Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 11, 2006

Hitguj » Views and Comments » Relationships » नवरा, बायको, संसार, तडजोड इ. » नवरा-बायको » Archive through December 11, 2006 « Previous Next »

Sunidhee
Thursday, December 07, 2006 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परी, स्वानुभवावरुन मला असे कळले आहे कि, आपल्या वयाबरोबर आपल्या अपेक्षा बदलतात आणि आपल्या संसाराच्या वयाबरोबर पण बदलतात. अपेक्षा असणं चूक नाही आणि ती पुरी झाली नाहीतर थोडेफ़ार वाईट वाटणे पण चूक नाही, मी तर म्हणते मग त्यासाठी थोडे भांडण होणे पण चूक नाही. फक्त नात्यामधे अंतर येऊ देउ नये. बेधडक सांगावे आपली काय इछ्छा-अपेक्षा आहे ते आपल्या जोडिदाराला. फ़ार तर तो-ती 'नाही' म्हणेल, मग समजुन घ्या की का नाही म्हणतो, आणि समजावुन देण्याचा प्रयत्त्न करा कि 'हो' म्हट्ल्यावर काय फ़ायदा होइल ते.. इथवर तरी प्रयत्त्न करायला काहीच हरकत नाही. मुळात माणुस चांगल असलं आणि जोडिदाराला साथ देणारं असलं की झालं नाहीतर काहीच उपयोग नाही.

म्हणुनच दोघांमधे सर्वात आधी open communication असणे फ़ार जरूरी आहे. बाकी १-२ गोष्टी कमी असल्या तरी चालतात मग. नाहीतर आपण मनात कुढत रहातो आणि मग बाकीच्या चांगल्या गोष्टीत पण रमु शकत नाही.
आणि ते रागावल्यावर समजुत काढणं वगैरे.. नसते एकेकाची सवय. एक उदाहरण म्हणुन लिहिले. फ़ार तर तो म्हणेल ' नाही गं मला जमत'.
तुझ्या लग्नाला फ़ार दिवस झाले नाहियेत. अजुन तुमची एकमेकांशी ओळख होण्याचेच दिवस आहेत. १-२ वर्ष तरी जातात ह्यात. पण मला तरी open communication चे महत्त्व पटले आहे.





Chyayla
Friday, December 08, 2006 - 10:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथे सगळे नवरेपणावर उपाय शोधत आहेत पण कुणी नवरे मन्डळी बायकोवर काय उपाय करता येईल या भानगडीत पडताना दिसत नाही... असो असे म्हणतात की पुरुषाच्या यशामागे अपयशामागे एका स्त्रिचा हात असतो. स्त्रि च्या महानतेबद्दल मला पुर्ण आदर आहे ईथे फ़क्त काही बाबी ज्या मला सान्गावाश्या वाटल्या त्या सान्गत आहे. मागे जशी माझी चुक तुम्ही लक्षात आणुन दिली त्याचप्रमाणे काही चुक सान्गत असेल तर मी ती पण स्विकारायला मोकळ्या मनानी तयार आहे.

हे पण विशयाला धरुनच व एका वेगळ्या द्रुष्टीनी लिहीत आहे,जरी हे तुमच्यासारख मी रोजच्या सन्सारातल लिहु शकत नाही तरी.

महान चिनी तत्ववेत्ता कन्फ़्युशियसला एकदा त्याच्या शिष्यानी प्रश्न केला की त्यानी लग्न करावे का? कन्फ़्युशियसने त्याला उत्तर दिले. बघ लग्न केले तर दोन गोष्टीन्ची शक्यता आहे. एकतर तुझी बायको चान्गली निघाली तर तुझे सान्सारिक जीवन सुखी होईल, जर कधी बायको चान्गली नाही निघाली तर माझ्या सारखा प्रसिद्ध होशील. त्यामुळे दोन्हीकडुन फ़ायदा होईल म्हणुन तु लग्न करच.

जर कधी आपण या विशयाकडे पाहिले तर कित्येक महान लोकान्च्या बायका ह्या फ़ार कजाग होत्या, सन्त तुकारामान्च एक उदाहरण देता येईल. पण दुसरी बाजु अशी की सन्सारात अश्या माणसासोबत राहाणे ही फ़ारच मोठी शिक्षा असते बायको साठी, कारण ते आपल्या विट्ठल भक्तित तल्लीन होते मग कसचे बायकोकडे लक्ष आणी हौस मजा. पण यासाठी तीचही योगदान कमी नाही ती चिडायची अद्वा तद्वा बोलायची पण करायची मात्र सगळ, दुपारी रोज स्वयम्पाक बनवुन भाकरी शिवारात घेउन यायची तसेच घरचे सन्साराचे काम सगळे व्यवस्थित करायची.
शेवटी सन्त तुकारामाना वैकुन्ठाला नेण्यासाठी विमान आले त्यानी बायकोला विचारले तु माझासोबत खुप भोगलस तु पण चल, तर तीनी उत्तर दिले नाही माझी म्हस व्यायची आहे. तीला सन्सारातच अजुनही गोडी प्रत्यक्ष परमेश्वर जरी भेटला तरी तीला नकोय.

एक प्रकरण सन्त तुलसीदासान्चे यान्च अगदी उलट होत बायकोवर कमालीची कामवासना की तीला पण गुदमरायला होत, कधी सोडायचाच नाही, एक दिवस बाहेर गावावरुन घरी आला व पाहिले की बायको माहेरी नीघुन गेली तर कशाची भ्रान्त न ठेवता तो तसाच तीच्याकडे नीघाला रस्त्यात घुप्प काळोख, जन्गल व हिस्त्र श्वापद, नदीला पुर आलेला एवढच काय दोरी समजुन लटकणार्या सापाला पकडुन तो वरच्या माळावर चढला. आणी बायकोला भेटला ते सगळ पाहुन त्याच्या बायकोने एवढेच म्हटले की "जर अशीच भक्ती अशीच तळमळ या नश्वर देहावर करण्यापेक्षा जर ईश्वरावर केली असती तर"
आणी त्या क्षणापासुन त्यान्चे जीवन बदलले व वैराग्य येवुन सन्त झाले तुलसीदास झाले आणी कायमचे ईश्वराच्या प्रेमात पडले.

अशी नवरा बाय्कोन्ची खुप चान्गली उदाहरणे आहेत.


Nandini2911
Friday, December 08, 2006 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटी मोठी मंडळी म्हणतात तेच खरं, नवरा बायको ही एका रथाची दोन टोके. दोन्ही ठीक चालली तरच रथ चालायचा. नाही तर गडगडायचा..
माझं लग्न न करण्याचं तत्वज्ञान घरात सर्वाना ठाऊक आहे, म्हणून सन्धी साधून मला लग्न करण्याचे फ़ायदे ऐकवले जातात. आयता हमाल ड्रायव्हर आचारी पासून मुलाना सांभाळायसाठी अशे नवर्याचे उपयोग सांगितले जातात. (आता बिनलग्नाची मुलं सांभाळायला नवरा? असा logical प्रश्न माडू नका.)
पण मला आवडलेलं सगळ्यात सुन्दर उदाहरण सांगते. कर्नाटकात बदामी म्हणून एक नितान्तसुन्दर स्थळ आहे, तिथे बरीचशी लेणी आहेत. बौध्द धर्माच्या उन्नतीच्या काळात सन्न्यास घेणं ही common गोष्ट झाली होती. जर सगळेच सन्सार सोडायला लागले तर कसं व्हायची याची काळजी समाजधुरीणाना लागली. म्हणून या बौद्ध लेण्यामधे entrance ला खाम्बावरती एक शिल्पक्रुती आहे. एका माणसाने या खाम्बाचा भार उचललाय त्याचा चेहरा दु:खी आहे तो रडायच्या बेतात आहे.
बाजूच्याच खाम्बाचा भार एक स्त्री आणि पुरुषाने उचललाय. आणि ते दोघं एकमेकाकडे प्रेमाने बघत आहेत आणि स्मित करत आहेत.



Shravanip
Friday, December 08, 2006 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ना अज्जुका अगदी खरं म्हणालिस आणि तेच शस्र वापरता येत नाही अमेरिकेत राहुन इथुनच तर मुळ मुद्दा सुरु झाला ना. तसं करता येतं तेव्हा नवरा जरा विचार करतो चिडचिड करण्याआधी पण इथे तेच तर नाही ना होत त्याला कशाची भिती म्हणून रहात नाही..काय करेल बायको करुन करुन रडेल, चिडेल, भांडेल...पण बाकि काहिच नाही करु शकत असं माझा नवरा नेहेमी म्हणतो आणि मग अमेरीकेत सगळ्यात जास्तं काही miss करत असु तर ते म्हणजे माहेरी जाण्याची धमकी न देता येणं याचं खूप वाईट वाट्टं.

Lalu
Friday, December 08, 2006 - 3:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>काय करेल बायको करुन करुन रडेल, चिडेल, भांडेल...पण बाकि काहिच नाही करु शकत असं माझा नवरा नेहेमी म्हणतो

साधा एक फोन करता येतो.. 911 ला. चिडून, रडून(खोटं पण चालेल), भांडून मग फोन करते म्हणून बघा! प्रत्यक्ष फोन करायची वेळच येणार नाही.
अमेरिकेत शस्त्रांना कमी नाही... ~D
बीबीचा विषय फार गहन आहे....


Anamikaa
Friday, December 08, 2006 - 8:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा!
अग ग्रेट काहि नाहि ग त्यात. आमच्या "ह्यांचा "प्रामाणिकपणा मला खुप भावला होता ग आणि त्यांच निर्व्याज आणि निर्मळ मला शक्ति देउन गेल बाकि काहि नाहि. तु एक विचार कर मी तर बाहेरची होते पण "त्यांच्या" मनाला किति यातना झाल्या असतिल.शेवटि पुरुष असो अथवा स्त्रि प्रत्येकाची स्वतःच्या लग्नाबद्दल काहि स्वप्ने काहि कल्पना असतात. पण जेंव्हा आपलीच रक्तानात्याची माणसे आपल्या स्वप्नाना चुड लावतात तेंव्हा ते सहन करणे किति वेदना देणारे असते याचि कल्पना करु शकतो.
आणि मुख्य म्हणजे अशा वागण्याला काहि कारण तर असायला हवे कि नाहि?
तुच सांग मला!
समज उद्या तु किंवा आणि कुणी आपल्या घरातल्यांची सगळी जबाबदारी अगदि प्रामाणिकपणे पार पाडत असेल. आणि तु एखादा सल्ला देउ ईच्छित असशिल आणि समज भरल्या ताटावर तुला तुझी आई म्हणाली कि तु आम्हाला काहि सांगण्याची गरज नाहि आमचे आम्हि बघुन घेउ आणि हे सगळ आलेल्या पाहुण्यां देखत तर तुला काय वाटेल.? ...................................
वडिलांच्या पश्चात कर्ता पुरुष म्हणुन आज सगळि जबाबदारि माझे "हे" अगदि समर्थ पणे पेलतायत. आज इतक्या वर्षात मी यांना स्वतःच्या आईला दुरुत्तर करताना ऐकले किंवा बघितले नाहि. आणि मी कितिहि चिडले तरि मला अजिबात बोलु देत नाहित.

आज माझ्या ३ मुलांनाचि कुणी साधि विचारपुस देखिल करत नाहि. धाकटा भाऊ ३० वर्षाचा आहे लग्न करुन मोकळा झालाय पण नोकरि करत नाहि.फ़क्त भावाच्या पैशावर मज्जा मारायची. त्या पैशाचा हिशोब देखिल आम्हि मागायचा नाहि.
६ वर्षापुर्वि माझ्या एका मैत्रिणिवरुन आमच्यात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न देखिल करुन झाला का तर? जेणे करुन मी यांच्या आयुष्यातुन निघुन जावे.माणुस इतक्या हीन पाताळीवर उतरु शकतो याचि मी तरि कल्पना करु शकत नव्हते पण स्वतःच अनुभवल्यावर विश्वास ठेवणे भाग आहे.
माझ्या मैत्रिणि मला मस्करित नेहमी म्हणतात कि तू लिहित का नाहिस तुझे अनुभव?, या वर सीरियल काढलि तर खुप चालेल आणि टी आर पि पण वाढेल चॅनेलचा.

परि मला विचारशिल तर मी तुला एकच सल्ला देईन एकदा पुढे टाकलेले पाउल मागे घेण्यात काहि अर्थ नाहि त्यापेक्षा तु तुझ्या नवर्‍याची मैत्रिण आणि प्रेयसी व्हायचा प्रयत्न कर आज तु अमेरिकेत आहेस तेंव्हा मागचे सगळे विसरुन जा आणि स्वतःचा संसार सुखाचा कर.ईतर कुणाचा विचार देखिल करु नकोस! आणि स्वतःचि तुलना इतर कुणाशि करु नकोस. शेवटि नशिबात जे असेल तेच होते.पण नशिब आपल्याला बदलता आले नाहि तरी घडवता नक्किच येते नाहि का?
अनामिका


Megha16
Friday, December 08, 2006 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनामिका,
मी तुला ग्रेट यासाठी म्हटले होते की, तु इतक्या कठीण प्रसंगी तुझ्या नवरयाला साथ दिली. कारण अशा वेळी तुझ्या शिवाय त्यांना कुणाचा आधार नव्हता. तुम्ही एकमेकांना साथ दिली, समजुन घेतल. म्हणुन तुमच नात टिकुन राहील, आणी प्रेम वाढत गेल.



Crp
Saturday, December 09, 2006 - 1:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या बीबी वरची सर्व पोस्टस वाचली, आणि वाचुन खुप फयदा पण झाला, खुप शिकले आणि पुन्हा एकदा ह्या गोश्टिचा प्रत्यय आला की सन्सारा मधे चुका फक्त एकाकडुनच होत नाहित तर प्रत्येकाने हे भान ठेवायला हवे कि दोघहि जण एकमेकान्चे गुण आणि गुणान्बरोबरच दोशही स्विकारुन प्रेम करत अस्तात आणि मला वाटते त्या मधेच खर चालेन्ज आहे. अनामिका तुम्हाला मी खुपच मानते. तुम्हि सन्साररुपी चालेन्ज नुस्त स्विकारल नाही तर ते यशस्वि पणे निभावुन दाखवलत. अर्थात तुमच्या नवर्याचीही खुप छान साथ तुम्हाला मिलालि!

Crp
Saturday, December 09, 2006 - 3:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी थोडीशि ओळख करुन द्यायचिच राहिली. माझ्या लग्नाला अडीच वर्श झाली. आणि सध्या अमेरिके ला असते. आणि ह्या बीबी वर्चे पोस्ट्स वाचुन चार समजुतीच्या गोश्टी शिकण्याचा प्रयत्न करते आहे. :-)

jokes apart, mala kharach kahi mahatwachya goshti samajlya, or rather lakshat aalya, jyancha mi majhya sansarat nakki upayog karu shaken

Manyah
Saturday, December 09, 2006 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मागे लिहिल्या प्रमाने माझे आताच लग्न टरले आहे...
तुम्हि सर्वानि मान्डलेले विचार वाचुन मला बराच उपयोग होइल.....विशेषतह भगिनि वर्गानि मान्डलेले.....


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators