही प्रदेश बेचिराख करत सुटणारी अमेरिकाही जगाला दिशा दाखवण्या लायकीची नाही. नव्हे जगाला भलत्याच दिशेने ते नेत आहेत असे म्हटले तरी वावगे ठरू नये. फ़क्त potential चा मुद्दा घेतला तरी भारत आज इतर अनेक राष्ट्रान्पेक्षा खूप सम्पन्न आहे हे मान्य करशील?(ज्या शिक्षणाच्या बळावर आपण इथे आलो ते भारतातील विद्यापीठातूनच मिळू शकते हे विसरला नसशीलच?)तेव्हा if we take a step back.. there are lot of positive things that could be worked on to improve the situation. वर भाग्याच पोस्ट भारताला लागू नसल तरी मुद्दा योग्य आहे. उत्क्रान्ती मधे जवळ जवळ एक पिढीचा काळ जातो. एकन्दरीत वरील सर्व positive/negative posts वरून हे सिध्ध होतय की आपली पिढी या विचार सन्क्रमणातून जाते आहे..तेव्हा there is good hope and big hope. असो. "विषयान्तर" झाल? मूळ मुद्दा आपण असे का आहोत?(या शीर्षकातच आपल्यात तृटी आहेत हे मान्य केल गेल आहे, तेव्हा पुन्हा नव्याने वैयक्तिक अनुभव अन एकन्दर परिस्थीतीला अनुसरून मुद्दामून शिव्या देण्याची काय गरज..?) का आहोत यावर चर्चा करा ना. for ex वाहतूक नियम आम्ही भारतात पाळत नाही, कचरा करतो, वक्तशीरपणा नाही वगैरे वगैरे.. असे का यावर objective मुद्दे मान्डा.. नुसत्या बोम्बा कशाला? मित्रा, भारताचे काय घेवून बसलास? इथे अमेरीकेत देशापासून इतक्या दूर राहूनही भारतीयान्चे असले एक एक नमुने अन अचम्बीत करणारे किस्से आहेत (अरे साध republic day/ind day celebration कार्यक्रम ठेवले तरी लोकाना "या" असे आवर्जून सान्गावे लागते. baseball/football/burger वर पैसे उधळतील पण देशाचा स्वातन्त्र्यदीन साजरा करायचा तर यान्च्या खिशाला अन वेळेला "झळ" बसते. अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत) की प्रश्ण पडतो शेवटी मूळ वृत्ती जोवर बदलत नाही तोपर्यन्त अमेरीका काय भारत काय गोळाबेरीज शून्यच. इथे दैनन्दीन जिवन आणि सुरक्षा ही comparatively चान्गली आहे कारण कायदा अत्यन्त कडक आहे. Thats it! शिक्षण, समाजव्यवस्था अन कायदा ही त्रीसूत्री जिथे कुठे व्यवसथित राबवली जाते तो तो प्रदेश,देश हा सम्पन्नतेच्या शिखरावर असतो हेच इतीहास सान्गतो. तेव्हा नुसतीच चिखलफ़ेक करण्यापेक्षा जरा "स्वच्छता मोहीम" हाती घेवूया. नाहीतर आपल्यात अन "लालभाईत" (विचारसरणी) मधे फ़रक काय?
|
Peshawa
| |
| Wednesday, December 20, 2006 - 11:00 pm: |
| 
|
भावनातिरेक ! नक्कीच आहे. पण कुथाय तो भारत माइचा लाल? घ्या हे वाचा... समाधान होइल तुमचे... http://ia.rediff.com/news/2006/dec/20george.htm?q=tp&file=.htm हाच का समाज ज्याच्या बद्दल आदराने बोलले पाहिजे? उरावर बसणे अरे फ़ार सभ्यच बोललो मी... अन म्हणे मागुन मिळते! huh!
|
Disha013
| |
| Wednesday, December 20, 2006 - 11:36 pm: |
| 
|
माणुस visa विसरू शकतो?????? great !!!
|
Yog
| |
| Wednesday, December 20, 2006 - 11:38 pm: |
| 
|
hhmmm..interesting... technical points सोडले तर NRI/GC किव्वा भारतीय काय, definitely one should expect better human/sane behavior or consideration यात काही दूमत नाही पण म्हणून परत सर्व "समाज" कसा काय दोषी ठरतो? But examples like this... end of the day thats the whole point. राष्ट्र भक्ती, देशाची प्रगती वगैरे वगैरे वाचायला बोलायला अभिमानाने ऊर फ़ुटेपर्यन्त बडवायला चान्गल वाटत पण काही शुल्लक गोष्टी, दैनन्दीन जीवनातील व्यवहार यासाठी सुध्धा जेव्हा आकाश पाताळ एक कराव लागत तेव्हा मनुष्याला स्वताच्या देशाची घृणा वाटू लागते. (But I won't be surprised if these same NRIs in past have used their "customs/immigration" contacts to get thru bag screaning etc.. ) तेव्हा एका नाण्याच्या दोन बाजू असतातच अन खोटे सिक्के पण असतातच..पण तू तर अक्खी टाकसाळच कचर्यात काढायला निघाला की... विषयान्तर होतय तरी नरेन्द्र मोदीना visa नाकारणारा, diplomats ना कपडे काढून झडती घेणारा अमेरीकेचा "समाज" ही मग असाच सडलेला म्हणायच का..? तू म्हणशील त्यान्चे tower उडवले security threat आहे.. अरे मग तस तर ज्या रेट ने भारतात अतीरेकी कारवाया घडतात त्या रेट ने बाहेरून आलेल्या प्रत्त्येक कीडा मुन्गीलाही microscope मधून तपासावे लागेल.. अतीशयोक्ती होतीये ना? मला देखिल तुझे वरील उदाहरण आणि आधीचे मुद्दे असेच उथळ आणि अतीशयोक्तीचे वाटतात. असो. चू.भू.दे.घे.
|
Bhagya
| |
| Wednesday, December 20, 2006 - 11:40 pm: |
| 
|
मला पण तेच आश्चर्य वाटले... IT असणारे दोन्ही सुशिक्षित पालक. व्हिसा कसे विसरलेत? दुसर्या देशात काय होईल व्हिसा विसरले तर?
|
Dinesh77
| |
| Thursday, December 21, 2006 - 2:12 am: |
| 
|
योग, तुम्हाला पुर्ण समथन. हे व्हिसाचे प्रकरण अमेरिकेत झाले असते तर त्याचा कुठे गवगवाही झाला नसता, त्या मुलांचे आई, बाप गप काही न बोलता फ़्रांसला परत गेले असते. आणि वर अमेरिकेत काय नियम पाळतात वा वा असे कौतुकही केले असते. अरे भारतीय कसले नियम पाळत नाहीत असे म्हणताना मग आता त्या सेक्युरिटी आॅफ़िसरने नियम पाळला तर का बोंब मारता? कुठेही जा माणुस म्हटला की काही चांगल्या काही वाईट गोष्टी येणारच. मी अमेरिकेत अनेक माणसांना थुंकताना पाहिले आहे (गोरे बरका) आणि अनेकांना चालत्या गाडीतुन सिगारेटी फ़ेकताना पाहीले आहे.
|
>>>>> अरे भारतीय कसले नियम पाळत नाहीत असे म्हणताना मग आता त्या सेक्युरिटी आॅफ़िसरने नियम पाळला तर का बोंब मारता? तुम्ही बातमी अर्धवट वाचली की मलाच बातमी कळली नाही? तो एक नियम एकाला (काळ्या कातडीला, कदाचित शन्का हे, मराठि बामणाला लावत होता) तर दुसरा नियम(???) गोर्या फ्रेन्च कातडीला लावत होता! कदाचित वरुन आदेश असतील....किन्वा या प्रभु दाम्पत्त्याकडे त्या ऑफिसरला "मॅनेज" कस करायचे याचे ज्ञान नसेल......! शेम ऑन अस! विसरण हा गुन्हा नसून चूक हे पण "भारतीय मूल" ( indian origin ) असणार्यान्ना प्रवेशच नाकारणे ही घटनेची थट्टा हे! याला नियम पाळणे म्हणत नाहीत जेव्हा ट्रान्झिट व्हिस्याचा पर्याय होता! त्याच बरोबर कुणि तरी आजच्या पेपरमधली बातमी शोधा, जेद्दह मधे एक मल्ल्याळि कामगार, बायको ला भेटायला हॉस्पिटल मधे निघतो तर त्याच्या टॅक्सीवाला रस्ता चुकतो व "परधर्मियान्ना निशिद्ध"क्षेत्रात प्रवेश करतो..... अशा ठिकाणि प्रवेश करणार्यास केवळ मृत्युदन्डाची शिक्षा दिली जाते, त्यालाही शिक्षा ठोठावली पण इकडुन कोणा मन्त्र्यान्च्या हस्तक्षेपाने त्याच्यावरचे अरीष्ट टळले अशा अर्थाची ती बातमी हे! आपण भारतीय आपली पाठ थोपटुन घेवुयात का? की त्या "प्रभू" दाम्पत्याला आपण असली कसली शिक्षा ठोठावली नाही? कारण आमच्यावर तसे सन्स्कार नाहीत?.......???????? पेशवा, यथोचित लिन्क दिलिस! केदार, यादी करावीच लागेल.... जमेल तेव्हा मीच यादी करतो, मग त्याची उपयुक्तता कळेल!
|
एन आराय किन्वा ग्रीनकार्ड होल्डरान्वर आग पाखडताना आम्ही किमान येवढेही भान पाळु शकत नाही की ज्या "व्यासपीठावर" आम्ही ही गरळ ओकतोय ते व्यासपीठही एका एन आराय कम ग्रीनकार्ड होल्डरने उपलब्ध करुन दिल हे! विचारस्वातन्त्र्याच्या नावाखाली आम्ही तेवढ विसरलो तर ते चूकीच नाहीच, नाही का? इथे केवळ आणि केवळ "आम्ही भारतीय" "असे" (म्हन्जे जसे होत तसे) का या विषयावर चर्चा अपेक्षित हे पण कुणि काही मुद्दे काढले की तो कुठे बसुन कोणत्या नागरिकत्वाने बोलतो असे विषयाला फाटे फोडुन मूल विषय बाजुला पडतो त्याचे काय?
|
मी भारतीयांच्या, गोर्या त्वचेच्या गुलामगिरीबद्दल, कालच लिहिले होते. त्याचा इतक्या लवकर प्रत्यंतर येईल असे वाटले नव्हते. मला खात्री आहे की गयावया करणार्या प्रभुंवर तो ईमिग्रेशन अधिकारी मोठ्यांदा खेकसला असेल आणि त्यांना बाहेर हाकलून दिले असेल. त्याच वेळी, त्या फ्रेंच माणसापुढे, त्या अधिकार्याने हांजीहांजी केली असणार. आणि ती फ्रेंच व्यक्ती जर महिला असेल तर विचारायलाच नको! नक्कीच त्या अधिकार्याची तिच्यापुढे लाळ गळली असेल! त्या अधिकार्याची मला काहीच चूक वाटत नाही. आपल्या रक्तातच गोर्या त्वचेची गुलामगिरी भिनली आहे. सोनिया गांधीचेच बघा ना! ती जर आफ्रिकन कृष्णवर्णी किंवा चिंकी असती तर, तिच्यापुढे भारतीयांनी लोटांगणे घातली असती का? आपल्या देशबांधवांना तुच्छ लेखणे आणि परकीयांसमोर लाचारी ही आपली फार जुनी परंपरा आहे. एअर इंडियाच्या विमानात सुद्धा भारतीय प्रवाशांकडे दुर्लक्ष तर गोर्या प्रवांशांना उत्तम सेवा दिली जाते.
|
Mahesh
| |
| Thursday, December 21, 2006 - 5:22 am: |
| 
|
पहिल्यापासुन ही चर्चा मन लावुन वाचत आहे. वरच्या उदाहरणाबद्दल बोलावेसे वाटले. व्हिसा विसरणे ही चूक आहेच, पण म्हणुन त्याला पर्याय पाहुच नये असे नाही. आई वडिल आणी ती मुले यांची हिस्टरी तर असेल की नाही ईमिग्रेशन कडे. आणी सर्वात खटकणारी गोष्ट म्हणजे फ्रेंच माणसाला व्हिसा दिला आणी यांना नाकारला. मला ईकडे जपानमधे आलेला अनुभव... माझ्या मुलीचा (वय ३.५) व्हिसा संपलेला आमच्या १ महिना उशिरा लक्षात आले. मी immegration office मधे जाऊन चौकशी केली, आधी म्हणाले की खरतर deport करतात, पण लहान मुल आहे, तसेच पालकांचा व्हिसा वैध आहे त्यामुळे तुम्ही येथेच अर्ज करा आणी सोबत एक असे का झाले याची कारणे लिहिलेले पत्र जोडा. एवढे केल्यावर व्हिसा मिळाला. सांगायचा मुद्दा हा की जपानी लोक आमचे कोणी लागत नसुन सुद्धा त्यांनी सहृदयता दाखवली, मग आपल्याच लोकांनी एवढे का अडवावे ? कृपया यावरुन मला परदेशाचे कौतुक आणी आपल्या देशाचा तिरस्कार आहे असा अर्थ काढू नये.
|
सतीश, तसेही असेल आणि मिळालेल्या अधिकारातील नियम एकतर्फी लावताना बुद्धी आणि माणुसकी, दोन्हीही गहाण टाकलेल्या असणे असेही असेल.... शेवटी माणुसकी ही भावनाच ना? कोण म्हणेल काय की ही भारतीय मण्डळी भावनेवर जगतात? भावनान्चा विचार करतात? मूलभूत भावना देखिल ज्यान्च्या दगडी हृदयास आणि मनांस स्पर्ष करु शकत नाहीत अशान्ना माणुस तरी का म्हणावे? पशू देखिल म्हणु नये, तो पशुन्चा अपमान होइल! महेशचे उदाहरण चपखल हे! थोड विषयान्तर, तर झाल अस की चारेक महिन्यान्पुर्वी मी पुण्यात गाडीवरुन फिरत होतो, मॉडर्न शाळेसमोरच्या चौकात (खर तर तिठ्ठा जिथे भुयारी मार्ग हे) मॉडर्न कॅफे कडुन डेक्कन कडे जाताना कधी नाही तो माझ्याकडुन सिग्नल तोडला गेला समोरच मामामहाशय उभे होते, त्यान्नी हात करुन थाम्बविले, थाम्बलो, करतो काय? मग उलटतपासणि सुरू झाली लायसेन्स बघु, पल्युशनच सर्टिफिकेट बघु, गाडीची कागद बघु.........! काय राव येवढी कसली घाई हे? बाकी लोक थाम्बलीहेत ना? कुठ चालला? कुठुन आला वगैरे वगैरे! मी शान्तपणे लायसेन्स काढुन दिले, म्हणले साहेब, चूक झाली पण इकडे चौक नसल्यामुळे सरळ वाहतुक चालत असेल असे वाटले, हवालदार्: लाल दिवा दिसत नाही का? की रन्ग कळत नाही? मी: कळतो ना साहेब, पण गडबडीत दुर्लक्ष झाले तो: येवढी कसली घाई? द्या ते लायसेन्स तोवर मी लायसेन्स च्या पाकीटातली बाकी अडगळ काढुन लायसेन्स त्याच्यापुढे धरले तो: काय साहेब तुम्ही? हे लायसेन्स केव्हाच सम्पल हे मी: अहो असे कस शक्य हे? मी मागेच तर रिन्यु करुन घेतल हे तो: मी काय खोट बोलतो का? दाखवा दाखवा मला यावर (लायसेन्स माझ्याकडे परत) चश्मा न लावल्याने मी डोळे फाडफाडुन पाने एकामागोमाग उलटतो, तर काय? फेब्रुवारी २००५ मधेच लायसेन्स ची मुदत सम्पलेली आणि मी अशा भ्रमात की लायसेन्स अजुन चालुच हे! तो: मग आता पावती फाडा आठशे ची! मी खिसे चाचपले, ऑफिसची कॅश होती पण ती नन्तरच्या कामात वापरायची होती म्हणल साहेब लायसेन्स्च लक्षातच आल नाही हो, विसरलो. तो: तुम्ही काय काय विसरणार? नो पल्युशन नाही, कागदपत्रे नाहीत, त्यात सिग्नल तोडला, लायसन्सही नाही... तुमची गाडी ती किती जुनी खटारा....! चला चला पावती फाडा लौकर! मी गाऽऽर! त्यास गयावया करुन म्हणल अहो साहेब, गरीब माणुस हे म्हणुन तर असली गाडी वापरतो हे ना? लायसन्स केव्हान्च हे ते तरी बघा, १९८८ पासुनच हे! चुकुन राहील रिनिवलच, शिवाय ते फोर व्हीलरच ट्रान्स्पोर्टच हे! आता नाही गरीबाकडे फोरव्हीलर, नाहीतर दर तीनतीन वर्षान्नी रिन्यु केलच जात ना, बघाना रेकॉर्ड साहेब. तो: ते काही नाही तुम्ही पावती फाडा....! मी: साहेब माझ्याकडे पैशेच नाहीत येवधे अन जे हेत ते ऑफिसचे हेत! मी जास्तित जास्त शम्भर रुपये देवु शकेन! तो: वा साहेब, अस कधि अस्त का? तुम्ही सगळे नियम तोडायचे अन वर पुन्हा आम्हालाच.....! मी: बघा साहेब, खिशात पैसे आहेत ते कम्पनीचे, ते जर तुम्हाला दिले तर काम न झाल्याने माझी नोकरी जाइल, तुम्हाला चालेल का? तो: बर बर कुठ कसल्या कामाला चाल्लात येवढ्य गडबडित? कुठ कामाला हे? माझ आयकार्ड गळ्यातच लटकवलेल होत ते दाखवल...आणि तपशील थोडक्यात सान्गितला अन म्हणल बघा साहेब, मी नियम तोडणार्यातला वाटतो का तुम्हाला? बघा बघा डोक्यावर हेल्मेटही हे, किती जुन हे ते बघा! जेव्हा सक्ती नव्हती तेव्हान्पासुनच हे! तुम्हीच सान्गा आता काय-द्याच! मी शम्भरच देवु शकतो..... कुठे देवु,इथेच चालेल का? इकडे तिकडे बघत एक हिरवी पत्ती दिले अन सुटका करुन घेतली......! प्रश्ण असा पडतो की कोणत्याही तस पहाता किरकोळ चूक किन्वा गुन्ह्याबद्दल सरसकट "आठशे" रुपयान्चा दण्ड आकारणारा कायदा गाढव? की तेवढा दन्ड भरण्याची ऐपत नसताना रस्त्यावरुन "गाड्या उडविणारे" आम्हि गाढव? की कायद्यान जरी गुन्हा असला तरी समोरच्याची चूक किरकोळ अजाणता झाली हे हे समजुन त्या "माणुसकीची" किरकोळ किम्मत घेणारा तो हवालदार गाढव? (नो पल्युशनचे सर्टिफिकेट माझ्या खिशातच होते जे गाडीत चिकटवायचे राहुन गेलेले आणि आहे हेच विसरलेलो
|
LT या BB वरची चर्चा आता गोंधळ घालू लागलीय उण्या-दुण्या वर येऊन ठेपलेत. असं नाही वाटत?
|
>>>>> LT या BB वरची चर्चा आता गोंधळ घालू ........ होय, आधी तस होऊ लागल होत, आता सावरतय! (नेमका मला वेळ नाही नायतर विषय खर्रचच महत्वाचा हे!)
|
वर उल्लेख केलेल्या बातमी सन्दर्भातील लिन्क येथे दिली हे जिज्ञासुन्नी अवश्य वाचावी 
|
कोणत्याही तस पहाता किरकोळ चूक किन्वा गुन्ह्याबद्दल सरसकट "आठशे" रुपयान्चा दण्ड आकारणारा कायदा गाढव? की तेवढा दन्ड भरण्याची ऐपत नसताना रस्त्यावरुन "गाड्या उडविणारे" आम्हि गाढव?>>>>> वर दिलेल्या चुका किरकोळ नक्किच नाहित कायद्याच्या ड्रुष्टीने तरी लिनंबु तिंबु तु आठशे रुपये भरायला हवे होते लाच देण्यापेक्षा ते नक्किच चांगले. परदेशात ही चुक किरकोळ नाही धरली जात.. इथे यासाठी तुम्हला तुमची गाडी विकुन दंड भरावा लागेल.. ,तीनदा जरी कॅमेरात सापडला तरी लायसन कायमचे बॅन होते.. त्यामुळे आपल्याकडे मला तरी लोकच गाढव आहेत कायद्याने त्यांना शिस्त लागत नाहीये दुर्दैवाने असच म्हणाव लागेल, बिना लायससन्स्ची गाडी चलवणे या कारणाने police घरी येउन एका स्रीला तुरुंगात घेउन गेलेत आणि तीच्या ३ व ४ वर्षाच्या मुली ते बघुन रडत होत्या.. हा सिन मी बघितालाय..
|
>>>>> बिना लायससन्स्ची गाडी चलवणे या कारणाने police घरी येउन एका स्रीला तुरुंगात घेउन गेलेत आणि तीच्या ३ व ४ वर्षाच्या मुली ते बघुन रडत होत्या.. हा सिन मी बघितालाय.. लोपा, मी माझ्या चूकीचे समर्थन करीत नाही पण "बिनालायसेन्स्च" आणि असलेले लायसेन्स "केवळ रिन्यु" केल नाही यातिल फरक न समजु शकणारा आणि अवाच्च्यासवा दण्ड किन्वा लाच याशिवाय अन्य पर्याय उपलब्ध न करुन देणारा कायदा गाढवच म्हणावा लागतो! एनिवे, मी हे उदाहरण प्रश्णान्ची दुसरी बाजू दाखविण्यास दिल हे ज्यात माझ्यासहीत "आम्ही" भारतीय कसे होत त्याच दर्शन करुन दिल हे! आणि तरीही परदेशातील तू सान्गत असलेली उदाहरणे मला मान्य करवत नाहीत हे ही तितकेच खरे!
|
LT, खरेच की. मोठाच प्रश्न आहे. त्या माणसाने, हो म्हणजे मामासाहेबाने जरा समजून घ्यायला पाहिजे होते. मग? एखाद्याकडून चुकून तोडला जातो सिग्नल. त्यात काय एवढे लगेच टोकायला पाहिजे? एखाद्याकडून विसरले जाते परवान्याचे नूतनीकरण करून घेणे. त्यात एवढे काय आहे मोठेसे की थांबवून विचारायचे? किती घाई असते माणसाला आपल्या कामाची? त्यांना हे सगळे ट्रेनींगमध्ये शिकवले जात नसणार. तेवढा शंभर रुपयाचा मोह करायचे शिकवत असणार. असो असल्या बारीक-सारीक चुकांसाठी तुझे शंभर रुपये गेले याचे दु:ख वाटतेय. पण आठशे रुपये वाचले याचे थोडे थोडे बरे पण वाटतेय. आता असल्या फालतू गोष्टींसाठी वेळ जाऊ देऊ नकोस. हे मामालोक सुधारेपर्यंत तू आपला सगळे कागदपत्रं वगैरे जे काही नेणं आवश्यक असतं ते आपल्या बरोबर वागवत जा. आधीच तुझ्या बहुतेक पोस्टमध्ये शेवटची ओळ असते की तुला अजिबात वेळ नाही आजकाल म्हणून.
शक्य होईल तेवढा वेळ वाचवून या बीबीसारख्या विषयांवर चर्चा करणे ही आज या देशाची गरज आहे!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|