|
Rahul16
| |
| Saturday, December 16, 2006 - 3:23 am: |
| 
|
wadachi level khali khali jat aahe...lalbhai aadhi vichar kara aani mag liha.
|
Laalbhai
| |
| Saturday, December 16, 2006 - 7:12 am: |
| 
|
तुमचा भारतातल्या नोकरीचा अर्ज रद्द झाला याबद्दल मला आनंदच वाटतो. आणि ज्यांनी तुम्हाला नाकारले ( rather भारतातून (लाथ घालून) हाकलले!) त्यांच्या बुद्धीमत्तेचा आणि दूरदृष्टीचाही अभिमान वाटतो. असल्या सडक्या मनोवृत्तीच्या लोकांनी स्वतःला अमेरिकनच म्हणवून घ्यावे, हे उत्तम. जास्त शोभते.
|
Laalbhai
| |
| Saturday, December 16, 2006 - 7:28 am: |
| 
|
पण त्यातून एव्हढे सगळे वादळ त्यांनी उठवले! >>> वादळ??? तुम्हाला खरोखरच वयोमानाप्रमाणे बुद्दीभ्रम झाला असावा! तुमचे होतेय काय की उतार वयात तुमच्या मूळांची आठवण येतेय. पण कर्तृत्वाचे चार चांद लावण्याचा नादात तुम्ही मूळेच तोडून टाकलेली आहेत. आता तिकडे रहावत नाही आणि इकडे येववत नाही! (कारण आपले आपल्या स्वभावामुळे स्वागत होईल याची खात्रीच नाही!) त्यामुळे अमेरिका आणि भारत दोन्ही समाजाला वेळोवेळी शिव्या देण्यात तुम्ही धन्यता मानत आहात. हे तुमचे मानसिक वैफल्य असावे. दुसरे असे असावे की तुम्ही मुद्दम कुरापती काढण्यासाठी आणि भांडणे उडवून देण्यासाठी असले काही गचाळ पोस्टिंग हेतुपुरस्सर करत असाल. तसे असेल तर, तुम्ही खरोखरच मूर्ख आहात. आणि केवळ भांडणाची मजा घ्यायची म्हणून काड्या टाकण्याची अमेरिकन वृत्ती तुमच्यात चांगलीच मुरली आहे, असे म्हणावे लागेल. असो. खरे खोटे तुम्हाला माहिती. पण दोन्ही केस मधे तुमच्याबद्दल कोणतीही सहानुभुती वाटत नाही. तुम्ही इथून हाकललेच जाण्याच्या लायकीचे होता / आहात!
|
Ajjuka
| |
| Saturday, December 16, 2006 - 8:27 am: |
| 
|
लालभाई, तुझ्या बर्याचश्या पोस्टस् ना मी विरोध केलाय, करेनही पटल्या नाहीत तर... पण NRI लोकांचे भारताबद्दल बोंब मारत रहाणे, स्वतःला शहाणे समजणे इत्यादी इत्यादी याबाबतीत आपले तुपले जमते. इथे अनेक समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी अनेक लोक कामही करतायत. माझा त्याला किती हातभार लागेल माहित नाही पण काही उपयोग झालाच तर मी स्वतःला भाग्यवान समजेन आणि नाही झाला तर दुर्दैवी पण इथल्या लोकांची लायकी नाही, इथले लोक असलेच असे तद्दन अमेरीकन विचार डोक्यातही येणार नाहीत. मुळात तुम्हाला खरंच परत यायची इच्छा असेल तर तुम्ही याल, रहाल सगळ्या समस्यांसकट. इथल्या समाजाचा एक भाग बनून. केवळ चांगल्याच गोष्टी हव्यात आणि वाईट गोष्टी नकोत असे म्हणून चालणार नाहीच. आणि इथे हे नाही, ते नाही म्हणून मी परदेशात रहातो नाहीतर खरतर मला इथेच रहायचं आहे ह्या म्हणण्याला तितकासा अर्थ नाही. माझे उच्च शिक्षण परदेशात झाले आहे. तिथेच रहावे अशी संधी मिळत असतानाच मी परत येण्याचा निर्णय घेतला कारण इथे परत यायचे आणि इथेच काम करायचे (समाजकार्य नाही माझ्या क्षेत्रात) हे मी प्रथमपासूनच ठरवले होते आणि त्यात ३ वर्षानंतरही बदल झाला नव्हता. माझ्या माझ्या क्षेत्रातले इथे रहाण्यामुळे येऊ शकणारे porblems मला माहित होते आणि त्यावर मात करून इथेच काम करायचे हेच मी ठरवले होते. आज मी जी काय थोडीफार पुढे गेले आहे माझ्या क्षेत्रात ते याच निर्णयामुळे आणि सर्व समस्या स्वीकारून त्या मोडायची, मात करायची तयारी असल्यामुळे. मला जवळून ओळखणार्या इथल्या अनेकांना हे माहित आहे. मी काही फार मोठे केलेय असे माझे म्हणणे नाही. पण समस्या आहेत म्हणून आम्ही येत नाही हे म्हणणे मला crocodile tears पेक्षा वेगळे वाटत नाही. पण ह्या किंवा अनेक कारणांसाठी जे परदेशात स्थायिक झाले आहेत त्यांना सरसकट देशद्रोही किंवा तत्सम विशेषणे लावणे मला जमणार नाही. माझे अनुभव तसे सांगत नाहीत मला. अर्थात माझ्या अनुभवात वरच्या उदाहरणासारखे उंटावरून शेळ्या हाकणारे NRIs ही मी पाह्यले आहेत. भारत हा एक देश असण्याची गरजच काय, europe सारखी अनेक राष्ट्रे होऊ देत. म्हणजे सुधारणा होईल असे म्हणणारे महाभाग आहेत. hollywood चे चित्रपट देशप्रेमी भावनेचे असतात म्हणून ते इतर देशांबद्दल अयोग्य चित्रण करतात, Armagaddon (spelling..??) मधील एक दृष्य आठवा, जिथे भारताअले लोक उघड्या माळावर बसून पृथ्वीला वाचवण्यासाठी फक्त प्रार्थना करतायत. आणि एकटे USA च आहे जिथे काही प्रयत्न चालू आहेत. हे किंवा star wars मधलीही अनेक दृश्ये.. तर असं दुसर्Yआला कमी लेखणं म्हणजे त्यांच्या देशप्रेमी असल्याचा पुरावा आहे अशी महान वाक्ये मीही ऐकली आहेत. आणि त्यांचा मात्र जरूर राग येतो. असो.. विषय फारच भरकतला..
|
Yog
| |
| Saturday, December 16, 2006 - 8:27 am: |
| 
|
Zakki, तुमचा अनुभव दुर्दवी आहेच पण प्रातिनिधीकही आहे. अर्थात त्यावरून सारेच भारतीय आणी एकन्दरीत भारत वाईट होत नाही. पण तुमच्या पोस्ट मधली बोच पूर्णपणे पटते आहे.. असे अनेक अनुभव माझ्याही अनेक मित्र, व इतरान्च्या वाट्याला आले आहेत. adjustment जशी अमेरीकेत करावी लागते काही बाबतीत तशीच देशातही, आणि त्या मन्डळीन्नी ती स्विकारली. पण सर्वानाच जमत असही नाही. यातून प्रत्त्येकाने परिस्थितीनुसारच मार्ग काढायला हवा. issue छोटा आहे का मोठा याला महत्व नाही.
|
>>>>हे तुमचे मानसिक वैफल्य असावे. हे आणिक कुणाला वैफल्या आलेले तुम्हाला कळले? मागल्याच आठवड्यात कुणीतरी माझ फ्रस्ट्रेशन काढल होत! ते आठवल! DDD
|
ओ बाप रे! काय भारताची ईज्जत घेणं चालवलय. अहो झक्की तुम्ही तुमच्या कुवतीमुळे अमेरिकेत गेला असाल. पण आजही भारत गरीशी झगडतोय. विशेष म्हणजे, ती गरीबी, समस्या सरकारनेच सोडावी असे काही लोकांचे म्हणणे नाही. परंतू ज्या परिस्थितून हा देश जगतोय त्याची आधी जाणीव करुन घ्या. अहो अनंत समस्यांशी झगडताहेत हो ईथले लोक आणि झगडत झगडतच हा देश आम्हाला चालवावा लागणार. आणि त्याचा विकास होणार. तुम्हाला वाईट अनुभव आला म्हणू देशाची ईज्जत तर घेऊ नका.
|
मला बोवा झक्कीन्च पटत! कटु असल तरी सत्य हे! 
|
Peshawa
| |
| Saturday, December 16, 2006 - 4:50 pm: |
| 
|
झक्कि तुमचे चुकलेच तुम्हाला भरतीय मनोव्रुत्ति समजलीच नाही नोकरि कसली मागायला गेलात? मागणार्याला भिकारी आणि लुबाडणार्याला श्रेष्ठ समजणारी लोक आहेत तिथे... मागुन देशात काही मिळत नाही उरावर बसले कीच मिळते... लालभाइ काय उगाच आंदोलन संप करत हिंडत असतात? उगाच जाळपोळि दंगे घडतात? जे असल्या रद्दड डोक्यांना समजते ते तुम्हाला समजु नये? हा हंत हंत! न्युनगंडाने पचाडलेले राश्ट्र आहे ते... न्युनगंड आणि दांभिक आत्मविश्वास...
|
Paul
| |
| Sunday, December 17, 2006 - 8:00 am: |
| 
|
एक तद्दन भंपक देश आहे भारत. ती आजच ईसकाळ ला आलेली बातमी नक्की वाचा. ओरीसा मध्ये म्हणे देव बाटला म्हणून मंदिर बंद केले. अणूबॉंम्ब पडला तरी सुद्ढा नाही सुधारणार.
|
Saavat
| |
| Sunday, December 17, 2006 - 9:49 am: |
| 
|
ए paul , तोंड सांभाळून बोल, तुझ्या नावावरूनच तुझी अक्कल कळते. अगोदर स्वत्:च्या बुडाखाली पसरलेला अंधार बघ, मग दुसर्याला दिवे दाखवायचे बघ. उचलली जीभ लावली टाळ्याला. आपली लायकी ओळखून वाग! भंपक काय? अणुबाॅम्ब काय?तुझ्यासारखी माणसे लाभली हेच देशाच दुर्दैव्य! आणि तुझ्यामते तुला कुठला देश आवडतो(?) आणि का, हे जर विचार करायचि लायकी असेल तर आवश्य सांग. असे विचारवंताचे, सुविचार तरि ऐकू देत. अजुन मंदिराच्या-मस्जिदिच्या पुढे विचारच जातच नाही, तिथ येऊन अणुबा ॅम्ब दाखवला की, तारे तोडल्याचा आव आणायचा. तू तरी राहशील काय? चार पैशे खिशात खुळखुळायला लागल्यावर, आईवरच थुंकणाराच्या मतीची कीव वाटते. आणि म्हणे सुधारलेले.
|
सावट योग्य शब्द वापरलेत paul ला. ही गुर्मी पैशांची आहे. तिथे अमेरिकेत राहून हे तारे पेशवा, paul तोडू शकतात. ईथे भारतात ह्यांचे कंबरडेच मोडले असते. अहो हे अमेरीकनांचे पाय चेपण्यातच धन्यता मानणारे. अहो ह्यांच्या XXX वर त्यांनी लाथ हाणली तर हे काय समुद्रात उड्या मारणार? तेव्हा कोणाच्या तोंडाकडे बघणार. तेव्हा झक मारुन भारतातच यावे लागेल. ही गुर्मी बरी नव्हे. फाटका पदर असला तरी तो आपल्याच आईचा आहे. त्या पदरच्या आड आईची ईज्जत असते. तिची लेकरं असूनही तुम्हीच तिची विकायला निघावे? हे बरे नव्हे.
|
पेशवा पौल... ज्या मात्रुभुमी नी तुम्हाला वाढवले आनी तिथे चार पैशे कमवन्या योग्य बनवले.........तीची अशी ढिंड काधायला तुम्हाला काहीच वाटत नाही पैशाचा माज एवधा येतो उद्या तुमच्या.......वर लाथा बसल्यावर कोठे जानार आहात
|
Sheshhnag
| |
| Sunday, December 17, 2006 - 3:24 pm: |
| 
|
सावट, पाटिलराव, निलेश, फ़ार चांगलं लिहिले. पैशापायी एवढा माज येवू शकतो हे अतर्क्य आहे. स्वदेशाला मातृभूमिची संकल्पना देणार्या या देशाची लेकरे इतकी उद्दाम होत असतील असं कधीच वाटलं नव्हतं. यानी परदेशात जाण्याअगोदर आपली जन्माला घातलेली आई आठवून पाहावी. ती नक्कीच त्या देशातल्या आयांसारखी नसणार. मला वाटते, तिथे गेल्यावर या लोकाना आपल्या त्या गरीब आईबापाना आपले म्हणायची लाज वाटली असणार. कदाचित हे लोक आई वडिलांना खांदा द्यायला गेले नसतील किंवा जाणार नाहीत, कारण ते आई वडिल तद्दन भंपक देशातील तद्दन भंपक आई बाप ना! ज्यावेळी यांची मुले यांची गरज संपल्यावर तद्देशीय पद्धतीप्रमाणे यांच्या xxx वर लाथ मारतील ना तेव्हा कळेल. जाऊ दे, इतकं टोकाचे मी आयुष्यात कधीच लिहिले नव्हते. पण आपल्या आईवरच चिखल उडवला जात आहे हे पाहून राहावले नाही. शेवटचे फक्त एवढेच सांगावेसे वाटते की, तुम्ही ज्या व्यासपीठावरून ही चिखलफेक करताहात, तेथील सर्व सभासदाना तुमचे हे उद्गार लागू पडतात. जरा सांभाळून.
|
Zakki
| |
| Monday, December 18, 2006 - 1:13 am: |
| 
|
ईथे भारतात ह्यांचे कंबरडेच मोडले असते. अहो हे अमेरीकनांचे पाय चेपण्यातच धन्यता मानणारे. अहो ह्यांच्या XXX वर त्यांनी लाथ हाणली तर हे काय समुद्रात उड्या मारणार? छे:! खरे म्हणजे असे काही झालेले नाही. आम्हाला इथे कुणि अजून लाथ वगैरे मारलेली नाही. नि पाय चेपणारे बहुधा मसाजिस्ट्स असतील, म्हणून ते पाय चेपतात. आमच्या बर्याच लोकांच्या व्यवसायात कुणाचे काही चेपायची वेळ येत नाही! मुख्य म्हणजे इथले लोक कामापुरते बघतात नि बोलतात, भारतीयांसारखे इतरांचे मनोविष्लेशण करून त्यांच्याबद्दल पूर्वग्रह धरून बसत नाहीत. असो. एकंदरीत मी भारताला बर्याच शिव्या दिल्या. एव्हढ्या द्यायला नको होत्या. म्हणजे 'सत्यं ब्रूयात्, प्रियं ब्रूयात्, न ब्रूयात् सत्यमप्रियं|' हे काही मला आचरणात आणता आले नाही. हा माझा दोष. तेंव्हा आता मी या विषयावर तरी काही लिहिणे बरे नाही! माझा ज्यांना राग आला त्यांची मी माफी मागतो. अनेकदा सांगूनहि माझी शिंगे मोडून वासरात शिरण्याची सवय जात नाही! एकंदरीतच भारताबद्दल काही न बोललेलेच बरे! आता वेळ अशी आली आहे की जगाचे साऽरे बंध तोडून ईशचरणि लागावे! पण ते म्हणण्याइतके सोपे नसते असे कळते आहे. असो. मायबोलीवर येऊन माझ्या मनातली खळखळ ओकून टाकायला तुम्ही मदत केलीत, बरे वाटले. पोट साफ झाल्यावर जसे वाटते तसे वाटले. ओकारी येऊन गेल्यावर तोंड धुवून लवंग खाल्ल्यावर जसे वाटते तसे वाटले. याबद्दल तुमचे आभार! आता अशा साफ नि स्वच्छ मनाने विप्रो नि महिंद्र टेक यांनी मला नुकत्याच पाठ्वलेल्या पत्रांचा विचार करतो! भारतात न जाता इथेच काही त्यांनी दिले तर बरेच. पण नाही दिले, काहीहि वेडेवाकडे बोलले तरी आता शांत मनाने समजून घेईन.

|
कठोर आत्मपरिक्षण, ज्यने त्याने केले तर व्यक्तीबाबत होउ शकते! राष्ट्राबाबत कोण करणार? कोणि केलेच की "गरीब आईची धिण्ड", "फाटक्या पदरा आडची अब्रु" वगैरे शेलकी भावनीक विशेषणे वापरली तरी "आम्हा भारतियान्च्या" मूळ वृत्तीचा प्रश्ण कसा काय सुटणार हे? आज झक्की एन आर आय हेत म्हणुन त्यान्चे बोलणे टाकावु कसे काय ठरते? हेच बोलणे या देशातील असन्ख्य विचारवन्त जेव्हा मान्डतात तेव्हा त्यान्ची मुस्कटदाबी करण्याची निती ज्या देशात राबविली जाते त्या देशाचे भविष्य उज्वल हे असे कसे काय म्हणता येईल? जो कठोर आत्मपरिक्षण करुन वास्तवाचे भावनिक मुल्यमापन न करता बौद्धिक मुल्यमापन करु शकतो तोच निन्दा,टिका इत्यादी सहन करुन त्यातुन चान्गले ते स्विकारतो! भारतिय जनपद भोन्गळ कारभाराने नटलेले आहे हे जो वर मान्य करीत नाही तोवर आम्ही त्यात सुधारणाहि करणार नाहि घरात केर कचरा घाण हे हे मान्यच केले नाही की डोळ्या आड मसणपाड नि मग ते साफ करण्याचीही गरज पडत नाही! एनिवे, तुमच चालुद्या......! मला सध्या तरी वेळ नाही
|
झक्कीचा एक मुद्दा अतिशय पटला. भारतातले नागरिक कधीच सुधारणार नाहीत. अगदी ब्रह्मदेवाला सुद्धा ते शक्य नाही. हा देश केव्हांच सुधारण्याच्या पलीकडे गेलेला आहे. आपण लोक स्वत्:च्या वाईट सवयी न सोडता दुस-यांच्या वाईट गोष्टी उचलण्यात सराईत आहोत.
|
आपल्याच देशावर चाललेलं तुमचं तोंडसुख घेणं सुरु ठेवा. आम्हालाही सवय झालीय 'तिथे अडकलेल्या भारतियांना सोडविण्यासाठी भारतीय नौदलाचे xxx जहाज रवाना झालेत.' लाथ ह्या अर्थाने म्हणायची होती. तुमच्या सारख्यांना मरु देत तिकडे. भारताबद्दलचे तुमचं ओकून झालं. असंच अमेरीकेबद्दल कुठ ओकू नका. परदेशस्थ भारतीयांबद्दल नको ते आम्ही वाचतो नि ऐकतो. अमेरीकेबद्दल तरी निष्ठा टिकवा. आम्हालाही वेळ नाहीच.
|
लिम्ब्या, पहिल्यांदाच छोट पण अतिशय उत्तम पोस्ट केल आहेस यातल पुर्वी काय करत नव्हतास ते तु ओळखशीलच झक्की, किती अमेरिकनांचे पाय चेपलेत आत्तापर्यंत आणि किती वर्षात ते एकदा सांगता का? असच, GK म्हणून हो
|
कसचं कसचं सव्यसाची! अरे वेळच नाहीहे! म्हणुन पोस्ट छोट झाल! त्वरीत अभिप्रायाबद्दल तुला थॅन्क्यू
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|