Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 19, 2006

Hitguj » Views and Comments » General » Why are we (Indians) like this? » Archive through December 19, 2006 « Previous Next »

Ajjuka
Monday, December 18, 2006 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया.. तू ही? की तुझा अर्धा उपरोध अर्ध सत्य आम्हा पामरांना कळत नाहीये..

बाकी पाऊल, सावट, एनके, पाटिल, शेषनागोबा... भावना समजल्या पण नुसत्या भावनेने काही होत नाही हो..

यांचं वाचून आता मतं पटत नसली तरी झक्की परवडले असं म्हणायची वेळ आली.. काय बरोबर ना एल्ट्या? (कैक वर्षांनी मी माझा अनुल्लेख मोडलाय तेव्हा...)


Limbutimbu
Monday, December 18, 2006 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> तरी झक्की परवडले असं म्हणायची वेळ आली.. काय बरोबर ना एल्ट्या? (कैक वर्षांनी मी माझा अनुल्लेख मोडलाय तेव्हा...)
हा, हे बाकी खर! कसही असल तरी झक्कीन्च पोस्ट विचारपुर्वक असत! बौद्धिक असत! देवनागरीत असत! कळवळ्यान अस्त, चळवळ्यागत अस्त, आडपडदा न ठेवणार असत, रोखठोक मुद्द्याच अस्त (म्हन्जे बाकीच्यान्ची नसतात असा सोइस्कर अर्थ कुणि घेवु नये)

पण मला ते तुझ्या मोडलेल्या अनुल्लेखाच काही कळल नाही, काय अर्थ त्याचा?
बाकी या बीबीवर येवुन एकदा दणदणीत पोस्टलच पायजेल!


Saavat
Monday, December 18, 2006 - 7:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

zakki

जगाचे साऽरे बंध तोडून ईशचरणि लागावे!

कोण म्हणत तू भारतिय नाही. तुझ्या वाक्याने पटल की तुझि पाळमूळ अजुनही तेवढिच घट्ट आहेत.

तू बर्‍याच B.B वर नामचा उल्लेख केला आहे. सुरु कर!


Saavat
Monday, December 18, 2006 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ajukaa
भावना समजल्या पण नुसत्या भावनेने काही होत नाही हो..

मग कशान होत, जरा सांगाल का हो..? DDD!


Limbutimbu
Monday, December 18, 2006 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> कठोर आत्मपरिक्षण
म्हणजे काय सांगा वेळ असेल तर. आत्म्याच परिक्षण कस काय करायच.
सावट, (चावटच दिस्तोय!) DDD
अरे बाबा आत्म म्हन्जे स्वतःच! आत्मा बित्मा वगैरे भुत्प्रेतसमन्धाधी डाकीणी शाकीणि हडलि वगैरे तमाम म्रुतान्च्या आत्म्यान्शी किन्वा जिवित व्यक्तीन्च्या अत्रुप्त, असमाधानी, हावरट आत्म्यान्शी याचा काही सम्बन्ध नाही रे भो!
अन असले शब्दार्थबिब्दार्थान्चे प्रश्ण तिकडे शब्दार्थान्च्या बीबी वर विचार, भली मोठ्ठी फौज येइल उत्तर द्यायला......!
तर सान्गत काय होतो की बीबी चे नाव हे हे अस....
Why are we (Indians) like this?
तर यातल like this म्हन्जे नेमक काय तेच अजुन या बीबीवर एकमताने ठरत नाही हे तर त्यामागच्या why या कारणान्चा विचार कधी होणार?
जे जस हे ते तस मान्य केल्याखेरीज त्यावरले उपाय तरी कुठुन सुचणार?
नाहीतर आहेच मग भावनेच्या भरात आपापली त्याज्य लक्तरे कुरवाळित बसणे!


Laalbhai
Tuesday, December 19, 2006 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

admin

माझे post का काढले कळेल का? मी व्यक्त केलेल्या संतापात अनैसर्गिक काय होते? मी कोणत्याही वोचारसरणीसाठी किंवा माझ्या गटासाठी भांडत नव्हतो!

मुद्दा हा आहे की जेंव्हा संपूर्ण देशाला आणि समाजाला शिव्या दिल्या जातात तेंव्हा त्या त्या देशाचे नागरिक समजल्या जाणार्‍या प्रत्येकाचा हा वैयक्तिक अपमान असतो. तसा तो झक्की आणि पेशवा यांनी माझा केला आहे. मग त्यांनीही भारतीय समाजाबद्दल वैयक्तिक अनुभवातून (किंवा काहींना डिवचण्यासाठी) अपमानास्पद उद्गार काढले, ते का ठेवले गेले?

माझ्या मते, जगात कुठेही रहात असाल तरी स्वतःला भारतीय समजत असाल तर प्रत्येकाने ह्या वृत्तेचा निषेध केला पाहिजे.


Laalbhai
Tuesday, December 19, 2006 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घरात केर कचरा घाण हे हे मान्यच केले नाही की

>>>

काय वेड घेऊन पेडगावला जाताय? माझा मुद्दा तुम्हाला समजला नाही असे नाही पण उगाच कोणाची तरी बाजू (वैयक्तिक कारणासाठी) घेताना मुख्य मुद्द्याला विरोध करताय तुम्ही.

भारतीय समाजात दोष नाहीत, असे मी कधीही म्हटले नाही. कोणत्याही समाजात दोष नसतात असे कधीच होत नाही. तसे ती भारतीय समाजात आहेत. आणि त्याचे विश्लेषण करण्याचा हक्क प्रत्येक व्यक्तीला आहे -- मग ती व्यक्ती भारतीय असो, नसो; त्या व्यक्तीला भारतीय समाजाचे सखोल ज्ञान असो, नसो! केवळ वाचास्वातंत्र्य म्हणून सोमालियाचा संडास साफ करणारा मनुष्य भारताच्या राष्ट्रपतींवर टिका करू शकतो.

पण कितीही चूका आहेत हे मान्य केले तरी खालिल वाक्ये तुमच्या सदसदविवेकबुद्धीला पटतात का? मग ती तुमच्या "खास" मित्राने केलेली असली तरीही.

१. उलट कीव येते. -- झक्की
२. भिकारी, निकम्मे लेकाचे! -- झक्की
३. अहो, तुम्ही जेमतेम लायकीचे आहात -- झक्की
४. आता सुद्धा भारतीय जर अजून म्हणत असतील की परदेशी भारतीयांनी येऊन भारत सुधारावा -- झक्की
५. मागणार्याला भिकारी आणि लुबाडणार्याला श्रेष्ठ समजणारी लोक आहेत तिथे -- पेशवा
६. मागुन देशात काही मिळत नाही उरावर बसले कीच मिळते -- पेशवा
७. जे असल्या रद्दड डोक्यांना समजते -- पेशवा
८. न्युनगंडाने पचाडलेले राश्ट्र आहे ते... न्युनगंड आणि दांभिक आत्मविश्वास... -- पेशवा


माझा मुद्दा हा आहे! वरील वाक्ये लिहिणार्‍याचा उद्देश दोषांचे विश्लेषण करण्याचा कधीच नसतो.

गंमत अशी की स्वतःच्या देशाचा घोर अपमान करणारी ही वाक्य इथे खुशाल मौजूद आहेत. आणि ह्या वाक्यांवर व्यक्त केलेला संताप काढून टाकला आहे.

सदा न कदा जाज्वल्य राष्ट्रभक्ती, अफाट धर्मप्रेम यांची दुहाई देत मतं मागणारी "उजवी" मंडळी का मूग गिळून गप्प आहेत? इथे भारताचा अपमान झालेला दिसत नाही काय?

माझा मुद्दा समजलाच असेल. दोष नाहीत असे माझे म्हणणे नाही. पण संपूर्ण समाजाबद्दल आणि देशाबद्दल वर दिलेली घाणेरडी वाक्ये उच्चारणे हा अपराध आहे. ह्या अपराधाला मायबोलीवर काय शिक्षा आहे?

(झक्की आणि पेशवा ह्यांना लाज वाटली तर त्यांनी किमान माफी मागण्याचा सूज्ञपणा तरी दाखवावा!)




Limbutimbu
Tuesday, December 19, 2006 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई, याक्षणी अक्षरषः एक अक्षरही टाइपण्यास वेळ नाही पण.....
शम्भर दीडशे वर्षान्पुर्वी लोकशाहीवादीन्नी लिहिलेली शतपत्रे आठवा, त्यानन्तरच्याही अनेकानेक समाजसुधारकान्नी मान्डलेले विचार आठवा, वरील तुमचा न्याय लावायचा तर लोकहितवादी व अन्य सर्व वैचारीक व कृतिशील सुधारक हे देशद्रोहीच मानावे लागतील, की ते देशात बसुन मते मान्डत होते आणि त्याकाळच्या "बामणि" आचारविचारान्ना छेद देत होते म्हणुन ते मस्तकी धारण करण्याच्या योग्यतेचे झाले? माझा मुद्दा येवढाच की त्यावेळचे त्यान्चे लिखाण "पुरोगामी" म्हणुन खपुन जाते तर एखाद्याने या देशाच्या प्रेमापोटी "सत्य तळतळाट" व्यक्त केला तर तो कुणाला का बर झोम्बावा की अपमान वगैरे व्हावेत?
तुम्ही उदाहरणादाखल दिलेल्या त्यान्च्या प्रत्येक वाक्यागणिक शेकड्यानी, एकदोन अपवादात्मक नव्हेत, शेकड्यानी उदाहरणे देण्याची वास्तव परिस्थिती भारतात असताना त्याकडे कुणि बोट दाखविले तर ते केवळ "एन आराय" हेत असे म्हणुन विषय भलती कडे वळविण्यामागचा उद्देश काय?


Laalbhai
Tuesday, December 19, 2006 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


स्वतःच्या वैक्तिक फायद्यासाठे बुडाला पाय लावून परदेशात पळालेल्या आणि तिथेच स्थायिक झालेल्या लोकांची तुलना तुम्ही लोकहितवादींशी करता, ह्यातच सगळा विरोधाभास व्यक्त होतो.

तरीही तुम्ही लिहिताना एक चूक केलीच. तुम्ही म्हणालात की "वैचारिक आणि कृतीशील सुधारक". आता तुम्हाला अतिषय आदरणीय असलेल्या सावरकरांचेच उदाहरण द्यायचे तर सावरकरांनी जातीव्यवस्थेवर टिका केली तेंव्हा जाती निर्मूलनाचे कार्यही केले.

लोकहितवादी मी वाचले आहेत. त्याविषयी चर्चा नंतर.

पुन्हा सांगतो, दोषांचे विश्लेषण करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. पण जेंव्हा विश्लेषण करताना स्वतःची लायकी ओळखली जात नाही तेंव्हा प्रतिहल्ला सोसण्याची तयारी ठेवावी. "भिकारी, निकम्मे, दांभिक, रद्दड" ही विशेषणे म्हणजे विश्लेषण नव्हे. कोणत्याही सुधारकाला आपले मत मांडताना हे शद्ब वापरायची गरज कधी वाटली नाही. फुल्यांचे "शेतकर्‍याचा आसूड" तुम्ही वाचलेच असेल, त्याच उच्च वर्गाच्या स्वार्थीपणावर जसे आसूड होते, तसेच शेतकर्‍याच्या आळशीपणावरही टिका होती. पण त्या विश्लेषणात कधी वरचे (किंवा तशा categoary मधले) शब्द मला दिसले नाहीत.

वैयक्तिक संतापातून सर्व समाजाला शिव्या देणे हा कमालीचा आचरटपणा आहे. तुम्ही त्याचे समर्थन करता ह्याचे कारण मला चांगलेच माहिती आहे.

परंतू तुमच्या वागण्याचा कितीही संताप आला तरी तुमच्याबद्दल "तळतळाट" मी कधीही व्यक्त करणार नाही. शिव्या जरूर देईन. :-)




Laalbhai
Tuesday, December 19, 2006 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकी इथेही तुम्ही बामणी वगैरे वाद आणणार असल्यास तुम्हाला उत्तर न देणेच योग्य. पण वेळ होईल तसे लिहा. मीही वेळात वेळ काढूनच लिहितो आहे.

वैयक्तिक अपमानाच्या भावनेतून व्यक्त झालेल्या तळतळाटाला, देशप्रेम वगैरे म्हणू नका हो. तुमच्या "खास" मित्राने केला तरी गुन्हा हा गुन्हाच होतो. :-)

आणि पेशवे यांचा गुन्हा तर फारच मोठा आहे. केवळ मला डिवचण्यासाठी काहीतरी मूर्खासारखे लिहिले आहे. त्यालाही तुम्ही "सुधारकी विश्लेषण" म्हणता, ही कमालच आहे. :-)

NRI असण्याबद्दल मला पूर्वग्रह नाही. मायबोलीवरचे अनेक NRI माझे चांगले मित्र आहेत. जाहीरपणे मी केदार जोशी या अमेरिकास्थित सद्गृहस्थांचेही कौतुक करतोच.


Sheshhnag
Tuesday, December 19, 2006 - 11:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुद्दा बरोबर आहे. भारतीयांच्या `वृत्ती'वर टीका, अगदी जहरी टीका केली तरी ती ग्राह्य आहे, नव्हे ती अपेक्षितच आहे. पण `वृत्ती'वर, सरसकट समाजावर नव्हे. सरसकट समाजावर केली तर अशा टोकाच्या प्रतिक्रिया येतात. लिम्बुटिम्बुनी म्हटल्याप्रमाणे शीर्षकाला धरून चर्चा यापुढे तरी व्हावी, जेणेकरून या मंथनातून काळकूट विषानंतर आता अमृत सिंचन होईल.

Patilchintaman
Tuesday, December 19, 2006 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देशाने स्वार्थ पूर्ण केला नाही म्हणून टिका? नाही तर भारतासारखा देश नाही. काही जन तर म्हणे भावनेवर नाही जगतायेत असे म्हणतात. आम्ही तरी जगतोय बुवा. थोडेथोडके नाही, तब्बल ११० कोटी आहोत. गैसवर तुम्ही जगताय. गैसवरच रहावा.

Kedarjoshi
Tuesday, December 19, 2006 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे फार उशीरा लक्ष गेले ईकडे. हा बी बी परत वाहतोय.

वरिल सर्व वाचुन काढले.

झक्की, लिबुं नी पेशवा कुछ पट्या नही आपका. घाण तर सर्वच देशात असते पण ती घाण आहे म्हणुन मी ईथे राहानार नाही हे म्हणने समजु शकतो पण तुम्हीही घाणीत राहाता म्हणजे तुम्ही मुर्ख हे समजु शकत नाही.

मागे देखील मुडी नी या विषया वर झक्कींना छेडले होते. झक्की हे लिहितात पण ते मुख्यत उपरोधिक असते.

असाच एक दुसरा बी बी पण होता. Be NRI and help India , ईथे पण मी विरोध केला होता.

भारतीय सिस्टीम ला विरोध करणे समजु शकत पण india is doomed वैगरे समजु शकत नाही. माझ्या मते अशा लोकांतच एक प्रकारचा गंड किंवा बोच असते ती अशा प्रकारच्या विधानातुन व्यक्त होते.

या वेळेस जर जास्त होत आहे असे वाटत आहे.

वयक्तीक अनुभवांना समोर ठेवुन देशाला नावे ठेवने हे NRI लोकांचे आद्य कर्तव्य झाले आहे.


Zakki
Tuesday, December 19, 2006 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी जे लिहिले ते मला खरे वाटत असले तरी लिहायला नको होते असे मी कबूल केले आहे. Sometimes perception is believed to be reality. It's good to know what others perceive today's India as. फार तर बोलू नये, पण भारतीयांना (किंवा कुणालाच) दोष देऊ नये.

आणि कुणी मला वैयक्तिक शिव्या दिल्या असतील तरी मला त्याचे काय? वादात असे होणारच. त्यांचे लिहिलेले असेच राहू दिले तरी माझी हरकत नाही. काय आहे, की त्यात देखील विचार करण्यालायक काहीतरी असेल तर ते घ्यावे, बाकी सोडावे.

वर (दुसर्‍या एका BB वर,) माझे लिखाण उडवून टाकावे अशी विनंति करण्यात आली आहे. माझी काही हरकत नाही! ते का उडवले नाही, असेही लिहिले आहे.

कदचित् बर्‍याच लोकांना ती टीका मूर्ख वाटत नसेल. जहाल जरूर आहे. कदाचित् तुम्हाला जसे भारतावर टीका केली की संताप येतो, तसा काही लोकांना इतका थोर भारत, इतके हुषार लोक, इतकी उच्च संस्कृति असूनहि, आज लाचलुचपत, अंधश्रद्धा, हिंसा, अकर्तुत्व, याचा अति जास्त उद्रेक का करतात याचे अतिशय दु:ख होऊन, नि विशेषत: त्याबाबत आपण काऽहीहि करू शकत नाही, यामुळे उद्वेग येऊन, निराश होऊन असे लिहीत असतील! निदान १ टक्का तरी ते लिखाण खरे असेल असे कुणाला तरी वाटत असावे. तेव्हढा एक टक्का जनतेपर्यंत पोचावा, शहाणी जनता बाकीचा फापटपसारा अनुल्लेखाने मारेल असा Admin ना विश्वास असेल!

असो. त्या वाईट गोष्टी इतरत्रहि आहेतच, पण फार कमी प्रमाणात. भारताकडून अपेक्षा जास्त आहे, कारण अजून आशा आहे! अमेरिका काय, त्यांना उच्च संस्कृतीचाच काय, कुठल्याच धड संस्कृतीचा वारसा नाही. पण निदान ते काय करतात त्याला सक्रीय विरोध करण्याची आर्थिक किंवा लष्करी ताकद जगात कुणाकडे नाही. हे त्यांनी स्वकष्टाने कमावले आहे, भारताने तर याहून जास्त यश मिळवायला पाहिजे होते, असे वाटते! कारण ते अमेरिकेपेक्षा जास्त शहाणपणाने वागतील याची खात्री आहे. कारण बर्‍यापैकी बलवान असून, त्यांनी अजून श्रिलंका, नेपळ, पाकीस्तान बांगलादेश नि नवीनच तयार झालेली राष्ट्रे यांच्यावर हल्ला केला नाही!



Vijaykulkarni
Tuesday, December 19, 2006 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी भारतात असताना आमच्या कॉलनीत
दसरा सन्क्रान्ती ला लहान मुले मुली
नवीन कपडे घालून घोळक्याने सर्व घरान्मध्ये तिळ्गुळ
वाटायला निर्धास्तपणे जायची. कोणीही मोठे
माणुस सोबत नसताना.

असे अमेरिकेत शक्य आहे?


Svsameer
Tuesday, December 19, 2006 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय कुलकर्णी
या पोस्ट्चा बाकि चर्चेशी संबंध समजला नाहि. पण तुमच्या प्रश्णाचे उत्तर होय आहे.

अमेरिकेत halloween ला लहान मुले वेगवेगळे costumes घालुन संध्याकाळी अनोळखी माणसांचे (ही) दार वाजवताना पाहिले आहे.


Dinesh77
Tuesday, December 19, 2006 - 8:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकेत काय होईल याचा नेम नाही.
१५ १६ वर्षाची मुले शाळेत
AK-47 घेउन जातात आणि आत्महत्या करतात नाहीतर हत्या करतात. (Springfield County Highschool issue)
भारतात मात्र हे कदापि होणे नाही.
अमेरिकेपेक्षा भारतच चांगला (कसाही असला तरी)


Vijaykulkarni
Tuesday, December 19, 2006 - 9:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ला लहान मुले वेगवेगळे cओस्तुमेस घालुन संध्याकाळी अनोळखी माणसांचे (ही) दार वाजवताना पाहिले आहे.
सोबत कोणीही नसताना?

मला असे म्हणायचे आहे की दोन्ही देशात चान्गल्या आणी वाईट गोश्टी आहेतच.


Maitreyee
Tuesday, December 19, 2006 - 9:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे भारतात कुठल्याच शाळेत कधी काही वाईट घडले नसेल कशावरून? आणि अमेरिकेत प्रत्येक शाळेत मुले AK47 घेऊन येतात हे कशावरून?? दोन्ही गोष्टी टोकाच्याच झाल्या की!!
आणि हो अमेरिकेत पण मुले हॅलोविन ला फ़िरतात की लोकांच्या घरी ट्रीट्स मागत..
आपला देश अमेरिकेपेक्षा आवडतो, बस्स हे पुएर्से आहे..., चुकीची कारणं देऊन पटवण्याची काय गरज
:-)

Dinesh77
Tuesday, December 19, 2006 - 9:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चुकीचे उदाहरण असे नाही.
मला वाटते भारतात असे एकही उदाहरण नाही. (चु.भु.दे.घे.)
अहो भारतात
AK-47 बाळगली की तुरुंगात टाकतात हो :-)

अतिप्रगत समाजाची लक्षणे :-) दुसरे काय!!!!!


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators