|
Manuswini
| |
| Wednesday, December 06, 2006 - 8:38 pm: |
| 
|
च्यायला मी ह्या म्हणण्याला दुजोरा देवु शकत नाही. कारण मी कीतीतरी मुली, मुले भाऊ, बहिण असुन सुद्धा ह्या 'वरील' बाबतीत निर्बुद्ध असतात. त्यांना अक्कलच नसते. किंवा कसे treat करावे, वागावे ह्याचा गंध नसतो. basically, "it all how have been raised and where you have been raised." thats it. thats how make your personality. people are over sensitive, over cautious , these characters build your persona while growing and where you growing up. to some extent biological differences of woman and men way of thinking makes a difference. but above parameter (where and how you grow up)is the largest way of your personality.
|
Chyayla
| |
| Wednesday, December 06, 2006 - 8:46 pm: |
| 
|
मनुस्विनी, माझा मुद्दा म्हनजे एकदम पुर्णपणे लागु होतो असा नाही, पण थोडा फ़रक निश्चित पडतो असे माझे म्हणणे आहे, याशिवाय पण ईतर अनेक बाबी असु शकतात जसे तुम्ही म्हणालात की ( where and how you grow up ) ही पण एक बाब असु शकते मला मान्य आहे.
|
परी, exactly हेच मला वाटले होते कि either तुझे मनाविरुद्ध लग्न झालेय किंवा मग इथे us ला आल्यावर तुला एकटे वाटतेय. माझ्या लग्नाला ९-१० वर्षे झाली आहेत अन त्या आधी आम्ही ३-४ वर्षे एकमेकांना ओळ्खत होतो तरीही सुरवातीला आमची भांडणे झालीच अन आता मागे वळुन पहातांना ती कितितरी क्षुल्लक कारणांवरुन झाली असे वाटते. मुळात लग्न म्हणजे एक प्रकारची adjustment च असते ग! दोन व्यक्ती २४ तास एकत्र रहाणार (एकत्र कुटुम्बात स्वतंत्र) म्हणजे थोडी वादावादी होणारच अन काहीही वावगे नाही त्यात फ़क्त कशाला किती महत्व द्यायचे,आपली priority काय हे ठरवायचे. तो नाही बदलणार असेच धरुन चाल, अन तु स्वत्:ला बदल. तुला नेमके काय हवे आहे त्याच्याकडुन हे त्याला एकदा छान समजावुन सांग(त्याचा mood छान असेल किंवा एखाद्या romantic dinner नंतर वगैरे..) मुख्य म्हणजे त्याच्याही काही अपेक्षा असणार हे नक्की त्याही जाणुन घे. मग बघ कशी जादुची कांडी फ़िरेल ती. आणि आज स्वानुभवाने सांगते आज १४-१५ वर्षानी तर एकमेकांच्या मनातले म्हण अथवा एखाद्या बाबींवर त्याचे काय मत असेल किंवा त्याच्या मनात काय चालले आहे हे नुसते बघुनच कळते .(पण तरीही भांडणे ही होतातच. ) शेवटी काय भांडणाने प्रेम वाढते संसाराची गोडी वाढते हेच खरे,फ़क्त ती भांडणे जास्त ताणायची नाही
|
Shravanip
| |
| Wednesday, December 06, 2006 - 8:58 pm: |
| 
|
परीणिता मीही तुझ्यासारखी गेल्याच वर्षी लग्न झालेली. असंच ८ दिवसात लग्न ठरलं. नंतर ६ महीने तो इथे अमेरीकेत आणि मी तिथे. chatting ह्या प्रकारात काही अर्थ नसतो. एकत्र आल्यावर कळंलं की खूप गोष्टी वेगळ्या आहेत.त्याला देव आणि स्वामी समर्थ आणि अनिरुद्ध बापू यांची आवड आणि मला खूप तिडिक. त्याच्या घरात सारखं देव देव. त्याची आई रोज सांगते अजूनही माळ कर हो जपाची आणि माझा अजुनही रोज संताप होतो. पण शेवटी एक दिवस दोघाना सांगितलं मला हे सांगु नका तुम्हाला जे करायचंय तुम्ही करा मला जे आवडेल ते मी करीन. थोडे दिवस नवरा चिडला पण मग झाला शांत. अगं खरंच आपल्याला त्या घरात जाऊन बदलावच लागतं नशीब की इथे यायला मिळालंय मी नवयाच्या पण सवयी हळुहळु कमी करतेय. नेमकं त्याला पूजा करायची असेल तेव्हा खूप महत्वाचं काम आठवून द्यायचं. आता १५ दिवस झाले मस्त विसरलाय तो आणि मग म्हणाला स्वत:च की तुझ्यामुळे माझी सगळि कामं नीट होतात अजुन काय हवं? तुला सांगू का कधी कधीइ भावनांच्या पुढे जाऊन tactfully वागायचं. आपणही खूष आणी तोही.पण तू ज्या अपेक्षा म्हणतेस ना त्यात आमंच अगदी उलट आहे. मी चिडले ना की तो लगेच जवळ घेतो पण तो चिडला की असं करावं हे मला सुचतच नाही..मग एकदा वैतागुन त्याने मला सांगितलं की मी चिडलो तर सोडुन काय देतेस. थोडं प्रेमानं बोललीस तर राग कमी नाही का होणार मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला. त्यामुळे तु अपेक्षा बोलुन दाखव नक्की खूप फायदा होईल बघ
|
Anamikaa
| |
| Wednesday, December 06, 2006 - 10:05 pm: |
| 
|
च्या तुझे म्हणणे मला तरि पटले नाहि का ते सांगते. हा माझा स्वतःहाचा अनुभव आहे................................. मी आईवडीलांची एकुलतीएक कन्या.भावंड नसल्यामुळे येणारे एकटे पण मी कायम अनुभवले. त्यामुळे वयात आल्यावर माझ्या संसाराच्या काहि कल्पना होत्या. मला नेहमी एकत्र कुटुंबाचे आकर्षण वाटायचे ते या एकटेपणाच्या अनुभवामुळेच असेल कदाचित! माझ्या नशिबाने मला माझ्या आयुष्याचा जोडीदार मिळाला ज्याला मी लहानपणा पासुन ओळखत होते आणि त्याच्या कुटुंबियाना देखिल. खरे सांगायचे तर माझ्या नणंदानीच मला त्यांच्या भावाला होकार देण्यासाठी राजी केले होते. मी सुद्धा अतिशय हरखुन गेले होते. आईबाबा पण आनंदात होते कि आपलि लेक परिचयातल्या घरातच सुन म्हणुन जाणार पण आमचा भ्रमनिरस फ़ार लवकरच झाला माझ्या लग्नाआधि १ वर्ष माझे सासरे अचानक गेले. त्यांचे असे जाणे माझ्या नवर्यावर आघात करुन गेले............................................... घरी २ बहिणी,आणि १ भाऊ जो तेंव्हा दहावित होता. वडिल गेले या धक्यातुन सावरतोय नाहि तर त्यांच्या मोठ्या बहिणीने २० दिवसातच घरातुन पळुन जाऊन एका ख्रिस्ति मुलाशी लग्न केले. नंतर समजले कि हेच समजल्या मुळे सासरे आजारि पडले आणि असे अचानक गेले. त्यानंतर वर्ष होते नाहि तोच दुसर्या बहिणीने देखिल मोठीचा कित्ता गिरवत पळुन जाऊन लग्न केले भाऊ ज्याला १०विला ८५% होते त्याला १२ विला ४२% मिळाले. शेवटि "यांनी" मुंबईतिल नोकरी सोडुन गावी परत जायचे ठरवले. नशिबाने तिकडे नवी नोकरी लगेच मिळाली. आणि शिवाय सासर्यांचा बिझनेस होताच तो हि यांनाच सांभाळावा लागणार होता. नोकरी आणि बिझनेस सांभाळणे यांना फ़ार कठिण ज़ात होते पण पर्याय नव्हता. या काळात नातेवाईकांनीखुप त्रास दिला. हि तारेवरची कसरत चालु असतानाच आमच्या लग्नाचि बोलणी चालु झाली होती आणि याला कारण माझ्या सासुबाई.त्या दरम्यान माझे शिक्षण चालु होते त्यामुळे माझी लग्न लवकर करायचि ईच्छा नव्हती. त्यामुळे सासुबाईनी लेकावर दबाव आणायला सुरुवात केली आता लग्न लवकर करण्याचि कारणे इति माझ्या सासरचि मंडळी.: १)माझे(सासुबाई) आता वय झाले माझ्याच्याने काम होत नाहि. २) मोठ्या नणंदेनी मला सांगितले कि तिच्या लहान मुलाला सांभाळायला तिला कुणितरि मुलगि ठेवायचि आहे असे कोणी तरि ठेवण्यापेक्षा तुच त्याला सांभाळ.त्या मुलिला जे पैसे द्यायचे ते तुला देऊ.(हे बोलणे मी मस्करीत घ्यावे हि अपेक्षा) ३)दिर लहान आहे त्याचे करायला कुणी नाही. शेवटी आईबाबा तयार झाले कारण आमचा साखरपुडा आधिच झाला होता. नातेवाईकांना उत्तर द्यावि लागत होती. शेवटी आईबाबांचा आणि आमच्या यांचा विचार करुन मी लग्नाला तयार झाले. लग्नाचि तयारि करायला कुणीहि पुढे आले नाहि. तसेच लग्नाची पुर्ण खरेदि मी आईबाबा व यांनी मिळुन केली. आधि सासुबाईनी दागिने मी करीन असे लेकाला सांगितले होते आणि जेंव्हा वेळ आली तेंव्हा माझ्याकडे काहि नाही तुझ्या लग्नाचि तयारि तुच कर असे लेकाला सांगितले.या सगळ्यामुळे यांनी कर्ज काढायचे ठरवले.मला हे समजल्यावर मी विरोध केला आणि मग सगळा खर्च आईबाबानि करायाचा आणि नंतर त्यातील अर्धा खर्चाचि रक्कम जमेल त्याप्रमाणे यांनी परत करायची. माझे लग्न फ़क्त एका मंगळसुत्रावर लागले पण मला त्याचे अजिबात दुखः नाहि. लग्नात माझ्या आईबाबांचा पाणऊतारा जाणिव पुर्वक केला गेला लग्नाच्या पहिल्याचदिवशि गृहप्रवेश झाल्यावर मला जेवणानंतरचे खरकटे काढायला लावले. त्याच दिवशि काहि कारण नसताना माझ्या आईचा अपमान केला. अश्या बर्याच गोष्टि आहेत त्यामुळे माझि स्थिति ओळखिचा चोर जिवानिशि मारी अशी होती. माझी एकत्र कुटुंबाचि हौस फ़िटली. ९७ साली या सगळ्याला कंटाळून यांनी गल्फ़ मधे नोकरी स्विकारली. आणि तेंव्हा पासुन आमचा वनवास संपला. आज लग्नाला १४ वर्षे झाली मी स्वतःला खुप भाग्यवान समजते कारण ईतक्या प्रतिकुल परिस्थितित राहिले पण आज मी ईश्वरकृपेने खुप सुखि आहे. अतिशय सुस्वभावि मनमिळाऊ प्रेमळ,प्रामाणिक, अतिशय मेहनति जोडिदार मला लाभलाय. आणि आज आम्हि दोनाचे पाच झालोय. अतिशय गोंडस अश्या ३ मुलांचि मी आई आहे. आज या क्षणि माझे मन एक गाणे गुणगुणतय. जे होते हवे ते मिळाले स्वप्न सत्यात साकार झाले........................... माझ्या अनुभवातुन मी घेतलेला बोध असा की माणुस फ़क्त शिक्षणाने प्रगल्भ होतोच असे नाहि. त्याचा स्वभाव व समाजातिल त्याचि वागणुक हि बहुतांशी त्याच्या संस्कार आणि मानसिक जडणघडणीवर अवलंबुन असते. आणि शेवटी हाताची पाची बोटे सारखी नसतात. एकाच आईच्या उदरातुन जन्माला येउन देखिल भावंडाचे स्वभाव भिन्न असतात. (माझा नवरा त्याला कळायला लागल्यापासुन पुण्यात त्याच्या आत्याकडे राहिला आणि वाढला आज तो जो काहि आहे त्याचे श्रेय मी नेहमी त्याच्या आत्यालाच देते.प्रत्येक कुटुंबाला एकत्र ठेवण्याची जबाबदारी हि त्या घरातिल ज्येष्ठ स्त्रिवर पर्यायाने आईवरच असते. ज्या घरात हि जबाबदारि निट पार पाडली जात नाही तिथे कधिहि एकोपा आणि सुख नांदत नाहि) विषयांतर केल्याबद्दल क्षमा असावी.
|
Chyayla
| |
| Wednesday, December 06, 2006 - 10:21 pm: |
| 
|
अनामिका तुझे अनुभव खरच भयन्कर आहेत, तु आणी मनस्वीनी तुम्ही छान समजावुन सान्गितले त्याबद्दल मनापासुन धन्यवाद. अशी काही चर्चा केली ना तर स्वता:चे पण गैरसमज दुर होतात, बाकी चालु द्या. खरे आहे घर हे घरातल्या ज्येष्ठ स्त्रि वरच अवल्म्बुन असते म्हटले तर विषम परिस्थितीतुन तीच घराला उभे करु शकते व म्हटले तर होत्याच नव्हते करु शकते, तुझ्या या अनुभवात तर तुझ्या सासुचे अपयश दिसुन येतय धड मुलीन कडे पण लक्ष देउ शकली नाही व एकन्दरीत घराला पण साम्भाळु शकली नाही, जो पर्यन्त सासरे होते ईतर गोष्टी पुढे आल्या नाहीत. पण स्त्रिच शेवटी स्त्रिची शत्रु होते हे पाहुन खरच वाईट वाटत.
|
Asmaani
| |
| Wednesday, December 06, 2006 - 11:09 pm: |
| 
|
अनामिका, आज तू सुखी आहेस ह्याचे कारण ईश्वरकृपा आणि तुझ्या मिस्टरांचे सद्गुणी असणे हे तर आहेच पण तुला स्वत्:ला देखिल त्याचे श्रेय आहेच! एकुलती एक मुलगी असल्याने तुला लाडात वाढवले असणार आईवडीलांनी. आणि सासरी एकदम विरुद्ध वातावरण असूनही धीर न सोडता तू संसार यशस्वी केलास. congratulations! आणि भावी आयुष्यासाठी तुला अनेक शुभेच्छा!
|
अनामिका तुमच वाचुन माझ्या डोळ्यात पाणि आल व तुम्ही आता सुखि आहात वाचुन आनंद हि झाला. घरातल्या स्त्रिवरच एकोप्याचि जवाबदारि ७०-८०% असते हे खर आहे. मला हि बहिण नाहि. दोन भाउ होते, मोठा भाऊ बाल वयातच गेला, त्याला मी पाहिलेल ही नाहि. दुसरा भाउ माझ्याहुन मोठा आहे आमच्यात बरच अंतर आहे. आम्हि सोबत खेळलोय पण खुप क्वचित. मी हि तस बालपण वै. एकट घालविल्याने मलाहि एकत्र कुटंबाचि खुप हौस होति पण लग्ना नंतर फिटलि काहि दिवसातच.
|
असामी मला खरच काहिच 'क्लिक' झाल नव्हत. मी हा निर्णय डोक्याने घेतलाय मनाने नाहि. मी विचार केला, "बाबांना मुलगा पसंत आहे, तो शिकलेला आहे स्व:ताच्या पायावर उभा आहे, खेड्यातला असुन हा अमेरिकेत आहे म्हणजे हा गुणी आहे. त्याचा "बारिक पणा", वयस्क दिसण हे महत्वाच नाहि; आपण गुणांना महत्व दिल पाहिजे." मनु मलाहि लग्ना नंतर बरेच दिवस विश्वासच बसेना आपल लग्न झालय याचा. लग्ना नंतर ४-५ दिवसात हे अमेरिकेत मी तिथे (माझा विसा आलेला नसल्याने). मला मधेच धक्का बसायचा "आपल लग्न झालय."मला जर थोडा जरि वेळ मिळाला असता ना मी खरच माघार घेतलि असति पण सार इतक फ़ास्ट झाल. असो. झुळुक हे खरय मी तो खेड्यातला याचा त्रागा करयला नको, जो होतो कधि कधि रागात, but Place where u grow is really very important for your over all life n करियर is true. अभिश्रुति व सुपरmom माझे ही अनुभव तुमच्या सारखेच आहेत. मी रडत असतांना हा माणुस उभा रहातो दुर कोपर्यात नी मला वाट्त रहात ह्याने जवळ घ्याव. Same about restaurant, but after reading your experience of years now I will not expect these thing from him.
|
Disha013
| |
| Wednesday, December 06, 2006 - 11:44 pm: |
| 
|
बापरे! अनामिका,किती सहन केलेस. आमचे problems किती क्षुल्लक आहेत ग! एखाद्या स्रीला जसा सद्गुणी नवरा महत्वाचा असतो ना, अगदी तसेच पुरुषाला देखील अशी धीराची बायको मिळणे हे नशीबच त्याचे. सुखात वाटेकरी आहोत,मग दु:खही वाटायलाच हवे. नाहीतर त्रागा करुन संसार मोडयला वेळ लागत नही. कितीही पुढारु दे समाज, काही मुल्ये ही शाश्वतच असतात.
|
Chyayla एकच मुल ह्यामुळे "मुलाला जरा जास्तच प्रेमाने घेतल जात हे हि चुकिच आहे" आमचे हे एकच "दिवा"त्यात खेड्यात असल्याने शाळा जवळ,सार काहि जवळ.शहरासारख नाहि सायकल वा बस, लोकल ने शाळेत जाण. शहरात माणुस खरच आपोआपच शहाणा होतो खुप काहि शिकतो. आईने कधि काहि जबाबदारिचि काम दिलि नाहित. सहज सुखि जिवन, काहि त्रास नाहि. मागितल ते मिळाल त्यामुळे कदाचित हा असा आहे अजिबात "व्यव्हारि पणा नाहि". मित्र, नातलग सार्यांनि गैर फायदा घेतलाय याचा. (Now because of me he has understood this व्यव्हारि पणा so now I m BAD for his friends n relatives.)
|
Shravanip
| |
| Wednesday, December 06, 2006 - 11:56 pm: |
| 
|
अगं परिणिता असुन देत. त्या friends आणि relatives पैकी किति खरच मदतीला येतात? कुणिच नाही. ते नुसतेच फयदा घेणारे असतात. तु अगदी बरोबर करतेयस.
|
Disha013
| |
| Wednesday, December 06, 2006 - 11:59 pm: |
| 
|
अगं,परी, माझाही नवरा असाच! मी रडत असले की स्वारी दुसर्या खोलीत निघून जाते. नवीन लग्न झाले तेव्हा फ़ार वाईट वाटायचे. याला काही देणेघेणेच नाही माझ्याशी असे समजुन अजुन रडाय्ची. आता सवय झालिये आणि कळतेय पण, की बायकोच काय कुनी रडत असले तरी त्या व्यक्तीला space देणे आपले कर्तव्य आहे असे तो मानतो. मग,रड बाई पोटभर,,असे त्याचे म्हणणे. सांगुनही फ़रक पडेना. जवळ घे, माझी समजुत काढ,असे आपल्याच तोंडाने किती वेळा सांगणार? सोडून द्यायला शिकले. आणि वर म्हणजे, हा भांडनानंतरचा रुसवा असेल तर माझ्यापेक्षा जास्त राग त्याला...मग काय...माझा राग विसरुन मी त्याचा राग घालवाय्च्या मागे! करणार काय!
|
Ajjuka U r not nobody u r great!वेब पेज हि सहिच आहे. नात नुसतच जुळवुन होत नाहि हे हि खर आहे. प्रामाणिक पणे नात्याच झाड प्रेमाच खत-पाणी घालुन वाढवाव लागत मगच काहि वर्षांनी गोड फळ मिळतात. जस तुम्हा सार्यांना मिळालित. (ह्या साठि स्त्री माळिने स्वत:ला बरच बदलाव लागत हे जरा SAD आहे आणि नवर्याच्या चुकिच्या सवयिंचि सवय न रागवता करावि लागते हे हि )
|
Shravani मी नाहि घेत मनावर. शेवटि संसार मला करायचाय. "लग्ना नंतर बदलाय, आम्हाला विसरलाय" निदान हे एकण्याचि सवय मला झालिय. नातलगांचे नसते फोन हि बंद आहेत सध्या. नाहितर ह्यांचे Friends, मामा, मावश्या १-१ तास फोन वर. नसता खर्च व नसते सल्ले. फोन बाबत आमच्या बाबांचि जि शिस्त होति त्याच महत्व जाम पटलय मला. तुम्हाला विश्वास नाहि बसणार पण एकदा ८०० USD बिल झाल टि मोबाईलच of 10-12 days. फोन suddenly बंद झाला. टि मोबाईलला (customer care) फोन केला "U r bill is 800 USD, which is too much 1st pay it then mobile will be activated" 800 USD only in 10-12 days not for a month. ह्यांच्या घरात शिस्त हा प्रकारच नाहि. त्यांचि आई इतकि बोलते फोन वर १-१ तास, बोलण काय, तेच तेच प्रश्न दहा वेळा विचारयचे आणी अजुन काय अजुन काय विचरत रहाते वर "काकाला फोन कर, मामाला कर सांगत रहाते". Anyway thanks to all for sharing your life n giving me suggestions.
|
Ajjuka
| |
| Thursday, December 07, 2006 - 4:28 am: |
| 
|
| माझ एक निरिक्षण आहे ज्या मुली किन्वा मुल त्यान्च्या पालकाना एकुलते एक असतात त्यान्ची मानसिकता थोडी वेगळीच असते. एकच मुलगा किन्वा एकच मुलगी असेल आणी सोबतीला कोणी रक्तातल्या नात्याच भावन्ड नसेल तर त्याना हे कळत नाही की आपण पुरुषाबरोबर किन्वा स्त्रि बरोबर कसे वागावे पर्यायानी लग्नानन्तर नवरा, बायकोबरोबर. | च्यायला (हे दोन्ही अर्थी घ्या संबोधन आणि उद्वेगपूर्ण उद्गार )... काहीही काय... आम्ही दोघेही एकुलते एक आहोत. दोघांनाही ना सख्खी बहीण ना भाऊ. sharing ची सवय नसते इतपर्यंत ठीक आहे पण ती होते. भरपूर भावंड, नातेवाईक या गोतावळ्यात वाढलेल्यांना सुद्धा दुसर्या gender च्या माणसांशी कसे वागावे हा sense असतोच असे नाही. तुम्ही कसे वाढलात, तुमच्यावर झालेले संस्कार, आजूबाजूची परिस्थिती या सगळ्यावर हे अवलंबून असते. असो. बाकी मी nobody असण्यानसण्याबद्दल चर्चा नंतर करू.
|
तुम्हा सगळ्याचे अनुभव वाचले.. खरेच समाजाने प्रगती केली आहे का? माझी आजी कायम सागते की ती लग्न करून आली तेव्हा तिला नऊवारी नेसता येत नव्हती.. आजोबा मदत करायचे पण त्या काळी तिला कधी काम येत नाही म्हणून ऐकून घ्यावे लागले नाही. उलट एकत्र कुटुम्बातल्या सगळ्या बायका एकमेकीना मदत करायच्या.. आता कुटुम्ब लहान झाली आहेत..पण अपेक्षा वाढल्या आहेत,,
|
Anamikaa
| |
| Thursday, December 07, 2006 - 1:34 pm: |
| 
|
सगळ्यांचे मनापासुन अभार. आज मी जेंव्हा मागे वळुन बघते तेंव्हा मी काय काय गमावले याचा अंदाज येतो................. ज्यांना मी कायम आपले मानले आणि ज्यांच्यावर जिवापाड प्रेम केले त्यांनि मला इतके वाईट वागवले. आज तुम्हा सगळ्यांकडे मन मोकळ करते. मला आशा आहे तुम्ही मला समजुन घ्याल आणि जर कुठे माझे चुकलेय किंवा चुकतेय असे वाटत असेल तर प्रेमाने माझि कानऊघडणी देखिल कराल. काहि गोष्टिंचा उल्लेख मी मागिल पोस्ट मधे केला आहेच. अजुनहि काहि आहे जे तुमच्याशि बोलुन मला माझ्या कोंडलेल्या भावनांना वाट मोकळि करुन द्यायचि आहे. माझ लग्न झाल तेंव्हा मी फ़क्त २० वर्षाची होते. लग्न ओळखितल्या मुलाशीच ठरले त्यापेक्षा मीच जमवले हे म्हणणे जास्त योग्य ठरेल. माझ्या समोर जेंव्हा "त्यांनी" त्यांच्या भावना प्रकट केल्या तेंव्हा मी बी ए च्या पहिल्या वर्षाला होते. काहि कळायचे वय नव्हते अल्लड वयात भावनेच्या भरात चुकिचा निर्णय घेण्याचि माझि तयारि नव्हति आणी म्हणूनच आधी मी मनापासुन तयार नव्हते. कारण शिक्षण पुर्ण करायचे होते. मला माझ्या वडिलांची मी वकील व्हाव ही ईच्छा पुर्ण करायची होती. पण मधल्या काळात "यांच्या" वडिलांनी माझ्या बाबांकडे माझ्या बाबतित विचारणा केली. आणि बाबा लगेच तयार झाले. तसेच यांच्या बहिणि देखिल मी होकार द्यावा म्हणुन मागे लागल्याच होत्या. आणि याच काळात माझ्या मनात देखिल "यांच्या "बद्दल एक अनाहुत ओढ निर्माण होऊ लागलि होति. खर सांगायचे तर मी नकार दिल्यावर देखिल "यांनी" हार मानली नव्हती मला भेटायला, बघायला ते नेहमी घरी किंवा कॉलेजला यायचे.माझ्या मैत्रिणि नेहमि मला म्हणायच्या अग किति अंत बघशील त्याचा आता योग्य निर्णय घे आणि होकार कळवुन टाक तो समोर आला कि तुला किति आंनद होतो हे काय आम्ही तुला सांगायला हवे का?इत्यादि इत्यादि. त्यांचे निरिक्षण चुकिचे नव्हतेच म्हणा शेवटी! आणि एकदाचा धिर करुन मी "यांना" होकार दिला. अजुनहि त्या वेळचा यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आहे एखाद्या लहान मुलाला त्याने मागितलेलि त्याच्या आवडिचि वस्तु मिळाल्यावर जसे आनंदी भाव त्याच्या डोळ्यात असतात तसे भाव होते यांच्या मुखावर. माझा हात हातात घेवुन फ़क्त इतकेच म्हणाले "हे" शोनु! खुप वाट बघायला लावलीस पण आज मला जे हवे होते ते मिळाले आता देवाकडे दुसरे काहि मागणे नाहि. मला ते शब्द ऐकुन स्वर्ग दोन बोटे उरल्याचा भास झाला. त्यांच्या उत्कट प्रेमाच्या वर्षावात मी न्हाउन निघाले होते. मी विचार करत होते असे काय असावे माझ्यात कि ज्या मुळे यांचा जिव जडला माझ्यावर? .घरी सांगितल्यावर आईबाबांना देखिल खुप आनंद झाला काहि कारणास्तव यांच्या घरी जाणे झाले असता सासर्यांनि सहेतुकपणे माझि विचारपुस केली. त्याच्या घरचे देखिल त्याक्षणी आनंदिच भासले मला. यांच्या लहान भावाशी माझी आधिपासुनच गट्टि होती. आजोळी गेले कि एकत्र खेळणे गप्पा मारणे फ़िरणे व्हायचेच. मी पण आपलेच घर समजुन वावरायचे. घरातील कामे करणे.विहिरिवरुन पाणि भरणे यासारखि कामे न सांगता करत होते. सगळ्यांशि जुळवुन घेत होते,हवे नको ते बघत होते. सगळ सुरळीत चालु होते आणि अचानक माझे सासरे देवाघरि गेले(कशामुळॅ ते मी मागेच उधृत केलेच आहे) . आणि या नंतर सगळे चित्र बदलले. आणि मला वास्तविकतेचे भान आले. घरातले वर्चस्व आपल्या हातात राखण्याच्या स्पर्धेत सगळे गूंतले होते.याला अपवाद फ़क्त "हे" च होते. वडिलांच्या आठवणींनि व्याकुळ झालेल्या यांना कुणाचाच आधार नव्हता. मी पण हतबल होते कारण मला "त्यांच्या" जवळ राहता येत नव्हते. आणि त्याक्षणी त्यांना सगळ्यात जास्त गरज माझी होति. शेवटि आपण ज्या समाजात रहातो त्याचि काहि बंधने पाळणे क्रमप्राप्त असते आणि त्यांना एकट ठेवणे हि काळाचीच गरज होति. कारण काळ हे प्रत्येक दुःखावर उत्तम औषध असते! त्यानंतर जेंव्हा ते मला भेटायला आले तेंव्हा माझ्या कुशित शिरुन लहान मुलासारखे ओक्साबोक्शी रडले होते. आणि तेंव्हाच मि मनाशी निश्चय केला कि कितिहि अडचणी आल्या तरिहि आपण यांचि साथ सोडायची नाहि. आता जरा थांबते कारण मन त्या आठवणीनि इतक विषण्ण झालय कि पुढे काय लिहावे? ते सुचेनासे झालय. मला खात्रि आहे तुम्हि समजुन घ्याल. अनामिका
|
Megha16
| |
| Thursday, December 07, 2006 - 4:54 pm: |
| 
|
परी, तुझा जो प्रोबलेम आहे तो बहुतेक कॉमन आहे कारण. बायका जश्या आपल्या मनातल लगेच दाखवतात तस नवरे सहसा बोलत नाहीत. त्यामुळे थोडफार खटके उडवतात... खेड्यातला लाजाळु पणा आणी शहरातला बिनधास्तपना एकत्र आल्यावर थोडा तर आवाज होईल च ना... आता तु च पुढाकार घे, तुझ्या नवरया शी बोलायचा, छोटे plan करण्याचा प्रयत्न कर. तुला लगेच + रीप्लाय मिळेल हे मी सांगत नाही पण मिळेल हे नक्कि. अनामिका, तु ज्या परिस्थीतुन आली आहेस तुला खरच मानाव लागेल.तुझा नवरा खरच लकी आहे त्याला तुझ्या सारखी बायको मिळाली. कारण तस पाहिल गेल तु ला नंतर नकार ही देऊ शकत होतीस. पण तुच त्याला आधार दिलास.... तुला लग्न करण्यासाठी तुला तुझ्या सासरच्यानी ज्या अटी किंवा कारण दिली होती... तरी सुधा तु लग्ना ला तयार झालीस.... खरच तु खुप ग्रेट आहेस...
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|