|
Chyayla
| |
| Thursday, October 19, 2006 - 5:11 pm: |
| 
|
आर्च, च्यायला तु समजते तसे काहीच वाईट नाही, अगदी हमखास मराठी टपोरी शब्द आहे, तसे मला खुप झणान्नी टोकले आहे. पण हा शब्द अगदी सहजच तोन्डात बसतो... च्यायला SSS , बघ पटेल तुला.
|
Manuswini
| |
| Thursday, October 19, 2006 - 7:05 pm: |
| 
|
बी तुझा लेख आजच वाचला एक प्रश्ण रागवु नकोस पण खरेच अर्थ कळला नाही वारुणी म्हणजे काय? दारु?? चरस??
|
Bee
| |
| Friday, October 20, 2006 - 3:34 am: |
| 
|
मनुस्विनी, अग त्यात रागवण्यासारखं काय आहे. वारुणीचा अर्थ होतो दारु. चरस नाही.. हे चरस काय असतं अन् कस दिसतं हे मलाही माहिती नाही. पण तो एक नशेचा प्रकार आहे. वारुणी म्हणजे दारू. हा खूप काव्यमय शब्द झाला. प्रचलित शब्द दारु आहे.
|
Ha thread baba cha asala tari aai-pappa n baddal majhya athavani combined aahet.. I love them equally.. Baryach junya athavani aahet aani navin pan add hotil in future .. tyatalyach kahi lahan asatana vargat pahila number yevude mi tula cycle aanato mhananare aai-pappa, result chya ek divas aadhi jaun mala cycle ghevun detat Engg madhye computer lagel hya kalpanene mala computer present karanare aai-pappa Nukatach office join kelela..sakali 7.45 vajata office chi bas nighayachi.. majhi sakal 7 vajatachi, tenvha kahi na vicharata pappa motor cycle ghevun bas paryant sodayala ubhe aani aai hatat daba ghevun ubhi ..sandhyakali office madhye late basala aani 9 chya bas ne ghari yenar kalala tar 9 vajata bas stop chya ethe pappa motor cycle ghevun ubhe..aai-pappa-lahan bhau sarva jevayala thamabalele majhya sathi US madhye job la yetana khushi aani bhiti hya mixed feeling madhale aai-pappa majha navara first time tyanchyashi bolala tenvha aamachya mulivar aamacha purna vishwas aahe sanganare majhe aai-pappa Atta halli halli pan, majhya delivery chya veles, mala contraction yet hotya tenvha majhya javal yevun sonu khup tras hotoy ka mhananare majhe aai-pappa.. Majhi delivery hoiparyant ratrabhar devapudhe diva lavun phone chi vat pahanare aai-pappa Atta majhya lahan muli mule mala faral karata yenar nahi mhanun india varun faral parcel karanare majhe aai-pappa Mi nehami devakade ekach magate, majhya aai pappa ni mala jasa ghadavala.. majhyavar premachi mayechi aani chukale tenvha shiksha devun neet karanyachi ji mehanet ghetali, majhya muli babat mala pan tech karata yave
|
Chyayla
| |
| Tuesday, October 24, 2006 - 10:44 pm: |
| 
|
स्वप्ना, तुझ्या मुळे मला बाबान्चा अजुन एक किस्सा आठवला... माझे ईन्जीनियरीन्ग चे २ पेपर एकाच दिवशी होते, आणी मला बाहेर खाण्याची सवय पण नव्हती, तर माझे बाबा चक्क सायकलवरुन डब्बा घेउन आले होते, मला कसे तरीच वाटले कारण हा प्रकार तिथे शोभुन दिसत नव्हता, मला ते पटले नाही पण नन्तर त्यामागच प्रेम कळुन आल.
|
Bee
| |
| Wednesday, October 25, 2006 - 6:32 am: |
| 
|
स्वप्ना, खूपच छान लिहिलं आहे. तुला एकेक गोष्ट आठवते हेच खूप मोठे आहे.
|
Vinya
| |
| Wednesday, October 25, 2006 - 4:05 pm: |
| 
|
एकदम ह्रुदयस्पर्शी लिहील आहेस. तुझ्या आईबाबांइतकच तुझ्या संवेदनशील मनाच पण कौतुक वाटत!
|
माझीही एक आठवण माझ्या दहावीच्या परीक्षेच्या वेळी खूप ऊन असायचं मला त्रास होऊ नये म्हणून रोज खूप लांब चालत जाऊन बाबा कलिंगड आणायचे मला खूप आवडतं म्हणून. engg च्या exam च्या वेळी माझी lucky भाजी कोबीची ती खाल्ली की पेपर छान जायचा म्हणून माझ्यासाठी ८ दिवस रोज एकच भाजी खाणारे आई बाबा.... असं कितीही लिहीलं तरी कमीच आहे हो ना?
|
Bee
| |
| Thursday, November 09, 2006 - 3:51 am: |
| 
|
मी बालपणी बाबांकडून खूप रट्टे खाल्ले आहेत. कारण मला १ली आणि २रीत शाळेत जायचाच कंटाळा यायचा. खरे तर शाळेत खूप मार मार मिळायचा आणि घरी आलो की भाऊ आणि वडील पण खूप मारायचे. पण हा मार जर नसता मिळाला तर आज मी इथवर पोचलो नसतो. कुठल्या तरी टपरीत शिंगलबश्या विसळत बसलो असतो. म्हणून कधीकधी मुलांना मार आवश्यक असतो जे माझ्यासारखे न ऐकणारे असतात. पण माझ्या बहिणींनी मला खूप खूप प्रेम दिले. ते जर मिळाले नसते तर मी घरातून खरच पळून जायचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मी इयत्ता ४थीत होतो :-)
|
"बाबा" या वर जितके लिहावे तितके कमि आहे. माझ्या दुर्दैवाने २१.१२.२००४ रोजी माझे बाबा देवाघरि गेले अगदि अचानक काय झाले कुठे चुकले काहि कळत नाहि माझ्या सारखी कमनशिबी मुलगी दुसरि कुणी नसेल एकुलती एक मुलगी म्हणून माझे कर्तव्य मि पार पाडू शकले नाहि. आई वडीलान पासुन दुर राहण्याची शिक्षा मला मिळालि आणि बाबा माझ्याशी काहि न बोलता निघुन गेले.मि त्यान्च्याजवळ पोहोचे पर्यन्त त्याचा अखेरच प्रवास सुरु झाला होता.२९ सप्टेबर २००४ ला कुवैतला जाताना दोन महिन्यात असे काही घडेल असा विचार देखिल मनात आला नाहि.?आणि मुख्य म्हणजे मिलन च्या जन्मानन्तर मि कुवैतला परत जावे या साठी माझ्या मागे लागणारे माझे बाबा मला असे अर्ध्या वाटेवर सोडुन जातिल असे कधि स्वप्नात सुद्धा वाटले नाही पण शेवटि नियति पुढे आपण हतबल असतो हे मात्र नक्कि! सगळ्यात जास्त सल याचाच आहे कि त्याना जेव्हा माझि नितात गरज होति तेव्हा मि दुर असल्यामुळे त्यान्च्या जवळ नव्ह्ते आणि आई तिच्या अपगत्वा मुळे त्याच्या जवळ राहु शकलि नाहि. अचानक झालेला हा आघात मला पचवणे खुप जड जातय.देवाच्या मनात तरि काय होते? याचा विचार करते तेन्व्हा डोक बधिर होत. आई साठी मला धिराने घ्यावच लागणार या पुढे तिचा आधार मीच आहे.त्यामुळे मन खम्बिर तर करावेच लागणार "पण "काही काही माणस आपल्यातू दूर निघून गेली तरी आपल्या मनात राहतातच. ज्या मातीत ती मिसळ्तात त्यातून्च त्यान्चा गन्ध येत राहतो." तो गन्ध मनात सठवतच त्याना सोबत घेऊनच आयुष्य मार्गी लावायच, सुसह्य करायच!
|
मनाली एकदम मन भरून आलं गं. तुझं खरं आहे. दैवापुढे काहीही नाही चालत गं. पण त्या आवडत्या व्यक्तीबरोबरच्या गोड आठवणी आपल्याबरोबर असतात नेहेमी हे काय कमी आहे?
|
Chyayla
| |
| Friday, November 17, 2006 - 7:34 pm: |
| 
|
मनाली, तुझी कविता खुप भावस्पर्शी आहे, अश्या गोष्टी मनाला फ़ार चटका लावुन जातात. कुठे तरी ती सल कायम रहाते. तुझ्यासारखी पाळी कुणावरही येउ नये.
|
Rakhalb
| |
| Sunday, November 19, 2006 - 1:41 pm: |
| 
|
मनाली, मी तुझ्या feelings समजू शकतो. मी लहान असतानाची माझ्या बाबांची एक आठवण आई सांगते: बाबांची नवीन नोकरी होती, बहुधा पहिलीच. Provident Fund चा फ़ाॅर्म भरताना बाबांनी nominee म्हणून आईचं नाव न लिहीता माझं नाव लिहीलं. "तरूणपणी जर मी गेलो तर तुझं परत लग्नं होईल, पण माझ्या राखालची सोय नको का असायला?" असा खुलासा त्यांनी आईजवळ केला. स्वत:चा संसार नीट उभा देखील झालेला नसताना नि:स्वार्थी आणि जबाबदार असण्याचं उदाहारण त्यांनी आम्हाला व्यवहारात जगून दाखवलं. माणूस गेल्या नंतर आपण त्याच्याबद्दल विचार करतो, बोलतो, आणि गेलेल्याला miss करतो, हे स्वाभावीकच आहे, त्यात वाईट वाटुन घेऊ नये, असं मला वाटतं. पितृ-रूण (sorry, I don't know how to write Hri in Devnagari) हे आपल्या मुलाचं किंवा मुलीचं यथासांग संगोपन करून फ़ेडायच असतं. त्यासाटी बाबांकडून शिकण्यासारखं खूप काही असतं.
|
समीर आणि वरद आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद. पण मी अतिशय प्रामाणिकपणे सान्गु इछिते कि हि कविता मी केलेली नाहि.यातील शब्द जरी माझे स्वतहचे नसले तरी भावना नक्किच माझ्या आहेत. कदाचित कुणि विश्वास ठेवणार नाही पण ज्या दिवशी माझे बाबा गेले त्यानतर एक दिवस मी सवयि प्रमाणे डायरी लिहायला घेतलि पण मन इतके विषण्ण झाले होते कि माझा हात काहि लिहायला उचलवतच नव्हता. डोळ्यातिल अश्रु अख़न्ड वाहत होते.आणि त्याच वेळेस माझा लहान मुलगा मिहिर बाहेर कुणाला तरि दगड मारत होता.मी बाहेर जावुन बघते तर तो एका कुत्र्याला मारत होता. मी त्याला का मारतोस? असे विचरले तर म्हणाला की हा भुभड्या आजोबाना चावला म्हणून आजोबा देवाघरी गेले मला त्याचि समजुत काढताना नाकीनऊ आले त्याच्या प्रश्नाना उत्तर देताना मिच त्याला हॉस्पिटल मधे असे सान्गितले कि आजोबाना कुत्रा चावलाय म्हणुन त्याना इथे ठेवलय आजोबा बरे होउन लवकर घरि येतिल. आणि तो बिचारा त्याच्या आजोबाचि वाट पहात राहिला.पण घरि आला तो त्याच्या लाडक्या आजोबाचा निर्विकार देह त्याना असे पाहुन मिहिर एकदम शान्त झाला.मला वाट्ले लहान आहे त्याला काहि कळत नसावे.बाबाचे पार्थिव नेल्यावर मात्र बर्याच वेळाने तो माझ्या जवळ आला आणि कुशित शिरुन हमसुन हमसुन रडायला लागला,मि प्रेमाने त्याच्या पाठिवर हात फ़िरवुन त्याला समजवायचा प्रयत्न करत होते.थोडा शान्त झाल्यावर मला म्हणाला पन्याआई आजोबा आत्ता परत कधिच येणार नाहित, कारण मला माहित आहे ते बाप्पाकडे गेलेत आणि तिथुन कुणीच कधि परत येत नाहि.मला त्याला काय सागावे हेच समजत नव्हते. ............................................................ आणि त्याच रात्रि सगळे नातेवाईक निघुन गेल्यावर एकटीच बसले होते आता पुढे काय? याचा विचार करत आणि तेव्हा समोर कुठ्लेतरि मासिक पड्लेले सहज म्हणून ते उचलुन चाळत होते तेव्हा हि कविता माझ्या द्रुष्टिस पडली. आणि कविता मला बरेच काहि शिकवुन गेली. आणि तेन्व्हाच मी ठरवले की या पुढे न रडता बाबाच्या आठ्वणीनवर पुढिल आयुष्य मार्गी लावायचे आणि त्याच वेळेस लताचे सुर कानात घुमु लागले कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला वैभवाने बहरुन आला याल का हो बघायाला?.....................................
|
राखाल तु म्हणतोस ते अगदी खरे आहे. माझे बाबा अगदि कडक शिस्तिचे.मला आठवतेय माझे बाबा जर्मनिहुन परत आल्यावरचि घटना आहे तेन्व्हा मी चौथित असेन स्कॉलर्शिप च्या क्लास साठि आम्ही आमच्या शाळेतिल एक शिक्षिका सौ वर्तक यान्च्याकडे जात असु.एकदा दुपारि क्लासला गेले आणि नेमकि सुट्टी होति म्हणुन आम्हि सगळ्या मैत्रिणी मिळून एका मैत्रिणीच्या घरि खेळायला गेलो. आणि खेळात इतक्या गुन्ग झालो कि वेळेचे भान राहिले नाहि.कुणितरि मला हाका मारतय असे वाट्ले म्हणून बाहेर येउन बघते तर शेजारच्या एका मुलाला बाबानि मला शोधायला पाठवले होते.मी घाबरतच घरी परत आले. आणि बाबानि मला शिक्षा म्हणून ओणवे उभे केले आणि ते त्यान्च्या कामाला निघुन गेले आणि मी ते परत येई पर्यन्त तशिच उभि होते.जवळपास ३ तास बाबान्च्या जेन्व्हा लक्षात आले तेन्व्हा मला उराशि कवटाळून ते खुप रडले.माझि पाठ इतका वेळ ओणवि उभि रहिल्यामुळे खुप दुखत होति.बाबानि स्वतहा मला तेल लावुन गरम पाण्याने शेकुन दिले मला पुर्ण बरे वाटे पर्यन्त बाबा माझ्या उशाशि बसुन होते. मला त्याना तसे रडताना बघुन खुप गम्मत वाटली आणि आश्चर्य पण मला ते नन्तर म्हणाले पदु या पुढे मी तुला कधि शिक्षा केलि तर अशी माझि वाट पहात राहु नकोस,तुला काहि झाले तर मी आणि तुझि आई जगु शकणार नाहि.माझ्या इतक्या रागिट बाबाचे ह्रुदय इतके कोमल आहे याचि जाणीव मला प्रथमच झाली
|
Mrudultai
| |
| Wednesday, December 20, 2006 - 11:17 am: |
| 
|
हा विशय फ़ारच आवडला.माझे बाबा अर्थात नाना दि.२८०८२००५ साली आम्हाला सोडून गेले. आम्ही दोघी बहिणी आहोत. आणि आई, नाना. आमचे फ़ारच छान कुटुअम्ब होते. आमचे नाना जेव्हा उपचारासाठी पुण्याला गेले होते तेव्हा आम्हला फ़ारच वाईट वाट्ले होते कारण घरी फ़क्त मी व माझी बहिण होते, नन्तर नाना व आई परत आले तेव्हा खुपच आनन्द झाला होत वातले नव्हते की मनातली भिती खरी होईल.मी सुद्धा माझे नाना गेले तेव्हा घरी नव्हते. ते ग्गेल्यनन्तर तर १ वर्षभर आमच्या कोणाचाही या गोष्टीवर विश्वास बसत नव्ह्ता. माझ्या बहिणीचे १२ वी चे वर्ष होते ती तर फ़ारच डीप्रेस झाली होती.करन ति तर सतत त्यन्च्यजवल होती. तीने फ़ार लहान वयातच म्रुत्यु पहिला होता. आम्ही दोघी त्यान्च्या खुपच क्लोज होतो.
|
Mrudultai
| |
| Wednesday, December 20, 2006 - 11:27 am: |
| 
|
मला कालच एक आठवण आली नानान्बद्दल. मी लहान असताना रात्री झोपेत जर माझा हात माझ्या अन्गाखाली आला तर मी झोपेत म्हणायची "नाना हात अलक्का न ?" आणी नाना तो हात कढायचे. व ते मला ह्यावरुन मी मोठी झ्याल्यानन्तर खुपच चिडवायचे. ह्या आठवणी आठवल्या की खुप छान वाटते पण लगेचच त्यान्ची आठवण देखिल येते.
|
Mrudultai
| |
| Wednesday, December 20, 2006 - 11:41 am: |
| 
|
ह्या विषयावर किती बोलु आणि किती नको अस होतय नाना गेल्यानन्तर आम्ही त्यान्च्या शिवाय जगणे शिकलो पण त्यान्ची खुप आठवण येते जास्ती करुन दिवाळी दसरा, दिवाळीतला पाडवा तेव्ह आमची आई आम्ही फ़ारच रडलो होतो. नानान्चा वाढदिवस आसायचा दिवाळीत. अजुन एक आठवण. ----------- आमच्या आईचा वाढदिवस नाना नेहमी विसरायचे पण सन्ध्याकाळी काहीतरी खायला आणायचे. मग आईचा राग जायचा. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आठवल्या की फ़ार वाईट वाटत.
|
Mrudultai
| |
| Wednesday, December 20, 2006 - 11:54 am: |
| 
|
माझे नाना जेव्हा आजारी पडले होते तेव्हा आत्या, काका सगले जण मला सान्गायचे आता टी.वाय. झाल्यानन्तर नोकरी कर. कारण नानान्ना पुर्ण आराम करायचा होता. हे ऐकल्यावर नाना खुपच रडले होते. त्यान्ना मी खुप शिकावे असे वाटायचे. आम्ही दोघी बहिणी पण त्यान्नी कधी तसा विचार केला नाही.ते मला नेहमी दादु म्हणयचे.
|
Disha013
| |
| Wednesday, December 20, 2006 - 4:04 pm: |
| 
|
म्रुदुल,छान लिहिलेस गं. पण एक सांगु का,तु तुझ्या profile मधुन personal माहिती काढुन टाक. मला वाटते,माणुसनेही हे तुला सांगितलेय आधी कुठेतरी. plz राग मानु नकोस. आपुलकीने सांगतेय.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|