|
Maitreyee
| |
| Tuesday, December 19, 2006 - 9:45 pm: |
| 
|
रिंकू पाटिल, सांगलीची अमृता, दोघी कशा बळी गेल्या? AK47 वाचून त्या मारणार्याचं काही अडलं नाही हो! आणखीही पुष्कळ उदाहरणे आहेत आपल्याकडे school age violence ची.. हत्यार कोणतेही असू दे काही फ़रक पडतो का? सांगायचा मुद्दा एवढाच की मेरा भारत महान हे ठीक पण जी कारणं दिली ती valid वाटली नाहीत.
|
Deshi
| |
| Tuesday, December 19, 2006 - 10:58 pm: |
| 
|
Vijay Kulkarni successfully diverted the subject. (as always)
|
Disha013
| |
| Tuesday, December 19, 2006 - 11:29 pm: |
| 
|
भारतात शेजारी आपल्या ओळखीचे असतात चांगल्याच. पण us मधे अनोळखी लोकांकडेही जातात बरे मुले ट्रीट मागाय्ला. आणि AK ला लागते लायसन्स. पण चाकु,सुरे,कोयते,तलवारी यांना थोडीच लागते?
|
भारत आणी अमेरिका अशी तुलना करने अयोग्य आहे. अमेरिका तुम्ही आजची पाहत आहात. थोडा मागचा ईतिहास ४० वर्षांपुर्वीचा आठवुन बघा. फारतर klan ह्या शब्दावर गूगल करा. येत्या २५ वर्षात भारतही बदलेल. (मीच नाही गार्टनर सारखे रिपोर्टस पण तेच म्हणत आहेत) उशीरा का होईना २००० मध्ये रस्ते सुधारण्याचा मोठा प्रोजेक्ट आला. आज पुणे ते कोल्हापुर एवढे अंतर कापायला फक्त ४ तास लागतात ५ वर्शापुर्वी ८ लागायचे. सुझलॉन सारख्या मोठ्या कंपन्या विंड ईनर्जी चे प्रोजेक्ट चालु करत आहेत, सामुदायीक शेती सारखे नविन उपक्रम येत आहेत. मुख्य म्हणजे आपल्या सारखे लोक रोज भारता बद्दल काही तरी लिहित वाचत आहेत, काही लोक प्रत्यक्ष काम करत आहेत तर काही मायबोली सारख्या वेबसाईट वर लिहुन मत मांडत आहेत. Now this is big आप्लय आधीच्या जनरेशन ने केले नाही असे नाही पण आता वेग वाढला आहे. प्रोढ शिक्षणात पण प्रगती होत आहे. ह्या व अशा अनेक सुधारना व्ह्यायला वेळ लागेल पण we will be there .
|
Peshawa
| |
| Wednesday, December 20, 2006 - 1:13 am: |
| 
|
(पोपटराव हताश उभे आह्ते. अचानक मुंग्यानी मेरु च्या style मधे पोपटराव म्हणतात.) ही राष्ट्रप्रेमाची आरडाअऒरड हा न्युनगंड आणी दांभिक आत्मविष्वास दोन्हीही! माझ्या सारख्या य:क्श्चित माणसाने राष्ट्रा बद्दल वेडेवाकडे (?) उच्चारले तर ज्यांचा पींड पिळवटून फ़ुटतो त्यांच्या डोक्याला रद्दड म्हणणे हे सुधा शाल आणी श्रिफ़ळ देउन सत्कारणे होइल असे मला वाटते आहे! काय फ़रक Danish cartoons बद्दल झालेल्या निदर्शनात आणि वरच्या निदर्शनात? कोणत्याही क्षेत्रात माप्दंडापासून मान वस्त्रापर्यंत सगळ्यासाठि अनुकरण करणार्यां, उसने आणणार्या राष्ट्रातील लोकानी का कराव्या आत्मप्रौढ वल्गना? हा लोकशाहीचा पोकळ डंका... इतका विश्वास असता तर जागो जाग रस्ते आडवा, बंद घाला, बंधने घाला, धरणे धरा, जाळ्पोळ करा असले अभद्र सुचले नस्ते! दांडगाइ करणार्या unions आणि संघटना उभारल्या नस्त्या! ज्यांना लोकशाहीची व्याख्या देशातील इतीहास व वास्तवावर करता येत नाही ज्यांची राज्यघटना उसनवारीवर बनवली आहे, ज्यांच्या राष्ट्रातील मह्त्वाच्या संस्था कोणितरी मागे सोडुन गेल्या म्ह्णुन आहेत. ज्या राष्ट्राचे चलन्वलन, Post, हे देखील कुणाची तरी देन आहे. ज्या देशातील कायदा १५० वर्शापसुन बदलत नाही. ज्या देशात विचरसरणि सुधा उसन्वारीवर आणावी लागते... ज्या देशात असे लोक आहेत जे अक्रमकांना मुक्तीदाते मानतात त्यांच्या करता पैसे उभारतात. अरे हाड! असल्या देशाने जगाला दिशा देण्याची स्वप्न बघावी हाच केव्हडा मोठा दैवदुर्विलास (?) आहे! काय मिळते देशात मागुन? मागुन ? आ हा! किंवा सगळे काही "मागुनच" मिळते असे तर म्ह्णायचे नाही... मागुन, टेबलाखालून, खोक्यातुउन... किंवा मागुन म्हणजे वराती मागुन घोडे त्यातील "मागुन" असे तर अपेख्शित नाही? मग अगदी बरोबर आहे. हे अर्थाचे व्याकरण ल्क्षातच आले नाही! देशाला जो आदर मिळतो तो तुमच्या पुर्वजांच्या कर्त्रुत्वाला आहे. हे समजले तरी नारळ म्हणावा इतके डोक्याचे evolution झाले असे समजण्यास हरकत नाही! हा हंत हंत! (अतीव वेदनेने पोपटराव रंगमंचावर कोसळतात सारे त्याना धरायला धावतात!)
|
Bhagya
| |
| Wednesday, December 20, 2006 - 1:40 am: |
| 
|
I agree with Kedar. भारत्-अमेरिका यांची तुलना हीच एक मोठी चूक आहे. एक लक्षात घ्या- भारताला स्वातंत्र्य मिळून फ़क्त ५० वर्षे झालीत. अमेरिका स्वतंत्र होऊन २५० तर ऑस्ट्रेलिया स्वतंत्र होऊन २०० वर्षे झालीत. इतिहासाची पुस्तके वाचा. सहज लक्षात येईल की हे सगळे देश आर्थिक आणि सामाजिक सुधारणेच्या evolution मधून असेच गेलेत. बर्याच वर्षांपूर्वी त्यांची स्थिती भारतापेक्षा खूपच वाईट होती. सुधारकी, आता श्रीमंत असणार्या राष्ट्रांत फ़ार पूर्वी बर्याच निंदनीय घडामोडी होऊन गेल्यात. जुने लंडन घाणेरड्या, रोगराईने ग्रासलेल्या गल्ल्यांचे एक शहर होते. श्रीमंत अमीर उमराव यांच्या हातात सारी सत्ता होती. छोट्या छोट्या गुन्ह्यांसाठी अगदी लहान मुलांपासुन ते म्हातार्या गरीबांना हात तोडणे, फ़ाशी देणे आणि बोटीत घालून ऑस्ट्रेलियाला पाठवणे असे प्रकार होते. लाचलुचपत आणि भ्रष्टाचार बोकाळला होता. बोटीत घालून या कैद्यांना ऑस्ट्रेलियात पाठवले तेव्हा तर ऑस्ट्रेलियात फ़ारच भयंकर परिस्थीत झाली. प्रचंड गरिबी, पुरुष कैद्यांच्या तुलनेत अगदी कमी असलेल्या स्त्रिया, लहान मुलांची जबाबदारी घ्यायला कोणी नाही, शेती पासून ते दुकानापर्यंत कुठलेही उद्योग नाहीत यांनी न भूतो न भविष्यती असे अराजक माजले. आणि स्वातंत्र्यलढ्या दरम्यान अमेरिकेत माजलेली अंतर्गत बंडाळी आणि तिचे लोकांना भोगायला लागलेले दुष्परिणाम तुम्हाला माहीत नाहीत? plantation era मधली काळ्यांची भीषण गुलामी तुम्हाला माहीत नाही? ते कसे स्वतंत्र झाले ते माहित नाही? तुम्हाला काय वाटते, ही राष्ट्रे प्रथमपासून अशी श्रीमंत आणि सुंदर होती? आपणपण प्रगतीच्या त्या दिशेने पाऊले टाकतोच आहे. आपली लोकसंख्या, भ्रष्टाचार आणि सामाजीक आणि आर्थिक विषमता ह्या आपल्यापुढे असलेल्या मुख्य समस्या आहेत. पण विचार करा, आपली जास्त लोकसंख्या आपली strength होउ शकते- योग्य तर्हेने वापरल्यास. आजकाल मिडिआ आणि न्यायव्यवस्थेत बर्याच सुधारणा होताहेत. मनू शर्मा, शिबू सोरेन यांना झालेली शिक्षा हे निदर्शीत करते. अर्थक्रांती तर होतेच आहे, आणि कालांतराने, अर्थक्रांतीच्या ओघात जेव्हा dignity of labour अर्थात खालच्या दर्जाच्या कामगारांना जेव्हा विदेशा सारखे पगार मिळतील, तेव्हा सामाजिक विशमता पण कमी होईल. अर्थात, या सगळ्याला वेळ लागेलच. but we will be there.
|
भारताबाहेर राहून भारतावर फक्त प्रेम करता ये ईल. तो तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही ज्या देशात रहाता, त्याच देशाचे होऊन जा. तिथे काय कमी जास्त होईल त्याबद्दल त्या देशाला काय द्यायच्या त्या शिव्या देत बसा. भारताबद्दल उणे दुणे काय काढत बसता. भारताचं काय करायचं ते आम्ही पाहुना. येथल्या भयानक system चे चटके काय आहेत ते आमच्यापेक्शा तुम्हाला कसे अधिक जाणवणार? त्या system शी झगडा आमचा चालू आहे. पण म्हणून देशच वाईट असं म्हणता ये ईल का?
|
भाग्या, तू दिलेली अमेरिका, आॅस्ट्रेलिया ई. देशांची उदाहरणे भारताला लागू पडत नाहीत. जेव्हा ते देश सुधारायला लागले तेव्हा त्यांची लोकसंख्या खूपच कमी होती. त्यामुळे त्यांना सुधारणा घडवून आणणे खूप सोपे होते. त्यांच्यात जाती-धर्माच्या फारश्या समस्या नव्हत्या. त्यांच्यामधल्या कोणीही एखाद्या विशिष्ट जातीचे किंवा धर्माचे लांगूलचालन केले नाही. आणि मुख्य म्हणजे आपल्यात दोष आहेत आणि आपण सुधारणे आवश्यक आहे याची त्यांना जाणीव होती. भारतात बहुतेकांना आपले काही चुकत आहे हे मान्यच नाही. उदा. कुठल्याही थुंकण्यार्या व्यक्तीला आपण काही घाण करत आहोत असे वाटतच नाही. मग ते थुंकणे थांबविणार तरी केंव्हा? अशा वृत्तीमुळे भारत सुधारण्याची शक्यता फारच कमी आहे. आणि १०५ कोटी लोकं सुधारणार तरी कधी? ज्या व्यक्तीला आपण आजारी आहोत याची जाणीव असते, त्याला औषध देउन बरे करता येते. ज्याला आपणाला काही आजार झाला आहे हे मान्यच नसते, तो औषधच घेत नाही. मग तो बरा होणार तरी कसा?
|
तुमच्याकडे काय औषध आहे? बाकी थुंकणार्यांबद्दल म्हणाल ते फारच वाईट. आम्हालाही वाटतच की हे थांबायला हवं म्हणून. आणि आता मी या विचारांप्रती आलोय की भारताने सुधरले पाहिजे असे म्हणणार्या तुम्हा सगळ्यांना फुले-आंबेडकरांचे वारसदारच समजावे. हा उपरोध नाही. कारण आपल्या समाजातील दुर्गुणांवर त्या महापुरुषांनी जळजळीत डाग दिले होते. पण ते त्या समाजात राहूनच. ह्या बद्दल तुम्हाला काय म्हणायचय?
|
Limbutimbu
| |
| Wednesday, December 20, 2006 - 5:48 am: |
| 
|
सतिश, बरोबरे तुमचे! परवा सहज घरात जेवताना विषय निघाला की सन्स्कार सन्स्कार म्हन्जे तरी काय? त्याच दिवशी ऑफिसमधे विषय चर्चेला आलेला की पुण्यालाच विधेचे माहेरघर, सन्स्कृतीचे माहेरघर वगैरे का म्हणले जाते इत्यादी इत्यादी....! बाकी सगळे अभिनिवेश बाजुला ठेवुन मी थोडा वेगळा विचार करु लागलो तेव्हा असे लक्षात आले की मुळात सन्सारक्षम वय असे नसले व आयुष्यभर ती क्षमता असली तरी तिचा आत्यन्तीक तीव्र स्वरुपातल्या सन्स्कारान्च्या ग्रहणक्षमतेचा विचार केला असता शालेय सहावी सातवी इयत्तेपर्यन्त ती जास्त असते व नेमक्या त्या कालखन्डातल्या आपल्या येथिल शिक्षणाच्या सर्वदूरच्या (केवळ पुणे मुम्बई नाही) बघितल्या असता सर्वत्र नन्नाचाच पाढा तर दिसुन येतोच पण त्या इयत्तान्नन्तरच्या शैक्षणिक कालखन्डात "सुसन्स्कार" या विषयाचा कुठेही मागमुसही दिसत नाही आणि मग असे एक झक्की किन्वा अनेक एन आराय बोम्बलले आणि आम्ही त्यान्च्यावर तुटुन पडलो तरी काय फरक पडणारहे? सुसन्स्काराधारीत शिक्षण हा एक मुलभुत विषय हे, असे अनेक विषय हेत! त्यान्ची शोधुन शोधुन यादि करा! मग बघु
|
Ajjuka
| |
| Wednesday, December 20, 2006 - 5:55 am: |
| 
|
मला केदार जोशी चे म्हणणेच पटू लागलेय थोडे थोडे. झक्कीचेही थोडे थोडे.. काहितरी प्रचंड घोळ आहे. पण जया.. हद्द झाली.. सर्व भारतीयांना आपल्या देशाबद्दल प्रेम असेल तर तो गुन्हा आहे असा अर्थ प्रतित होतोय तू जे म्हणतोयस त्यातून आणि ते पटणे तर दूरच.. मी तर याला काही न करता निव्वळ बोंबा मारणेच म्हणेन. ह्या सगळ्या कारणांसाठी तू देश सोडून गेला असशील तर जिथे गेलायस ते नंदनवनच असायला पाहीजे आणि ते तसे नाहीये हे तुलाही माहितीये. परत तिथे तू उपराच आहेस. कधीकाळी होशीलही कायदेशीर नागरीक पण तरी तुला कातडीच्या रंगावरून उपराच मानले जाणार.. कवी आहेस त्यामुळे ते subtle undercurrents तुला जाणवतीलच. असो.. आता तुला मेल करून शिव्या घालतेच.. भावनेवर नाही सगळं चालत. त्याच romanticism मधून आपण भारतीय जितकं लवकर बाहेर येऊ तितक बरं.. स्वतःचे दोष शोधून स्वतःपासूनच उपायाला सुरूवात करता आली तरी पुरे आहे.
|
चिंतामणराव पाटील, तुम्ही माझे पोस्टिंग नीट वाचलेले दिसत नाही. माझ्याकडे समाजाला सुधारायचे कुठलेही औषध नाही. आणि असले तरी समाज ते घेणारच नाही कारण भारतीय समाजाला आपले काही चुकत आहे असे वाटतच नाही. मध्यरात्री फटाके वाजवणे, थुंकणे, रस्त्यावरून लग्नाच्या वराती काढून वाहतुकीचा खोळंबा करणे, वाहतुकीचे नियम न पाळणे, गोर्या कातडीची गुलामगिरी करणे, पैसे खाणे या व अशा अनेक गोष्टींमध्ये काही चुकीचे आहे असे भारतीयांना वाटतच नाही. असा समाज सुधारणे अशक्य आहे. तुम्ही एखाद्याला लाल सिग्नल तोडू नका किंवा थुंकु नका असे सांगितले तर, ते तुम्हाला "रस्ता तुमच्या बापाचा आहे का?" असे सुनावतात. त्यामुळे मी फक्त मला आणि माझ्या कुटुंबियांना सुधारण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा भारतीयांना आपले काही चुकत आहे असे वाटेल, तेव्हांच सुधारण्याची क्रिया सुरू होइल. पण असे होणे नजीकच्या भविष्यकाळात तरी अशक्य वाटते. परंतु जेव्हा ही क्रिया सुरु होइल, तेव्हां कदाचित फार उशीर झालेला असेल!
|
Limbutimbu
| |
| Wednesday, December 20, 2006 - 5:56 am: |
| 
|
>>>>> भारताने सुधरले पाहिजे असे म्हणणार्या तुम्हा सगळ्यांना फुले-आंबेडकरांचे वारसदारच समजावे. हा उपरोध नाही. आम्ही कुणाचे कसले वारस समजायचे तो वेगळा विषय, सद्ध्या जे स्वतःला फुले आम्बेडकरान्चे वारस समजुन जी काही काळी कृत्ये करीत आख्खा महाराष्ट्रभर ज्यान्नी तोडफोड आणि जाळपोळिचा धिन्गाणा घालत नन्गानाच केला, आधी त्यान्चे "सुधारणेबद्दल" काय मत हे ते तपासा! आणि त्याचबरोबर माननीय बाबासाहेब आम्बेडकरान्ना मुळात कोणि शिकविले याचा जरा तपास काढा! "जळजळित डाग" वगैरे उपमा उत्प्रेक्षा विसरा आणि वास्तवात हजर व्हा!
|
Limbutimbu
| |
| Wednesday, December 20, 2006 - 6:16 am: |
| 
|
सतिश, पुन्हा एक सन्यमीत चान्गली पोस्ट! भावना पोचल्या! पेशवा, गुड पोस्ट, भावना पोचल्या
|
Giriraj
| |
| Wednesday, December 20, 2006 - 6:26 am: |
| 
|
बर! काय ठरले मग? कश्यामुळे भारतिय असे आहेत? मुळात भारतिय करंटे आहेत कि नाहीत हे तरी ठरले की नाही?
|
मी सुद्धा एकेकाळी एनाराय होतो. ५-६ वर्षे परदेशात राहून काही वर्षांपूर्वी भारतात आलो. भारत आणि परदेश यांमधील भयानक फरक मला कायम अस्वस्थ करतो. विशेषत: भारत आणि इतर देशांमधल्या लोकांच्या वृत्तीमध्ये अतिशय फरक आहे. भारतीयांना आपले काही चुकत आहे असे वाटतच नाही. त्यांनी परकीयांच्या फक्त वाईट गोष्टीच उचलल्या आहेत. परकीयांचा वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा, कामावरची निष्ठा, कार्यक्षमता, शिस्त, नियम न मोडण्याची वृत्ती ई. गोष्टींकडे भारतीयांनी संपूर्ण दुर्लक्ष केलेले आहे. त्याऐवजी त्यांच्या दारू पिणे, मुक्त वागणे, स्वैराचार करणे ई. गोष्टी आत्मसात केल्या आहेत. बहुसंख्य भारतीयांना याच्यात काही चुकीचे आहे असे वाटतच नाही. म्हणूनच खुनी, भ्रष्टाचारी पुढारी पुन्हा पुन्हा निवडुन येतात. गाडगेबाबा, महात्मा गांधी ईंनी अनेक वर्षं प्रयत्न करून सुद्धा जत्रेत बोकड बळी देण्याचे अजून बंद झालेले नाही. अनेक कायदे करून सुद्धा लोक रात्री फटाके वाजवतातच. आपण अजूनही परकीयांचा आणि परकीयांनी सोयीस्करपणे लिहीलेला आपला इतिहास शिकतो. हे मानसिक गुलामगिरीचेच लक्षण नाही का? समाजसुधारकांच्या प्रयत्नांनी किंवा कायदे करून हा समाज सुधारलेला नाही. म्हणुन मी फक्त मला आणि मझ्या कुटुंबियांना सुधारायचा प्रयत्न करतो. आम्ही सुधारलो तरी त्या प्रमाणात भारतीय समाज सुधारल्यासारखाच आहे.
|
परदेशातले भारतीय सुधारले आहेत हा सुद्धा एक भ्रम आहे. परदेशातल्या कोणत्याही पान मिळणार्या किराणा-भुसार दुकानात जाउन बघा. दुकानाच्या बाहेर असंख्य लाल पिचकार्या दिसतील. अनेक भारतीय वस्तू परत करण्याच्या योजनेचा गैरफायदा घेउन, सहलीला जाउन वस्तू वापरतात आणि आल्यावर परत करून पैसे परत घेतात. फक्त ते वाहतुकीचे नियम पाळतात, पण ते शिक्षेच्या भीतीने! हेच शिस्तबद्ध भारतीय भारतभेटीवर आल्यावर अस्सल भारतीयासारखे वागायला विमानतळावर पाय ठेवल्यापासून सुरुवात करतात!
|
आम्हाला वाटतय हो सगळं कसं चकाचक हवं. पण व्रुत्तीच तशी जन्माला येऊ लागल्यात त्याचं काय करायचं? घाण करणार्यांनी तसं करु नये. चांगलं वागावं, भ्र्ष्टाचार वगैरे.....गोष्टी कोणाला नकोहेत? लोकांना या गोष्टींपासून पराव्रुत्त करण्यासाठी अनेक जण झटतच आहेत की. आम्हाला मान्यय की आमचं वर्तन चुकीचय. पण देशाला शिव्या? नाही... नाही खपविता येणार.
|
Saavat
| |
| Wednesday, December 20, 2006 - 2:43 pm: |
| 
|
V&C च्या चर्चेशी संबंधीत असणारी, मायबोली वरचीच 'भारत' हि लिन्क पहा! 'हे राज्य व्हावे हि "श्रींची" इच्छा, आहे', सगळ्यांच मन:पुर्वक स्वागत! आणि जे सगळे NRI आहेत, ते पण 'यणार हायत', तेव्हा, त्यांचही स्वागत!! इतर पाहूण्यांना आम्ही देवासारखे मानतो!! हीच आमची संस्कृती आहे.
|
Sheshhnag
| |
| Wednesday, December 20, 2006 - 2:52 pm: |
| 
|
मला वाटते, ज्या उद्देशाने ही चर्चा सुरू केली त्या उद्देशाकडे आपण हळुहळू जात आहोत. भारतावर एवढी जहाल टीका करणार्यांनो, एक लक्षात घ्या, हा देश महान आहे, यावत्चंद्र दिवाकरो राहील. तुम्ही ज्यांच्यावर टीका करताहात, ते इथे राहाणारे लोक आहेत. कुणी त्यांच्यावर टीका केली तर ती सहनीय आहे, कारण ती वृत्ती आहे. पण त्यांच्या भारतीयत्वावर आणि भारतावर टीका करू नका, ते कुठल्याच देशाचा नागरिक सहन करणार नाही.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|