|
Satishm27
| |
| Sunday, November 12, 2006 - 9:24 am: |
| 
|
Bepositive (?), आपल्या मताशी मी असहमत आहे. मी ह्या BB वरील सर्व पोस्ट काही वाचल्या नाही.
|
Deshi
| |
| Sunday, November 12, 2006 - 6:26 pm: |
| 
|
India is a DEAD country.>>>>>> for guys like you
|
Kashi
| |
| Tuesday, November 14, 2006 - 1:24 am: |
| 
|
bepositive......be positive.. tumch sarkhya virchar karnarayn mule ..bhartachi hi aavastha zali aahe...
|
Maku
| |
| Tuesday, December 12, 2006 - 11:10 am: |
| 
|
tumhi america la jaun tithe lagech india la naaave thevathath aare tithe paise aahe mhannon jaata naa ... india madhe rahun india chi seva kara mala zakki etc saglyanche bilkul pan patale nahiye bolane .... mala india baddal kahi bolalele chalanar nahi i love my des. okk
|
Chyayla
| |
| Tuesday, December 12, 2006 - 4:21 pm: |
| 
|
झक्की मलापण मकु, काशी, देशी यान्चे पटले. पण बी-पोजीटीव एकदम नीगेटीव का बोलत आहे कळेना. बी अरे तुला कोणी तरी नीगेटीव करत आहे झोपलास काय? तुम्हीच म्हणाला की अमेरिकेत पण भ्रष्टाचार, लबाडी, लाचलुचपत आहे, भारतातही आहे पण मोठ्या प्रमाणात, तुम्हाला असे नाही का वाटत की हे लोकसन्ख्येच्या प्रमाणात आहे, भारतातही तुम्हाला चान्गले लोक मिळतील पण विरुद्ध प्रमाणात. माझ अस मत आहे की Indians may be personaly Best but socailly Worst, while Americans and europians may be personaly Worst but socially Best अर्थात तुम्हाला अपवाद दोन्हीकडे मिळतील पण मी एक सामान्य बाब सान्गतोय. त्यान्च्यातला चान्गले गुण खरच घ्यायला पाहिजे "मला विदेशातले काय चान्गले वाटले" ह्या BB वर बरेच काही लिहिले आहे ते जर आपण भारतात उतरवण्याचा प्रयत्न केला तर चान्गले होईल वेळ लागेल निश्चीत पण बीपोजीटीव. तुम्हाला काही सान्गण्याची योग्यता नाही पण अमेरिकन मधे देशाभिमान पण आहे तो जर आपण उचलला तर तुम्ही खरे अमेरीकन व्हाल पण आत्मा मात्र भारतिय राहील जो वैश्विक कुटुम्बाची कास ठेवतो त्यामुळे तुमच्या अमेरीकन व भारतियपणात सन्घर्ष होणार नाही. नाहीतर न घर का ना घाट का अशीच परिस्थिती कायम राहील. द्वेषाने नावे ठेवणे आणी सद हेतुने दोष दाखवणे यात फ़रक आहे, मला वाटत केवळ या मुळेच तुमची मत पटत नसावीत.
|
Zakki
| |
| Wednesday, December 13, 2006 - 2:27 pm: |
| 
|
tithe paise aahe mhannon jaata naa ... india madhe rahun india chi seva kara mala zakki etc saglyanche यावर पूर्वी अनेकदा लिहून झालेले आहे. मी अनेक वर्षांपूर्वी (१९७० मधे) फक्त अमेरिकेत काँप्युटर शिकयला मिळत असे म्हणून आलो. भारतात रहावे असे वाटले म्हणून परत आलो, तर मला अक्षरश: हाकलून देण्यात आले. माझा अनुभव न पहाता, माझ्याशी न बोलताच, भारतीयांनी ठरवले की मी अमेरिकन आहे, मला भारतातले काही कळत नाही, पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत. 'तुम्ही स्वत:ला काय शहाणे समजता काय? तुमच्या बोलण्यालिहिण्यात उद्धटपणा दिसतो' इ. माझे इतरहि अनुभव मी अनेकदा इथे लिहिले आहेत. वाटल्यास मला इ-मेल पाठवून विचारा, मी सर्व अनुभव परत सांगेन, नावासकट! तर आता तुम्ही सर्व विनम्र, हुष्षार, शिकलेले, अमेरिकेनांपेक्षा जास्त सुसंस्कृत आहात ना? मग करा की आपल्या देशाचे भले आपणच!! खरे बोलले की झोंबते म्हणूनच ना पटत नाही? असल्या भारताबद्दल द्वेष नि जेलसी कशाला वाटेल? उलट कीव येते. केवळ आळशीपणे स्वत:ची देवनागरी शिकण्याचे परिश्रम न घेता, फुकट वादावादी करायची! असले स्वाभिमानशून्य, नुसतेच वाचावीर लोक जिथे आहेत तिथे नुसती बोंबाबोंब होईल! तुम्हा बाहेरच्या लोकांचे डोळे उघडतील असे काही तरी करून दाखवू असे नाही. तुम्हीच इथे येऊन आमच्यासाठी काहीतरी करा. भिकारी, निकम्मे लेकाचे! अमेरिकेला काय कुणी कमी नावे ठेवतात का? पण म्हणून ते काय तुमच्यासारखे रडत न बसता स्वत:ला हवे तेच करतात! तुम्हाला वाटत असेल भारतीयांशिवाय आमची काँप्युटर इंडस्ट्री चालणार नाही! अहो, तुम्ही जेमतेम लायकीचे आहात पण तुम्ही कमालीच्या बाहेर स्वस्त आहात म्हणून परवडता! प्रत्येक क्षेत्रात काही कमी लायकी लागणारी कामे असतातच की. तीच फक्त भारतीय करतात, अमेरिकनांनी सांगीतले तशी! तर तुम्ही अमेरिकेतल्या भारतीयांबद्दल बोलूच नका! !
|
Robeenhood
| |
| Wednesday, December 13, 2006 - 2:39 pm: |
| 
|
बोवाजी, तुम्ही दाहक सत्य फारच जळजळीतपणे मांडले आहे याबद्दल खरेच तुमचे कौतुकच केले पाहिजे. अर्थात अनुभवाचे बोल आहेत म्हणा हे. काहीही न करता नुसता उरबडवेपणा करायला काय कुणाच्या तीर्थरूपाचे जाते. चांगलीच धुलाइ केलीत तुम्ही, ब्रेव्हो!!
|
Laalbhai
| |
| Wednesday, December 13, 2006 - 2:58 pm: |
| 
|
राग देवनागरी न शिकण्याचा आहे, तुम्हाला "घालवून दिले" याचा आहे की अजुन कसला? पूर्वीच्या काळापासून लोकं परदेशात जातात शिकतात परत येतात. प्रत्येकाच्या स्वभावानुसार ज्याला त्याला अनुभव येत असावेत. तुलना नाही (म्हणजे शक्यच नाही!) पण गांधी, सावरकर अशी अनेक लोकं परदेशात राहून शिकून परत आली. आणि इथे येऊन इथल्याच लोकात जबरदस्त सामाजिक काम केले. इथल्या लोकांच्या मनावर राज्य केले. अजुनही अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी काही वर्षे अमेरिकेत आणि पाश्चिमात्य देशात काम केले आणि नंतर भारतात येऊन इथल्या समाज जीवनाशी मिसळून गेले आहेत. भारतीयांच्या चूका शोधा, नाही असे नाही, पण जरा स्वतःच्याही शोधल्यात तर फार बरे होईल. उगाच भारतीयांची कीव वगैरे वाटणार नाही!
|
Zakki
| |
| Thursday, December 14, 2006 - 1:18 am: |
| 
|
भारतामधल्या अनेक गोष्टींचा राग आला, नि काही गोष्टी फार छान वाटल्या. ते गांधी सावरकर नि आमच्यासारखे भुक्कड लोक यांची तुलना करू नका. आम्ही आमच्या परीने आलो, नि प्रयत्न केला. भारतीयांना नाही पटले. पण तेंव्हा नि आता सुद्धा भारतीय जर अजून म्हणत असतील की परदेशी भारतीयांनी येऊन भारत सुधारावा, तर त्या मनोवृत्तिची अतिशय चीड येते. अरे चांगले आलो होतो तर अपमान करून घालवलेत. तुम्हाला इथले काही कळत नाही म्हणून सांगता. नि मला पटते की मला काही कळत नाही, नि बाहेरच्यापेक्षा भारतातच बरेच लोक जास्त हुषार आहेत. तर तुमची अशी अपेक्षाच का की बाहेरच्या लोकांनी सगळे अपमान सहन करून परत आपले भारतात यावे! आमची एकच चूक झाली, आम्ही म्हंटले आपले ज्ञान नि अनुभव याचा भारतात काही उपयोग होतो का बघावे. तशी चूक आता करणार नाही. आलो तर फक्त चैन करायला, काम नाही.
|
Maku
| |
| Thursday, December 14, 2006 - 3:48 am: |
| 
|
आरे india आत्त्ता कुथे सुधरत आहे. zakki तुमचे बोलने बिलकुल पन नाही पतले. आरे आपन नाही सुधारवनार तर मग कोन करनार . आत्त्ता लोक सुध्ररत आहे. eduction वधात आहे. i hate usa.. usa मधले लोक जर india ला कहीपन बोलतात. तुम्ही राहु तरी कसे शकता.
|
Chyayla
| |
| Thursday, December 14, 2006 - 4:30 am: |
| 
|
अरे चांगले आलो होतो तर अपमान करून घालवलेत. तुम्हाला इथले काही कळत नाही म्हणून सांगता आपले लोक समजले की सगळा अपमान, दुख पचवुनही प्रेमाखातर माणुस करतो. नवरा-बायको हया BB वर तुम्हीच वेगळ्या सन्दर्भात बोलले होते ना? मग तसेच याही सन्दर्भात लागु होते असे तुम्हाला वाटत नाही का?. आणी मी तर म्हणतो ईथेच तर खरी कसोटी आहे अरे जर सगळे चान्गलेच असते तर तुम्हाला काही करायची गरज किन्वा अपेक्षा नसती. मुलगा कितीही खोडकर असला तरी आई त्याला रागावते, समजावते पण दुर लोटत नाही की घर सोडुन पळत नाही. तुम्हाला नाही यायचे नका येउ तिथेच सुखी रहा पण तुम्ही काही करु शकत नाही तर निदान नावे तरी ठेवु नये ही अपेक्षा.
|
Zakki
| |
| Thursday, December 14, 2006 - 5:30 pm: |
| 
|
माझे म्हणणे एव्हढेच की भारतीयांची अशी अपेक्षाच का की भारताबाहेर गेलेल्या लोकांनी येऊन काही करावे? भारतात आहेत ना अनेक लोक? ते आम्हाला सांगतात 'तुम्हाला भारतातली काही माहिती नाही, ही अमेरिका नव्हे' मग मी ते मान्य करतो. म्हणजे प्रेम आहे, अपमान सहन करीन, पण जर भारतीयांच्या मते आम्हाला भारतातले काही कळतच नाही, तर कशाला पुन: पुन: अपेक्षा करता की प्रेम ठेवा, आमच्यासाठी काही तरी करा. हेच कळत नाहीये. असे म्हणूच नका की परत या नि भारतासाठी काही करा! आलो तर आम्हाला सांगता तुम्हाला काही कळत नाही, मग कशाला म्हणता या म्हणून? करा तुमचे तुम्हीच. एव्हढेच फक्त कळत नाही मला. बाकी भारतीयांची थोरवी, त्यांचे अगाध ज्ञान, त्यांची उच्च संस्कृति, सचोटी, प्रामाणिकपणा, कामसू वृत्ति काही विचारूच नका! कुठलेहि काम कसे फटाफट होते! जगात सर्वश्रेष्ठ! एकदम पहिला नंबर! सत्य, अहिंसा वापरून सोडवलेले प्रश्न, त्याची उदाहरणे दररोज वर्तमानपत्रात वाचत असतो. उदा. अयोध्या मंदिर, गोध्रा येथील प्रकरणे, परवा डेक्कन क्विन ला काय केले ते. secularity , नोकर्या देण्यात किंवा राष्ट्रीय संपत्तिचा उपयोग करण्यात कुणालाही जात धर्म न विचारात घेता, सर्वांना समान संधि,त्वरित न्याय देण्याची त्यांची तडफ पाहून मी कसा मंत्रमुग्ध होतो!
|
कळतात, कळतात बरे हं, तुमची ही घालून पाडून बोलणी बोवाजी!! आयुष्यभर तुम्ही केलेतच काय आहे याशिवाय.., सदा न कदा मेलं नथीतून तीर मारणं... 
|
Sandu
| |
| Thursday, December 14, 2006 - 6:54 pm: |
| 
|
झक्किंचे मला मनोमन पटते. देशाभिमान जरुर असावा पण त्या बरोबर आपल्यात काय कमी आहे हे मान्य करायची अक्कलही हवी. To improve self: accept the faults and respect the finger at u
|
Prasadp77
| |
| Friday, December 15, 2006 - 9:26 am: |
| 
|
In TOTAL agreement with Zakki (with due apology for writing in english)
|
Laalbhai
| |
| Friday, December 15, 2006 - 12:48 pm: |
| 
|
जर भारतीयांच्या मते आम्हाला भारतातले काही कळतच नाही, तर कशाला पुन: पुन: अपेक्षा करता की प्रेम ठेवा, आमच्यासाठी काही तरी करा. >>>> कोण म्हटले तुम्हाला परत बोलावले आहे? कुणाचे कुणावाचून अडत नसते हो! येणारे न बोलता येतात आणि करायचे ते करून जातात. ज्यांना काही करायचेच नसते ते रडत बसतात "आम्हाला यायचे आहे हो, पण भारतात प्रदुषणच फार!!!!" well , भारत आणि भारतीय असे आहेत. सर्वगुणसंपन्न आहेत असे नाही, दोष आहेतच. पण कुणी कुणाला "परत" येण्यासाठी पायघड्या घालत नाहीये. असेही, आपण आयुष्यात काय महान केले / कमावले आहे, की एका संपूर्ण समाजाने आपल्यासाठी पायघड्या घालाव्यात, हे ज्याचे त्याने ठरवावे. उगाच वैयक्तिक अपमान झाले म्हणून एका संपूर्ण समजाला आणि देशाला दोष देत फिरू नका. तुमचा मूर्खपणा सिद्ध होतो आहे. अर्थात, भूंकण्याकडेही कुणी फार काळ लक्ष देत नाही, ह्याचा तुम्हाला विसर पडला असावा. (भारतात गल्लोगल्ली कुत्री भूंकत हिंडत असतात. लोकं त्याकडे दुर्लक्ष करायला शिकली आहे. अमेरिकेत काय होते माहिती नाही. तिकडे रस्त्यावर कुत्री भूंकतात का? की अमेरिकेतली कुत्री फक्त सार्वजनिक व्यासपीठावर भूंकतात?) तर सांगणे असे की आमच्या तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाहीत. तेंव्हा ती चिंता सोडा. हरी हरी करा आणि स्वतःच्या प्रकृतीची काळजी मात्र घ्या. आम्ही आमचा देश आमच्या पद्धतीने सुधरवू. किंवा गाळात घालू. तुम्ही निवांत असा.
|
Laalbhai
| |
| Friday, December 15, 2006 - 12:52 pm: |
| 
|
उदा. अयोध्या मंदिर, गोध्रा येथील प्रकरणे, >> हीच सन्मानयी व्यक्ती संपूर्ण मुसलमान धर्माबद्दल मागे एकदा काय म्हणाली होती, ह्याची आठवण सगळ्यांना असेलच. असो.
|
Sheshhnag
| |
| Friday, December 15, 2006 - 1:35 pm: |
| 
|
वरील पोस्टवरून असे दिसते, की झक्कीना भारतात त्यांच्या आपल्याच माणसांनी जोर का झटका दिला आहे. पण म्हणून अख्खा देश नालायक? झक्कींना जन्म देणारे भारतीयच ना. झक्की, तुमचा अनुभव दुर्दैवी आहे, पण तुमच्या लिखाणावरून असे दिसते कि, ``मी अमेरिकेतून शिकून आलो आहे, मी तुमचे भलं करायला आलो आहे, पाहा मी आता काय करतो ते,'' अशा भावनेने आला होता. आणि अशा भावनेने आलेल्या कोणालाही कोणत्याही देशात असाच असाच अनुभव येतो. `भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, या देशासाठी मी शक्य ते सर्व करीन,' या भावनेने आला असता तर कदाचित तुम्हाला वेगळा अनुभव आला असता, आणि कर्तव्यपूर्तीचेही समाधान मिळाले असते. एवढे उच्चशिक्शित होऊनही असाच तुम्ही विचार करणार तर एखाद्या अशिक्शितात आणि तुमच्यात फ़रक काय राहिला. आता या वयात गतानुभवांकडे जरा वेगळ्या नजरेने पाहायचे असते.
|
Laalbhai
| |
| Friday, December 15, 2006 - 3:01 pm: |
| 
|
मी अमेरिकेतून शिकून आलो आहे, मी तुमचे भलं करायला आलो आहे अशा भावनेने आलेल्या कोणालाही कोणत्याही देशात असाच असाच अनुभव येतो. एवढे उच्चशिक्शित होऊनही असाच तुम्ही विचार करणार तर एखाद्या अशिक्शितात आणि तुमच्यात फ़रक काय राहिला. >>> खरंय तुमचे! आविर्भाव दाखवून भाव खायला जातात त्यांचे पाणी नेहमीच उथळ असते. इतरांना आविर्भाव दाखवायची गरज नसते.
|
Zakki
| |
| Saturday, December 16, 2006 - 1:50 am: |
| 
|
पण कुणी कुणाला "परत" येण्यासाठी पायघड्या घालत नाहीये. असेही, आपण आयुष्यात काय महान केले / कमावले आहे, की एका संपूर्ण समाजाने आपल्यासाठी पायघड्या घालाव्यात, india madhe rahun india chi seva kara ... maku} मी तर बुवा नोकरीसाठी proper channel मधे अर्ज केला होता, सगळ्यांसारखा! पायघड्या काय घालणार तुम्ही? तुम्हाला साधे खड्डे बुजवता येत नाहीत. मला मुळीच अपेक्षा नव्हती तशी, तसे मी म्हंटले पण नाही! भारताचे भले म्या पामर काय करणार? ते तर परमेश्वरालाहि अशक्य आहे! भारतीय समाज सुधारणे असले हुउच्च विचार माझ्या मनाला कदापिहि स्पर्श करत नाहीत. तेव्हढा थोर माणूस मी नाहीच. त्यांनी नुसते पाहिले असते की आपली गरज काय नि त्यासाठी या माणसाचा उपयोग होतो की नाही एव्हढाच विचार केला असता नि मग ठरवले असते की नको हा माणूस, तर मला काही वाईट वाटले नसते. पण त्यांनी (बर्याच कंपन्यांनी) आधीच ठरवले नि मला सांगीतले की ``मी अमेरिकेतून शिकून आलो आहे, मी तुमचे भलं करायला आलो आहे, पाहा मी आता काय करतो ते,'' अशा भावनेने आला होता. 'तुम्हाला काय वाटते, अमेरिकेतून आला म्हणजे जास्त शहाणे झालात का? ' इ. इ. आता मला त्या सगळ्याची गंमतच वाटते! माझ्याशी एक चकार शब्द न बोलता त्यांनी माझ्या भावना 'ओळखल्या'? मला काय 'वाटते' ते त्यांना समजले? त्याला मी काय करणार? कुठे भारताचे भले करतोय् माझ्यासारखा एकटा माणूस? या 'देशासाठी' काय माझा उपयोग होईल कुणास ठऊक? मी साधी नोकरी मागायला आलो होतो! पण त्यातून एव्हढे सगळे वादळ त्यांनी उठवले! नि तुम्ही पण! अहो भारताला, संपूर्ण समाजाला, देशाला दोष देण्यात सुद्धा माझे contribution फारच कमी पडेल. अगदी भारतातले नि जगातले गल्लोगल्ली उकीरड्यावर भटकणारे कुत्रे सुद्धा एका संपूर्ण समजाला आणि देशाला दोष देत हिंडत असतात! नि भारत त्याबद्दल काऽही करू शकत नाही! करणारहि नाहीत. काय बोलले यापेक्षा कोण बोलले यालाच महत्व देणारे लोक असतात! त्यांना जाम dignity असते! पुण्यातल्या लोकांनीच सांगीतले! काम झाले नाही तरी चालेल, पण आम्ही आमची dignity सोडणार नाही! धन्य धन्य! तुम्ही कितीहि काऽहीहि बोंब मारा! भारतात शिस्त येणार नाही, लाचलुचपत थांबणार नाही, पैशासाठी देव देश नि धर्म विकणे थांबणार नाही. दंगे, संप, जाळपोळ थांबणार नाही, निदान येत्या पन्नास वर्षात तरी. कुणिही काऽहीहि म्हंटले, केले तरी!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|